#हक्काचं
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स
ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली अनोख्या विक्रमाची नोंद स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राला…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/70d27c3fa6e530a7cd076011c3c73577/cde2841298e6a9b0-61/s540x810/341288a0c8875bf1841ef10730f4c111925c1dc6.jpg)
View On WordPress
#Genelia D&039;Souza#Genelia Deshmukh#Riteish Deshmukh#Satish Rajawade#Satish Rajwade#Star Pravah#Star Pravah Guiness Book of World Records#Star Pravah World Record#Star Pravahs World Record For Ved#Ved#Ved World Television Premier#Ved World Television Premiere#Wed#World Television Premiere#महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण - स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स#वेड#स्टार प्रवाह
3 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• एआय तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी तसंच सामाजिक आणि नैतिक हित लक्षात घेऊन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन • देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या दहा वर्षात ३२ पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा मॉल उभारणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा • दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे आदेश-बारावीच्या परीक्षेला प्रारंभ • ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १४९ पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे, त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी तसंच सामाजिक आणि नैतिक हित ध्यानात ठेवून होईल, याकडे लक्ष देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पॅरिसमध्ये एआय कृती परिषदेत सह अध्यक्षपदावरुन ते काल संबोधित करत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते. एआय क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरजही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, कृषी यासारख्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, त्यामुळे जगात��्या कमी विकसित देशांनाही याचा लाभ मिळेल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता ३२ पट वाढल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ चं काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारत फक्त स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ऑक्टोबर २०२५ पूर्वीच इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर असल्याची माहिती त्यांनी दिली, ते म्हणाले: ‘‘आज भारत 19% इथेनॉल ब्लँडींग कर रहा है। इससे फॉरेन एक्सचेंज की सेव्हिंग हुई है। और सबस्टेंशियल फार्मर रेव्हेन्यू जनरेट हुआ है। हम ऑक्टोबर 2025 से पहले ही 20% इथेनॉल मॅनडेट अचिव्ह करने की राह पर है।’’
दरम्यान, भारत ऊर्जा सप्ताह हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. या सप्ताहात देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केल�� जाणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात विकास आणि वित्तीय प्राधान्य यांचा समतोल साधण्यात आल्याचं प्रतिपादन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या काल लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर जगात सर्वाधिक असेल, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असून, चलनवाढीचा दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट-वेव्ज २०२५ या जागतिक संमेलनाचं येत्या एक ते चार मे दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. काल या आयोजनाबाबत बैठक झाली, संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं.
दरम्यान, मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात भरवण्यात आलेल्या “महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून, मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत, तसंच ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यभरातलूा बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उपलब्ध व्हावं, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या���ेळी केली. ‘‘असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये ��री मॉल ची सुरुवात झाली पाहिजे. त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे, ती आपण करणार आहोत. अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत, की एकदा या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत.’’
दरम्यान, राज्यातल्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिकाऱ्यांना यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी, तसंच कॉपी प्रकरणी मदत करणाऱ्या शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल शहरात देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. नांदेड जिल्ह्यात इंग्रजीच्या परीक्षेला काल ९४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग आणि प्रशासन प्रयत्नशील आहे, मात्र बीड शहरात काही परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला. जालना जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता बारावीचा पहिला पेपर सर्व केंद्रावर सुरळीत पार पडला. भरारी पथकांनी तीन केंद्रांवर नऊ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात आज माघ पोर्णिमेच्या स्नानाला सुरुवात झाली. प्रशासनाकडून यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. १३ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावली आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला केली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची आयोगानं गांभीर्याने दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर काल छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोराडे यांचं काल सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. बोराडे यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि ��िक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आ��े. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी बोराडे यांच्या साहित्याचं वेगळेपण सांगत, आपल्या भावना व्यक्त केल्या.. ‘‘मराठवाड्याची अशी खास ग्रामसंस्कृती आहे. त्या ग्रामसंस्कृतीचा वेध रा रं बोराडे यांनी घेतला. म्हणून त्यांची कथा, कादंबरी एका अर्थानं प्रादेशिकही आहे. आधुनिकीकरणाचा जो परिणाम, मराठी ग्रामीण जीवनावर झाला, त्याचंही अतिशय सखोल असं चित्र बोराडेंनी रेखाटलं. मराठीतला हा एक मोठा असा लेखक आपल्यातून गेला, ही एक अतिशय दु:खद घटना आहे.’’
ज्येष्ठ साहित्यिक डॉ छाया महाजन यांनी बोराडे यांना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.. “ग्रामीण साहित्यातले उत्कृष्ट लेखक म्हणून बोराडे सरांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांची पाचोळा फार सुंदर कांदबरी. पण मी जेव्हा आमदार सौभाग्यवती पाहिला त्यांचा, तेव्हा मला वाटलं की सरानां प्रत्येक क्षेत्रामध्ये रुची आहे. आणि त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्यानं ते लिहिलेलं आहे. त्यांनी शिवार पुरस्कार दिले. लेखकाला प्रोत्साहन द्यायचे. साहित्य क्षेत्राची खऱ्या अर्थाने हानी झाली असं मी निश्चित म्हणेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने काल जिम्नॅस्टिक्स मध्ये सहा सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या संघाने रौप्य पदक जिंकलं. पदकतालिकेत महाराष्ट्र सध्या एकूण १४९ पदक जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये ४१ सुवर्ण, ५४ रौप्य, तर ५४ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादल ५५ सुवर्ण पदकांसह पहिल्या, तर कर्नाटक ३३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
वृक्षारोपण आणि संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याप्रसंगी ते काल बोलत होते. बांबू आणि चंदनासह फळबागांचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी रवाना झाले आहेत. मानखुर्द ते मंत्रालय असं २० किलोमीटर अंतर अर्धनग्न अवस्थेत पायी चालून मंत्रालयासमोर हे शेतकरी आंदोलन करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे, त्या��ूर्वी काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या पाचोड इथल्या ग्रामीण रुग्णालयात, कॅन्सर डायग्नोंस्टिक व्हॅनचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे करण्यात आलं. या व्हॅनमध्ये स��फ्टवेअरद्वारे मुख कर्करोग तपासणीची सुविधा आहे.
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/793eb709617e2f9ea59dc307810d681f/faa4669829d23633-b2/s540x810/8b44db921d96d0e53687089b3a8898be7d137468.jpg)
मगरपट्टा सिटीच्या भव्य आणि यशस्वी निर्मितीनंतर मधुवन या गृहप्रकल्पाचा शुभारंभ झाला. मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि. यांनी साबळे कन्स्ट्रक्शन्सच्या सहकार्याने साकारलेला हा दिमाखदार प्रकल्प, स्वप्नातलं घर बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी पुणेकरांसाठी घेऊन आला आहे.
हडपसरच्या जवळ आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सुविधासंपन्न मधुवन वसलेलं आहे. आवाक्यातल्या किंमतीतली इथली १ बीएचके घरं राहायला आनंददायक आणि गुंतवणुकीला लाभदायक अशी आहेत. खेळण्यासाठी मोकळ्या जागा, भरपूर हिरवाई व सुखकर जीवनशैलीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा 'मधुवन' मध्ये आहेत. त्यामुळे सुरक्षित परिसरातील सर्वसमावेशक जीवनशैलीचा आनंद आणि फायदे सामान्यांच्याही आवाक्यात आले आहेत.
ससाणे नगर, SRPF, मगरपट्टा सिटी व इतर प्रमुख लोकेशन्सशी उत्तमरीत्या जोडलेला हा प्रकल्प आहे. तेव्हा आता क्षणभरही उशीर करू नका. मधुवन मधलं दर्जेदार, मनपसंत घर बुक करून, पुण्यात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा.
0 notes
Text
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका चाहत्यांचा उत्साह शिगेला चाहत्यांचा उत्साह शिगेला Go to Source
View On WordPress
#‘ही’#alia#bhatt#kapoor#ranbir#wedding:#आलियाच्या#निमंत्रण#पत्रिका#बॉलिवूड#रणबीर#लग्नाआधी#व्हायरल;#हक्काचं#होतेय
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/1687f7ef87cdf743d015543f84b59bec/11e9a0f43af012e7-d3/s540x810/371ee1e5abe8186f4174cf9f9d55162ae516f792.jpg)
📸📸महाराष्ट्रातील अश्याच अप्रतिम पोस्ट बघण्यासाठी नक्की फॉलो करा आपलं हक्काचं page 🎭📸📸..................... Like, share and com ment 👍 ______________________________ _______________ Follow 👇👇👇 ⏩@maharashtramodeling001 ⏩@maharashtramodeling001 ⏩@maharashtramodeling001 ⏩@maharashtramodeling001 ⏩@maharashtramodeling001 Follow ⏩@ ____________________________________________ #model #maharashtramodeling001#model #pune #puneri #kolhapur #kokan #mumbailife #maharashtra#auragabad #photography #photoshoot #modelsearch #jalgaon#beautiful #instagram #makeup #photographer #photo #cute #picoftheday #fitness #girl #actor #fashionblogger #likeforlikes #portraitphotography#shoutout #freeshoutouts #shoutoutforshout
#📸📸महाराष्ट्रातील अश्याच अप्रतिम पोस्ट बघण्यासाठी नक्की फॉलो करा आपलं हक्काचं page 🎭📸📸....................#share and com ment 👍 ______________________________ _______________ Follow 👇👇👇 ⏩@maharashtramodeling001 ⏩@maharashtramodeling001 ⏩@mahara
0 notes
Text
पुण्यातील मराठा समाजासाठी आपल्या हक्काचं वधू वर
https://www.hindumaratha.com
हिंदू मराठा वधू वर पुणे
Maratha Matrimony Pune
Maratha vadhu var
#maratha #hindu #vadhuvar #pune
1 note
·
View note
Text
काय पत्नीच्या जाचाला कंटाळलात...तुमच्यासाठी खास आश्रम, खाण्याची राहण्याची सोय
काय पत्नीच्या जाचाला कंटाळलात…तुमच्यासाठी खास आश्रम, खाण्याची राहण्याची सोय
पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांसाठी हक्काचं घर, महाराष्ट्रात सुरू झालाय अनोखा आश्रम पाहा कुठे आणि काय आहे अट
View On WordPress
#AURANGABAD#Maharashtra#Viral#Ajab Gajab#Ashram specially Husband#Bizarre News#Husband Wife Fight#Husband Wife News#Weird News#Weird Story
0 notes
Text
अंबाजोगाई शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रमाई आवास घरकुल योजनेचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार असून मागासवर्गीय बांधवांना आता हक्काचं घर मिळणार आहे. भोगवट्याची जाचक अट शिथिल करत परळीच्या धरतीवर अंबाजोगाई शहरात देखील या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मरा���वाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता दे��ील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद करणारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ��ाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्यानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
Text
कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार-'महाराष्ट्राची हास्यजत्रा'
कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’
१५ मार्चपासून सोमवार ते गुरुवार मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. हास्यत्रेचे ३०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत हास्यजत्रा नेहमीच नशीबवान ठरली आहे. आता ही हास्यजत्रा आठवड्यातले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e591bff744b260bede4b6b3451d78bb6/e183d0120bd4ecdc-18/s540x810/6f45d03978575f0d7847be0575a37decd7726a61.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Baal Aadhaar Card | बोलगोपाळांना मिळाले हक्काचं ओळखपत्र! 16 दशलक्ष बाल आधार कार्ड जारी, आता योजना होणार राष्ट्रीय
Baal Aadhaar Card | बोलगोपाळांना मिळाले हक्काचं ओळखपत्र! 16 दशलक्ष बाल आधार कार्ड जारी, आता योजना होणार राष्ट्रीय
Baal Aadhaar Card | बोलगोपाळांना मिळाले हक्काचं ओळखपत्र! 16 दशलक्ष बाल आधार कार्ड जारी, आता योजना होणार राष्ट्रीय Baal Aadhaar Card | देशातील 16 दशलक्ष बालगोपाळांना हक्काचं ओळखपत्र मिळाले आहे. त्यांना बाल आधारकार्डमुळे कोणते फायदे मिळू शकतात, ते पाहुयात. Baal Aadhaar Card | आधार कार्डला (Aadhar Card) महत्वाचा दस्ताऐवज म्हणून मान्यात मिळाली आहे. देशभरातील 16 दशलक्ष बालकांना (children) आधारची ओळख…
View On WordPress
#aadhaar#baal#card#आजची बातमी#आता#आताची बातमी#आधार#ओळखपत्र#कार्ड#जारी#ठळक बातमी#ताजी बातमी#दशलक्ष#बातम्या#बाल#बोलगोपाळांना#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मिळाले#योजना#राजकारण#राष्ट्रीय#हक्काचं
0 notes
Text
मराठा समाजासाठी आपल्या हक्काचं वधू वर
https://www.hindumaratha.com
हिंदू मराठा वधू वर
Maratha Matrimony
Maratha vadhu var
1 note
·
View note
Link
आपल्या खेळातील प्रदर्शनाने आबाल-वृद्धांच्या मनात त्याने हक्काचं स्थान निर्माण केलंय. विराटला भारतीय क्रिकेट संघाचा बेक-बोन म्हंटल्या जातं कारण तो उजव्या हाताने खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर व सर्वाधिक प्रतिभावान आणि हुशार खेळाडूंपैकी एक आहे.
0 notes
Text
Rajkummar Rao Tweet About New Home Inquiry - राजकुमार रावला नवीन शहरात घ्यायचंय नवीन घर, यूझर्स म्हणाले आधी मनोज बाजपेयीशी बोल! | Maharashtra Times
Rajkummar Rao Tweet About New Home Inquiry – राजकुमार रावला नवीन शहरात घ्यायचंय नवीन घर, यूझर्स म्हणाले आधी मनोज बाजपेयीशी बोल! | Maharashtra Times
मुंबई- अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी स्वप्नाच्या शहरात मुंबईत आपलं स्वतःचं हक्काचं घर विकत घेतलं आहे. आता अभिनेता राजकुमार राव देखील स्वत: साठी नवीन घर विकत घेण्याच्या तयारीत आहे. त्याने स्वतः ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच चाहत्यांकडून काही माहितीही मागितली आहे. विशेष म्हणजे राजकुमार मुंबई बाहेर घर घेण्याचा विचार करत आहे. राजकुमार याने ट्विटरवर यूझर्सना एक प्रश्न विचारला…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/768a2f82322c808311fafe962b5607c1/07c5c577de96b351-f4/s540x810/6b52c9c38add215b7893bb81fe9e89f3e0d592fb.jpg)
View On WordPress
0 notes