#अवमान
Explore tagged Tumblr posts
Text
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा
महापुरुषांचा अवमान सहन न उदयनराजे तडकाफडकी राजीनामाही देतील; सुषमा अंधारेंचा टोमणा पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. परंतु, उदयनराजेंनी कोणतेही भाष्य न केल्याने सुषमा अंधारे यांनी टोमणा मारला आहे. उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपचा राजीनामाही देतील,…
View On WordPress
0 notes
Text
न्यायालय अवमान क्या है एंव इसके प्रकार | Contempt of Court in Hindi
न्यायालय अवमान क्या है? न्यायालय अवमान अधिनियम, 1971 की धारा 2(क) के अनुसार न्यायालय अवमान से सिविल एवं आपराधिक अवमान अभिप्रेत है लेकिन यह शाब्दिक परिभाषा नहीं है। वस्तुतः न्यायालय के अवमान से तात्पर्य – (i) न्यायालय के आदेशों एवं निर्णयों की साशय अवज्ञा ��रना, अथवा (ii) न्यायालय के कार्य में विघ्न उत्पन्न करना, अथवा (iii) न्यायाधीशों के साथ अभ्रद व्यवहार करना है। न्यायालय के अवमान के लिए अधिवक्ता…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वन रँक-वन पेन्शनच्या अंमलबजावणीला आज दहा वर्षे पूर्ण झाली. वन रँक-वन पेन्शन म्हणजे निवृत्त सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळं मदत झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सैन्यदलाच्या बळकटीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गोवा भेटीवर आहेत. राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या विविध सरावांची पाहणी करणार आहेत. यामध्ये जमिनीवरील जहाज मोहीम, कॉम्बॅट ऑपरेशन्स, पाणबुडी ऑपरेशन्स आणि बचाव आणि मदतकार्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयएनएस विक्रांतची प्रथमच पाहणी करत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना आयोगाकडून टपालाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू केलं जाणार नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ३७० कलम लागू करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करायचा का, असा सवाल उपस्थित करुन हे कलम हटवल्यामुळे राज्यातील दहशतवादी घटना कमी झाल्याचं इराणी यांनी नमूद केलं. दरम्यान, ३७० कलमाच्या पुनरूज्जीवना संदर्भातील ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत स��्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे आज सभागृहात गदारोळ झाला.
ग्राहक ओळख पटवणे- केवायसीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन अथवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी ग्राहक देय परिश्रम कस्टमर ड्यू डिलिजन्स साठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून छटपूजेनिमित्त ११ तारखेपर्यंत रेल्वेच्या १६० विशेष फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ७ हजार ६०० विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागातूही पानिपतसाठी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान चार जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात किनवट दौऱ्यावर आहेत. किनवट मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्यात लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवार निवडणूक लढवत आहे. किनवट इथल्या सभेनंतर फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन जाहीर सभा नियोजीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दर्यापूर, तिवसा, बडनेरा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले.
प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचं परवा मंगळवारी दिल्लीत निधन झालं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा उद्या��ासून बीड इथं होणार आहेत. विद्या��ीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत ३५ संघ सहभागी झाले आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
Text
Pimpri : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही - काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील (Pimpri) राजकोट परिसरामध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान…
0 notes
Video
youtube
नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाय : ठाकरे #news #indianpolit...
0 notes
Text
' बरं झालं गेलो नाही ' , शरद पवार यांची रोखठोक भूमिका कारण..
नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी तब्बल वीस राजकीय पक्षांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन करता राष्ट्रपतींचा अवमान करत स्वतःच संसदेचे उद्घाटन केल्याने बहिष्कार टाकलेला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनाला गेलो नाही याचे मला समाधान वाटते आहे , असे…
View On WordPress
0 notes
Text
“नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म”
मुंबई | स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, असं पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत, असंही ते म्हणालेत. मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटतं, असं त्या म्हणाल्यात. सौमित्र खान त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. खान यांचे विधान म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा अवमान आहे. स्वामी विवेकानंद यांची विचारधारा ही भाजपाच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात आहे, असं हकीम म्हणाले. Read the full article
0 notes
Video
youtube
#nbinewsmarathi:हिंदू देवतांचा अवमान केल्याबद्दल सुषमा अंधारेवर कायदेशीर...
0 notes
Text
महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पाचोऱ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पाचोऱ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्ये करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या आवमानाचा निषेध करण्या���ाठी पाचोरा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रात सद्यस्थितीत भाजपाच्या वाचाळ विरांनी महापुरुषांवर चुकीचे वक्तव्य केल्याचा…
View On WordPress
0 notes
Text
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
Udayanraje Bhosale : नूपुर शर्मा प्रमाणे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात पुण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उदयन राजे यांनी कारवाईची मागणी केली. Udayanraje Bhosale : छत्रपती…
View On WordPress
#‘नूपुर#bhosale#udayanraje#अपडेट न्यूज#अवमान#आजची बातमी#आताची बातमी#उदयनराजे#ऑनलाईन बातम्या#करणाऱ्यांवर#करा#कारवाई;#खासदार#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#प्रमाणे#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भोसले#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मागणी#यांची#लेटेस्ट बातमी#शर्मा#शिवरायांचा
0 notes
Text
अभिलेख न्यायालय क्या है ? अभिलेख एवं अधीनस्थ न्यायालय में अन्तर | Court of Record?
इस आलेख में संविधान के अनुच्छेद 129 एंव 215 के तहत अभिलेख न्यायालय किसे तथा क्यों माना गया है? और अभिलेख न्यायालय एवं अधीनस्थ न्यायालय में क्या अन्तर के बारें में बताया गया है| अभिलेख न्यायालय | Court of Record संविधान के अनुच्छेद 129 के अन्तर्गत उच्चतम न्यायालय को एवं संविधान के अनुच्छेद 215 के अन्तर्गत उच्च न्यायालय को अभिलेख-न्यायालय घोषित किया गया है तथा इन न्यायालयों को अपने अवमान के लिए…
View On WordPress
#Court of Record#Law notes in hindi#अनुच्छेद 129#अनुच्छेद 215#अभिलेख न्यायालय#अभिलेख न्यायालय की विशेषताए
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्ण पदक, पदकांची संख्या २६ वर
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथं, जल संचय जन भागीदारी, या अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून, पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जल संचयानेच तोडगा निघू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीत शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
****
नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखां��र पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं, त्यांनी आज समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
****
पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत, या विकासाच्या मंदिराचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिलह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील म्हणाले.
आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणंघेणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे, अशी टीका त्यांनी केली.
****
निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची टीका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला असून, जनता त्रस्त आहे, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु केलेली ही योजना असून, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भिती दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र, महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल, असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून, गेल्या दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री केली जात आहे.
****
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याचं, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोक���श चंद्र यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात २८ गावं पूर प्रभावित झाली होती. या गावामध्ये आता आरोग्य सेवा सुरळीत राहावी, साथ रोग पसरू नये, यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून, ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे, तिथे घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी आज १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
****
भंडारा पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत १६७ किलो गांजा पकडला. याप्रकरणी एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात आडोळी ते वाळकी दरम्यान असलेल्या ३५ टोलवरची १८० मीटर विद्युत तार चोरणाऱ्या ४ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलिस प्रशासनाने माध्यमांना माहिती दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे.
नौकायन स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या २०० मीटर टी - 12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने देखील उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या ४०० मीटर टी - 47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २६ पदकं जिंकून पदकतालिकेत १७ व्या स्थानावर आहे.
****
२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हीनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र ख��ल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
****
0 notes
Text
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि जत तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडण्याचा प्रकार पाहता मागील तीन वर्षांपासून स्वाभिमानाची भाषा करणाऱ्या सरकारने या प्रकारावर ज्या पद्धतीने चुप्पी साधली आहे ते पाहता कर्नाटकने सोडलेल्या पाण्यातच राज्य सरकारने जलसमाधी घ्यावी, असे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये प्रचार सुरू…
View On WordPress
0 notes
Text
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि जत तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडण्याचा प्रकार पाहता मागील तीन वर्षांपासून स्वाभिमानाची भाषा करणाऱ्या सरकारने या प्रकारावर ज्या पद्धतीने चुप्पी साधली आहे ते पाहता कर्नाटकने सोडलेल्या पाण्यातच राज्य सरकारने जलसमाधी घ्यावी, असे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये प्रचार सुरू…
View On WordPress
0 notes
Text
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
तो महाराष्ट्राचा अवमान नाही का ? , संजय राऊत म्हणाले की.
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि जत तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडण्याचा प्रकार पाहता मागील तीन वर्षांपासून स्वाभिमानाची भाषा करणाऱ्या सरकारने या प्रकारावर ज्या पद्धतीने चुप्पी साधली आहे ते पाहता कर्नाटकने सोडलेल्या पाण्यातच राज्य सरकारने जलसमाधी घ्यावी, असे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये प्रचार सुरू…
View On WordPress
0 notes