#चेन्नईच्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात ��ुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार���यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
नारळाच्या करवंटीत चहा प्या; चेन्नईच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया
नारळाच्या करवंटीत चहा प्या; चेन्नईच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया
नारळाच्या करवंटीत चहा प्या; चेन्नईच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया अनेक चहा विक्रेते पेपर कपचा वापर करतात. तर कुल्लड चहा देखील सर्वांनाच माहित आहे. तर चहा प्या आणि कप खावून टाका असा ट���रेंडही आला आहे. या पर्यावरण पूरक कल्पनांमध्ये आता नारळाच्या करवंटीची भर पडली आहे. चेन्नईत नारळाच्या करवंटीत चहा पिण्याचा अनुभव चहा प्रेमींना घेता येणार आहे. चेन्नई : वाढते प्रदूषण पाहता पर्यावरण संवर्धनासाठी अनेक…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
CSK vs RR: राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर CSK कर्णधार एमएस धोनी काय म्हणाला?
CSK vs RR: राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर CSK कर्णधार एमएस धोनी काय म्हणाला?
सीएसकेच्या पराभवावर एमएस धोनी: आयपीएलमध्ये शुक्रवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने शेवटच्या षटकात चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नई आधीच या स्पर्धेतून बाहेर पडली होती. अशा स्थितीत त्याच्यासाठी या सामन्यातील विजय आणि पराभव यात काही फरक नव्हता. तिला फक्त आयपीएल 2022 ला विजयासह अलविदा करायचा होता, पण ते होऊ शकले नाही. सामन्यानंतर चेन्नईचा…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
चेन्नई येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारत अ संघाचा कर्णधार संजू सॅमसनचे प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. प���ा | क्रिकेट बातम्या
चेन्नई येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारत अ संघाचा कर्णधार संजू सॅमसनचे प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. पहा | क्रिकेट बातम्या
भारत अ संघ सध्या न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांच्या अनधिकृत वनडे मालिकेत आमनेसामने येत आहे. वनडे नंतर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे, जी भारत अ 2-0 ने जिंकली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुरुवारी पाहुण्यांचा सात गडी राखून पराभव करून यजमानांनी वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा आणि तिसरा वनडे अनुक्रमे रविवारी आणि मंगळवारी त्याच मैदानावर खेळवला जाईल. गोलंदाजी निवडल्यानंतर…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
#CSKvMI: मुंबईने चॅम्पियन चेन्नईला हरवून आपल्या जुन्या पराभवाचा बदला घेतला, चाहते म्हणाले – हम तो डुबेंगे सनम – तू मला भी घेशील!
#CSKvMI: मुंबईने चॅम्पियन चेन्नईला हरवून आपल्या जुन्या पराभवाचा बदला घेतला, चाहते म्हणाले – हम तो डुबेंगे सनम – तू मला भी घेशील!
चेन्नईच्या पराभवावर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter मुंबई इंडियन्स (MI) नंतर, चेन्नई सुपर किंग्स (CSK) देखील IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. IPL 2022 च्या 59 व्या सामन्यात मुंबईने शानदार गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला आहे. या सामन्यात मुंबईने एकतर्फी खेळ दाखवला तर चेन्नईने पाच गुण मिळवले […] मुंबई इंडियन्स (MI) नंतर, चेन्नई सुपर किंग्स (CSK) देखील IPL…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
चेन्नईच्या संघाने सुरेश रैनानंतर दिला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूला वालीच नाही...
चेन्नईच्या संघाने सुरेश रैनानंतर दिला अजून एक मोठा धक्का, दिग्गज खेळाडूला वालीच नाही…
बंगळुरु : महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आजच्या लिलावात सुरेश रैनानंतर अजून एक मोठा धक्का दिला आहे. भारताच्या एका दिग्गज खेळाडूवर त्यांनी विश्वास दाखवला नाही. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी बोलीच लावली नाही. चेन्नईने बोली लावली नाही हे पाहिल्यावर कोणीही त्याला संघात घेण्यासाठी रस दाखवला नाही आणि अखेर त्याला कोणीली वाली उरला नसल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या संघाने यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
फॉरेन रिटर्न्ड...
मित्रांसोबत चाललेल्या गप्पांमध्ये कुठेतरी एखादी ट्रिप मारावी अशी चर्चा चालू होती. कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पर्याय सुचवले जात होते. पण एकमत होत नव्हते. त्याचवेळी आमचे एक मित्र बबन सातपुते म्हणाले ‘चला साहेब, बाहेरच्या देशात जावू.’
याबरोबरच एक नवी ट्युब पेटली! नुकतेच पासपोर्ट काढले होते. पण त्याचा उपयोग फोटो आयडी सोडून काही होत नव्हता. अनेक पर्याय पाहून स्वस्त आणि मस्त परदेशवारी करायची तर ‘चलो श्रीलंका’ यावर आमचे मत ठाम झाले. बाकी कुणाकडे पासपोर्ट नव्हते, म्हणून मी आणि सातपुते पुढील कामाला लागलो. काही टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना भेटलो. बरीच आकडेमोड झाली आणि ठरवले की आपण दोघेच जायचे तर कशाला पाहिजे टूर अ‍ॅरेंजर? जावू जमेल तसे. मग त्याच दिवशी चेन्नईवरून कोलंबोला जाण्या येण्यासाठी एअर इंडीया एक्स्प्रेस या विमानाचे २६ जुलै २००७ चे तिकिट बुक केले.
सर्व तयारी झाली आणि २३ जुलै रोजी औरंगाबादहुन दुपारी तीनच्या पॅसेंजरने हैद्राबादला निघालो. डुगडुग करत पॅसेंजर दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता हैद्राराबादला पोहोचली. एका छोट्या हॉटेलमध्ये फ्रेश झालो आणि तडक बसस्टँडवर आलो. चेन्नईला जाण्यासाठी बस उशीरा होती म्हणून विजयवाड्याच्या बसमध्ये बसून संध्याकाळी सहा वाजता विजयवाड्याला पोहोचलो. तिथून लगेच चेन्नई बस मिळाली आणि सकाळी सहा वाजता चेन्नईच्या मोफुसील बसस्टँडवर पोहोचलो. तिथून एअरपोर्ट खूप दूर होते. रु. २००/- मध्ये एक टॅक्सी ठरवून एअरपोर्टजवळच्या एका लॉजमध्ये रूम बुक केली. दिवस पूर्ण रिकामा होता म्हणून सि��ी बसने फिरून मरीना बीचवर संध्याकाळपर्यंत टाईमपास करून परत आलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी आठचे प्लेन होते. पहाटे चारलाच जाग आली. परदेशात जायची खूप एक्साईटमेंट होती त्यामुळे रात्री झोप अशी लागलीच नव्हती. स्नान वगैरे आटोपून साडेपाच वाजताच एअरपोर्टवर चेक इन केले. इमिग्रेशन चेक म्हणजे काय याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आमच्या समोर एक माणूस सेक्युरिटीसोबत तामिळीत हुज्जत घालत होता. सेक्युरिटी पोलिस युपीचे होते. तो माणूस वॉलेट, बेल्ट काढत नव्हता. आमच्या समोर त्या पोलिसांनी त्याला संपूर्ण उघडे केले. अंडरवेअर शिल्लक ठेवली होती म्हणून बरे झाले! बिचारा रडवेला चेहरा करून आत गेला.
एवढी कडक सेक्युरिटी असते हे पाहून आम्ही हबकलोच. गुपचूप सर्व सामान, बेल्ट, वॉलेट, हँड पाऊच, घड्याळ, शूज, अगदी हातरुमाल, चष्मा (अंगावरचे कपडे सोडून) सगळं स्कॅनर मध्ये टाकले. चेकींग करून पुढे येवून सामान घेतले. हँड पाऊचमध्ये दाढीचे नवे करकरीत सामान सेक्युरिटींनी काढून घेतले! परदेश प्रवासासाठी म्हणून भारीचे सामान घेतले होते. ते सर्व डस्टबीनमध्ये माझ्याकडे पहात आरामात पहुडले. आत्ताच त्या माणसाचा प्रताप पाहिला होता, म्हणून काहीही न बोलता उरलेले सामान घेवून गुमान आत गेलो.
काही वेळातच विमानाची अनाऊंसमेंट झाली. पासपोर्ट, तिकीट दाखवून विमानात प्रवेश केला. एअरहोस्टेसने काही अघटीत घडले तर काय करायचे हे अ‍ॅक्शनसहीत करून दाखवले आणि विमानाने आमची पहिली परदेशवारी घडवण्यासाठी उड्डाण केले.
मनात खूप गुदगुल्या होत होत्या. या तंद्रीत असतांनाच एअरहोस्टेसने सँडवीच, टोस्ट, चहा आणून दिला. चांगली सर्वीस होती विमानात. काही ठीस ठीस नाही की फीस फीस नाही. हसत इंग्लिश हिंदीत त्या बोलत होत्या. त्यात एक मराठी मुलगी होती हे आमच्या लक्षात आले होते. मध्येच एखादी बस खडबडीत रस्त्यावर धावतांना जसे जाणवते तसेच जाणवले. सातपुते एक्स मिल्ट्रीमन असल्यामुळे त्यांना अनुभव होता, पण माझ्या पोटात मात्र गोळा उठला होता. खाली ढग आणि वर खडखड! जीव मुठीत घेवून बसलो.
बाहेर पहात, फोटो काढत खाणे चालू होते. अजून चहा घेतच होतो की अनाऊंसमेंट झाली ‘दहा मिनिटात आपण बंदारनायके कोलंबो एअरपोर्टवर पोहचत आहोत!’ अरे! आत्ताच बसलो आणि आलंही का श्रीलंका! आश्चर्याने बाहेर पाहिले तर समुद्र, छोटी घरे दि��ायला लागली. हळुहळू विमान खाली आले आणि अतिशय सुंदर रितीने लँड झाले. एअरहोस्टेस आणि पायलट नमस्कार करत सर्वांना निरोप देत दारात थांबले. त्या मराठी मुलीला सातपुते म्हणाले ‘पॅसेंजर कसेही असले तरी तुम्हाला सतत हसत राहणे कसे काय जमते हो?’ ती मुलगी मराठीतच म्हणाली ‘आमची हीच तर ड्युटी आहे सर’.
हसत हसतच आम्ही बाहेर पडलो. परत इमिग्रेशन चेक सुरू झाले. फॉर्म भरून आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. आमचा नंबर आला आणि फॉर्म वाचून तो ऑफिसर म्हणाला ‘व्हेर यु आर स्टेईंग इन कोलंबो?’
कुठे रहायचे ते आम्ही ठरवलेच नव्हते. मुंबई पुण्याला जातो तसेच आम्ही निघालो होतो. तिथे गेल्यावर एखादा लॉज पाहू असे ठरवले होते. मी त्या ऑफिसरला म्हणालो ‘वुई हॅव नॉट डिसायडेड येट. वुई विल फाईंड सम हॉटेल अँड स्टे देअर.’
मी प्रामाणिकपणाने एक्स्प्लेनेशन देत होतो, पण त्याने मात्र फॉर्म माझ्या तोंडावर फेकला आणि जोरात ओरडला ‘गेट आऊट! अँड गो बॅक टू इंडीया.’
आली का पंचाईत! काय काय ठरवले होते अन झाले काय! तिथून निघून बाजूला आलो तितक्यात अजून एकदा ‘गेट आऊट’ असा आवाज आला आणि माझ्या मागे सातपुतेही आले! हताश होवून आम्ही एका बेंचवर बसलो. बाजूला एका केबीनसमोर एक श्रीलंकन कबीर बेदी दाढी कुरवाळत उभा होता. कडक ड्रेस घातलेला गंभीर चेहर्‍याचा तो ऑफीसर माझ्याकडेच पाहत होता. मी उठून भीत भीत त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो ‘वुई आर टुरिस्ट सर. वुई वाँट टू सी श्रीलंका. फर्स्ट टाईम वुई केम अब्रोड. बट वुई हॅव नॉट डिसायडेड व्हेर टू स्टे. प्लीज हेल्प अस.’
दाढी कुरवाळतच तो मंद हसला आणि मला आत बोलावले. ‘राईट एअरपोर्ट गार्डन रिसॉर्ट रुम नंबर 208.’ मी त्याने सांगितले तसे डेस्टीनेशनच्या रकान्यात लिहिले आणि त्याला धन्यवाद देवून बाहेर पडलो. सातपुतेंच्या फॉर्ममध्येही तसेच लिहिले आणि वेगळ्या लाईनला लागलो. तिथल्या ऑफिसरने फॉर्म तपासला आणि पासपोर्टवर शिक्का मारून एकदाचे इमिग्रेशन अ‍ॅक्सेप्ट केले. खुश होवून आम्ही बाहेर पडलो. बाहेर जातांना डोळ्याच्या कोपर्‍यातून आम्हाला गेट आऊट म्हणणार्‍या ऑफिसरकडे पाहिले. तो कामात मग्न होता. त्याने आमच्याकडे पाहिलेच नाही म्हणून बरे झाले! सुटलो एकदाचे!
बाहेरच्या लाऊंजमध्ये श्रीलंकन टुर्सचे अनेक स्टॉल्स होते. तिथे चौकशी करून बाहेर अजून स्वस्त टॅक्सी मिळतील असा विचार करून एअरपोर्टच्या बाहेर आलो. एका टपरीवरून पाण्याची बाटली आणि चहा घेतला. त्याचे बील देतांना लक्षात आले की आपल्याकडे श्रीलंकन करं��ी नाही! आम्ही निघतांना सोबत डॉलर्स घेतले होते. एअरपोर्टवर ते कन्व्हर्ट करून घ्यायला पाहिजे हे माहितच नव्हते. परत पंचाईत झाली. त्या टपरीवाल्यानेच जवळच्या ज्वेलरकडून डॉलर कन्व्हर्ट करून घ्यायला सांगितले. लगेच तिथे जावून शंभर डॉलर देवून सात हजार श्रीलंकन रुपये घेतले आणि टपरीवाल्याचे बील दिले. तितक्यात ‘नेगोंबो नेगोंबो’ असे ओरडत एक मिनी बस तिथे थांबली. एका माणसाने मोडक्या तोडक्या इंग्रजीत कोलंबो पेक्षा नेगोंबो स्वस्त आहे आणि कोलंबोच्या बाहेरच्या भागात आहे असे सांगितले. लगेच निर्णय घेतला आणि नेगोंबोला निघालो.
अर्ध्या तासात आम्ही नेगोंबोला पोहोचलो. परत एका टपरीवर चहा घेत लॉज आणि टॅक्सीची चौकशी केली. तिथे एक मुंबईत शिकलेला विद्यार्थी भेटला. भारतीय भेटल्यामुळे त्याला आनंद झाला होता. त्याने त्याच्या ओळखीच्या टॅक्सीवाल्याला फोन केला आणि काही वेळातच इसरू नावाचा टॅक्सीवाला आला. ४०० डॉलरमध्ये सहा दिवस आमच्या सोबत रहायचे ठरवून त्या विद्यार्थ्याला धन्यवाद देवून आम्ही टॅक्सीत बसलो.
सगळ्यात आधी इसरूने आम्हाला एका मोबाईलच्या दुकानात नेले. तिथून टेंपररी सीम कार्डस मिळवून दिले. आता आम्हाला भारतात फोन करता येणे शक्य झाले होते. लगेच घरी फोन करून सर्व सुखरूप असल्याचा निरोप दिला. तिथून कोलंबो शहरात आलो. एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. संध्याकाळी स्ट्रिट मार्केटमध्ये फिरलो. अजून श्रीलंकन करंसीचा आम्हाला अंदाज येत नव्हता. एका दुकानातून शर्ट घेतला. त्याने किंमत १२०० एसएलआर (श्रीलंकर रुपीज) सांगितले. एवढे महाग असते का म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली. ‘आर यू इंडियन?’ असे म्हणत त्याने भारतीय रुपयात त्या शर्टची किम्मत रु. ४८०/- होते हे पटवून दिले तेव्हा कुठे आमच्या डोकात प्रकाश पडला. चहासुद्धा तीस रूपयाला मिळायचा म्हणून आम्ही जास्त घेत नव्हतो. पण इंडियन करंसीमध्ये तो १० रुपयाला पडतो हे लक्षात आल्यावर मात्र प्यायला लागलो.
दुसर्‍या दिवशी दिवसभर प्रवास करून आम्ही अनुराधापुराकडे निघालो. टॅक्सी अनुराधापुराला रात्री आठ वाजता पोहोचली. इसरूच्या ओळखीने एक होम स्टे घेतला. अतिशय छान जेवण त्यांनी सर्व्ह केले आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी उठल्यावर पाहिले तर ते होम स्टे एका सुंदर जंगलात होते. सर्वत्र झाडी होती. समोर एका झाडावर एक लाकडाची खोली होती. शिडी चढून त्या खोलीत बसूनच आम्ही नाष्टा केला आणि ‘आय बुवान’ म्हणजे नमस्कार करून त्या होम स्टेचा निरोप घेतला.
अनुराधापुरा हा अनेक बौद्ध स्तुपांचा प्रदेश होता. बरीच मोठी बौद्ध स्तुपे पाहून आम्ही कँडीकडे निघालो. वाटेत डंबुला गावातील क्रिकेट स्टेडियम पाहून जवळच असलेले सिग्रिया हे ठिकाण पाहिले. एका मोठ्या पुरातन शहराचे अवशेष आणि उंच दगडी डोंगरावर मंदिर व लेण्या होत्या तेथे. तेवढ्या उंच चढतांना वारा आणि लटकत्या पायर्‍यामुळे खूप भीती वाटत होती. ते सुंदर ठिकाण पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
संध्याकाळी सहाच्या आसपास कँडी या अतिशय मनमोहक शहरात पोहोचलो. इंग्लिश पिक्चरमध्ये असते तसेच वातावरण होते तिथे. शहराच्या मध्यभागी तलाव होता. त्या तलावा भोवतीच हे थंड हवेचे शहर वसले होते. हॉटेलचा शोध सुरू केला पण काही केल्या हॉटेल मिळेना. शेवटी रात्री आठ वाजता एक होम स्टे टाईप हॉटेल मिळाले. क्रिकेटर कुमार संगकाराच्या वडलांचे ते हॉटेल होते. रूममध्ये फ्रेश होवून संगकाराच्या वडलांना भेटायला गेलो. पण ते त्या दिवशी येणार नव्हते असे कळले. एक साठ पासष्ट वर्षाची बाई केअर टेकर होती. तिने मस्तपैकी जेवण तयार केले. जेवण करून आम्ही लवकरच झोपी गेलो.
सकाळी त्या बाईने भरपूर नाष्टा खावू घातला. ‘पुढच्या वेळी येतांना बायकोला घेवून या आणि माझ्यासाठी साडी आणा’ असे हक्काने म्हणाली. ‘हो नक्की’ असे आश्वासन देवून तिचा निरोप घेवून आम्ही बाहेर पडलो. कँडीतले खूप मोठे आणि अतिशय स्वच्छ बौद्ध मंदिर पाहून हरखून गेलो. बराच वेळ तिथे व्यतीत केला आणि नुवारा इलिया या हत्तीचे अनाथ आश्रम असलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी कूच केली. वाटेत चहाच्या बगिचात जावून एका फॅक्टरीत चहा कसा तयार करतात हे पाहिले आणि सर्वांना देण्यासाठी चहाची पाकिटे विकत घेतली.
नुवारा इलियात पोहोचल्यावर तिकिटे काढायला गेलो तर फॉरेनरसाठी दोन हजार रुपये लागतील असे त्याने सांगितले. हत्ती पहायला दोन हजार कशाला खर्चायचे? असा विचार करून एका ठिकाणी चहा घेतला. त्या चहावाल्याने सांगितले की एशियन टुरिस्ट साठी पाचशे रूपये तिकिट आहे. तो स्वत: सोबत आला आणि त्याने तिकिट काढून दिले. त्याच्यामुळे आम्हाला ते ठिकाण पाहता आले.
एका मोठ्या विस्तीर्ण आवारात हे आश्रम होते. आतमध्ये भरपूर बेवारस हत्ती होते. एका पायाने लंगडे, तुटलेल्या सोंडेचे असे जखमी हत्ती तिथे पोसले जातात हे कळले. श्रीलंकेत हत्ती खूप आहेत. बर्‍याच गावात गावाभोवती तारेचे कुंपन घालून रात्री त्यात करंट सोडतात. हत्तींच्या उपद्रवापासून बचाव होण्यासाठी असे अवैधरित्या गावकरी करतात असे समजले. यात जखमी झालेले हत्ती या आश्रमात आणले जातात.
नदीमध्ये हत्तींचा स्नान करण्याचा सोहळा पहायचा आनंद घेवून तिथून आम्ही कोलंबोकडे प्रयाण केले. वाटेत गॉल शहर पाहिले. सुनामीमुळे उध्वस्त झालेले समुद्र किनार्‍यावरचे गॉल फोर्ट अतिशय मोठे होते. फोर्टवर उभे राहून समोर क्रिकेट स्टेडियम स्पष्ट दिसत होते. लोकल ��ुठली तरी तिथे मॅच चालली होती. किल्ल्यावरूनच एका डोंगराकडे हात दाखवत इसरू म्हणाला ‘युवर हनुमान ब्रॉट धीस माऊंटेन द्रोणगीरी हियर’. खरे का खोटे माहित नाही, पण तिथूनच त्या डोंगराकडे पाहून आम्ही हात जोडले.
तिथून कोलंबोकडे निघालो. संपूर्ण समुद्रकिनार्‍याचा रस्ता होता. श्रीलंकेत एक पाहिले की रस्ते जरी छोटे असले तरी खूप चांगले होते. कुठेही खड्डे दिसले नाहीत. आणि रस्ता क्रॉस करतांना कुणी दिसला तर ड्रायव्हर दूरूनच कार थांबवून त्या क्रॉस करणार्‍याला जावू देत. तो पलिकडे गेल्यावराच कार चालू करत असत. ‘दिसत नाही का?’ ‘डोळे फुटले का?’ असे म्हणणारे कुणीच दिसले नाहीत.
रस्त्यात समुद्र किनारी बसून एका हॉटेलमध्ये चहा सांगितला. त्याने चहासोबत अनेक वेगवगळे स्नॅक्स आणून ठेवले. ‘टेस्ट इट’ असे म्हणून आम्हाला ते आग्रहाने खायला लावले. खूपच चांगले पदार्थ होते ते. सर्व फस्त करून दोन कप चहा पिऊन आम्ही कोलंबोकडे निघालो.
कोलंबोत पोहोचायला रात्र झाली होती. इसरू म्हणाला ‘���फ यू वाँट चीप स्टे, देन वन युथ हॉस्टेल इज देअर’ असे म्हणून त्याने एका हॉस्टेल टाईप टिपिकल सरकारी परिसरात नेले. एक रूम आम्ही पसंद केली. अगदी साधारण सरकारी डाकबंगल्यासारखी रूम होती. रात्री फक्त झोपायचे आहे तर कशाला भारी रूम करायची असा मध्यमवर्गीय विचार करून तिथे झोपलो.
दुसर्‍या दिवशी कोलंबो दर्शनास निघालो. ताज हॉटेल, बेंटॅटो बीच, झुऑलॉजिकल गार्डन हे सर्व पाहिले. इतके दिवस जेवण सप्पकच मिळत होते. म्हणून इसरूला सांगून एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. पोळी, भाजी, दालफ्राय ऑर्डर केली. लालभडक लोणचे दिसले म्हणून सातपुतेंनी ते ऑर्डर केले. एवढे करूनही जेवण सप्पकच निघाले. ते लोणचे तर केवळ रंगानेच लाल होते, चव मात्र गुळचीट होती. कसेबसे जेवण उरकले आणि प्रेमदासा स्टेडियमकडे निघालो. योगायोगाने भारत श्रीलंका टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस होता. तिकीट काढायला गेल्यावर तिकीटवाला म्हणाला ‘द्याट वे फ्री एंट्री, हिअर टू हंड्रेड एसएलआर.’ फ्री एंट्रीमध्ये चांगले नसेल म्हणून दोनशे रुपयाचे तिकीट काढून आत गेलो. फारच कमी प्रेक्षक होते. बँडवर ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ हे गाणे वाजवले जात होते. फ्री स्टँडमध्ये लॉनवर बरेच प्रेक्षक एंजॉय करत होते. तिथेच गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटले. मॅच पाटा खेळपट्टीवर चालली होती. इशांत शर्मा सुद्धा आऊट होता होत नव्हता यावरूनच लक्षात येत होते. कंटाळून आम्ही बाहेर पडलो आणि मार्केटमध्ये फिरून एक लॉज बुक केले. दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास होता. इसरूला सकाळी पाच वाजता यायला सांगून सामानाची आवाराआवर करून झोपी गेलो.
सकाळी बरोबर पाच वाजता इसरू आला. त्याच्या सोबत विमानतळाकडे निघालो. काहीच रहदारी नव्हती तरी तो ८० च्या पुढे स्पीड वाढवत नव्हता. तो म्हणाला ‘पोलिस व्हेरी स्ट्रिक्ट. इफ स्पीड मोर, दे फाईन’ असे जमेल तसे त्याने इंग्रजीतून सांगितले. हाईट म्हणजे एका चौकात लाल लाईट लागली अन तो थांबला. चारी बाजूने मिळून फक्त आमचीच गाडी होती. एका कोपर्‍यात मागे हाताची घडी घालून एक किडमिडीत पोलिस उभा होता. ‘चल कुछ नही होता’ असे आपल्या स्टाईलमध्ये इंग्रजीतून त्याला आम्ही म्हणालो. तो म्हणाला ‘नो सर, पोलिस फाईन’.
आपल्याकडे असे असते तर दहा किलोमिटर पुढे निघून गेलो असतो. पण तिथले नियम कडक होते. शेवटी सहा वाजता विमानतळावर पोहोचलो. इसरूचे सर्व पैसे देवून वर भरघोस टीप दिली आणि आत येवून चेक इनचे सर्व सोपस्कार पार पाडले. एक माणूस सर्वांकडे दोन दोन ड्युटी फ्री लिकरच्या बाटल्या देतांना दिसला. आमच्याकडे येवून आम्हालाही म्हणाला ‘विल यू कॅरी दिज टू बॉटल्स? टू बॉटल्स आर अलाऊड. आवर मॅन विल कलेक्ट इट अ‍ॅट चेन्नई अँड विल पे यू टू फिफ्टी फॉर इच बॉटल.’
सातपुते लगेच तयार झाले, पण मी अडवले. ‘यात काही ड्रग्ज वगैरे भानगडी असतील तर आपण अडकून जाऊ. नको मोहात पडायला.’ असे म्हणून विनम्रपणे त्याला नकार दिला आणि विमानात बसलो. एक तास दहा मिनिटाचा प्रवास करून चेन्नई एअर पोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवरून बाहेर पडतांना सर्व पॅसेंजरच्या हातात दोन दोन बॉटल दिसत होत्या. बाहेर एक माणूस त्या घेत होता आणि प्रत्येकाला पाचशे रुपये देत होता.
‘बघा साहेब, पाचशे रुपये फुकट गेले’ असे सातपुते म्हणाले आणि कपाळाला हात मारून घेत हसत हसतच आम्ही बाहेर पडलो.
तो दिवस चेन्नईत थांबून दुसर्‍या दिवशी हैद्राबादमार्गे औरंगाबादला परत आलो. या दौर्‍यात औरंगाबाद ते श्रीलंका जाणे येणे धरून खरेदीसहित सव्वीस हजार रुपये प्रत्येकी खर्च आला. टुर कंपनीकडून गेलो असतो तर (खरेदी सोडून) चाळीस हजार लागले असते. पैसे खूप वाचले, पण एक लक्षात आले की एकतर अभ्यास करून जायला पाहिजे किंवा ट्रॅव्हल्स कंपनीसोबतच जायला पाहिजे, म्हणजे सर्व महत्वाची ठिकाणे पाह्यला मिळतात. आमची बरीच ठिकाणे मिस झाली.
असे असले तरी या पहिल्यावहिल्या विदेश दौर्‍यात खूप मजा आली, आणि मुख्य म्हणजे (श्रीलंकेला जाऊन का होईना) एकदाचे आम्ही ‘फॉरेन रिटर्न्ड’ झालो...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
चेन्नई सुपर किंग्सच्या संघात शेन व्हॉटसन परत मुंबई : प्ले ऑफमध्ये दोन महिन्यांचा थरार पार पडल्यानंतर आयपीएलच्या अकराव्या हंगामा�� आजपासून प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या संघात सॅम बिलिंग्ज ऐवजी शेन वॉटसनला जागा मिळाली आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला क्वॉलिफायर सामना सुरू आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या हैदराबादची लढाई चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध रंगणार आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादच्या संघाने गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने आपल्या नावावर केलेे आहेत. त्यामुळे आजचा सामना हैदराबादची गोलंदाजी विरुद्ध चेन्नईची फलंदाजी असाच रंगणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश ��रणार आहे, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीचे आव्हान आहे.
1 note · View note
digimakacademy · 4 years ago
Text
करोना लशीचं 'ड्राय रन', समिक्षेसाठी आरोग्यमंत्री चेन्नईच्या दौऱ्यावर
करोना लशीचं ‘ड्राय रन’, समिक्षेसाठी आरोग्यमंत्री चेन्नईच्या दौऱ्यावर
चेन्नई : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज पुन्हा करोना लशीबद्दल सूतोवाच केलंय. लवकरच काही दिवसांतच देशवासियांना कोव्हिड १९ ची लस मिळू शकेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. ते चेन्नईमध्ये बोलत होते. चेन्नईच्या सरकारी रुग्णालयांत लशीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशव्यापी ड्राय-रनची समीक्षा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. गृहिणींना पगार, प्रत्येक घरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्‍ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.  जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत ��ाहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. 
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.  नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन ​​किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
समीर वानखेडेंची चेन्नईच्या DGTS मध्ये बदली
समीर वानखेडेंची चेन्नईच्या DGTS मध्ये बदली
समीर वानखेडेंची चेन्नईच्या DGTS मध्ये बदली आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणाचा चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या मुंबई एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंची आता बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना आता चेन्नईच्या DG TS म्हणजे करदाते सेवांचे महासंचालक बनवण्यात आलं आहे. समीर वानखेडे हे सध्या डीजीएमआरए पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
विजयानंतर धोनी म्हणाला - तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलात तर चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही पोहोचला नाही तर जगाचा अंत नाही.
विजयानंतर धोनी म्हणाला – तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलात तर चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही पोहोचला नाही तर जगाचा अंत नाही.
सीएसकेच्या विजयावर एमएस धोनी: रविवारी रात्री झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) चौथा विजय मिळवला. CSK ने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या आयपीएलमधील हा सर्वात मोठा विजयही ठरला. या विजयानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी खूप ��नंदी दिसत होता. सामन्यानंतर त्याने आपल्या संघाच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग या दोन युवा वेगवान…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
Smartacus 2022: HT नॅशनल इंटरस्कूल क्विझच्या दिग्गज क्विझमास्टर्सना भेटा
Smartacus 2022: HT नॅशनल इंटरस्कूल क्विझच्या दिग्गज क्विझमास्टर्सना भेटा
अनेक दशकांपासून, चेन्नईतील स्वातंत्र्यदिनाचे समारंभ लँडमार्क क्विझचे समानार्थी आहेत, ज्याचे आयकॉनिक क्विझमास्टर डॉ. नवीन जयकुमार यांनी आयोजन केले आहे. 90 च्या दशकात आणि त्यानंतरच्या दशकात, क्विझ उत्साही चेन्नईच्या म्युझिक अकादमी हॉलमध्ये डॉ. जयकुमार यांच्या ��्विझर्ससह जादूचे विणकाम पाहण्यासाठी गर्दी करतील. प्राथमिक फेरीनंतर, प्रेक्षक श्री अविनाश मुदलियार यांच्या नेतृत्वाखालील टीम आर्डवार्क्स…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
#DRS नाही: स्टेडियमचे दिवे गेले, चेन्नईचा फ्यूज उडाला, मीम शेअर करून चाहते म्हणाले - हा सामना आहे की विनोद..!
#DRS नाही: स्टेडियमचे दिवे गेले, चेन्नईचा फ्यूज उडाला, मीम शेअर करून चाहते म्हणाले – हा सामना आहे की विनोद..!
#NODRS वर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter IPL 2022 च्या 59 व्या सामन्यात वीज संकटाचा परिणाम दिसून आला. वास्तविक, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नईच्या डावाच्या पहिल्या 10 चेंडूपर्यंत डीआरएस उपलब्ध नव्हता, कारण स्टेडियममधील वीज खंडित झाली होती. आयपीएल 2022 चा 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिले 10 चेंडू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
चेन्नईच्या करामतीमुळे पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%82/?feed_id=17061&_unique_id=5f9fad947a0e3
0 notes
kokannow · 4 years ago
Text
चहरचा कहर! चेन्नईचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय
चहरचा कहर! चेन्नईचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय
मुंबई – आयपीएलच्या 14व्या पर्वातील आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 षटकांत 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. पंजाबच्या बड्या फलंदाजांना चेन्नईच्या दीपक चहर या युवा गोलंदाजाने पुरतं हैरान केलं. त्याने आपल्या 4 षटकांत पंजाबच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडलं.…
Tumblr media
View On WordPress
0 notes