#जागतिक बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप संमेलनातून केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारे नेतृत्त्व तयार होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सोल लीडरशीप संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यावेळी उपस्थित होत. राष्ट्र उभारणीसाठी नागरिकांचा विकास खूप महत्त्वाचा असून, स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची स्थापना विकसित भारताच्या प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
****
दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध परिसंवाद, असे कार्यक्रम होणार आहेत.
****
केंद्र सरकारनं समाजमाध्यमांवरील विविध प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसाठी भारतीय कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत नियमावली जारी केली आहे. ��टीटी प्लॅटफॉर्म्सनी कायद्यानं प्रतिबंधित असलेला कोणताही कंटेंट प्र��ारित करू नये आणि कंटेंटचे वयानुसार वर्गीकरण करावं अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे.
****
देशात मागच्या दहा वर्षात आरोग्यावर होणारा खर्च चौसष्ट टक्क्यांवरून घटून सुमारे एकोणचाळीस टक्के इतका झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद २०२५, या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह राष्ट्रीय आरोग्य योजना आणि अन्य अशा योजनांमधून पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमुळे खर्चात ही घट झाल्याचं ते म्हणाले. देशातली सुमारे चाळीस टक्के लोकसंख्या या योजनांअंतर्गत येते, असं नमूद करत, नुकतंच सत्तर वर्षांवरच्या सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करून घेण्यात आल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाहन बाँबनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज दोन व्यक्तींना अटक केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथून या दोघांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. अभय शिंगणे आणि महेश वायाळ अशी या दोघांची नावं असून, त्यांची मुंबईत गोरेगाव पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे. काल एका ईमेलद्वारे ही धमकी मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरू करून चोवीस तासात संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
****
पीक विमा कंपनीकडे असलेला नव्व्याण्णव कोटी रुपयांचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या मागणीसह परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, नाफेडनं शिल्लक सोयाबीनची खरेदी करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी इथं गोदावरी नदीपात्रात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून  सुरुवात झाली आहे. यंदा राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या या दहावीच्या परिक्षांमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी बीड जिल्ह्यात शिक्षण विभागानं सात भरारी पथकांसह एकशे छप्पन्न बैठी पथकं स्थापन केली आहेत. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक पूर्णवेळ उपस्थित राहणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक कोणत्याही क्षणी परीक्षा केंद्रावर अचानक येऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपली मातृभाषा जपण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी कटीबद्ध राहू या, असं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. ब गटातल्या संघांदरम्याचा हा पहिलाच सामना आहे.
****
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
IBM चा प्रभाव अनलॉक करणे: मराठी बातम्य���ंनी नवीन मार्ग उघडले
तांत्रिक नवकल्पना आणि कॉर्पोरेट प्रभावाच्या गजबजलेल्या लँडस्केपमध्ये, IBM एक बेहेमथ म्हणून उभी आहे, सतत डिजिटल जगाची रूपरेषा तयार करत आहे. तथापि, त्याच्या जागतिक उपस्थितीत, प्रादेशिक बातम्यांमध्ये, विशेषतः मराठीत, IBM च्या प्रवेशामुळे, सर्वसमावेशकता आणि प्रवेशयोग्यतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्रयत्न केवळ IBM ची पोहोच वाढवत नाही तर मराठी भाषिक समुदायांना संबंधित आणि वेळेवर माहिती देऊन सक्षम बनवतो.
IBM च्या भांडारात मराठी बातम्यांचे एकत्रीकरण विविध सांस्कृतिक लँडस्केप्सची सूक्ष्म समज आणि स्थानिक संवेदनशीलता पूर्ण करण्याचे महत्त्व दर्शवते. मराठी, भारतातील प्रमुख प्रादेशिक भाषांपैकी एक, समृद्ध वारसा आणि विशाल प्रेक्षक अभिमान बाळगते मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक विविधतेचे महत्त्व मान्य करते आणि तंत्रज्ञान आणि प्रादेशिक समुदायांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करते.
मराठी बातम्यांमध्ये IBM च्या उपक्रमाचा प्रभाव केवळ भाषिक समावेशकतेच्या पलीकडे आहे. हे मराठी भाषिक प्रेक्षकांशी सखोल संबंध वाढवते, त्यांना IBM चे उपक्रम, सेवा आणि तंत्रज्ञानातील प्रगती त्यांना सोयीस्कर असलेल्या भाषेत गुंतवून ठेवण्यास सक्षम करते हे पाऊल माहितीच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करते, व्यक्तींना माहिती ठेवण्यासाठी आणि डिजिटल युगात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करते.
शिवाय, IBM चा मराठी बातम्यांमध्ये प्रवेश, स्थानिकीकरण आणि सामुदायिक सहभागासाठी ��ंपनीची बांधिलकी अधोरेखित करते. हे सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित सामग्री प्रसाराच्या महत्त्वावर जोर देऊन कॉर्पोरेट संप्रेषण धोरणांमध्ये एक प्रतिमान बदल दर्शवते. मराठी बातम्यांचा स्वीकार करून, IBM भाषिक अडथळ्यांना पार करते आणि मराठी भाषिक भागधारकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासते.
मराठी बातम्यांवरील IBM च्या उपक्रमाचे परिणाम विविध क्षेत्रांमध्ये उमटतात. तळागाळातील नवकल्पना सुलभ करण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यापर्यंत, सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी स्थानिकीकृत दळणवळण माध्यमे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मराठी प्रेक्षकांना तंत्रज्ञान, व्यवसाय ट्रेंड आणि जागतिक घडामोडींवरील बातम्या आणि अपडेट्स उपलब्ध करून देऊन, IBM ज्ञानाचा प्रसार उत्प्रेरित करते आणि डिजिटल क्रांतीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी व्यक्तींना सक्षम करते.
शिवाय, IBM च्या पुढाकाराने भाषिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी आणि प्रादेशिक समुदायांशी सक्रियपणे संलग्न राहण्यासाठी इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे. वाढत्या परस्परसंबंधित जगात, सर्वसमावेशक समाजाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी भाषिक बहुलता समजून घेणे आणि त्याचा आदर करणे अत्यावश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:-
प्रमुख मराठी लोगो
अमरावती बातम्या आज मराठीत
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सूर चुकला अन् बेडीत अडकला; बेसूर गायल्याबद्दल प्रसिद्ध बांगलादेशी गायक हीरो अलोमला अटक
सूर चुकला अन् बेडीत अडकला; बेसूर गायल्याबद्दल प्रसिद्ध बांगलादेशी गायक हीरो अलोमला अटक
सूर चुकला अन् बेडीत अडकला; बेसूर गायल्याबद्दल प्रसिद्ध बांगलादेशी गायक हीरो अलोमला अटक Hero Alom Arrest: तुम्ही गाता का? आणि बरे गाता का? पण, जर बरे गात नसाल आणि काही कारणांनी बांगलादेशला जाणार असाल तर चुकूनही तिकडे तुमच्या गाण्यातला साऽऽऽ लावू नका. कारण तुमचा सूर चुकला तर कदाचित तेथील पोलिस तुमची गठडी वळतील आणि मग तुम्हाला तेथील तुरुंगात बे-सुरांच्या नावाने बोटे मोडत बसावे लागेल. विश्वास बसत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
ज्याच्यावर जीवापाड प्रेम तोच निघाला अट्टल लोक! सर्वोच्च सहा वर्षांनी घटना सत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं
ज्याच्यावर जीवापाड प्रेम तोच निघाला अट्टल लोक! सर्वोच्च सहा वर्षांनी घटना सत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं
प्रेम ही अशी एक भावना आहे जे माणसाला काही विसर्जित भाग पाडते. प्रेम वय, जात, रंग-रूप, पैसा लागत नाही, असे म्हणतात. प्रेमात बुडालेली व्यक्ती भावनिक निर्णय घेते. मात्र या निर्णयाला त्या व्यक्तीला सोडा. अशीच एक घटना घडली आहे. जेव्हा तिला तिच्या प्रियकराची सत्यता समजली, तेव्हा तिच्या पायालची जमीन सरकली. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेणे. ३५ ग्राहक स्टेला पॅरिस ही महिला एका यासह संपूर्ण वर्षभर…
Tumblr media
View On WordPress
#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#चर्चेतील विषय#जगभरातील ��्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ#वर्तमान ट्रेंडिंग बातम्या#व्हायरल ट्रेंडिंग व्हिडिओ#व्हायरल व्हिडिओ
0 notes
loksutra · 2 years ago
Text
शहनाज गिल आपल्या ताज्या ट्विटमुळे प्रचंड ट्रोल झाली
शहनाज गिल आपल्या ताज्या ट्विटमुळे प्रचंड ट्रोल झाली
‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री शहनाज गिल दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या बबली स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. शहनाज गिल पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली असून यावेळी तिचे एक ट्विट कारण ठरले आहे. यावेळी लोकांनी त्याला ट्रोल केले आहे. खरं तर शहनाज गिल जागतिक दाढी दिन पण ट्विट करून एकाने अडचण घेतली आहे. यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर गेली. हेही वाचा – Exclusive:…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
आंतरराष्ट्रीय बाजारातही टाटा मोटर्सचा धोका, जागतिक घाऊक विक्रीत 2 टक्क्यांनी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातही टाटा मोटर्सचा धोका, जागतिक घाऊक विक्रीत 2 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली: टाटा मोटर्स समूह यशाच्या नव्या पायऱ्या चढत आहे. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही टाटा मोटर्सचा दबदबा आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने नोंदवले आहे की जग्वार लँड रोव्हर-जेएलआरसह जागतिक घाऊक विक्रीत वर्षभरात 2 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत कंपनीने एकूण 3,34,884 वाहनांची विक्री केली…
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
राजकीय साठेमारीत हरवलेले बुद्धिबळातील यश
     गेल्या महिनाभरातील  भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर फार मोठे यश मिळवले मात्र त्याची यथोचित दखल राजकीय बातम्या देण्यात मग्न असलेल्या माध्यमांनी घेतली नाही . मराठीतील एक उकृष्ट चित्रपट झेंडा या चित्रपटात  ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सुरवातीला कार्यालयाच्या प्रसंगात आर्थिक बातम्यांना राजकीय बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते याबाबत खंत व्यक्त करण्यात आली होती तोच काहीसा प्रकार या बुद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
दिल्लीत९८व्याअखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.संमेलनाचंउद्घाटन दुपारी साडेतीन वाजतापंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याहस्तेहोणारआहे. संमेलनाच्याअध्यक्षडॉक्टरताराभवाळकरयांच्यासहसंमेलनाचेस्वागताध्यक्षशरदपवार, मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयावेळीउपस्थितअसतील. तालकटोराक्रीडा संकुलातल्या छत्रपतीशिवाजीमहाराजसाहित्यनगरीततीनदिवसचालणाऱ्यायासंमेलनात, मान्यवरांच्यामुलाखती, बहुभाषिककवीसंमेलन, विविध परिसंवाद, असेकार्यक्रमहोणारआहेत.
यासाहित्यसंमेलनासाठीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीदोनकोटीरुपयांचाअतिरिक्तनिधीमंजूरकरतएकूणचारकोटीरुपयांचानिधीउपलब्धकरूनदिलाआहे.
****
एकोणिसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर सुरू होत आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक राणा या संमेलनाच्या अध्यक्षस्थ��नी आहेत.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित होते. येत्या दोन मार्च पर्यंत चालणा-या या महोत्सवात मराठीसह बंगाली, तामिळ, इंग्रजी, अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण होणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथे संत श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन उत्सव साजरा झाला. तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात काकडा, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धर्मिक कार्यक्रम झाले. यावर्षी प्रगट दिन उत्सवात १००१ दिंड्यांनी सहभाग घेतल्याचं आणि जिल्हाभरातल्या मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एकतीस लाख लोकांनी पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांनाही आता महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कैद्यांना कारागृहाच्या आवारातच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान,महाकुंभाच्याशेवटच्याआठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेनं तयारी केली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांच्याबाहेरअतिरिक्त  विशेष व्यवस्था तयार करण्या�� आली असून, प्रवाशांना त्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या नियोजित वेळेनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.
****
२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका सांगता झाली. या महोत्सवात जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वेच्या ‘आरमंड’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचं महाराष्ट्र शासनाचं ‘प्रभात’ पारितोषिक मिळालं; तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सांगळा’ या चित्रपटाला मिळालं. मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'स्नो फ्लॉवर' या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल दाभाडे यांनातरसर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छाया कदम यांना जाहीर करण्यात आला.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण, तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांसाठी शासनामार्फत बावीस कोटीरुपयांचा निधी प्राप्‍त झाल्यामुळेलातूर शहरातल्या सर्व लाभार्थीना महानगरपालिकेमार्फत दोनदिवसातनिधी वाटप करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आलेला आहे.यायोजनेच्यालाभार्थ्यांनीमहापालिकेच्यासंबंधितअधिका-यांशीसंपर्कसाधूनयानिधीचालाभघ्यावा, असंआवाहनलातूर महानगरपालिकेचे आयुक्‍त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
****
मध्यआसामच्यावरचक्रीवादळाचीस्थितीउत्पन्नझाल्यामुळेदेशाच्याईशान्यभागातआजविजाआणिढगांच्यागडगडाटासहमुसळधारवादळीपाऊसहोण्याचाअंदाजहवामानविभागानंवर्तवलाआहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
छत्रपतीसंभाजीनगरमधल्याऑरिकसिटीलादेशातलंउत्तमऔद्योगिकक्षेत्रबनवण्याचासंकल्पअसून, येणार्याकाळातमराठवाडासर्वातमोठंऔद्योगिकहबबनेल, असंकेंद्रीयवाणिज्यमंत्रीपियुषगोयलयांनीम्हटलंआहे. तेआजछत्रपतीसंभाजीनगरइथंवार्ताहरांशीबोलतहोते. ऑरिकसिटीतकालउद्योजकांशीझालेल्याचर्चेविषयीत्यांनीयावेळीमाहितीदिली. ऑरिकसिटीतजवळपाससातहजारकोटीरुपयांचीगुंतवणूकहोणारअसून, याठिकाणीनागरीकआणिकामगारांसाठीघरे, रुग्णालय, विद्यापीठयासारख्यापायाभूतसुविधाउपलब्धहोणारअसल्याचंगोयलयांनीसांगितलं. याऔद्योगिकक्षेत्रातकौशल्यविकासकेंद्रतसंचस्टार्टअपइन्क्यूबेशनहबबनवण्यातयेणारअसल्याचीमाहितीहीत्यांनीदिली. मराठवाड्यालामोठाऐति��ासिकवारसालाभलाअसून, हावारसाविकासाशीजोडण्याचंकाममहायुतीस��कारकरतअसल्याचं, गोयलम्हणाले.
****
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ताआजशपथघेणारआहेत. भारतीय जनतापक्षाच्या दिल्ली विधीमंडळ पक्षाची काल बैठक झाली, त्यातरेखागुप्तायांच्यानावाचीपक्षनेताम्हणूनघोषणाकरण्यातआली. त्यानंतरत्यांनीदिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन, सरकारस्थापनेचा दावाकेला. आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर शपथग्रहणहोणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थितराहण्याची अपेक्षा आहे.
****
भारत अनेक क्षेत्रात आघाडीवरचा देश असून, विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करत तसंच नवनवीन उपक्रमराबवून जागतिक स्तरावर मानदंड प्रस्थापित करत असल्याचं प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. काल एका मुलाखतीत भारताच्या अवकाश क्षेत्राविषयी बोलतानात्यांनी, देशाने या क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन केलं असून, महत्त्वकांक्षी मोहिमा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातही वाढझालीअसल्याचंसांगितलं. अंतराळ संशोधनात देशाच्या वाढत्या वर्चस्वालाअधोरेखित करणाऱ्या टप्प्यात, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून येणाऱ्या निष्कर्षांची वाट पाहात असल्याचंही सिंगयांनी सांगितलं.
****
रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधितघोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पश्चिम रेल्वेच्यापाच अधिकाऱ्यांना अटक केली. बडोदा आणिअमदाबादमधून प्रत्येकी २ आणि मुंबईतून एकाला अटकझाली आहे. रेल्वेच्या कार्मिक विभागातल्या दोन वरिष्ठअधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. याप्रकरणी सीबीआयच्याअधिकाऱ्यांनी बडोद्यात ११ ठिकाणी छापे घातले. त्यात६५० ग्रॅम सोने आणि ५ लाख रुपये रोख रक्कम ताब्यातघेण्यातआली.
****
मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत कालझालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.छत्तीसगडच्या सीमेवर ही चकमकझाली. यात काही नक्षलवादी जखमी झाले, मात्र ते पळकाढण्यात यशस्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात शस्रास्त्र जप्त करण्यातआली.
****
यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनंझारखंडमधल्या नक्षलवादी कमांडरलाअटककेली. तुलसीउर्फदिलिपमहातोनावाच्यायानक्षलवाद्यावर१९९३ते१९९७याकाळातल्यानक्षलीहल्ल्यांचेसहागुन्हेदाखलआहेत.
****
राज्यसरकारनंविविधठिकाणीप्राथमिकआरोग्यकेंद्रंआणिग्रामीणरुग्णालयंस्थापनकरायलामान्यतादिलीआहे. त्यासाठीउपकेंद्रतेजिल्हारुग्णालयस्तरावरएकूणदोनहजार७०पदनिर्मितीसाठीशासनानंमान्यतादिलीअसल्याचीमाहिती, सार्वजनिकआरोग्यमंत्रीप्रकाशआबिटकरयांनीदिली. टप्याटप्यानंसर्वरिक्तजागाभरण्यासाठीनियोजनबद्धप्रयत्नकेलेजातील, असंहीत्यांनीसांगितलं.
****
राज्यपरिवहनविभागात दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार असल्याचं, परिवहनमंत्रीप्रतापसरनाईकयांनीसांगितलंआहे. तेकालसोलापूरइथंबोलतहोते. राज्यातल्या सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजनअसल्याचंत्यांनीसांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नाशिकजिल्ह्यातलासाल्हेर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणारअसल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंआहे. साल्हेरइथंकालशिवजयंतीनिमित्तझालेल्याकार्यक्रमाततेबोलतहोते. साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीनं आदिवासी संग्रहालय आणि शिवसृष्टीसाठी दीडशेकोटीचा आराखडा प्रस्तावित असून, पहिल्या टप्प्यासाठी७५कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याचीमाहितीआमदार दिलीप बोरसेयांनीयावेळीदिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या पारा गावामध्येकालच्याशिवजयंती रॅलीत फटाके उडवताना स्फोट झाल्याची घटना घडली. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडी तोफेतून आवाजाची दारू उडवतानास्फोटातदोनजणगंभीरजखमीझाले, त्यांच्यावरउपचारसुरूआहेत.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपदचषकक्रिकेटस्पर्धेतआजभारताचासामनाबांग्लादेशविरुद्धहोणारआहे. दुबईतहोतअसलेलाहासामनाभारतीयवेळेनुसारदुपारीअडीचवाज��ासुरुहोईल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचाण्णवावी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी, १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नामांकित
राज्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची माहिती
आणि
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-बांग्लादेश लढत
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती काल सर्वत्र साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईतल्या विविध कार्यक्रमांमध्ये राज्यपाल सहभागी झाले होते.
****
शिवजयंतीचा मुख्य सोहळा पुण्यात साजरा झाला. किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरांपेक्षाही मोठे असून, त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. तर, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
****
पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, काल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात, छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले असून, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
‘‘देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्कोच्या जागतिक वारसाकरता त्याठिकाणी नॉमीनेट केलेले आहेत. लवकरच त्याची परिषद होणार आहे. आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पहिल्या टप्प्यामध्ये युनोस्कोला पॅरीसला जाऊन यासंर्भातलं एक सादरीकरण करणार आहेत. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे किल्ले हा खरोखरच जागतिक वारसा म्हणून याठिकाणी युनोस्कोही स्विकारेल.’’
राज्यात सर्वच जिल्हा ���ुख्यालयांच्या ठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रा काल काढण्यात आली. पुण्यात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरही सुमारे तीन हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीसह ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. मराठवाड्यातही या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
‘‘छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वेषभुषा केलेले शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले.
**
जालन्यात काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
बीड इथं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
**
परभणी या पदयात्रेला विविध मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पारंपारिक वेशभूषेतली मुलं आणि साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांची मनं जिंकून घेतली.
**
हिंगोली इथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
**
नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
**
धाराशिव इथं पदयात्रा उत्साहपूर्ण वातारणात पार पडली. शहरातल्या विविध शिक्षण संस्थांमधले सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले.
**
लातूर इथे जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम आणि झांज पथकांनी ढोल-ताशांच्या तालावर केलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली.’’
****
शिवजयंतीच्या निमित्तानं काल तुळजापूर इथं श्रीतुळजाभवानी देवीची 'भवानी तलवार अलंकार' महापूजा करण्यात आली. शिवाजी महाराजांना देवीनं भवानी तलवार दिली होती, अशी मान्यता आहे, त्याची आठवण म्हणून ही पूजा मांडली जाते.
****
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल उत्तरप्रदेशात आग्रा इथं लाल किल्ला परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आग्य्रातल्या ज्या कोठीत शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आलं होतं, त्याठिकाणी भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिव जयंतीनिमित्त राजकीय भाष्यकार आणि ’सकलजनवादी शिवराय’ या ग्रंथाचे लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं, शिवरायांचा सकलजनवाद हाच खरा महाराष्ट्रधर्म असल्याचं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित पुणे ते दिल्ली ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ कालपासून प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत हे संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे मराठी भाषा��ंत्री उदय सामंत यांनीही या विशेष रेल्वेत साहित्यिकांसोबत प्रवास केला.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ऑरिक सिटी सभागृहात उद्योजकांच्या संघटनाशी गोयल यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शेंद्रा आणि बिडकीन उद्योग वसाहतीमध्ये उद्योगांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक असून, शून्य भ्रष्टाचार आणि शून्य विलंब पद्धतीचा अवलंब करून सर्व पूर्तता करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी उद्योजकांना यावेळी केलं. उद्योग क्षेत्रासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची गोयल यांनी माहिती दिली.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. दुबईत होत असलेला हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
दरम्यान, या स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला.
****
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती.
****
धाराशिव तालुक्यात आळणी इथले ज्येष्ठ गांधीवादी नेते चंद्रकांतराव वीर यांचं काल निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले वीर यांनी, जिल्हा होमगार्डचे समादेशक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसंच काँग्रेस समीतीचे धाराशिव शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. १६३० साली आजच्याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना करून मुघल सामाज्याला आव्हान दिलं. शिवाजी महाराजांचं प्रागतिक नेतृत्व, सैन्याबाबतची दूरदृष्टी, शौर्य, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठीचे त्यांचे अविरत प्रयत्न, या असामान्य गुणांमुळे शिवाजी महाराजांना जनमानसात अत्यंत आदराचं स्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांच्या असामान्य नेतृत्वानं रचलेला स्वराज्याचा पाया तसंच त्यांचं शौर्य आणि न्यायबुद्धी, यांनी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज स्वतंत्र, आत्माभिमानी भारत आपण पाहतो आहोत, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेऱणा आहे. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानवता त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला कल्पना आहे ते केवळ योग्य नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन असेल जंगल संवर्धन असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त���राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते
स्वराज्यातले किल्ले मंदिरं आहेत, त्यामुळे त्यांच्या संवर्धनाकडं विशेष लक्ष दिलं जात असून, किल्ल्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी कृती दल स्थापन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तेरा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यात शिवनेरी किल्ल्याचाही समावेश असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. पुण्यात काढण्यात आलेल्या पदयात्रेत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आलं. शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोलापूर, धुळे, अकोला, नंदुरबार, यवतमाळ तसंच वाशिम इथं काढलेल्या पदयात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
बीड इथं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी शिवजयंतीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यावेळी उपस्थित होते. गेवराई इथं शिवशाही या ऐतिहासिक महानाट्याचे तीन प्रयोग शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केले असून, शिवप्रेमी नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.
लातूरमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा मध्यरात्री साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम झाला. सोलापूर शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर लाखो महिलांच्या साक्षीने शिवजयंती निमित्त पाळणा गायन करण्यात आलं.
व्यसनमुक्त समाजासाठी 'धरू व्यायामाची कास, करू व्यसनांचा ऱ्हास' हा संदेश देत यवतमाळच्या देव चौधरी ह्या आंतरराष्ट्रीय धावपटूने 'आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्' साठी तब्बल १३ तास धाऊन नोंद केली आहे. न थकता, न दमता, भर उन्हात देव १३ तासात १३७ किलोमीटर धावला आणि या विक्रमाला त्याने गवसणी घातली. आम्ही यवतमाळकर क्रीडाप्रेमी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते देव चा सत्कार करण्यात आला.
नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होणार असून, आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार आहे.
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला प्रारंभ
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या तीन मार्चपासून सुरुवात, १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदत वाढ
आणि
मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन, दिल्ली साहित��य संमेलनाच्या गीताचं प्रकाशन
****
बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या बँकांमध्ये गैरव्यवहारामुळे खातेधारकांचे पैसे खात्यात अडकून पडले आहेत, अशा खातेदारांना, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर अधिक रक्कम काढता येईल. सध्या अशा प्रकरणात ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतात. विमा योजनेची खरेदी केल्यानंतर एक वर्षापर्यंत ग्राहकांना त्याबाबत फेरविचार करता येईल, असं नागाराजू यांनी सांगितलं. वर्षभराच्या मुदतीत ग्राहकांना विमा योजना आवडली नाही, तर या योजनेच्या प्रीमियमपोटी भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग - एम एस एम ई साठी तारणमुक्त कर्ज देणाऱ्या योजनेला, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रारंभ केला. अर्थसंकल्पाच्या संदर्भात विविध उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी काल मुंबईत घेतलेल्या कार्यक्रमात त्यांनी या योजनेची सुरुवात केली. या योजनेमुळे एम एस एम ई ना यंत्रसामग्री किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी, १०० कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज तारणमुक्त स्वरुपात उपलब्ध होईल. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारनं या योजनेची घोषणा केली होती.
महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात पुरेशा तरतुदी नसल्याचे विरोधकांचे आरोप, सीतारामन यांनी फेटाळून लावले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यातल्या गुंतवणूकदारांनाही मिळत असून, सरकारच्या धोरणामुळेच संरक्षण उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या तीन मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल. अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाने, विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या शाळांशी संपर्क वाढवावा, असं आवाहन, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुण्यात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात ते काल बोलत होते. आदिवासी भागातल्या मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्यासाठी, या संपूर्ण समस्येचं विद्यापीठानं अध्ययन करावं, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.
****
सर्वसामान्यांना लाभ देणारी कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचा पुनरुच्चार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकु��े यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. काही योजनांचा लोकांनी गैरफायदा घेतला, त्याची तपासणी सुरू आहे. योजनांना पात्र असलेल्यांना लाभ निश्चित मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काही बाबी प्रलंबित होत्या, त्याचं उत्तर सरकारनं दिलं असून, लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल आणि राज्य सरकार तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेईल, अशी आशाही बावनकुळे यांनी व्यक्त केली.
****
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट - एच एस आर पी बसवण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता येत्या ३० एप्रिल पूर्वी एच एस आर पी बसवून घ्यावी, असं आवाहन परिवहन विभागाने केलं आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली कामं तातडीने पूर्ण करण्याची सूचना, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाचाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांच्यासमवेत दानवे यांनी आढावा घेतला.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या,राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी, उद्या १९ फेब्रुवारीला होणार आहे. छत्रपतींचा योद्ध्याच्या वेषभूषेतला ६० फुटी पूर्णाकृती पुतळा इथं उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, नवीन पुतळ्याची अंतर्गत संरचना, पूर्णतः स्टेनलेस स्टीलची असणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या नोएडा इथल्या कारखान्यात हा पुतळा बनवला जात आहे.
****
दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या वृत्ताचं, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईने खंडन केलं आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याच्या हेतुनं सामाजिक संपर्क माध्यमावरून काही लोक अशा अफवा पसरवत आहेत, मात्र त्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सीबीएसईने केलं आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याची माहितीही मंडळाकडून देण्यात आली. याबाबत कोणतीही शंका असल्यास, मंडळाच्या डब्‍ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीबीएसई डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर पडताळणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कुंटूर तांडा इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर भौतिकशास्त्र आणि तर्कशास्त्राच्या पेपरच्यावेळी चार विद्यार्थ��यांना कॉपी करतांना काल माध्यमिक बोर्ड आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने पकडलं. जिल्ह्यात काल १०७ केंद्रावर, २३ हजार ३६१ विद्यार्थ्यांपैकी, २३ हजार ६९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.
****
अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नवी दिल्लीतल्या नियोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार केलेल्या संमेलन गीताचं काल राजभवनात राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, प्रियंका बर्वे, मंगेश बोरगावकर, शमीमा अख्तर आदींनी हे संमेलन गीत गायलं आहे.
**
दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावं, हा सुवर्णयोग असल्याचं मत, छत्रपती संभाजीनगर इथल्या साहित्यिक रसिका देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या...
‘‘हे संमेलन दिल्लीत व्हावे हा मला एक सुवर्णयोग वाटतो. आणि खरोखरच ही प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. असं वाटतय आपली जबाबदारी वाढली आहे. आता मराठीच मराठीपण जपणं हे जास्त आपल्याला आता कटाक्षानं करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. तो प्रत्यक्ष सोहळा डोळ्यानं बघणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे.’’
दरम्यान, दिल्लीतल्या या नियोजित साहित्य संमेलनातल्या एका व्यासपीठाला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात येणार आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी काल बीड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भातलं पत्रं अखिल भारतीय साहित्य मंडळाकडून मिळाल्याचं चांदणे यांनी सांगितलं.
****
पुस्तकं ही माणसाला उर्जा प्रदान करतात, असं ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने भरवण्यात आलेल्या, परभणी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रत्येकाने वाचन संस्कृती ही जोपासलीच पाहिजे, असं आवाहनही वसेकर यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत काल शिवकालीन शस्त्रांच प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मुंबईतल्या नालासोपारा इथल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केलं. पाळणा गीत गायन स्पर्धाही काल घेण्यात आली.
**
लातूर इथं उद्या ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या पदयात्रा पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात आव्हाणे बुद्रुक इथल्या निद्रिस्त गणेशाच्या माघी यात्रेची आज सांगता होणार आहे. संकष्ट चतुर्थी पासून प्रारंभ होणारी ही यात्रा तीन दिवस चालते. या यात्रेनिमित्ताने निद्रिस्त गणेशाची महापूजा करण्यात आली. राज्यातला हा एकमेव निद्रिस्त स्वरूपात असलेला स्वयंभू गणेश आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाची ओळख असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड पोलीस दलातले पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत ससाणे यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचेधक्केजाणवले. त्याची तीव्रताचाररिश्टरस्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली जवळ धऊला कुवा इथं जमिनीच्या खाली पाचकिलोमीटर वर होता. यात अजून कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याच वृत्त नाही.
दरम्यान, या भूकंपानंतर आणखी काही धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी दिल्लीच्या नागरिकांना शांत राहून याबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचं आणिसतर्क राहण्याचं आवाहनकेलंआहे. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचत्यांनी म्हंटल आहे.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजारचौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारीउपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातल्या परिवर्तनाचं समग्रदर्शन घडवणारं ठरलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावांचं दर्शनघडवणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळतआहे. बांदा, झाशी, चित्रकूट, ललितपूर आणि महोबा यासह बुंदेलखंडमधल्या पाणीटंचाईच्या समस्येवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात आला, हे या नमुना गावानं दाखवून दिलं आहे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणिअतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानंनवीदिल्लीरेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्याआहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार असल्याचंयाबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
दरम्यान, काल महाकुंभमेळ्यातजवळपासदीडकोटी भाविकांनी स्नानकेलं. १३जानेवारीपासून सुमारे५३कोटी भाविकांनीपवित्रसंगमावर स्नान केल्याची नोंद झाली आहे.
****
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं काल आदीमहोत्सव २०२५ चं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात त्यांनीगेल्या १० वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठीअनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं. आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाचीसंस्कृति समृद्ध कर��ात, अस�� त्या म्हणाल्या.
****
केंद्रीय श्रम, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल मुंबईत भाजपच्या 'युवा संवाद' कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन केलं. आपल्या युवा शक्तीची क्षमताभारताला लवकरात लवकर विकसित राष्ट्र बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
भारतीय भांडवली बाजारामधून परदेशीगुंतवणूकदारांनीफेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.जानेवारीत एकंदर ७८ हजार २७ कोटी रुपयांची परदेशीगुंतवणूक झाली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीइतर देशांमधून आयात मालावर अतिरिक्त शुल्कआकारण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारसंस्थांनी सावध पवित्रा घेतला असावा, असंयाबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
****
जळगावजिल्ह्यातल्याजामनेरइथंकालनमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटनमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याहस्तेझालं. सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातले खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाबअसल्याचंतेयावेळीम्हणाले. या स्पर्धेत नऊ देशांतले कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातल्या सन्मित्रमहिला नागरी सहकारी बँकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळाकालफडणवीसयांच्याउपस्थितीतपारपडला. महिलांनी पुढाकार घेतला, तर एखादी सहकारी बँकयशाच्या शिखरावर पोहचते, महिलांना अर्थकारण चांगलंकळतं असं, मुख्यमंत्रीम्हणाले.
****
पुणे जिल्ह्यात जुन्नर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशआणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटनकालमुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरेयांच्याहस्तेझालं. नवीन वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने सतत अध्ययनकरायला हवं, असंत्यांनीयावेळीसांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आय सी यु आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटरचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्तेकालझालं. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
****
बालस्नेही विधी सेवा योजना २०२४ बाबत जनज��गृतीकरण्यासाठी सांगलीत काल एक शिबीरघेण्यातआलं. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्यासामान्य किमान कार्यक्रमाअंतर्गत आयोजित या शिबिरातबालश्रम प्रतिबंध, पोक्सो यासारख्या बालहक्कांच्याकायद्यांची तसंच ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठीच्या टोलफ्री क्रमांकाबद्दल मुलांना माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कसाबखेडा इथल्या आयुष्मान आरोग्य मंदिराची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विविध अधिकार्यांनी पाहणी करून या केंद्राचं उत्कृष्ट कामकाज दिसून आल्यामुळे, ही निवड करण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यातल्या प्रत्येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना सुरुवात
आणि
नांदेडहून आयोध्येला जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात चार जणांचा मृत्यू
****
भारत टेक्स एक्स्पोमध्ये परंपरेसोबत विकसित भारताचं दर्शन होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारत मंडपम् इथं भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात ते बोलत होते. हे जागतिक वस्त्रोद्योग संमेलन असून, यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि निर्यातीला चालना मिळत आहे, तसंच यामधून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून, ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
****
नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांचा समावेश आहे. या समितीने स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. फलाट क्रमांक ��४ आणि १५ वर उतरण्यासाठी असलेल्या पुलावरुन उतरताना काहीजण घसरले त्यामुळे गर्दीतली माणसं एकमेकांवर कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं, उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या आधी तासाभरात पंधराशेहून अधिक तिकिटं विकली गेली होती, त्यामुळे रेल्वेला गर्दीचा अंदाज यायला हवा होता, असं त्या म्हणाल्या.
****
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेची बातमी दुःखद आणि वेदनादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाकुंभातून आणलेल्या गंगाजलाचा लाभ घेण्यासाठी नागपूरमधे आयोजित कार्यक्रमा��ंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लव जिहाद वर मत व्यक्त केलं. एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे गैर नाही, मात्र यात फसवणुकीचे प्रकार वाढत असून, त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, जळगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले असता, मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या प्रत्येक शाळेला मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात आल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही. यासंदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. दुसरं शाळा हिंदी असो, इंग्रजी असो, कुठलीही असो, त्यांना मराठी शिकवावी लागेल, याची आपण सक्ती केलेली आहे. ती सक्ती ते योग्य प्रकारे पालन कराताहेत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे. यासंदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे.
****
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या आजच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं. तर आपल्याला भविष्यात काय करायचं याबद्दल मुलांनी आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगावं आणि ते पूर्ण करून दाखवावं, असं भूमी पेडणेकर यांनी सांगितलं.
उन पॅरेंटस्‌ को भी कहना चाहुंगा की जो एक्सपेक्टेशन्स आपने अपने बच्चों पे डाली है, वो बर्डन जिस दिन लगने लगती है ना, तो दे आर नॉट एबल टू ग्रो। और प्रधानमंत्री श्री मोदीजी भी ये कहते है की, आपके सपने जो है, वो आपके है, आपके बच्चों के नही।
मेरे मम्मी पापा चाहते थे की, मै एक डिफरंट करीअर पार्ट चुनूं। और तब मैने अपने तरीके से उनको एक पॉझिटीव्ह चीज दिखानी शुरू की एक्टींग की दुनिया पॉझिटीव्ह है। ये इतनी आपको घबराने की जरूरत नही है।
****
केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा ‘मेरा युवा भारत’ उपक्रम जळगाव इथं सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात मुंबईतल्या २७ युवक युवतींचा समावेश आहे. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज या युवकांशी संवाद साधत जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषि परंपरेची माहिती दिली.
****
शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली. यात शहरातल्या सर्व पुतळ्यांची साफसफाई जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली, तसंच सायकल रॅलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी सायकल रॅली मधून आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौकात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त शिवकालीन शस्त्र आणि संस्कृती तसंच त्यांनी केलेली युद्धनीती याबद्दल आबालवृद्धांना माहिती होत आहे.
****
नांदेडहून अयोध्येला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात लोणीकटरा इथं अपघात होऊन, चार जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या एका बसला धडक देऊन हा अपघात झाला. मृतांमधले तिघे जण नांदेड इथले, तर एक जण हिंगोली इथले रहिवासी होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाच्या कामाचं भुमिपूजन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. इतर मागासवर्ग कल्याण आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं उत्तम स्मारक आणि सर्वोपयोगी अद्यावत सभागृह, यासारख्या कामांसाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन शिरसाट यांनी यावेळी दिलं.
****
नाशिक महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तीन हजार ५४ कोटी ७० लाख रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला आज सादर केलं. अत्यल्प करवाढ वगळता गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ५०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असून, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज उचलण्याऐवजी महापालिकेने दोनशे कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी शासन आराखड्यात मंजूर नसलेली कामं परंतू सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक आणि पूरक असणाऱ्या कामासाठी टोकन म्हणून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कसाबखेडा इथल्या आयुष्मान आरोग्य मंदिराची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विविध अधिकाऱ्यांनी पाहणी करून या केंद्राचं उत्कृष्ट कामकाज दिसून आल्यामुळे, ही निवड करण्यात आली.
****
नांदेड इथं रेल्वेमार्ग विस्तारीकरणाच्या कामांमुळे उद्या १७ फेब्रुवारीपासून येत्या तीन मार्च पर्यंतच्या ���५ दिवसांच्या कालावधीत काही रेल्वेगाड्या काही दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी-नांदेड एक्स्प्रेस १९, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी तसंच एक आणि दोन मार्च या दिवशी रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन, दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसरात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या खामसवाडी शिवारात अवैध गांजाच्या झाडाची लागवड करुन संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसांनी कारवाई केली. संभाजी हिलकुटे असं या शेतकऱ्याचं नाव असून, त्याच्या शेतातून एकूण ३४७ किलो २८० ग्रॅम वजनाची गांजाची झाडं ताब्यात घेण्यात आली.
****
उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी तसंच सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर नगरपालिका आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी उद्या भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे. सुरुवातीला सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं, त्यानंतर सहा हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं हे पाणी सोडलं जाणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा महत्त्वपूर्ण आणि अतिशय फलदायी ठरला असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात संरक्षण सहकार्य, संरक्षण करार, आर्थिक संबंध, तंत्रज्ञान, उर्जा संरक्षण, नागरी संबंध आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. २०३५ पर्यंतच्या अमेरिका भारत प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी १० वर्षांच्या नवीन आराखड्याला अंतिम रूप देण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली, तसंच दोन्ही देशांमध्ये निर्यातीमधले अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं निश्चित करण्यात आल्याचं, मिस्त्री यांनी सांगितलं.
****
दरम्यान, थायलंडमध्ये आयोजित संवाद या चौथ्या जागतिक हिंदू बुद्धिस्ट उपक्रम कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. भगवान बुद्धांची शिकवण जगाला शांततापूर्ण, प्रगतीशील युगाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक असल्याचं, ते यावेळी म्हणाले. भारत आणि थायलंड या देशांनी अनेक क्षेत्रांमध्ये एक सशक्त भागीदारी केली आहे, असं सांगत ही परिषद भारत आणि थायलंडमधल्या मैत्रीचा आणखी एक यशस्वी अध्याय असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. जागतिक उत्तरदायित्व आणि परस्पर सहकार्यावर आधारित स्थैर्याचं तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतातम्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या जवानांचं बलिदान आणि राष्ट्राप्रती असलेलं त्यांचं अतूट समर्पण येणाऱ्या प��ढ्या कधीही विसरणार नाहीत, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहीली आहे. दहशतवाद हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू असून, संपूर्ण जग त्याविरुद्ध एकजूट असल्याचं, शहा यांनी नमूद केलं.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात पोषणतज्ञ ऋजुता दिवेकर, फूडफार्मर रेवंत हिमत्सिंगका आणि पोषणतज्ञ शोनाली सबरवाल यांनी विद्यार्थ्यांना आहाराचं महत्व अधोरेखित केलं. परीक्षेदरम्यान शरीरात अधिक ऊर्जा आणि, एकाग्रता राखणं तसंच मानसिक शांतता राखण्यासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली पाळण्यासाठी त्यांनी प्रभावी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासातल्या विविधतेप्रमाणेच अन्नामध्येही विविधता असावी, बाहेरचं अन्न टाळून घरातल्या जेवणाला प्राधान्य द्यावं, असा सल्ला ऋजुता दिवेकर यांनी दिला.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं निर्बंध घातले आहेत. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही, बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारु शकणार नाही. पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील.
****
महाविद्यालयीन जीवनात आभासी विश्वातून येणाऱ्या प्रलोभनांपासून विद्यार्थ्यांनी सावध रहाव, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावरच्या व्याख्यानात त्या आज बोलत होत्या. आपण फसवले जातोय असं वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आणि आपल्या पालकांची मदत घ्या, असं देखील चाकणकर म्हणाल्या.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार, नांदेडचे कवी पी. विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत गरजूंना, पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी कार्ड काढण्याकरता तसंच नावाची नोंदणी करण्याकरता हिंगोली नगर परिषदेच्या वतीने विशे��� मो��ीम राबवण्यात येत आहे. हिंगोली शहरात पाच ठिकाणी शिबीरं आयोजित करण्यात आले असल्याची माहिती, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली.
****
उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. पुढच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन मेघालय करणार असून, यावेळी खेळांचा ध्वज मेघालयला सुपूर्द केला जाईल.
दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्रानं पदकांचा २०० चा आकडा पार केला आहे. राज्याच्या खात्यात एकूण सर्वाधिक २०१ पदकं असून, त्यामध्ये ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक ६८ सुवर्ण पदक जिंकून सेना दल पहिल्या, ५४ सुवर्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या, तर ४८ सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा अमेरिकेचा दौरा आटोपून स्व��ेशी निघाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्झ यांची भेट घेतली. संरक्षण, तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कंडक्टर आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी भारतीय - अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी तसंच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली.
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतातम्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या सैनिकांचं बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्या कायम स्मरणात ठेवतील, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचं प्रतिक असल्याचं, प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी म्हटलं आहे. ते काल प्रयागराज इथं बोलत होते. त्यांनी संगम सेक्टर चार इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांची पाहणी केली.
सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार नाही, यासाठी विविध उपाय योजणं सरकार सुरू ठेवेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या. आयकरातल्या सवलतींचा फायदा केवळ श्रीमंतांना होईल, हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारतीय डाळी परिषदेत ते काल बोलत होते. महाराष्ट्र सरकार डाळींच्या उत्पादनात पुढाकार घेत असून, शाश्वत शेती, संशोधन, सरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रसह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं रावल यांनी नमूद केलं.
जगभरातलं तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि संधी भारतात उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईत १० एकर जागेत, मनोरंजन क्षेत्रातलं जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल आशिष शेलार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन अनिमेशन, व्ह��ज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्था उभारणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरच्या तज्ज्ञांकडून उच्च शिक्षण दिलं जाणार असल्याचं, शेलार यांनी सांगितलं.
विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अकोल्यात शिवनी इथं अपघाती निधन झालं. एका पिकअप गाडीनं बिडकर यांच्या गाडीला धडक दिल्यानं ते अपघातात गंभीर जखमी झाले होते, रुग्णालयात नेत असताना त्यांचं निधन झालं. अकोल्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित डेबू चित्रपटाची निर्मितीही बिडकर यांनी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
भारतमाला परियोजनेतल्या सुरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली. तालुक्यातल्या जवळपास ११ गावातून हा ३३ किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी जवळपास तीनशे जमीनीचं संपादन करण्यात येणार असून, ८१ टक्के क्षेत्र संपादित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत जालना शहरात काल रन फॉर लेप्रसी मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते कुष्ठरोग निर्मुलन कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मॅरेथानमध्ये क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
लातूर महानगरपालिकेने थकित करवसुलीसाठी धडक मोहिम करत काल दिवसभरात एक शिक्���ण संस्था कार्यालय, दोन गोदामं, एक दुकान सील केलं, तर तब्बल १९ नळ जोडणी खंडित केल्या.
0 notes