#निवडणूक आयोग
Explore tagged Tumblr posts
Text
लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात 'या' तारखेला मतदान
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली. यावेळी १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत मतदान व ४ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून, मुंबई व ठाण्यात २० मे रोजी मतदान होईल. या…
View On WordPress
#Election Commission Of India#lok sabha election schedule#lok sabha elections 2024#mumbai news#केंद्रीय निवडणूक आयोग#मुंबई न्यूज#लोकसभा निवडणूक
0 notes
Text
Marathi Vocabulary - Indian General Elections
Nouns
भारत [bhārat] - India (m.)
लोकशाही [lokśahī] - democracy (f.)
हुकुमशाही [hukumśāhī] - dictatorship (f.)
राजकारणी [rājkārṇī] - politician (m.)
नेता [neta] - leader (colloquially, politician) (m.)
जनता [janatā] - public, people (f.)
पक्ष [pakṣa] - party, faction (m.)
नेतृत्व [netṛtva] - leadership (n.)
युती [yutī] - alliance (f.)
राष्ट्र [rāṣtra] - nation, state (m.)
निवडणूक [nivaḍṇūk] - election (f.)
आयोग [āyog] - commission (m.)
मतदान [matadān] - voting (n.)
मतदार [matadār] - voter (m.)
मतदारसंघ [matadārsaṅgha] - constituency (m.)
मत [mat] - vote (n.)
निकाल [nikāl] - result, results (m.)
मोजणी [mozṇī] - counting (f.)
विजय [vijay] - victory (m.)
पराभव [parābhav] - defeat (m.)
संसद [saṅsad] - parliament (n.)
लोकसभा [loksabhā] - Lok Sabha (The Lower House of Parliament) (f.)
खासदार [khāsdār] - member of parliament (m.)
उमेदवार [umedvār] - candidate (m.)
प्रतिनिधी [pratinidhī] - representative (m.)
मंत्री [maṅtrī] - minister (m.)
पंतप्रधान [paṅtapradhān] - prime minister (m.)
धर्मनिरपेक्षता [dharmanirapekṣatā] - secularism (f.)
समाजवाद [samājvād] - socialism (m.)
राष्ट्रवाद [rāṣtravād] - nationalism (m.)
साम्यवाद [sāmyavād] - communism (m.)
सरकार [sarkār] - government (n.)
शासन [śāsan] - administration (n.)
विकास [vikās] - development (m.)
प्रगती [pragatī] - progress (f.)
आघाडी [āghāḍī] - front, forefront (f.)
सेना [sena] - army, armed force (f.)
Adjectives
भारतीय [bhāratīya] - Indian
राष्ट्रीय [rāṣtrīya] - national
विजयी [vijayī] - victorious
समाजवादी [samājvādī] - socialist
राष्ट्रवादी [rāṣtravādī] - nationalist
साम्यवादी [sāmyavādī] - communist
Verbs
जिंकणे [jiṅkṇe] - to win
हरणे [harṇe] - to lose
मोजणे [mozṇe] - to count
निवडणे [nivaḍṇe] - to choose, to elect
मतदान करणे [matadān karṇe] - to vote
-ला मत देणे [-lā mat deṇe] - to vote for
निवडून येणे [nivaḍūn yeṇe] - to be elected
घोषित करणे [ghoṣit karṇe] - to announce
31 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
देशाचे एकावन्नावे सरन्याधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मौलाना आझाद यांना ज्ञानाचा प्रकाश आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवले जाते असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे सखोल विचार करणारे आणि यशस्वी लेखक होते. विकसित आणि सशक्त भारताच्या त्यांच्या संकल्पनेतून सरकार प्रेरित असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्षा कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडींनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत. तर, भाजपकडून नव्या हरिदा�� आणि लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटचे उमेदवार सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढ�� आहे.
राज्यातही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात सायंकाळी साडेचार वाजता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. तर, भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदीया आणि मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
रिपब्लीकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घनसावंगी इथं जाहीर सभा झाली.
अकोल्यात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. श्रीवल्लभ देशपांडे या 98 वर्षीय मतदारानं आपला मतदानाचा हक्क आज बजावला. परभणी जिल्ह्यातही 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १८७ मतदार आणि ६७ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. येत्या १४ ते १६ तारखेदरम्यान जिल्ह्यात गृह मतदान होणार असून, यासाठी सहा मतदान पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
मुंबईच्या विक्रोळी उपनगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधल्या एका गोदामात त्या नेण्यात येत होत्या. निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरुन खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांना महाडिक यांनी खुलासा सादर केला, मात्र त्यांचा खुलासा अमान्य करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. ��ा प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं काल चेन्नई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. पाच दशकांच्या कारकिर्दित त्यांनी विविध भाषांमधल्या ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे भूमिका केल्या. दस, अजब प्रेम की गजब कहाणी, चेन्नई एक्सप्रेस या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं होतं. नाटक आणि चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही विविध मालिकांमधे त्यांनी अभिनय केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्��िक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या सिद्धी हत्तेकरनं सुवर्णपदक पटकावलं. मुंबई उपनगरची अनुष्का पाटील हिनं रौप्य, तर पुण्याच्या सताक्षी टक्के हिनं कांस्यपदक जिंकलं. छत्रपती संभाजीनगरच्याच रिद्धी हत्तेकर हिनं फ्लोअर एक्सरसाईजवर सुवर्ण आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली.
महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बिहारमधल्या राजगीर इथं सुरु होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, जापान, मलेशिया, कोरिया और थाईलंड देशांचे संघ सहभागी आहेत. या स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती बिहार क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी दिली.
0 notes
Text
१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुत्तार दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/19-ideal-polling-stations-in-hingoli-lok-sabha-constituency-collector-cast-your-valuable-vote-for-strengthening-democracy/
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-election-marathi-and-english-language-list-of-polling-stations-released/
0 notes
Link
भारत निवडणूक आयोग दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App - Election Commission of India.
0 notes
Text
मुख्यमंत्री बदलाची चर्चा निरर्थक : अजित पवार
https://bharatlive.news/?p=149987 मुख्यमंत्री बदलाची चर्चा निरर्थक : अजित पवार
पुणे : निवडणूक आयोग जो ...
0 notes
Text
जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतमधील २९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर; १८ मे रोजी मतदान
गोंदिया, दि.12 : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीमधील २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे. पोटनिवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ०६ एप्रिल २०२३ पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार…
View On WordPress
0 notes
Text
Maharashtra Political Crisis | शिंदे-फडणवीस सरकार जाणार?
मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद करत ठाकरे गटाची जोरदार बाजू मांडली. राज्यपालांनी विद्यमान सरकारला दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकार जाईल, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे-फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. ठाकरे गटाकडे बहुमताचा आकडा आहे, असा दावाही कपिल सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. 39 जणांचं बहुमत तपासून आयोगानं त्यांना चिन्ह दिलं, कोर्टाच्या निर्णयाचा त्यांनी गैरवापर केला, असं सिब्बल म्हणालेत. आम्ही या प्रकरणात आयोगाने काय निर्णय घेतला हे बघणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यावर ठाकरेंवर आयोग, राज्यपाल आणि त्यांच्या आमदारांनी सर्वांनी अन्याय केला आहे. आयोगाने निर्णय घेतल्याने त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देखील नाही, असं सिब्बल म्हणाले. दरम्यान, आमदार पात्र आहेत हे राज्यपालांनी गृहित धरलं. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. राज्यपालांकडे काय काय होतं ते मागवून घ्यायला हवं. कायद्याच्या माझ्या प्रस्तावाशी सहमत असाल तर राज्यपालांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता धुळे आणि दोन वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत, मतदान जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई महापालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
��चारसंहिता काळात राज्यभरा�� सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या चारही मतदार संघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना केल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.
लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेख्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली.
धुळे शहरात १० नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. याअंतर्गत २६८ वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये नव्व्द कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आला होता. याप्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक आधिकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
चेन्नई इथं सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा ४-१ असा पराभव केला. तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा ५-० असा पराभव केला. चंदीगडने उत्तराखंडविरुद्ध ९-० असा विजय मिळवला.
0 notes
Text
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
जळगाव दि.17 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी…
View On WordPress
0 notes
Text
मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास होणार अपात्र, ग्रामपंचायत निवडणूक आयोग चा नवा नियम
मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास होणार अपात्र, ग्रामपंचायत निवडणूक आयोग चा नवा नियम
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाली असून अर्ज करणे, अर्जाची छाननी अर्ज माघारी घेणे , चिन्हं वाटप मतमोजणी यांची तयारी चालु आहे. 2 डिसेंरअखेर अर्ज दाखल करणे 5 डिसेंबर पर्यंत अर्जाची छाननी करून अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. मतदान 18 डिसेंबर रोजी होणार असून त्याची मतमोजणी हि 20 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू
महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान, आजपासून आचारसंहिता लागू
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 13 ऑक्टोबरला मतदान होणार असून 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. संकल्पना प्रतिमा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंचांच्या निवडणुकीसाठी दि. 13 ऑक्टोबर रोजी मतदान आणि…
View On WordPress
#ग्रामपंचायत निवडणुका#निवडणूक आयोग#पंच सरपंच निवडणूक#महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक#राज्य निवडणूक आयोग
0 notes
Link
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय.
0 notes
Text
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी Thackeray vs Shinde On Shiv Sena : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे. त्यामुळं आता पक्षावर हक्क कोणत्या गटाचा असणार, याबाबत निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे. Thackeray vs Shinde On Shiv Sena : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं…
View On WordPress
#‘शिंदे#&8216;शिवसेना&8217;;#shinde#thackeray#अपडेट न्यूज#आज#आजची बातमी#आताची बातमी#आयोगासमोर#ऑनलाईन बातम्या#की#कुणाची#ठळक बातम्या#ठाकरे#ताज्या घडामोडी#निवडणूक#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महत्त्वपूर्ण#महाराष्ट्र#लेटेस्ट बातमी#सुनावणी
0 notes