Tumgik
#समजल्यावर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Aai Kuthe Kay Karte: अभिषेकचं सत्य समजल्यावर काय असणार अनघाचा निर्णय? मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट
Aai Kuthe Kay Karte: अभिषेकचं सत्य समजल्यावर काय असणार अनघाचा निर्णय? मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट
Aai Kuthe Kay Karte: अभिषेकचं सत्य समजल्यावर काय असणार अनघाचा निर्णय? मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट Aai Kuthe Kay Karte: एकीकडे अरुंधतीच्या आयुष्याची घडी बसत असताना, दुसरीकडे देशमुखांच्या घरात आणखी अरुंधती निर्माण होणार आहे. Aai Kuthe Kay Karte: एकीकडे अरुंधतीच्या आयुष्याची घडी बसत असताना, दुसरीकडे देशमुखांच्या घरात आणखी अरुंधती निर्माण होणार आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 18 Dcember 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      एन सी सी एफ आणि नाफेडचा महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय
·      मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा २३ डिसेंबरला जाहीर केली जाणार
·      नागपूर इथं संरक्षण उपकरण कारखान्यातल्या स्फोटात सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू
आणि
·      दिव्यांगांसाठीच्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत १२ सुवर्णांसह महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर
सविस्तर बातम्या
राष्ट्रीय उपभोक्ता संरक्षण संस्था-एन सी सी एफ आणि राष्ट्रीय कृषी आणि सहकार विपणन महासंघ - नाफेडने महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘एनसीसीएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिक लगतच्या छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी सुरू केल्याचं चंद्रा यांनी सांगितलं.
दरम्यान, एनसीसीएफ कडून नाशिक इथं भारत ब्रॅँड योजनेअंतर्गत रास्त दराने वस्तू विक्रीची सुरुवात काल करण्यात आली. नाशिक शहरात पंधरा मोबाईल व्हॅनद्वारे ही वस्तूविक्री होत असून, दुसऱ्या टप्प्यात ही योजना जिल्हाभर राबवली जाणार आहे. यामध्ये पंचवीस रुपये किलो कांदा, साठ रुपये किलो डाळ तसंच २७ रुपये किलो दराने गव्हाचं पीठ उपलब्ध करून दिलं जात आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यभर विस्तारणात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल यासंबंधी कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. तीन डिसेंबर पासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत पदपथ, रस्‍त्‍यांलगतची गटारे, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे एकाच वेळी स्‍वच्‍छ केले जाणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथांमार्फत देशभरात शासकीय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल हिंगोली तालुक्यात सरकाळी इथं पोहचली. यावेळी आरोग्य विभागाचे उपसचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. हिंगोलीचे अरुण पिंपरे आणि घन:श्याम मुकडे तर छत्रपती संभाजीनगर इथल्या उषा गायकवाड यांनी आपल्याला झालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
****
दरम्यान, ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात यादव नगर इथं पोहोचली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. 
****
परभणी जिल्ह्यात कोटंबवाडी इथं परभणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या हस्ते यात्रा रथाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नागरीकांना शासनाच्या विविध योजनांसह नोंदणी करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यात वरखेडा वीरू, परतूर तालुक्यात आनंदवाडी, मंठा तालुक्यात लिंबखेडा, भोकरदन तालुक्यात नळणी, जालना तालुक्यात हस्तेपिंपळगाव तर अंबड तालुक्यात पानेगाव इथं आज विकसित भारत यात्रा जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नागरिकांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी केलंआहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी बीड इथल्या नियोजित सभेत जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यभरातल्या समन्वयकांची बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका समजल्यावर बीडच्या सभेत पुढची दिशा जाहीर करण्यात येईल, असं जरांगे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाला आपला विरोध नाही, मात्र दादागिरी-झुंडशाही तसंच आमदारांची घर जाळणाऱ्याना आपला विरोध असल्याचं, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात आगरी महोत्सव मैदानावर ओबीसी निर्धार महामेळाव्यात बोलत होते.
दरम्यान, ओबीसी बचाव परिषदेने ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चंद्रपूर इथं काल ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही परिषद घेण्यात आली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, असं परिषदेने स्पष्ट केलं आहे.
****
नागपूर इथं संरक्षण उपकरण कारखान्यात स्फोट होऊन सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. बाजारगाव भागात काल सकाळी ही दुर्घटना घडली. या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटकं तयार केली जातात. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशीरा दुर्घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, तसंच जखमींना दर्जेदार उपचाराच्या सूचना संबंधितांना दिल्याआहे.
संबंधित कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी वीस लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्याच्या वडी पाटीनजीक ट्रॅक्टर आणि क्रूझरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघतात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. सर्व अपघातग्रस्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या ब्राह्मणवाडीचे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात पुणे - नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाच्या शिवारात धावत्या कारवर टेम्पो पडून झालेल्या अपघातात दोन वर्षीय बालिकेसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला.
****
जालना पोलिसांनी काल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा संशयितांना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून अटक केली. या सहा संशयितांकडून सहा गावठी पिस्तुलं, बारा जिवंत काडतुसं, एक तलवार, पाच मोबाईल, असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  
****
नांदेड इथं गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी काल गोळीबार करून जेरबंद केलं. शेरू सिंग नानक सिंग असं त्याचं नाव असून, पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी झाला, त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेलं ११७ धावांचं आव्हान भारतानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं ४ चेंडूंत साध्य केलं. भारताच्या साई सुधरसननं सर्वाधिक ५५ धावा केल्या तर पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं १२ सुवर्ण, सात रौप्य आणि १६ कांस्य पदकांसह पाचवं स्थान पटकावलं. स्पर्धेच्या काल शेवटच्या दिवशीही राज्यातल्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी या स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. या स्पर्धेत हरियाणा पहिलं, उत्तर प्रदेश दुसरं, तामिळनाडू तिसरं आणि गुजरातनं चौथं स्थान पटकावलं.
****
श्रीलंकेच्या संसदीय शिष्टमंडळानं काल अजिंठा लेणीला भेट दिली. या शिष्टमंडळात श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांच्या पत्नी सुविद्य नेलुम ललना यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. काल हे पथक दिल्लीकडे रवाना झालं.
****
चंपाषष्ठीचा उत्सव आज साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगरनजिक सातारा परिसरात आज महाआरतीने खंडोबा यात्रेला सुरुवात झाली. सातारा गावात कालपासूनच भाविकांची गर्दी सुरु झाली. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध प्रकारची दुकानं सजली आहेत.
****
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
दुसऱ्याच्याच वडिलांना ' बाबा ' म्हणत त्याने टाहो फोडला, प्लॅन समजल्यावर पोलिसही हैराण
दुसऱ्याच्याच वडिलांना ‘ बाबा ‘ म्हणत त्याने टाहो फोडला, प्लॅन समजल्यावर पोलिसही हैराण
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात स्ट्रेचरवर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पाहून मुलाने बाबा असे म्हणून जोरदार हंबरडा फोडला आणि तो रडू लागला. उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी देखील भाउक झाले आणि त्यानंतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी मुलाकडे देण्यात आला. मुलाने देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले मात्र त्यानंतर जे घडले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
दुसऱ्याच्याच वडिलांना ' बाबा ' म्हणत त्याने टाहो फोडला, प्लॅन समजल्यावर पोलिसही हैराण
दुसऱ्याच्याच वडिलांना ‘ बाबा ‘ म्हणत त्याने टाहो फोडला, प्लॅन समजल्यावर पोलिसही हैराण
महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात स्ट्रेचरवर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पाहून मुलाने बाबा असे म्हणून जोरदार हंबरडा फोडला आणि तो रडू लागला. उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी देखील भाउक झाले आणि त्यानंतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी मुलाकडे देण्यात आला. मुलाने देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले मात्र त्यानंतर जे घडले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"बरोबर नाही": माजी भारतीय फलंदाज केएल राहुल झिम्बाब्वे मालिकेसाठी कर्णधार म्हणून शिखर धवनच्या जागी | क्रिकेट बातम्या
“बरोबर नाही”: माजी भारतीय फलंदाज केएल राहुल झिम्बाब्वे मालिकेसाठी कर्णधार म्हणून शिखर धवनच्या जागी | क्रिकेट बातम्या
मूलतः, ते होते शिखर धवन 18 ऑगस्टपासून हरारे येथे सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी ज्याची निवड करण्यात आली होती आणि केएल राहुल संघात स्थान दिले नाही. तथापि, कोविड-19 मधून बरे झाल्यावर, आणि नंतर तंदुरुस्त समजल्यावर, राहुलचा संघात समावेश करण्यात आला आणि धवन त्याच्या उपकर्णधार म्हणून काम करत होता. भारताचे माजी फलंदाज मोहम्मद…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची Rolls-Royce खातीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ ! कारण समजल्यावर तुम्हीही जाल चक्रावून
अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची Rolls-Royce खातीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ ! कारण समजल्यावर तुम्हीही जाल चक्रावून
अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची Rolls-Royce खातीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ ! कारण समजल्यावर तुम्हीही जाल चक्रावून मुंबई – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारलेल तुम्ही पाहिल असेल. परंतु बच्चन यांनी खऱ्या खुऱ्या पोलीस चौकीत यावे लागल्याचा प्रसंग कधीही ऐकलं नसेल. मग अशात अमिताभ बच्चन यांची महागडी गाडी कित्येक दिवसांपासून एका पोलीस स्टेशनमध्येच धूळखात पडून आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 17 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीत तमिळ संगम कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी जाहीर करणार
नागपूर इथं संरक्षण साहित्य निर्मिती कंपनीत भीषण स्फोट; सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू
नांदेड इथं दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगाराला गोळीबार करून अटक
आणि
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत आघाडी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत तमिळ संगम कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. वाराणसीत सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, कन्याकुमारी वाराणसी तमिल संगमम रेल्वे तसंच वंदेभारत रेल्वेला ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज वाराणसीत विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेतला. सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला.
दरम्यान पंतप्रधानांनी आज सकाळी सूरत इथं जगातल्या सगळ्यात मोठ्या हिरे बाजाराचं उद्घाटन केलं. इथल्या व्यापाऱ्यांनी अनुकूल व्यवस्थेचा लाभ घेऊन, भारतीय रत्न आणि आभुषण क्षेत्राला प्रगतीच्या नव्या शिखरांवर नेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथांमार्फत शासकीय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभाची इतरांना माहिती देत आहेत. हिंगोलीचे अरुण पिंपरे आणि घन:श्याम मुकडे तर छत्रपती संभाजीनगर इथल्या उषा गायकवाड यांनी आपल्याला झालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
बाईट - अरूण पिंपरे, घन:श्याम मुकडे, जि.हिंगोली
आणि उषा गायकवाड, छत्रपती संभाजीनगर
****
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात यादव नगर इथं पोहोचली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं तसंच जनतेसाठीच्या विविध केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता महाराष्ट्रभर विस्तारणात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज यासंबंधी कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तीन डिसेंबर पासून या मोहीमेला सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पदपथ, रस्‍त्‍यांलगतची गटारे, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे हे सगळे एकाच वेळी स्‍वच्‍छ केले जाणार आहेत. मुंबईत वाहनतळांची समस्‍या सोडवण्‍यासाठी लवकरच मार्शलची नेमणूक करण्‍यात येणार असल्‍याचही मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी बीड इथल्या नियोजित सभेत जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यभरातल्या समन्वयकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्यात ५४ लाख कुणबी नोंद सापडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका समजल्यावर बीडच्या सभेत पुढची दिशा जाहीर करण्यात येईल, असं जरांगे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, इतर मागासवर्ग - ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा ओबीसी बचाव परिषदेने निषेध केला आहे. चंद्रपूर इथं आज ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही ओबीसी बचाव परिषद घेण्यात आली. जरांगे पाटील हे त्यांची भूमिका वारंवार बदलत असून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला. जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांविरुद्ध केलेल्या द्वेषपूर्ण आणि धमकीच्या वक्तव्याचा परिषदेने यावेळी जाहीर निषेध केला. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, हे देखील परिषदेने यावेळी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रीय उपभोक्ता संरक्षण संस्था-एनसीसीएफ कडून नाशिक इथं रास्त दराने वस्तू विक्रीची सुरुवात आज करण्यात आली. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक मध्ये नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवली जाणार असल्याचं चंद्रा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. नाशिक शहरात पंधरा मोबाईल व्हॅनद्वारे ही वस्तूविक्रीची सुरुवात करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात ही योजना जिल्हाभर राबवली जाणार आहे. यामध्ये पंचवीस रुपये किलो कांदा, साठ रुपये किलो डाळ तसंच २७ रुपये किलो दराने गव्हाचं पीठ उपलब्ध करून दिलं जात आहे.
दरम्यान, नाफेडनं राज्यात दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
****
नागपूरच्या बाजारगाव इथं आज सकाळी एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जातात. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली, तसंच जखमींना दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
दरम्यान, संबंधित कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी वीस लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची तसंच दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला या कंपनीत नोकरी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्याच्या वडीपाटीनजीक ट्रॅक्टर आणि क्रूझरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघतात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना काल मध्यरात्री घडली. सर्व अपघातग्रस्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडीचे रहिवासी असून, परभणीच्या यशवाडी इथल्या मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं आहे.
****
नांदेड इथं गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी आज गोळीबार करून जेरबंद केलं. शेरू सिंग नानक सिंग असं त्याचं नाव आहे. त्याने आज रज्जु सिंघ गुलाब सिंघ यांचा तलवार घेऊन पाठलाग केला असता, रज्जू सिंघ यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शेरू सिंग याने घरगुती वापराचा गॅस लिकेज करून स्फोटाची धमकी दिली. त्याला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी शेरु सिंग याच्या पायावर गोळ्या झाडल्या. यात तो जखमी झाला, पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. जोहान्सबर्ग इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीमुळं दक्षिण आफ्रिका संघानं २७ षटकं ३ चेंडूंत ११६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्यूत्तरादाखल, भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं ४ चेंडूंत हे आव्हानं साध्य केलं. भारताच्या साई सुधरसननं सर्वाधिक ५५ धावा केल्या तर पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
श्रीलंका देशाच्या संसदीय शिष्टमंडळानं आज अजिंठा लेणीला भेट दिली. यासाठी हे पथक कालचं छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालं होतं. या शिष्टमंडळात श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांच्या पत्नी सुविद्य नेलुम ललना यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आज हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पेन्शनर्स असोसिएशनसाठी सभागृह उभारलं जाईल असं राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. पेन्शनर्स दिवसाच्या निमित्तानं, आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
****
0 notes
mhlivenews · 3 years
Text
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी
मुंबई, दि 25 : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला पारकर यांचाच पडद्यामागून विरोध
कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला पारकर यांचाच पडद्यामागून विरोध
नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा आरोप  कोविड केअर सेंटर सुरू होणार हे समजल्यावर श्रेय घेण्यासाठी पारकर यांची धावपळ ​कणकवली: ​कणकवली नगरपंचायतच्या मार्फत सुरू करण्यात येत असलेले कोविड केअर सेंटर कसे होता नये यासाठी पारकर व त्यांच्याच पक्षाची काही मंडळी पडद्यामागून अधिकाऱ्यावर दबाव आणून  विरोध करत होती.मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या वतीने हे कोविड केअर सेंटर पूर्ण झाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 5 years
Text
Safar A Journey song Tujhko Chalna Hoga Lokrang afsana likh rahi hoon article abn 97 | अफसाना लिख रही हूँ.. : ‘तुझ को चलना होगा..’
Safar A Journey song Tujhko Chalna Hoga Lokrang afsana likh rahi hoon article abn 97 | अफसाना लिख रही हूँ.. : ‘तुझ को चलना होगा..’
[ad_1]
  मृदुला दाढे- जोशी
आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे. नीलाला सोडून मधेच उतरून जावं लागणार.. हवंहवंसं वाटायला लागलेलं हे आयुष्य संपतही आलं? इथपर्यंतच होती का ही साथ? या विषण्णतेतून आलेलं हे गाणं..
‘जिंदगी का सफर है ये कैसा सफर,
कोई समझा नहीं, कोई जाना नहीं
है ये कैसी डगर, चलते है सब मगर,
को…
View On WordPress
0 notes
bloggerdeepu · 5 years
Text
आजी..
नीट र्‍हा सोना... रुना... बिना..... मेलीचं नावच येत न्हाय तोंडात....आजीला सगळी मिळून १६ नातवंड... तिचा एक प्रॉब्लेम होता, समोर उभा असलेल्या नातवंडाच नाव तिला कधीच आठवायचं नाही.. आधी समोर नसलेल्या १५ जणांची नावं घेईल, मग जमलं तर राहीलेल्याचं... कष्टानं खडबडीत झालेले हात गालावरनं फिरवून आलाबला घेईल. मटामटा मुकं घेईल.. उशीरा भेटायला गेलो तर दोन चार शिव्या हमखास...
वजन कितीही वाढलं तरी किती बारिक झाली माझी नात अस म्हणून अंडयाची पोळी बनवायला घ्यायची... थकली असली तरी... वाक्यावाक्याला अस्सल गावरान म्हणी आणि शिव्या जिभेवर खेळत असायच्या. मी तिच्या शिव्या ऐकण्या साठी कधी कधी कामात मुद्दाम चुका करायचे .. वाटच बघायचे कि बोलता-बोलता फटदिशी एखादी भन्नाट म्हण अथवा शिवी हटकून येइल..
लगीन कर.. कवा करणार.. म्हातारी झाल्यावर.. हे दोन प्रश्न ठरलेले असायचे.. एकदा खूप आठवण आली म्हणून ८ दिवसांची सुट्टी काढून तिच्या जवळ रहायला गेले. दोन वेळा पॅरालिसिस मधून बरी झालेली आजी लहानपणी घालायची तशी आंघोळ, चवीचं जेवन करून घालते, उलट आपलीच काळजी घेते तेव्हा भल्याभल्या प्रेम कथा फिक्या वाटतात.. unconditional love ची concept प्रॅक्टीकली समजते.. ८ दिवस कसे जातात समझतच नाही.... आजीच्या दारात मोर कोंबड्यांप्रमाणे धान्य खाताना कितीदा तरी पाहीले.. मांजर एकटीच नदीत जाऊन मासे खाते हे समजल्यावर हासडल्याना तिने दोन चार शिव्या... काय गं सटवे? एकटी एकटी ताव मारतीस व्हय.. दुसऱ्या दिवशी मांजर नदीवरून फरफटत दोन मासे घेऊन हजर.. गोंडया नावाचा आजीचा एक कुत्रा होता.. तिनं जणू त्याला सांगून ठेवल होत आपलं कोण आणि तिराईत कोन..२ वर्षांनी जरी तुम्ही गोंडयासमोर गेलात तरी गोंडया तुमच्यावर भुंकेल काय... आजीचं आणि प्राणीपक्ष्यांच नातं खूप दुर्मिळ प्रकारचं अन् मला न उलघड़लेलं होतं..
आजीच्या घरी लोकं आवर्जुन यायची.. सरपंचाची बायको होती पण नानांची नानी म्हणून जास्त famous होती आजी. तिने कधी कोणाला न खाता पिता सोडलय अस कधीच नाही झालं.. तिचं अधिकारवाणीनं बोलणं, लोकांची काळजी करनं.. सगळ्यांच चांगलं व्हाव यासाठी झुरणं.. खर तर ७५ वर्षांचं आयुष्य ७५ ओळीत लिहणं अशक्य आहे...
उन्हाळयाच्या सुट्टी मधे आजीच्या घरी आम्ही सगळे जमायचो, एकच गलका व्हायचा, नदीवर पोहायला जायचो तोवर आजी सगळयांसाठी गरम गरम जेवन बनवून ठेवायची... आजीच्या संत्री आणि मोसंबीच्या बागा होत्या.. आजीने शिव्या घालू नये म्हणून फळं खावून सालं जमिनीत पुरायचो... कमी जेवलो की तिला समजून जायंचं.. नानांनी आमची बाजू घेतली की नानांना पण शिव्या.. नानांची रिअॅक्शन बघून, हसून-हसून डोळ्यांत पाणी यायच. लै लै लै ग्वाड व्हती आमची आजी!
कोणी तिला भेटून परतीच्या प्रवासाला जायला निघालं की तिच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.. हस गं आजे फोटो काढतेय.. पेटला तुझा फुटू... अस म्हणून पदराने डोळे टिपायची.. तिच्या बदद्ल जेवढं लिहावं तेवढ कमीच आहे..तुझा आशिर्वाद नेहमी सोबत जाणवतो आजे... तू आम्हाला सोडून गेलीस यावर माझा विश्वासच नाही मुळी..
Tumblr media
0 notes
webnewswala · 4 years
Text
जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
प्रसिद्ध डब्ल्यडब्ल्यूई रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचे भारतात असंख्य चाहते आहे.
जॉन सीना अनेकदा भारतीय कलाकार, क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.काही दिवसांपुर्वी त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांचे फोटो शेअर केला होता.
आता जॉन सीनाने ऐश्वर्या रायचा देखील फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्या देखील सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये आहे.
Vi…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
‘मी प्रेग्नन्ट आहे हे समजल्यावर निर्मात्यांनी…’ नेहा धुपियानं केला धक्कादायक खुलासा
‘मी प्रेग्नन्ट आहे हे समजल्यावर निर्मात्यांनी…’ नेहा धुपियानं केला धक्कादायक खुलासा
‘मी प्रेग्नन्ट आहे हे समजल्यावर निर्मात्यांनी…’ नेहा धुपियानं केला धक्कादायक खुलासा अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘अ थर्सडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील यामी गौतमच्या भूमिकेसोबतच अभिनेत्री नेहा धुपियाच्या भूमिकेचंही जोरदार कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात ती एका प्रेग्नन्ट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली. पण या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २९ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानचं नागरिकत्व असणाऱ्या, पण अनेक वर्षे भारतात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाब या राज्यातल्या १३ जिल्ह्यात वास्तव्य क��णाऱ्या विविध अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याच आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. नागरीकत्व अधिनियम १९५५ नुसार हा आदेश लागू करण्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे.
****
म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीवरील औषधांवरील सीमा शुल्क तसंच वस्तू आणि सेवा करावर देण्यात आलेल्या सवलतींना मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४३वी बैठक काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.  
****
देशाला सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठतेची अधिक गरज आहे, असं प्रतिपादन विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आयोजित ऑनलाइन पुरस्कार समारंभात ते बोलत होते. 'विकसित देशांमध्ये विज्ञानावर मोठा भर दिला जातो, भारतामध्ये मात्र कृतीपेक्षा चर्चाच अधिक असून विज्ञानाबाबत असणारी ही उदासीनता देशाला आणि समाजालाही घातक असल्याचं नारळीकर म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार कर्नल बी. संतोष बाबू यांना, तर स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार, पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला यावेळी देण्यात आला.
****
परभणी शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरोधात विविध ठिकाणी महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
****
परभणी इथं काल दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेली मुलं पाण्यात बुडत असल्याचं समजल्यावर अग्निशामक दलानं बचावकार्य सुरू केलं, मात्र दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
****
नांदेड जिल्ह्यात महानगर पालिकेच्या नऊ केंद्रांसह जिल्ह्यातल्या ९२ लसीकरण केंद्रावर आज कोविड लसीकरण होणार आहे. या सर्व केंद्रांवर फक्त ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे.
*****
0 notes
filmykhabarmantra · 5 years
Text
शुक्रवारी भेटा जगावेगळी फिलॉसॉफी असणा-या ‘देशपांडे’ला उर्फ निखिल रत्नपारखीला
शुक्रवारी भेटा जगावेगळी फिलॉसॉफी असणा-या ‘देशपांडे’ला उर्फ निखिल रत्नपारखीला
‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या सिनेमाच्या शीर्षकावरुन सिनेमाची गोष्ट दोन आडनावांच्या व्यक्तींवर आधारित आहे हे सर्वात पहिले लक्षात येते. या सिनेमात सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांना सिनेमाचे नाव समजल्यावर सिनेमाची कथा आणि त्यांचे पात्रं जाणून घेण्याची उत्सुकता असते. या सिनेमाच्या बाबतीतही अगदी तसेच असले तरी जरा वेगळे आहे आणि याचे कारण म्हणजे…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना; नारायण राणेंची टीका; पडवेतील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मानले आभार
आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना; नारायण राणेंची टीका; पडवेतील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मानले आभार
पडवे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉस्पिटल सुरू करण्याचं मी योजलं तेव्हा सर्वात पहिला विरोध शिवसेनेने केला. चिपी विमानतळ आणलं तेव्हाही विरोध करणारी शिवसेनाच होती. मात्र, मागाहून विमानतळ पूर्ण होतंय समजल्यावर स्वतः श्रेय घेणारी शिवसेनाच आहे. प्रत्येक विकासकामाला विरोध करायचा आणि आपल्या शिवाय काम पूर्ण होतंय समजल्यावर श्रेय घेण्यासाठी धडपड करायची हे शिवसेनेचं नेहमीचंच काम असून आयत्या बिळावर नागोबा…
Tumblr media
View On WordPress
0 notes