#इंग्रज
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शाळा, शालेय आवार तसंच शालेय वाहतुकीदरम्यान विद्यार्थी सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून सात सदस्यीय समिती स्थापन
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उचलून नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं या रोगाबाबतच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली. २०१९ मध्ये सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग या श्रेणीतून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्दबातल ठरवलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली ��हे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर बाललैंगिक अत्याचारासारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नाशिक इथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या प्रस्तावित विद्यापीठात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश असेल, असं नमूद करत, या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील, असं राज्यपाल म्हणाले. आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असून, राजभवनात आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातला आदिवासी आता एकत्र झाला असून, त्यांच्या पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्यानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. आज जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आज तिसऱ्या दिवशीही बघायला ��िळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली.
हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल्या ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे. याशिवाय, गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्यासोबतच गरजूंना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उल्हासनगर इथल्या एका बिस्किट कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. विद्युत यंत्रणेतल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. आज नांदेड तालुक्यातल्या आलेगाव आणि निळा या गावांच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.
राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचं मुक्कामाचं ठिकाण धुळे ऐवजी हिंगोली इथे करण्यात यावं, यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शके��, अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी केली.
पाटील यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या अतिवृष्टीबाधित भागाचीही पाहणी केली. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. आज दुपारी बारा वाजेपासून या विसर्गाला सुरुवात झाली. सध्या धरणात दहा हजार ७४६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास, विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या बंधाऱ्याबाबत काढलेली निविदा तातडीनं रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीत खरबी इथे कयाधू नदीवर बंधारा बांधून ते पाणी ईसापूर धरणात आणि त्यानंतर नांदेडला नेण्याचं प्रस्तावित आहे. याबाबत हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली असून, येत्या १३ तारखेपर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
****
येत्या अकरा तारखेला, बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथले संत जरजरीजरबक्ष यांच्या उर्सनिमित्त जिल्हा प्रशासनानं स्थानिक सुटी जाहीर केली आहे. राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतली कार्यालयं, केंद्रीय प्रशासनाची कार्यालयं आणि बँकांच्या कक्षेतली कार्यालयं सोडून जिल्ह्यातली इतर सगळी शासकीय, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयं, शासकीय कोषागारं आणि महामंडळांच्या कार्यालयांना ही सुट्टी लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
Text
मराठा आरक्षणाचा घटनात्मक मार्ग!
https://bharatlive.news/?p=158777 मराठा आरक्षणाचा घटनात्मक मार्ग!
इंग्रज सरकारने 1885 मध्ये केलेल्या ...
0 notes
Text
विकासकामांचा गिरीशभाऊंचा ध्यास
पुणे | लोकप्रतिनिधी म्हणून श्री. गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक कामे केली. लोकांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प आणले. प्रकल्पांची फक्त घोषणा न करता, ही कामे पूर्णत्वास कशी जातील त्याचप्रमाणे कामाचा दर्जाही चांगला कसा राहील यासाठी स्वत: त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. प्रकल्प राबवत असताना येणाऱ्या समस्यांबाबत��ी त्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेतले. त्यांनी केलेल्या विकासकामांपैकी पीएमआरडीएची स्थापना, पीएमआरडीएच्या माध्यामातून केलेली विकासकामे, वाहतूक समस्या कमी करण्यासाठी घेतलेले निर्णय प्रामुख्याने पुणे मेट्रोची मंजुरी, रिंगरोड तसेच पुणे विमानतळ विस्तारासाठी त्यांनी केलेले प्रयत्��� या शहर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्तवाचे आहेत. श्री. गिरीश बापट यांनी पाच वेळा विधानसभेत कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. पुण्याचे आमदार म्हणून त्यांनी पुणे शहराचे आणि परस्पर परिसराचे वेगवेगळे विषय धसास लावले. मुंबई महानगराचा विकास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने एमएमआरडीएची स्थापना केली होती. मुंबई खालोखाल पुणे हे राज्यातलं महत्त्वाचे शहर आहे. पुढील काळात पुणे एक विकसित महानगर होईल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएच्या धर्तीवर त्यांनी पीएमआरडीएची म्हणजेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा अनेक वर्षे सरकारकडे आग्रह धरला. मी विधानमंडळाचे वार्तांकन करताना आणि नंतर विधानसभा अध्यक्ष मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही काम करत असताना, गिरीशभाऊंना अनेक वेळा विधानमंडळात पीएमआरडीएसाठी आपल्या भाषणात जोशपूर्ण आग्रह धरताना पाहिलय. पुणे परिसराचा भविष्यात सर्वांगीण विकास होण्यासाठी ते कायम या विषयावर विधानसभेत बोलत. आज संपूर्ण देशात पीएमआरडीए रिजन हे सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेलं त्याचबरोबर पुणे महापालिका हे देशात सर्वाधिक क्षेत्र असलेलं महानगराचे क्षेत्र आहे. या दृष्टिकोनातून गिरीश भाऊंनी महाराष्ट्रातच एक महत्त्वाचा हा विकासाचा परिसर म्हणून या भागाकडे पहावा यासाठी आग्रह धरला होता. त्यात मला त्यांची दूरदृष्टी दिसून येते. कारण या पुढच्या काळात महत्त्वाच्या कंपन्या, महत्त्वाच्या आस्थापना, शैक्षणिक केंद्र, व्यावसायिक क्षेत्र म्हणून ह्या पट्ट्यात एका मोठ्या परिसराचा विकास होत असल्याचे आपल्याला दिसून येते. बापट साहेबांनी पीएमआरडीएचा आग्रह धरल्याने 2014 साली मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय महत्वाचा विषय म्हणून पीएमआरडीएच्या स्थापनेसाठी लगेचच मान्यता दिली. पीएमआरडीएचे पहिले अध्यक्ष म्हणून पालकमंत्री या नात्याने गिरीशभाऊ बापट यांची नियुक्ती झाली. या आधीच्या काळात मी या सर्व घडामोडी जवळून पाहिलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेंव्हा पीएमआरडीएचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा मंत्री असावेत, की कॅंाग्रेसचे मुख्यमंत्री पीएमआरडीएचे अध्यक्ष असावेत यात खूप वाद विवाद झाले. आणि त्या वादात पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी स्थापन होणारी ही एक महत्त्वाची यंत्रणा उभी नाही राहू शकली. ही दुर्दैवाने पुण्याच्या विकासासाठी अतिशय मारक ठरलेली गोष्ट होती. पण गिरीश भाऊंच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत देवेंद्रजींनी ज्या धडाडीने निर्णय घेतले त्याचा एक भाग म्हणून पीएमआरडीए अस्तित्वात आली. पुढच्या काळात पीएमआरडीएचा विकास जसजसा होईल तसतसं गिरीश भाऊंची ही कृती किती महत्त्वाची होती आपल्या लक्षात येईल. पीएमआरडीची स्थापना करताना त्यांनी अधिकाऱ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढच्या किमान पन्नास वर्षाचा आराखडा आपण तयार केला पाहिजे अशी सूचना केली. त्यात कटाक्षाने लोकांची व्यवस्थित सोय कशी होईल हे पहिले. हे करत असताना वाहतुकीच्या सोयी, आरोग्य,शाळा, रस्ते, पाणी, कचरा या सर्व प्रकल्पांवर लक्ष देण्याचा प्रत्येक वेळी आग्रह धरला. याची अंमलबजावणी करायला अधिकाऱ्यांना जवळपास भाग पाडले असं म्हणायला हरकत नाही. पुण्यात इंग्रज राजवटीत कोरेगाव पार्क आणि डेक्कन जिमखाना या टाउनशिप अस्तित्वात आल्या. त्यानंतर त्यात धर्तीवर पीएमआरडीए मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी टाऊनशिपच्या कल्पना मांडून स्वतंत्रपणे चांगला विकास कसा करता येईल, याच्यासाठी धोरण आखायला सांगून बापट साहेबांनी आग्रह करून ते काम करून घेतलं. पीएमआरडी मार्फत रस्त्यांचे वेगवेगळे जाळ तयार करायचा, त्याचबरोबर पीएमआरडीएचा रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई पासून निघालेले किंवा वेगवेगळ्या भागातून वरून येणारी पुणे शहरातून जाणारी अवजड वाहने शहरातून आणि शहराला लागून असलेल्या रस्त्यांवरून जातात. वास्तविक त्यांना या परिसरात येण्याची काहीच गरज भासत नाही. ही वाहतूक टाळल्यास पुणे शहरात येणारा मोठा वाहतुकीचा लोड टाळता येऊ शकतो, असं लक्षात आल्यानंतर पीएमआरडी कडून एक वेगळा रिंग रोड करण्याची योजना आखण्यात आली. त्या रिंग रोडचे पण नियोजन झालं. तो एक महत्त्वाकाक्षी प्रकल्प बापट साहेबांनी हातात घेतला होता. त्यातून वाहतुकीचा खोळंबा टाळता आला असता. शहरात येणाऱ्या मोठ्या गाड्या टाळून ही वाहतूक अन्यत्र वळवल्यास शहरातल्या लोकांना वाहतुकीत खूप मोठा फरक झालेला दिसून आला असता. भविष्यात ते नक्की घडेल. पुणे हे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आयटीचं मोठं केंद्र म्हणून गेल्या काही वर्षात उदयाला आलं. पण आयटीच्या उदयाबरोबरच शहरातले वाहतूक, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि त्यानुसार या प्रश्नांना ऍड्रेस करणं, त्यावर उपाययोजना करणे ही आवश्यक गोष्ट होती. मात्र याबाबत दुर्दैवाने ठोस निर्णय झाले नव्हते. बापट साहेब पालकमंत्री असताना मी त्यांच्या काही कामांचा समन्वय करत होतो. यामुळे हिंजवडीतील आयटी पार्क असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मला माहिती देऊन आमच्या भागातील महत्वाच्या प्रश्नांसाठी बापट साहेबांनी लक्ष घालावे अशी विंनती केली. त्या प्रश्नांचा ��भ्यास केल्यानंतर आम्हाला असे लक्षात आलं की, अनेक वर्षांपासून यात कोणी व्यवस्थित लक्ष दिले नसल्याने हे प्रश्न अतिशय चिघळलेले आहेत. पुणे शहरातून प्रामुख्याने कोथरूड, बाणेर, बालेवाडी भागातून हिंजवडीत जायला ट्रॅफिक जाम मध्ये दोन ते अडीच तास लागत होते. हिंजवडीला कामाला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लोक जर दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम मध्ये अडकत असतील, तर दुर्दैवाने याच्यासारखी दुसरी गंभीर गोष्ट असू शकत नाही. या लोकांचा वेळ अर्धा तास ते ४० मिनिटांवर आला तर तेवढाच वेळ ते आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी खर्च करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यावेळी ते म्हणाले होते. यासाठी आपण याच्यात लक्ष घालून जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल याची खबरदारी घेऊ असं बापट साहेबांचे म्हणन होत. हिंजवडी आयटी पार्क असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर त्यांनी या दृष्टिकोनातून खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू केले. या कामांबाबत विविध पातळीवर मी फॉलोअप करून रस्ते, मेट्रो आणि अन्य कामांसाठी प्रयत्न केले. येथील वाहतूक समस्या करण्यासाठी बापट साहेबांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे शहरात पहिल्यांदाच हिंजवडी ते शिवाजीनगर अशी मेट्रो संकल्पना मांडली. ही संकल्पना फक्त मांडली नाही तर याला मूर्त रूप देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माननीय फडणवीस साहेबांनी बापट साहेबांचा आग्रह न मोडता या मेट्रो मार्गाला परवानगी दिली. लवकरच या मार्गावर मेट्रो धावताना आपल्याला दिसेल. वाहतुकीच्या समस्यांबरोबरच त्या भागातील सुरक्षा व्यवस्था, कचरा प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आदी विषयांवर काम करणे सुरु केले. येथील मोठ्या गाड्या सगळ्या बेभरवशाच्या पातळीवर पार्क केल्या जात होत्या. त्याच्यासाठी योग्य तो समन्वय करणे आवश्यक होतं. बापट साहेबांना मी याबाबतची सगळी माहिती दिल्यानंतर आम्ही हिंजवडीतच आयटी पार्क असोसिएशन बरोबर सर्व संबंधित एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पीएमआरडी आणि महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांना बोलवून बैठका लावल्या. एक दोनदा नव्हे तर किमान चार वेळा बापट साहेब हिंजवडी मध्ये या कामासाठी स्वतः वेळ देऊन आले. यासंबंधित सर्व आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना या बैठकांसाठी बोलावून घेतले. अशा प्रकारची पहिली बैठक पालकमंत्र्यांनी इतक्या वर्षात या भागात केली. त्यातून हिंजवडीला कनेक्ट करणारे वेगवेगळे रस्ते, मेट्रोचा प्रकल्प या वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात झाली. आज आपण हिंजवडीच्या पट्ट्यात ही विकास काम वेगाने पूर्णत्वास आलेली आपण पाहत आहोत. त्यामुळे एक पुणे शहराचा हा अनेक वर्ष प्रलंबित असलेला, अडकून पडलेला विकास बापट साहेबांच्या आग्रही नेतृत्वामुळे पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. पुणे शहरात असलेला वाहतुकीचा ताण कमी कर��्यासाठी मेट्रो असावी हा सुद्धा विषय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात प्रलंबित होता. मात्र सत्तेत आल्यानंतर माननीय देवेंद्रजी यांनी जणू काही ‘पुणे मेट्रोचा’ आराखडाच तयार केला. यामध्ये पण बापट साहेबांचा महत्वाचा सहभाग होता. बापट साहेबांनी त्याच्यात जी काय महत्त्वाची भूमिका बजावली त्याला मी साक्षीदार आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पुणे मेट्रोसाठी गिरीश बापट कमिटी स्थापन करून याचा अहवाल द्यायला सांगितला. शहराच्या विकासाचा ध्यास असलेल्या बापट साहेबांनी एक महिन्यात त्याचा रात्रंदिवस अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर केला. यासाठी आम्ही रात्री एक- एक, दोन -दोन वाजेपर्यंत मुंबईच्या त्यांच्या शासकीय बंगल्यावर केलेल्या चर्चांना मी साक्षीदार आहे. तो अहवाल झाल्यानंतर दिल्लीतल्या बैठका, वेगवेगळ्या स्तरावरच्या मंत्रालयीन परवानगी यासाठी फडणवीस साहेबांनी विशेष प्रयत्न केले. हा समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री म्हणून बापट साहेबांनी जी काही धडपड केली यातून एक नेतृत्व कसं विकासाचं काम करू शकतो त्याचा एक खूप मोठा मूर्तिमंत उदाहरण असल्याचे मला जाणवले. अर्थमंत्री असताना अरुण जेटली यांच्याबरोबरची बैठक असो, त्याचप्रमणे पुढे जाऊन गडकरी साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली केंद्रातल्या परवानगी घेणे, राज्यातल्या सर्व गोष्टी देवेंद्रजींकडे आग्रहाने मागून त्यांच्याकडून तयार करून घेणे, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व आवश्यक तांत्रिक, आर्थिक या सगळ्या बाबींची पूर्तता तातडीने करून घेतल्याने पुण्याची मेट्रो आज उभी राहिलेली दिसते. यथावकाश तिचा विकास जसा होत राहील तशी पुण्यासाठी, पुणेकरांसाठी जवळपास २५ वर्ष प्रलंबित असलेली ही मेट्रो ज्यावेळेस धावायला लागेल, त्यावेळेस आपल्याला बापट साहेबांनी हे आपल्याला काय करून दिले त्याची खरी किंमत कळेल. पुण्याचे खासदार आणि त्याआधीही पालकमंत्री म्हणून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण असो वा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा द्यायचं असो त्यात समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बापट साहेबांनी निभावली. महापालिकेची मागची निवडणूक झाल्यानंतर आम्ही दिल्लीत गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बापट साहेबांनी आयोजित केली. त्यात सर्व विमानतळाशी संबंधित अधिकारी, विभाग यांचा समावेश होता. पुण्याच्या विमानतळावर जवळपास वार्षिक एक कोटीपर्यंत प्रवासी संख्या कोविडच्या आधी वाढली होती. या सगळ्या गर्दीला समन्वयाने व्यवस्थित सोयी सुविधा देण्यात यावे यासाठी जागेची गरज होती. आणि ती जागेची गरज बापट साहेबांनी गेल्या सहा वर्षात जे काम केलं तयार झाली. आज पुणे शहराच्या विमानतळाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं यात गडकरी साहेब आणि बापट साहेबांची फार मोठी भूमिका आहे ती आपल्याला पुणेगारांनी कायम लक्षात ठेवावे अशीच….. सुनील माने, भाजप पुणे शहर चिट��ीस महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Text
Jonathan Strange & Mr Norrell - Marathi Vocabulary
I finished reading this book last month, and it was a blast through and through.
It's a very long book, and a lot of its more interesting vocabulary borrows from the early 19th century, but I've compiled this vocab list based on the more common terms found through the book.
Characters:
Gilbert Norrell - गिल्बर्ट नॉरेल
Jonathan Strange - जॉनथन स्ट्रेंज
John Segundus - जॉन सेगन्डस
Sir Walter Pole - सर वॉल्टर पोल
Lady Emma Pole - लेडी एमा पोल
Arabella Strange - आराबेला स्ट्रेंज
Stephen Black - स्टीफन ब्लॅक
Vinculus - व्हिंक्युलस
Drawlight - ड्रोलाइट
Lascelles - लसेलेस
Honeyfoot - हनीफुट
Arthur Wellesley, Duke of Wellington - आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचे ड्यूक
John Uskglass - जॉन अस्कग्लास
The Gentleman - जेन्टल्मन
Childermass - चिल्डरमस (चिल्डरमॅस? चाइल्डरमॅस?)
Places and Events:
England - इंग्लंड [ iṅglaṅḍ ]
Venice - व्हेनिस [ vhenis ]
Padua - पादोव्हा [ pādovhā ]
London - लंडन [ laṅḍan ]
York - यॉर्क [ yŏrk ]
Peninsular War - द्वीपकल्पीय युद्ध [ dvīpakalpīya yuddha ]
Battle of Waterloo - वॉटर्लूची लढाई [ vŏṭarlūcī laḍhāī ]
Vocabulary:
magic - जादू [ jādū ]
magician - जादूगार [ jādūgār ]
English (not language) - इंग्रज [ iṅgraz ]
library - ग्रंथालय [ graṅthālay ]
book - पुस्तक [ pustak ]
fairy - परी [ parī ]
spell - मंत्र [ maṅtra ]
king - राजा [ rājā ]
servant - नोकर [ nokar ]
society (of certain people) - मंडळ [ maṅḍaḷ ]
mirror - आरसा [ ārsā ]
darkness - अंधार [aṅdhār], काळोख [kāḷokh]
letter - पत्र [ patra ]
illusion - भास [ bhās ]
finger - बोट [ boṭ ]
#marathi#langblr#languages#books#jonathan strange and mr norrell#marathi vocabulary#learn marathi#vocabulary#indian languages#vocab
11 notes
·
View notes
Text
काळ्या इंग्रजांपासून देशाची सुटका करा - नवज्योत सिंग सिद्धू
काळ्या इंग्रजांपासून देशाची सुटका करा – नवज्योत सिंग सिद्धू
काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे. हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांनी गोऱ्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. इंदूरवासियांनो तुम्ही काळया इंग्रजांपासून देशाला मुक्ती मिळवून देणार आहात. असे वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले आहे. ते इंदूरमध्ये बोलत होते.
काळे इंग्रज म्हणत सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला. काळे इंग्रज म्हणजेच…
View On WordPress
#BJP#INC#latest marathi news#loksabha election 2019#navjyot singh sidhu#इंग्रज#काँग्रेस#नवज्योत सिंग सिद्धू#भाजप
0 notes
Text
लाल किल्ल्याचा मालक शेतकरीच.. शेतकऱ्यांचे गर्जन गीत Shetkari Garjan Geet
नवीन लेख : शेतकरी गर्जन गीतशेतकरी कधी गरजत नाही आणि बरसतही नाही. संबंध शेतीचा इतिहास जरी चाळून बघितला तर १९८० नंतरचा काही काळ सोडला तर शेतकरी गरजताना आढळल्याच्या पाऊलखुणा इतिहासातही आढळत नाहीत.शेतकरी देशाचा मालक पण निव्वळ नामधारी. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या वाट्याला निव्वळ हलाखीचे आणि लाचारीचे जिणे वाट्यास येत असल्याच्या नियमिततेने इतिहास भरून पावला आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत "गोरे जाऊन काळे इंग्रज http://gangadharmute.blogspot.com/2022/10/shetkari-garjan-geet.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गंगाधर मुटे's
0 notes
Text
मराठीची दैना झाली
शब्दांचा होतो गोंधळइंग्रजीचा डंका भारी ।मराठी बिचारी शांत कितीसोसते ती इंग्रजीची स्वारी । इंग्रज जरी गेलेत सोडूनइंग्रजी आमची सुटली नाही ।मराठीचे ती धरते पायसरसावून आपल्या दोन्ही बाही । मराठी तर चाकर बिचारीबॉस तिचा तर इंग्रजी झाला ।सहन करते अत्याचार सारेदिवस तिच्या लाचरिचा आला । दैना झाली हो या मराठीचीतुटून फुटून आता जगत आहे ।द्याना तिला आधार थोडासगळे तुमच्याच हातात आहे ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Bhagat Singh : देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटाळणारे थोर क्रांतीकारकांना विसरुन कसे चालेल - हेमंत बल्लाळ
#Bhagat Singh : देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटाळणारे थोर क्रांतीकारकांना विसरुन कसे चालेल - हेमंत बल्लाळ #Mukundnagar #Ahmednagar
(Photo Vijay Mate Ahmednagar) Bhagat Singh : भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना हुतात्मा स्मरण मंचतर्फे अभिवादन Bhagat Singh : अहमदनगर (दि २५ मार्च २०२२) प्रतिनिधी – भारतमातेसाठी बलिदान देणार्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात, कारण इंग्रज अधिकारी सँडर्स यांच्या जाचातून मुक्तता करणार्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटाळणार्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या वर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागू करण्याची, तसंच भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेल्या पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटं, बॅटरी-संचलित कार सेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशी शिफारस करण्यात आली होती.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौ-यावर असून, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न रोखत सैन्यानं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं. काल रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांपैकी दोघांना मारल्यानंतर या परिसरात शोध मोहीम स��रू असून, सैन्यानं या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूरसारख्या दुर्दैवी घटना रोखण्याच्या अनुषंगानं या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर मंत्री पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या हदगाव तालुक्याला भेट दिली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारनं सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नांदेडच्या दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे परभणी भागातल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
****
स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱया नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणार्या बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछुट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
भारतीय गिधाड, या धोक्यात असलेल्या आणि विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्षी प्रजातीसाठी नागपूरच्या पेंच अभयारण्यात जटायू ग्राम मित्र, हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये, गावातले पशुपालक आणि इतर लोक जंगलातल्या एका विशिष्ट ठिकाणी नैसर्गिकरीत्या मरण पावलेल्या पशुपक्षांचे मृतदेह टाकतील, ज्यामुळे गिधाडांना अन्न मिळणं न��श्चित होईल. पशुपक्षांचे मृतदेह ठरलेल्या ठिकाणी नेऊन टाकण्या-या लोकांना वाहतुकीचा खर्च दिला जाणार आहे. हा प्रकल्प सध्या एक वर्षासाठी राबवण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात साडे ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून तीन हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी, कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन जायकवाडी धरणाच्या नियंत्रण कक्षानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मांजरा धरणात ५३ पूर्णांक ३४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातुर शहरासह बीड जिल्ह्यातल्या केज, अंबाजोगाई तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरासह, मांजरा धरणावर आधारित असलेल्या शेतीसह सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.
****
0 notes
Text
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणा देत राहील - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सदैव प्रेरणा देत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली
मुंबई, दि. ५ :- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात दिलेले योगदान तसेच देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहील, अशा…
View On WordPress
0 notes
Text
Subhash Wankhede on Modi Government | मोदी सरकारपेक्षा इंग्रज बरे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जहाल प्रतिक्रिया
Subhash Wankhede on Modi Government | मोदी सरकारपेक्षा इंग्रज बरे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जहाल प्रतिक्रिया
Subhash Wankhede on Modi Government | मोदी सरकारपेक्षा इंग्रज बरे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जहाल प्रतिक्रिया Subhash Wankhede on Modi Government | इंग्रज सरकार मोदी सरकारपेक्षा बरे असल्याची घणाघाती टीका माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे. Subhash Wankhede on Modi Government | इंग्रज सरकार (British Ruler) मोदी सरकारपेक्षा (Modi Government) बरे असल्याची घणाघाती टीका हिंगोलीचे माजी…
View On WordPress
#government#modi#subhash#wankhede#आजची बातमी#आताची बातमी#इंग्रज#खासदार#जहाल#��ळक बात��ी#ताजी बातमी#प्रतिक्रिया#बरे#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#माजी#मोदी#यांची#राजकारण#वानखेडे#सरकारपेक्षा#सुभाष
0 notes
Photo
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन एका पोर्तुगीज इतिहासकाराने केले आहे त्या परिच्छेदाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे..., गूढ आणि अद्भुतरम्य, साहसप्रेमी आणि धाडसी, नशीबवान, एक भटका सरदार, आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर, लाघवी चर्या, मनमिळावू आणि सौजन्यशील स्वभाव, शिकंदराप्रमाणे शरणांगतांना औदार्याने वागविणारा, उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा, झटपट निर्णय घेणारा, ज्युलियस सीझरप्रमाणे विजिगीषु, कृती करणारा, दृढनिश्चयी आणि शिस्तप्रेमी, निष्णात डावपेची, विजापूरचे तुर्क, पोतुगीज, इंग्रज, डच आणि फ्रेंच ह्या प्रतिस्पर्ध्यांशी मोठ्या चातुर्याने राजकारण खेळणारे.. शिवाजी महाराजांनी आशिया खंडातील त्या काळच्या सर्वात मोठ्या मोगली स��्तेची पर्वा न करता, विजापूरकरांशी झुंज देऊन एक मोठे साम्राज्य (𝐔𝐌 𝐆𝐑𝐀𝐍𝐃𝐄 𝐈𝐌𝐏𝐄𝐑𝐈𝐎) स्थापन केले..... ➖➖➖➖➖➖➖➖ चित्रकार : Unknown... (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CTgNRfni2r-/?utm_medium=tumblr
0 notes
Text
मोदीजी तुमचे ‘आजी- आजोबा’ इंग्रजांसोबत होते - कपिल सिब्बल
मोदीजी तुमचे ‘आजी- आजोबा’ इंग्रजांसोबत होते – कपिल सिब्बल
राहुल गांधी यांच्या आजी- आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकली होती का?, असा प्रश्न विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिराकूड धरण, सरदार सरोवर धरण आणि भाकरा धरण हे कोणी बांधले होते ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी मोदींना केला आहे. तुमच्या पक्षातील ‘आजी-आजोबां’नी इंग्रजांशी हातमिळवणी केली. पण मोदींना हे माहित नसावे, अशा शब्दात…
View On WordPress
0 notes
Text
कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता? नव्या पुस्तकावरून नवा वाद
कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता? नव्या पुस्तकावरून नवा वाद
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : कोरेगाव भीमातला विजय स्तंभ म्हणजे इंग्रज सैन्याकडून लढताना भीमपराक्रम गाजवणाऱ्या महार सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगणारा ऐतिहासिक वारसा. या लढाईत इंग्रजांचा विजय झाला आणि मराठ्यांचा पराभव. मात्र हे वास्तव नाही. कोरेगाव भीमाची लढाई पेशव्यांच्या विरोधात नव्हती, असा दावा ‘१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे…
View On WordPress
#Pune#Ad Rohan Jamadar Malvadkar#Controversy#Fight against Peshwas#Koregaon Bhima new Book#Koregoan Bhima#mahar battalion#New Book#Vijay Stambha
0 notes
Text
editorial on pm modi blames previous governments for fuel price hike abn 97 | आजार आणि औषध
editorial on pm modi blames previous governments for fuel price hike abn 97 | आजार आणि औषध
खनिज इंधनावरील अवलंबित्व आयातीनेच भागवावे लागते, यामागे सत्ताधारी कोण होते वा त्यांनी स्वयंपूर्णतेचा विचार केला का यासारखी कारणे असू शकत नाहीत.. ‘दीडशे वर्षांच्या इंग्रज राजवटीने तेल उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याने आपली दुरवस्था आहे’, असे सांगण्याची पळवाट नेहरूंनी कधी वापरल्याची नोंद नाही.. अन्य कोणा येरागबाळ्याने ही विधाने केली असती तर ती हास्यास्पद ठरून दुर्लक्षयोग्य मानणे शहाणपणाचे ठरले असते.…
View On WordPress
0 notes
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०
****
· अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीर सज्ज
· आयुर्वेद आणि योग या सारख्या स्वदेशी चिकित्सा प्रणालींना आधुनिक चिकित्सा पद्धतींशी एकीकृत करा- मनसुख मांडविया यांचं आवाहन
· महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागील जनगणनेनुसार प्रभागाची संख्या निश्चित करण्याचे नगर विकास विभागाचे आदेश
आणि
· राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधली सभेसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माहिती
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उद्यापासून ९५ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत असून संमेलनस्थळ ‘भारतरत्न लता मंगेशकर साहित्यनगरी’ यासाठी सज्ज झाली आहे. उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून त्याआधी सकाळी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो, स्वागताध्यक्ष पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्री अशोक चव्हाण, सुभाष देसाई, अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.या संमेलनासाठी, देशभरातल्या सुमारे एक हजारावर मराठी साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी सात विचारपीठ उभारण्यात आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची भाषणं, विविध विषयांवर परिसंवाद, निमंत्रितांचं कविसंमेलन, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान, उदगीर इथं २३ आणि २४ ��प्रिलला विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलाची तयारी सुरु असून, शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. संमेलनस्थळाला महात्मा बसवण्णा वचन साहित्यनगरी, असं नाव देण्यात आलं आहे.
****
आयुर्वेद आणि योग या सारख्या स्वदेशी चिकित्सा प्रणालींना आधुनिक चिकित्सा पद्धतींशी एकीकृत करण्याच्या आवश्यकतेवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भर दिला आहे. त्यांनी आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान अकादमीच्या बासष्टाव्या वर्धापन दिन समारंभात मार्गदर्शन केलं, त्यावेळी मांडविया बोलत होते. संशोधन आणि नवीकरणावर अधिक भर दिला पाहिजे असं आवाहन करताना त्यांनी संशोधक आणि अकादमींना या क्षेत्रात खासगी क्षेत्राबरोबर सहकार्यासाठी प्रोत्साहन यावेळी दिलं.
****
‘महाराष्ट्र’या आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्याची शपथ घेऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागरी सेवेतल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिना निमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानमधील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. दफ्तर दिरंगाई, लाल फीत या सारखे शब्द खोडून काढायाला हवेत. नागरिकांना त्यांचे हक्त सजतेने मिळायला हवेत, असं ते म्हणाले. राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवताना सर्वांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून काम केलं पाहिजे. ही निष्ठा राज्य, देश आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असली पाहिजे, असंही ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.
****
सध्या मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागील जनगणनेनुसार प्रभागाची संख्या निश्चित करावी, असे आदेश नगर विकास विभागानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचना निश्चित करून त्याचा प्रारूप आराखडा तयार करण्याचं काम सुरू करावं, असंही या आदेशात नमुद करण्यात आलं आहे. विविध महापालिका आयुक्तांनी या आदेशांच्या पार्श्वभूमीवर त्यादृष्टीनं कार्यवाही सुरू केल्याचं वृत्त आहे. सध्या मुदत संपलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त आहे. सहा महिन्यांसाठीच ही मुदतवाढ असल्यानं आणि प्रायोगिक तत्त्वावर माहिती संकलनाचं कामही आता अंतिम टप्प्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागानं हे आदेश दिले आहेत.
****
अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं जी दंगलीची स्थिती निर्माण झाली त्याला राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अमरावती जिल्ह्यात इंग्रज राज���टीप्रमाणं पोलिसांचं राज्य चालू असुन, दोन समाज आता ��कमेकांसमोर उभे राहिल्यानं वाईट स्थिती निर्माण झाली असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.
****
काही दिवसांपूर्वी अंतराळातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशच्या काही भागांत अवशेष कोसळले होते. ते अवशेष उपग्रह वाहून नेणाऱ्या अवकाशयानाचे असून, ते चीनच्या यानाचेच आहेत, असा निष्कर्ष पुणे विद्यापीठातल्या ‘आयुका’ संस्थेनं काढला आहे. गेल्या दोन एप्रिल आणि त्यानंतर काही दिवस काही भागांमध्ये अंतराळातून पेटते अवशेष आगीच्या लोळाच्या रुपात कोसळले होते. अवकाशातून कोणत्या देशाच्या रॉकेटचे यंत्र त्या परिघातून जाणार होते, याचा अभ्यास करुन हे अवशेष चीनच्या यानाचेच आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
****
सामाजिक न्याय मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या रेणू शर्मा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान आपल्याला आंतरराष्ट्रीय दूरद्धनी क्रमांकावरुन संपर्क साधून खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बलात्काराची तक्रार तसंच सामाजिक संपर्क माध्यमावर बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती, असं मुंडे यांनी या संदर्भातल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथं एक मे रोजी होणाऱ्या सभेला विरोध झाला तरी ही सभा होणारच, असं पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत या संदर्भातलं निवेदन दिलं. शहरातल्या काही संघटनांनी या सभेला विरोध दर्शविला आहे. सभेच्या परवानगीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचं नमूद करताना परवानगी मिळेल असा विश्र्वास धोत्रे यांनी व्यक्त केला.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या बेलथर इथं २५ तारखेला होणारा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण पथकाला यश आलं. याठिकाणी बालविवाह होणार असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्याच्या जननी पथकास आणि बाल संरक्षण पथकाला मिळाल्यानंतर पथकानं मुलीच्या आई वडीलाचं समुपदेशन करत त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेऊन हा बालविवाह रोखला आहे.
****
गजानन सहकारी कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर यांच्या पत्नी तसंच बीड विधानसभा मतदारसंघाचे ��मदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखा क्षीरसागर यांच्या पार्थिव देहावर नवगण राजूरी इथं आज अंत्���संस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी त्यांचं हृदयविकारानं निधन झालं होत. हजारोंच्या उपस्थितीमध्ये आज टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
****
0 notes