#आयपीएल १५
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आता��र्यंत १ लाख ५२ हजार ९४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम् यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम् मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
0 notes
Text
#IPL2023 | आयपीएलचा नवीन नियम! आता ११ नव्हे तर १५ खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरणार
#IPL2023 | आयपीएलचा नवीन नियम! आता ११ नव्हे तर १५ खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरणार
#IPL2023 | आयपीएलचा नवीन नियम! आता ११ नव्हे तर १५ खेळाडूंसोबत संघ मैदानात उतरणार IPL 2023 – इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) म्हणजे आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या स्पर्धेचे महत्वही वाढत चालले आहे. जगभरातील अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. स्पर्धेच्या २०२३च्या १५ व्या हंगामात…
View On WordPress
0 notes
Text
BCCI ने IPL 2022 च्या 'अनसंग हिरो'साठी 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली
BCCI ने IPL 2022 च्या ‘अनसंग हिरो’साठी 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटर्स आणि फील्ड कर्मचार्यांना रु. 12.25 कोटी पुरस्कार जाहीर केला आहे. नवोदित गुजरात टायटन्सने रविवारी रात्री झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करून आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “टाटा…
View On WordPress
0 notes
Text
IPL 2022: या खेळाडूंना सोडल्याने संघाला होणार पश्चाताप, ते स्वतःहून बदलत आहेत सामन्��ाचा दृष्टिकोन
IPL 2022: या खेळाडूंना सोडल्याने संघाला होणार पश्चाताप, ते स्वतःहून बदलत आहेत सामन्याचा दृष्टिकोन
View On WordPress
0 notes
Text
१५ एप्रिलपर्यंत आयपीएल पुढे ढकलली!
मुंबई : करोना व्हायरसचा धोका वाढल्याने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी प्रशासनाचा दबाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्था १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनेही यावर्षी स्पर्धा घेऊ नये, असा सल्ला दिला होता. तसेच आयपीएल स्पर्धा घेणार असेल तर त्या मोकळ्या स्टेडियममध्ये घ्याव्यात, असे सरकारने सुचविले होते. आयपीएलचा हा १३वा हंगाम असून २९ मार्चपासून या स्पर्धा सुरू होणार…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलकामुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिषद कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या डिसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिस���ात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे ��शारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं, राज्यात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करुन दिले आहेत. या टप्प्यात अकरा लोकसभा मतदार संघांमध्ये, मतदानासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी या सर्व जिल्ह्यांची प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त ठिकाणी रवाना झाले आहेत. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदारयादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात २०२२ ते २०२७ या कालावधीत उल्लास- नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानात सहभाग घेऊन ४ लाख २५ हजार ९०६ जण साक्षर झाले आहेत. यामध्ये ६६ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तब्बल ९६ हजार ५१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याचं राज्याच्या शिक्षण संचालनालयानं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून या अभियानात सहभागी झालेल्या निरक्षरांची साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील विभागांमध्ये, २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी, प्रवेश चाचणी परीक्षा-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश होणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. सीईटीसाठी १५ ते २५ मे दरम्यान नोंदणी केली जाणार असून, त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान संबंधित विभागांमध्ये ऑफलाइन पद्धतीनं सीईटी होणार आहे.
सीईटीचे ५० टक्के आणि अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरून गुणवत्तेनुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी होणार असून, सीईटी परीक्षाही स्वतंत्रपणे आयोजित केलेली आहे. १०० गुणांच्या चा परीक्षेत एकूण ५० प्रश्न विचारले जातील, असं विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे आहे.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसची आज रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाच्या कामांसाठी जालना जिल्ह्यात कोडी आणि रांजणी रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि शनिवारी काही गाड्या उशिराने धावणार आहेत. तर धर्माबाद-मनमाड ही गाडी आजपासून चार ऑगस्टपर्यंत धर्माबाद ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेसाठी, भारतीय कुस्तीपटू अमन शेरावतनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. ही कामगिरी करणारा अमन हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. तुर्कियेतल्या इस्तंबूलमध्ये जागतिक कुस्ती ऑलिंपिक पात्रता फेरीत त्यानं ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात विजय मिळवला.
दरम्यान, भारताच्या दिपक पुनियाला ८६ किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित करता आलं नाही.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. चेन्नईच्या एम. ए. चिंदबरम क्रीडा संकुलात हा सामना होईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.
****
येत्या २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा विभागानं दिला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून ��ंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या कि��ाबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
हरियाणातील नारनौर जिल्ह्यातील कनिना इंथल्या जीएलपी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्या��ुळं पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. रमजान ईदनिमित्त शासकीय सुटी असतानाही खाजगी शाळा सुरु ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाताना हा अपघात झाला. दरम्यान, हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा उपायुक्तांकडून अहवाल मागविला आहे.
****
काश्मीर घाटीत पुलवामा जिल्ह्यात स्थानिक पोलीस, लष्करासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव बंदी आणि शोधमोहीम आज सकाळी सुरु केली. संशयित ठिकाणी हे पथक पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून, सुरक्षा पथकानं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
****
परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली, सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इंथल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी महाविकास आघडीचे उमेदवार चंद्राकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान, शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर आदींनी अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते थोड्याच व��ळात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातल्या माथेरान मध्ये गेल्या २६ डिसेंबर पासून इ-रिक्षा सेवा पुन्हा सुरू झाली, मात्र या रिक्षांमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्यानं सध्या ७ पैकी केवळ ३ ई-रिक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग तसंच पर्यटकांची गैरसोय होत आहे. सनियंत्रण समितीने रिक्षांची संख्या वाढवावी, त्या ठेकेदारास चालवायला न देता पुर्वी जे लोक हात रिक्षा चालवत होते त्यांनाच चालवायला द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
****
मतदार यादीत नाव शोधणं, किंवा मतदान केंद्र कुठं आहे याबद्दलची माहिती भारत निवडणूक आयोगानं तयार केलेल्या व्होटर ॲपवर उपलब्ध आहे. या ॲपचा वापर करून मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा ३ गडी राखून पराभव केला.
****
जर्मनी इथे सुरु असलेल्या डबल्यूटीटी फीडर डसलडर्फ टेबल टेनिस स्पर्धेत भारताची यशस्विनी घोरपडेनं काल स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी युनचेई चा ३-२ असा पराभव केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 May 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता
एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरल्याची मुख्यमंत्र्यांची भावना
राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करण्याची राज्यपाल रमेश बैस यांची सूचना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार, मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव
सविस्तर बातम्या
येत्या सहा महिन्यात मुंबईपर्यंतचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर ते मुंबई पर्यंतच्या समृद्धी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर असा ऐंशी किलोमीटर अंतराचा हा दुसरा टप्पा आहे. समृद्धी मार्ग गडचिरोली पर्यंत नेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला. आणि लगेच आपण पुढचा टप्पा ८० किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला, तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला, आणि शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अलीकडेच महामार्गावर झालेल्या अनेक अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं. या महामार्गावर लवकरच सुगम वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येईल असं ते म्हणाले. महामार्गाचं महत्त्व विशद करताना ते म्हणाले....
Byte…
हा समृद्धी महामार्ग का आहे, हा एक ईकॉनॉमिक कॉरीडोर आहे. राज्याच्या १५ जिल्ह्यांचं भाग्य हा बदलणार आहे. आणि शेवटी जगाच्या पाठीवर त्याच देशांमध्ये प्रचंड आपल्याला विकास झालेला दिसतो, ज्याठिकाणी पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे, पोर्टच्या आधारावर विकास झाला, त्या पोर्ट लेड डेव्हपमेंटचा आतापर्यंत उपयोग हा केवळ मुंबई, एमएमआर रिजन, आणि पुण्याला होत होता, त्याच्या पलिकडे तो होत नव्हता, आता पार गोंदिया पर्यंत पोर्ट लेड डेव्हलपमेंटचा उपयोग होणार आहे, आणि म्हणून महाराष्ट्राला रिडीफाईन करणार हा महामार्ग आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारला काल नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं भाजप, येत्या ३० तारखेपासून जनसंपर्क अभियान सुरू करणार आहे. या अभियानातून सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे ‘नौ साल सेवा सुशासन, गरीब कल्याण’, या विषयावरच्या एका राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगनही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात तीन सत्रं होणार असून, त्यात इंडिया सर्जिंग अहेड, जन जन का विश्वास आणि युवा शक्ती गॅल्व्हानायझिंग इंडिया या तीन विषयावर चर्चासत्रं होणार आहेत. या परिसंवादात विविध मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
****
दिल्लीतल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. ही याचिका सुनावणी घेण्यायोग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलानं ही याचिका मागे घेतली.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, यावेळी ७५ रुपयांचं नवं नाणं जारी करण्यात येणार आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या ५० गावांमध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास तसंच पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या माध्यमातून जालना, नांदेडसह जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतल्या गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश जारी करण्यात येतील असं महाजन यांनी सांगितलं.
****
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्यानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं काल शासन आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपा��� भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यावेळी उपस्थित होते.
जनतेची कामं लवकरात लवकर होण्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील राहील, असं आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले,
Byte…
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होतं, पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं, की का आपण लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग या यंत्रणेचा वापर या सर्वसामान्य लोकांना झाला पाहीजे. आपलं सरकार आल्यानंतर २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना आपण सुप्रमा दिला. सहा लाख हेक्टर जमिन या निर्णयामुळे ओलीताखीली येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे वितरीत करण्यात आली. पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्न वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल��.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही शासन आपल्या दारी या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, राज्यात शिवचरित्राशी संबंधित स्थळांना जोडणारं, 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' विकसित करावं, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त मुंबईहून रायगड इथं सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला राज्यपालांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अभियान सुरु करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं, “किल्ले, कथा आणि लेणी” महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जाणार आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन आणि चित्रकला शिबिर घेण्यात येईल. तर संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव आणि समुहाचं “पोवाडा गायन”, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, आणि वेरुळ लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित, सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता आणि त्यांच्या महागामी नृत्य समूहाचा “नृत्यांकन”- हा कार्यक्रम होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात वीज जोडणी प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शेतीसाठी रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसंच जळालेली रोहित्रं तात्काळ बदलण्याच्या सूचनाही, त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसंच शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बोगस बि-बियाणं, खते, किटकनाशकांची विक्री करताना आढळून आल्यास, कृषि केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण सावंत यांच्या हस्ते काल झालं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलतांना सावंत यांनी, राज्यातली आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी रुग्णालयांना आकस्मिक भेटी देऊन सद्यस्थिती जाणून घेतल्याचं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीचे जयकुमार जैन यांची, तर उपसभापती ��्हणून, संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी एक- एकच अर्ज आल्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी कुमार बारकुल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
****
औरंगाबादमध्ये आजपासून ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीनं हा महोत्सव होत असल्याचं, सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितलं. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचं उद्धाटन होईल, अधिक माहिती देताना पठाडे म्हणाले...
Byte…
हा आंबा महोत्सव २७/०५ ते ३१/०५ असं, त्यात पुढे काही वाढवायचं ठरलं शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या नुसार आपण एक दोन दिवस पुढेही वाढवू शकतो. आणि कोकणामधून येणारे, देवगड, रत्नागिरी, चिपळूण या भागातून सर्व शेतकरी याठिकाणी स्वत:चा पिकवलेला आंबा, घेऊन येणार आहेत. पणन मंडळाकडे जे नोंदणीकृत केलेले शेतकरी आहेत. असेच या महोत्सवात भाग घेणार होते. परंतू मिटींगमध्ये असं ठरलं की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा पिकवत असेल किंवा स्वत:च्या मळ्यातला आंबा असेल तर ते पण या महोत्सवामध्ये भाग घेवू शकतील, त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गाळयुक्त शिवार मोहीमेअंतर्गत सिंचन प्रकल्पातला गाळ काढण्याची कामं पूर्ण करण्याची सूचना, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या विविध जलसंधारण कामांचं नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. शेतकरी, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा गाळ काढावा, तसंच तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात यावा असंही त्यांना यावेळी सूचित केलं.
****
उस्मानाबाद हा जिल्हा केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हा जाहीर केला असून, जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याबाबत माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
Byte..
यामध्ये १९१ तीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि एक हजार ५१९ मध्यम कुपोषित म्हणजे मॅम तर सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख १३ हजार ७९४ बालकं आढळून आली आहेत. यातील एक हजार ७१० बालकांची आरोग्य विभागामार्फत स्वंतत्र पथकाव्दारे जून मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणीमध्ये आढळून आलेल्या आजारी तीव्र कुपोषित सॅम श्रेणीतील बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. गंभीर वैद्यकीय दोष आढळलेल्या बालकांना संदर्भ सेवा देऊन वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करुन, अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २३३ धावा केल्या. शुभमन गिलनं ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १८ षटकं दोन चेंडुत १७१ धावांवर सर्वबाद झाला.
****
परभणी इथं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं, बेरोजगारांसाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत, आज पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमित्त लातूरसह राज्यभरात अभिवादन सभा तसंच विविध कार्यक्रम काल घेण्यात आले. लातूरमध्ये निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ७३ जणांनी रक्तदान केलं. लातूर तालुक्यातल्या मौजे वासनगाव ग्रामपंचायतीत, विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीनंही विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
राजपूत समाजासोबतचा भामटा शब्द वगळण्याची तसंच राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
जी-२० समूहाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची आजपासून मुंबईत तिसरी बैठक
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना लवकरच प्रारंभ तसंच विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत घटकपक्षांसोबत लवकरच चर्चा -जयंत पाटील
अकोला शहरात दोन गटात वाद, एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून माझं स्वच्छ शहर, अभियानाला प्रारंभ
राज्यात तापमानात लक्षणीय वाढ
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा राजस्थान रॉयल्सवर ११२ धावांनी तर कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी राखून विजय
****
देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पाकिस्तान आणि चीनकडून दहशतवाद आणि घुसखोरीचा प्रयत्न केला जातो, मात्र त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही, संरक्षण दल आत्मनिर्भर झाल्यामुळे पुलवामा आणि गलवान खोऱ्यात झालेल्या घटनांचा जागेवरच बदला घेतला, असं राजनाथ सिंह म्हणाले.
औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजी नगर नामकरण केल्याबद्दल राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.
राजपूत समाजासोबतचा भामटा हा शब्द वगळण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. यासंदर्भात ��ाज्य सरकार लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवेल, असं ते म्हणाले. त्याचबरोबर राजपुत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले…
“राजपूत समाजासाठी जी आर्थिक विकास महामंडळाची मागणी आहे, ती देखील राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ करण्याचा निर्णय देखील याठिकाणी आपण घेऊया. आणि आणखी एक मागणी इकडे आहे, की भव्य दिव्य असा महाराणा प्रतापांचा आश्वारूढ पुतळा इकडे पाहिजे, तो ही तातडीनं केला जाईल आणि त्या उद्घाटनाला आपण राजनाथ सिंह साहेबांना बोलवूया. आपल्याला ज्या ज्या काही मागण्या असतील सरकार तिथं कुठेही मदतीचा हात मागे घेणार नाही.’’
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचं २०१९-२० मध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं, पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. मात्र २०१९-२० या वर्षात कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयं बंद होती, परिणामी अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्यानं, त्यांना पाचव्या वेळेस परीक्षेची संधी द्यावी, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी, केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे मांडली होती. पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत या विध्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीही या निर्णयाला मान्यता दिली.
****
आगामी काळात वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि अन्य विद्याशाखांच्या स्नातकोत्तर जागांमध्ये वाढ करणार असून, शैक्षणिक सुविधांसाठी विशेष तरतूद करणार असल्याचं, केंद��रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. ते काल वर्धा जिल्ह्यात सावंगी इथल्या दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या, १४ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी वापरला, तरच भारत विश्वगुरू बनण्याचं स्वप्न साकार करू शकतो, असं ते म्हणाले. या समारंभात एक हजार २०१ स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
****
जी-२० समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक आज मुंबईत होणार असून, जी-२० देशांसोबतच, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था तसंच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, यासारख्या इतर काही संघटनांचे एकूण १०० प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. ��ेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं विशेष भाषण या बैठकीत होणार आहे. तंत्रज्ञानातल्या त्रुटी दूर करून ऊर्जा संक्रमण करणं, ऊर्जा संक्रमणासाठी कमी किमतीच्या वित्तपुरवठा पर्यायांचा विचार करणं, ऊर्जा सुरक्षा आणि विविध पुरवठा साखळी, ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कार्बन संक्रमण कमी करणं आणि ऊर्जेचा जबाबदार वापर करणं, भविष्यासाठी इंधन आणि स्वच्छ ऊर्जा सर्वांना उपलब्ध करून देणं आणि न्याय्य, परवडणारे, आणि सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमण मार्ग उपलब्ध करून देणं, अशा सहा बाबींवर प्रामुख्यानं या बैठकीत चर्चा होणार आहे. ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या याआधीच्या दोन बैठका बंगळुरू आणि गांधीनगर इथं झाल्या होत्या.
****
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना लवकरच प्रारंभ होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानं देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही ठाकरे यांच्या बाजूनेच लागला आहे. या दोन्ही गोष्टी आम्ही राज्यातल्या जनतेपर्यंत घेऊन जाणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यासाठी तसंच जागावाटपाबाबत लवकरच घटकपक्षांसोबत चर्चा करून निर्णयाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं पाटील यांनी सांगितलं.
****
अकोला शहरात समाज माध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरावरून शनिवारी रात्री दोन गटात वाद होऊन तणाव निर्माण झाला. दोन्ही जमाव परस्परांवर चालून गेले, या घडामोडीत काही दुचाकींचं नुकसान झालं, तर समाजकंटकांनी एक घर पेटवून दिलं. यात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी २६ जणांना ताब्यात घेतलं आहे. शहरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं.
दरम्यान, तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जुन्या शहर परिसरात संचारबंदी तर काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल अकोला इथं जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दंगलीत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं. हे कुटुंब अत्यंत गरीब असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत घोषित केली असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग-सी.बी.आयच्या संचालकपद�� प्रवीण सूद यांची निवड करण्यात आली आहे. सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. प्रवीण सूद हे सध्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
****
कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या बहुमतानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडण्यासाठी पक्षातर्फे त्रिसदस्यीय पक्ष निरिक्षक गट स्थापन करण्यात आला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा या गटात समावेश आहे.
****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा-आय एस सी ई अभ्यासक्रमाचे दहावी तसंच बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. सी आय एस सी ई डॉट ओ आर जी, तसंच रिझल्ट्स डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई इथं वर्षा या शासकीय निवासस्थानी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग -कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे. काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वपक्षीय संघटनांतर्फे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं, टीव्ही सेंटर भागातल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. सायंकाळी या परिसरातून शोभायात्राही काढण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरा टीव्ही सेंटर भागातल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. या पुतळ्याच्या नूतनीकरणास पाच कोटी रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
मागच्या सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका संशयास्पद असल्याची टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणातून वाटा नको, तर पूर्वीप्रमाणे टिकाऊ आरक्षण मिळावं, अशी भूमिका सावंत यांनी मांडली. ते म्हणाले…
‘‘मागच्या शासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. त्यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी कुठलेही एफर्टस् घेतलेले नाहीत. आम्हाला कुणाच्याही ताटातलं, कुणाच्याही वाटीतलं काढून आमच्या मराठा समाजाला द्यावं ही आमची पूर्वीपासूनच मागणी नव्हती. आणि म्हणून या ठिकाणी असणारा माझा ओ बी सी समाज, या ठिकाणी असणारा माझा एस सी, एस टी चा समाज, या ठिकाणी असणारा माझा मराठा समाज हातात हात घालून नांदतो. पण या परंपरेला कुठंतरी छेद देण्याचा प्रकार या वेगवेगळ्या माध्यमातनं चाललेला आहे. आणि आम्ही तो डेफिनेट ��ाणून पाडू. आणि आम्हाला जे पूर्वीचं आमचं आरक्षण होतं, हे आमचं टीकाऊ आरक्षण माझ्या मुलाला मिळावं, ही आमची माफक अपेक्षा.’’
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर विभागातल्या आरोग्य सेवेचा, सावंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा घेतला. आरोग्य विभागातर्फे राज्यात ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबवण्यात येत आहे. अशा अभियानामुळे राज्याच्या आरोग्य सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या प्रत्येक विभागीय उपसंचालकाने आपल्या विभागाचा आरोग्यविषयक आराखडा तयार करावा, रूग्णालयातले सूचना फलक रुग्णांना समजेल अशा भाषेत लावावेत, अशा सूचनाही सावंत यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या जनतेचं आरोग्य सदृढ करण्यासाठी, ग्रामीण तसंच शहरी भागात वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच, आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी, आपण सर्व मिळून काम करूया, असं आवाहन सावंत यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून माझं स्वच्छ शहर, या अभियानाला प्रारंभ होत आहे. कचरा कमी करणं अर्थात रीड्युस, त्याचा पुनर्वापर अर्थात रीयुज आणि प्रक्रियेद्वारे त्याचा नवीन उपयोग करणं अर्थात रिसायकल, या तीन आर बद्दल जनजागृतीचा, या अभियानाचा मूळ उद्देश आहे. महापालिकेतर्फे आयोजित हे अभियान येत्या पाच जून पर्यंत सुरु असणार आहे. या अभियानांतर्गत शहरातल्या नऊ विभागात अशी आर.आर.आर. केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये शहरातल्या नागरिकांनी वापरलेली पुस्तकं, प्लास्टिक, कपडे, बुट, बॅग, फर्निचर, भांडी आणि अन्य साहित्याचं संकलन होणार आहे. जमा झालेल्या कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून किंवा नूतनीकरण करून पुनर्वापर करण्यात येईल.
****
राज्यात अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट असून, काल तापमान सरासरी ४२ अंश सेल्सिअस इतकं होतं. पैठण तालुक्यात आडूळ इथं बंडू वाघ या तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाला. बीड, नांदेड, जालना जिल्ह्यातही काल तापमान ४२ अंशापेक्षा अधिक होतं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बंगळुरूच्या संघानं राजस्थान रॉयल्ससमोर १७२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थान रॉयल्स संघ अवघ्या ११ व्या षटकातच ५९ धावांवर सर्वबाद झाला.
अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या संघानं १४५ धावांचं लक्ष्य दिलं. कोलकाताच्या संघानं १८ षटकं तीन चेंडूत चार गडी गमावत ��े लक्ष्य पूर्ण केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं छत्रपती संभाजी महाराज जयंतीनि��ित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली. जमावानं दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान करुन काही प्रमाणात जाळपोळही केल्याचं वृत्त आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, यात चार पोलिस जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
****
बीड इथं काल एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आलं. मराठी साहित्य वार्ता आणि महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती, यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 12 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १२ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या कार्यक्रमात शिक्षकांना संबोधित करत होते. शिक्षकांनी सतत शिक्षकाच्या भूमिकेत राहावं, देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी सदैव स्मरणात असू द्यावी, असं सांगतानाच, आपण स्वत: कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले सांगितलं. शाळेसोबत असलेलं नात वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी आपापल्या शाळेचा वाढदिवस साजरा करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. एकूण ८७ पूर्णांक ३३ शतांश टक्के निकाल लागला असून, त्रिवेंद्रम क्षेत्राचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९ पूर्णांक ९१ शतांश टक्के लागला असल्याचं सीबीएसईनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षी क्रमांक आणि गुणवत्ता यादी जाहीर केली नसल्याचं मंडळानं या पत्रात सांगितलं आहे.
****
आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती, जागतिक परिचारिका दिन म्हणून आज साजरी होत आहे. जगभरातल्या परिचारिकांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, आणि आरोग्य सेवेतल्या त्यांच्या योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी परिचर्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातल्या बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात परिचारिका बजावत असलेली भूमिका अतुलनीय असल्याचं ते म्हणाले.
परिचारिका दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण नैतिकतेला धरुनच राजीनामा दिल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी यावेळी केला.
****
परभणी जिल्ह्यात सोनेपेठ तालुक्यातल्या तांडा शिवारात सेफ्टी टॅंक स्वच्छ करताना पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातल्या योजनेतून, प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काल रात्री मारुती राठोड यांच्या शिवारात असलेल्या सेफ्टी टँकची स्वच्छता सुरु असताना विषारी वायुमुळे या कामगारांचा जीव गुदमरुन मृत्यू झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जिल्हा वरीष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेचं येत्या सोमवारी १५ मे रोजी आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ॲथलेटिक्स ट्रॅक वर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या औरंगाबाद संघाचा राज्यस्तरीय वरीष्ठ स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहे.
****
हिंगोली इथं काल व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका द्यावी, वृत्तपत्रांत जाहिरातींवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
मोखा चक्रीवादळ आणखी तीव्र झालं असून आज पहाटे हे चक्रीवादळ पोर्ट ब्लेयरच्या पश्चिम वायव्येस साधारण ५२० किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागराच्या मध्य क्षेत्राकडे सरकलं आहे. हे चक्रीवादळ ताशी दीडशे ते १६० किलोमीटर वेगानं म्यानमार आणि बांग्लादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी आजपासून १४ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रासह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एकशे एकावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशातल्या ४९९ शहरांसह देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. दुपारी दोन ते पाच वाजून वीस मिनिटे या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
****
मणिपूर मधल्या परिस्थितीत सुधार होत असून, राज्यात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दल प्रयत्न करत आहे. मणीपूरच्या राज्यपाल अनसुया उईके यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त चूरचंद्रपूर जिल्ह्यात सकाळी सात ते दहा यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. आतापर्यंत या हिंसाचारात चोपन्न जणांचा मृत्यू झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
मणिपूरमध्ये मात्र आज नीट परीक्षा होणार नाही. इथे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरनीटची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवारांसाठी परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं राष्ट्रीय परीक्षा संस्था - एनटीएनं सांगितलं आहे.
***
दरम्यान, मणिपूरमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून चौकशी करून सर्वतोपरी मदत करण्याचं तसंच या विद्यार्थ्यांना राज्यात सुखरूप आणण्याची व्यवस्था केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालकांशी संपर्क केला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा असून कुलगाम इथला रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या भागात पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवांनांची संयुक्तपणे शोध मोहीम सुरू असताना ही चकमक उडाली.
****
कोयना धरण परिसरात आज पहाटे तीन वाजून ५३ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयनानगर पासून उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली, तर भूकंपाचा केंद्रबिंदू ३० किलोमीटर खोल इतका होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
***
देशात गेल्या २४ तासात दोन हजार ३८० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाच हजार १८८ रुग्ण बरे झाले. ���ेशात सध्या २७ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ इतका आहे.
****
भारतीय नौदलाचं सर्वात जुनं आयएनएस मगर हे जहाज काल संध्याकाळी कोची इथल्यां नौदलाच्या तळावर झालेल्या समारंभात सेवामुक्त करण्यात आलं. हे जहाज जुलै १९८७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झालं होतं. पाच हजार पाचशे टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेणारं हे पाहिलं स्वदेशी जहाज आहे. ऑपरेशन समुद्र सेतू, कोविड-19 साथीच्या काळात जगाच्या विविध ठिकाणांहून भारतीयांना परत आणणे, २००४ मध्ये त्सुनामीतून वाचलेल्या १३०० नागरिकांना बाहेर काढणे याचबरोबर भारतीय सैन्यासह अनेक संयुक्त लष्करी सरावांमध्ये या जहाजाचा सहभाग होता.
****
कर्नाटकात सत्ताधारी भाजप सरकारविरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगानं कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. या आरोपांच्या पुराव्यांसह आज सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्तर देण्यास निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. भाजप सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या जाहिराती काँग्रेसनं वृत्तपत्रातून प्रकाशित केल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात होळ इथल्या एका व्यायामशाळेत ४५ किलो चंदनासह एक गावठी कट्टा, एक पिस्तूल, दोन लोखंडी कोयते, पंधरा जिवंत काडतूसं यासह इतर घातक साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन तस्करांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात क्रेरी भागातल्या वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवाद्यांच्या उप��्थितीबद्दल विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं पायन परिसरात घेराव घालून ��ोध मोहीम सुरू केली. संयुक्त पथक संशयित घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल आणि एका पिस्तूलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
****
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल देशातलं अवयवदान धोरण आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि मंत्रालयाचे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, २०१३ मध्ये वर्षाला पाच हजारापेक्षाही कमी असलेलं प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचं प्रमाण, २०२२ मध्ये १५ हजारांपेक्षाही जास्त झालं आहे. या क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतराराष्ट्रीय मानकांचा अभ्यास करून ती कार्यान्वित करावीत, अवयवदान आणि प्रत्यारोपण याबाबत रुग्णालयांना उपयुक्त आणि दिशादर्शक ठरेल अशी मार्गदर्शक नियमावली पुस्तिका तयार करावी, प्रत्यारोपण समन्वयकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावा, अशा सूचना मांडवीय यांनी यावेळी दिल्या.
****
लोकसंख्येवरील उष्णतेचा प्रभाव मोजण्यासाठी, आणि विशिष्ट स्थानांसाठी प्रभाव-आधारित उष्मा लहरी सूचना निर्माण करण्यासाठी, भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक सुरु करणार आहे. भारतीय हवामान विभागानं गेल्या आठवड्यात देशाच्या विविध भागांसाठी प्रायोगिक उष्णता निर्देशांक जारी करण्यास सुरुवात केली. हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन ते खरोखर किती गरम आहे ते या निर्देशांकाद्वारे निर्धारित करण्यात येतं. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तापमान आणि आर्द्रतेपासून, ते वारा आणि प्रभावाचा कालावधी यांसारख्या इतर बाबी या निर्देशांकात एकत्रित असतील. लोकांसाठी उष्णतेच्या ताणाचा तो प्रभावी सूचक असेल. धोक्याचा गुणांक सुमारे दोन महिन्यांत तयार होईल आणि तो पुढील उन्हाळ्याच्या हंगामात कार्यान्वित होईल असंही महापात्रा यांनी सांगितलं.
****
देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ९६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सात हजार ८७३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३६ हजार २४४ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लसींची मात्रा घेतलेल्यांची संख्या २२० कोटी ६६ लाख इतकी झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या दहा विद्याशाखांमधल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा - सीईटी २०२३ साठी ��र्ज भरण्यास सहा मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. साडेतेराशेपेक्षा अधिक जागांसाठी २२ ते २४ जुलै दरम्यान ही परिक्षा होणार आहे. या सीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका एक ऑगस्ट, तर निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज भरता येतील.
****
परभणी जिल्ह्यात ‘योजना जन कल्याणकारी सर्व सामान्यांच्या दारी’, या शासकीय योजनांच्या जत्रा कार्यक्रमाअंतर्ग��, जिल्ह्यातल्या कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, आणि एच एल एल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं सात मे पर्यंत जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ यांचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करायचे आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, खुडज, कळमनुरी, कुरुंदा, बाळापूर, आदी ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचं मोठं नुकसान झालं.
****
या आठवड्यात बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मोचा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग, त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं बचाव, मदतकार्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. इकडे महाराष्ट्रात,अनेक ठिकाणी सहा मेपर्यंत जोराचे वारे, वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
सरकार लवकरच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स अभ्यासक्रमाचा शालेय अभ्यासक्रम लागू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं. मुंबईत आज भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भारताने अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात जगाशी संपर्क साधण्याची गरज असून, या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या गोरेगाव चित्रनगरीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही चंद्रा यांनी केली.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायनं काल दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेच्या शिफारशी जारी केल्या. अलीकडच्या दशकात सरकारने व्यवसाय सुलभ करण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असल्याचं, दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. ट्राय ने २०२१ मध्ये दूरसंचार क्षेत्रातल्या व्यवसाय सुलभतेवर एक मार्गदर्शक पत्रिका तयार केली होती. यात वापरकर्ता-अनुकूल, पारदर्शक आणि प्रतिसादात्मक डिजिटल एक खिडकी आधारित पोर्टल सुरू करण्याची शिफारस केली आहे. हे पोर्टल आंतर-विभागीय ऑनलाइन प्रक्रिया सुलभ करण्याकरता नवीन डिजिटल तंत्रज्ञानासह सक्षम केलं जाईल, असं म्हटलं आहे.
****
भारतीय ओळखपत्र प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आज साजरा केला जात आहे. पत्रकारिता स्वातंत्र्याचं महत्त्व आणि समाजातली त्यांची भूमिका यावर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. "अधिकारांचे भविष्य घडवणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती ��्वातंत्र्य" ही यंदाची पत्रकार स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ७२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सात हजात ६९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार १७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के आहे.
****
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलट गणतीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगानं योग दिनाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार विभागानं काल “योग महोत्सव” आयोजित केला होता. आंतराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवस आधी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नाटक, पथनाट्य अशा माध्यमातून योगासनाचं सादरीकरण करण्यात आलं. सोलापूर, पालघर याठिकाणीही केंद्रीय संचार विभागानं अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
****
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगानं काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांची बैठक घेतली. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत देशातल्या सगळ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला क्रमांक मिळावा, या उद्दिष्टानं ही बैठक घेण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये नदी आणि नाल्यांची स्वच्छता, कचरा प्रक्रिया केंद्राचं व्यवस्थापन, कचरा संकलन, कचरा मुक्त शहर, सांडपाणी व्यवस्थापन, हेल्पलाईन, दंड आकारणी, सार्वजनिक शौचालयं, या मानकांवर गुण दिले जातील, अशी माहिती स्वच्छ भारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आस्थापना कर लागू केल्यास शहरातले सगळे व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधींनी दिला आहे. या करासंदर्भातला व्यापाऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी लवकरच पालकमंत्री, सहकारमंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पारधी समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाराशीव इथं काल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. धाराशीवचे जिल्हा पोलीस अधीक्षक ���तुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार हे शिबिर घेण्यात आलं. पारधी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला आणि इतर कागदपत्रं अद्ययावतत करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना मोहाली इथं पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये देणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण, मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये तीन पूर्णांक आठ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आ��ल्या प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात नमूद केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या नव्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत जमा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला.
****
पर��णी इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी केली. या रुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. विद्युत उपकरणं, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
0 notes