#खडाजंगी!
Explore tagged Tumblr posts
Text
महिला आरक्षण विधेयकावरुन सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगी
https://bharatlive.news/?p=144545 महिला आरक्षण विधेयकावरुन सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगी
नवी दिल्ली, ...
0 notes
Video
youtube
Maharashtra Assembly Winter Session LIVE | विधानसभा खडाजंगी | हिवाळी अधि...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादासंदर्भात मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्यांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ दशांश टक्क्यांनी वाढ
स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मृद आणि जलसंधारण विभागाला निर्देश
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी
महापुरुषांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरात मोर्चा
औरंगाबादमधल्या २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वसाधारण विजेते��द
आणि
बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव, मालिकाही गमावली
****
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. यावादात लक्ष घालण्याची त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांकडे मागणी केली. सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली.
दरम्यान, या प्रश्नी आज गृहमंत्री शाह राज्यातील सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२ वाजता शून्यकाळानं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या सदस्यांनी साथ दिली. याचवेळी कर्नाटक मधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. त्यामुळे दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं सांगितलं.
भारताला जी-२० देशांचं प्रतिनिधित्व मिळणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. जी-२० शिखर संमेलन आणि जी-२० देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक भारतात यशस्वीपणे पार पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
****
राज्यसभेत नवनियुक्त सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांना उत्तर देताना धनखड यांनी, आपल्याला दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने लोकशाही ��ूल्य अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा देश करत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिक उपयोगी व्हावं यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. या अधिवेशनात युवा सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाला प्रगतीच्या नव्या शिखरापर्यंत नेण्यासाठीच्या उद्देशानं या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.
****
बॉम्बे हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय असं नामकरण करण्याची मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी काल लोकसभेत केली. नियम ३७७ अंतर्गत ही सूचना मांडताना शेट्टी यांनी घटनेच्या सहाव्या भागाच्या पाचव्या अध्यायात अनुच्छेद २१४ मध्ये दुरुस्ती सुचवली आहे. "प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय" या वाक्यात "प्रत्येक राज्यात राज्याचा नावावर एक उच्च न्यायालय" अशी दुरुस्ती करावी असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
****
नोटबंदीच्या निर्णयाबाबत न्यायालय मूकप्रेक्षक होऊ शकत नाही, ही बाब आर्थिक धोरणाची असली तरी न्यायालयाला निर्णयाचं पुनरावलोकन करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं सहा वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात ५८ याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.ए.नजीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर काल सुनावणी झाली. नोटबंदी निर्णयाची योग्यता नव्हे, तर हा निर्णय घेण्यासंबंधीची प्रक्रिया तपासली जाऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती, असं रिझर्व्ह बँकेचे वकील जयदीप गुप्ता यांनी कालच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ दशांश टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात ही सलग पाचवी वाढ असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २०२३ वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्याची वाढ अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मृद आणि जलसंधारण विभागानं पाणलोट विकासाची अधिकाधिक कामं हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागाचं बळकटीकरण आणि आर्थिक तरतुदीस सर्वतोपरी पाठबळ देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे हे अभियान पुन्हा गतिमान करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंधारण विभागाच्या माध्य��ातून राज्यात आतापर्यंत अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
****
ऊसतोड कामगार महिलांचं गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबतचा संशोधनपर अहवाल तयार करण्याच्या तसंच ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉकटर नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणी संदर्भातल्या आढावा बैठकीत काल त्या बोलत होत्या.
****
गुजरात तसंच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. उत्तरप्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदार संघ तसंच पाच राज्यांतल्या सहा विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणीही आज केली जाणार आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होइल.
****
दिल्ली महानगर पालिकेत आम आदमी पार्टीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाबद्दल काल औरंगाबाद इथं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भडकल गेट इथल्या संपर्क कार्यालयासमोर जल्लोष केला. उस्मानाबाद इथंही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.
****
राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातील विकास कामांवरील स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची परवानगी मागितल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल १९२ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी दिली होती, यातील काही कामे निविदा स्तरावर तर काही कामे अंदाजपत्रक स्तरावर असताना राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला, ही स्थगिती तातडीने मागे घ्यावी असं चव्हाण म्हणाले.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महापुरुषांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ काल जालना इथं मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी पक्षाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्यपालांच्या संबंधित वक्तव्याच्या विरोधात जालना शहरातून सर्व पक्षीय निषेध फेरीही काढण्यात आली. राज्यपालांना पदावरून हटवत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ.संजय लाखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. आमदार राजेश टोपे, आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह लोकप्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथं मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या दोन बसवर केशरी रंगाचा फवारा उडवून घोषणाबाजी करण्यात आली. काल पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्नाटकच्या बस पोलिस बंदोबस्तात त्यांच्या हद्दीपर्यंत सोडल्या जात आहेत. शहरात कर्नाटक बँकेच्या शाखेलाही पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, सांगली तसंच कोल्हापूर मार्गे कनार्टकात जाणाऱ्या एसटी बसेस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
****
नाशिक इथं स्वराज्य संघटनेच्या वतीनं शहरातील कर्नाटक बँकेच्या फलकाला काळा रंग फासण्यात आला. कर्नाटक सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल सांगली जिल्ह्यातून कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र मिरज पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवलं, यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
****
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जे एफ पाटील यांचं काल कोल्हापूर इथं उपचारादरम्यान निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. पाटील यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात दीर्घकाळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. अनेक सामाजिक संस्थांमध्ये तसंच सरकारच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सदस्य, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांना काम पाहिलं. डी वाय पाटील विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाचा काल समारोप झाला. या स्पर्धेत यजमान विद्यापीठ संघाने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, खो-खो आणि कबड्डी या चारही गटात सुवर्णपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. गेल्या २४ वर्षांत यजमान संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यजमान विद्यापीठ पुरुष संघ २६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुरुष संघ २२० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटातलं विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकलं. यजमान विद्यापीठ संघाने मुलींच्या गटात कबड्डी तसंच खोखो स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली तसंच ऑलंपिकपट�� सुमंगला शर्मा, क्रीडा ��ाजदूत तथा बास्केटबॉलपटू नवेली देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला जनरल चॅम्पियनशीप प्रदान करण्यात आली.
****
बांगलादेशाविरुद्ध काल दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला. या पराभवासोबतच भारतानं ही तीन सामन्यांची मालिकाही गमावली आहे. काल बांगलादेशानं दिलेलं २७२ धावांचं आव्हान गाठताना भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद होत गेले. अखेरच्या काही षटकांत फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून, भारताचा विजय दृष्टिपथात आणला, पण तळाच्या अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं, भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत २६६ धावाच करू शकला. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या १० तारखेला होणार आहे.
****
कतार इथे सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आता उद्या शुक्रवारपासून उपान्त्यपूर्व फेरींचे सामने सुरु होणार आहेत. क्रोएशिया, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना आणि मोरक्को हे आठ देश उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.
****
कोलंबियात काल झालेल्या जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिने रौप्यपदक पटकावलं आहे. मीराबाईने एकूण दोनशे किलो वजन उचललं. मीराबाईने यापूर्वी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर २०१८ आणि २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. २०१७ मध्ये जागतिक भारोत्तोलन स्पर्धेतही ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर २०२० मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने कांस्यपदक पटकावलं आहे.
****
औरंगाबाद इथं शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात ध्वज संकलन निधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वीर पत्नी आणि हुतात्मा कुटुबिंयांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
****
0 notes
Text
महेंद्रसिंग धोनीला न आवडण्याच्या मुद्द्यावर गौतम गंभीर उघडपणे बोलला, विराट कोहलीवरही म्हणाला
महेंद्रसिंग धोनीला न आवडण्याच्या मुद्द्यावर गौतम गंभीर उघडपणे बोलला, विराट कोहलीवरही म्हणाला
गौतम गंभीर एमएस धोनी रिफ्ट: गौतम गंभीर एमएस धोनीसाठी म्हणाला, ‘पहा, आमच्यात मतभेद असू शकतात. माझे स्वतःचे मत आहे, तिचे स्वतःचे मत आहे.’ महेंद्रसिंग धोनीसोबत गौतम गंभीरचे संबंध त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटी सौहार्दपूर्ण नव्हते. 2011 च्या विश्वचषक फायनलमधील 97 धावा किंवा 2012 च्या सीबी मालिकेतील धोनीच्या कर्णधारपदाबद्दल, दोन दिग्गजांमध्ये मतभेद असल्याचा संदेश गेल्या काही काळातील गंभीरने…
View On WordPress
#एमएस धोनी#गंभीर#गंभीर एमएसडी#गंभीर धोनी#गंभीर धोनी वर्ल्ड कप#गंभीर-धोनीमध्ये खडाजंगी#गंभीर-धोनीमध्ये दुरावा#गौतम गंभीर#गौतम गंभीर एमएस धोनी#गौतम गंभीर एमएस धोनी रिफ्ट#गौतम गंभीर एमएसडी#जीजी एमएसडी#धोनी#धोनी गंभीर फाटा#धोनी विरुद्ध गंभीर#धोनीवर गंभीर#फाटा#फूट#भरत#भारत#भारत संघ#भारतीय क्रिकेट#भारतीय क्रिकेट बातम्या#भारतीय संघ#महेंद्रसिंग धोनी#विराट कोहली
0 notes
Text
लोकसभेत चर्चेदरम्यान अमित शाह-असदुद्दीन ओवैसींमध्ये खडाजंगी | ABP Majha
#ABPMajha
एनआयए काद्यातल्या सुधारणांच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना संसदेत अमित शाह आणि असदुद्दीन ओवैसींमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक बळकटी देणाऱ्या सुधारणांवर भाजप खासदार सत्यपाल सिंहांचं भाषण सुरू होतं. यावेळी असदुद्दीन औवैसी यांनी सत्यपाल सिंह यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: https://ift.tt/2Jp6S4D Social Media Handles: Facebook: https://ift.tt/2xa8b63 Twitter: https://twitter.com/abpmajhafeed Google+ : https://ift.tt/2X8qo1e
Download ABP App for Apple: https://ift.tt/2Hzwb7m Download ABP App for Android: https://ift.tt/2fRkOeI
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
The post लोकसभेत चर्चेदरम्यान अमित शाह-असदुद्दीन ओवैसींमध्ये खडाजंगी | ABP Majha appeared first on .
The post लोकसभेत चर्चेदरम्यान अमित शाह-असदुद्दीन ओवैसींमध्ये खडाजंगी | ABP Majha appeared first on .
from WordPress http://www.richmeganews.com/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf/
0 notes
Text
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन बी जे पी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे. “त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव…
View On WordPress
#Shivendraraje Bhosale#udayanraje bhosale#उदयनराजे भोसले#उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप#उदयनराजे लोकसत्ता बातमी#निवडणुकीच्या बातम्या#भारत निवडणूक आयोग#भ्रष्टाचार#महाराष्ट्र निवडणूक#शिवेंद्रराजे भोसले#सातारा नगरपालिका निवडणूक#साताऱ्याचे राजकारण
0 notes
Text
कणकवली तालुक्याला बसू लागले भारनियमनाचे चटके
कणकवली तालुक्याला बसू लागले भारनियमनाचे चटके
वागदे, हळवल भारनियमनग्रस्त ग्रामस्थांची महापारेषणच्या सब स्टेशनला धडक उपकार्यकारी अभियंत्यांकडून तात्पुरते आश्वासन कणकवली: तालुक्यातील हळवल, वागदे, शिरवल, कसवण आदी गावांमध्ये अचानक विद्युत पुरवठा खंडित करत भारनियमन सुरू केल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण च्या कणकवली सबस्टेशनला रात्री आठ वाजता धडक देत कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत या ग्रामस्थांची खडाजंगी झाली.…
View On WordPress
0 notes
Text
राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यात खडाजंगी, लग्नाआधीच ठेवली अशी मागणी!
राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यात खडाजंगी, लग्नाआधीच ठेवली अशी मागणी!
राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांची बिग बॉस ओटीटीमध्ये भेट झाली होती. इथून या जोडप्याची प्रेमकहाणी सुरू झाली होती, अशा परिस्थितीत त्यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली होती. आता शमिता आणि राकेशच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना हादरवले आहे. राकेश आणि शमिता यांच्यात सर्व काही ठीक नाही, अशा बातम्या पूर्वी आल्या होत्या. त्यानंतर दोघ���ंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि सांगितले की त्यांच्यामध्ये सर्व…
View On WordPress
#बिग बॉस १५#बॉलीवूड बातम्या#राकेश बापट#शमिता शेट्टी#शमिता शेट्टी बॉयफ्रेंड#शमिता शेट्टी राकेश बापट फाईट#शमिता शेट्टी राकेश बापट लव्ह स्टोरी#शमिता शेट्टी राकेश बापटचे ब्रेकअप#शमिता शेट्टी वय
0 notes
Text
विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन खडाजंगी | नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग
विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन खडाजंगी | नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भीती…
View On WordPress
0 notes
Text
भाजपचे १२ आमदार निलंबित
मुंबई : तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर विरोधी पक्षाने पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये खडाजंगी आता पुढचा विचार करा | #Congress #ArgumentAtMeeting #RahulGandhi http://www.headlinemarathi.com/politics-marathi-news/new-congress-president-in-june-decision-after-argument-at-meeting/?feed_id=45273&_unique_id=600b98b0b4c97
0 notes
Text
शिक्षक बँक; सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
https://bharatlive.news/?p=142409 शिक्षक बँक; सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
· अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच्या विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा सुरु; शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणं राबवण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
· महिला सुरक्षेशी संबंधित शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे सरकारला निर्देश
· दहिहंडीला साहसी ��ेळाचा दर्जा तर गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
· वीज सबसिडी लाटणाऱ्या उद्योगांची चौकशी करुन कारवाई करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
· अंबाजोगाईच्या अवैध गुटखा प्रकरणी पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित तर पोलिस उपअधीक्षकाची अकार्यकारी पदावर बदली
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार २४६ रुग्ण, मराठवाड्यात ३३ बाधित
आणि
· झिंबाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला
सविस्तर बातम्या
राज्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षांच्या वतीने विधानसभेत प्रस्ताव दाखल कर्ण्यात आला, त्यावर अजित पवार बोलत होते. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आ��्महत्या करत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. माजी मंत्री अशोक चव्हाण, बच्चू कडू यांच्यासह अन्य आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी काल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लावून धरली. ही मागणी करताना या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
****
महिला सुरक्षेशी संबंधित शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले आहे . गोंदिया इथल्या महिला अत्याचाराच्या प्रश्नावर लवकरात लवकर तपशीलवार चर्चा घेतली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सर्व कामकाज बाजूला ठेवून याप्रकरणी तातडीनं चर्चा करावी अशी मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे, विरोधकांनी काल विधानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज प्रत्येकी दहा मिनिटांसाठी दोनदा स्थगित करावं लागलं होतं. उपसभापती जेव्हा सांगतील तेव्हा या विषयावर सरकार चर्चेला तयार आहे, असं सरकारच्या वतीनं, विधीमंडळ कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तुकड्यांना त्रुटी पूर्ततेनंतर अनुदान मंजूर करण्याच्या प्रश्नावरून, विरोधी पक्ष सदस्य आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी झाली. त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
****
राज्यातल्या ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्क��यांनी वाढ करणार असल्याची माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी, ग्रंथालयांना थकीत अनुदानाची रक्कम वितरित करण्यासह, ग्रंथालयातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच ग्रंथालयांबाबतच्या त्रुटी आणि कठोर निकष बदलण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सर्वांनी सूचना पाठवाव्यात, असं आवाहन पाटील यांनी केलं. राज्यात नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या परिविक्षाधीन सहायक शिक्षक - शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव, शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं. यासंबधी डॉ. सुधीर तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणं कार्यवाही करण्यात येईल, असं केसरकर यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांचा समावेश असणाऱ्या उपसमितीनं, वस्तू आणि सेवा कर- जीएसटीमध्ये होणारी चोरी रोखण्यासाठी पॅकेजमधल्या वस्तूंवर हा कर आकारण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे विरोधकांनी तो दोष कोणालाही देऊ नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमूद केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. आता यासंबंधी दुरुस्तीमुळे कलम ४१ मध्ये बदल करून अंतिम करच आकारला जाईल, परतावा मिळेपर्यंत जो कर लागायचा तो आता लागणार नाही, परतावा मिळण्यासाठी सरसकट दोन वर्षांची वेळ अंतिम केली असल्याचंही, फडणवीस म्हणाले.
****
दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
Byte….
कबड्डीला राजाश्रय आहे, कबड्डीला काही नियम आहेत, निकष आहेत, हे सर्व नियम या गोविंदा खेळाला देखील उत्सवाला देखील मिळतील, याचे लाभ मिळतील. त्याचबरोबर नोकरी मध्ये देखील पाच टक्के आरक्षण जे आहे, त्याच्यामध्ये देखील या गोविंदा पथकाचा समावेश होईल. आणि एकंदरीत या साहसी खेळाचे महत्व वाढेल, यासाठी शासनानं हा निर्णय घेतला आहे. आणि पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डी च्या धरतीवर प्रो गोविंदा हा देखील एक खेळ सुरू होईल.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या "प्रो गोविंदा" या व्यावसाय���क स्पर्धा घेण्याचीही घोषणा काल मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दहिहंडी -गोविंदा या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं. बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल, त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू झाला किंवा जखमी झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली. यात पथकातील खेळाडूचा पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपये, महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास साडे सात लाख रुपये तर एक अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास पाच लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात येईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठीच असून यासाठी काही अटी आणि शर्ती लागू असणार आहेत.
****
वीज सबसिडी लाटणाऱ्या उद्योगांची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत दिलं. जालना इथल्या काही स्टील उद्योगांनी राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. काही उद्योगांनी कंपनीचं नाव बदलून वीज सबसिडी लाटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल, जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून वसुली केली जाईल, तसंच उत्पादन न करता नियमबाह्य सबसिडी दिली असल्यास संबंधितांवरही कार्यवाही केली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
अंबाजोगाई इथले पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांचं निलंबन करण्यात येत असून, पोलिस उप अधीक्षक सुनील जायभाये यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अवैध गुटखा प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.
****
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असं ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देतांना ते बोलत होते. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा विभागातल्या जुन्या शाळांच��या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही महाजन यांनी सांगितलं.
****
विधानपरिषदेत परवानगी न घेता हातवारे करत मी मंत्री आहे, असं सांगत बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना, उपसभापती निलम गोऱ्हे यांनी खडसावलं. प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण मंत्री दीपक केसरकर उत्तर देताना विरोधकांकडून त्यांच्या उत्तरावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर सभागृहात बसलेल्या गुलाबराव पाटील यांनी, मागील बऱ्याच गोष्टी काढता येतील, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. पाटील बोलण्यासाठी उठले असता उपसभापतींनी त्यांना परवानगी नाकारली, त्यावर आपण मंत्री असल्यानं आपल्याला बोलू दिलं पाहिजे, असं पाटील यांनी म्हणल्यानंतर निलम गोऱ्हे यांनी त्यांना खडसावलं. परवानगी नसताना बोलणं ही सभागृहात वागण्याची पद्धत नाही, असं त्या म्हणाल्या.
****
रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर श्रीवर्धन किनाऱ्यावर आढळलेल्या एका १६ मीटर लांबीच्या संशयास्पद बोटीचा मुद्दाही काल विधीमंडळात चांगलाच गाजला. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं. सणासुदीचे दिवस लक्षात घेता या भागात अति दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक मच्छिमारांना ही बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स, दारुगोळा तसंच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सदर बोटीचं नाव ‘लेडीहान’ असून, तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे, तिचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून, ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून रोजी या बोटीचं इंजिन निकामी झालं, त्यानंतर एका कोरिअन युद्ध नौकेनं बोटीवरच्या खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केलं. समुद्र खवळलेला असल्यानं ‘लेडीहान’ या बोटीचं टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय तट रक्षक दलाकडून देण्यात आली.
****
आधार कार्ड वर पाच लाख रुपयांचं कर्ज मिळत असल्याच्या वृत्ताचं केंद्र ��रकारनं खंडन केलं आहे. अशा आशयाचा एक मजकूर सध्या सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहे. हे वृत्त पूर्णपणे खोटं असून, अशा वृत्तांना बळी पडू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
****
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल सद्भावना दिन पाळण्यात आला. मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना तसंच परदेशी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान कृष्णाचं जीवन आणि शिकवणीत पुण्य आणि कल्याणाचा समावेश असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार २४६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७८ हजार ४११ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर काल एक हजार ९२० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १८ हजार ५३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ६९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर जिल्ह्यातल्या ११, औरंगाबाद दहा, जालना सहा, तर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद इथं अग्नीवीर भरती दरम्यान काल एका तरुणाचा धावताना कोसळून मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातल्या चापानेर इथला करण नामदेव पवार हा भरती दरम्यान धावताना मैदानावर कोसळला. त्याला पुढील उपचारासाठी घाटीत दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
****
झिंबाब्वे विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना काल भारतानं दहा गडी, १९ षटकं आणि एक चेंडू राखून सहज जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघानं झिंबाब्वेचा डाव ४० षटकं आणि तीन चेंडूमध्ये १८९ धावांवर संपुष्टात आणला. जलदगती गोलंदाज दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा आणि फिरकीपटू अक्षर पटेलनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीर शुभमन गिलनं ७२ चेंडुंमध्ये ८२ आणि शिखर धवननं ११३ चेंडुंमध्ये ८१ धावा करत हा सामना जिंकला. दीपक चहरला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या विजयाबरोबरचं भारतानं तीन सामन्याच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
हिमाचल प���रदेश निवडणूक: दारंग जागेवर 9 वेळा विजयी झालेले कौल सिंह 2017 मध्ये पहिल्यांदाच पराभूत झाले होते.
हिमाचल प्रदेश निवडणूक: दारंग जागेवर 9 वेळा विजयी झालेले कौल सिंह 2017 मध्ये पहिल्यांदाच पराभूत झाले होते.
दारंग विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे दिग्गज नेते कौल सिंह यांच्यासमोर कोणत्याही पक्षाचा उमेदवार कधीही टिकू शकलेला नाही. 2017 मध्ये कौल सिंग यांना पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. कौल सिंह ठाकूर यांनी आतापर्यंत 9 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका यावरून आता राजकीय पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशात प्रामुख्याने दोन पक्ष लढत आहेत,…
View On WordPress
0 notes
Photo
Balasaheb Thorat: Balasaheb Thorat: ‘गुपकर’वरून महाराष्ट्रातही खडाजंगी; ‘फडणवीस खोटारडे’ म्हणत पलटवार – gupkar alliance balasaheb thorat criticizes devendra fadnavis मुंबई: सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते …
0 notes
Text
सावरकरांवर लक्ष केंद्रित करून भाजपच्या विभाजनाच्या व्हिडिओला काँग्रेसचे प्रत्युत्तर
सावरकरांवर लक्ष केंद्रित करून भाजपच्या विभाजनाच्या व्हिडिओला काँग्रेसचे प्रत्युत्तर
सोशल मीडियावर दिवसभर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली नवी दिल्ली: 1947 मध्ये देशाच्या फाळणीला कोण जबाबदार होते यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव दिलेला दुसरा “फाळणीचा भयंकर स्मरण दिन” – भाजप आणि काँग्रेस यांच्यातील कटू आरोपांमध्ये पार पडला. त्याची सुरुवात सकाळी भाजपनंतर झाली. जवाहरलाल नेहरूंवर लक्ष केंद्रित करणारा व्हिडिओ ट्विट केला. दिवसाचा शेवट काँग्रेसच्या एका व्हिडिओने झाला,…
View On WordPress
0 notes