#भारत निवडणूक आयोग
Explore tagged Tumblr posts
Text
Marathi Vocabulary - Indian General Elections

Nouns
भारत [bhārat] - India (m.)
लोकशाही [lokśahī] - democracy (f.)
हुकुमशाही [hukumśāhī] - dictatorship (f.)
राजकारणी [rājkārṇī] - politician (m.)
नेता [neta] - leader (colloquially, politician) (m.)
जनता [janatā] - public, people (f.)
पक्ष [pak��a] - party, faction (m.)
नेतृत्व [netṛtva] - leadership (n.)
युती [yutī] - alliance (f.)
राष्ट्र [rāṣtra] - nation, state (m.)
निवडणूक [nivaḍṇūk] - election (f.)
आयोग [āyog] - commission (m.)
मतदान [matadān] - voting (n.)
मतदार [matadār] - voter (m.)
मतदारसंघ [matadārsaṅgha] - constituency (m.)
मत [mat] - vote (n.)
निकाल [nikāl] - result, results (m.)
मोजणी [mozṇī] - counting (f.)
विजय [vijay] - victory (m.)
पराभव [parābhav] - defeat (m.)
संसद [saṅsad] - parliament (n.)
लोकसभा [loksabhā] - Lok Sabha (The Lower House of Parliament) (f.)
खासदार [khāsdār] - member of parliament (m.)
उमेदवार [umedvār] - candidate (m.)
प्रतिनिधी [pratinidhī] - representative (m.)
मंत्री [maṅtrī] - minister (m.)
पंतप्रधान [paṅtapradhān] - prime minister (m.)
धर्मनिरपेक्षता [dharmanirapekṣatā] - secularism (f.)
समाजवाद [samājvād] - socialism (m.)
राष्ट्रवाद [rāṣtravād] - nationalism (m.)
साम्यवाद [sāmyavād] - communism (m.)
सरकार [sarkār] - government (n.)
शासन [śāsan] - administration (n.)
विकास [vikās] - development (m.)
प्रगती [pragatī] - progress (f.)
आघाडी [āghāḍī] - front, forefront (f.)
सेना [sena] - army, armed force (f.)
Adjectives
भारतीय [bhāratīya] - Indian
राष्ट्रीय [rāṣtrīya] - national
विजयी [vijayī] - victorious
समाजवादी [samājvādī] - socialist
राष्ट्रवादी [rāṣtravādī] - nationalist
साम्यवादी [sāmyavādī] - communist
Verbs
जिंकणे [jiṅkṇe] - to win
हरणे [harṇe] - to lose
मोजणे [mozṇe] - to count
निवडणे [nivaḍṇe] - to choose, to elect
मतदान करणे [matadān karṇe] - to vote
-ला मत देणे [-lā mat deṇe] - to vote for
निवडून येणे [nivaḍūn yeṇe] - to be elected
घोषित करणे [ghoṣit karṇe] - to announce
32 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
राज्य विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थ���वर विरोधकांची टीका
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कार्यरत
आणि
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत उद्या भारत-ऑस्ट्रेलिया लढत
****
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल.
या अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून, विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते,
‘‘जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला एक सकारात्मक चर्चा आपण करुया, अशा प्रकारची संधी होती. त्यांची संवाद स्थापित करावा, असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, सगळ्यांनाच निमंत्रित केलं होतं. पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार घातला. आणि मला याचा अर्थच समजला नाही की, संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा म्हणायचं.’’
विरोधी पक्षाच्या बैठकीला त्यांचे मुख्य नेतेच हजर नव्हते, त्यातून त्यांच्यातला विसंवाद दिसून येतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक बातम्यांच्या आधारे विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत, मात्र यासंदर्भात सरकारने दिलेला खुलासा विरोधकांनी वाचावा, असा सल्ला देत, माध्यमांनीही योग्य शहानिशा करूनच बातम्या प्रसिद्ध करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, या अधिवेशनात आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती तसंच महिला दिन, आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी एक चर्चा आयोजित केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली...
‘‘आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन���मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे. ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे, त्या अनुषंगाने ही चर्चा आहे. आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसांची सकारात्मक चर्चा व्हावी, म्हणजे लाल संविधान दाखवतात ताशा प्रकारची नाही, तर संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर चांगली, सकारात्मक चर्चा करेल, अशी माझी अपेक्षा आहे.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. महायुती सरकारने मागच्या कार्यकाळात वेगाने काम केलं, विकासाचा हा वेग या कार्यकाळात वाढेल आणि त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसेल, असं शिंदे यांनी नमूद केलं.
अजित पवार यांनी यावेळी बोलतांना, अधिवेशनात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आपली तयारी असून, बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही, अशी भूमिका मांडली.
****
फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. काल सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘‘फक्त चहापानाला जाणं, म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही. खरंतर संसदीय लोकशाहीचं पालन जशी सत्ताधारी पक्षाची आहे, तशीच विरोधी पक्षाची पण आहे. आणि या राज्याचं हीत व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे. विरोधी पक्षाला सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.’’
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, तसंच पुण्यातल्या लैगिंक अत्याचार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदशील असून, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना पाहता, कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्यांनी तत्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
****
सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा, यासाठी ��िवडणूक आयोग काम करत असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर, आयोगानं ही माहिती दिली. मात्र, दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात, वेगळ्या विधानसभा मतदारसंघात, आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नोंदवलेलं आहे. यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रीत असल्याने असे क्रमांक दिले गेल्याचं, आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मात्र हे एपिक नंबर आयोगानेच एकाच वेळी दोन मतदारांना दिलेले असल्यास, बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासाही आयोगाने केला आहे.
****
महामार्गावर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित 'परिवहन भवन' या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, ते म्हणाले..
‘‘ॲक्सिडेंट कमी करण्याकरता ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याही अत्यंत चांगल्या आहेत. विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एकोणातीस टक्के आणि समृद्धीवर जवळपास पस्तीस टक्के ॲक्सिडेंट कमी झालेले आहेत, ती खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे. कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की आपण काहीही नियम मोडला, तर इमिजीयेट कॅमेरा कॅप्चर करतोय. आणि कॅप्चर करून जो काही आपला दंड आहे, तो आपल्या घरीच पाठवतोय. दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड भरल्यामुळे लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम असल्यामुळे आपण कुठलंही उल्लंघन करू नये.’’
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना 'निवृत्ती सन्मान' योजनेंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान निधीचं वितरण करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात किल्ले धारूर तालुक्यात एका शेतकऱ्याने तीन गुंठे जमिनीवर अफूची शेती पिकवल्याचं निदर्शनास आलं आहे. पिंपरवाडा, चोंडी तसंच जहागीर मोहा या ��ीन गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरवाडा शिवारातल्या या शेतावर पोलिस पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अंतिम साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत नऊ बाद २४९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ ४६व्या षटकात २०५ धावांवर सर्वबाद झाला. वरुण चक्रवर्तीने पाच, कुलदीप पादवने दोन, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला. वरुण चक्रवर्तीने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, स्पर्धेच्या अ गटातले हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत. उपांत्य फेरीतला पहिला सामना उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तर तर दुसरा सामना परवा बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार आहे. तर येत्या रविवारी नऊ मार्चला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
****
विदर्भ क्रिकेट संघानं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा पटकावलं आहे. काल नागपूर इथं विदर्भ आणि केरळ संघात झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या बळावर जेतेपद पटकावलं.
****
केंद्र सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडीया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या 'संडे ऑन सायकल' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा क्रीडा संकुलात सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
****
धाराशिव जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातल्या चार लघुपाटबंधारे प्रकल्पातलं पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला. येमाई, मंगरुळ, आरळी, केमवाडी या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले.
****
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे काल महास्वछता अभियान राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेकडो नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत ४० किलोमीटर रस्त्यांवरील सुमारे २६४ ��न कचरा संकलित केला. शहराच्या विविध परिसरासह वाळूज, बजाजनगर, वैजापूर, पैठण आदीसह ग्रामीण भागातही हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
****
0 notes
Text
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १९ नोव्हेंबर तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८, १९ आणि २० नोव्हेंबरला मुलाखत - महासंवाद
मुंबई, दि. 16 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक…

View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-election-marathi-and-english-language-list-of-polling-stations-released/
0 notes
Link
भारत निवडणूक आयोग दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App - Election Commission of India.
0 notes
Text
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन बी जे पी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे. “त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव…

View On WordPress
#Shivendraraje Bhosale#udayanraje bhosale#उदयनराजे भोसले#उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप#उदयनराजे लोकसत्ता बातमी#निवडणुकीच्या बातम्या#भारत निवडणूक आयोग#भ्रष्टाचार#महाराष्ट्र निवडणूक#शिवेंद्रराजे भोसले#सातारा नगरपालिका निवडणूक#साताऱ्याचे राजकारण
0 notes
Text
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग निर्णय घेईल, शिंदे आणि ठाकरे गटाला त्यांच्या बाजूने तथ्ये मांडण्याचे आदेश
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग निर्णय घेईल, शिंदे आणि ठाकरे गटाला त्यांच्या बाजूने तथ्ये मांडण्याचे आदेश
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत त्यांच्या बाजूचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे इमेज क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) अस्सल शिवसेना कोणाची? शिंदे गटाची शिवसेना खरी की ठाकरे गटाची शिवसेना खरी? दोन्ही गट त्यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना सांगत आहेत तर दुसऱ्या गटाची शिवसेना खोटी शिवसेना सांगत आहेत.आता त्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग…

View On WordPress
0 notes
Text
निवडणूक आयोग आज दुपारी जाहीर करणार राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणूक आयोग आज दुपारी जाहीर करणार राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणूक आयोग आज दुपारी जाहीर करणार राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी दुपारी ३ वाजता विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. भारताच्या नवीन राष्ट्रपतींना २५ जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. २०१७ मध्ये…
View On WordPress
#“आज#आजच्या घडामोडी#आयोग#करणार#जाहीर;#ठळक बातम्या#ताजी बातमी#दुपारी#निवडणुकीचे#निवडणूक#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#राष्ट्रपती#वेळापत्रक
0 notes
Text
भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन
भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन
लोकसभा निवडणूक-2019 मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गोरेगाव येथे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आदर्श मतमोजणी केंद्राला निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच राज्यातील जिल्हाधिकारी…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना
राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना
मुंबई, दि. 18 : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत आज सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी सेंट्रल हॉल, विधान भवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदाकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी…

View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल
मुंबई, दि.13 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर आज प्राप्त झाले. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी…

View On WordPress
0 notes
Text
विधानसभा निवडणूक 2022 निवडणूक आयोग उद्या आरोग्य सचिवांना भेटून निवडणूक रॅलींच्या रोड शोला भेटणार आहे
विधानसभा निवडणूक 2022 निवडणूक आयोग उद्या आरोग्य सचिवांना भेटून निवडणूक रॅलींच्या रोड शोला भेटणार आहे
नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयोगाने पाच राज्यांतील डॉ निवडणूक रॅलीपदयात्रा, रोड शो बंदीचा निर्णय घेणार. निवडणूक आयोग उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश निवडणूक २०२२)पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता 22 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली, जाहीर सभा, पदयात्रा, सायकल रॅलीवर बंदी घालण्यात आली…
View On WordPress
#EC पत्रकार परिषद#गोवा निवडणूक#निवडणुकीच्या तारखा 2022#निवडणूक 2022#निवडणूक आयोग#निवडणूक आयोग निवडणूक वेळापत्रक#पंजाब#मणिपूर निवडणुकीच्या तारखा#मणिपूर निवडणूक २०२२#यूपी#विधानसभा निवडणुकीच्या तारखा#विधानसभा निवडणुकीच्या बातम्या#विधानसभा निवडणूक 2022#हिंदी मध्ये निवडणूक बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय मतदार दिन देशभरात उत्साहात साजरा-राष्ट्रपतींच्या हस्ते निवडणूक पुरस्कार प्रदान
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ९४२ कर्मचाऱ्���ांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं जाहीर
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
आणि
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण सुरू
****
१५ वा राष्ट्रीय मतदार दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या निवडणूक प्रक्रियेचा गौरव करतांना राष्ट्रपती म्हणाल्या –
आधुनिक विश्व के लिये भारत का लोकतंत्र का अनोखा उदाहरण है। हमारी चुनाव प्रणाली तथा प्रबंधन से विश्व के अनेक देश सीख ले रहे है। निर्वाचन आयोग के प्रबंधन, मतदाताओं की भागीदारी, सुरक्षाकर्मी तथा इलेक्शन मिशनरी ने सहयोग देनेवाले नागरिकों के बल पर भारतीय लोकतंत्र द्वारा जिस विशाल पैमाने पर चुनाव आयोजित किये जाते है, वो पुरे विश्व में अतुलनीय है।
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला, निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठी पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र ��ोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे, अशा शब्दात मोदी यांनी समाज माध्यमांच्या द्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या.
हमारे संविधान निर्माताओं ने संविधान मे हमारे चुनाव आयोग को लोकतंत्र मे लोगों की भागीदारी को बहोत बडा स्थान दिया है। देश मे जब 1951-52 में पहली बार चुनाव हुये, तो कुछ लोगों को संशय था की क्या देश का लोकतंत्र जीवीत रहेगा? लेकिन हमारे लोकतंत्र ने सारी आशंकाओं को गलत साबित किया।
****
राज्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला. या निमित्तानं नागरिकांना मतदार शपथ देण्यात आली
बीड इथं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हिरवा झेंडा या फेरीला प्रारंभ झाला,
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती अभियान राबवण्यात आलं, यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून मतदान जनजागृती केली.
परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी चित्र प्रदर्शन तसंच रांगोळी स्पर्धा भरवण्यात आल्या विविध शाळेचा विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नगारिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत माहिती दिली.
एक जानेवारी २०२५ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कुलगुरू बोलत होते.
अहिल्यानगर इथं जिल्हा निवडणूक प्रशासनानं सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान केला. शिर्डी विधानसभा मतदार संघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक ९५ टक्के मतदानाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला.
राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार दिवस साजरा करण्यात आला.
****
राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज मुंबईत ��त्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगत, यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत असून, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती यावेळी उपस्थित होते, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले, याचं उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी चक्रवर्ती यांनी केली आहे.
****
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संदेशाचं थेट प्रसारण संध्याकाळी ७ वाजता आकाशवाणीवरुन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज, संध्याकाळी पावणेसात वाजता प्रसारित होईल.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातल्या ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं तसंच सेवा पदकं आज जाहीर झाली. यामध्ये पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक दल तसंच नागरी सुरक्षा आणि कारागृह प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवलं जाणार आहे. याशिवाय रविंद्रकुमार सिंघल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. याशिवाय ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय कारागृह सेवेतल्या ५ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चपळगांवकर यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. साहित्य, कला, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमं, विधी आणि न्याय, उद्योग, वैद्यकीय, प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांनी चपळगांवकर यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणारे चपळगांवकर यांनी, ७० च्या दशकात वकिली पेशात प्रवेश केला, आणि ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. माजलगाव इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली. संयमी तरीही परखड विचारांचे साहित्यिक म्हणून चपळगांवकर यांची ओळख होती. वर्धा इथं साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अशा संमेलनांविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं.
न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चपळगावकर यांच्या निधनानं एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत, अशी भावना आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, अशा व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी असल्याचं म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजपर्यंत कधीही घडले नाही, असे मराठा समाजाच्या बाबतीत घडत आहे, त्यामुळे आपण पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीनं करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगेसोयरे नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरु करावेत, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित केल्याप्रमाणे शंभर दिवसांच्या नियोजनात सात सुत्री कार्यक्रमाची नांदेड जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, यांची स्वच्छता मोहीम सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध कार्यालयांना भेट देऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला.
****
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल.
****
0 notes
Text
दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ दक्ष - महासंवाद
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित…

View On WordPress
0 notes
Text
कणकवली शहरातही मतदार यादीचा विशेष नोंदणी कार्यक्रम
कणकवली शहरातही मतदार यादीचा विशेष नोंदणी कार्यक्रम
मुख्याधिकारी अवधूत गावडे यांची माहिती ��णकवली : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ पर्यंत राबविण्याचे जाहीर केलेले आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादी १ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमानुसार १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर…

View On WordPress
0 notes
Link
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय.
0 notes