Tumgik
#काळजीवाहू
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते, नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा प्रंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान, या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारी राष्ट्रांचे महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनौथ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या शपथविधी समारंभानंतर या नेत्यांची राष्ट्रपती भवनात बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहू, असंही खर्गे म्हणाले. खर्गे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व, पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैद्राबाद इथं आज सकाळी निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. ईनाडू समूह आणि रामोजी चित्रपटसृष्टीचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुखः व्यक्त केलं आहे. देशानं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावलं असून पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त राव यांची दृष्टी सामाजिक उत्थानासाठी रुजलेली होती, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामोजी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रामोजी राव भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानानं पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली. देशाच्या विकासाबद्दल त्यांना अत्यंत तळमळ होती, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामोजी राव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षण आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिला, अशी माहिती जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी ते आज माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटीत सर्व समाजातील गावकऱ्यांनी उपोषणाला पाठींब्याचं लेखी पत्र दिल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
****
यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल बियाणं वितरीत केलं आहे, आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरोचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचीही शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टेक्सास इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेश संघानं श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघानं निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल बांग्लादेश संघानं १९ षटकात आठ गडयांच्या मोबदल्यात विजय मिळवला. 
अन्य एका सामन्यात अफगानिस्तान संघानं न्यझिलंड संघाचा ८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तान संघानं २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मात्र, न्यझिलंड संघाचे ७५ धावांतच सर्व गडी बाद झाले.
****
दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
अक्षय कुमार बनला भोजपुरीचा जय यादव, 11 चित्रपट प्रदर्शित होणार
अक्षय कुमार बनला भोजपुरीचा जय यादव, 11 चित्रपट प्रदर्शित होणार
जय यादव बनला भोजपुरीचा अक्षय कुमार, 11 चित्रपट प्रदर्शित होणार ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sri Lanka crisis : लंका पेटली आंदोलक रस्त्यावर; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती
Sri Lanka crisis : लंका पेटली आंदोलक रस्त्यावर; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती
Sri Lanka crisis : लंका पेटली आंदोलक रस्त्यावर; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या नावाची श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे हे आता श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कोलंबो:  श्रीलंका (Sri Lanka crisis) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.…
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Words in Marathi
काळजी
[kāḷjī], noun (feminine), uncountable
worry, care, concern
मला माझ्या शेताची काळजी आहे. malā mājhyā śetācī kāḷjī āhe
I am concerned for my farm. (lit. I have concern of my farm)
Origin:
Doublet of काळीज [kāḷīz]. This word means 'liver' biologically, but it is figuratively used to mean 'heart'.
काळीज [kāḷīz] comes from Old Marathi काळज [kāḷaja], eventually from Sanskrit कालेय [kāleya].
Compound verbs and associated terms:
काळजी असणे [kāḷjī asṇe] - to have concern for
काळजी वाटणे [kāḷjī vāṭṇe] - to feel worried
काळजी करणे [kāḷjī karṇe] - to worry
काळजी घेणे [kāḷjī gheṇe] - to take care
काळजीपूर्वक [kāḷjīpūrvak] - carefully, with care
काळजीकारक [kāḷjīkārak] - worrying, worrisome
काळजीवाहक [kāḷjīvāhak] - custodian
काळजीवाहू [kāḷjīvāhū] - caretaker
काळजीमुक्त [kāḷjīmukta] - carefree
8 notes · View notes
kokannow · 3 years
Text
गोवा विधानसभा बरखास्त
डॉ.प्रमोद सावंत काळजीवाहू मुख्यमंत्री गोवा: प्रमोद सावंत यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत विधानसभा बरखास्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपाल पी.एस. श्रीधरनपिल्लई यांना कळवला. राज्यपाल पिल्लई यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला आणि नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत डॉ.प्रमोद सावंत यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. याबाबतचे पत्र राज्यपाल पिल्लई यांगी प्रमोद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
अकाउंट नंबर, ऑनलाईन देणगी महत्वाची माहिती
अकाउंट नंबर, ऑनलाईन देणगी महत्वाची माहिती
पंतप्रधान केअर फंड ऑनलाईन देणगी | पंतप्रधान काळजी निधी खाते क्रमांक | नागरी मदत आणि स्वयंचलित कॉशलेसमध्ये देणगी द्या पंतप्रधानांनी यूपीआय कोडची काळजी घेतली [email protected] प्रदर्शन सिटीजन असिस्टेंड आणि रिलिफ इन इमरजेंसी सिचुएशन फंड यानी पंतप्रधान काळजीवाहू निधी केंसंत आज दिनांक २ देश मार्च २०२० रोजी देशातील जनता कोरोना विषाणूचा लढाईत सहकार्याने प्रयत्नशील राहिली ती माननीय श्री. पीएम कॅर फंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
eight June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y3xmu8nj चालू घडामोडी (eight जून 2019) जगनमोहन मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री : आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगु देशम पक्षाचा दारुण पराभव करून सत्तेवर आलेल्या वायएसआर जनगमोहन रेड्डी सरकारने मंत्रिमंडळातही नवा पॅटर्न आणला आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्य आणि कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क: पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. पती- पत्नीमध्ये उत्पन्नाच्या वाटणीचा फॉर्म्यूला ठरलेला आहे. याअंतर्गत पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडेच राहायला हवे तर एक हिस्सा पत्नीला दिला पाहिजे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत पतीने पत्नीला पगारातील 30 टक्के रक्कम द्यावी, असे आदेश दिले. न्या. संजीव सचदेवा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. पतीच्या ��ार्यालयाने (सीआयएसएफ) त्याच्या पगारातील तीस टक्के रक्कम कापून थेट पत्नीच्या बँक खात्यात जमा करावी, असे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे. इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्बची खरेदी : भारत 300 कोटी रुपये खर्चून इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तातडीने खरेदी करणार आहे. तसा करार दोन्ही देशात नुकताच झाला. तर याच स्पाइस बॉम्बचा मारा करून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. तसेच हे बॉम्ब स्पाइस-2000 जातीच्या बॉम्बची अत्याधुनिक आवृत्ती असणार आहेत. या बॉम्बच्या माऱ्यामुळे शत्रूच्या इमारती तसेच बंकरचे एका क्षणात प्रचंड नुकसान होते. इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तीन महिन्यांच्या आत भारताला पुरविले जातील. थेरेसा मे यांचा अखेर राजीनामा : ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढण्यात अयशस्वी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील. पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याबरोबरच त्यानी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. तर युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्द्यावर ब्रिटनच्या पार्लमेंटमधील खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात थेरेसा मे अयशस्वी ठरल्या होत्या. ब्रेक्झिट कराराला पार्लमेंटची मंजूरी मिळविण्याचे मे यांनी तीनदा केलेले प्रयत्न फोल ठरले होते. दिनविशेष : eight जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य‘ या ग्रंथाचे eight जून 1915 मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले. eight जून 1918 रोजी नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला. एअर इंडिया ची eight जून 1948 मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली. पहिल्यांदा जागतिक महासागर दिन eight जून 1992 रोजी साजरा केला गेला. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
dendy · 8 years
Photo
Tumblr media
धावचित झालेल्या फलंदाजाप्रमाणे खिन्न होऊन खेळपट्टीकडे पाहणे, हा शशिकलांपुढे एकमेव मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. आजच सकाळी एका आमदाराने त्यांच्या शिविरात उडी मारली होती. आता त्यांच्याकडे सात आमदार आणि 12 खासदार झाले आहेत. किमान 45 ते 50 आमदार त्यांच्या बाजूने आहेत, असे म्हणतात. त्यामुळे हा निकाल आल्या-आल्या त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडले तर ते समजून घेणे सोपे आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात शशिकला दोषी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठासून सांगितले. त्यामुळे जयललिता यांच्या मागोमाग शशिकला यांनाही तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यांना चार वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. तमिळनाडूची सध्याची विधानसभा आणि शशिकला यांच्या शिक्षेचा काळ तंतोतंत जुळतात. काय ही नशिबाची थट्टा! गंमत म्हणजे या खटल्यातील मुख्य आरोपी जयललिता या होत्या. सिंहाचा वारस सिंहच असतो, असे दोनच दिवसांपूर्वी शशिकलांनी सांगितले होते. आता सिंहाच्या पदचिन्हांवर त्यांना असेही चालावे लागेल, हेच विधिलिखित आहे. धावचित झालेल्या फलंदाजाप्रमाणे खिन्न होऊन खेळपट्टीकडे पाहणे, हा शशिकलांपुढे असलेला एकमेव मार्ग आहे. न्यायमूर्ती पी सी घोष और न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्या पीठाने तमिळनाडूतील एका मोठ्या राजकीय नाट्याचे मध्यंतर केले आहे. न्यायालयाने शशिकला यांना आत्मसमर्पण करण्याचेही आदेश दिले आहेत. शशिकला यांनी आपल्या वतीने कोणाला नियुक्त केले, तर तेही लोकांना पचण्यासारखे नाही कारण जो कोणी असेल त्याच्यामागे जयाम्मांचा वरदहस्त नाही. पन्नीरसेल्वम व शशिकला यांची गोष्ट वेगळी होती. पन्नीरसेल्वम हे जयाम्मांचे 'हातचा आला एक' होते. राजकीय अडचणीची समीकरणे सोडविण्यात ते कामास येत. शशिकला या तर साक्षात जयाम्मांच्या सावली! त्यामुळे त्यांच्या दाव्यालाही काही एक बळ होते. तिसऱ्या कोणत्याही चेहऱ्याला हे स्थान नाही का बळ नाही. थोडक्यात पन्नीरसेल्वम हे, मी मागे म्हटल्याप्रमाणे, एकाच वेळेस माजी, आजी व भावी मुख्यमंत्री आहेत. धर्माचा जय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता त्यांचा पक्ष वरचढ ठरल्यामुळे ते आणखीच सश्रद्ध होतील. मात्र या निर्णयाने चिंता मिटलेले पन्नीरसेल्वम एकटे नाहीत. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या 'वेदनिलयम' या घरातून शशिकला यांना बाहेर काढा, अशी मागणी एका महिला वकिलाने चेन्नईच्या पोलिस आयुक्तांकडे नुकतीच केली होती. त्यांनाही आता फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. कलादेवी नावाच्या या वकिलांचीही चिंता मिटली असेल. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही एक अडचण न्यायालयाने परस्परच दूर केली आहे. आता शक्तिप्रदर्शनही नको आणि कोणाचे हात दाखवून अवलक्षणही नको. सगळे कसे सुरळीत, सहज आणि सोपे! आता ते उजळमाथ्याने चेन्नईला जाऊ शकतील. अन् गेले नाहीत तरी कोणी त्यांच्यावर कालापव्यय करण्याचा आरोप करू शकणार नाही. इतकेच काय, कृष्णरायपुरम येथील अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार गीता यांच्या पतीचीही चिंता आता दूर झाली असणार. "माझी आमदार बायको दोन दिवसांपासून दिसली नसून तिला माझ्यासमोर हजर करा," अशी मागणीच गीता यांच्या पतीने चेन्नई उच्च न्यायालयात केली होती. याही त्यातल्याच एक. त्यांच्या पतीने मद्रास उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस् (व्यक्तीला उपस्थित करण्याची) याचिका दाखल केली आहे. "गीता यांच्या प्रमाणेच अनेक आमदारांना बळजबरीने कोंडून ठेवले आहे. उच्च न्यायालयाने माझ्या बायकोला शोधून माझ्यासमोर आणावे," अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या आमदारांना जिथे कोंडून ठेवले होते, त्या कूवंदूर येथील रिसॉर्टची कटकट गेली असेल. गेले आठवडाभर येथे आमदारांना कोंडून ठेवल्यामुळे तेथे आणीबाणीसदृश वातावरण होते. त्यामुळे आधीच असलेल्या पाहुण्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे म्हणे या रिसॉर्टची रेटिंग घसरली होती. आता आमदारांनाच हलावे लागल्यामुळे या रिसॉर्टचे दरवाजेही सताड उघडू शकतील. पुराणकथेतील आकाशवाणीप्रमाणे ऐन मोक्याच्या वेली आलेल्या या निर्णयाचे म्हणूनच अनेक ठिकाणी स्वागत होईल. यात शंका नको!
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०८ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
छत्तीसगडच्या बस्तर परिसरात काल सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. दंतेवाडा इथले पोलिस अधिक्षक गौरव राय यांनी याबाबत आकाशवाणीला माहिती दिली. दरम्यान, सर्व सात नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
ईनाडू समुह आणि रामोजी चित्रपट सृष्टीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद इथं उपचारादरम्यान निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, देशाचे काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुखः व्यक्त केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणासाठी प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली, तरीही जरांगे यांनी उपोषणवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासह सगेसोयरेसंदर्भातली आपली मागणी राज्य सरकारनं मान्य करावी ही भुमिका जरांगे यांची आहे.
****
तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे १२ जून रोजी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजयवाड्यात हा शपथविधी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी होणार आहे. नायडू हे आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा विराजमान होणार आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी तेलगु देसम पक्ष, जनसेना आणि भारतीय जनता पक्षांनी मिळून एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे चौंसष्ट जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केलं आहे.
****
मराठवाड्यात काल रात्री आणि आज पहाटे काही ठिकाणी पाऊस झाला आहे, ���िभागात पुढच्या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवमान संशोधन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओ: लहान हत्ती आणि काळजीवाहू यांच्यातील मजेदार भांडण तुम्ही पाहिलं का? व्हिडिओने लोकांना हसवले
व्हायरल व्हिडिओ: लहान हत्ती आणि काळजीवाहू यांच्यातील मजेदार भांडण तुम्ही पाहिलं का? व्हिडिओने लोकांना हसवले
लहान हत्ती आणि काळजीवाहू यांच्यातील मजेदार लढत तुम्ही पाहिली का? प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter या मजेदार व्हिडिओने लोकांना हसवले आहे. हे IFS अधिकारी डॉ. सम्राट गौडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहे, ज्याला आतापर्यंत 1 लाख 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हत्ती हे वन्य प्राणी असले तरी त्यांना जंगलात राहायलाही आवडते, पण त्यांना माणसांसोबत राहायलाही हरकत नाही. हत्ती हजारो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
India vs Zimbabwe: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त
India vs Zimbabwe: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त
India vs Zimbabwe: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले लक्ष्मण यांची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचे काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. … भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
एनडीएचा राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा-उद्या सायंकाळी नव्या सरकारचा शपथविधी
नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेपासह सुशासनाला प्राधान्य-काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार-नाशिक शिक्षक मतदार संघासाठी ४० जणांचे ५३ अर्ज
बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश
आणि
ज्ञानराधा प्रकरणात कुटे दाम्पत्याला १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
****
भाजपचे ज्येष्ठ नेते काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी सहा वाजता हा शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला, यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनीही काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षनेतेपदी निवड झाल्याचं, तसंच त्यांना सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं.
काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या बैठकीत सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तेलगूदेशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि धर्मनिर्पेक्ष जनता दल नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
यावेळी बोलतांना मोदी यांनी, एनडीए फक्त राजकीय पक्षांचा गट नाही तर राष्ट्र प्रथम या तत्वानं एकत्रित आलेला कटीबद्ध समूह असल्याचं प्रतिपादन केलं. सुशासन, विकास, जीवनमान दर्जा उंचावणं आणि नागरिकांच्या जीवनात किमान हस्तक्षेप याला सरकारचं प्राधान्य असेल, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, काल एनडीएच्या बैठकीनंतर मोदी यांनी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
****
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात १७ जागा लढवून १४ जागांवर विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं यश असल्याचं, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य असून, त्यातही असाच लढा देऊ, असा निर्धार चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
****
राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. मनसेतर्फे अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काल मुदतीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे, भाजपाचे निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैय्या रिंगणात आहेत. सरैया तसंच डावखरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
**
नाशिक विधान परीषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधीज्ञ संदीप गुळवे यांनी तर शिवसेनेच्या वतीने विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी अर्ज दाखल केला आहे. काल अखेरच्या दिवसापर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.
****
भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
****
१८ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १५ ते २१ जून, दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचं प्रदर्शन मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, पुणे, तसंच कोलकाता इथं केलं जाणार आहे. यंदा या महोत्सवाच्या स्पर्धा विभागात ३८ देशांमधून ६५ भाषांमधील तब्ब्ल एक हजार १८ चित्रपटांची नोंदणी झाली आहे.
****
यंदा��्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुंडे बोलत होते.
यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी असून, त्यापैकी १३ लाख क्विंटल वितरीत केलं असून आणखी सहा लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती, मुंडे यांनी दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीच्या उपसरपंचांसह ७० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देऊ नये, असं म्हटलं होतं. जरांगे मात्र आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाच्या निर्णयावर कायम आहेत.
****
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये बीड इथले पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत तुकाराम गुळभिळे यांनाही राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं.
****
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना न्यायालयानं १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी काल पहाटे कुटे यांच्या पुण्यातल्या हिंजवडी इथल्या घरातून त्यांना ताब्यात घेत, माजलगाव न्यायालयासमोर सादर केलं, न्यायालयानं त्यांना येत्या गुरुवापर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून घेतलेल्या ठेवी परत केल्या नाहीत, या प्रकरणी कुटे यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल आहेत.
****
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर परिसरात एक चारचाकी वाहन मालवाहू ट्रकवर पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लातूर जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात एका टेंपोने चारचाकीला दिलेल्या धडकेत काल दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. उमरगा-लातूर मार्गावरच्या बाबळसुर पाटीजवळ हा अपघात झाला.
****
लातूर जिल्ह्यात पावसाच्या पुरात वाहून गेल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. देवणी तालुक्यातल्या कमालवाडीत गुरुवारी अलेल्या पुरामध्ये ही महिला वाहून गेली होती, काल तिचा मृतदेह सापडला.
****
बीड जिल्ह्यातल्या केज इथं एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थाकडून ३ हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. धनराज सखाराम सोनवणे असं मुख्याध्यापकाचं नाव असून, शाळेच्या दाखल्याची दुसरी प्रत देण्यासाठी त्याने तक्रारदार विद्यार्थाकडे लाचेची मागणी केली होती.
****
महावितरण कंपनीच्या विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं आहे. समाज माध्यमांवर वीजमीटर विरोधात जन समर्थन एकत्रित करण्याचं काम याद्वारे सुरू करण्यात आलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी मीटर विरोधात सविस्तर पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या शेतकऱ्यांनी काल नरसी इथल्या वीज उपकेंद्रासमोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केलं. या परिसरातील दोन महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यामुळं शेतात विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या. मात्र अद्याप हे खांब उचलण्यात आले नाहीत, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतीच्या मशागतीस त्याचा अडथळा निर्माण होत असल्यानं हे आंदोलन केल्याचं, शेतकऱ्यांनी सांगितलं.
****
पावसाळ्याच्या कालावधीत शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनीही कोरडा दिवस पाळण्यासह इतर उपायांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११ जूनपर्यंत धर्माबाद-मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
श्रीलंका ते इटली सत्तांतराची लाट सुरु, मारिओ द्राघींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर
श्रीलंका ते इटली सत्तांतराची लाट सुरु, मारिओ द्राघींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर
श्रीलंका ते इटली सत्तांतराची लाट सुरु, मारिओ द्राघींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर Mario Draghi : इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्याचं नाट्य अखेर संपलं आहे. मारिओ द्राघी यांनी दिलेला राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला असून नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ते काम पाहितील. Mario Draghi : इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्याचं नाट्य अखेर संपलं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष; भारतासोबत कसे असतील संबंध?
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष; भारतासोबत कसे असतील संबंध?
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष; भारतासोबत कसे असतील संबंध? Anil Wickremesinghe New President of Sri Lanka: आर्थिक संकटामुळे जनतेच्या आंदोलनानंतर गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलानंतर आज श्रीलंकेच्या अध्यक्षीय पदासाठी झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे यांचा विजय झाला असून ते आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. सध्या रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू अध्यक्ष…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड श्रीलंकेत आज झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेत आज झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी  त्रिकोणी सामना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण
Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. “नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील,” असे ते म्हणाले. नवीन…
View On WordPress
0 notes