#अहवालात
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 20 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.10.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा एकशे पंधरावा भाग असेल.
या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्युज ऑन ए आय आर या ॲपवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालय तसंच सूचना प्रसारण मंत्रालयाच्या यु ट्युब चॅनलवर मन की बात चं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही याचं प्रसारण केलं जाणार आहे.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राद्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रोहिणी गोडबोले यांनी विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्यांचं हे महत्वपूर्ण योगदान प्रशंसनीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. मुळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर गोडबोले बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञानजगतात महिलांचं स्थान सक्षम  करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील, असं पंतप्रधान मोदी यांनी आपले शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
इस्रायलने इराणच्या ��ष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने एक ऑक्टोबर रोजी केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर इराण आणि इराकने सर्व उड्डाणे स्थगित केल्याचे स्थानिक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 
****
नाशिक शहर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असला, तरी यंदा पक्षाची मदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिममधून मनसेने भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  दिलीप दातीर यांनी २०१९ मध्ये  शिवसेनेचा राजीनामा देऊनमनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, नाशिक शहरात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदार संघ सुटला नसल्याने मित्र पक्षांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यास संधी द्यावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात काल करण्यात आली.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत चार दिवसात ४४ इच्छुकांचे एकूण ५५ अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी काल १८ इच्छुकांनी ३२ नामनिर्देशनपत्रं प्राप्त केली. आतापर्यंत ७४ इच्छुकांनी १३१ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात नाकाबंदी दरम्यान अमित ओमप्रकाश हेडा यांच्या वाहनात १ कोटी २६ लाख ८८ हजार ५२० रुपये तर कळमनुरी इथल्या गजानन माणिक काळे यांच्या वाहनात १३ लाख ५० हजार रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून यासंदर्भात तपास सुरु आहे.
****
नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी भूकंपसदृश्य दोन सौम्य हादरे जाणवले, मुखेड तालुक्यात अंबुलगा इथं जाणवलेल्या या हादऱ्यांच�� तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे एक पूर्णांक पाच आणि शुन्य पूर्णांक सात अशी नोंदवण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदेसह काही गावात काल रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.
****
कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळी निमित्त सोमवारी २८ ऑक्टोबर ते शनिवारी दोन नोव्हेंबरपर्यंत सलग सहा दिवस बंद राहणार आहे, बाजार समितीच्या प्रशासनानं यासंदर्भात कळवलं आहे. दरम्यान काल या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल २ हजार २०२ रुपये सरासरी भाव मिळाला.
****
0 notes
mazhibatmi · 3 months ago
Text
Sugarcane Farming: महाराष्ट्राच्या कृषी विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात मराठवाडा विभागातील उसाचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पावसाच्या आधारे गोळा केलेली आकडेवारी ही दिशा दर्शवते. महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने 31 जुलैपर्यंतच्या पावसाच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालातून ऊस लागवडीची आकडेवारी संकलित केली आहे. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
cinenama · 1 year ago
Text
एअरबीएनबीने दिला २०२२ मध्ये गोव्याला 'इतक्या' कोटी डॉलर्सचा व्यवसाय...
पणजी: एअरबीएनबी हा गोव्यातील पर्यटन उद्योगाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरला असल्याचे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गोव्याच्या एकूण उत्पन्नात एअरबीएनबीने १० कोटी ८० लाख डॉलर्सचे (८.५ अब्ज रुपये) योगदान दिले आहे, तर केवळ २०२२* ह्या वर्षांत ११,५०० स्थानिक रोजगार निर्माण करण्यात मदत केली आहे, असे ह्या अहवालात म्हटले आहे. एअरबीएनबीचे ग्राहक करत असलेल्या खर्चाचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण : शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती उघड
https://bharatlive.news/?p=117622 निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण : शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती ...
0 notes
successtrainings · 1 year ago
Text
Five-day working week : 28 जुलैपासून बँकमध्ये लागू होणार पाच दिवसांचा आठवडा
Five-day working week : बँक कर्मचाऱ्यांना आता लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांमध्ये आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी प्रस्तावित असून यावर 28 जुलै रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इंडियन बँकिंग असोसिएशन पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल, असे अहवालात म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mukundbhalerao · 2 years ago
Link
आता जगात फक्त भारतच..
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
पुलावरील जड वाहतूक बंद : गोंदिया, आमगाव, सालेकसा राज्य मार्ग 335, मनाई आदेश जारी
गोंदिया, दि.13 : गोंदिया, आमगाव, सालेकसा राज्य मार्ग 335 वरील कि.मी. 238/205 मधील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे व्हीएनआयटी नागपूर यांनी 16 मे 2018 रोजी केले असून स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला आहे. या अहवालात दिलेल्या निर्देशानुसार पुलावरील जड वाहतुक त्वरित बंद करणे गरजेचे आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविणे गरजेचे असल्याचे तसेच सदर पूल जास्त धोकादायक झाल्याने पुलावरील जड वाहतूक त्वरित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
तब्बल इतके कोटी नागरिक बेरोजगार होण्याचा अंदाज ? रिपोर्टने उडवली झोप
देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थितीत नकारात्मक बदल होत असून 2023 मध्ये तब्बल 21 कोटी नागरिक देश जगभरात बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केलेली आहे . येत्या काळात बेरोजगार लोक आणखीन खराब परिस्थितीला सामोरे जातील तसेच गरीब लोक आणखीन गरीब होतील अशी देखील भीती या अहवाला व्यक्त करण्यात आलेली आहे. अहवालात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून
प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून
पातूर :पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. यानंतर लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नीने आपल्या पतीची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. आता वैद्यकीय अहवालात ही बाब उघडकीस येताच मृतांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल; यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल
उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल; यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल
मुंबई, दि. 2 : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर 2022) नमूद क���ले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. ‘डुइंग बिझनेस इन इंडिया: द यूके पर्स्पेक्टिव्ह (2022 एडिशन)’ हा यूके इंडिया बिझनेस कौन्सिलचा आठवा वार्षिक अहवाल आहे,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days ago
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी आभार मानले.
****
देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूपीआयचा गेल्या ५ वर्षांत किरकोळ डिजिटल व्यवहारांत सर्वाधिक वाटा असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.
****
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाला जागा मिळल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांचा पक्षांतराचा ओघ सुरूच आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नाशिकमधल्या येवला लासलगाव मतदार संघातले शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर शिक्षक मतदार संघातले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जमाती करता राखीव असून, काँग्रेसनं या मतदारसंघातून बौद्ध समाजातला उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. असे न केल्यास बंडखोरी करुन आपला उमेदवार उभा करु, असा इशारा देण्यात आला आहे. 
****
येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे सात चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही, अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की ��ाही हे बघितलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट मत साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. दिल्ली इथं होणाऱ्या ९८व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, आणि सरहद, यांच्यातर्फे काल पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची बाब असली, तरी मराठी माणसांनी मराठी भाषा बोलली, लिहिली आणि वाचल्याशिवाय मराठी भाषा टिकणार नाही असंही भवाळकर यांनी सांगितलं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठानं संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे.
****
राज्यात आचारसंहिता लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला आळा घातला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
दुसरी कारवाई लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारवर करण्यात आली. त्यामध्ये ५९ लिटर विदेशी मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा मद्यसाठा आणि वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त केला आहे.
****
पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरा��रीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शासनानं या हंगामात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
****
भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताला दोन गोल्सनी पराभव स्वीकारावा लागला. राजधानी दिल्ली मध्ये सुमारे दहा वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामने होत आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
Google Pixel 7 Pro Tensor G2 बेंचमार्क सुधारणांबाबत सूचना: अहवाल
Google Pixel 7 Pro Tensor G2 बेंचमार्क सुधारणांबाबत सूचना: अहवाल
Google Pixel 7 Pro चा नवीन बेंचमार्क, जो कथितपणे ऑनलाइन समोर आला आहे, तो Tensor G2 चिप CPU आणि GPU कार्यप्रदर्शनात सुधारणा दर्शवितो. Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे Google च्या हार्डवेअर इव्हेंटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे. आता एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की Tensor G2 चिप दोन कॉर्टेक्स-X1 कोर, दोन कॉर्टेक्स- X1 कोरच्या समान संयोजनाचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. A76…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
डॉ. तात्याराव लहानेंवर अनधिकृतपणे शस्त्रक्रिया केल्याचा चौकशी समितीचा ठपका, अहवालात नेमकं काय म्हटलंय?
https://bharatlive.news/?p=105539 डॉ. तात्याराव लहानेंवर अनधिकृतपणे शस्त्रक्रिया केल्याचा चौकशी समितीचा ...
0 notes
loksutra · 2 years ago
Text
मनोरंजन जगताशी संबंधित मोठ्या बातम्या वाचा या ताज्या अहवालात
मनोरंजन जगताशी संबंधित मोठ्या बातम्या वाचा या ताज्या अहवालात
5 सप्टेंबर 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 5 सप्टेंबर रोजी मनोरंजन विश्वातून अनेक रंजक बातम्या समोर आल्या आहेत. ‘ल���ल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. आमिर खान आणि करीना कपूरचा हा चित्रपट २० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत असे बोलले जात आहे की खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या ‘जहाँ’ या बंगल्यावर हे जोडपे सात फेरे घेणार आहेत. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
अखेर ' ती ' आत्महत्याच असल्याचे समोर , लॉजमध्ये सापडला होता तरुणीचा मृतदेह
अखेर ‘ ती ‘ आत्महत्याच असल्याचे समोर , लॉजमध्ये सापडला होता तरुणीचा मृतदेह
काही दिवसांपूर्वी सांगली शहरातील कोल्हापूर रोड परिसरात असलेल्या साई डीलक्स लॉज इथे सीए असलेल्या एका तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अस्मिता मिलिंद पाटील ( वय 33 सध्या राहणार पुणे मूळ राहणार कुपवाड रस्ता सांगली ) असे तिचे नाव होते. तिच्या मृत्यूबाबत परिसरात अनेक चर्चेला उधाण आले होते मात्र शवविच्छेदन अहवालात तिने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अस्मिता पाटील ही उच्चशिक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
अखेर ' ती ' आत्महत्याच असल्याचे समोर , लॉजमध्ये सापडला होता तरुणीचा मृतदेह
अखेर ‘ ती ‘ आत्महत्याच असल्याचे समोर , लॉजमध्ये सापडला होता तरुणीचा मृतदेह
काही दिवसांपूर्वी सांगली शहरातील कोल्हापूर रोड परिसरात असलेल्या साई डीलक्स लॉज इथे सीए असलेल्या एका तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अस्मिता मिलिंद पाटील ( वय 33 सध्या राहणार पुणे मूळ राहणार कुपवाड रस्ता सांगली ) असे तिचे नाव होते. तिच्या मृत्यूबाबत परिसरात अनेक चर्चेला उधाण आले होते मात्र शवविच्छेदन अहवालात तिने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अस्मिता पाटील ही उच्चशिक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes