#आयपीएल 14
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह उत्साहात सुरू
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी
काँग्रेसची भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघासमोर लखनऊ संघाचं १६२ धावांचं आव्हान
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन मतदारांची नोंदणी वाढवणं आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मतदार जनजागृतीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला राज्यपाल बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं.
****
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं आणि राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभं करायला सुरुवात केली असून, नागपूरमधील दीक्षा भूमीचं जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर खरेदी करून त्याचं सं��्रहालयात रूपांतर करून शासनानं बाबासाहेबाना खरी मानवंदना दिली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी कायमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला, ते समाजसुधारणेचे अग्रणी होते अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजानं दूर सारलेल्या घटकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्यात स्वाभिमान जागृत केला असं पवार यांनी या निमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यभरात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त विविध उपक्रम, फेऱ्या, मिरवणुका सुरू आहेत. शासकीय आस्थापनांत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरमध्येही डॉ. आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. संविधान चौक इथं काल रात्री बारा वाजता बाबासाहेबांचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागपूर आकाशवाणीत अभिवादन कार्यक्रम झाला. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज बाबासाहेबांच्या विचारांच्या अऩुषंगानं राष्‍ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादनासाठी जनसागर लोटला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील एनडीए आघाडीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रत्येकानं प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेले संविधान हे आज घडीला वाचवणं, लोकतंत्राला वाचवणं ही खरी गरज आहे. या संविधानामुळं सामान्य नागरिकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नागपूर इथं केलं. दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर सर्व चालतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसंच संविधान असेल तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव अमर राहील असंही खर्गे यावेळी म्हणाले.
****
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून `सब का साथ सब का विकास` या तत्त्वाच्या आधारे विविध योजनांची आश्वासनं देणारा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केला. गरिबांना शिधापत्रिकेवर मोफत अन्नधान्य देण्याची योजना पुढची पाच वर्षं चालू ठेवण्याचा, प्रधानमंत्री आवास योजन���अंतर्गत तीन कोटी घरं बांधण्याचा, तसंच ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आय़ुष्मान भारत योजना पोहोचवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. एक देश एक निवडणूक, एकसामायिक मतदारसंघ, आणि पेपरफुटीविरोधी कायदा करण्याचं आश्वासनही भाजपनं याद्वारे दिलं आहे.
****
निवडणुका आल्यानं भारतीय जनता पक्षाला शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांची आठवण झाली असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना भाजपनं सत्तेत असताना दहा वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. समान नागरी कायद्याचं आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिलं होतं मग आतापर्यंत भाजपनं त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपनं जे सांगितलं तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला लवकरात लवकर इतर मागास वर्ग- ओबीसीमधून आरक्षण नाही दिलं तर येत्या पाच जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करायचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज चैत्यभूमी इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. मराठा समाजही विधानसभा निवडणुकीची तयारी करेल, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना शहर तसंच जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांग ��ागली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी, फराळ वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. जयंतीनिमित्त आज शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
****
लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी बाबासाहेबांनी सामान्य नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि प्रबळ लोकशाही करीता मतदानाचं महत्त्व', या विषयावर व्याख्यान झालं, त्यावेळी डोळे बोलत होते. मतदान निर्भयपणे करता यावं, अशी सुद्धा तरतूद बाबासाहेबांनी केली असल्याचं ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जयंतीनिमित्त डॉ. अरविंद गायकवाड यांचं 'राष्ट्रनिर्माते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर व्याख्यान झालं. बाबासाहेबांनी घटना निर्मीतीबरोबरच ऊर्जा, विद्युत, जल धोरण देखील ठरवल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यावेळी अध्यक्षस्थानी होते.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं शिताफीनं केलेल्या एका कारवाईमध्ये वन्यजीवांच्या अवशेषांची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये घोरपडीच्या ७८१ `हात जोडी` तसंच साडे १९ किलोहूऩ अधिक वजनाचे प्रवाळ याचा समावेश आहे. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून नाशिक जिल्ह्यामध्ये नंदगाव रेल्वेस्थान परिसरात तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या कारवाईत ही अटक केली. महसूल गुप्तचर संचालनालयाला स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांचं यात सहकार्य मिळालं. तस्करांनी आदिवासी वस्तीवर बोलावून या पथकावर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून तस्कराला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
आज १४ एप्रिल, हा दिन 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' म्हणूनही पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्यानं पेट घेतला होता. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन विभागातर्फे आज मुंबईमध्ये सेवा बजावताना आजवर वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी आणि सैनिकांना श्रद़धांजली अर्पण करण्यात आली.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं लखनऊ सुपर जायंटस संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी १६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापासून थोड्यावेळापुर्वी कोलकाता संघानं चौथ्या षटकात दोन बाद ४२ धावा केल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना वानखेडे मैदानावर होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर तुळशी यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. महावितरणचे दक्षता अधिकारी प्रशांत तुळशी आणि दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक गणेश तुळशी यांचे ते वडील होत. आज संध्याकाळी सात वाजता त्यांच्या पार्थिव देहावर प्रताप��गर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
धोनीने चेन्नई सुपर किंग्जसोबत 14 वर्षे पूर्ण केली, जाणून घ्या कसा राहिला आतापर्यंतचा विक्रम
धोनीने चेन्नई सुपर किंग्जसोबत 14 वर्षे पूर्ण केली, जाणून घ्या कसा राहिला आतापर्यंतचा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक, चेन्नई सुपर किंग्ज 4 वेळा चॅम्पियन बनला आहे. या संघाच्या यशामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा हात आहे. धोनी 2008 मध्ये या फ्रँचायझीशी जोडला गेला होता आणि तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे. फिक्सिंगमुळे सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली, त्यानंतर धोनी पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. पण चेन्नईच्या पुनरागमनाने तो संघात सामील झाला. आज (20…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
आकाश चोप्रा म्हणतो की ऋषभ पंतने टी-20 मध्ये अनेक संधी वाया घालवल्या, टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळणाऱ्या 11 मध्ये स्थान नाही
आकाश चोप्रा म्हणतो की ऋषभ पंतने टी-20 मध्ये अनेक संधी वाया घालवल्या, टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळणाऱ्या 11 मध्ये स्थान नाही
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याला वाटते की, भारताच्या सर्वोत्तम T20 प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतच्या स्थानाबाबत अनिश्चितता आहे. पंत टी-20 फॉरमॅटमध्ये कठीण परिस्थितीतून जात आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC), त्याने 14 सामन्यांमध्ये 340 धावा केल्या. T20I मध्ये दक्षिण आफ्रिकेची खराब कामगिरी कायम राहिली, जिथे त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत 14.50 च्या सरासरीने केवळ 58 धावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
 आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये गुजरातचा संघ राजस्थानवर भारी, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
 आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये गुजरातचा संघ राजस्थानवर भारी, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
 आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये गुजरातचा संघ राजस्थानवर भारी, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथमच आयपीएल खेळणारी गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेले राजस्थान ट्रॉफीसाठी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथमच आयपीएल खेळणारी गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेले…
View On WordPress
0 notes
krantinewsin · 3 years ago
Text
आयपीएल 2022 चे वेळापत्रक जाहीर - पहा कधी होतील सामने ?
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
आयपीएल 2021 एप्रिलपासून आयपीएलचा थरार पहा तारीख
आयपीएल 2021 एप्रिलपासून आयपीएलचा थरार पहा तारीख
मुंबई-प्रतिनिधी क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो आयपीएल 2021 हंगामाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. BCCI ने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
आयपीएल - 2021 पीबीकेएस वि एसआरएच लाइव्ह स्कोअर | पीबीकेएस वि एसआरएचः हैदराबादचा हंगामातील पहिला विजय, पंजाबला wickets विकेट्सने हरवून, बॅरिस्टोचा आयपीएलमधील सातवा अर्धशतक, खलीलने wickets बळी घेतले
आयपीएल – 2021 पीबीकेएस वि एसआरएच लाइव्ह स्कोअर | पीबीकेएस वि एसआरएचः हैदराबादचा हंगामातील पहिला विजय, पंजाबला wickets विकेट्सने हरवून, बॅरिस्टोचा आयपीएलमधील सातवा अर्धशतक, खलीलने wickets बळी घेतले
डिजिटल डेस्क, चेन्नई. आयपीएल 2021 च्या दुसर्‍या दुहेरी शीर्षकाच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला 9 गडी राखून पराभूत केले. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब 19.4 षटकांत 120 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.4 षटकांत 1 गडी गमावून 121 धावा करुन सामना जिंकला. जॉनी बेअरस्टो नाबाद 63 आणि केन विल्यमसन नाबाद 16 धावांवर खेळत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
महेंद्रसिंग ढोणीने चेन्नई सुपर किंग्ज जर्सीचे अनावरण केले महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जची नवीन जर्सी सुरू केली
महेंद्रसिंग ढोणीने चेन्नई सुपर किंग्ज जर्सीचे अनावरण केले महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जची नवीन जर्सी सुरू केली
डिजिटल डेस्क, चेन्नई. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी 9 एप्रिलपासून सुरू होणार्‍या लीगच्या आगामी 14 व्या हंगामासाठी आपली नवीन जर्सी सुरू केली. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाच्या संघाने आपल्या नव्या जर्सीमध्ये सैन्याचा सन्मान करताना त्याच्या सैन्यात मोहिनी जोडली आहे. थाला धरिसनम्! #WearOnWhistleOn सर्व नवीन सह # येल्लोव! #WhistlePodu–…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सत्र शुक्रवार 9 एप्रिलपासून सुरू होईल आयपीएल १:: टी -२० महाकुंभ शुक्रवारपासून कोरोना संकटाच्या मध्यभागी सुरू होईल, मुंबई-बेंगळुरू दरम्यानचा पहिला सामना
इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सत्र शुक्रवार 9 एप्रिलपासून सुरू होईल आयपीएल १:: टी -२० महाकुंभ शुक्रवारपासून कोरोना संकटाच्या मध्यभागी सुरू होईल, मुंबई-बेंगळुरू दरम्यानचा पहिला सामना
डिजिटल डेस्क, मुंबई. जगातील सर्वत्र (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये जगातील सर्वात प्रसिद्ध टी -20 लीगमधील इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वे सत्र शुक्रवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल, ज्यांनी आतापर्यंत स्पर्धेचे जेतेपद जिंकलेले नाही. मुंबईची कमान रोहित शर्माच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
विराट कोहलीने टीम इंडियाचा कर्णधार अधिक क्रिकेट खेळत आहे का असे विचारल्यानंतर कपिल देवने रोहित शर्मावर निशाणा साधला
विराट कोहलीने टीम इंडियाचा कर्णधार अधिक क्रिकेट खेळत आहे का असे विचारल्यानंतर कपिल देवने रोहित शर्मावर निशाणा साधला
1983 मध्ये टीम इंडियाला विश्वचषकात नेणारा कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीनंतर रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, टीम इंडियाचा कर्णधारच सांगू शकतो की तो जास्त क्रिकेट खेळतोय की थकतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खराब कामगिरी केली. 14 सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही आणि 19.14 च्या सरासरीने त्याला केवळ 268 धावा करता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहम्मद सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, आकाश चोप्रा दिनेश कार्तिकबद्दलही म्हणाले; पाहा व्हिडिओ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, माजी भारतीय क्रिकेटपटूही म्हणाले दिनेश कार्तिकबद्दल; व्हिडिओ पहा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहम्मद सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, आकाश चोप्रा दिनेश कार्तिकबद्दलही म्हणाले; पाहा व्हिडिओ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सिराजसह 4 खेळाडूंना सोडू शकते, माजी भारतीय क्रिकेटपटूही म्हणाले दिनेश कार्तिकबद्दल; व्हिडिओ पहा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुढील हंगामापूर्वी मोहम्मद सिराजसह चार खेळाडूंना सोडले पाहिजे, असे मत भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले. यामागे त्याचा तर्क असा आहे की खेळाडूंना सोडल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पर्समध्ये 12-14 कोटी रुपये मिळतील. या पैशातून तो अधिक चांगले पर्याय शोधू शकतो. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर आयपीएल 2022 मधील दिनेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
किरॉन पोलार्ड पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळेल का? भारताच्या माजी फलंदाजाचे काय म्हणणे आहे ते येथे आहे | क्रिकेट बातम्या
किरॉन पोलार्ड पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळेल का? भारताच्या माजी फलंदाजाचे काय म्हणणे आहे ते येथे आहे | क्रिकेट बातम्या
आयपीएल 2022: मुंबई इंडियन्ससाठी किरॉन पोलार्डचा हंगाम खूपच खराब होता© BCCI/IPL पाचवेळा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने लीग टप्प्यात संभाव्य 14 पैकी केवळ चार विजय मिळवून गुणतालिकेत तळाला स्थान पटकावले होते. MI च्या हंगामाचे विश्लेषण करताना, भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा म्हणाला की, पाच वेळा चॅम्पियन्सला अनुभवी अष्टपैलू खेळाडूंसह काही खेळाडूंना सोडावे लागेल किरॉन पोलार्ड.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
राजस्थान रॉयल्सने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला, बेंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला
राजस्थान रॉयल्सने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला, बेंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला
राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर २ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल २०२२ ७ गडी राखून जिंकले: आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थानने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघासाठी जोस बटलर��े तुफानी खेळी केली. त्याने धोकादायक फलंदाजी करताना शतक झळकावले. राजस्थानसाठी प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
RCB vs RR: RCB चा पराभव करून राजस्थानने 14 वर्षांनंतर IPL फायनलमध्ये स्थान मिळवले, Mims शेअर चाहत्यांनी शाही शैलीत विजय साजरा केला
RCB vs RR: RCB चा पराभव करून राजस्थानने 14 वर्षांनंतर IPL फायनलमध्ये स्थान मिळवले, Mims शेअर चाहत्यांनी शाही शैलीत विजय साजरा केला
राजस्थानच्या विजयावर बनवलेले मजेदार मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयासह फॅन्स सॅमसन सेन��ला 14 वर्षांनंतर टी-20 लीगची अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. राजस्थानचे चाहते त्यांच्या संघाच्या या कामगिरीने खूप खूश दिसत आहेत. आयपीए��� क्वालिफायर-2 मध्ये, राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (आरआर विरुद्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीने हर्षलवर टाकली होती मोठी जबाबदारी, जाणून घ्या घाबरत असतानाही त्याने कशी घेतली विकेट
डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीने हर्षलवर टाकली होती मोठी जबाबदारी, जाणून घ्या घाबरत असतानाही त्याने कशी घेतली विकेट
आयपीएल 2022 एलिमिनेटर: IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शानदार विजय मिळवला. या सामन्यात लखनौला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आरसीबीकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी केली. ईडन गार्डन्सवर, आरसीबीने हर्षलला 208 धावांचे संरक्षण करण्याचे काम दिले होते. लखनौला शेवटच्या तीन षटकात ४१ धावांची गरज असताना हर्षलला गोलंदाजी देण्यात आली. तो लवकरच 18…
View On WordPress
0 notes