#जो मुख्यमंत्री होईल
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
* स्वामित्व योजनेअंतर्गत ई प्रॉपर्टी कार्ड वितरणाला आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
* राज्य सरकारचं कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना
* बीड प्रकरणी कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
* एसटी महामंडळाचा दरवर्षी पाच हजार साध्या लालपरी बस खरेदीचा निर्णय
आणि
* राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान
****
स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्काविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड वितरणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातल्या दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावांतल्या ६५ लाख ई प्रॉपर्टी कार्डस् पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच प्रत्येक तालुका मुख्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात हजर राहण्याचं आवाहन इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे.
**
वाहन उद्योगात हरित तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आपल्या सरकारचा अधिक भर अस��्याचं प्रतिपादन, पंतप्रधानांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जीवाश्म इंधनावरचा भार कमी करण्यासाठी हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं यावर भर देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं, ते म्हणाले...
‘‘आज हम एक ऐसे मोबिलिटी सिस्टीम के निर्माण में जुटे है, जो इकॉनॉमि और इकोलॉजी दोनों को सपोर्ट करें। एक ऐसा सिस्टीम जो फॉसिल फ्युअल के हमारे इंपोर्ट बिल को कम करें। इसलिये आज ग्रीन टेक्नॉलॉजीज्, ईव्हीज्, हायड्रोजन फ्युअल्स, बायोफ्युअल्स ऐसी टेक्नॉलॉजी के डेव्हलपमेंटपर हमारा काफी फोकस है।’’
****
राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटिलिजन्स - अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या कृती दलाचे अध्यक्ष असून, विविध क्षेत्रातल्या १६ तज्ज्ञांचा या कृती दलात समावेश आहे. या कृती दलाला आपल्या शिफारसी सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ए आय धोरण ठरवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.
राज्यात सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापनाही काल करण्यात आली. या कार्यदलाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यात येणार आहे.
****
बीड प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. तपास यंत्रणांना कोणत्याही दबावाशिवाय तपास करू देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
“तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो. आपण कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे. मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील.’’
****
पुणे-नाशिक महामार्गावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. काल सकाळी झालेल्या या अपघातात चार महिला, चार पुरुष आणि ५ वर्षाच्या एका बालिकेचा मृत्यू झाला.
****
राज्य परिवहन महामंडळ-एसटीने दरवर्षी पाच हजार साध्या लालपरी बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळांतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते काल महामंडळाच्या कामकाज आढा��ा बैठकीत बोलत होते. यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
चालू आर्थिक वर्षात १५ फेब्रुवारी नंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य सरकारच्या वित्त विभागानं सरकारी कार्यालयांना दिले आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटी मंजूर निधी संपवण्यासाठी होत असलेल्या खरेदीला आळा घालण्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल, त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाचं पहिलं सत्र १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर १० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दुसरं सत्र होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे या महिन्यात हा कार्यक्रम उद्या होत आहे.
****
राष्ट्रीय खेल पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार, आणि नेमबाज मनु भाकर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह ५ जणांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातला नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅरा अथलीट सचिन खिलारी यांच्यासह ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. ज्येष्ठ खेळाडू सुचा सिंग आणि दिव्यांग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
‘‘श्री मुरलीकांत राजाराम पेटकर। देश के सबस��� उत्कृष्ट पॅरा तैराकी खिलाडियों मे से एक है। उन्होंने 1972 में पॅरालंपिक्स मे स्वर्ण पदक, 1970 मे राष्ट्रमंडल पॅराफेजिक खेलों मे स्वर्ण पदक हासिल किया। श्री मुरलीकांत राजाराम पेटकर को पॅरा तैराकी खेल में उनकी उत्कृष्ट उपलब्धियों को मान्यता प्रदान करते हुये, वर्ष 2024 के लिये जीवन पर्यंत अर्जून पुरस्कार प्रदान किया जाता है।’’
महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना देखील काल राष्ट्रपतींच्या हस्ते साहसी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा तेनझिंग ��ोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला.
****
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी उपान्त्यफेरीत प्रवेश केला आहे. काल उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय महिला संघानं बांग्लादेशचा १०९ विरुद्ध १६ गुणांनी तर भारतीय पुरुष संघानं श्रीलंकेचा १०० विरुद्ध ४० गुणांनी पराभव करत उपान्त्य फेरी गाठली.
****
राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत धाराशिव तालुक्यात वडगांव सिद्धेश्वर जिल्हा परिषद प्रशालेच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे. कोल्हापूर इथं झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात अमरावती संघाला पराभूत करून वडगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या संघानं सुवर्णपदक मिळवलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शार्ङ्गदेव महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. एमजीएम परिसरातल्या महागामी संस्थेत आयोजित या महोत्सवात काल पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ज्योती हेगडे यांनी रुद्र वीणा वादन तसंच मालवणच्या सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाने दशावतार प्रयोगाबाबत माहिती दिली, तर सायंकाळी या कलेचं सादरीकरण झालं. बंगळुरूच्या डॉ करूणा विजयेंद्र आणि संचाने सादर केलेल्या, बदामीतल्या नटेश्वर शिल्पावर आधारित महानट या नृत्याविष्काराला रसिकांची भरभरून दाद मिळाली. महोत्सवाचं हे सोळावं वर्ष आहे.
****
नद्या अतिक्रमणमुक्त करण्यासाठी त्यांच्या सीमा लक्षात घेऊन आरेखन करण्याची आवश्यकता जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली आहे. ते काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एकदिवसीय जल परिषदेत बोलत होते. नद्यांचं वाहून जाणारं पाणी अडवल्यास, पूर आणि दुष्काळ दोन्हीपासून मुक्त होणं शक्य असल्याचं, राणा यांनी नमूद केलं.
****
बीड जिल्ह्यात काल तीन भावांवर जीवघेणा हल्ला झाला, यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आष्टी तालुक्यातल्या वाहिरा परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सकल मराठा समाजाचा नांदेड इथला आजचा नियोजित आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी शासनाने आरोपींविरोधात मकोका लागू केल्यानं, हा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचं वडजे यांनी सांगितलं.
****
पर्यटन, उद्योग आणि शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून रोजगा��निर्मिती करण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात किलज इथं बोलत होते. पहिल्या टप्प्यात १० हजार रोजगारनिर्मिती करण्याचा आपला निश्चय असल्याचं आमदार पाटील यावेळी म्हणाले.
****
महारेशीम अभियानाच्या प्रचारासाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल प्रचार रथालं हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. जिल्ह्यात १०० गावांमध्ये हा रथ, रेशीम उत्पादनाविषयी जनजागृती करणार आहे. जिल्ह्यात पुढच्या वर्षासाठी ११०० एकर क्षेत्रावर तुती लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या ��ेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्य���ंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, ��्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स��ृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
Text
अनुराग ठाकूर म्हणतात अखिलेश यादवसाठी आयटी म्हणजे दहशतवादी मुख्तार अन्सारी अतिक अहमद यांचे ब्रँड अॅम्बेसेडर nodmk3 कडून मिळकत
अनुराग ठाकूर म्हणतात अखिलेश यादवसाठी आयटी म्हणजे दहशतवादी मुख्तार अन्सारी अतिक अहमद यांचे ब्रँड अॅम्बेसेडर nodmk3 कडून मिळकत
लखनौ. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या तारखा जवळ आल्याने राज्यातील राजकीय पाराही चढला आहे. निवडणुकीच्या वातावरणात घातपाताचे पर्वही सुरू झाले आहे. या क्रमाने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ना अनुराग ठाकूर (अनुराग ठाकूर) यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की IT म्हणजे सपा प्रमुखांसाठी दहशतीतून उत्पन्न आणि मुख्तार…
View On WordPress
#२०२२ च्या निवडणुका#bjp vs सपा#अनुराग ठाकूर यांचा अखिलेश यादव यांच्यावर हल्ला#अनुराग ठाकूर विरुद्ध अखिलेश यादव#उत्तर प्रदेश विधानसभा चुनव 2022#उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका#केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर#केंद्रीय मंत्र्यांचा समाजवादी प्रमुखांवर टोला#केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री#चुनाव 2022 पर्यंत#जो मुख्यमंत्री होईल#दहशतीतून उत्पन्न#निवडणूक#ब्रँड अॅम्बेसेडर अतिक अहमद#ब्रँड अॅम्बेसेडर अतीक अहमद#ब्रँड अॅम्बेसेडर नाहिद हसन#ब्रँड अॅम्बेसेडर मुख्तार अन्सारी#भाजप नेते अनुराग ठाकूर#माफिया अतिक अहमद#माफिया अतीक अहमद#माफिया नाहिद हसन#माफिया मुख्तार अन्सारी#यूपी निवडणूक 2022#सपा विरुद्ध भाजप#सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव#समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव
0 notes
Text
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाकडून संजय राठोड यांनीही शपथ घेतली. राठोड यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यावर बोलायचं काम नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही असंही फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळ���ल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही असा टोलाही फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लगावला. ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील आशा पक्षाने आशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न आहे. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचे ट्विट करावे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. राठोड यांच्या मंत्रीपदावरून चित्रा वाघ संतापल्या दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलें जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंग…जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. Read the full article
0 notes
Text
Prevent illegal construction
Prevent illegal construction....?
बेकायदा बांधकामे कसे रोखता येतील ?
अनधिकृत बांधकामाचा व त्यातील रहिवाशांचा प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात उग्र स्वरूप घेणार आहे. यांची समाजातील सर्व क्षेत्रांना जाणीव आहे. सरकारसकट सर्व विचारवंत गोंधळलेले आहेत. १९६९ ते १९७३ या चार वर्षाच्या काळात मी सदर व्यवसायातील एक आद्य प्रवर्तक होतो. पुढे अर्बन सिलिंगचा कायदा अमलात आल्यानंतर मी सरकारी कंत्राटदारीकडे वळलो , तरीही १९८२ ते १९८५ या काळात आणखी एक , दोन स्कीम उभ्या केल्या , त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आता झालेला फरक हा जमीन-आस्मानाचा फरक आहे व त्याला आता आवर घालण्याची गरज आहे, अन्यथा बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसाय अधिक बदनाम होण्याची शक्यता आहे. तसेच ह्या व्यवसायात पैसे व्याजाने घेऊन किंवा इन्वेस्टरला बरोबर घेऊन जाणाऱ्या मंडळींना वाईट दिवस येणार आहेत, कदाचित आणखी काही लोक व्यवसायाला कंटाळून व्यवसाय सोडून इतर व्यवसायाकडे जातील , अशीही भीती बाळगल्यास ती चूक ठरू नये.
१९६९-१९७३ या काळामध्ये प्लॉटचे भाव अत्यंत कमी होते व बांधकामाचे दरही स्वस्त होते. मी आपटे रोडवर १० , ०००/- चौ. फटाचा प्लॉट अवघे १०/- रु चौ. फुटाने श्री. चंदा गाडगीळ व राजा गाडगीळ यांच्याकडून विकत घेऊन तेथे सध्या अस्तित्वात असलेली ' अस्मिता अपार्टमेंट ' १९७२ ला पूर्ण केली व त्यावेळी अवघ्या ५५ रु. चौ. फूटाने चटईक्षेत्रावरती मी फ्लॅट विकले होते आणि पार्किंग फ्री दिले होते. आज तेथेच भाव १५ , ०००/- रु. चौ. फूट चालला आहे.
१९७४ साली अर्बन सिलिंग कायदा लागू झाला आणि मी व्यवसायात परिवर्तन करण्याचे ठर���ून सरकारी कंत्राटदारीकडे वळलो, मात्र तेव्हापासून आजतागायत सदर व्यवसायाबद्दल कायम निरीक्षण व पाहणी करत होतो व निष्कर्ष मी मनामध्ये साठवून ठेवले होते व आहेत, ते मी इथे नमूद करतो.
१९६९ ते १९७३ या काळामध्ये बांधकामाचा दर हा प्लॉटपेक्षा दुप्पट तिप्पट असे व आम्ही बांधकामामध्ये १५ ते २० % मार्जिन काढून व्यवसाय करीत होतो, त्यानंतर अर्बन लँड सिलिंगमध्ये गेलेल्या जमिनी सोडवून आणणे , हा एक व्यवसाय झाला , व तो व्यवसाय काही लोक अतिशय चतुराईने करू लागले व ओनरशिप फ्लॅटमध्ये नवीन पर्व सुरू झाले व ते पर्व जो लवकर अर्बन लँड सिलिंगमधून प्लॉट सोडवून आणील , त्याच्यामागे प्लॉटधारक धावू लागले व ठरावीक बिल्डर्स व्यवसाय कंट्रोल करू लागले.
त्यापुढे १९८० ते १९९० च्या शतकात सदर व्यवसायात खूप पैसा आहे, म्हणून व्याजावर पैसे घेऊन, जमिनी घेऊन ओनरशिपचा धंदा करणारी काही मंडळी या व्यवसायात आली व त्या धंद्याचे आकर्षण सर्वसामान्य लोकांना व गुंतवणूकदारांना होवू लागले आणि गुतवणूकदारांचा मोर्चा सदर व्यवसायाकडे वळला. त्याचवेळेला राज्यकर्त्यांचे लक्ष या व्यवसायाकडे वळू लागले व जमिनी सोडविताना मुख्यमंत्री कायम अर्बन लँड सिलिंगचे ऑर्डर स्वतः काढत असत व अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तेव्हापासून कायम मुख्यमंत्र्यांकडे राहिले आहे ते आजतागायत. सदर योजनेला मंजुरी देताना कलेक्टर ऑफिस, टाऊन प्लानिंग ऑफिस , कार्पोरेशन ऑफिस, मोजणी ऑफिस, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मुंबई या सर्वांचे डोळे विस्फारू लागले व त्यांची मागणी वाढू लागली व या सर्वाचा बोजा ग्राहकावर पडू लागला.
पुढे १९९० ते २००० या काळात मोठ्या प्रमाणावर देश - विदेशातून गुंतवणूक टाऊनशिप डेव्हलपमेंटसाठी येऊ लागली व काही सुलभ कर्ज देऊ लागल्या व घरबांधणी क्षेत्राला प्रचंड वेग आला, जो - तो पुण्यात, मुंबईत, ठाण्यात, डोंबिवलीत फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करू लागला व त्या व्यवसायातील मंडळी जी पूर्वीपासूनच श्रीमंती दाखवीत होती, ती श्रीमंती अधिक गडद होऊ लागली व सर्वसामान्यांच्या डोळ्यावरती येईल इतकी मोठी होऊ लागली, तसेच १० - १० पिढ्या पुरतील एवढ्या जमिनी स्वस्तात घेऊन बिल्डर्स मंडळी लैंड बैंक निर्माण करू लागते, व त्या सोडून आणण्यासाठी तसेच त्याच्या संरक्षणार्थ मनी आणि मसल - पाँवर तसेच राजकीय शक्ती वापरू लागले. त्यानंतर काहीही संबंध नसताना स्थानिक राजकीय नेतृत्व बिल्डरकडे पैशाची मागणी करू लागले, व निवडणुकीसाठी भरमसाट रकमेच्या मागण्या येऊ लागल्या व त्या मागण्या पूर्ण करताना बिल्डर्स मंडळाना त्रास सुरु झाला, तो प्रास कमी होण्यासाठी मसलपॉवरचा उपयोग सुरू झाला. म्हणजे ज्या बिल्डर्सकडे राजकीय शक्तीबरोबर मनी आणि मसलपावर असेल. त्या बिल्डरांचा उदय जोर धरू लागला व अनेक टाऊनशिपच्या जाहिराती सरू झाल्या व कार्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर १० ते २० कि. मी. परीघ क्षेत्रामध्ये बिल्डरांचे हातपाय पसरू लागले व महत्त्वकांक्षेला, अपेक्षेला, अर्थाजनाला मर्यादा राहिली नाही , त्यामुळे बिल्डर मंडळीच्या हालचालीकडे सर्वचजण आश्चर्यकारकरित्या पाहू लागले. तद्पूर्वीच किंवा त्याअगोदर (१९७० ते १९८० च्या दशकातच) ब्रोकर नावाची मार्केटिंग व्यवस्था जोर धरू लागली व ब्रोकरशिवाय विक्री अवघड होऊ लागली , बिल्डरांची मोठमोठे कार्यालय होऊ लागली. तेथे स्वतंत्र मार्केटिंग ऑफिसेस सुरु झाले, मार्केटिंग ऑफिसर्स आले, जाहिराती फडकू लागल्या, मोठमोठे बोर्ड लागले, टी.व्ही चॅनलवर जाहिराती येऊ लागल्या व या धंद्याला ग्लॅमर प्राप्त झाले.
२००० ते २०१० या काळात बिल्डर्स मंडळी आर्थिकदृष्या खूपच गरीब होत गेली आणि त्या धंद्यात अनेक इतर धंद्यातील यशस्वी व्यवसायिक पदार्पण करू लागलेव बिल्डर व्यवसाय सर्वस्वी पैशांच्या जोरावर व राजकीय संपर्कावर जोर धरू लागला. बांधकामाची किंमत त्यामानाने गौण झाला . जागेच्या किंमती गगनाला भिडल्या व फ्लॅट घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडचे झाले.
अजूनही बिल्डर मंडळी खूप नफा मिळवण्याच्या इराद्याने काम करीत असतील, तर ती त्यांची चूक होईल व ' रघुराम राजन - गव्हर्नर रिजर्व बैंक - यांनी सुचवल्याप्रमाणे कमी किंमतीत रिकामे flat विकले नाहीत , तर अचानक घरांच्या किंमती कोसळून या व्यवसायातील अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी मला भीती वाटते. त्यासाठी ज्येष्ठत्वाच्या नात्याने मी बिल्डर मंडळींना कामे झटपट दर्जेदार कशी होतील व ओव्हर ट्रेडिंग न करता आपल्याला झेपतील तेवढेच कामे हातात घेऊन संपवण्याच्या मागे लागणे. हाच त्याला पर्याय राहील, तसेच आर्थिक दृष्ट्या जितके जमेल तेवढे स्वबळावरच कामे करावी, गुंतवणूकदार मध्ये घेऊ नये व भारी व्याजाने कर्ज काढून व्यवसाय करू नये, असा त्यांना माझा सल्ला आहे. तसेच आज ना उद्या भाव वाढतील, मंदी कमी होईल , यावर खोटी आशा ठेऊन तयार फ्लॅट विकणे थांबवू नये , कारण बाजार दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे, असा माझा अंदाज आहे.
बेकायदा बांधकामे का वाढली ?
१. सरकारने ग्रामपंचायतीपासून ते कार्पोरेशनपर्यंत व टाऊनप्लॅनिंग ऑफिसपर्यंत बांधकाम परवानगी प्रक्रिया इतकी किचकट व क्लिष्ट करून ठेवली आहे की ती मिळता जमीन मालकांना अनेक हाल सोसावे लागतात व भर��ूर पैसे वाटावे लागतात, तरीही कधीच वेळेवर काम होत नाही.
२. बेजाबदार नियोजनामुळे बेफाट, अमर्यादित, दिशाहीन वाढलेली शहरे व त्यामुळे महाराष्ट्रापासून ते परप्रांतातून येणाऱ्या अफाट लोकसंख्येला आळा घालता आला नाही. त्यामुळे घरांची मागणी खुप वाढली व सुनियोजित सरकारी आराखड्या ऐवजी , बिगर परवानगी बांधकामे फोफावू लागली व त्यांना मागणी ही वाढली. मराठवाडा, विदर्भ, कोकण, बिहार , यूपी , बंगाल , आंध्र , कर्नाटक , ओरिसा या ठिकाणाहून भरपूर मजूर व चतुर्थश्रेणी वर्ग पुणे , मुंबई , ठाणे , डोंबिवली , पनवेल , कल्याण या सार भागात स्थिरावू लागली . जागा सापडेल तिथे घर बांधून राहू लागली. मिळेल तेथे भाड्याने , विकत घर घेऊ लागली व भुरट्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय बिल्डरांना किंवा खालच्या दर्जाच्या बिल्डर्सना बळी पडू लागली.
३. बिल्डर कोणी व्हावे याचा काहीही नियम नसल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत , ज्यांच्याकडे थोडीफार जमीन आहे त्यांच्यापासून, पानपट्टीवाल्यापासून, सोनेवाल्यापर्यंत समाजातील सर्व थरांनी बिल्डर होण्यासाठी व अफाट पैसा मिळवण्यासाठी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. त्याला कुठलाही निकष नसल्याने, त्यावर कुठलाही कायदा लागू नसल्याने पैसे मिळवण्यासाठी गुंड प्रवृत्ती समाजात फोफावू लागली.
४. अर्बन लँड सेलिंगच्या कायद्यामुळे अतिरिक्त जमिनीवर नियंत्रण आले व बांधकामालाही उपलब्ध जमिनींचे भाव वाढू लागले . तसेच अतिरिक्त जमिनीच्या परवानगीसाठी किंवा अर्बन लँड सेलिंगमध्ये सोडवण्यासाठी बिल्डर व राज्यकर्ते यांचा महाप्रचंड देवाण - घेवाणीचा व्यवसाय सुरू झाला आणि सदर भ्रष्टाचारी पैशांमुळे जमिनीचे भाव गगनाला भिडू लागले. बिल्डरच्या फ्लॅटच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या कुवतीच्या पलीकडे गेल्या.
त्यामुळे कार्पोरेशन, हद्दीबाहेरील खासगी, वनखात्याच्या, सरकारी गायराने यासाठी असलेल्या जमिनीवर बेसुमार , बेकायदा बांधकामे तयार झाली व विकली गेली किंवा भाड्याने दिली गेली.
तसेच या सदर अनधिकृत बांधकामावर कुठलीही कारवाई होणार नाही याची जबाबदारी घेऊन स्थानिक , राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजून घेतली व निवडणुकीत हमखास निवडून येण्याची सोय करून ठेवली. त्यावे ज्वलंत उदाहरण ठाणे येथील सर्वे नं. ७२ मधील जमीन उध्वस्त झालेली इमारत. तसेच ठाणे येथे अशी अगणित बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत व ती सरकारची फार मोठी डोकेदुखी होईल. यासाठी अर्बन लँड सिलिंग कायदा अंमलात आलाच नसता तर घरांचा मुक्त व्यवसाय होऊन, घरांच्या किंमती सर्वसामान्याच्या आवाक्यात राहिल्या असत्या. गरज होती ती फक्त सर्व लेवल विकास आराखडे मंजूर ��रण्याची.
- भास्करराव म्हस्के
0 notes
Text
मुख्यमंत्र्यांना वाटतंय मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल - शरद पवार
मुख्यमंत्र्यांना वाटतंय मराठा आरक्षणाचा फायदा निवडणुकीत होईल – शरद पवार
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मराठा आरक्षणाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होईल, असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत आ��ेत. मात्र या भूलथापांना जनता फसणार नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
ज्या राज्यात जो पक्ष मोठा आहे, त्यांनी भाजप विरोधात नेतृत्व केले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं शक्य होईल. देशपातळीवर एक आघाडी करतोय हे खरं नाही पण राज्या राज्यात…
View On WordPress
0 notes
Photo
धावचित झालेल्या फलंदाजाप्रमाणे खिन्न होऊन खेळपट्टीकडे पाहणे, हा शशिकलांपुढे एकमेव मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. आजच सकाळी एका आमदाराने त्यांच्या शिविरात उडी मारली होती. आता त्यांच्याकडे सात आमदार आणि 12 खासदार झाले आहेत. किमान 45 ते 50 आमदार त्यांच्या बाजूने आहेत, असे म्हणतात. त्यामुळे हा निकाल आल्या-आल्या त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडले तर ते समजून घेणे सोपे आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात शशिकला दोषी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठासून सांगितले. त्यामुळे जयललिता यांच्या मागोमाग शशिकला यांनाही तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यांना चार वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. तमिळनाडूची सध्याची विधानसभा आणि शशिकला यांच्या शिक्षेचा काळ तंतोतंत जुळतात. काय ही नशिबाची थट्टा! गंमत म्हणजे या खटल्यातील मुख्य आरोपी जयललिता या होत्या. सिंहाचा वारस सिंहच असतो, असे दोनच दिवसांपूर्वी शशिकलांनी सांगितले होते. आता सिंहाच्या पदचिन्हांवर त्यांना असेही चालावे लागेल, हेच विधिलिखित आहे. धावचित झालेल्या फलंदाजाप्रमाणे खिन्न होऊन खेळपट्टीकडे पाहणे, हा शशिकलांपुढे असलेला एकमेव मार्ग आहे. न्यायमूर्ती पी सी घोष और न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्या पीठाने तमिळनाडूतील एका मोठ्या राजकीय नाट्याचे मध्यंतर केले आहे. न्यायालयाने शशिकला यांना आत्मसमर्पण करण्याचेही आदेश दिले आहेत. शशिकला यांनी आपल्या वतीने कोणाला नियुक्त केले, तर तेही लोकांना पचण्यासारखे नाही कारण जो कोणी असेल त्याच्यामागे जयाम्मांचा वरदहस्त नाही. पन्नीरसेल्वम व शशिकला यांची गोष्ट वेगळी होती. पन्नीरसेल्वम हे जयाम्मांचे 'हातचा आला एक' होते. राजकीय अडचणीची समीकरणे सोडविण्यात ते कामास येत. शशिकला या तर साक्षात जयाम्मांच्या सावली! त्यामुळे त्यांच्या दाव्यालाही काही एक बळ होते. तिसऱ्या कोणत्याही चेहऱ्याला हे स्थान नाही का बळ नाही. थोडक्यात पन्नीरसेल्वम हे, मी मागे म्हटल्याप्रमाणे, एकाच वेळेस माजी, आजी �� भावी मुख्यमंत्री आहेत. धर्माचा जय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता त्यांचा पक्ष वरचढ ठरल्यामुळे ते आणखीच सश्रद्ध होतील. मात्र या निर्णयाने चिंता मिटलेले पन्नीरसेल्वम एकटे नाहीत. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या 'वेदनिलयम' या घरातून शशिकला यांना बाहेर काढा, अशी मागणी एका महिला वकिलाने चेन्नईच्या पोलिस आयुक्तांकडे नुकतीच केली होती. त्यांनाही आता फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. कलादेवी नावाच्या या वकिलांचीही चिंता मिटली असेल. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही एक अडचण न्यायालयाने परस्परच दूर केली आहे. आता शक्तिप्रदर्शनही नको आणि कोणाचे हात दाखवून अवलक्षणही नको. सगळे कसे सुरळीत, सहज आणि सोपे! आता ते उजळमाथ्याने चेन्नईला जाऊ शकतील. अन् गेले नाहीत तरी कोणी त्यांच्यावर कालापव्यय करण्याचा आरोप करू शकणार नाही. इतकेच काय, कृष्णरायपुरम येथील अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार गीता यांच्या पतीचीही चिंता आता दूर झाली असणार. "माझी आमदार बायको दोन दिवसांपासून दिसली नसून तिला माझ्यासमोर हजर करा," अशी मागणीच गीता यांच्या पतीने चेन्नई उच्च न्यायालयात केली होती. याही त्यातल्याच एक. त्यांच्या पतीने मद्रास उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस् (व्यक्तीला उपस्थित करण्याची) याचिका दाखल केली आहे. "गीता यांच्या प्रमाणेच अनेक आमदारांना बळजबरीने कोंडून ठेवले आहे. उच्च न्यायालयाने माझ्या बायकोला शोधून माझ्यासमोर आणावे," अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या आमदारांना जिथे कोंडून ठेवले होते, त्या कूवंदूर येथील रिसॉर्टची कटकट गेली असेल. गेले आठवडाभर येथे आमदारांना कोंडून ठेवल्यामुळे तेथे आणीबाणीसदृश वातावरण होते. त्यामुळे आधीच असलेल्या पाहुण्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे म्हणे या रिसॉर्टची रेटिंग घसरली होती. आता आमदारांनाच हलावे लागल्यामुळे या रिसॉर्टचे दरवाजेही सताड उघडू शकतील. पुराणकथेतील आकाशवाणीप्रमाणे ऐन मोक्याच्या वेली आलेल्या या निर्णयाचे म्हणूनच अनेक ठिकाणी स्वागत होईल. यात शंका नको!
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय • गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू • ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर आणि • वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन
डीएपी खतांवर प्रतिटन साडे तीन हजार रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यावर एक हजार ३५० रुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात तीन हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अ��्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।’’
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले… ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ‘‘मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला अ��ा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
कृत्रिम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता १९ किलो वजनाचं एलपीजी सिलिंडर एक हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून ��ाणगापूरला दर्शनासाठी जात होते.
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाशया ग्रंथाला, तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. पाच मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या सहा गावांमधल्या अकराशे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये बनावट पिक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन, गु��्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्याने माहिती देण्याची मागणी केली.
परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इज्तेमा सुरु असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ‘100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे.
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज ��ढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 December 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• अवकाशातल्या अनोख्या प्रयोगासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज. • छत्रपती संभाजीनगराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. • मस्साजोग तसंच परभणी इथल्या पीडित कुटुंबीयांचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन. • अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावर विघनवाडी ते राजुरी दरम्यान लोहमार्गाची चाचणी यशस्वी. आणि • मेलबर्न कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावसकर मालिकेत दोन-एकने आघाडी.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज अवकाशातल्या एका अनोख्या प्रयोगासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्त्रोचा अग्निबाण, ४७६ किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत एस डी एक्स 01 आणि एस डी एक्स 02 या दोन उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, अंतराळ क्षेत्रात असं तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
वर्ष २०२५-२६ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक पार पडली. विविध विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. २०२५-२६ चा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करिअप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनाने प्रारंभ झाला. २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसह मधून आलेले २ हजार ३६१ छात्रसैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबीरात सहभागी होत आहेत. त्यात ९१७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. १४ मित्रदेशांमधले कॅडेट्सही युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत या शिबीरात सहभागी होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराला नव्या जलवाहिनीतून मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचे निर्देश, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. येत्या जून महिन्यात का�� पूर्ण होऊन पाणी पुरठा सुरू होईल, असं सावे यांनी सांगितलं. ते म्हणाले… आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे, तो मार्चपर्यंत सुरु व्हावा. जवळ जवळ ८८ टक्के पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सात टँक ऑलरेडी कमीशन झालेल्या आहेत. २२ टँक मार्चपर्यंत पूर्ण होतील अशी परिस्थिती आहे. मार्च पर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करुन आणि जूनपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करुन शहराला पाणी मिळायला सुरुव���त होईल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीप्रकरणातल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. दरम्यान, आठवले यांनी आज परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांचीही भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे पाच लाख रुपये मदत करण्यात आली, तर वाकोडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
बीडचे आमदार सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. शिफारशीने बंदुकीचा परवाना मिळवलेल्यांची चौकशी करावी अशी मागणी धस यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावं, अशी आपली मागणी असल्याचं धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी येत्या महिनाभरात मोठी कारवाई केली जाईल असा विश्वास, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर दमानिया या पत्रकारांशी बोलत होत्या.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुढच्या काही महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनात आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ते म्हणाले… येणाऱ्या वर्षा मध्ये नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराचे असतात. त्यांच्यात प्रमुख एअर पोर्ट जे आहे. एअर पोर्टला सुध्दा आता इंटरनॅशनल फ्लाईट नव्याने दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुसंघाने देखील आपण मॅन पॉवर डिप्लोमॅट मिमिग्रॅशन करतांना आणि इतर योजना आपल्या चालु आहेत. त्याच्या प्रमाण�� आपण लवकरच नियोजन करू.
अहिल्यानगर - बीड- परळी या रेल्वेमार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली. बीड इथं झालेल्या या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली.
राज्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केलं असून, २०२४-२५ या वर्षात राज्यात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर १ हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - १ हजार १३४, पुणे १ हजार ८७२, कोल्हापूर १ हजार पाच, अमरावती ३ हजार ५६६, तर नागपूर विभागात २ हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या यात्रेबाबत खंडोबा संस्थानचे पुजारी संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली… ही साधारणत: बाराव्या शतकापासुनची परंपरा आहे अशी अख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हेमांडपंथी मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकामध्ये झालेले आहे. आमच्या माळेगाव खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे.त्याबरोबर भाविक या ठिकाणी श्रध्देने देवाचे दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीने याठिकाणी विनामुल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा झाला. लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, 'येळवस' नावाने हा सण ओळखला जातो. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मित्र-परिवारासोबत शेतात पूजा करून वनभोजनाचा आनंद घेतला. लातूरचे प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांनी आकाशवाणीशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली. या सणाचं महत्व म्हणजे रब्बीच पूर्ण पीक बहरलेलं असते आणि आज या ठिकाणी शेतामध्ये कुप्पी करुन पाच पांडवाची आणि लक्ष्मीची या ठिकाणी काळी आईची पुजा केली जाते. आज या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेतामध्ये बोलावून विशेष करुन आंबील, भज्जी, तिळाची पोळी वनभोजनाचा स्वाद हे सर्वजण येऊन घेत असतात.
बॉर्डर -गावस्कर ��षक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर १८४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. कसोटी सामन्याच्या आज शेवटच्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव १५५ धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालनं ८४ धावांची खेळी केली, त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. कसोटीत दहा बळी आणि ९० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पॅट कमिन्स सामनावीर ठरला. मालिकेतला शेवटचा कसोटी सामना तीन जानेवारीपासून सिडनी इथं होणार आहे. दरम्यान, या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
जालना शहरातल्या फ्रेजर बॉईज शाळेच्या मैदानावर आज सकाळी क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करणाऱ्या एका ३५ वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू झाला. विजय पटेल असं मृत खेळाडूच नाव असून, तो मुंबईतल्या नालासोपारा भागातला रहिवासी आहे. ख्रिसमस ट्रॉफीनिमित्त हे क्रिकेट सामने खेळवले जात होते.
नांदेड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी कायद्याची जनजागृती आणि प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. ते आज याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कन्या दिनानिमित्त शपथ देणं तसंच आणि आपल्या अल्पवयीन बालकांचा विवाह न करणेबाबत पत्र लिहून कळवण्याचे उपक्रम राबवावेत, असे राऊत यांनी सांगितलं. जिल्ह्यात या वर्षात ६३ बालविवाह थांबवण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २८ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार • राष्ट्रपती, पंतप्रधान, आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातून श्रद्धांजली अर्पण • देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर • संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा आणि • महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय
माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात येईल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी डॉ सिंग यांचं अंत्यदर्शन घेता येईल. सकाळी साडे नऊच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयातूनच डॉ सिंग यांची अंत्ययात्रा निघेल, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अंत्यसंस्काराचं सकाळी ११ वाजेपासून आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारण होईल.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांनी काल डॉ सिंग यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. देशसेवा, निष्कलंक राजकीय जी��न आणि कमालीची नम्रता या स्वभावगुणविशेषांमुळे डॉ सिंग नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही डॉ सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेलं कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान आपल्या शोकसंदेशात म्हणाले… ‘‘एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा। एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवाए दी। एक चुनौती पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई। पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया।’’
फाळणीचा कटू अनुभव गाठीशी घेऊन भारतात आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला एक किशोरवयीन मुलगा, आपल्या प्रज्ञेच्या बळावर अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात पारंगत होतो, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देतो आणि पंतप्रधानाच्या रुपात दहा वर्ष देशाचा कारभार सांभाळतो, ही काही सामान्य कामगिरी नाही. डॉ मनमोहनसिंह त्यामुळेच असामान्य ठरतात. प्रतिकुल परिस्थितीतही प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहणाऱ्या आपल्या देशाबद्दल राज्यसभेतल्या एका भाषणात ते म्हणाले होते.. ‘यूनान मिस्र् रोमां सब मिट गए जहां से अब तक मगर है बाकीं नामों निशा हमारा। कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौर- ए- जमा हमारा’।।
मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले, अनेकांनी टीका केली. मात्र मृदुभाषी, मितभाषी असलेले डॉ सिंग यांनी अशा आरोपांना किंवा टीकेला उत्तर न देणं पसंत केलं. संसदेच्या एका अधिवेशन काळात लोकसभेतल्या वादळी चर्चेनंतर बाहेर आलेल्या डॉ सिंग यांनी पत्रकारांच्या या संदर्भातल्या प्रश्नाला या शब्दांत उत्तर दिलं…
हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी,जो कई सवालों की आबरू ढक लेती है
मुख्यमंत्री देवेंद्र ��डणवीस यांनी, डॉ सिंग यांच्या अशाच स्मृतिंना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली…
‘‘देश में मनमोहन सिंग जी की एक अपनी छबी रही है एक अर्थशास्त्री के रूप में। उसके बाद एक रिझर्व बँक गव्हर्नर के रूप में। वित्त सचिव के ग्रुप में। मंत्री के रूप में। प्रधानमंत्री के रूप में। उन्होंने अपने कर्तव्यों का बहुत अच्छी तरह से निर्वहन करने का प्रयास किया है। मै उनको विनम्र श्रद्धांजली अर्पण करता हूं। और उनका जो परिवार है, उस परिवार के दुख मे हम सभी लोग शामील है।’’
माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईत राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी, मंत्रालयात देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशावाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेचा हा एकशे सतरावा भाग असेल.
आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने घेण्यात येत असलेल्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजाराहून अधिक नागरिकांचं परीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ६४१ जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉ मोनम डव्हळे आणि ५३३ जणांचं प्रकृती परीक्षण करणारे डॉ. परमेश्वर फालके यांचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करावी, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खासदार संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल या समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. दरम्यान, जिल्हा विद्युत सल्लागार समितीच्या बैठकीला भुमरे यांनी काल मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात ग्रामीण भागात विशेषतः शेतीसाठीच्या वीज वितरणाच्या बळकटीकरणाला वेग द्यावा, असे निर्देश खासदार भुमरे यांनी यावेळी दिले.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवत लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हे ही या मोर्च���त सहभागी झाले. या प्रकरणी आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, खंडणी गुन्हा प्रकरणी वाल्मीक कराड यांच्या पत्नी, दोन अंगरक्षक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची काल सीआयडी पथकानं चौकशी केली.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची ��यसीसी चॅम्पियनशिप मालिका भारतीय संघाने ३-० अशी जिंकली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडिज संघाने दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय संघाने ५ खेळाडू गमावत २९ व्या षटकात पूर्ण केलं. दिप्ती शर्मा हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तर मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रेणुका ठाकूर सिंह हिला गौरवण्यात आलं.
बॉर्डर गावसकर मालिकेतल्या मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजी निषप्रभ ठरत आहे. यशस्वी जैस्वालच्या ८२ धावा वगळता, एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कालच्या पाच बाद १६४ या धावसंख्येवरून भारतीय संघानं आज खेळ पुढे सुरू केला, उपाहारापर्यंत भारताच्या सात बाद २४४ धावा झाल्या आहेत. सामन्यात भारत अद्याप २३० धावांनी पिछाडीवर आहे. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
गोंदिया इथं अंध मुला-मुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला कालपासून सुरवात झाली. या स्पर्धेत देशाच्या १५ राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत अंतिम सामने आज खेळवले जाणार आहेत.
लातूर इथे आजपासूनचं नियोजित मुख्याध्यापकांचं राज्यस्तरीय संमेलन, माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलं आहे. मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली.
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या अन्वा इथून तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने काल ताब्यात घेतलं. विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या पथकानी ही कारवाई केली.
हवामान छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल पहाटे, दिवसा आणि रात्रीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, जळगाव जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे हरभरा आणि तुरीचं नुकसान झालं. राज्यात अनेक जिल्ह्यात गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप - अधिवेशन यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा • गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती • राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, गृह तसंच ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवार यांना अर्थ तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम विभाग • मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कारवाईची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि • तूळजापूरचा पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबई इथं होणार होणार आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभेत १३ विधेयकं संमत तर १५ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. तर विधानपरिषदेत चार विधेयकं संमत झाल��, तर चार विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. चार विधेयकं शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवण्यात आली तसंच एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. दरम्यान, हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरीही, ठरवलेलं कामकाज पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
या अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले तसंच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भ तसंच मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. शेतकरी, कष्टकरी, तसंच उद्योगधंद्यांसाठी कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर दिलं. गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केला. मराठवाड्यात ११ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली, कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेलाही निधी पुरवल्याचं सांगताना, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासंदर्भात कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा आराखडा नव्याने केंद्राकडे पाठवला असून, त्यासंदर्भात पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे. आता केंद्र सरकारचा नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरा करू. आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनचे अंतर्गत नेटवर्क तयार केलं, त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही सोल नेटवर्क तयार करायचा ग्रेडच्या रूपानं तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न आपण करू. उद्योग क्षेत्राबद्दल बोल���ांना, गेल्या अडीच वर्षात मराठवाड्यात ३४ मोठे प्रकल्प आले, ७२ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे दीड लाखावर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यातून वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प कर्नाटकातून ऑरिक सिटीत आला, त्यामुळे १३ हजार लोकांना थेट रोजगार मिळाल्याचं सांगत, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही दोन शहरं उद्योजकांचा आकर्षण बिंदू ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले… महाराष्ट्राज नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना. आज ड��एमआयसीमध्ये आपण जो ऑरिक सिटी तयार केली, शेंद्रा बिडकीन या ज्या एमआयडीसी तयार केल्या, जागा शिल्लक नाही इतकी मागणी आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी त्याला मिळालेली आहे आणि जालन्याला आपण ड्रायफ्रूट देखील करतो आहोत. याच्यामुळे अशी इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली आहे की त्यातलं मराठवाड्याच्या विकासाकरता एक मोठं दालन या ठिकाणी उभं राहीलं.
दरम्यान, महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधान परिषदेत नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर देणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यात १२ जानेवारी पर्यंत सोयबीनची खरेदी सुरू ठेवणार असून, गरज पडली तर यात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात कापूस खरेदी केंद्रातून आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह तसंच ऊर्जा खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपक्रम विभाग देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. महसूल - चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण - चंद्रकांत पाटील, स्वच्छता आणि पाणीपुरवठा - गुलाबराव पाटील, महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे, कृषी - माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - प्रकाश आबिटकर, ग्रामीण विकास - जयकुमार गोरे, शालेय शिक्षण - दादा भुसे, मृदा आणि जलसंधारण - संजय राठोड, उद्योग आणि मराठी भाषा - उदय सामंत, पर्यटन - शंभुराज देसाई, बंदरे आणि मत्स्यव्यवसाय - नितेश राणे, क्रीडा तसंच वक्फ - दत्ता भरणे तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता - मंगलप्रभात लोढा, पणन आणि राजशिष्टाचार - जयकुमार रावल, आदिवासी विकास - अशोक उईके, पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय - शंभूराज देसाई, तर आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक खात्याचे मंत्री असतील. मराठवाड्यातल्या मंत्र्यांना मिळालेली खाती याप्रमाणे… पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशू संवर्धन, धनंजय मुंडे यांना अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक स���रक्षण, अतुल सावे यांच्याकडे बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय, बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं देण्यात आलं आहे. तर मेघना बोर्डीकर या महिला बालकल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, ऊर्जा, आदी खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून काम पाहतील.
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांनी काल मस्साजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील त्यांना फाशीची शिक्षा होईल, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल मस्साजोग इथं देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. शरद पवार यांनी परभणी इथंही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिसराची पाहणी केली. परभणी इथं आंदोलनादरम्यान दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी तसंच रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं.
पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर झाला आहे. तुळजापूर इथल्या हिरकणी पुरस्कार संयोजक समितीनं काल ही घोषणा केली. येत्या १२ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर इथं हा पुरस्कार ममता सपकाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय माहिती सेवेतले अधिकारी संतोष अजमेरा यांना २०२४ चा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डोमिनिकन रिपब्लिक इथं हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत बांग्लादेश दरम्यान सुरु झाला आहे. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्ह्यात नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पाठोपाठ आयएसओ मानांकन मिळवणारी बिलोली ही पाचवी पंचायत समिती ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल समितीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ काल आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोली आणि कळमनुरी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं निदर्शन करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनात शहा यांच्या राजीनाम्याची मागणी झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने काल ध्यान दिनाचं औचित्य साधून ध्यानधारणेविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. योग अभ्यासक अनंत पंडित यांनी ध्यानसाधनेमुळे एकाग्रता वाढून तणाव कमी होतो असं सांगत, ध्यानाचं महत्त्व विशद केलं. या वेळी उपस्थित विद्यार्थी-शिक्षक-पालक यांनी ध्यानधारणेची प्रात्यक्षिकं केली.
रोटरी इंटरनॅशलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात महाएक्सपो प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात विविध स्टॉल्ससह देहदान चळवळीची माहिती देणारं दालनंही आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप-अधिवेशन यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कारवाईची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
तूळजापूरचा पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून मुंबई इथं होणार होणार आहे. दरम्यान, नियोजित सर्व कामं पूर्ण झाल्यानं, हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरीही, ठरवलेलं कामकाज पूर्ण झाल्याचं, शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कमी कालावधी असला तरीसुद्धा सरकारने ठरवलेलं कामकाज वेगाने केलेलं कामकाज पूर्ण झालं. सतरा विधेयकं मंजूर झाली. या विधेयकांमध्ये अनेक महत्वाची विधेयकं जसं कारागृह सुधारणा, प्राचीन स्मारके आणि इतरही महत्वाची विधेयकं देखील मंजूर झालेली आहेत. पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या. ज्या योजना आमच्या सरकारने जाहीर केल्या होत्या, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बळीराजाला सवलत असेल, इतरही काही योजना आहेत, ह्या सुरू ठेवण्यासाठी जी आर्थिक तरतूद लागते, ती तरतूद देखील पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केली.
महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत दिली. विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातील औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर देणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. मुंबई इथले इंदूमिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ६ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात १२ जानेवारी पर्यंत सोयबीनची खरेदी सुरू ठेवणार असून गरज पडली तर यात वाढ करण्यात येईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात कापूस खरेदी केंद्रातून आतापर्यंत ३८ लाख १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. गेल्या दोन वर्षांत मराठवाड्यात सात प्रकल्प पूर्ण करून ३८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा निर्माण केला. मराठवाड्यात ११ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली, कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेलाही निधी पुरवल्याचं सांगताना, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासंदर्भात कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा आराखडा नव्याने केंद्राकडे पाठवला असून, त्यासंदर्भात पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले –
संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे. आता केंद्र सरकारचं नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनचे अंतर्गत नेटवर्क तयार केलं, त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही जोड नेटवर्क तयार करायचा ग्रेडच्या रूपानं तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न आपण करू.
उद्योग क्षेत्राबद्दल बोलतांना, गेल्या अडीच वर्षात मराठवाड्यात ३४ मोठे प्रकल्प आले, ७२ हजार ८३९ कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन सुमारे दीड लाखांवर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प कर्नाटकातून ऑरिक सिटीत आला, त्यामुळे १३ हजार लोकांना थेट रोजगार मिळाल्याचं सांगत, छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही दोन शहरं महाराष्ट्रात उद्योजकांचा आकर्षण बिंदू ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
महाराष्ट्राज् नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना. आज डीएमआयसीमध्ये आपण जो ऑरिक सिटी तयार केली, शेंद्रा बिडकीन या ज्या एमआयडीसी तयार केल्या, जागा शिल्लक उरली नाही इतकी मागणी आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी त्याला मिळालेली आहे आणि जालन्याला आपण ड्रायफ्रूट देखील करतो आहोत. याच्यामुळे अशी इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली आहे की त्यातनं मराठवाड्याच्या विकासाकरता एक मोठं दालन या ठिकाणी उभं राहीलं.
लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यातून वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती होणार असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं –
मागच्या लक्षकाळात लातूरला कोर्स फॅक्टरी आपण तयार केली. वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे. त्याची घोषणा देखील आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम आपण करतो आहोत.
****
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांच्या एकवीस सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष असतील.
****
मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांनी आज मस्साजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी ग्वाही पवार यांनी पीडित देशमुख कुटुंबीयांना दिली.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. या हत्येमागे सूत्रधार कोण, हे मुळात जाऊन शोधणं गरजेचे आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांनी परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिसराची पाहणी केली. ��ा आंदोलनादरम्यान दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी तसंच रिपब्लिकन सेनेचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं.
****
पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्क��र समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. तुळजापूर इथल्या हिरकणी पुरस्कार संयोजक समितीनं आज ही घोषणा केली. येत्या १२ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते तुळजापूर इथं हा पुरस्कार सपकाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना २०२४ चा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डोमिनिकन रिपब्लिक इथं हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला. मलेशियात क्वालालांपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. बिलोली पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पाचवी पंचायत समिती ठरली आहे. यापूर्वी नांदेड, लोहा, मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते समितीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले.
****
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातल्या मुख्य बाजारपेठेतली बहुतांश दुकानं दिवसभर बंद राहिली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बंदमुळे शहरातल्या मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं निदर्शन करण्यात आली. हिंगोली आणि कळमनुरी इथं डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने घोषणा देत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या वतीने आज ध्यान दिनाचं औचित्य साधून ध्यानधारणेविषयी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. योग अभ्यासक अनंत पंडित यांनी ध्यानसाधनेमुळे एकाग्रता वाढून तणाव कमी होतो असं सांगत, ध्यानाचं महत्त्व विशद केलं. या वेळी उपस्थित विद्यार्थी-शिक्षक-पालक यांनी ध्यानधारणेची प्रात्यक्षिकं केली.
****
रोटरी इंटरनॅशलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात महाएक्सपो प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात विविध स्टॉल्ससह देहदान चळवळीचं महत्त्व विशद करण्यासाठी स्वतंत्र स्टॉल रोटरीच्या वतीने उभारण्यात आला आहे. प्रदर्शनातून मिळणारी रक्कम जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या १५ हजार विद्यार्थींनीच्या आरोग्य तपासणी साठी तसंच ४० गावांमध्ये स्मशानभूमी उभारण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन • ‘एक देश-एक निवडणूक’शी संबंधित दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार • राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार • अविष्कार २०२४ च्या विद्यापीठस्तरीय फेरीत पावणे दोनशे प्रकल्पांचं सादरीकरण • जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू आणि • बॉर्डर -गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेत तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर झालेल्या विशेष चर्चेच्या उत्तरात ते काल बोलत होते. काँग्रेसने संविधानाचा सातत्याने अवमान केला, तसंच राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा वापर केल्याचं नमूद करत, काँग्रेसच्या कार्यकाळात ६५ वेळा घटना दुरुस्ती करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीसह अनेक घटनांचा त्यांनी यावेळेस उल्लेख केला. आपल्या कार्यकाळात मात्र इतर मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा, गरीब घटकांना दहा टक्के आरक्षण, महिला आरक्षण, काश्मीरातून कलम ३७० हटवणं यासह समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी घटनादुरुस्ती केल्याच�� पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले… “हमने भी संविधान संशोधन किए है देश की एकता के लिए देश के उज्वल भविष्य के लिए आज संविधान की भावना के प्रति पूर्ण समर्पण के साथ किए है हमने जो संविधान संशोधन किए है वह पुराणी गलतियों को ठीक करने के लिए किए है और हमने एक उज्वल भविष्य का रास्ता मजबूत करने के लिए किए है और समय की कसौटी पर हम खरे उतरेंगे क्यूंकि सबके स्वास्थ के लिए किया गया पाप नहीं है देश हित में किया गया पुण्य है” कर्तव्य पालन, सबका साथ सबका विकास, भ्रष्टाचाराचं संपूर्ण निर्मूलन, कायदे परंपरांचं पालन, आदी ११ संकल्प पंतप्रधानांनी यावेळी सदनासमोर मांडून आपल्या भाषणाचा समारोप केला.
त्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू यांनी काल सकाळी या चर्चेला प्रारंभ केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. अनेक नेत्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्तारूढ पक्षावर संविधान कमकुवत करण्याचा आरोप केला. विद्यमान सरकारच्या काळात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता नष्ट झाल्याचा आरोप गांधी यांनी केला.
‘एक देश-एक निवडणूक’शी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत उद्या सोमवारी सादर केली जाणार आहेत. संविधान सुधारणा विधेयक तसंच केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा ही दोन विधेयकं, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल लोकसभेत मांडतील. ‘एक देश - एक निवडणूक’ या संकल्पनेची पडताळणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यात राबवण्याची शिफारस केली आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका, तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, असं या शिफारशींमध्ये म्हटलं आहे.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपूर इथं राजभवनात सायंकाळी चार वाजता हा शपथग्रहण समारोह होईल. राजभवनातून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली असून, तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक जानेवारीपासून होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक चांगली वित्तीय सुविधा पुरवणं हा यामागील उद्देश आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या एका निवेदनात सांगितलं आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत..
युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या आविष्कार २०२४ या महोत्सवाची विभागीय फेरी काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडली. कोल्हापूर इथल्या डी वाय पाटील विद्यापीठाचे संशोधन-संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर सी. डी. लोखंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या आविष्कार महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून -१२५, जालना-२५, बीड-४५, तर धाराशिव जिल्ह्यातून -६२ असे २४८ संशोधक विद्यार्थी स��भागी झाले. विविध शाखांमधून १७५ प्रकल्प या फेरीत सादर झाले असून, विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी आज होणार आहे.
मुंबई इथं डॉ. होमी भाभा विद्यापीठात झालेल्या, "नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेसिलेन्स" या राष्ट्रीय परिषदेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या परिषदेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातले, विशाल काळबांडे यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला, प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आलं. तसंच तनुजा वाघ, किंजल मोरे, सुजय किंगे, नयन लोनगाडगे, प्रियंका बोरसे, सक्षम पंडितकर, आणि काजल कुमारी या विद्यार्थ्यांनीही उच्च दर्जाचे संशोधन शोधनिबंध सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात कार्यरत प्राध्यापक डॉ. योगेश राजेंद्र यांना त्यांच्या संशोधनासाठी पेटंट मिळालं आहे. डॉ राजेंद्र यांनी रुग्ण, वयोवृद्ध, बालक, तसंच पाळीव प्राण्यांच्या दैनंदिन वागणुकीवर लक्ष ठेवून, त्यांना त्याप्रमाणे मदत करण्यासाठी तसंच त्यांची काळजी घेण्यासाठीचं एक उपकरण विकसित केलं आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
अंबाजोगाई इथं ११ व्या साहित्य संमेलनाला कालपासून प्रारंभ झाला. डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी स्वागताध्यक्ष डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या हस्ते जागर दिंडीचं उद्घाटन झालं. ही जागर दिंडी मुकुंदराज सभागृहात पोहोचताच, सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा पुष्प देऊन सन्मान केला.
“संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात कवयित्री रचना यांना डॉ शैला लोहिया लेखिका पुरस्कार, उमेश मोहिते यांना मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार तर अलीम अजीम यांना प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना डॉ. शिरीष खेडगीकर यांनी लोकाश्रयातून साहित्य संमेलन भरवणं ही आशादायक गोष्ट असल्याचं सांगत, संमेलन इव्हेंट नव्हे तर मुव्हमेन्ट व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांनी अंबाजोगाई इथं आद्यकवी मुकुंदराजांपासून प्रा. शैला लोहिया यांच्यापर्यंत मान्यवरांनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत, या माध्यमातून पुढच्या पिढ्यांवर कला-साहित्य-संगीताचे संस्कार झाल्याचं मत व्यक्त केलं.” या संमेलनात आज, नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण, या विषयासह, संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांच्या साहित्यावर परिसंवाद, दुपारच्या सत्रात कथाकथन तर सायंकाळी चार वाजता समारोप सोहळा होणार आहे.
जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८ ते २० प्रवासी जखमी झाले. नाशिक-नांदगाव डेपोची ही बस जालन्याहून सिंदखेडराजाकडे जात असताना, नाव्हा शिवारात ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
क्रिकेट बॉर्डर - गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू झालेल्या या सामन्यात भारतानं काल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, यजमान संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद २८ धावा झाल्या असतांनाच पाऊस आल्यानं, खेळ थांबवावा लागला, तो दिवसभरात पुन्हा सुरू होऊ शकला नाही. मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
परभणी इथं घडलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल या ठिकाणाची पाहणी केली. या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आठवले यांनी ��ेली. शहरात झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून राबवली जात असलेली कारवाई थांबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी चर्चा करून, भीमनगर मधल्या नागरिकांची भेट घेऊन आठवले यांनी संवाद साधला.
दत्तजयंती काल ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली. माहूर इथल्या दत्तशिखरासह औदुंबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, या प्रमुख स्थानांसह विविध दत्त मंदिरात काकड आरती, मंगलआरती, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत तालुकानिहाय २१ केंद्रावर मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकाची ऑनलाईन शेतकरी नोंदणीस एक ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर स्वत: जावून ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
मानसिक आजाराचं वेळेत निदान झाल्यास आणि नियमित औषधोपचार, समतोल आहार घेतल्यास मानसिक आजार पूर्णपणे बरे होण्यास मदत होते, असं मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यात तेरखेडा इथं सर्व रोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• ईशान्य भारतातली आठ राज्यं म्हणजे अष्टलक्ष्मीची प्रतीकं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेला आज हरियाणातल्या पंचकुला इथून प्रारंभ • विधानसभेचं आजपासून विशेष अधिवेशन-कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती • नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर भर देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही • माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन-अहिल्यानगर जिल्ह्यात राजूर इथं आज अंत्यसंस्कार आणि • भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून अभिवादन
ईशान्य भारतातली आठ राज्यं म्हणजे अष्टलक्ष्मीची प्रतीकं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले… ‘‘मां लक्ष्मी को सूख, आरोग्य ��र समृद्धी की देवी कहा जाता है। जब भी लक्ष्मी जी की पूजा होती है, तो हम उनके आठ रूपों को पुजते है। इसी तरह भारत के पूर्वोत्तर में आठ राज्यों की अष्टलक्ष्मी विराजमान है। आज का भारत दुनिया को हेल्दी लाईफस्टाईल से जुडे हुये, न्युट्रीशन से जुडे हुये जो सोल्युशन देना चाहता है, उसमें नॉर्थ ईस्ट की बडी भूमिका है।’’ तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्येकडील आठही राज्यांची संस्कृती, वस्त्रोद्योग, हस्तकला, पर्यटन स्थळं आणि अद्वितीय उत्पादनं दाखवण्यात येणार आहेत.
देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. हरयाणातल्या पंचकुला इथे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत सुरू होणारी ही मोहीम, ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ३४७ जिल्ह्यांमधून पुढचे शंभर दिवस राबवली जाणार आहे. या क्षयाचे नवीन रुग्ण शोधणं, गंभीर रुग्णांसाठी आधुनिक उपचार करणं, तसंच पोषक आहाराचा पुरवठा करणं, यावर मोहीमेत भर दिला जाईल. नांदेड जिल्ह्यात या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा आणि २०२५ मध्ये जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी काल राज्य विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. २८८ नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर पदाची शपथ देतील. दरम्यान राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ से २१ डिसेंबर या कालावधीत नागपूर इथं होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले… “मागच्या काळामध्ये एरिगेशन मिनिस्टर म्हणून, चार नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे, हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात, कायम! ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे, कारण आपण मागच्या काळामध्ये ५४ हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आहेत. आणि या प्रोजेक्टमुळे २०३० साली, महाराष्ट्रातली ५२ टक्के वीज ही अपारंपरिक स्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे. सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटीव्हचा असणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल, आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना यामुळे मिळेल.’’ दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर इथं खासगी कार्यक्रमासाठी आले होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसंच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या १५ ऑक्टोबरपासून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राज्य मंत्रिमंडळात विविध पदं भुषवलेले पिचड यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर पाच वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आज सायंकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात राजूर इथं पिचड यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
१९७१ साली भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून, 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या मॅरेथॉनमध्ये सहभागी सैन्य दलातील धावपटू, येत्या १६ डिसेंबरपर्यंत मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असं ४०५ किलोमीटरचं अंतर पार करणार आहेत. यावेळी राज्यपालांनी कुलाबा इथल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं. चैत्यभूमीसह नागपुरात दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रसिद्ध लेखक शाहू पाटोळे यांचं व्याख्यान झालं. जल, जमीन आणि जातीय ऐक्य हे विषय बाबासाहेबांच्या जगण्यातील श्वास आणि ध्यासही होते, असं मत पाटोळे यांनी व्यक्त केलं. दरम्यान, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच काल मोठी गर्दी झाली होती. शहरात विविध उपक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकर राईट मूव्हमेंट अर्थात फॅम या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘एक वही एक पेन’ हे अभियान राबवण्यात आलं. मिलिंद नागसेन वन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन तसंच रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्यावतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ** जालना शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे सदस्य तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. ** परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भिक्खू संघाच्या वतीने पंचशील ध्वजारोहण करून महावंदना घेण्यात आली. ** हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा आणि इतर कार्यक्रमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ** धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक समरसता मंचाच्या वतीने बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, तसंच यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आलं. विभागात बीड, लातूर, नांदेडसह राज्यात बुलडाणा, वाशिम, धुळे इथंही बाबासाहेबांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं पहिल्या डावात १८० धावा केल्या आहेत. काल सकाळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, यजमान संघाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत, सलामीवीर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला, रोहित शर्मा तीन तर विराट कोहली सात धावांवर तंबूत परतले. काल खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघानं पहिल्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ८६ धावा केल्या होत्या.
लातूर इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिव्यांगत्व प्रकार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात या स्पर्धा होणार असल्याचं, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितलं. उद्घाटनापूर्वी विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं, त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. दरम्यान, लातूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं काल जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या महोत्सवात विविध कलाप्रकारात अनेक युवक सहभागी झाले आहेत.
बीड युवा महोत्सवाचा काल समारोप झाला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप समारंभात, विविध स्पर्धांमधल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. युवकांना अशा महोत्सवातून प्रोत्साहन मिळतं, यातूनच देशाचे भविष्य घडण्यासही मदत होते, असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं.
चंपाषष्ठीचा सोहळा आज साजरा होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीसह, छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या सातारा आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या खंडोबा मंदिरात आजपासून विविध धार्मिक कार्यक्र���ाचं आयोजन करण्यात आलं आहे. खंडोबाच्या षड्रारोत्सवाचंही आज उत्थापन होत आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराचं वितरण, दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर आजपासून संसदीय कामकाज सुरळीत होणार • भारतीय जनता पक्षाकडून विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक • ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे आणि • उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभात होणार सहभागी
आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी १६ कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
संसदीय कामकाजाची कोंडी सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्याचं मान्य केलं. काँग्रेसचे गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. १३ आणि १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यसभेतही चर्चा होईल. विरोधकांनी सहमती दर्शवल्यानंतर आजपासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरू होईल, आज पहिलं विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडलं जाईल तसंच विरोधकांनी दिलेल्या आश्वासनामुळे कामकाज सुरळीत पार पडेल, असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान, एका खासगी कंपनीचं कथित लाचखोरी प्रकरण आणि संभलमधल्या हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल सलग पाचव्या दिवशी बाधित झालं.
राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीनं, भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या चार तारखेला होणार असून, त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी पाच तारखेला होणार आहे. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली असून, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं महाजन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं. यापूर्वी आपल्याला केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव मिळाला होता, मात्र आपण तो नाकारला, पक्ष संघटना आणि लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणार असून, राज्यातल्या कोणत्याही मंत्रिपदात आपल्याला रस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि इव्हिएममधल्या मतदानामध्ये तफावत दिसत असून, पोस्टल मतदानाचा जो ट्रेंड आहे, तो इव्हिएममधल्या मतदानात दिसत नाही, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची माहिती दिली. या ट्रेंडबद्दलचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीविषयीही त्यांनी खुलासा केला, ते म्हणाले. ‘‘आपण एक लक्षात ठेवा पाच ते सहाच्या नंतर सहाला कोणी क्यू मध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते. म्हणून पूर्ण दिवसामध्ये कुठल्याही स्तरावर किती टक्केवारीने वाढले, किती नंबरला वाढले एवढेच नंबर पाचच्या नंतर सुद्धा वाढलेले आहेत. चुकून आपण झारखंडच्या सोबत काही कम्पॅरिजन होत आहे. झारखंड मध्ये पाच वाजता मतदान क्लोज झालेला आहे ऑफिशियली. महाराष्ट्र मोठा राजे असल्यामुळे सहा वाजता बंद झाले. झारखंड पूर्वीपासून अरली वोटिंग राज्य आहे. म्हणजे लवकर येऊन लोक मतदान करून जातात. सात ते नऊ मध्ये त्यांच्या परसेंटेज पाहिलं तर फार मोठा असतो आपल्याकडे सात ते नऊ मध्ये कमी असतं.’’
दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत. संमेलनाच्या समितीची ही मागणी पवार यांनी स्वीकारल्याची माहिती, समितीच्या वतीनं डॉ. सतीश देसाई आणि संजय नहार यांनी काल पुण्यात दिली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
जागतिक एड्स दिन एक डिसेंबर रोजी पाळण्यात आला, त्यानिमित्त विविध ठिकाणी कालही अनेक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात काल जाणीवजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसचं महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. प्रसिद्ध रंगकर्मी मदन मिमरोट यांच्या कलापथकाने जागृतीपर सादर केलेल्या कार्यक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ��िंगोलीत काल जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रानं जनजागृती रॅली काढली होती. हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. उपस्थितांना या कार्यक्रमात एड्स नियंत्रणाबाबत शपथ देण्यात आली. बीड इथंही जागतिक एड्स दिनानिमित्त काल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनपर्यंत जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव जी.जी.सोनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. सर्व उपस्थितांना यावेळी एड्स मुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली. लातूर इथंही जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक तसंच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने काल रॅली काढण्यात आली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथून अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना एड्सविरोधी शपथ देण्यात आली.
परभणी जिल्ह्यात हिवाळी हंगामातल्या रब्बीच्या पिकांसाठी जायकवाडी, निम्न दुधना आणि येलदरी धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असली तरी याचदरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा सुर��ीत होत नसल्यानं कमी दाबाची वीज मिळत असल्याने मोटार पंप जळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रब्बीच्या पेरणीचा कालावधी संपत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरानजीक सातारा परिसरातल्या खंडोबा अर्थात मार्तंड भैरव यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक सातारा परिसरात येत असतात. येत्या सात ते नऊ डिसेंबर दरम्यान दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर देवस्थानकडून चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती, देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली.
पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात होणार असून, या स्पर्धेतला अंतिम सामना उद्या होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अ- गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. अ -गटातल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला ६० धावांनी पराभूत केलं.
हवामान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. काल परभणी शहरासह काही भागात जोरदार पाऊस झाला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा, तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे तर शेवटच्या टप्प्यातला कापूस भिजल्यानं नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात, राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
0 notes