#अॅथलेटिक्स
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ डिसेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तीन पिकांच्या वाणांना भारतीय संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. तूर बी डी एन २०१३-२ रेणुका, सोयाबीन एम ए यु ७२५ आणि करडई पिकाच्या पी बी एन एस १५४ परभणी सुवर्णा या तीन वाणांचा यात समावेश आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून राज्य क्रीडा महोत्सवाला सुरवात होत आहे. अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो या पाच क्रीडा प्रकारात होणाऱ्या या महोत्सवात दोन हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी काढण्यात आलेली तुळजापूर ते औरंगाबाद मशाल रॅली आज औरंगाबाद शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत विद्यापीठ परिसरात दाखल होत आहे. आज दुपारी तीन वाजता या स्पर्धांचं उद्घाटन होत आहे.
****
नांदेड शहरात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादामध्ये दिव्यांगांसाठी न्यायालयीन तरतुदी, दिव्यांगत्व निर्मुलनासाठी शीघ्र निदान आणि उपचाराचे महत्त्व या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहेत.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ६ डिसेंबरपर्यंत ‘समता पर्वा’चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आज लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
समता पर्व दिनानिमित्त काल नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील अन��सूचित जाती तसंच नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना भेटी दिल्या.
//*********//
0 notes
Text
नीरज चोप्रानं रचला इतिहास, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
नीरज चोप्रानं रचला इतिहास, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
नीरज चोप्रानं रचला इतिहास, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अमेरिकेतील ओरगॉनमध्ये सुरू असलेल्या अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं रौप्य पदक मिळवलं आहे. नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अमेरिकेतील ओरगॉनमध्ये सुरू असलेल्या अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं…
View On WordPress
#sports news#अॅथलेटिक्स#इतिहास#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#चॅम्��ियनशिपमध्ये#चोप्रानं#नीरज#पदक#भारत लाईव्ह मीडिया#रचला#रौप्य#वर्ल्ड#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
अॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच
अॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच
पंचकुला, ९ (क्रीडा प्रतिनिधी) : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांची मालिका सुरूच आहे. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले. जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १००…
View On WordPress
0 notes
Text
Neeraj Chopra: नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
Neeraj Chopra: नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
Neeraj Chopra: नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव लौकिक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव लौकिक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने जागतिक…
View On WordPress
#chopra#neeraj#sports news#अंतिम#अॅथलेटिक्स#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#चॅम्पियनशिपच्या#चोप्रा#जागतिक#नीरज#फेरीत#भारत लाईव्ह मीडिया#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
अविनाश साबळेने आशा पल्लवीत केल्या; जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूपुत्राची फायनलमध्ये धडक
अविनाश साबळेने आशा पल्लवीत केल्या; जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूपुत्राची फायनलमध्ये धडक
अविनाश साबळेने आशा पल्लवीत केल्या; जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूपुत्राची फायनलमध्ये धडक Avinash Sable: महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळेने अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत फायनलमध्ये प्रवेश केलाय. Avinash Sable: महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळेने अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील ३ हजार मीटर अडथळ्यांच्या…
View On WordPress
#sports news#अविनाश#अॅथलेटिक्स#आशा#केल्या#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#जागतिक#धडक#पल्लवीत#फायनलमध्ये#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्राच्या#साबळेने#सूपुत्राची#स्पर्धेत#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 August 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ आठ नोव्हेंबर पर्यंत असेल.
****
चालू आणि पुढच्या आर्थिक वर्षातही भारताचा अर्थव्य��स्था वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के असेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं देखील पुढच्या दोन वर्षात भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर सर्वात जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. भारतात आज नवनवीन गुंतवणुकदार आकर्षित होत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २५ लाख ८६ हजार ८०५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ३९ लाख ८१ हजार ४४४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या नऊ हजार ५२० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२ हजार ८७५ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८७ हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नागपुरात तान्हा पोळा सणा निमित्त निघणाऱ्या मारबत मिरवणुकीला आज सकाळी सुरुवात झाली. पिवळी मारबत नागोबा देवस्थान इथून तर काळी मारबत नेहरु पुतळा येथून निघाली. १४२ वर्षांची परंपरा असलेली ही मिरवणूक 'इडा पिडा घेऊन जा रे मारबत' हा संदेश देत काढली जाते. या मिरवणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बडग्याच्या प्रतिकृतीद्वारे समाजातल्या अनिष्ट रूढी, सामाजिक राजकिय मुद्यांवर लक्ष वेधलं जातं. गोंदिया मध्ये देखील मारबतचा जल्लोष पहायला मिळाला.
****
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेश बागूल याला २८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातल्या स्वयंपाक गृहाच्या उभारणीसाठी ठेकेदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यानं केली होती. त्याच्या पुण्यातल्या घराच्या झडतीत ४८ लाख रुपये तर नाशिकच्या घरातून ९८ लाख रुपये अशी एकूण एक कोटी ४६ लाख रुपयांची रोकड���ी विभागानं जप्त केली आहे.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रानं लुसाने डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक शून्य आठ मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं ही कामगिरी केली असून, ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या विजयामुळे नीरज डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, ही स्पर्धा सात आणि आठ सप्टेंबरला स्विज्झर्लंडमध्ये होणार आहे.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सात्विक - चिराग जोडीला मलेशियाच्या जोडीकडून २२ - २०, १८- २१, १६ - २१ असा पराभव पत्करावा लागला.
****
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ - फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ - ए आय एफ एफ वर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. निलंबन मागे घेतल्यामुळे भारतात १७ वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फिफाच्या या निर्णयावर क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरु करण्यात आला आहे. धरणाचे दहा दरवाजे अर्धा फूट उघडून पाच हजार २४० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पहाता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
राज्यातला पाऊस ओसरू लागला असला तरी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उद्यापासून ३० ऑगस्टपर्यंत काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
· राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण; संध्याकाळी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण.
· पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे फेरी विक्रेत्यांना मोठा आधार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
· उदयपूर तसंच अमरावती हत्या प्रकरणांच्या निषेधात सकल हिंदू समाजाचा औरंगाबाद इथं मूक मोर्चा.
· लातूर जिल्ह्यात नागरी सहभागातून मांजरा नदीच्या दहा किलोमीटर काठालगत वृक्ष लागवड.
आणि
· जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्यपदक.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं आकाशवाणीवरुन थेट प्रसारण केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू या उद्या सकाळी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. त्यानंतर नवनिवार्चित राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.
****
कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळं मोठा आधार मिळाला. अनेक लोकांचे संसार वाचले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत झाली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं डोंबिवली इथं पथ विक्रेत्यांसाठी स्वनिधी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. यावेळी बोलताना, राज्य शासन लवकरच पुढील शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला असून सर्वसामान्यांचं जीवन सुरक्षित करण्याचं काम विमा योजनेमुळं झालं असल्याचं नमूद केलं.
****
खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचं, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तसं पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध तालुकाप्रमुखांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख ८३ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ९९ लाखांहून अधिक नागरिकांना मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
ई -विवरणपत्र सादर करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ, सोपी आणि अद्ययावत झाली आहे. ई-विवरणपत्र सादर करण्यासाठी 'इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही डॉट इन' या नव्या पोर्टलची सुरूवात करण्यात आली असून त्यात करदात्यांच्या सोयीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यात आला आहे.
****
उदयपूर, अमरावती तसंच देशातील विविध भागात झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट इथून निघालेला हा मोर्चा टिळकपथ, गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक परिसरात विसर्जित झाला. भर पावसाताही हिंदू समाज बांधव, विशेषत: महिला आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. विविध संस्था, संघटना, समाज, पंथ, राजकीय पक्ष, तसंच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दंडावर काळ्या फीती बांधून उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभाग घेतला. औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामंतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पारीत केल्याबद्दल मोर्चात सहभागी संत मह��तांनी आनंद व्यक्त केला. शासन स्तरावर उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
****
लातूर जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून आज मांजरा नदीच्या दहा किलो मीटर काठालगत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड मोहिमेचं औपचारिक उदघाटन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या चौदा गावात १० किलोमीटरची मानवी साखळी, करून २८ हजार वृक्षाची लागवड यावेळी करण्यात आली. यानिमित्ताने वृक्षदिंडीही काढण्यात आली. कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
****
अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज रौप्यपदक पटकावलं. नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १३ मीटर भालाफेक करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या यशाबद्दल नीरजने सर्वांनी दिलेल्या सहकार्याने ही कामगिरी करू शकल्याची भावना व्यक्त केली. यापुढे अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला –
बहोत अच्छा लग रहा है आज सिल्व्हर जीता है देश के लिये। और अभी अगले साल फिर हमारी वर्ल्ड चॅम्पियनशिप मे कोशिश करेंगे की वहां पर इससे बेहतर करें। और बहोत बहोत थँक यू करता हूं साई का, फेडरेशन का और हमारी गव्हर्नमेंट का, जिन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और बाहर ट्रेनिंग के लिए भेजा है और जिससे मै हर कॉम्पिटीशन खेल सकता हूं बाहर के जो इंटरनॅशनल कॉम्पिटीशन होते है। और आशा करता हूं की ऐसे ही हर स्पोर्ट मे हमको सपोर्ट मिलता रहेगा। और हमारा देश तरक्की करेगा स्पोर्ट्स मे।
या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९० पूर्णांक ५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं. भारताचा अन्य एक भालाफेकपटू रोहित यादव ७८ पूर्णांक ७२ मीटर अंतरावर भाला फेकून दहाव्या स्थानावर राहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल नीरजचं अभिनंदन करत आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजचा हा ऐतिहासिक विजय असून भारतीय क्रीडा विश्वाचा हा मोठा गौरव असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही नीरजचं अभिनंदन केल�� आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज त्रिनिदादमध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
भागवत धर्माची पताका देशभर पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं आज कामिका एकादशी अर्थात परतवारी निमित्त दर्शनासाठी भाव��कांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटे चार वाजता शासकीय महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. कोरोना विषाणूच्या संकटानंतर प्रथमच परतवारी निर्बंधमुक्त झाल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीहून परतीच्या मार्गावर असलेल्या शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं. आज आणि उद्या पालखीचा शहरात मुक्काम असून परवा पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.
दरम्यान, आज कामिका एकादशी पर्वावर संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरहून पैठणला पोहचणार असल्यानं हजारो भाविकांनी पैठणला नाथ पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
****
राज्य परिवहन महामंडळ -एसटीची सोलापूर -गाणगापूर बस आज अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर एका शेतालगत उलटली. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दुखापतग्रस्त किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासकीय खर्चानं जखमी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या आहेत.
****
राज्यात शिक्षक भरती तत्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद इथं या संदर्भात पत्रकार परिषदत घेतली. शासनानं शिक्षकांच्या जागा राज्य सेवा आयोग -एमपीएसीसी द्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एमपीएससीद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्याला विलंब होणार असल्यानं शासनानं तातडीनं शिक्षक भरती करण्याची मागणी माजी आमदार विजय गव्हाणे यांनी यावेळी केली.
****
0 notes
Text
World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…”
World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…”
World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…” जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर…
View On WordPress
#athletics#championship#sports news#world#अनुकूल#कामगिरी#केल्यानंतर#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#चोप्रानं#दिली#नसूनही#नीरज#प्रतिक्रिया#भारत लाईव्ह मीडिया#म्हणाला…#रुपेरी#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या#हवामान
0 notes
Text
तेजस्विनचा गुणवत्तेनुसार राष्ट्रकुलसाठी विचार करावा! ; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
तेजस्विनचा गुणवत्तेनुसार राष्ट्रकुलसाठी विचार करावा! ; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
तेजस्विनचा गुणवत्तेनुसार राष्ट्रकुलसाठी विचार करावा! ; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश राष्ट्रीय महाविद्यालयीन अॅथलेटिक्स संघटनेच्या अजिंक्यपद स्पर्धेत तेजस्विनने पात्रता निकष पूर्ण केले आहेत. नवी दिल्ली :बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आलेला उंच उडीपटू तेजस्विन शंकरच्या कामगिरीचा गुणवत्तेनुसार विचार करावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय अॅथलेटिक्स निवड…
View On WordPress
0 notes
Text
देवेंद्रला पद्मभूषण, तर नीरजसह आठ जणांना पद्मश्री पुरस्कार
देवेंद्रला पद्मभूषण, तर नीरजसह आठ जणांना पद्मश्री पुरस्कार
देवेंद्रला पद्मभूषण, तर नीरजसह आठ जणांना पद्मश्री पुरस्कार नवी दिल्ली : अपंग क्रीडापटू देवेंद्र झझारियाला मंगळवारी पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याचप्रमाणे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह आठ जणांना प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नीरज हा ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात सुवर्णपदक…
View On WordPress
0 notes