#residentialcareformentallychallengedadults
Explore tagged Tumblr posts
hugepunch1 · 3 years ago
Text
भविष्यातील योजना
भविष्यातील योजनांचा विचार करताना या वर्षामध्ये असवलीमध्ये पक्क्या घरांचे बांधकाम सुरु करणे, हा विचार प्रामुख्याने पुढे येतो. यासाठी अनेक पातळ्यांवर मदत लागणार आहे. ती मदत मिळविण्यासाठी हितचिंतकांना भेटणे हे महत्त्वाचे काम या वर्षात करायचे आहे. जसे बांधकाम होत राहील त्याप्रमाणे मुलांना प्रवेश देणे, त्या प्रमाणात मुलांच्या मदतीकरता सहकारी वाढवणे व हे करताना सगळ्यात महत्त्वाचे, मारुंजीसारखीच सिस्टिम इथे बसेल याची काळजी घेणे. मला खात्री आहे असवली घराची चांगली सिस्टिम लवकर बसेल कारण आम्ही कुसगावचे घर जवळजवळ दोन वर्षे यशस्वीपणे चालविले होते.
लहान मुलांच्या पालकांशी संवाद साधायचा आहे. विशेष मुलाला वाढवताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा, त्यांना जास्तीत जास्त प्रेम देऊन सुरक्षित भावना देऊन स्वावलंबी कसे बनवावे, फाजील लाड न करता त्यांना शिस्त कशी लावावी व सर्वात महत्त्वाचे त्यांच्या भविष्याचे नियोजन कसे करता येईल? व ते का करणे गरजेचे आहे? या व याशिवाय अनेक विषयांवर पालकांशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करायची इच्छा आहे. अन्य पालकांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना नवनव्या कल्पना राबवून बघण्यास प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्याबरोबर संवाद वाढवायचा आहे. यामुळे अनेक पालकांचे आयुष्य सुसह्य होईल व विशेष मुलांनाही चांगले आयुष्य मिळू शकेल.
एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी जास्त संस्थांमार्फत पोहोचायचे आहे. या प्रोग्रॅमचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे. १४ वर्षांवरील विशेष मुलांसाठी असलेली ‘हॉलिडे होम’ ही संकल्पना जास्त पालकांपर्यंत पोहोचवायची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणली तर मुलांच्या भविष्यातील पुनर्वसनाला कसा फायदा होतो, हे पालकांना समजावून द्यायचे आहे. पालकांना नवक्षितिजसारखी निवासी कार्यशाळा काढण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करायचे आहे. मी अदितीच्या बाबतीत हे केलेले असल्यामुळे माझा या संकल्पनेवर विश्वास आहे.
काळजीवाहकांसाठी सुरु केलेल्या कोर्ससाठी जास्त संस्थांनी कर्मचारी पाठवावेत, यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुलांच्या निवासी कार्यशाळा चालवताना अनेक स्तरावर अडचणींचा सामना संस्थाचालकांना करावा लागतो. नियमित भेटल्यामुळे संस्थाचालकांमधील सुसंवाद वाढेल व एकमेकांना अडचणीच्यावेळी मदत करायची भावना वाढीला लागेल. यासाठी निवासी कार्यशाळेच्या संस्थाचालकांनी नियमित भेटावे, याकरता प्रयत्न करून याचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे.
इंग्लिशमध्ये असलेली कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचे (ऑपरेशन मॅन्युअल) मराठी भाषांतर छापून, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचा वापर कसा करावा? याबाबतीत इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यशाळा घ्यायच्या आहेत.
शाळेचा विस्तार करायचा आहे. शाळा व स्वमग्न मुलांसाठीची कार्यशाळा, याची घडी अजून नीट बसवायची आहे. निवासी कार्यशाळेच्या सिस्टिम अजून व्यवस्थित बसवायच्या आहेत. नवक्षितिजचे फंड रेजिंगचे काम सातत्याने व कार्यक्षमतेने होण्यासाठी, या क्षेत्रातील तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे.
या सगळ्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेकांची मदत लागणार आहे. आतापर्यंत जसे तुमचे संवेदनशील सहकार्य मिळाले तसेच पुढेही मिळेल, याची मला खात्री आहे. https://navkshitij.org/26-bhavisyatila-yojana
0 notes
hugepunch1 · 3 years ago
Text
Understand, Assimilate, Forgive: A Friend Shows Us How
Tumblr media
ANAND, a special friend with Down’s syndrome, is a quiet boy with a good sense of what is fair and unfair. One day, at my weekly meeting with Friends, he complained about Friend Chaitanya who did not allow him to take solar water first. “I am very angry today because I thought it was unfair,” he told me. We discussed the issue at length. Chaitanya explained that he wanted the water for his friend who was ill and therefore took the water first. He said he had later realised his mistake and had apologised to Anand that morning itself. But Anand was still upset. However, at the meeting, he listened to Chaitanya’s explanation patiently. At the end of the discussion, I asked him whether he was happy with the explanation and he said, yes. The two shook hands immediately.
Both Anand and Chaitanya are Caregiver Assistants and they have the responsibility of helping the caregivers run their home well. Immediately after the weekly meeting with friends, we have our monthly meeting with caregiver assistants, caregiver coordinators and assistant manager. At the start of the meeting, Anand told me that after hearing Chaitanya’s explanation he thought it was okay for him to have taken the water first because he was helping another friend. “Now I am feeling peaceful. I am not angry.” He forgave his friend and it helped him to release his own anger. I felt so good that he could voice his trouble and was able to work on it. Life will be so beautiful for us too if we also practice forgiveness on a regular basis. https://navkshitij.org/understand-assimilate-forgive-a-friend-shows-us-how
0 notes
hugepunch1 · 3 years ago
Text
Good Insight into Indian Culture
I spent the last six weeks working as a volunteer at Navkshitij. Because the volunteer room was not available, I stayed under one roof with the special friends during my visit. Besides some minor challenges that arose because of that constellation, it wasn’t a problem for me at all. Looking back, I think that I got an even better impression of the special friends' everyday life because of that.
Tumblr media
I am happy to have been able to help in all the different workshop units as well as in the Day School. I had never worked with specially-abled young children before and found it really interesting to see how they learn basic motor skills with little exercises and games in a small group with individual support as per everyone’s abilities.
It was also great to be involved in other activities ranging from playing games with the special friends or staff members to teaching tricks on the trampoline. Through participating in the trips and treks, I was also able to see a great deal of the beautiful green Indian nature during the rainy season.
Special events like the stall at BMC and the drama class for the special educators were also really exciting for me, especially because of my previous drama play experience in Germany.
I enjoyed my stay at Navkshitij, and am thankful for the great experience. Although I only stayed for a short time, I feel like I’ve got a good insight into the Indian culture and will go home with great memories.
0 notes
hugepunch1 · 4 years ago
Text
THE SPIRIT OF NAVKSHITIJ - HINDI
करोना व्हायरस सध्या सर्व जगभर धुमाकूळ घालत आहे . भारतामध्ये सुध्दा सध्या करोना व्हायरस पसरत आहे. नवक्षितिज सारख्या मतिमंद प्रौढ व्यक्तींचे जन्मभरासाठी पुनर्वसन करणाऱ्या संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागतंय. नवक्षितिज मधील विशेष मित्रमैत्रिणींना घरी पाठवणे हा एक पर्याय उपलब्ध होता पण तो पर्याय घेणे मी व माझ्या सहकाऱ्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पटण्यासारखा नव्हता. त्यामुळे आम्ही त्या पर्यायाचा विचारच केला नाही. अनेक विशेष मित्रमैत्रिणींचे आईवडिल वयस्कर आहेत तर काहींचे आई वा वडील मृत्यू पावलेले आहेत तर काही विशेष मित्रमैत्रिणींचे आईवडील दोघेही मृत्यू पावलेले आहेत. दिवसभर विशेष मित्रमैत्रिणीं घरी करणार काय? कंटाळा येऊन त्यामुळे अनेक व��्तुणूक समस्या सुरू व्हायची भीती असते. ही परिस्थिती हाताळणे पालकांना फार अवघड जाते.
नवक्षितिज मधील कार्यशाळेची सुरुवात प्रार्थनेपासून होतो
सध्या नवक्षितिज मध्ये मारुंजी येथे ५० मित्रमैत्रिणीं तर आसवली येथे ८ विशेष मित्र रहात आहेत. दोन्ही शाखा मिळून ५ जण काही कारणाने घरी गेलेले आहेत. नाईलाजाने त्यांना १५ एप्रिल पर्यंत घरीच थांबायला सांगितले आहे. शाळा, स्वमग्न विभाग व कार्यशाळेसाठी दिवस भरासाठी येणारे २४ विशेष मित्रमैत्रिणींना १५ एप्रिल पर्यंत घरीच थांबायला सांगितले आहे. शाळा, स्वमग्न विभाग बंदच ठेवला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल नंतरच परत कामावर येण्यास सांगितले आहे. ही काळजी नवक्षितिज मध्ये राहणारे विशेष मित्रमैत्रिणी, निवासी कर्मचारी व त्यांची मुले यांना करोना व्हायरसची लागण होऊ नये याच साठी घेतलेली आहे. यामुळे मुख्य आव्हान उभे राहिले मारुंजी येथील निवासी कर्मचारी यांच्या समोर कारण स्वयंपाघरात काम करणारी फक्त एकच निवासी कर्मचारी आहे बाकी तीन जणी जवळच्या गावांमधून येणाऱ्या होत्या. इतर विभागामधील गंगा, मंजुळा व आशा यांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे विशेष मित्रमैत्रिणींना नेहमीच्या वेळापत्रकानुसार जेवण मिळत आहे.
नवक्षितिज मधील निवासी सहकारी स्वयंपाकघरात स्वादिष्ट आणि रुचकर जेवण बनवताना
कार्यशाळेमध्ये आठ कर्मचाऱ्यांच्या ऐवजी कार्यशाळा व्यवस्थापक मुंडे, कार्यशाळा सहाय्यक अनुराधा व मोरे मावशी मिळुन सकाळी ११ ते संध्याकाळी ४.३० असे नेहमी प्रमाणे कार्यशाळेचे कामकाज चालू ठेवले आहे. यामुळे विशेष मित्रमैत्रिणींना सकारात्मक दिनक्रम मिळतो व त्याची उर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते व याचा फायदा त्यांना मानसिक स्थिरता येण्यात होतो.
विशेष मित्र मैत्रिणी कार्यशाळेत आपल्या विभागात बसून काम करताना (सोबत अनुराधाताई मुंडे आणि संतोष मुंडे सर)
काळजीवाहक समन्वयक साईनाथ, सुविधा समन्वयक तिरुपती व दत्ता हे तिघे ३५ विशेष मित्रांची तर सखुताई एकट्या १५ विशेष मैत्रिणींची काळजी घेत आहेत. कारण दुसरी काळजीवाहक गंगा स्वयंपाकघरात मदत करत आहे. विशेष मित्रमैत्रिणींचा सकाळचा व्यायाम, त्यांना अंघोळीच्या वेळी लागणारी मदत, त्यांचे कपडे धुऊन ते व्यवस्तीत ठेवणे,सकाळ व संध्याकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण. याशिवाय येणारी आजारपणे, जरुर असेल तर दवाखान्यात नेणे, नेहमी चालू असणारी औषधे वेळेवर देणे, त्यांचा वेळ जाण्यासाठी कॅरम, सापशिडी, रंगवायला पुस्तके देणे, टी व्ही ला��ून देणे ही व अशी अनेक कामे काळजीवाहक रोजच्यारोज न कंटाळता करत असतात. याच बरोबर त्यांना विशेष मित्रमैत्रिणींच्या वर्तवणूक समस्यापण हाताळाव्या लागतात.
काळजीवाहक सखुताई आपल्या मुलींसोबत ; दत्ता दादा, साईनाथ दादा आणि तिरुपती दादा विशेष मित्रांसोबत
बागकामासाठी पूर्णवेळ तीन कर्मचारी असतात सद्यस्थितीत एकटा ओंकार विशेष मित्रांच्या मदतीने बागेला पाणी घालणे, बाग झाडणे व इतर स्वच्छता करतो.
ओंकार दादा बागेची काळजी घेताना
कार्यालयीन कामासाठी कार्यालयात ४ कर्मचारी असतात सध्या फक्त व्यवस्थापक वायाळ हे काम करत आहेत. ८१ वर्षांच्या वसुधा दिवेकर या संस्थापक विश्वस्त तिथेच राहून या सर्वाना प्रोत्साहन देत आहेत.
जनरल मॅनेजर आपरेशन्स व्यवस्थापक रामेश्वर, सुविधा व्यवस्थापक सूर्यवंशी व मी आम्ही सतत निवासी सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना तिथे जाऊन मदत करायच्या इच्छेला आवर घालून त्यांना करोना व्हायरस पासुन सुरक्षित रहाण्याच्या दृष्टीने आमची जबाबदारीची भूमिका पार पाडत आहोत. त्यांना काहीही अडचण आली तरी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्या सर्वांना आहे.
आसवली येथील कार्यशाळा व्यवस्थापक मव्हाळे, राम , संतोष, राणी, साधना व अश्विनी मिळून तेथील विशेष मित्रमैत्रिणींची खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने काळजी घेत आहेत.
आसावली शाखेचे विशेष मित्र आणि सहकारी
नवक्षितिजचे मारुंजी येथील १४ निवासी कर्मचारी विशेष मित्रमैत्रिणींची खूप प्रेमाने व संवेदनशीलतेने काळजी घेत आहेत. खूप जास्तीची जबाबदारी घेऊन प्रयत्नपूर्वक ते हे सर्व करत आहेत हे बघून त्यांचे खूप कौतुक वाटते. ज्या ज्या वेळी नवक्षितिज मध्ये काही अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळी माझे सर्व सहकारी पुढे येऊन जबाबदारी घेऊन त्यातून मार्ग काढतात. विशेष म्महणजे नवक्लाषितिज मधील विशेष मित्र-मैत्रिणीसुद्धा परिस्थितीशी सामंजस्यानेघेत जबाबदारीने काम करत आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. अशावेळी आम्ही सर्वजण एकमताने व एकसंघपणे अडचणीच्या परिस्थितीतुन यशस्वीपणे मार्ग काढतो. या सकारात्मक भावनेमुळेच नवक्षितिजमध्ये विशेष मित्रमैत्रिणींना आनंदी व उत्साहाने भरलेले आयुष्य देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. याहून जास्त आमची सगळ्यांची लाडकी दिवेकर माऊशी वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा जोमाने काम करत आहेत. This is the spirit of Navkshitij.
दिवेकर माऊशी नवक्षितिज कार्यालयात दैनंदिन काम करताना
0 notes