#खर्चास
Explore tagged Tumblr posts
Text
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मुंबई :- राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20 टक्के, वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/…
View On WordPress
#1160#Adventure#अनुदानासाठी#आहे#केसरकर#कोटींच्या#खर्चास#गंभीर#दीपक#मंत्रिमंडळाची#मान्यता;#मुद्दा#राज्यातील#शालेय#शाळांना#शिक्षणमंत्री
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
आसामच्या नऊ लाख पस्तीस हजारहून अधिक लोकांची आधारपत्रं देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. २०१९ च्या फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्वशर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या पंधरा ते तीस दिवसात आपली आधारपत्रं मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ साठी सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांत संबंधितांनी आपली मतं मांडावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी.श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीनिवासन हे १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिससेवा बिहार केडर��े अधिकारी आहेत.
****
दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्या��ी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी तीन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बाबेजा यांच्यासमोर दूरदृष्यप्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' -युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी "वित्त विभागाला” प्राधिकृत करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी वॉर्ड, अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक ॲक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे ९९ पूर्णांक ९९ टक्के जिवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं, यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने आज शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्या�� आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गुजरात मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत ८४ भारतीय क्रिडापटू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
Link
धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम ! १ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता. मंत्रिमंडळ निर्णय १४ फेब्रुवारी २०२३.
0 notes
Text
राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई, दि. 13 :- राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20 टक्के, वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/ नैसगिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करणे आणि त्यासाठी 1160 कोटी रुपयांच्या खर्चास आज…
View On WordPress
0 notes
Text
राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यातील शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई, दि. 13 :- राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी 20 टक्के, वाढीव 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/ नैसगिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करणे आणि त्यासाठी 1160 कोटी रुपयांच्या खर्चास आज…
View On WordPress
0 notes
Text
Ajit Pawar Has Decided That 30 percent Of The Funds Of The District Planning Committee Will Be Allowed To Be Used For Corona Prevention Measures - corona prevention measures करोनाप्रतिबंधक उपयाययोजनांसाठी अजित पवार यांचा महत्वाचा निर्णय | Maharashtra Times
Ajit Pawar Has Decided That 30 percent Of The Funds Of The District Planning Committee Will Be Allowed To Be Used For Corona Prevention Measures – corona prevention measures करोनाप्रतिबंधक उपयाययोजनांसाठी अजित पवार यांचा महत्वाचा निर्णय | Maharashtra Times
हायलाइट्स: जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल, असा निर्णय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्री��ील गैरप्रकार…
View On WordPress
#ajit pawar#corona prevention measures#District Planning Committee#अजित पवार#करोनाप्रतिबंधक उपयाययोजना
0 notes
Photo
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री सुभाष देसाई कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 81 कोटींची तरतूद औरंगाबाद, दिनांक 30: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाययोजनेसाठी 81.38 कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजूरीचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 notes
Link
३६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/32txYDu
0 notes
Text
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे ३००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले (Re Issue) असून ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधिच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.
रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसुचनेमध्ये नमूद केलेल्या अटी…
View On WordPress
0 notes
Text
दिव्य मराठी ओरिजिनल:उच्च शिक्षणावर खर्चास 293 दिवसांची दिरंगाई, ‘कॅग’च्या अहवालात राज्य सरकारवर ठपका
दिव्य मराठी ओरिजिनल:उच्च शिक्षणावर खर्चास 293 दिवसांची दिरंगाई, ‘कॅग’च्या अहवालात राज्य सरकारवर ठपका
दिव्य मराठी ओरिजिनल:उच्च शिक्षणावर खर्चास 293 दिवसांची दिरंगाई, ‘कॅग’च्या अहवालात राज्य सरकारवर ठपका Go to Source
View On WordPress
#293#अहवालात#ओरिजिनल:उच्च#कॅगच्या#खर्चास#ठपका#दिरंगाई#दिवसांची#दिव्य#बातम्या#मराठी#राज्य#शिक्षणावर#सरकारवर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या कामांना सरकारची मंजूरी
मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
देशासह राज्यात हर घर तिरंगा अभियानाला उत्साहात सुरुवात
आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरस्कार जाहीर तर, साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या कवी नर्मद पुरस्काराचे मानकरी
****
देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज सायंकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित केलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या सुमारे दोन हजार कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठ��ीत ही मंजुरी देतानाच, या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी आपत्ती विषयक विविध आराखड्यांना देखीलमंजुरी देण्यात आली.
****
पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पासाठी १४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करणं, शासकीय तसंच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकांना ठोक मानधन देणं, मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणं, तसंच नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३६ हजार ९६४ कोटी खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाला कालपासून प्रारंभ झाला.
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. नागपूर इथं काल घेतलेल्या तिरंगा मॅरेथॉनमध्ये नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही काल महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा यात्रा कढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सैनिकी गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्याच�� लक्ष वेधून घेतलं. वेरूळ इथं काल शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट लांबीच्या तिरंग्यासह प्रभातफेरी काढली.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उप��्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
मराठवाडा विभागातल्या हर घर तिरंगा मोहिमेविषयीची माहिती श्रोत्यांना आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल.
****
देशाच्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली इथं मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील यांना, तसंच परतूर तालुक्यातले रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना निमंत्रण मिळालं आहे. राम पाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
मला जवळपास १४ वर्ष याठिकाणी होत आहेत, मी तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक लाभाच्या योजना असतील, प्रत्येक योजनेचा लाभ दिला. किंवा प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेत माझी याठिकाणी निवड करण्यात आली.
****
निवासी डॉक्टरांची संघटना - एफ ओ आर डी ए नं पुकारलेलं देशव्यापी आंदोलन काल मागे घेतलं. कोलकाता इथं एका निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल देशभरात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या प्रतिनिधींनी काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमधल्या निवासी डॉक्टरांनी मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर आरती अंकलीकर-टिकेकर यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह विविध सहा जीवनगौरव पुरस्कार तसंच १२ गटांत सांस्कृतिक पुरस्कार काल जाहीर करण्यात आले.
राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काल संध्याकाळी हवाई रुग्णवाहिकेतून हैदराबाद इथं हलवण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आल्यानं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी शहरापासून जवळच असलेल्या सुकापुर वाडी गावाला रस्ता नसल्यानं इथल्या नागरिकांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह शाळा भरवली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा पवित्रा या सर्वांनी घेतल्यानं, काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ५० लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटख्यासह एकूण ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल काल जप्त केला. बीडहून निघालेला हा ट्रक जालना-अंबड मार्गावरील लालवाडी शिवाराततून जालन्याकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई करत, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी काल लातूर इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तसेच जिल्हा शोध आणि बचाव पथकातल्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा १२ वा स्मृतीदिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं विविध वैद्यकीय संघटना आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Link
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यात 36 गावांमध्ये सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे दिनांक 7 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधीमंडळाला सादर करताना केली होती. प्रती सभागृह 62 लक्ष 53 हजार 400 रू. या प्रमा��े एकूण रूपये 22 कोटी 51 लाख 22 हजार 400 एवढया खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
0 notes
Text
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. 10 : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आयोगाकडून…
View On WordPress
0 notes
Text
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. 10 : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयोगाच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आयोगाकडून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
विदर्भासह मराठवाड्यात दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
आणि
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांची घोषणा-ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या सुमारे दोन हजार कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यात दरड प्रतिबंधक, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांची उभारणी, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा समावेश आहे. या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालयातल्या तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या आपत्ती प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यावेळी आपत्ती विषयक विविध आराखड्यांना मंजुरी देण्यात आली.
****
पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी १४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
****
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. २७ ते २०१ अश्वशक्ती भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट ७५ पैसे तसंच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपया अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यात येणार आहे.
राज्यात सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३६ हजार ९६४ कोटी खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय तसंच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातील ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी के �� एफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी एक हजार ४९४ कोटी ४६ लाख रूपये किंमतीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत.
****
देशात पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘अहिल्या भवन’ मुंबईत मानखुर्द इथं उभारणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. ३५ हजार ५०० चौरस मीटर परिसरात हे भवन उभारलं आहे. यामध्ये महिला आणि बालहक्क आयोग, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आदी २० कार्यालयं असणार आहेत.
****
कोलकत्यातील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे. मुंबईतल्या विविध रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना या प्रकरणी नोटीस बजावत दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काल रात्री मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला. आज आपत्कालीन सेवा वगळता घाटीतले निवासी डॉक्टरही संपात सहभागी झाले होते.
****
मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये शांतता रॅली झाली. यावेळी केलेल्या भाषणात जरांगे यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून त्यांनी टीका केली.
****
राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून ही सरकार त्यावर अंतिम निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारत असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदनही सादर करण्यात आलं आहे.
****
देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन परवा साजरा होत आहे. यानिमित्तानं नवी दिल्ली इथं मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील यांना, तसंच परतूर तालुक्यातील रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना निमंत्रण मिळालं आहे. राम पाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या –
मला जवळपास १४ वर्ष याठिकाणी होत आहेत, मी तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक लाभाच्या योजना असतील, प्रत्येक योजनेचा लाभ दिला. किंवा प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेत माझी याठिकाणी निवड करण्यात आली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यावर्षीच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रवेश घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्या असं मंडळानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात ��ेणाऱ्या या वर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रकाश बुध्दीसागर यांना, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, शुभदा दादरकर यांना, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, शशिकला झुंबर सुक्रे तसंच जनार्दन वायदंडे यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार यासह विविध १२ गटांत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा जीवनगौरव पुरस्कारांची रक्कम दुप्पट करण्यात आली असून त्याचं स्वरूप दहा लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली ��सून, आता या पुरस्काराचं स्वरूप तीन लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं आहे.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर आज तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी-कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
****
या मोहिमेत धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण भागात ८० हजार तर शहरी भागात एक लाख तिरंगा ध्वज वितरित केले जाणार आहेत. यासाठी कनगरा इथल्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाशी संलग्नित एनपीके महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाची निर्मिती करण्यात येत आहे. या महिला बचत गटाला जिल्हा प्रशासनाने ८० हजार ध्वज निर्मितीचं उद्दिष्ट दिलं असून, जवळपास १०० महिलांना तिरंगा ध्वज निर्मितीचं काम मिळालं आहे. या महिलांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या –
लक्ष्मी बनसोडे
गेल्या तीन वर्षापासून आम्ही ध्वज निर्मितीचं काम करतो. सात रूपये प्रमाणे आम्ही एक ध्वज तयार करतो. आणि आम्हाला दिवसाचे चारशे ते पाचशे रूपये रोजगार मिळतो. म्हणजे चांगलाच हातभार आमच्या संसाराला लागतो.
नाझिया शेख
आमच्या उत्पादक गटामध्ये सध्या तिरंगा ध्वजची निर्मिती होत आहे. या वर्षी आमच्या एन पी के गटाला ५० हजारांची ऑर्डर धाराशिव जिल्ह्यासाठी मिळालेली आहे. त्या ऑर्डरमध्ये आम्हाला तीन ते साडेतीन लाखाचा निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यात काम करतांना आम्ही पण देशासाठी काम करत आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. यासाठी आमच्या गटातील महिला खूप खूश आहेत आणि आमचं खूप उत्साहात तिरंगा ध्वज निर्मितीचं काम चालू आहे.
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा १२ वा स्मृतीदिन उद्या पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं लातूर मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन तसेच विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास ३०० रुग्णालयांच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबीर पार पडणार असल्याचं, आज एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
****
परभणी शहरापासून जवळच असलेल्या सुकापुर वाडी गावाला रस्ता नसल्यानं इथल्या नागरिकांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी ��ांडेकर यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह शाळा भरवली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा पवित्रा या सर्वांनी घेतल्यानं, काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ५० लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटख्यासह एकूण ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीडहून निघालेला हा ट्रक जालना-अंबड मार्गावरील लालवाडी शिवारातून जालन्याकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई करत, ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दिव्यांगांसाठीची कर्जमर्यादा ५० हजार रुपयांवरुन अडीच लाख रुपये, राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्थापणार कल्याणकारी महामंडळ
· खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार
· दिल्ली इथल्या खासगी कोचिंग क्लासमध्ये झालेल्या म���त्यूप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाची चौकशी समिती
आणि
· पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकर-सरबजोत सिंग जोडी आज कांस्यपदकासाठी खेळणार
सविस्तर बातम्या
दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दिव्यांग कल्याण महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं. दिव्यांग महामंडळाला ५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असून, दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे, ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दिव्यांगांना रोजगार स्वयंरोजगासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना, कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने राबवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत काल झालेल्या अन्य एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
सन २०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने काल जारी केला. राज्यातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण एक हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काल अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी निर्णय घेणार आहे. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे.
****
सर्वसामान्य नागरिकांन��� जलदगतीने न्याय देणं, ही आपली सर्वांची जबाब��ारी असल्याचं प्रतिपादन, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी केलं आहे. काल धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये पावसाचं पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ३० दिवसांच्या आत समिती याप्रकरणी आपला अहवाल सादर करेल.
दरम्यान, या विषयावर काल संसदेत चर्चा झाली. शाळा महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं, खासदार फौजिया खान यांनी म्हटलं आहे. कोचिंग क्लासच्या रुपात समांतर शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचं सांगत, फौजिया खान यांनी यासंदर्भात एक नियामक संस्था असण्याची गरजही व्यक्त केली.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या चर्चेत बोलतांना, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं नमूद केलं. कोचिंग क्लाससंदर्भात असलेल्या कायद्याचं राज्य सरकारांनी काटेकोर पालन करण्याची गरज प्रधान यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेमुळे दिल्लीतल्या १३ प्रशिक्षण केंद्रांना महानगरपालिकेनं टाळं ठोकलं असून, तळघरातले तीन प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असुन. या अल्पकालिक चर्चेनंतर राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला प्रारंभ झाला.
दुपारच्या सत्रानंतर लोकसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली, या अर्थसंकल्पात जात आधारित जनगणनेबाबत काहीही घोषणा नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना, आसाम आणि बिहारमध्ये आलेल्या पुरावर संसदेत चर्चा झाली, मात्र महाराष्ट्रातल्या पुराच्या नुकसानीवर अर्थमंत्री बोलल्या देखील नाही, असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका केली.
****
राहुल गांधी यांनी संसदेत लोकसभा अध्यक्षांविषयी उपस्थित केलेल्या प्रश्ननावर माहिती आणी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टीका केली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही राहुल गांधी यांनी घटनात्मक पदावर असताना जबाबदारीनं वागली पाहिजे, असं म्हटलं आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही जोडी दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. आज त्यांचा सामना भारतीय वेळेनूसार दुपारी एक वाजता दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंडोनेशियाई जोडीशी होणार आहे. चिराग - सात्विक जोडी ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली जोडी ठरली आहे. भारतीय हॉकी संघानं अर्जेन्टीनासोबतच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. आज भारतीय हॉकी संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
इराण इथं झालेल्या चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतनं पाच पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या रिदम केडिया आणि मध्य प्रदेशच्या वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक पटकावलं, तर महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशच्या भव्य तिवारी आणि राजस्थानच्या जयवीर सिंग यांना रौप्यपदक मिळालं. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.
****
आमदार पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्ह्याला भेट दिली. विधान परिषदेच्या आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे. नागरिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. मुंडे यांनी, सावरगाव घाट तसंच नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं. बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं.
****
लाडक्या बहिणींसाठी योजनांची घोषणा करणारं सरकार लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यात घोर अपयशी ठरल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नवी मुंबईत उरण इथं नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचार आणि हत्या घटनेतल्या पीडित कुटुंबियांची दानवे यांनी काल भेट घेऊन, सात्वंन केलं, त्यानंतर ते बोलत होते. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयु��्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. या घटनेतल्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
****
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी ��र्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना घुगे यांनी दिल्या. जिल्ह्यात या योजनेसाठी तीन लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण असून, जिल्हा प्रशासनाचं उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. काल सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग -एमएसएमई संदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणं याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा नव उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी इथं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत २०२२-२३ या वर्षातले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातले जिल्हास्तरीय पुरस्कार काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. मानवत तालुक्यातल्या रामपुरी ग्रामपंचायतीला प्रथम, पालम तालुक्यातल्या तेलजापूर ग्रामपंचायतीला द्वितीय, तर जिंतूर तालुक्यातल्या कुंभारी ग्रामपंचायतीला तृतीत क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
****
आयुष्यमान कार्ड योजनेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेविषयी शेटे यांनी दिलेली माहिती उद्या बुधवारी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या सदरात ऐकता येईल.
****
0 notes