#आजचा दौरा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 17 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होत असून, यावेळी ५०० जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कुवेत दौरा आटोपून काल भारतात परतले. त्यांच्या या भेटीत संरक्षण सहकार्यासह चार महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. सर्वसमावेशक संरक्षण सहकार्य करारात द्विपक्षीय लष्करी सहकार्यासह, सांस्कृतिक, क्रिडा, सौर ऊर्जा क्षेत्रांचा यात समावेश आहे. भारत आणि कुवेत या दोन्ही देशांनी सीमेपलीकडच्या दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकमुखानं विरोध केला. दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देश सहकार्य वाढवतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांच महत्व आणि भागिदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे, यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका ओळखून सरकारने त्यांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अनेक उपक्रम हाती ��ेतले आहेत. देशात यंदा विक्रमी ३३२ दशलक्ष टनापेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालं आहे.
शेती हा ग्रामीण विकासाचा कणा असून, जोपर्यंत ग्रामीण भागाचं चित्र बदलत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं चौधरी चरणसिंह पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते. शेतकरी जेव्हा आत्मनिर्भर होईल तेव्हाच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था उभी राहु शकते, असं धनखड म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी चौधरी चरणसिंह यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले, तसंच शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास यासाठीच्या चरणसिंह यांच्या योगदानाचाही उल्लेख केला.
विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान तळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. विमान तळांवर वाजवी दरात खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय होणार असल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. प्रायोगिक तत्वावर कोलकता विमान तळावर सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यानं देशात अन्य विमान तळांवर सुद्धा हा उपक्रम राबवला जाईल.
माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या आय आय एम सी या माध्यम क्षेत्रातल्या सर्वोच्च संस्थेची उभारणी बडनेरा इथं होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, संजय जाजू यांनी काल नागपूर इथं या संस्थेच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयांच्या प्रमुखांचीदेखील बैठक घेतली.
पुण्यातल्या बालरंगभूमी संमेलनाचा काल समारोप झाला. या समारोप सोहोळ्यात बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कर्याबद्दल प्रतिभा मतकरी यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तीन दिवसांच्या या संमेलनात बालरंगभूमी परिषदेच्या पुण्यासह राज्यभरातल्या शाखांमधल्या बालकलावंत आणि दिव्यांग कलावंतांनी सादरीकरण केलं.
पुण्यात वाघोली इथं भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळयांची तस्करी करणाऱ्या एकाला ठाणे जिल्ह्या���ल्या भाईंदर इथून उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. जितेंद्र कामता असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातल्या निराधारांना संजय गांधी, श्रावणबाळ योजने अंतर्गत नव्या लाभार्थ्यांचे अर्ज आता मंजूर झाले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात बीड इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मानधनानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं ९१ धावा केल्यामुळे तिनं या वर्षी केलेल्या धावांची संख्या एक हजार ६०२ झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्टचा एक हजार ५९३ धावांचा विक्रम मोडला आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही’; बंडानंतर शरद पवारांचा पहिल्यांदाच अजित पवारांना इशारा You are not a nationalist party; Sharad Pawar warned Ajit Pawar for the first time after the rebellion सातारा : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात तिसरा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे. अजित पवारच नाही तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल असे एकाहून एक महत्त्वाच्या शिलेदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसह जाणे पसंत केले. दरम्यान, अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यापासून राष्ट्रवादीच्या बांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, असा निर्वाणीचा इशाराच दिला आहे. तसेच आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही, कुणालाही अपात्र करणार नाही. मी त्या रस्त्यानेच जाणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधत होते. संघर्षाला सुरुवात करायची असेल किंवा काही नवीन गोष्टी निर्माण करायच्या असेल तर मी दोन शहरांची नेहमी निवड करतो. एक सातारा आणि कोल्हापूर या दोन शहरातून मी नव्या गोष्टीची सुरुवात करतो. राष्ट्रवादीचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला, अपेक्षा होती की त्यांनी हे संघटन महाराष्ट्रात मजबूत करावे. पण नुसते मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशात भाजपकडून जाती जातीत, धर्माधर्मात एक प्रकारचे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केल�� जात आहे. या सर्वांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेसाठी प्रयत्न करणे ही आमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले. विश्वासातले इतके लोक तिकडे गेले याचे दुःख वाटते का? हा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, अजिबात नाही! मला दुःख वाटत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर अंतिम रिझल्ट भले तो आज नसेल सहा महिन्यांनी लागला, वर्षभराने लागला तर तो रिझल्ट या देशातला सर्वसामान्य मतदार देतो. माझा विश्वास आणि सामान्य माणसावर आहे. आमच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने अनेक वर्ष मोलाची कामगिरी केली. ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे. त्यांच्यासोबतच ते गेले. पण नवीन पिढीचा कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये तो जोमाने उभा राहावा म्हणून मी आजपासून हा दौरा सुरू केला आहे, असे पवार म्हणाले. मी गाडीत बसल्यापासून इथे येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ७० ते ८० टक्के तरुण वर्ग मजबूतीने स्वागताला उभे असल्याचे चित्र बघितले. आम्ही कष्ट केले, या तरुणांना दिशा दिली, कार्यक्रम दिला तर दोन ते ते तीन महिन्यात राष्ट्रवादीला महाराष्ट्राला चित्र अनुकूल होईल. त्याची सुरुवात इथे झाली. याचा आनंद आहे. आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी महत्त्वाची मोहीम सुरू करायची म्हणून यशवंतरावांच्या समाधीस्थळापासून आम्ही सुरुवात केली, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला काही लोकांचे फोन आले. पक्षाच्या मूळ धोरणापासून वेगळी भूमिका घेऊ नये असे त्यांचे मत होते. अमोल कोल्हे यांनी तुम्हाला आज पाठिंबा दिला आहे. पण काल ते अजित पवार यांच्यासोबत होते, असं विचारलं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार काही परके नव्हते. माझी मुलगी तीनदा तिथे गेली. याचा अर्थ चुकीचं काम केलं नाही. मतभिन्नता असते. त्यामुळे तो जाणून घेण्यासाठी एखादा सहकारी गेला असेल तर त्यावर मी संशय व्यक्त करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कुणावर कारवाई करणार नाही. अपात्रता करणार नाही. मी या रस्त्याने जाणार नाही. तुमच्या सारखे सूज्ञ बुद्धीचे लोक असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द कळेल. मी जाहीरपणे पक्षाच्या बांधणीसाठी निघालो. असं असताना आशीर्वाद हा शब्द वापरून तुम्ही पत्रकारांचा दर्जा कमी करू नका, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावरही पवार यांनी उत्तर देत अजितदादांना फटकारले. अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसोबत काम केले. त्यावेळी तुम्ही मंत्री होता. तेव्हा शिवसेनेसोबत चूक झाल्याचे का वाटले नाही? असा सवालच त्यांनी केला. देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी राजकीय पक्ष आणि मीडियाने इंदिरा गांधींवर टीका केली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य होती असे सांगणारा एकच नेता होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि आणीबाणीला पाठिंबा देणारा एकच पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारही दिले नव्हते. इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही काही वेगळी भूमिका घेतली नाही. आजच असे घडले असे नाही, अशी आठवणही त्यांनी काढली.
https://bharatlive.news/?p=109207 ‘तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही’; बंडानंतर शरद पवारांचा ...
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये Years वर्षे पूर्ण करण्याच्या सरकारी कामांचा समावेश असलेला विकास पुस्तिका प्रकाशित केली - योगी सरकारची चार वर्षे: मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारीपासून विका��ापर्यंत आपण काय केले ते सांगितले
योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये Years वर्षे पूर्ण करण्याच्या सरकारी कामांचा समावेश असलेला विकास पुस्तिका प्रकाशित केली – योगी सरकारची चार वर्षे: मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारीपासून विकासापर्यंत आपण काय केले ते सांगितले
_ “_ आयडी”: “60543c94f68efa596b6ff8ad”, “स्लग”: “योगी-आदित्यनाथ-थेट-मुख्यमंत्री-योगी-आदित्यनाथ-प्रकाशन-पुस्तिका–सरकार-कृत्ये-पूर्ण-ऑन-completion-वर्ष-पूर्ण- इन-लकनो “,” प्रकार “:” कथा “,” स्थिती “:” प्रकाशित “,” शीर्षक_एचएन “:” 0 u092f u094b u0917 u0940 u0938 u0930 u0915 u093 u99\ 915 . u093f u0915 u093e u0938 u0924 u0915 u0939 u092e u0928 u0947 u0915 u094d u092f ” u093″ “_ u093 ” ” u0936 u0939…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 3 years ago
Text
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
आमदार वैभव नाईक यांचा आजचा दौरा  कुडाळ: आमदार वैभव नाईक यांचा आजचा दौरा पुढीलप्रमाणे आयोजित केला आहे. दुपारी ३ वाजता सोनवडे येथे भेट, सायंकाळी ४ वाजता घोटगे येथे भेट, सायंकाळी ५ वाजता भरणी येथे भेट, सायंकाळी ६ वाजता जांभवडे येथे भेट, सायंकाळी ७ वाजता कुपवडे येथे भेट अशा भेटी ते गावांना देणार आहेत.तरी त्या त्या विभागातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, जि.
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 15 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या सर्वांना सदस्यत्वाची शपथ दिली. विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ५ जागा अजून रिक्त आहेत.
दरम्यान, या नियुक्त्यांना विरोध करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. मात्र, राज्यपाल निर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची हंगामी स्थगिती नव्हती किंवा सरकारनेही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती. त्यामुळे १२ रिक्त जागांपैकी ७ आमदारांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी अंतिम निर्णय देताना याबाबत मत नोंदवू, असं उच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत सांगितलं.
****
केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. आज दुपारी साडे तीन वाजता यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. 
****
दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत वेगाने पुढे जाणाऱ्या देशांपैकी एक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद २०२४ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. भारतात १२० कोटी मोबाइल फोन वापरकर्ते, ९५ कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि जगातले ४० टक्क्यांहून अधिक रिअल-टाइम डिजिटल व्यवहार होतात, असं पंतप्रधानांनी सांगितलं. स्वस्त उपकरण���, कनेक्टिव्हिटी सर्व कानाकोपऱ्यात पोहोचणं, परवडणारा डेटा आणि डिजिटल-प्रथम या चार स्तंभांवर भारताची डिजिटल दृष्टी काम करते, असं त्यांनी सांगितलं. भारताने अवघ्या दहा वर्षात जेवढे ऑप्टिकल फायबर पसरवलं आहे, ते पृथ्वी आणि चंद्र यांच्यातल्या अंतरापेक्षा आठ पट जास्त आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G बाजारपेठ बनली असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात यावर्षीच्या आठव्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२४ चं ही उद्घाटन करण्यात आलं. 
****
देशाचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती आज साजरी होत आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी आणि विचार विकसित भारताच्या संकल्पपूर्तीमध्ये महत्त्वाचं योगदान देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आजचा लातूर दौरा संभाव्य आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला आहे. प्रशासनामार्फत ही माहिती कळवण्यात आली आहे.
****
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे दया पवार स्मृती पुरस्कार २०२४ चं वितरण येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई इथं होणार आहे. लोकशाही संभाजी भगत हे या पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष असतील. या पुरस्काराचं यंदाचं हे २६ वं वर्ष आहे. प्राध्यापक आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता हे या पुरस्काराचे मानकरी असून या प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून देण्यात येणारा बलुतं पुरस्कार अरुणा सबाने यांना देण्यात येणार आहे. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 
****
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहराला अखेरीस नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने या संदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे इथली ग्रामपंचायत बरखास्त करून आता नगर परिषदेचा दर्जा मिळणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. मुदखेड पंचायत समितीने केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी आणि पशुसंवर्धन, आरोग्य, महिला आणि बालविकास, रोजगार, स्वच्छता आणि पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. आयएसओ मानांकन मिळवणारी ही जिल्ह्यातली तिसरी पंचायत समिती ठरली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन 
पंतप्रधानांचा नियोजित पुणे दौरा रद्द-मात्र तीन परम रुद्र संगणकांचं दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांच्या कोठडीसह २५ हजार रुपये दंड
आणि
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम-पालघर तसंच नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट
****
आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत देश रक्षणासाठी तैनात सैनिकांचं कार्य गौरवास्पद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज लद्दाखमध्ये सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवर असलेल्या सैन्यदलाच्या तळाला भेट देऊन राष्ट्रपतींनी तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला. इथल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले. सियाचीन युद्ध स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून त्यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतरत्न दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचीन दौरा करणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्याच राष्ट्रपती आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमांपैकी तीन परम रुद्र संगणकांचं तसंच हवामान विभागासंदर्भात एक संगणकीय यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य यंत्रणेच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आलं. शास्त्रोक्त संशोधनासाठी सहायक ठरणारे हे परम रुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत.
****
देशांतर्गत कापूस उत्पादनात प्रति हेक्टरी एक टन वृद्धीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. कृषीपाठोपाठ रोजगार देणारं वस्त्रोद्योग हे मोठं क्षेत्र असून सन २०३० पर्यंत या क्षेत्रामध्ये सहा कोटी लोकांना रोजगार देता येतील असा विश्वासही गिररराज सिंह यांनी वर्तवला.
****
देशात सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाल्याचं निरीक्षण राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या खर्चाचं प्रमाण ६४ पूर्णांक दोन शतांश टक्के होतं, २०२१ मध्ये ते प्रमाण ३९ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारन��� आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण १ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांवरून वाढून १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
****
प्रशिक्षण काळातच प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांचं अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचे निर्देश देत, हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खेडकर सध्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला केंद्रीय लोकसेवा आयोग-युपीएससीने विरोध केला आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू असून, अनेक भागात हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी देण्यात आली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
****
लातूर जिल्ह्यात रेणा नदीवरील रेणापूर मध्यम प्रकल्पाचे ४ दरवाजे आज सकाळी १० सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा १ हजार २५८ घनफुट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
****
हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ ��ाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या ��डकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्या निमित्त धाराशिव तालुक्यातील सांजा या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत, अधिक माहिती दिली –
१७ सप्टेंबरपासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये एक पेड माँ के नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये स्वच्छतेचे जे कामं झालेले आहेत, त्या कामाचं उद्‌घाटन, त्याच्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रम���णावर सहभाग हा दैनंदिन उपक्रम राबवतोय. दोन ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्रवर्ग -४ मधील हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा संकलन, वर्गीकरण, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती, सुक्या कचराचे व्यवस्थापन या विषयीची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देण्यात आली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
नांदेड जिल्ह्यात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील पर्यटन स्थळांना चालना आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्��ांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी काम करताना सर्व नियम आणि कायद्यातील तरतुदी याची माहिती घेऊन काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
संयुक्त राष्ट्र संघासह बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या पुनर्रचनेची आवश्यकता भारतानं व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथं जी-20 शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ही भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच रममाण असून, संघटनेनं जगासोबत विकसित होण्याची गरज असल्याचं, जयशंकर यांनी नमूद केलं. जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भेदभावरहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करत असल्याचं, जयशंकर यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या बिडकीन औद्योगिक वसाहतीसह देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टिमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडून, सुमारे ५६ हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
****
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल सर्वाधिक ७१ मिलिमीटर पाऊस खेडमध्ये पडला. हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातीची भातपिकं तयार झाली असून, त्यासाठी असा मोठा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याचं आमच्या वार्तहारानं कळवलं आहे.
****
पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पोषण भी, पढाई भी' या राज्यस्तरीत परिसंवादात त्या बोलत होत्या. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण, आहार आणि शिक्षण देणं हा 'पोषण भी, पढाई भी' या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यावेळी उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती तटकरे यांनी, केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे केली.
****
'स्वच्‍छता ही सेवा' पंधरवड्यात सफाईमित्र सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. यामध्ये साडे तीन हजाराहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचंही आयोजन करण्यात आलं होतं. 
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच�� माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं आज नागपुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते यकृताच्या आजारावर उपचारासाठी रुग्णालयात उपचार घेत होते. केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देणारे मृदुभाषी कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील असं गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी २८ सप्टेंबरला निघणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात सर्व धर्मियांच्या ६० वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील यांनी शेवाळं या पाणवनस्पती पासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पर्यावरण पूरक अशा या प्रयोगाचे पेटंट देखील त्यांनी मिळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शंभर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
��ंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं.
****
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टिमुळं जनजीवन ठप्प झालं आहे. खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून, प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई मनपा क्षेत्रातल्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांच्या वर पोहोचला असून, धरणातून होणार्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा तसंच धुळे जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात काल वीजांसह मुसळधार पाऊस पडला.
****
उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात काल मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत असल्याचं ते म्हणाले.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूर इथं पक्षातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.  विधानसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ५८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना शाह यांनी यावेळी केली.
****
देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक दिल्लीत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल हेल्थ मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं. 
****
देशात २०२३-२४ या वर्षात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ लाख मेट्रिक टनांनी वाढून तीन हजार ३२२ लाख मेट्रिक टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२३-२४ साठी विविध महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाचे अंतिम अंदाज जाहीर केले आहेत. सरत्या वर्षात भात, गहू आणि श्री अन्न यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन विक्रमी झाल्याचं या मंत्रालयानं म्हटलं आहे. व��विध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्राथमिक अंदाज करण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या ��िशात टाकणाऱ्यांवर सरकारनं कारवाई केली असून, यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी बळकट करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत काल झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महाअभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमलनं पाकिस्तानच्या खेळाडुचा सहा - दोन असा पराभव केला.
****
कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडुंमध्ये स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुन्हा रद्द? मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुन्हा रद्द? मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुन्हा रद्द? मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले? मुंबईः कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा (Belgaum Visit) तुर्तास रद्द करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही माहिती दिली. बेळगावच्या लोकांना भेटायचं आहेच… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापुरात राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सोलापूर: शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापूर: शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने
सोलापूर: शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध, राज्यपालांच्या ताफ्याला भगवे झेंडे दाखवत निदर्शने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आजचा सोलापूरचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी एकत्र येऊन राज्यपालांना रोखण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 February 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
पायाभूत सुविधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी पीएम गतीशक्ती योजना महत्वा��ी असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम गतिशक्तीचा दृष्टीकोन आणि यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीचा समन्वय' याविषयी एका वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गतिशक्ती योजना कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण माहितीसह नियोजन करणं शक्य होणार आहे. केंद्र आणि राज्यांमधल्या समन्वयाच्या अभावामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पानं २१ व्या शतकातल्या भारताच्या विकासाची गती निश्चित केली असून, सरकार खूप मोठं ध्येय घेऊन पुढे जात असल्याचं ते म्हणाले. केंद्राने राज्यांच्या मदतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दुर्गम भागात रस्ते संपर्क वाढवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह युक्रेसमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचा दौरा करणार आहेत. यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वप्रकारे मदत करणार असल्याचं सांगितलं.  
****
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ऍट ऑप गंगा हे विशेष ट्विटर हँडल सुरू केलं आहे. नागरिकांना आपल्या सर्व अडचणी यावर पाठवता येतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्वीट संदेशात दिली आहे.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी, रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ, २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एकात्मिक दृष्टिकोन ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रम आज देशभरात आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत २२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विज्ञान सर्वत्र पूज्यते या साप्ताहिक कार्यक्रमाची सांगताही आज होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. संभाजीराजे यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्��दाब आणि शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं असून, अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.
आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे,  त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात, या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं खासदार संभाजीराजे आज वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक होत आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, परवा बुधवारी ही सुनावणी होणार आहे. निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे.
****
वीज दर कमी करा आणि वीज जोडणी तोडण्याची मोहीम थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सूरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज इथल्या एम एस ए बी चं कार्यालय काल पेटवण्यात आलं. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दिवसा दहा तास वीज देणं, वाढी वीज दर रद्द करणं, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन सुरु केलं आहे.
****
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात रावेरी इथं आठवं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन काल पार पडलं. शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक आणि स्तंभलेखिका प्रज्ञा बापट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजिका मधुरा गडकरी यांचे हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं. सामान्य माणसाची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची जाणीव मराठी साहित्यविश्वाला करून देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 February 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.०० **** केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशाच्या वित्तीय तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 'जन-जन का बजेट २०२०-२१' च्या दुसऱ्या टप्प्यावर हैदराबादमध्ये व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधतांना अर्थमंत्री बोलत होत्या. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा-एफआरबीएम डोळ्यासमोर ठेवून २०२०-२१ चा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. प्रथमच अर्थ मंत्रालय विविध ठिकाणी थेट भेटी देऊन लोकांना बजेट समजावून सांगत असल्याचंही त्या म्हणाल्या. **** महाराष्ट्राची पुढची निवडणूक रचनात्मक असेल, ती स्वबळावर लढू. त्या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी आज केला. भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन नवी मुंबईतल्या नेरूळ इथं होत आहे. या परिषदेचं उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तर शेतकऱ्यांनी राज्यपालांन��� फसव्या कर्जमाफीबाबत पत्र लिहावं, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं. **** महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी राज्याच्या सकल उत्पन्नामधला कृषी क्षेत्राचा २८ टक्क्यांचा वाटा आता घटून १२ टक्क्यांवर आला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत घेऊन जा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शर�� पवार यांनी आजचा नाशिक दौरा रद्द केला आहे. मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून. त्यात पवार हे पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळेच त्यांनी आपले नाशिकमधले कार्यक्रम रद्द करून मुंबई गाठल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिकमध्ये आज सायंकाळी राज्य वकील परिषदेचा पवार यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार होता. **** सेलू येथून परभणीकडे जाणार्या खाजगी बसला झालेल्या अपघातात एकजण ठार तर पाचजण जखमी झाले आहेत, आज निपाणी टाकळी जवळ ही घटना घडली. बसच्या स्टेअरींगचा रॉड तुटल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा गेला. बस रस्त्याच्या बाजूला येऊन झाडास आदळली यात बसचा क्लिनर सय्यद नवाब हा खाली पडून जागीच ठार झाला जखमींना सेलू येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जालना शहराचं आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराज समाधी सोहळ्यानिमित्त जुना जालना भागातून आज पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामी मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची आज सांगता झाली. **** वाशिम जिल्ह्यात रिसोड-मालेगाव मार्गावर दुचाकी आणि पिकअपची धडक झाली. या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर पिकअप चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, पुढे जाऊन एका रिक्षाला धडकला. यामध्ये रिक्षाचंही नुकसान झालं. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. **** राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला उद्यापासून ला��ुर इथं सुरवात होत आहे. दगडोजी देशमुख सभागृहात उद्या सकाळी साडे दहा वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून निवडले गेलेले उत्कृष्ट नाट्यसंघ त्यासाठी लातुरात दाखल झाले आहेत. ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम; अमित शहा यांचा मुंबई दौरा स्थगित ** भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ** वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपनं बोलावलेली बैठक शिवसेनेकडून रद्द ** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; १८ नोव्हें��रला घेणार शपथ आणि ** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व जिल्ह्यात उद्या एकता दौडचं आयोजन **** राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम आहे. शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे, त्यात मुख्यमंत्रीपद अडीच- अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे. दरम्यान, भाजप विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी निरीक्षक असतील. राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेत सत्तेचं समान वाटपं करण्याचं ठरलं होतं, मात्र यात मुख्यमंत्री पदाचं समान कालावधीसाठी वाटप करण्याचा निर्णय झाला नव्हता, असं भाजपच्या सूत्रानं सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केलं. याबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर आपल्यासमोर कोणताही निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. राज्यात आपल्या नेतृत्वाखाली महायुतीचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्यासोबतची भेटही रद्द झाली आहे. दरम्यान, राज्यात नव्यानं निवडून आलेले शिवसेनेचे पंचेचाळीस आमदार भाजपशी हात मिळवणी करण्यास तयार असून त्यांना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच हवे आहेत, असं राज्यसभेतले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. **** भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, भाजपाने बोलावलेली आजची बैठक शिवसेनेनं रद्द केली आहे. सत्ता वाटपाच्या पन्नास पन्नास टक्के वाटपाच्या समीकरणावर चर्चा झालेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर चर्चेसाठी कोणताही मुद्याच नसल्याने, बैठक रद्द केल्याचं, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. कॅमेऱ्यासमोर केलेलं विधान मुख्यमंत्री मान्य करत नसल्याचं, राऊत यांनी नमूद केलं. **** शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडावा, उपमुख्यमंत्रिपद घ्यावं, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी, असंही आठवले यावेळी म्हणाले. **** दरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेकडून ठोस काही प्रस्ताव आला तर विचार केला जाईल, असं माज�� मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष स्वत:हून शिवसेनेकडे जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. *** नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार महेश बालदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी ���तदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बालदी यांनी या संदर्भातलं पत्र काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलं. **** न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते १८ नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार १७ नोव्हेंबरला संपणार आहे. न्यायमूर्ती बोबडे यांच्या पदाचा कार्यकाळ सतरा महिन्यांचा असणार आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. **** राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. त्यांच्याकडे देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होणार आहे. यानिमित्त राज्यात जिल्हा मुख्यालयं, महत्त्वाची शहरं असा विविध ठिकाणी रन फॉर युनिटी - एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. **** राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, संपूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी अकोला इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बुलडाणा तालुक्यातल्या चिखला शिवारात पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची काल कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागासोबत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना डवले यांनी केली. नांदेड जिल्ह्यातले भोकरचे आमदार अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना केली. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही काल नांदेड तालुक्यातल्या सावंगी, पुयणी, वाडी ब��द्रुक, चिखली आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचमाने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पीक विमा कंपनीनं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशी मागणी विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची शिवसेनेच्या वतीनं आज पाहणी करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व आमदार, नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे जिल्ह्यात आठही तालुक्यातल्या विविध गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. **** नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. यामुळे कांद्याचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. **** भाऊबिजेचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी पाड्यावर अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. काँग्रेस नेत्या डॉ स्वाती वाकेकर आणि डॉ संदीप वाकेकर यांनी आदिवासी बांधवाना ओवाळून भेटवस्तू वाटप केल्या. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या लहान या गावातही स्वरानंद संचच्या वतीनं संगीत दिवाळी पहाट हा भावगीत, भक्तीगीत तसंच मराठी हिंदी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमानं भाऊबीज साजरी करण्यात आली. औरंगाबाद शहरात काल भाऊबिजेच्या दिवशी हेल्यांचा सगर काढला जातो. यावेळी पशुपालकांनी शहरातला बिबी का मकबरा, फकीरवाडी इथलं श्रीकृष्ण मंदीर आणि नवाबपुऱ्यात सजवलेल्या हेल्याचं पूजन करुन त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. सगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पोटूळ ते लासूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचं एका स्थानिक शेतकऱ्यानं लक्षात आणून दिल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई-नांदेड-हैदराबाद मार्गावरच्या गाड्यांची गती ताशी ३० किलोमीटरपर्यंत कमी केली जाणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल, असं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. **** पंढरपूर -रिसोड एस टी बसचा काल परळी शहराजवळ संभाव्य अपघात दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे टळला. या धावत्या बसच्या ��ागच्या दोन चाकांच्या जोडीपैकी एक चाक निखळून पडल्याचं पाहताच, गणेश यतोंडे आणि रोहित सातपुते या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. बसमधल्या सुमारे साठ प्रवाशांनी या दोघांनी सतर्कतेनं अपघात टाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ****
0 notes