Tumgik
#आयोगासमोर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगासमोर आजच्या सुनावणीत काय घडलं?
धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगासमोर आजच्या सुनावणीत काय घडलं?
धनुष्यबाण कुणाचा? निवडणूक आयोगासमोर आजच्या सुनावणीत काय घडलं? नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आज शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आयोगासमोर उपस्थिती लावली. आज ठाकरे (Thackeray) गट आणि शिंदे गट या दोघांकडूनही जबरदस्त युक्तिवाद होण्याची चिन्ह होती, मात्र आज फक्त पाच ते सात मिनिटं हे प्रकरण आयोगासमोर चाललं. मुख्य…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरप्रादेशिक बातम्यादिनांक: १६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्प्यात, भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यात तसंच कल्याणमध्ये सभा
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान
मुंबईत कोसळलेल्या फलकाच्या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू
      आणि
फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकपटू निरज चोप्राला सुवर्ण पदक
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार येत्या शनिवारी संपणार असून, या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं सभा घेतली. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्राचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांवर कडाडून टिका केली.
नाशिक मधल्या कांद्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची योजना सुरु केल्याचं सांगितलं. कांद्यासह इतर पिकांसाठी सरकार ऑपरेशन ग्रीन राबवत असून, कांद्याच्या वाहतुकीसाठी अनुदान दिलं जाईल, असं ते म्हणाले.
त्यानंतर मोदी यांनी कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेला संबोधित केलं.
मुंबईत घाटकोपर इथ मोदी यांनी काल रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, उमेदवार मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल दिंडोरी लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी वणी इथं सभा घेतली. तसंच त्यांनी मुंबईत कांजुर मार्ग इथंही प्रचारात सहभाग घेतला.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक इथं सभा घेतली. इलेक्टॉरल बॉण्ड हा सर्वांत मोठा घोटाळा असून, याबाबत खुली चर्चा करण्याचं आव्हान सरकारला देत असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं, काँग्रेस आणि इंडिया आघाडी कडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री एस.जयशंकर, जी.किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश होता. आदर्श आचारसंहिता भंगाची २२ उदाहरणं आयोगासमोर ठेवली असून, त्यावर त्वरित कारवाईची मागणी केल्याचं जयशंकर यांनी ���ा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यातल्या नारायणगावमध्ये पोलीसांनी धाड टाकून ७० जणांना अटक केली. परदेशासह देशातल्या इतर राज्यात धाडी टाकल्यानंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच काम नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं हवाला त्यांनी केल्याचं अंमलबजावणी संचालयानलयानं केलेल्या तपासात उघड झालं आहे.
****
सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत काल पहिल्यांदा १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप झालं. या कायद्याच्या अंतर्गत अर्ज केलेल्या या व्यक्तींना केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी ही प्रमाणपत्र सुपूर्द केली. या अधिसूचनेनुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तींनी नागरिकत्वासाठी अर्ज करायचे होते.
****
मुंबईतल्या घाटकोपर मध्ये छेडा नगर परिसरात कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसंच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं.
****
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातले विनापरवानगी, अनधिकृत फलक तत्काळ काढून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची तक्रार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचं निदर्शनास आलं असल्याचं नाईक यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. 
****
राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाळला जात आहे. त्यानिमित्त आज आरोग्य विभागाच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणुकीचं भांडं आठवड्यातून एकदा रिकामं आणि कोरडं करुन भरावं, एक दिवस कोरडा पाळण्यात यावा, आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, असं आवाहन, लातूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांनी केलं आहे.
****
आगामी काळातल्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. पाणी टंचाई आढावा बैठकीत काल ते बोलत होते. आवश्यकता भासल्यास विहीर-कुपनलिकांचं अधिग्रहण करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा जिल्हाधिकारी गावडे यांनी आढावा घेतला.
****
जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता असून, या कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिला. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
आगामी खरीप हंगामात शेतकर्यांनी अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी आणि लागवड करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी आणि बियाणे विक्री परवानाधारकांकडुनच कापुस बी.टी.बियाणे पावतीसह खरेदी करावे, असं त्यांनी सांगितलं आहे. फसवणूक तसंच बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पहिल्या टप्यातल्या वैद्यकीय विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परिक्षा येत्या १८ मे पासून सुरु होणार आहेत. राज्यातल्या एकूण ३९ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परिक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून, ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन’ आणि ‘महात्मा गांधी मिशन’तर्फे आयोजित जिगीषा नाट्यसहवास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीपासून जिगीषा तर्फे मिलिंद सफई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावर्षीचा पुरस्कार लेखक-दिग्दर्शक-अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
****
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात काल ��्थिर सर्वेक्षण पथक - एसएसटीनं कल्याण रेल्वे स्थानकातून सात लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. कल्याण रेल्वे स्थानकात जयेश पोटे याच्या जवळील बॅगेची तपासणी केली असता, त्याच्याकडे ही रोकड आढळली. या रोख रक्कमेबाबत त्याला योग्य प्रकारे उत्तरं न देता आल्यानं, ही रोकड पथकाकडून जप्त करण्यात आली.
****
भुवनेश्वर इथं झालेल्या फेडरेशन चषक २०२४ स्पर्धेत भालाफेकपटू निरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावलं. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज दुसऱ्या स्थानावर होता, मात्र चौथ्या फेरीत ८२ पूर्णांक २७ मीटर अंतरावर भाला फेकत त्याने अव्वल स्थान पटकावलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द, नायगव्हाण, जरुळ, आणि भादली इथं काल संध्याकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रं उडाली, तसंच काही ठिकाणी झाडं उन्मळुन पडली.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
Ajit Pawar | बिग ब्रेकींग! अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष; याबाबतचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल
Tumblr media
Ajit Pawar | अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. काही वेळापूर्वीच ही मोठी बातमी दिली आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र, अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या आमदारांपेक्षा जास्त आहे. निवणुक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत याबाबतच्या ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हे पत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या अर्जात अजित पवार यांच्या गटाने दावा केला आहे की, प्रफुल्ल पटेल यांनी 30 जून रोजी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अजित यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. म्हणजेच अजित पवार यांच्या छावणीने त्यांना राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष घोषित केले आहे. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळावर दावा व्यक्त केला आहे.
निवडणूक चिन्हावर दावा
निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या याचिकेत अजित पवार गटाने दावा केला आहे की, राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 30 जून रोजी मुंबईत झाली होती. यामध्ये अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह आमच्याकडे आहे, ते कुठेही जाणार नाही, असे सांगितले. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ते जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. पक्षाचे चिन्ह आम्ही कोणालाही घेऊ देणार नाही. अजित पवार हे खोटे नाणे निघाले.
अजित पवार म्हणाले…
अजित पवारांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना शरद पवारांना राजकारणात राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार म्हणाले, “तुमचे वय 83 आहे. तुम्ही कधी थांबणार की नाही? आम्ही सरकार चालवू शकतो. आमच्याकडे सत्ता आहे. मग आम्हाला संधी का देत नाही?” अजित पवार म्हणाले, “मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे. राज्याचे भले करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षपद मिळणे आवश्यक आहे. तरच मी महाराष्ट्राचे भले करू शकेन.” वेगळे होण्याचा निर्णय घेतलेल्या आमदारांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नाही. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराची होणार ओळखपरेड
शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराची होणार ओळखपरेड
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात 12 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर असतील. सूत्रांकडून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
भारतमुक्ती मोर्चाचे निषेध मालिका आंदोलन सुरु
भारतमुक्ती मोर्चाचे निषेध मालिका आंदोलन सुरु
कोरेगाव-भीमा दंगल चौकशीत पुराव्यात छेडछाड प्रकरण उप जिल्हाधीकारी श्री. भडकवाड याना दिले निवेदन प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी आयोगासमोर पोलिसांनी पुरावे म्हणून दाखल केलेले व्हिडिओ, सीसीटिव्ही फुटेज छेडछाड करून सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने १८ जुलै पासून निषेध मालिका आंदोलन सुरू केले आहे. या अनुषंगाने राज्यपाल यांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? हा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला, उद्धव गट म्हणाले- आमचे मत जाणून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? हा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला, उद्धव गट म्हणाले- आमचे मत जाणून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (फाइल फोटो). इमेज क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) शिवसेनेने निवडणूक आयोगासमोर कॅव्हेट दाखल केले आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण किंवा निवडणूक चिन्हाबाबत आमचे मत जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशा शब्दांत आवाहन या सावधगिरीत करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले कारण शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार उद्धव ठाकरे (उद्धव ठाकरेछावणी सोडल्यानंतर एकनाथ शिंदे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका
पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका
पुणे, दि. 21 : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवाधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर  मोठ्या प्रमाणात  विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक-प्रतिनिधींनी उपस्थित राहून यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले. सर्वोच्च…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी
Thackeray vs Shinde : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची?, निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी Thackeray vs Shinde On Shiv Sena : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे. त्यामुळं आता पक्षावर हक्क कोणत्या गटाचा असणार, याबाबत निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे. Thackeray vs Shinde On Shiv Sena : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार अंतिम टप्प्यात, भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यात तसंच कल्याणमध्ये सभा
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान
मुंबईत कोसळलेल्या फलकाच्या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू
      आणि
फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकपटू निरज चोप्राला सुवर्ण पदक
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार येत्या शनिवारी संपणार असून, या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात येत्या २० तारखेला मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं सभा घेतली. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्राचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांवर कडाडून टिका केली.
नाशिक मधल्या कांद्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची योजना सुरु केल्याचं सांगितलं. कांद्यासह इतर पिकांसाठी सरकार ऑपरेशन ग्रीन राबवत असून, कांद्याच्या वाहतुकीसाठी अनुदान दिलं जाईल, असं ते म्हणाले.
त्यानंतर मोदी यांनी कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेला संबोधित केलं.
मुंबईत घाटकोपर इथ मोदी यांनी काल रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, उमेदवार मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल दिंडोरी लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी वणी इथं सभा घेतली. तसंच त्यांनी मुंबईत कांजुर मार्ग इथंही प्रचारात सहभाग घेतला.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक इथं सभा घेतली. इलेक्टॉरल बॉण्ड हा सर्वांत मोठा घोटाळा असून, याबाबत खुली चर्चा करण्याचं आव्हान सरकारला देत असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं, काँग्रेस आणि इंडिया आघाडी कडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री एस.जयशंकर, जी.किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश होता. आदर्श आचारसंहिता भंगाची २२ उदाहरणं आयोगासमोर ठेवली असून, त्यावर त्वरित कारवाईची मागणी केल्याचं जयशंकर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचा ��ढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यातल्या नारायणगावमध्ये पोलीसांनी धाड टाकून ७० जणांना अटक केली. परदेशासह देशातल्या इतर राज्यात धाडी टाकल्यानंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच काम नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं हवाला त्यांनी केल्याचं अंमलबजावणी संचालयानलयानं केलेल्या तपासात उघड झालं आहे.
****
सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत काल पहिल्यांदा १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप झालं. या कायद्याच्या अंतर्गत अर्ज केलेल्या या व्यक्तींना केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी ही प्रमाणपत्र सुपूर्द केली. या अधिसूचनेनुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तींनी नागरिकत्वासाठी अर्ज करायचे होते.
****
मुंबईतल्या घाटकोपर मध्ये छेडा नगर परिसरात कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले आहेत. या सुट्या भागांसह राडारोडा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसंच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्यरत आहेत. १३ तारखेला झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं.
****
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातले विनापरवानगी, अनधिकृत फलक तत्काळ काढून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी, लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप झालं असल्याची तक्रार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांनाच मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचं निदर्शनास आलं असल्याचं नाईक यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. 
****
राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाळला जात आहे. त्यानिमित्त आज आरोग्य विभागाच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणुकीचं भांडं आठवड्यातून एकदा रिकामं आणि कोरडं करुन भरावं, एक दिवस कोरडा पाळण्यात यावा, आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, असं आवाहन, लातूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांनी केलं आहे.
****
आगामी काळातल्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. पाणी टंचाई आढावा बैठकीत काल ते बोलत होते. आवश्यकता भासल्यास विहीर-कुपनलिकांचं अधिग्रहण करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा जिल्हाधिकारी गावडे यांनी आढावा घेतला.
****
जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता असून, या कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिला. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
आगामी खरीप हंगामात शेतकर्यांनी अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी आणि लागवड करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केलं आहे. गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी आणि बियाणे विक्री परवानाधारकांकडुनच कापुस बी.टी.बियाणे पावतीसह खरेदी करावे, असं त्यांनी सांगितलं आहे. फसवणूक तसंच बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पहिल्या टप्यातल्या वैद्यकीय विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परिक्षा येत्या १८ मे पासून सुरु होणार आहेत. राज्यातल्या एकूण ३९ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परिक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून, ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन’ आणि ‘महात्मा गांधी मिशन’तर्फे आयोजित जिगीषा नाट्यसहवास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीपासून जिगीषा तर्फे मिलिंद सफई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावर्षीचा पुरस्कार लेखक-दिग्दर्शक-अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
****
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात काल स्थिर सर्वेक्षण पथक - एसएसटीनं कल्याण रेल्वे स्थानकातून सात लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. कल्याण रेल्वे स्थानकात जयेश पोटे याच्या जवळील बॅगेची तपासणी केली असता, त्याच्याकडे ही रोकड आढळली. या रोख रक्कमेबाबत त्याला योग्य प्रकारे उत्तरं न देता आल्यानं, ही रोकड पथकाकडून जप्त करण्यात आली.
****
भुवनेश्वर इथं झालेल्या फेडरेशन चषक २०२४ स्पर्धेत भालाफेकपटू निरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावलं. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज दुसऱ्या स्थानावर होता, मात्र चौथ्या फेरीत ८२ पूर्णांक २७ मीटर अंतरावर भाला फेकत त्याने अव्वल स्थान पटकावलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द, नायगव्हाण, जरुळ, आणि भादली इथं काल संध्याकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रं उडाली, तसंच काही ठिकाणी झाडं उन्मळुन पडली.
****
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर शिवसेना आणि मनसेने मांडली भूमिका https://prasidhipramukh.in/?p=9239
0 notes
darshaknews · 3 years
Text
Parambir Singh : परमबीर सिंह सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार
#Parambir Singh : परमबीर सिंह सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार #Mumbai #Police #Maharashtra
Param-Bir-Sing Parambir Singh : मुंबई (दि २७ नोव्हेंबर २०२१) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित झाल्यानंतर तब्बल २३१ दिवसांनी हे गुरूवारी मुंबईत आले.चांदीवाल चौकशी आयोगाने दिलेल्या इशाऱ्यानंतर येत्या सोमवारी आयोगासमोर हजर राहण���र आहेत. परमबीर सिंह यांच्या वकिलांनीच ही माहिती आयोगाला दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
कोरेगाव भीमा: गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल - आयोग
कोरेगाव भीमा: गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल – आयोग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केली असतानाच या मागणीवर आयोगाने भूमिका स्पष्ट केली. आयोगाला वाटले आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कोणत्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. मात्र तुर्तास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावणे योग्य ठरणार नसल्याचे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने मांडले…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगासमोर हजर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार चौकशी आयोगासमोर हजर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
शरद पवार सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आपले म्हणणे नोंदवण्यासाठी शरद पवार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरण (भीमा कोरेगाव प्रकरण) न्यायिक चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पोहोचले आहेत. मिळालेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर शिवसेना आणि मनसेने मांडली भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर शिवसेना आणि मनसेने मांडली भूमिका
मुंबई, दि. १२ : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्यांच्या पक्षाची यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले. सर्वोच्च…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Thackeray Vs Shinde गटातील वादावर निवडणूक आयोगासमोर १२ डिसेंबरला सुनावणी, ‘धनुष्यबाण’चा होणार फैसला
Thackeray Vs Shinde गटातील वादावर निवडणूक आयोगासमोर १२ डिसेंबरला सुनावणी, ‘धनुष्यबाण’चा होणार फैसला
Thackeray Vs Shinde गटातील वादावर निवडणूक आयोगासमोर १२ डिसेंबरला सुनावणी, ‘धनुष्यबाण’चा होणार फैसला Shivsena Symbol Dispute : खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाणावर कोणाचा हक्क यावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.  Shivsena Symbol Dispute : खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाणावर कोणाचा हक्क यावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.  Go to…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·      ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं गोव्यात दिमाखदार सोहळ्यात उद्‌घाटन;अभिनेत्री माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्कारानं गौरव 
·      राज्यातली आठ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न-मुख्यमंत्री
·      जायकवाडी पाणी प्रश्नी छत्रपती संभाजीनगर इथं सर्वपक्षीय आंदोलन
आणि
·      ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचा शिवराज राक्षे याला विजेतेपद
सविस्तर बातम्या
५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचं काल गोव्यात पणजी इथं दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं. भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांसाठी प्रोत्साहनपर निधीत वाढ करण्याची घोषणा ठाकूर यांनी यावेळी केली. या उद्‌घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सनी देओल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर यंदा २७० पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये भारतातील २५ फीचर फिल्म आणि २० बिगर फीचर फिल्म्सचा समावेश आहे. 'कॅचिंग डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटाने या प्रदर्शनाला प्रारंभ झाला.
दरम्यान, ठाकूर यांच्या हस्ते फिल्म बाजारचंही उद्‌घाटन झालं. या संदर्भात बोलताना ते म्हणाले....
Byte…
फिल्म बाजार साऊथ ईस्ट एशिया का ही नही अब दुनिया के बडे बाजारों मे से एक है। और ये फिल्म बाजार के बढते हुये कदम मेडिया अँड एंटरटेनमेंट के लिये अच्छे कदम भी है। मुझे पूर्ण आशा है, जिस तरह से हजारो पिक्चरों का इस बार सबमिशन हुआ है इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल के लिये, ये लगातार इफ्फि के बढते कदम को दिखाता है।
****
भंडारा इथं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. राज्यातली आठ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणुक आयोगासमोर पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्या गटानं सादर केलेली प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा दावा शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणी आज पुन्हा सुरू होणार आहे. नार्वेकर यांनी गेल्या दोन तारखेला या प्रकरणी शिवसेनेच्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत, निकाल राखून ठेवला होता.
****
धनगर आरक्षणासाठी राज्यसरकारकडून अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची ही समिती येत्या तीन महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करेल.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पहिल्या टप्प्यात सोळा गावांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. सोमवारी बोधडी आणि थारा इथं ही यात्रा पोहोचली. संकल्प रथाच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या संकल्प रथाचे अंगणवाडी बालक, शालेय विद्यार्थी तसंच गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या योजनांच्या लाभार्थ्यांनी नागरिकांना योजनांचं लाभ घेण्याचं आवाहन केलं. पृथ्वी पडियार तसंच अशोक गाडेकर यांनी आपलं मनोगत या शब्दांत कथन केलं...
बाईट - पृथ्वी पडियार आणि अशोक गाडेकर
यावेळी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव वैद्यकीय अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड, विस्तार अधिकारी एन. एम. मुकणार यांनी गावकऱ्यांना योजनांची माहिती दिली. दरम्यान ही संकल्प यात्रा आज मंगळवारी जलधारा आणि नंदगाव तांडा इथं पोहोचणार आहे.
****
समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार, जायकवाडी धरणात, अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर काल मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात दाखल अर्जांवर आज सुनावणी होणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळाने बस चालकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई केली आहे. या नियमाचा भंग केल्यास कडक कारवाईचे निर्देश एसटी महामंडळानं दिले आहेत.
****
भारताच्या सहा खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल प्रसिद्ध केलेल्या संघात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विराट कोहली, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या भारतीय क्रिकेटपटूंसह दक्षिण आफ्रिकेचा गेलार्ड कोएत्जी आणि क्विंटन डिकॉक, न्यूझीलंडचा डेरेल मिशेल, श्रीलंकेचा दिलशान मधुशंका, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झाम्पा यांचा  समावेश आहे.
****
नांदेडचा शिवराज राक्षे हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. धाराशिव इथं झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल गादी गटातून झालेल्या लढतीत शिवराज राक्षे तर माती गटातून नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विजयी झाले. या दोघांमध्ये झालेल्या केसरी किताबाच्या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षे ६-० गुणांनी विजयी झाला. स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील आणि मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील यांच्या हस्ते राक्षे याला महाराष्ट्र केसरी किताब आणि महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी तसंच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. उपविजेता ठरलेला हर्षवर्धन सदगीर याला महिंद्रा ट्रॅक्टर आणि लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षी पासून देण्यात येणारी चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. २३९ केंद्रांवर या परीक्षा होणार असून, संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी ३२ भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करून, रेशीम शेती परिसरात क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. काल लातूर इथं ‘महा रेशीम अभियान २०२४’ अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्ह्यात २० डिसेंबर पर्यंत महा रेशीम अभियान राबवलं जात आहे.
****
वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी परभणी इथले प्र��थमिक शिक्षक विनोद शेंडगे यांनी सायकलने परभणी ते नागपूर प्रवास केला. काल सायंकाळी नागपूर इथं पोहाचल्यावर त्यांचा शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक शाळा, ग्रंथालय आणि खेड्यातील कुटुबांना भेटी देऊन वाचनाचं महत्त्व पटवून दिलं.
****
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अती उच्चदाब वाहिनीच्या कामामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक आज आणि उद्या दोन दिवस दुपारी १२ ते ४ यावेळात बंद असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी ही माहिती दिली. उर्वरित वेळी वाहतुक सुरळीत सुरु राहणार असून बंद काळात पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळवली असल्याचंही संचालकांनी कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून कुष्ठरोग आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरूवात झाली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ.एस.एन.हालकुंडे यांनी ही माहिती दिली. या मोहिमेत जिल्ह्यातल्या २९ लाख ४१ हजार ५५० नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असून ही मोहीम सहा डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. 
****
0 notes