#ट्रॅकिंग
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 24 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १४ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा-पंतप्रधान आज उत्तर देणार • भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी • ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ आणि • बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग
राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत कालपासून संविधानावर विशेष चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर देणार आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल या चर्चेला प्रारंभ केला. देशाचं संविधान हा फक्त एखादा दस्तऐवज नसून, नागरिकांच्या आकांक्षांची अभिव्यक्ती असल्याचं, राजनाथसिंह यांनी नमूद केलं. नागरिकांनी तयार केलेलं हे संविधान, भारतीय मूल्यांवर आधारित असल्याचं, राजनाथसिंह म्हणाले. काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी या चर्चेत भाग घेत, संविधान हे नागरिकांच्या संरक्षणाचं सुरक्षा कवच तसंच न्याय, एकता आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराचं कवच असल्याचं मत व्यक्त केलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी, संविधान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं सांगितलं, तर तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी गेल्या दहा वर्षात देशाची धर्मनिरपेक्ष वीण उसवत चालल्याची टीका केली. संयुक्त जनता दलाचे नेते केंद्रीय मंत्री राजीवरंजन ऊर्फ लल्लनसिंह यांनी यावेळी बोलतांना, संविधानामुळे समाजाच्या सर्वच घटकांसाठी सामाजिक तसंच आर्थिक प्रगतीच्या कक्षा रुंदावतात, असं सांगितलं. आणिबाणी लागू करणं तसंच परिच्छेद ३५६ चा दुरुपयोग करण्याबद्दल काँग्रेसवर टीका केली.
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला काल २३ वर्षं झाली. या हल्ल्यात वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना काल संसद परिसरात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अभिवादन केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहातही मौन पाळून या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं.
भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्‌घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचे पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक ने तो सांस्कृतिक पुनरुत्थान भी हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व मे हो रहा है। ये सारी चीज से मिलाकर भारत को एक मजबूत देश के रूप मे प्रस्थापित कर रही है। और ऐसे समय इस भारत के पॉवर हाऊस के रूप में महाराष्ट्र को प्रस्थापित करने का काम करेंगे.’’
येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारी रोजी शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरूणाईसाठी विशेष अभियान सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीत कन्व्हर्सेशनल इमेज रेकग्निशन चॅटबॉट', 'महिला सुरक्षा', 'ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय', 'लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग, नवी मुंबईतल्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या जेएनईसी तसंच राजर्षी शाहू अभियांत्र���की महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षीसं पटकावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दत्त जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं नांदेड जिल्ह्यात माहूर गडावरच्या दत्तशिखरासह ठिकठिकाणच्या दत्तमंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंबड इथं दत्तजयंती संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. सामगायनानं प्रारंभ झालेल्या या तीन दिवसीय संमेलनात आज आणि उद्या दररोज दोन सत्रांत मान्यवर कलावंतांकडून गायन, वादन तसंच नृत्य सादरीकरण होणार आहे. पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात होत असलेल्या या संगीत महोत्सवाचं हे शतकपूर्ती वर्ष आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून समारोप डॉ. आदित्य पतकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे… ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना, १० डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमधून तर अन्य एक आरोपी प्रतिक भिमराव घुले यास ११ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून होणार आहे.’’ रवी उबाळे आकाशवाणी बातम्यांसाठी बीड.. खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल केज तहसील कार्यालयात बैठक घेऊन, सदर प्रकरणाचा जलद गतीने करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मराठा समाजाच्या वतीने काल बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. बीड शहरासह जिल्हाभरात सर्व ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ काल जालना इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी तसंच परभणी इथं पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाया थांबवण्यात याव्यात, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे ��रण्यात आली. परभणी इथल्या अप्रिय घटनेप्रकरणी मुख्य सूत्रधाराविरोधात देशद्��ोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांविरोधातले दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी, बीड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान, परभणी बंद काळात वृत्तपत्र कार्यालयास पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी परभणी जिल्हा पत्रकार संघाने केली आहे. काही समाज कंटकांनी दमदाटी करत कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस संरक्षण पुरवण्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे.
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल समृध्दी महामार्गावर कारवाई करत गुटखा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कंटेनर चालक इरफान रहीम सय्यद याच्यासह अन्य दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
नागरिकांनी ध्वजदिन निधीमध्ये आपले योगदान देवून जिल्ह्यात जास्तीत जास्त ध्वजदिन निधी संकलित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. त्या काल ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होत्या. सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात, लातूर जिल्हा प्रशासन यापुढेही पुढाकार घेत राहील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात काल ड्रोन विषयी माहिती आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली. शेतकरी तसंच कृषी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्राचे विषयतज्ज्ञ दत्ता पाटील तसंच प्राध्यापक गीता यादव यानीं सविस्तर माहिती दिली.
पर्जन्य जलपुनर्भरण प्रकल्पातून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल, असा विश्वास निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात वडगाव जहागीर इथं या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. तालुक्यातल्या ३१ गावात शासकीय इमारती, शाळा, वाचनालयं, तसंच सभागृहांच्या छतावर जवळपास एक हजार सत्तावीस ठिकाणी पर्जन्य जलपुनर्भरण यंत्रणा बसवण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये १६ ते २० डिसेंबर या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र-कुसुम हे अभियान राबवण्यात येणार आहे, लातूर इथं आशा कार्यकर्त्या आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. कुष्ठरुग्णांच्या सहवासातल्या व्यक्ती��ना खबरदारी म्हणून औषधाची एक मात्रा यावेळी देण्यात येईल, ��्यामुळे घरी येणाऱ्या पथकामार्फत तपासणी करून घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
क्रिकेट बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना नुकताच सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद २४ धावा झाल्या होत्या. मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' जिथं जाईल तिथे तो हजर ' , गुजरातच्या प्रियकराचा कारनामा आला समोर
सोशल मीडियावर सध्या गुजरातच्या एका प्रियकराची जोरदार चर्चा सुरू असून सुरत येथे हा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपले एकतर्फी प्रेम असलेली ही तरुणी कुठे जाते यासाठी गुजरातच्या एका महाभागाने चक्क तिच्या गाडीला गुपचूप जीपीएस लावलेला होता आणि त्या माध्यमातून तो तिचे ट्रॅकिंग करत असायचा. तरुणी कुठेही गेली तरी तो काही सेकंदात तिच्यासमोर हजर व्हायचा. सदर तरुणीला काही दिवस हा प्रकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ब्लूटूथ कॉलिंग आणि हेल्थ ट्रॅकिंग फीचर्ससह Pebble च्या दोन शानदार स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत खूपच कमी
ब्लूटूथ कॉलिंग आणि हेल्थ ट्रॅकिंग फीचर्ससह Pebble च्या दोन शानदार स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत खूपच कमी
ब्लूटूथ कॉलिंग आणि हेल्थ ट्रॅकिंग फीचर्ससह Pebble च्या दोन शानदार स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत खूपच कमी Pebble Smartwach Launched: Pebble ने भारतीय बाजारात आपल्या दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केल्या आहेत. या स्मार्टवॉचची किंमत ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे. या वॉचमध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. Pebble Smartwach Launched: Pebble ने भारतीय बाजारात आपल्या दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केल्या आहेत. या…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
iphone: Apple चे AirTags कार चोरण्यासाठी कसे वापरले जात आहेत
iphone: Apple चे AirTags कार चोरण्यासाठी कसे वापरले जात आहेत
या वर्षाच्या सुरुवातीला, सफरचंद त्याचे लाँच केले ट्रॅकिंग AirTags नावाचे उपकरण. किल्‍या, बॅकपॅक आणि बरेच काही यांसारख्या हरवलेल्या वस्तू शोधण्‍यासाठी ते उपयोगी असले तरी, त्‍यांचा गैरवापर होत असल्‍याची जाणीव नेहमीच होती. असं वाटत आहे की चोर कॅनडामध्ये कार चोरण्यासाठी AirTags वापरत आहेत. अनेक ऑनलाइन अहवालांनुसार, ओंटारियोचे यॉर्क प्रादेशिक पोलिस चोरांकडून एअरटॅग कसे वापरले जात आहेत याबद्दल चेतावणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 3 years ago
Text
पुणे ब्रेकिंग..कुरियर ट्रॅकिंग करायला गेला अन..
पुणे ब्रेकिंग..कुरियर ट्रॅकिंग करायला गेला अन..
लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगार काय शक्कल लढवत आहेत याचा काही नेम राहिला नाही. अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर आलेली असून पुण्यातील एका कुरिअर कंपनीने कुडाळ साळगाव येथील एका युवकाला तब्बल 74 हजार रुपयांना गंडा घातलेला आहे. कंपनीने त्या युवकाला कूरियर ट्रेकिंगची लिंक पाठवली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Fossil चे शक्तिशाली Gen 6 Hybrid Smartwatch लाँच केले, Amazon Alexa सपोर्ट देखील मिळेल
Fossil चे शक्तिशाली Gen 6 Hybrid Smartwatch लाँच केले, Amazon Alexa सपोर्ट देखील म��ळेल
फॉसिल स्मार्टवॉच जनरल ६: Fossil ने त्याचे Gen 6 Hybrid स्मार्टवॉच उघड केले आहे. यूएस मध्ये त्याची सुरुवातीची किंमत $ 229 (सुमारे 17,900 रुपये) आहे आणि ती कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेट्सद्वारे 27 जून रोजी विक्र��साठी उपलब्ध होईल. या वेअरेबलला एक राउंड डायल, दोन आठवडे बॅटरी लाइफ, SpO2 ट्रॅकिंग वैशिष्ट्य आणि Amazon Alexa साठी सपोर्ट मिळतो. Fossil Gen 6 Hybrid हे अॅनालॉग घड्याळाच्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 December 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन दिलं. या अपघाताचा तपास करण्यासाठी हवा�� दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रावत हे एका कार्यक्रमासाठी वेलिंग्टन इथल्या मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये जात होते. सुलुल एअरबेसचा दुपारी १२ वाजून आठ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. जंगलात काही स्थानिक लोकांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी काही वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कुन्नूर इथं हेलिकॉप्टर कोसळल्याच्या ठिकाणी पाहणी केली. वेलिंग्टन इथल्या मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये आज रावत यांच्यासह १३ जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिव देहावर उद्या दिल्ली छावणी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रकार ओमायक्रोनचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरचे उपचार कोविड केंद्रांमध्ये बनवण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात केले जातील, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण अन्य कोविड बाधित व्यक्तींच्या संपर्कात येऊ नयेत याची काळजी घेण्याचे निर्देश, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. ओमायक्रॉन बाधित रुग्णांचे चाचणी अहवाल जनूकीय अनुक्रम सिक्वेन्सिंगसाठी निर्धारित करण्यात आलेल्या प्रयोगशाळांकडे पाठवले जावेत, तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सात टक्क्याहून जास्त आहे, त्या ठिकाणी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यामध्ये दिले आहेत.
****
कोविड-19 वर देशांद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाचं पुन्हा मुल्यांकन करावं आणि ओमायक्रॉनविरुद्ध सज्जतेसाठी लसीकरणाची गती वाढवावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. कोविड-19 वरील वर्तमान लसी ओमायक्रॉनविरुद्ध कितपत परिणामकारक ठरतील हे इतक्यातच सांगता येणार नाही, असंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १३० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात ८० लाख ८६ हजा�� ९१० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या, १३० कोटी ३९ लाख ३२ हजार २८६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या नऊ हजार ४१९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ४६ लाख ६६ हजार २४१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ७४ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल आठ हजार २५१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४० लाख ९७ हजार ३८८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ९४ हजार ७४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या, शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी, मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व नियमित आणि पुन्हा परीक्षेस बसणारे तसंच, खासगी, श्रेणी सुधार आणि तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना, २० डिसेंबर २०२१ पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार असून, २१ डिसेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची सुविधा, मंडळानं उपलब्ध करून दिली आहे.
****
बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून, यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत, उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, असं ते म्हणाले.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भराकी पथकानं नंदुरबार जिल्ह्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अवैधपणे परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त केला आहे. या बॉडीपॅक कंटनेर मध्ये हरियाणा राज्यात निर्मिती आणि विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचे ४८८ बॉक्स आढळून आले. यावेळी ६२ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली -कृषी मंत्री दादाजी भुसे
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली -कृषी मंत्री दादाजी भुसे
मुंबई : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 3 years ago
Text
पुणे ब्रेकिंग..कुरियर ट्रॅकिंग करायला गेला अन..
पुणे ब्रेकिंग..कुरियर ट्रॅकिंग करायला गेला अन..
लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगार काय शक्कल लढवत आहेत याचा काही नेम राहिला नाही. अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर आलेली असून पुण्यातील एका कुरिअर कंपनीने कुडाळ साळगाव येथील एका युवकाला तब्बल 74 हजार रुपयांना गंडा घातलेला आहे. कंपनीने त्या युवकाला कूरियर ट्रेकिंगची लिंक पाठवली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गुगल डाऊन!
गुगल डाऊन! आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार सोमवारी हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन होते. डाउनडिटेक्टरच्या मते, जगातील सर्वात मोठ्या शोध इंजिनसह समस्यांची तक्रार करणार्‍या लोकांच्या 40,000 हून अधिक घटना घडल्या आहेत, जे त्याच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याने सबमिट … आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार सोमवारी हजारो वापरकर्त्यांसाठी Google डाउन होते. डाउनडिटेक्टरच्या मते, जगातील सर्वात मोठ्या शोध इंजिनसह समस्यांची…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली -कृषी मंत्री दादाजी भुसे
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली -कृषी मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 8 : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत…
View On WordPress
0 notes
agrojayyworld · 5 years ago
Text
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट. डेटा सायन्स आणि आयओटी
जगभरात 821 दशलक्ष लोकांना भूक लागली आहे, ज्यात 150 दशलक्षाहून अधिक मुले आहेत. गरीबी, हवामान बदल, अन्नाची नासाडी, राजकीय संघर्ष आणि अन्नाची कमतरता यासारखे अनेक घटक उपासमारीच्या उच्च दरासाठी जबाबदार आहेत. वाढत्या जागतिक उपासमारीचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे गुणवत्ताभूत पायाभूत सुविधांची कमतरता आणि सरकारी आणि खासगी गुंतवणूकीचा अभाव. म्हणूनच, एकाधिक जागतिक ना-नफा संस्था सतत या परिस्थितीच्या संकटासाठी नवीन आणि चांगल्या उपाय शोधत असतात.
आयओटी आणि एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आगमन आधीच अनेक उद्योग क्षेत्रात बदल घडवून आणत आहे. त्याचप्रमाणे, आयओटी सारखी प्रगत तंत्रज्ञान जागतिक स्तरावर उपासमारीची समस्या कमी करण्यासाठी स्मार्ट शेतीची सुरूवात करून शेती क्षेत्रात क्रांती घडवत आहे. आयओटी वापरुन स्मार्ट शेती करणेः
पीक उत्पादन प्रभावीपणे सुधारण्यासाठी,
हवामान आणि मातीचे विश्लेषण सक्षम करा आणि
शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी कीटकांची संख्या नियंत्रित करा.
शिवाय, आयओटीचा वापर करून स्मार्ट शेती शाश्वत शेती पध्दतीस प्रोत्साहन देईल ज्यायोगे शेतकरी, सरकारी संस्था आणि खाजगी घटकांचे नफा वाढतील. पुढील घडामोडींसह, शेती प्र��्रिया स्वयंचलित आणि सूक्ष्म-व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात ज्या पारंपारिक शेती पद्धतींनी सध्या अशक्य आहे.
आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) चा वापर करून स्मार्ट शेती
स्मार्ट शेतीमुळे अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण अनुप्रयोगांचा विकास सक्षम होईल ज्यायोगे शेतकरी आणि कृषी क्षेत्राला फायदा होईल. स्मार्ट शेतीची काही प्रगत आयओटी शक्तीच्या उपयोग प्रकरणे अशी आहेत.
फील्ड मॅनेजमेंट
शेती व्यवस्थापन ही शेतीसाठी सर्वात आवश्यक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान, शेतकरी माती आणि पिकांची स्थिती तपासून काढणीच्या तारखांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या उत्पन्नातून मिळणाऱ्यां महसुलाचा अंदाजही शेतकरी व्यक्त करतात. आ��ओटीचा वापर करून स्मार्ट शेती क्षेत्र व्यवस्थापन पद्धती सुलभ करेल आणि शेतीकडे डेटा-केंद्रित दृष्टिकोन लागू करेल. आयओटी सेन्सर शेताच्या पलिकडे असलेल्या मातीमध्ये मातीची रचना आणि पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवता येतात. आयओटी सेन्सरचा वापर करून स्मार्ट शेती महत्त्वपूर्ण डेटा संकलनास सक्षम करेल जी शेताचा इतिहास, मातीतील ओलावा आणि वनस्पती नकाशावर अंतर्दृष्टी प्रदान करेल. तसेच, आयओटी सेन्सर मातीचे आरोग्य राखण्यासाठी मदतीसाठी मातीत कीटकनाशके मोजू शकतात. याव्यतिरिक्त, आयओटी सेन्सर सिंचन आणि कीटकांच्या प्रादुर्भावासाठी इशारा पाठवू शकतात आणि कापणी व पीक घेण्याच्या वेळेचा अंदाज घेऊ शकतात. कीड आणि उंदीर हे एक मोठे आव्हान आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आयओटी सेन्सरसह स्मार्ट ट्रॅप एकत्रित करणे एक उत्तम दृष्टीकोन आहे. आयओटी सेन्सर शेतक-यांना कीटकांच्या प्रादुर्भावासाठी हॉटस्पॉट्सविषयी रिअल-टाइम मध्ये सूचित करू शकतात जेणेकरून शेतकरी कृतीशीलतेने कार्य करू शकतील.
हवामान विश्लेषण आणि अंदाज
हवामान बदलासारख्या पर्यावरणीय घटनांचा कृषी उत्पादनावर खोलवर परिणाम होतो. आयओटी वापरुन स्मार्ट शेती केल्यामुळे हवामानातील बदलाचे विश्लेषण चालू हवामान पद्धती आणि पिकावरील परिणाम समजून घेण्यास मदत होईल. आयओटीचा वापर करून स्मार्ट शेती केल्याने शेतकरी त्यांच्या पिकांसाठी हवामान योग्य आहे की नाही हे ठरवू शकतात आणि विशिष्ट हवामान-प्रकारात जास्त उत्पादन देणारी बियाणे निवडू शकतात. या पध्दतीचा वापर करून, शेतकरी हवामानाच्या परिस्थितीशी प्रभावीपणे जुळवून आपला नफा अधिकाधिक वाढवू शकतात.
उपकरणे ट्रॅकिंग
आयओटी सेन्सर शेतीची उपकरणे आणि शेतीतील वाहने जसे की ट्रॅक्टर आणि फार्म ट्रकमध्ये स्थापित केले जाऊ शकतात. अशा सेन्सरद्वारे उपकरणे आणि वाहनांचे स्थान ट्रॅक करणे शक्य होईल. तसेच, आयओटी सेन्सर शेतीतील यंत्रे आणि ��पकरणे यांच्यातील दोष ओळखून उपकरणांचे अपयश रोखू शकतील आणि त्यांची देखभाल करण्यास अनुमती देईल. आयओटी सेन्सर कामगिरी, तेलाचे तापमान, वेग, आरपीएम, टायर प्रेशर आणि शेतीची यंत्रणा आणि वाहनांचे बॅटरी आयुष्य देखील मोजू शकतात. जेव्हा इंधन किंवा बॅटरीची पातळी कमी असेल किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत त्वरित कारवाईची मागणी केली जाईल तेव्हा शेतकरी सतर्क होऊ शकतात. उदाहरणार्थ, बियाणे लागवड करताना ट्रॅक्टरचा वेग सुमारे 6 मैल प्रति तास असावा. वेग त्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना सूचित केले जाईल आणि ते ड्रायव्हरला वेगवान करण्यास सांगू शकतात.
पशुधन देखरेख
गायी, मेंढ्या आणि कुक्कुटपालन यासारख्या जनावरांना खायला घालणे आणि त्यांची काळजी घेणे हे शेतकर्‍यांसाठी एक आवश्यक काम आहे. कॉलर टॅग वापरुन प्राण्यांशी जोडलेले आयओटी सेन्सर स्थान ट्रॅक करण्यास अनुमती देतील. आयओटी सेन्सर वापरुन स्मार्ट शेती करणे शरीराचे तापमान, पौष्टिक माहिती आणि प्रत्येक प्राण्यांसाठी शारीरिक क्रिया यासारख्या गंभीर डेटा गोळा करून आणि प्रत्येक प्राण्यांच्या आरोग्याचा डेटा लॉग राखून पशुधनांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यास सक्षम असेल. आयओटी सेन्सर देखील जेव्हा जनावरे त्यांचे आजारी असतात किंवा कामगार असतात तेव्हा त्यांना सूचित करतात. तसेच, त्यांचे आहार आणि पोषणविषयक गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी शेतकरी त्यांच्या पशुधनाचे आहार पद्धती ओळखू शकतात.
हरितगृह शेती
ग्रीन हाऊस शेतीमुळे छोट्या-छोट्या उत्पादनासाठी शेतीसाठी खर्च-प्रभावी पद्धती लागू केल्या आहेत. आयओटीचा वापर करून स्मार्ट शेती डेटा-चालित आणि स्वयंचलित फ्रेमवर्कसह ग्रीनहाऊस शेती सुधारू शकते. आयओटी सेन्सर तापमान, मातीची रचना आणि रिअल-टाइममधील मातीची आर्द्रता यांचे परीक्षण करू शकतात. असा गंभीर डेटा गोळा केल्याने पिकांची आणि मातीची स्थिती आणि शेतीच्या उत्पादनाचा अंतर्दृष्टी येईल. आयओटीचा वापर करून स्मार्ट शेती केल्याने विश्लेषित व संभ्रमित डेटाचा उपयोग पिकाचे उत्पादन सुधारण्यासाठी प्रभावी रणनीती तयार करण्यास अनुमती मिळेल. शिवाय, IOT सेन्सर वनस्पती पुराणमतवादी पाण्याच्या वापराच्या पद्धती लागू करण्यासाठी स्वयंचलित सिंचन देऊ शकतात.
ऊर्जा आणि जलसंधारण
जागतिक स्तरावर पाण्याच्या 70% वापरासाठी शेती जबाबदार आहे. त्याचप्रमाणे शेतीही वेगवेगळ्या कारणांमुळे उर्जा वापरते. म्हणूनच, खर्चाची गणना करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची उर्जा आणि पाण्याच्या वापरावर देखरेख करावी लागेल. आयओटी वापरुन स्मार्ट शेती करून, सेन्सर पाण्याचा वापर, गुणवत्ता आणि तपमानांचे परीक्षण करू शकतात. गोळा केलेला डेटा संपूर्ण शेतात पाण्याचा प्रवाह आणि वितरण समजण्यास मदत करेल. आयओटी-चालित गळती शोधक पाण्याची बचत करण्यासाठी सदोष पाईप्�� आणि गळती उपकरणे ओळखतील. त्याचप्रमाणे, आयओटी-आधारित स्मार्ट मीटर विविध शेती प्रक्रियेत उर्जा वापराचा मागोवा घेऊ शकतात. पाणी आणि उर्जा वापराची माहिती शेतकऱ्यांना संवर्धनाची रणनीती अंमलात आणण्यास आणि अक्षय उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहित करण्यास मदत करेल.
स्मार्ट शेतीत भविष्यातील ट्रेंड
आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अधिक नवकल्पना घेऊन, अधिक परिष्कृत कृषी अनुप्रयोग जे ऑटोमेशन सक्षम करतील आणि फील्ड व्यवस्थापन सुलभ करतील. स्वयंचलित आणि कार्यक्षम शेती तंत्र तयार करण्यासाठी स्टार्टअप्स आणि विकसक निरंतर विविध तंत्रज्ञानावर संशोधन करीत आहेत.
स्वायत्त कारच्या आगमनाने रस्त्यांची सुरक्षा सुधारेल आणि रहदारी कमी करावी लागेल. अशी स्वायत्त वाहने कृषी क्षेत्रातही आणली जातील. स्वायत्त ट्रॅक्टरमध्ये नेव्हिगेशनसाठी आयओटी सेन्सरचा वापर करून शेतकरी स्मार्ट शेती लागू करू शकतात ज्यायोगे शेतकरी आपल्या शेतात शेतात ट्रॅक्टरचा मार्ग तयार करू शकतील. हे ट्रॅक्टर मातीच्या अवस्थेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देखील गोळा करतात आणि आपोआप बिया देखील लागवड करतात.
स्वयंचलित शेतीचा ट्रेंड शेती प्रक्रियेत उत्पादकता वाढविणार्‍या शेती रोबोट्सना देखील वाढ देईल. शिवाय, फोटॉनिक्स तंत्रज्ञानाची एक शाखा, अ‍ॅग्री-फोटोनिक्स, कृषी प्रक्रिया सुधारण्यासाठी विविध शक्यता शोधून काढू शकते. उदाहरणार्थ, शेती पिकांचे उत्पादन आणि मातीच्या प्रकाराचे विश्लेषण करण्यासाठी शेतांचे 3 डी नकाशे तयार करण्यासाठी लीडरची अंमलबजावणी करुन कृषी ड्रोन शेतकऱ्यांना फायदा करु शकतात. लिडर मॅपिंग देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यास आणि मातीची धूप असणारी क्षेत्रे ओळखण्यात मदत करते.
किंबल कस्तुरीचा इनडोअर फार्मिंग प्रोजेक्ट स्थानिक पातळीवर असणाऱ्यां, प्रक्रिया नसलेल्या अन्नास आणि शेतीकडे सहस्रावधी चालविण्यास प्रोत्साहन देत आहे. प्रकल्प मुळात शिपिंग कंटेनर वापरतात जे असंख्य वनस्पतींच्या शेतीसाठी इनक्यूबेटर म्हणून काम करतात. एकट्या 320 चौरस फूट उष्मायंत्र दिवसातून फक्त 8 गॅलन पाण्याने वर्षामध्ये 2 एकर शेतीप्रमाणेच पिके काढू शकतात.
शिवाय, इनक्यूबेटरमध्ये स्मार्ट हवामान नियंत्रणासह, शेतकरी विविध प्रकारचे पीक घेऊ शकतात. अशा अत्याधुनिक प्रकल्पातून असे सूचित होते की तंत्रज्ञानाने चालवलेल्या शेतीचा आगमना अगदी जवळ आला आहे. सतत संशोधन आणि विकासामुळे आयओटी आणि एआय चा वापर करून स्मार्ट शेती लवकरच प्रत्येक शेतक to्यांना मिळू शकेल. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाची उपस्थिती आणि त्याचे फायदे हे मान्य न करता स्मार्ट शेती कधीही पात्रतेने उचलू शकणार नाही. म्हणूनच, ��धुनिक तंत्रज्ञानाविषयी आणि शेतीत त्यातील अनुप्रयोगांबद्दल शेतकऱ्यांना शिक्षित करणे आणि त्यांना आधार देण्यासाठी पुरेशी संसाधने पुरविणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Mi Smart Band 6 कमी किमतीत उपलब्ध आहे, येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या
Mi Smart Band 6 कमी किमतीत उपलब्ध आहे, येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या
Mi Smart Band 6 भारतात: Mi Smart Band 6 गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च झाला होता. Amoled डिस्प्ले Mi Smart Band 6 सह उपलब्ध आहे. यामध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि हार्ट रेट ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याचा बॅटरी बॅकअप 14 दिवसांचा असल्याचा दा��ा केला जात आहे. Mi Smart Band 6 band ची किंमत बाजारात 3,499 रुपये होती. त्याच किमतीत लॉन्च करण्यात आला होता. पण आता Mi Smart Band 6 भारतीय बाजारात 500…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 August 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राह���्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल केल्याशिवाय मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही- अशोक चव्हाण.
·      कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रथम वर्षाकरता बारावीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
·      राज्यात सहा हजार १२६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर ३७० बाधित.
·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक सूचना जारी.
·      मनरेगा योजनेतल्या गैरप्रकारांच्या चौकशीत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.
·      शेगावच्या संत श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन.
·      टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा जर्मनीसोबत सामना सुरु.
·      आणि
·      मुष्टियोद्धा लवलिना बोर्गोहेनला कांस्यपदक, कुस्तीत रविकुमार दहिया अंतिम फेरीत.
****
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल केल्याशिवाय मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही, असं मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळानं काल झालेल्या बैठकीत सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग निश्चित करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला, त्या पार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. मराठा आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारनं संसदेच्या पातळीवर योग्य कार्यवाही करून, आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करणं आवश्यक असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले –
केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हा अधिकार म्हणजे आरक्षण देण्यासंदर्भातले अधिकार हे राज्यांना बहाल करण्याबाबतीमधे मान्यता दिल्याचं आज माहिती समोर आलेली आहे. आणि याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनामधे संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो, की आता हा अधिकार राज्यांना दिला असल्यामुळे मराठा आरक्षणाचा किंवा आरक्षण देण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला आहे. मला एवढाच खुलासा या ठिकाणी करायचा आहे, राज्याला अधिकार देण्याबाबत आ��ची काही तक्रार नाही. किंबहुना आमची मागणी तर आधीपासूनचा होती. परंतू आम्ही हे ही म्हणालो होतो, की नु��तं राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाहीये. खरंच राज्यांना अधिकार देऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर ५० टक्क्यांची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, इंद्रा साहनी प्रकरणामधे, ही मर्यादा जोपर्यंत शिथील होत नाही, तोपर्यंत नुसतं राज्याला अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही हे माझं ठाम कायदेशीर मत आहे.
मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
****
वरीष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रथम वर्षाकरता सामाईक प्रवेश परीक्षा होणार नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बारावीच्या गुणांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामाय़िक प्रवेश परीक्षा बंधनकारक राहील, असंही ते म्हणाले. त्याबरोबरच ११ एप्रिलला कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे रद्द केलेली, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब राजपत्रित अधिकारी पूर्व परीक्षा, येत्या चार सप्टेंबरला होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
****
कोरोना विषाणू संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना काल राज्य सरकारनं जारी केल्या. कोरोना संसर्गाचं प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं संपर्कमंत्र्यांच्या सल्ल्यानं स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचं नियोजन करावं, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित सामाजिक अंतराचे नियम पाळून साजरा होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहील. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी संकेतस्थळावर अथवा समूह माध्यमांवर त्याचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.
****
राज्यात काल सहा हजार १२६ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख २७ हजार १९४ झाली आहे. काल १९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३३ हजार ४१० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल सात हजार ४३६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख १७ हजार ५६० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७२ हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३७० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समा��ेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८१ रुग्ण आढळले, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९३ नव्या रुग्णांची भर पडली. औरंगाबाद ४२, लातूर ३३, जालना १५, तर नांदेड जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून, या चारही जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जाणार असून, अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आजपासून तीन दिवस नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, विकास कामांची पाहणी करणार आहेत. उद्या सहा तारखेला हिंगोली, तर सात तारखेला परभणी दौरा करून नांदेड मार्गे राज्यपाल मुंबईला परतणार आहेत.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. बीड जिल्ह्यात २०११ ते २०१९ या कालावधीत मनरेगा योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं चौकशीचे आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर न्यायालयानं जगताप यांची बदली करण्याचे आदेश दिले.
****
हिंगोली जिल्ह्यातलं प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं, संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान श्रीक्षेत्र नरसी नामदेव इथं, कामिका एकादशी निमित्त होणारी परतवारी काल भाविकांविना साजरी झाली. या परतवारीला भाविकांची मोठी गर्दी होत असते, परतवारी निमित्त मोठा यात्रोत्सव साजरा होत असतो. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे परतवारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नाहीये. त्यामुळे वैष्णवांच्या मांदियाळीविनाच काल महापूजा झाली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
कोरोनाच्या संसर्गामुळे परतवारीला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे वैष्णवांच्या मांदियाळीविनाच श्री संत नामदेव महाराज यांच्या वस्त्र समाधीची संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार मधुकर खंडागळे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. भाविक भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा यांच्या हस्ते सपत्नीक श्रींच्या वस्त्र समाधीस अभिषेक करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून भक्तांच्या गर्दी विनाच पार पडत असलेल्या या कामिका एकादशी निमित्त होणारी परतवारी यावर्षीही सूनीसुनीच होती. ��्यामुळे कोरोनाचे संकट जाऊ दे, भक्तांचे आणि देवातले अंतर संपू दे अशी याचना भाविकांनी केली आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
उस्मानाबाद इथं जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीनं पक्षकार, विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना ५००० मास्कचं वाटप करण्यात आलं. प्रमुख जिल्हा न्यायाधीश के आर पेटकर यांच्या उपस्थितीत हे मास्क वाटप करण्यात आलं.
****
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज हॉकीमध्ये कांस्य पदकासाठी भारतीय पुरुष संघाचा सामना जर्मनीसोबत सुरु आहे.
गोल्फमध्ये महिलांच्या वैयक्तिक प्रकारात भारताची अदिती अशोक दुसऱ्या फेरीत खेळत असून, ती तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या लढतीत भारताच्या लवलिना बोर्गोहेनचा तुर्कीच्या खेळाडूनने पराभव केला, मात्र लवलिनाने पराभवानंतरही कांस्य पदकाची कमाई केली. या ऑलिम्पिक स्पर्धेतलं हे भारताचं तिसरं पदक आहे. याआधी मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य, तर पीव्ही सिंधूने बॅटमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.
पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत रविकुमार दहियाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, आज त्याचा सामना रशियाच्या झॉऊर युगुएव्हशी होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीत रवीने इराणच्या मल्लाचा ९-४ असा पराभव केला.
कुस्तीपटू दीपक पुनियाचा मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला, आता त्याचा कांस्यपदकासाठी सामना होईल.
महिला हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा अर्जेंटिना संघाने दोन - एकने पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता भारतीय महिला संघाची इंग्लंड संघासोबत कांस्य पदकासाठी लढत होईल.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना काल टेंट ब्रिज इथं सुरू झाला. कालचा पहिला दिवस संपला तेव्हा भारताच्या बिनबाद २१ धावा झाल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ १८३ धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराहने चार, मोहम्मद शमी ने तीन, आणि मोहम्मद सिराजने एक गडी बाद केला.
****
शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं काल सायंकाळी निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. शरीरातले अंतर्गत अवयव निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी संस्थांची बांधणी करून, गोरगरिब आणि वंचितांची सेवा केली. शेगाव इथल्या व्यावसायिकांनी काल आपली दुकानं बंद ठेवून शिवशंकर पाटील यांच्या निधनाद्दल दुखवटा पाळला. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
****
अहमदन��र जिल्ह्यातल्या वडगाव गुप्ता या गावानं गेल्या दोन वर्षांत लोकसहभागातून गावाचा विकास साधला आहे. नदीचं खोलीकरण तसंच ओढ्यांची जोडणी करून गावानं पाण्याच्या समस्येवर मात करत दुग्ध व्यवसायाला चालना दिली आहे. गावचे सरपंच विजय शेवाळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले –
महत्वाचं शेतकऱ्यांना पाणीचा प्रश्न. आमच्याकडे कुठलं एरिगेशनचं पाणी नाही. त्यामुळे हा दुष्काळी भाग होता. आणि महत्वाचं शेतकरी शहराजवळ असल्यामुळे दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि चारा विकत घेऊन शेतकऱ्यांना परवडत नाही. जी ओढे गावाला येतात आणि ते पाणी थांबत नव्हतं, मग त्याला कुठतंरी पाणी अडवलंच पाहिजे, आपल्या गावाला पाण्याची कमतरता आहे, या हिशोबानं साडेतीन मीटर साधारण लांबीचं शंभर फूट रूंद २० फूट खोल असं आपण काम केलेलंय. दोन्ही बाजुंनी रस्ते केलेले आहेत. नदीच्या कडेला. आणि झाडं पण लावली आहेत आता. सगळं फायदेशीर झालं. शेतकरी खूष. बोअरला पाणी. वापरायला गावामधे पाण्याचा प्रश्न मिटून गेला. पाण्याची कुठलीही अडचण नाही राहिली.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड ते लोहा आणि गंगाखेड, कोद्री ते बीड जिल्ह्यातल्या हद्दीपर्यंतच्या, एकूण ४२० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ही माहिती दिली. या रस्ते कामाकरिता दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतल्याचं गुट्टे यांनी सांगितलं.
****
गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
thebusinesstimes · 5 years ago
Text
'खाताबुक'ने उभारले ४५४ कोटी
‘खाताबुक’ने उभारले ४५४ कोटी
मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपातील व्यवसायांना व्यापारविषयक देवाण-घेवाण व्यवहार करणे तसेच त्यांचे ट्रॅकिंग करण्यात मदत करणाऱ्यात अग्रेसर असलेल्या युटिलिटी सोल्यूशन प्रोव्हायडर खाताबुकने सीरीज बी निधी मालिकेत ४५४ कोटी रुपयांचा निधी जमवण्यात यश मिळवले आहे. या फेरीचे नेतृत्व बी कॅपिटल ग्रुप आणि सिकोइया इंडिया आणि डीएसटी पार्टनर्स या सध्याच्या गुंतवणूकदारांनी संयुक्तरुपात केले आहे. या निधीद्वारे…
View On WordPress
0 notes