#भारतीय क्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – १० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
• विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन • महाविकास आघाडीचाही महाराष्ट्रनामा जारी, शेती, ग्रामीण विकास, यासह महिला सुरक्षा या मुद्यांवर भर • फुलंब्रीतल्या दरीफाटा इथं एका दुकानाला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू आणि • भारत - दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळला जाणार
****
भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रसिद्ध केला. हा जाहीरमाना शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं, शहा यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाख रोजगारांची निर्मिती, अशी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिक माहिती दिली – ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ��वजी एकवीसशे रूपये देण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, का��ण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत. आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत.
महाविकास आघाडीची अनेक आश्वासनं प्रत्यक्षात उतरणारी नसल्याची टीका शहा यांनी केली. खोटं फार काळ टिकत नसल्यामुळेच २०२२ साली महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. खासदार पियुष गोयल तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शहा यांनी आज जळगाव, मलकापूर इथं जाहीर सभा घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
****
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा जाहीरमाना, महाराष्ट्रनामा या नावाने प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं खर्गे यावेळी म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली. महिलांसाठी विशेषकरून महालक्ष्मी योजना, मोफत बस, सहा गॅस सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना आम्हाला निर्भय करायचं आहे. आणि स्वावलंबी करायचं आहे. त्यासाठी विशेषकरून तरतूद केलीय. त्याचप्रमाणे सेफ्टी ऑडीट शाळांमध्ये व्हावं यादृष्टीनं एक नवीन संकल्पना त्याठिकाणी मांडलीये.
****
निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक राहील्यानं सर्वत्र जोमाने प्रचार सुरु आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, जनसंवाद आणि सभा घेण्यावर भर दिल्याचं दिसून आलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आज पदयात्रा काढली होती. याच मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची सभा झाली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले माहाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी देखील घरोघरी जाऊन नागरीकांशी संवाद साधला. एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आज औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
****
गंगापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सभा होणार आहे. पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंडा विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.
****
भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव इथं भाजप उमेदवार अशोक उईके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातल्या धारणी इथं भाजप उमेदवार केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. ठाणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रॅलीत सहभागी झाले होते.
****
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केलं आहे. बाईट - वर्षा उसगावकर
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल यांनी आज नवीदिल्लीत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. तसंच ‘इव्ही ॲज अ सर्व्हिस’ अर्थात, ‘विजेवरच्या वाहनांची सेवा’ या कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी केली. या कार्यक्रमाची राजधानी दिल्लीसारख्या प्रदूषण वाढलेल्या शहरांकरता गरज असल्याचं ते म्हणाले. औद्योगिक प्रक्रिया, बांधकाम आणि वाहनांच्या वाहतुकीसारख्या बाबींमुळे प्रदूषण वाढत असल्याचं ते म्हणाले. या प्रत्येक क्षेत्रानं प्रदूषण नियंत्रित ठेवण्याकरता प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधे पाठवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉन, प्रदर्श��, कार्यशाळा असे कार्यक्रम होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात उद्यापासून चित्ररथाद्वारे जनजागृतीची मोहीम राबवण्यात येणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता हा चित्ररथ जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना होणार आहे. रत्नागिरी शहरात मतदार जनजागृतीसाठी आज मॅरॅथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरॅथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्या��र झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
****
फुलंब्रीतल्या दरीफाटा इथं काल मध्यरात्री एका दुकानाला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हे दुकान प्लास्टिक साहित्य विक्रीचं असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचं समजताच दुकान मालकानं दुकान उघडलं. त्यावेळी आगीमुळे दुकानात तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाला आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. नितीन नागरे, गजानन वाघ आणि राजू पटेल अशी या तिघांची नावं आहेत. या दुर्घटनेतल्या गंभीर जखमी झालेल्या दोघांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
भारत - दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज गकेबरहा इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
भारताच्या पंकज अडवाणीनं आय बी एस एफ विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत 150-अप फॉरमॅटचं विजेतेपद पटकावलं आहे. कतारमधे दोहा इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा ४ विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. आयबीएफएसच्या जागतिक बिलियर्डस् स्पर्धेतलं पंकज अडवाणी याचं हे २८वं विजेतेपद आहे. या स्पर्धेत भारताच्या सौरव कोठारी यानं कांस्यपदक मिळवलं.
****
लेखक, कलावंत आणि शिक्षकांनी जातीच्या विचारांपासून दूर राहावं, अशी अपेक्षा नदिष्ट या कादंबरीचे लेखक प्राध्यापक मनोज बोरगावकर यांनी व्यक्त केली आहे. आज बंगळुरू इथं कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं डॉक्टर अनुराग लव्हेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. नदिष्ट हे गोदामाईनं माझ्या पदरात टाकलेलं दान आहे, नदी वाहत राहिली तर पुढच्या पिढ्या वाहत राहतील, असं बोरगावकर यांनी नमूद केलं.
****
येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांमधून शेकड��ंच्या संख्येनं दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.
****
0 notes
Text
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
व्हिडिओ क्रिकेटप्रेमींचे स्वप्न आहे की भारतीय दिग्गज एकत्र आले आणि धमाका केला सचिन तेंडुलकर तुम्हाला मित्र सुरेश रैनाची आठवण करून देईल
T20 2022 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज भारताच्या मातब्बरांनी दक्षिण आफ्रिकन संघाचा पार धुववला. मोठ्या मैदानानंतर स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेुलकर मैदानात दिसल्याने भारतीयांना आनंदाला पारावार उरला. दणदणीत विजय शिवाजी टीम इंडिया लिजेंड्सचा एक धम्माल व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवराज सिंहने आपल्या गटावर हा व्हिडीओ शेअर केला असून सर्व भावनेने एकत्रितपणे पाहणे हे…
View On WordPress
#T20 रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज#क्रिकेट अपडेट#क्रिकेट जगतातील बातम्या#क्रिकेट बातम्या#क्रिकेटच्या बातम्या#भारतीय महापुरुष#युवराज सिंग#युवराज सिंग डान्स करत आहे#व्हायरल व्हिडिओ#व्हायरल व्हिडियो#सचिन तेंडुलकर#सचिन तेंडुलकर ओव्ह द टॉप शॉट#सचिन तेंडुलकर क्रिकेट#सुरेश रैना#सुरेश रैना गायन
0 notes
Text
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही
Suresh Raina सुरेश रैनाने घेतली भारतीय क्रिकेटमधूनही निवृत्ती, IPLमध्ये दिसणार नाही डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.त्याच्या काही मिनिटांपूर्वी एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.जरी दोन्ही दिग्गज आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी उपलब्ध होते, तरीही … डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय…
View On WordPress
#iplमध्ये#raina:#suresh#क्रिकेट#क्रिकेटमधूनह��#क्रीडा#खेळ बातम्या#घेतली#टे��िस#दिसणार#नाही#निवृत्ती#भारत लाईव्ह मीडिया#भारतीय#मराठी खेळ अपडेट्स#राष्ट्रीय खेळ बातम्या#रैनाने#सुरेश#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी
0 notes
Text
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदत��साठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला ��ॉर्ममध्ये परतण्यास…
View On WordPress
#इंड विरुद्ध इंजी#क्रिकेट बातम्या#टीम इंडिया#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोर आज#विराट कोहली#विराट कोहली क्रिकेट बातम्या#विराट कोहली फॉर्म#विराट कोहली ब्रेक#विराट कोहली भारतीय क्रिकेट#विराट कोहली सुनील गावस्कर यांची मुलाखत#विराट कोहलीचा फॉर्म#विराट कोहलीची कारकीर्द#सुनील गावस्कर#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
उद्या, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा T20 खेळला जाईल, ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन असू शकते.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा T20 खेळत आहे 11: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना उद्या, शनिवारी ९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाने मालिकेतील पहिला टी-20 जिंकला असला तरी दुसऱ्या टी-20 मध्ये त्यात अनेक बदल होऊ शकतात. दुसऱ्या T20 मध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे जाणून…
View On WordPress
#IND vs ENG 2रा T20#इंग्लंड दुसऱ्या T20 साठी 11 धावांवर खेळत आहे#ऋषभ पंत#क्रिकेट बातम्या#जसप्रीत बुमराह#जोस बटलर#टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी#दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ#भारत खेळत आहे 11#भारत दुसऱ्या T20 साठी 11 धावांवर खेळत आहे#भारत विरुद्ध इंग्लंड#रवींद्र जडेजा#विराट कोहली
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसंभांना आजपासून सुरुवात झाली. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं सुरू झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे ११ मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ��हायुतीततल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपनेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगली इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीरसभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉक्टर तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं तीन सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून १६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं ४७६ गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत चार हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या चार तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
नांदेड बिदर महामार्गावर एकुर्का रोडवर टेम्पो आणि कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, दोन विवाहीत मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी यानं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जने आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या खेळाडूचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तत्पूर्वी, काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जने तैवानच्या खेळाडूचा पराभव केला.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता धुळे आणि दोन वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत, मतदान जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई महापालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या चारही मतदार संघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना केल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.
लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेख्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी द��ली.
धुळे शहरात १० नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. याअंतर्गत २६८ वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये नव्व्द कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आला होता. याप्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक आधिकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
चेन्नई इथं सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा ४-१ असा पराभव केला. तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा ५-० असा पराभव केला. चंदीगडने उत्तराखंडविरुद्ध ९-० असा विजय मिळवला.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. दरम्यान, शारदा सिन्हा यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी ९ तारखेला नांदेड इथं जाहीर सभा होणार आहे. खासदार अशोक चव्हाण तसंच खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला इथं सभा घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेची आढावा बैठक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. या बैठकीला निवडणूक आयोगाचे उप आयुक्त हिर्देश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. पहिली तपासणी उदगीर विधानसभा मतदारसंघ ७ तारखेला, अहमदपूर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील ८ तारखेला, तसंच लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी ९ तारखेला रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी तपासणी १२ आणि १३ तसंच तिसरी तपासणी १६ आणि १७ तारखेला होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी काल केली. शिवडी इथं काल झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्र��ाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.
मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने, अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना काल सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आलं. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक��टर जब्बार पटेल यांच्या हस्ते सुहास जोशी यांना सन्मानित करण्यात आलं. विष्णुदास भावे गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे आणि आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यावेळी उपस्थित होत्या.
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या कलाकारांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहेत. काल झालेल्या सामन्यांत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे, आरव मुळ्ये यांनी मानांकित खेळाडूंवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. स्मित उंद्रेनं गुजरातच्या १४ व्या मानांकित कबीर परमारचा पराभव केला. तर, आरव मुळ्येनं तेलंगणाच्या चौथ्या मानांकित प्रणित रेड्डीवर विजय मिळवला. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीना हिनं ओडिशाच्या शजफाचा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ -आयसीसीच्या काल जाहीर करण्यात आलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची महिला क्रिकेट खेळाडू दीप्ती शर्मा दूसऱ्या स्थानावर असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ती चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ही पहिल्या स्थानावर आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस • मराठवाड्यात जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली मतदारसंघांत उमेदवार देण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे संकेत • शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या त्रुटीबाबत चौकशीचे निवडणूक आयोगाचे निर्देश • दीपोत्सवात भाऊबीजेचा सण काल घरोघरी पारंपरिक पद्धतीने साजरा आणि • मुंबई क्रिकेट कसोटी जिंकत न्यूझीलंडचा भारताविरोधात निर्भेळ मालिका विजय
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. रा��्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द यासह ३६ ठिकाणी तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा यासह २६ ठिकाणी इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. महायुतीकडून तसंच महाविकास आघाडीकडून आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर, उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधली नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असं आवाहन, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्यानं महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असंही सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या यशवंत सेना या संघटनेनं, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे संकेत, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्��य घेण्यासाठी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. आपण ज्���ा जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू, अशी भूमिका, जरांगे यांनी या बैठकीत मांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप, सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी इथं दिवाळी पहाट ही सुरेल संगीत मैफल काल घेण्यात आली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे त्यांच्या मार्गदर्शनात मुख्य समन्वयक अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे यांच्या संचाने, नागरिकांना येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन केलं..
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
सणांचा समूह असलेल्या दीपोत्सवात काल भाऊबीजेचा सण पार पडला. घरोघरी बहिणींनी भावांना औक्षण करून, त्यांच्या दीर्घायुष्याची मंगल कामना केली, तर भावांनी बहिणींना ओवाळणीच्या रुपात आकर्षक भेटवस्तू दिली. काल भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर वस्त्रप्रावरणं, आभुषणं आणि इलेक्ट्रीक तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
छत्रपती संभाजीनगर इथं काल गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सगर महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये रेड्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. पशुपालकही पारंपारिक पोषाख घालून मोठ्या उत्��ाहाने यामिरवणुकीत सहभागी झाले होते.
बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलातल्या खो-खो च्या मैदानावर दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड जिल्हा खो-खो असोसिएशन, आणि साई-गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून परस्परांना शुभेच्छा दिल्या.
न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. काल मुंबईत झालेला तिसऱ्या आणि अखेरच्या सामनाही न्यूझीलंडनं अवघ्या २५ धावांनी जिंकला. न्यूझीलंडचा दुसरा डाव काल सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला, पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळे भारताला विजयासाठी १४७ धावा करायच्या होत्या, मात्र भारताचा दुसरा डाव अवघ्या १२१ धावांवर संपुष्टात आला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने एकाकी झुंज देत ६४ धावा केल्या, वॉशिंग्टन सुंदरने १२ तर कर्णधार रोहित शर्माने ११ धावा केल्या, रवीचंद्रन अश्विन आठ, रवींद्र जडेजा सहा, यशस्वी जैस्वाल पाच, शुभमन गिल, विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी प्रत्येकी एक धाव केली तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. सामन्यात ११ बळी घेणारा न्यूझीलंडचा एजाज पटेल सामनावीर, तर विल यंग मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
१४ व्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धांना आजपासून चेन्नईत प्रारंभ होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ सहभागी होत आहेत. उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांच्या पार्थिव देहावर काल आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. वरखडे यांचं शनिवारी रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहिल.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. • भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेतील- भाजपला विश्वास. • जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देणार- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे. आणि • न्यूझीलंडने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही जिंकला.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज्यातल्��ा २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीडमध्ये ९० उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये सात उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्यात आल्या��ंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्ष तसंच शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असताना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एबी फॉर्म देत उमेदवार दिले आहेत. त्यामुळं महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, ही बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरीचा फटका रोखण्यासाठी नुकताच पुण्याचा दौरा केला.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेनं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
आपण ज्या जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जाहीर केली. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे यांनी सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भारतीय जनता पक्षानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कायदे बनवले जातील असं त्यांनी सांगितलं. गोगो दीदी योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपये, पात्र कुटुबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, दसरा आणि रक्षाबंधनला गॅस सिलिंडर मोफत देण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं. पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दोन हजार रुपये मानधन देऊ. पाच वर्षांत रोजगाराच्या पाच लाख संधी निर्माण करु, असंही शाह म्हणाले.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जनजागृती पथकाची नेमणूक केली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सुचनेनूसार या पथकामार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पथकातील सदस्य आणि आयकॉन डॉ. विजय निलावार यांनी दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲपचा वापर करावा आणि मतदान करावं, असं आवाहन केलं आहे. बाईट - डॉ. विजय निलावार
भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामनाही गमावला आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर आज सामन्याच्या त���सऱ्या दिवशी न्यूझीलंडनं भारतावर २५ धावांनी मात केली. नऊ बाद १७१ धावसंख्येवरुन पुढं खेळताना न्यूझीलंडचा डाव सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या रविंद्र जडेजानं या डावातही ५ गडी बाद केले. पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळं भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचं आव्हान होतं. मात्र न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली, आणि संघाचा दुसरा डाव केवळ १२१ धावांवर आटोपला. यष्टीरक्षक ऋषभ पंतनं ६४ धावा काढताना एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं दुसऱ्या डावात ६ गडी बाद करत सामन्यात एकूण ११ बळी टिपले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विल यंग मालिकावीर ठरला. न्यूझीलंडनं या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आठ गडी राखून विजयी मिळवल्यानंतर दुसरी कसोटीही ११३ धावांनी जिंकली होती.
शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचा आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथ पत्रातील मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सहा तारखेला दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमधील मंगळवेढ्याचा दौरा करणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर तसंच पैठण इथं आज दिवाळी निमित्त सगर महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सव���ला शंभर वर्षां पेक्षाही अधिक काळाची परंपरा असल्याचं सांगितलं जातं. या महोत्सवा अंतर्गत रेड्यांची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. पशूपालक या मिरवणूकीत पारंपारिक पोषाख घालून उत्साहानं सहभागी झाले. ढोल वाजवत, फटाके उडवत ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदीरा पर्यंत सजवलेल्या रेड्यांची विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. फातिमा खान हिला ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधून आज अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपूर इथं एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या सोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या ��ासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रंगतदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 03 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळण्याचा आणि भावानं बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेह, समर्पण आणि भक्तीचं प्रतीक असलेली भाऊबीज सर्वांच्या जीवनात अपरिमित आनंद घेऊन येवो अशी शुभकामना त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा सण काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो.
चार धाम पैकी केदारनाथ धामचे द्वार हिवाळ्यानिमित्त आज सकाळी विधीपूर्वक बंद करण्यात आले. भाऊबीजेच्या औचित्यानं या मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या यमुनोत्री धामचे द्वार आज दुपारी बंद करण्यात येतील. या वर्षी १५ लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धाम तर सात लाखांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री धामला भेट दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारतासमोर १४७ धावांचं लक्ष्य आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारताच्या दुसऱ्या डावामध्ये पाच बाद ५७ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडचा दुसरा डाव आज सकाळी १७४ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडनं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.
भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
आक्षेपार्ह टिप्पणी करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड का बंद आहेत, असा सवाल करत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांनी या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने महिलांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यातील रामपुरी इथं मतदान जनजागृतीपर दिवाळी पहाटचा सुरेल संगीत कार्यक्रम घेण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा असा संदेश स्वीप उपक्रमांतर्गत यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी मतदान करण्याचा निर्धार करून मतदानाची शपथ घेतली.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये भारतीय रेल्वेनं ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ या संकल्पनेसह आणि प्रवाशांना अधिकाधिक स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणं सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यापक उपक्रमांसह सातत्यानं प्रमुख सहभाग नोंदवला आहे. गेल्या महिन्यात रेल्वेनं राबवलेल्या स्वच्छता पंधरवडा मोहिमेत देशभरातली ७ हजार २८५ रेल्वे स्थानकं, २ हजार ७५४ रेल्वे गाड्या आणि १८ हजार ३३१ कार्यालयं स्वच्छ करण्यात आल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. पंधरवडा कालावधीत, भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या गटांनी वृक्षारोपण मोहीम, स्वच्छ संवाद, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ प्रसाधन इत्यादी दैनंदिन योजना किंवा उपक्रम हाती घेतले. या वर्षी रेल्वे मार्गावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ. • विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर��शक सूचना जारी. • बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा ��ाडवा विविध वस्तूंच्या खरेदीने सर्वत्र साजरा. आणि • मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेत, सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. फडणवीसांच्या उपस्थितीत अनिल कौशिक यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
भाजपाचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आपण पक्ष सोडलेला नाही, पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरीही आपण पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपलं प्रत्येक पाऊल पक्षाच्या हितासाठी, पक्षात राहून पक्षाची हानी करणाऱ्यांच्या विरोधात आहे, असं ते म्हणाले.
माहिमचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहिमची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे.
विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. पॅम्प्लेट, पोस्टर, फ्लेक्स या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेच�� वापर उमेदवारांना करता येईल. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांबाबत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागणार आहे.
दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करावी, आणि त्याच खात्यातून धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निवडणूक खर्च करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असणार आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे. बाईट – विवेक भीमनवार
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले. अन्नकूट उत्सवानिमित्त आज अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले. दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. या वर्षी आतापर्यंत आठ लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे. याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी आज केली जाते. घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजब��ले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. विक्रम संवत २०८१ ला आजपासून प्रार��भ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, सफलता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण उद्या साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर बस स्थानकं तसंच रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडीत झाली. बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली एकत्रित पाडवा साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, आजचा हा पाडवा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दिवे प्रज्वलित करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, अशा एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा ३ तत्वांवर प्रत्येक हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ या धावसंख्येवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.
अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मान��वं लागलं.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. ��ा नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.10.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी-चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार
राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल
प्रसिद्ध साहित्यिक डॉ वीणा देव यांचं निधन-पुण्यात काल अंत्यसंस्कार
शरियत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही-मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल
निरामय जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय महिला संघाचा मालिका विजय
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होणार आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल ३६८ अर्ज दाखल झाले. माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा सर्व लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्यानं, एमआयएम पक्षाने नांदेड लोकसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं.
महायुतीचे संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद मध्य मतदार संघातून तर महायुतीचे अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदार संघातून काल उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पूर्वमधून महाविकास आघाडीचे पांडुरंग तांगडे, पैठणहून महायुतीचे विलास भुमरे, तर कन्नडहून महायुतीच्या संजना जाधव यांनी अर्ज दाखल केला. कन्नड मतदार संघातून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
**
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात काल १३० उमेदवारांनी १७९ अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २७१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.
**
लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल १२५ उमेदवारांनी १७३ नामनिर्देशन पत्रं दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत २१३ उमेदवारांनी ३०१ अर्ज भरले आहेत.
**
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल २७ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ४१ जणांचे ५६ अर्ज दाखल झाले आहेत. तर जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघात काल ३८८ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ५१५ उमेदवारांनी एकूण ६६७ अर्ज भरले आहेत.
**
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात काल १४९ उमेदवारांनी २०८ अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २५८ उमेदवारांचे ३८२ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात आतापर्यंत ४०९ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले, परभणी जिल्ह्यात १८९ उमेदवारांनी २४४ अर्ज भरले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदार संघात काल १२४ नामनिर्देशनपत्रं दाखल झाली आहेत.
**
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आर विमला यांनी केलं आहे.
Byte…
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
प्रसिद्ध साहित्यिक डॉ वीणा देव यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. मान्यवरांच्या मुलाखती आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आकाशवाणीशी जोडलेल्या होत्या. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत..
हाडाच्या शिक्षक असलेल्या वीणा देव यांनी, पुण्यात शाहू ��ंदिर महाविद्यालयात ३२ वर्ष अध्यापन केलं. विविध पुस्तकांचं संपादन करणाऱ्या वीणा देव यांची, स्वान्सीतील दिवस, परतोनी पाहे, आठवणींचा झिम्मा, अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, आपले पिता गो नि दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या व्यक्तिचित्राला राज्य शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आपल्या मृण्मयी प्रकाशनाद्वारे त्यांनी गोनिदांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत, शिवाय, गोनिदांच्या स्मरणार्थ मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, आणि छायाचित्र प्रदर्शनही त्या भरवत असत. गोनिदांच्या विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे वीणा देव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या साथीने शेकडो कार्यक्रम केले आहेत.
वीणा देव यांच्या पार्थिव देहावर काल रात्री पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल समाजातल्या सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
शरियत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. एका मुस्लिम जोडप्याने ट्रिपल तलाक संदर्भात मदुराई खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी हा निकाल दिल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शरियत कौन्सिल ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेला कौटुंबिक तसंच आर्थिक विषय हाताळता येऊ शकतात. परंतू, घटस्फोटाचं प्रमाणपत्र देणं किंवा दंड ठोठावण्याचा अधिकार या संस्थेला नाही, असं मदुराई खंडपीठाने या निकालात स्पष्ट केलं आहे.
****
प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण काल साजरा झाला. सायंकाळच्या सुमारास घरोघरी भगवान धन्वंतरी यांचं पूजन करण्यात आलं. धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपक्रमांना काल प्रारंभ करण्यात आला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात काल राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर आणि मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
****
महिला क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा खेळ��डू राखून विजय मिळवत, तीन सामन्यांची मालिका दोन - एकनं जिंकली आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर ४५ व्या षटकात चार खेळाडू गमावत हे लक्ष्य साध्य केलं. स्मृती मंधानाला प्लेयर ऑफ द मॅच, तर दीप्ती शर्माला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा, राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं पार पडला.यावेळी १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण १११ पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेत दाखल झाले.
****
परभणी जिल्ह्यात सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून जिंतूर आणि परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी के. हरीता यांची तर गंगाखेड आणि पाथरी या मतदारसंघांसाठी संचिता बिश्नोई यांची नियुक्ती केली आहे. तर सर्व मतदारसंघांसाठी राजेश दुग्गल यांची निवडणूक पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी, केज आणि परळी विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक म्हणून के. रोहन राज यांची, तर गेवराई, माजलगाव आणि बीड विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक म्हणून कपील जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात निवडणूक विभागाच्यावतीने सर्व उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी दिल्या आहेत. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात काल अवैध वाहतुक होणाऱ्या मद्यासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कळंब-अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
****
धाराशिव इथंल्या जात प्रमाणपत्रासाठी १९ हजार रुपये लाच घेताना संबंधित कार्यालयातला शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्यासागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे.
****
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षभरातल्या तीन स्थानिक सुट्यांपैकी, उद्या ३१ ऑक्टोबरची दीपावलीची सुटी रद्द करून, त्याऐवजी सात डिसेंबर, २०२४ रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्��ालयं नियमितपणे सुरु राहतील, असं कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर
राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम
नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी काल उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. काँग्रेसनं २३ उमेदवारांची दुसरी, तर १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा - अभयकुमार पाटील, नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, देगलूर - निवृत्ती कांबळे, मुखेड - हणमंतराव बेटमोगरेकर तर तुळजापूर मतदारसंघातून कुलदीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील तर परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला - माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून-अभिषेक कळमकर यांचा समावेश आहे.
****
भाजपनेही काल २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदार संघातून देवयानी फरांदे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण - रमेश कराड तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सनेनं काल पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये गंगाखेड मतदारसंघातून रुपेश देशमुख, फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर, उस्मानाबाद - देवदत्त मोरे, परांडा - राजेंद्र गपाट तर बीड मतदारसंघातून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमिन - ए आय एम आय एम नं विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार काल जाहीर केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलिल, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून नासेर सिद्दीकी निवडणूक लढवणार आहेत.
****
प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत करत, त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला काल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी तयार केलेल्या या विशेष एलईडी व्हॅनच्या माध्यमातून, महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ��३२ शॅडो मतदान केंद्र, तर सांगलीत एक शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ, बीड इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्ही एच एफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बी एस एन एल मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी या दिवशी मतदान करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
बाईट
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पाचवा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला...
बाईट
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एस एम एस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांही घेण्यात आल्या.
****
मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या मतदार संघातल्या हैदरबाग परिसरात काल मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात, ५७ पैकी ३३ महसूल मंडळात सततच्या पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर झालाआहे. मात्र, यासोबतच उर्वरित २४ महसूल मंडळातल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांनाही नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या मदत, पुनर्वसन आणिव आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहून, सध्याच्या आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना न्यूझीलंड संघानं ११३ धावांनी जिंकला. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा तिसरा सामना मुंबईत येत्या एक नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
****
लातूर इथं कालपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून ३३६ खेळाडू सहभागी झाले.
****
0 notes