Tumgik
#खासदार पाऊस
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत एक हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पाऊस अद्यापही देशातून परतलेला नाही. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू होत आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री अचानक पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा हे रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी झाले आहेत. आज पहाटे मुंबईत राहत्या घरी ही घटना घडली. रिव्हॉल्वर हातातून निसटून खाली पडल्याने, त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायात लागल्यानं, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, गोविंदा यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.  
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बंधाऱ्यांमुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर जळकोट इथंल्या नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचं लोकार्पणही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी काल नांदेड इथं महाराष्ट्रातल्या खासदारांशी सवांद साधला. मुंबई -जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी, त्यासोबतच नांदेड - हैदराबाद या मार्गावर नवी वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. विभागांतर्गत गेल्या पाच वर्षात १ हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, २६ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नांदेड - बीदर, नांदेड - लातूर आणि बोधन - लातूर या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचंही जैन यांनी सांगितलं.
****
उद्या गांधी जयंतीला नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. गावस्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण स्‍पर्धेतल्या पात्र कुटुंबांचा उद्या सन्‍मान करण्‍यात येणार आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावं, त्याकरता प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड, परिसर स्वच्छता, स्वच्छता रॅली यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये काल संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यासह शाळेत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला.
****
0 notes
gajananjogdand45 · 10 months
Link
https://marmikmaharashtra.com/mp-hemant-patils-demand-to-the-chief-minister-is-to-give-compensation-of-rs-180-crore-to-the-farmers-of-hingoli-district/
0 notes
nandedlive · 1 year
Text
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न महावितरण कंपनीने तात्काळ सोडवावा. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजेच्या प्रश्नाविषयी भेट घेणार.
Tumblr media
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न महावितरण कंपनीने तात्काळ सोडवावा. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजेच्या प्रश्नाविषयी भेट घेणार. भागवत देवसरकर यांची माहिती. प्रतिनिधी दिनांक 22 एप्रिल हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, ग्रामीण भागातील वीज हे रात्रीच्या वेळेला गायब होते त्यात उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण,त्रस्त होत आहेत, ग्रामीण भागात अनेक गावात रात्रभर लाईटच नसते,या भागातील नागरिक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे चकरा मारूनही कंपनीचे अधिकारी दाद देत नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत,हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेच्या प्रश्नाविषयी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, खासदार हेमंत पाटील,बाबुराव कदम कोहलीकर यांच्या माध्यमातून भेट घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विजेचा प्रश्न त्यांच्या कानावर घालून सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती हदगाव विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
Tumblr media
उन्हाळ्याचे दिवस त्यात वादळी वाऱ्यासह पाऊस यामुळे वातावरणात बदल होऊन सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात साधा वारा आला तरी लाईट जाते, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत,दुरुस्तीचे कामे पावसाळ्यापूर्वी करायची असतात ती पण अद्याप सुरू केली नाहीत, याबाबत कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता शाखा अभि���ंता यांनी ही मोहीम राबवून नागरिकांना रात्रीच्या वेळी वीजपुरवढा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे,परंतु या अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज मिळत नाही, अनेक गावात रात्रभर लाईटच नसल्यामुळे नागरिकांना झोपेअभावी रात्र काढावी लागत आहे,अनेक गावातील नागरिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारूनही अधिकारी दात देत नसल्यामुळे याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरठा सुरळीत व्हावा यासाठी माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री सूर्यकांता पाटील, खासदार हेमंत पाटील, बाबूराव कदम कोहळीकर यांच्या माध्यमातून भेट घेऊन दोंन्ही तालुक्यांतील संबंधित अधिकाऱ्याची एक बैठक लावून वीजपुरवठा सुरळीत होईल यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती भागवत देवसरकर यांनी दिली आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे भोपाळच्या शाळा बंद, आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यांची तयारी
मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे भोपाळच्या शाळा बंद, आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्ह्यांची तयारी
मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि नर्मदापुरममधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (प्रतिनिधित्वात्मक) भोपाळ: मध्य प्रदेशातील जबलपूर, भोपाळ आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि नर्मदापुरममधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जबलपूरमध्ये बरगी धरणाचे 21 पैकी 13 दरवाजे आणि बारणा धरणाचे आठ पैकी सहा दरवाजे अतिरिक्त पाणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Washim Rain | वाशिम जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, खासदार आणि आमदार बांधाकडे फिरकलेही नाही
Washim Rain | वाशिम जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, खासदार आणि आमदार बांधाकडे फिरकलेही नाही
Washim Rain | वाशिम जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, खासदार आणि आमदार बांधाकडे फिरकलेही नाही वाशिम जिल्ह्यात मागील 23 दिवस सलग मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचून शेताला नदी नाल्यांचे स्वरूप आल्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी साचलं आहे. मात्र शेतकरी आपल्या रोजीरोटीसाठी संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. वाशिम : वाशिम (Washim) जिल्हात…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
"मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे!" - मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे
“मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे!” – मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे
पुणे दि. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे! राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे !, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे !, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
"मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे!" - मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे
“मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे!” – मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे
पुणे दि. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे! राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे !, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे !, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 
पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा रद्द-मात्र तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड
आणि
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम-पालघर तसंच नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज लद्दाखमध्ये सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सैन्यदलाच्या तळाला भेट देऊन राष्ट्रपतींनी तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला. इथल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले. सियाचीन युद्ध स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतरत्न दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचीन दौरा करणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्याच राष्ट्रपती आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमांपैकी तीन परम रुद्र संगणकांचं तसंच हवामान विभागासंदर्भात एक संगणकीय यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आलं. शास्त्रोक्त संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.
****
देशांतर्गत कापूस उत्पादनात प्रति हेक्टरी एक टन वृद्धीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कृषीपाठोपाठ रोजगार देणारं वस्त्रोद्योग हे मोठं क्षेत्र असून सन २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये सहा कोटी लोकांना रोजगार देता येतील असा विश्वासही गिररराज सिंह यांनी वर्तवला.
****
देशात सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या खर्चाचं प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, २०२१ मध्ये ते प्रमाण ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरून वाढून १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
****
प्रशिक्षण काळातच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांचं अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचे निर्देश देत, हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खेडकर सध्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीने विरोध केला आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, अनेक भागात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
****
लातूर जिल्ह्यात रेणा नदीवरील रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे आज सकाळी १० सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा १ हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
****
हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ���हे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातील सांजा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली –
१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्रवर्ग -४ मधील हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा संकलन, वर्गीकरण, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती, सुक्या कचराचे व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
नांदेड जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील पर्यटन स्थळांना चालना आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी काम करताना सर्व नियम आणि कायद्यातील तरतुदी याची माहिती घेऊन काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय
Tumblr media
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय - कृषि मंत्री अब्दुल सत्तार   नांदेड येथे मराठवाडा विभागीय पातळीवर कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक   पूरग्रस्त भागाची पाहणी नांदेड दि. 21 :- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचे नियोजन आम्ही करत आहोत. याबाबत येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. महसूल यंत्रणा व कृषि विभाग यांनी समन्वयातून उरलेले पंचनामे तात्काळ कसे पूर्ण होतील याचे नियोजन करण्याचे आदेश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात मराठवाडा विभागीय पातळीवरील कृषि आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार रत्नाकर गुट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. डी. जी. चिमनशेट्टे व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार डॉ. राहुल पाटील, विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.   जुलै पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झालेले आहेत. तथापि जुलै नंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात पाचवेळा तर काही मंडळात तीन वेळा तर काही मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली. एकाच हंगामात पाच-पाच वेळा जर अतिवृष्टी होत असेल तर स्वाभाविकच या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. उर्वरीत पंचनामे अधिक गतीने पूर्ण करणे हे अत्यावश्यक असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यात दक्षता घेऊन तात्काळ नियोजन करावे, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात 89 मंडळापैकी तब्बल 82 मंडळात अतिवृष्टी आहे. जिल्ह्यातील 8 लाख 12 हजार हेक्टर कृषि क्षेत्रापैकी 50 टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत अधिकाधिक मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सद्यस्थितीत विधानसभेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशाबाहेर कोणत्याही घोषणा करता येत नाहीत. ज्या-ज्या भागात जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तात्काळ मिळावी यादृष्टिने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे. लवकरच याबाबत धोरानात्मक निर्णय घेतला जाईल हे त्यांनी स्पष्ट केले.   जिल्हा प्रशासन, कृ्षि विभाग आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्पर समन्वय असणे खूप आवश्यक आहे. यात तिघांनी मिळून जर नुकसानीचा पंचनामा केला तर त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचला जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.   जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीसह जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या हाती काही पीक शिल्लक आहे त्यांना सावरण्यासाठी विजेची शाश्वत उपलब्धता असणे आवश्यक आहे. परंतू अनेक गावात ट्रान्सफार्मरचे आयुष्य संपत आले असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरूस्तीही करणे आवश्यक झाले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 5 कोटी रुपयांची तरतुद करून तात्काळ चांगले ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार डॉ. राहूल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आग्रही मागणी केली. पूरग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद व प्रत्यक्ष गावातील परिस्थिती समजून घेण्यासाठी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भापासून दौरा सुरू केला आहे. आज नांदेड जिल्ह्यातील प्रातिनिधीक गावांना त्यानी भेट देऊन पाहणी केली. कासारखेडा, नांदुसा, विष्णुपुरी, जानापुरी, सोनखेड भागातील परिस्थितीची त्यांनी पाहणी केली.   अशी आहे विभागीय पाहणी औरंगाबाद विभागात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर असून सन 2022-23 मध्ये 47.99 लाख हेक्टर क्षेत्रावर 98.80 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची 2450056.42 हेक्टर क्षेत्रावर व कापूस पिकाची 1372886.82 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद विभागामध्ये 1 जुन ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान 570.80 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पाऊसाच्या तुलनेत 130.11 टक्के इतका पाऊस पडलेला आहे. एकुण 52 दिवसामध्ये सदरचा पाऊस पडलेला आहे. औरंगाबाद विभागात एकुण 450 महसूल मंडळे असून त्यापैकी 207 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये औरंगाबाद विभागात एकुण 66,30,913 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 35,21,449 हेक्टर क्षेत���र विमा संरक्षित झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे एकुण 1,80,017 पूर्व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. औरंगाबाद विभागामध्ये जुन ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8,11,845 शेतकरी बाधित झालेले असून 5,87,466.41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाईपोटी 403.58 कोटी रकमेची आवश्यकता आहे. तसेच 489.11 हेक्टर शेतजमीन खरडून / वाहून गेली असून त्याचा नुकसान भरपाईपोटी 1.43 कोटी रकमेची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मच्छरदाणी, पाऊस, इडली: निलंबित खासदारांचा संसदेबाहेर ५० तासांचा निदर्शनेचा दुसरा दिवस
मच्छरदाणी, पाऊस, इडली: निलंबित खासदारांचा संसदेबाहेर ५० तासांचा निदर्शनेचा दुसरा दिवस
आंदोलक खासदार मच्छरदाणीत झोपले. नवी दिल्ली: खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात 50 तासांच्या आंदोलनासाठी विरोधकांनी संसदेचे प्रवेशद्वार निवडले आहे. बुधवारी पाच खासदारांनी संसदेबाहेर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खासदारांच्या दुसऱ्या रात्रीचे आकाशाखाली फोटो शेअर केले. छायाचित्रांमध्ये खासदार मच्छरदाणीत झोपलेले दिसत आहेत. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगरच्या उड्डाणपुलाचं कसं काय चाललंय ?
नगर शहरातील मोठा जिव्हाळ्याचा आणि प्रलंबित विषय असलेला उड्डाणपूल याचे काम सध्या प्रगतीपथावर असून दिवाळीच्या सुमारास उड्डाणपुलाचे गिफ्ट मिळेल अशी नगरकरांना आशा आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात पाऊस सुरू असून उड्डाणपुलाचे काम मात्र त्यामुळे थांबलेले नसल्याचे सुखद चित्र असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरु आहे. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम…
Tumblr media
View On WordPress
0 notes