Tumgik
#संपवण्यासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला जयपूर : दोन महिन्यांपूर्वी एका बाईक अपघातात एका महिलेसह तिच्या दिराचा मृत्यू झाला होता. सुरवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक खुलासा झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विम्याचे 1.90 कोटी रुपये हडपण्यासाठी पतीने…
View On WordPress
0 notes
atulgaikwad7038 · 11 days
Text
आपल्या इथे या पृथ्वीवर जन्म आणि मृत्यू हा रोग लागला आहे तो संपवण्यासाठी ज्ञान गंगा हे पुस्तक अवश्य वाचा
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली.
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान श्रीराममूर्तीची स्थापना.
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे ही नियुक्ती दोन वर्षांपासून होत नव्हती. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून जास्त याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. य�� याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं आज सांगितलं. आजच्या सुनावणीआधी एक दिवस, म्हणजे काल, केंद्र सरकारनं यासंदर्भात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून सुरू असलेला दहशतवाद संपवण्यासाठी कलम ३७० हटवणं, हा एकमेव मार्ग होता, असं म्हटलं आहे.
****
अयोध्येतल्या नव्या श्री राम मंदिरात येत्या पंधरा ते चोवीस जानेवारी दरम्यान भगवान श्रीरामांची मूर्ती स्थापन केली जाईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत रॉय यांनी दिली आहे. मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून इतर कामं येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिरात भगवान श्रीरामांची मूर्ती पाच वर्षांच्या बालकाच्या स्वरूपात स्थापन केली जाणार असून मंदिराच्या तळमजल्यावर राम दरबार स्थापित केला जाईल, असंही रॉय यांनी सांगितलं. पुढची अनेक शतकं देखभालीची आवश्यकता भासू नये, अशा रीतीनं मंदिराची निर्मिती होत असल्याचं रॉय यांनी सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा खात्याचे सचिव संजीव चोपडा यांनी ही माहिती दिली आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून यामुळे तांदुळाची किरकोळ दरवाढ रोखता येईल, असं ते म्हणाले. सध्या महामंडळाकडे पुरेसा तांदूळ असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार, चालू हंगामातला तिसरा ई लिलाव उद्या सुरू होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांसोबत आज एक बैठक केल्याचं, तसंच या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असं प्रतिपादन वेणुगोपाल यांनी यावेळी केलं. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी आजच्या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दात त्याचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी पार्थला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी ही माहिती दिली आहे. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीत ऐन शहरात तीन जुलैपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा मीना यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम डॉ.सतीश साबळे यांना ��्वितीय आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं. राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम आणि मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयक योजना, यासंदर्भात यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ नांदेड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून यासाठी कोणतीही प्रवेश परिक्षा नाही. या उपक्रमात राज्यातले तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन करतील. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी nanded.spardhamission.com या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी www.awards.gov.in या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली, दि. 25 ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडचिरोली, दि. 25 ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
गोवा हादरले..आईला संपवण्यासाठी प्रेयसीसोबत रात्रभर गच्चीवर मुक्काम अन ..
गोवा हादरले..आईला संपवण्यासाठी प्रेयसीसोबत रात्रभर गच्चीवर मुक्काम अन ..
अनेक मुलांसाठी आई म्हणजे सर्वस्व असते मात्र या घटनेत चक्क प्रेयसीच्या नादी लागून एका नराधमाने आपल्या आईचा खून केला आहे. दत्तक गेलेल्या मुलाने धारदार शस्त्राने आईचा खून केल्याची ही घटना गोवा येथील धडे सावर्डे येथे घडलेली असून सोमवारी दुपारी बारा वाजता घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश मंगलदास नाईक ( वय 18 ) असे संशयित मुलाचे नाव असून त्याने आपली आई मनिषा मंगलदास नाईक ( वय 55 ) यांचा प्रेयसीच्या मदतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
देवळातील भेदभाव संपवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
देवळातील भेदभाव संपवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
मयूर ठाकूर । कणकवली : जातीयवादाविरुद्ध अनेक संघटनांनी पुकारलेल्या मोर्चात कणकवली येथील शुभांगी पवार, शिवराम पवार व सुरेश पवार यांनीही भाग घेऊन हिंदू देवळातील मागासवर्गीय समाजावरील अन्याय संपवा असा ठराव सर्व ग्रामपंचायतीनी घ्यावा असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू मंदिरातील भेदभाव संपवा असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
पुण्यात अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे
पुण्यात अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे
पुणे : सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा गणपती टिळक चौकात पोहोचला असून, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील झाले आहेत. काल सकाळपासूनच मिरवणूक संथ गतीने सुरू राहिल्याने ती पाहण्यासाठी आलेल्या गावोगावच्या भाविकांचा हिरमोड झाला. पोलिसांनी सकाळपासून मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यामुळे मंडळांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kumkum-world · 2 years
Text
Tumblr media
#संतरामपालजींद्वारे_समाजाला_दिशा
सध्या देशात भ्रष्टाचार, लाचखोरी शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाला याचा फटका बसतो. हे संपवण्यासाठी संत रामपालजी महाराजजींनी अहोरात्र लढा दिला, ज्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. जेणेकरून प्रत्येक मनुष्याला भ्रष्टाचारामुळे होणाऱ्या दुःखांपासून वाचवता येईल.
7 Days Left For Avataran Diwas
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' गद्दार ' हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
‘ गद्दार ‘ हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून राज्यातील सत्ता नाट्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवण्यासाठी हे निघाले आहेत याबाबत राग येण्यापेक्षा आता दुःख वाटत आहे. ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच आता पक्ष संपवायला निघालेले आहे आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत, असे शिवसेना नेते आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
'चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी अमेरिकेसमोर भारत हाच पर्याय'
https://bharatlive.news/?p=128393 'चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी अमेरिकेसमोर भारत हाच पर्याय'
पुढारी ...
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
' गद्दार ' हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
‘ गद्दार ‘ हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून राज्यातील सत्ता नाट्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवण्यासाठी हे निघाले आहेत याबाबत राग येण्यापेक्षा आता दुःख वाटत आहे. ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच आता पक्ष संपवायला निघालेले आहे आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत, असे शिवसेना नेते आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·      महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध-शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
·      पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही-उद्धव ठाकरे यांचा दावा
·      यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
·      धुळे शहरात मुख्य रस्त्यावरील सराफा पेढीतून एक कोटी दहा लाख रुपयांची चोरी
·      औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासींना आर्थिक विकासाच्या योजनांचा लाभ द्यावा-केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड
·      पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीचा आज निकाल
आणि
·      जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या २१ वर्षाखालील संघाची सहा सुवर्णांसह, एकूण ११ पदकांची कमाई
****
महायुतीचं सरकार राज्याला विकासाकडे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल धुळ्यात शासन आपल्या दारी या उपक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. विकासाला साथ देण्यासाठी शिवसेना-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस, रुग्णवाहिका सेवा देणारे आणि अग्निशमन दल यांनी योग्य समन्वय साधला तर अधिक प्रभावीपणे काम करता येणं शक्य होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात कुलाबा इथं राज्य पोलीस मुख्यालयातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद काल झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत, पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारी पोलीस ठाणी तसंच अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतं, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी मागर्गदर्शन केलं. सत्ता संघर्षासाठी आणि राजकारणासाठी वापरला जाणारा पैसा हा मेळघाटातलं कुपोषण संपवण्यासाठी वापरला तर ते समृद्ध होईल, असं मत, ठाकरे यांनी व्यक्त केलं. आपल्यावर घरी बसून राहल्याची टीका सगळेजण करतात, मात्र आपण घरी बसलो होतो, कोणाची घरं फोडली नाही, असं ते म्हणाले. लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याच्या हक्क मतदारांना मिळावा, या विषयावर चर्चा होण्याची गरजही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. नागपूर इथंही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचं खासगी वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शिक्षण हक्क कायदा- आरटीई अंतर्गत राज्यात आतापर्यंत ८० हजार ९४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत, तर २० हजार ९०१ जागा रिक्त राहिल्या आहेत. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल आणि समाजातल्या वंचित घटकांमधल्या विद्यार्थ्यांना एक लाख एक हजार ८४६ जागांवर खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे. या जागांवरील प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सात जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. 
****
राज्यात आतापर्यंत सरासरी २२७ पूर्णांक तीन मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. खरीप हंगामात ४७ पूर्णांक १३ लाख हेक्टर, म्हणजे केवळ ३३ टक्के इतकी पेरणी झाली असल्याचं, कृषी विभागानं सांगितलं आहे. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस झाल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल. सध्या पेरणीची कामं संथ गतीनं होत असून, यात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या, तसंच भात वाफ्यांची कामं सुरू आहेत.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या चिंदर गावात अज्ञात रोगाने गेल्या तीन दिवसात तब्बल ३६ जनावरं दगावली आहेत. यामुळे चिंदर इथल्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. पशूवैद्यकीय विभागाची पथकं चिंदर गावात कार्यरत असून, आजारी जनावरांवर उपचार सुरू आहेत. दगावलेल्या जनावरांची उत्तरीय तपासणी करून ते नमुने पुणे इथल्या प्रयोगाळेत पाठवण्यात आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
या वर्षीच्या गणेशोत्सवात राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यावर्षी १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. 
****
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. या कार्याची दखल घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याचं, रोहित टिळक यांनी सांगितलं. येता एक ऑगस्टला लोकमान्य टिळक यांच्या एकशे तिनाव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
****
महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. क्रीडा, सामाजिक उपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी १८ वर्षांखालील बालकं यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
****
छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत��राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा काढून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं इसरोच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या यानाच्या निर्मितीसह त्याच्या संचलनाची जबाबदारीही खासगी क्षेत्राला दिली जाण्याची शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवेच्या माध्यमातून भारताचा अंतराळ उद्योग २०२५ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत १३ अब्ज अमेरिकी डॉलरचं योगदान देईल, असं एका अहवालात म्हटलं आहे.
****
भारतीय दलित पँथरचं पुनरुज्जीवन करण्याचा मानस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. नाशिक इथं काल भारतीय दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, ज्येष्ठ पँथर कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा काल आठवले यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. दलित पँथरचं पुनरुज्जीवन करताना या चळवळीचं स्वरूप कसं असावं, त्याची आंदोलनाची दिशा कशी असावी याबाबत विचार करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
धुळे शहरात एका सराफा पेढीतून एक कोटी दहा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना काल उघडकीस आली. शहरात आग्रा रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेत स्वर्ण पॅलेस या सराफा पेढीचं मागील बाजुच्या शटरचं कुलुप तसंच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, चोरट्यांनी आत प्रवेश केला, आणि सोनेचांदीच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश चौधरी यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदिवासींना मुलभूत गरजांसोबतच आर्थिक विकासाच्या योजनांचा लाभ प्रशासनानं द्यावा, असे निर्देश, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहेत. आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कन्नड, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांमधल्या आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावं, त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी सामाजिक कायकर्त्यांची मदत घ्यावी, तसंच या सर्व सुविधासाठी जिल्हा नियोजन समिती मधून पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून आदिवासी विभागाला उपलब्ध करुन द्यावा अशा सूचना कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीत २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात असून, ऐंशी पूर्णांक छप्पन टक्के इतकं मतदान झालं आहे. या कारखान्याचं कार्यक्षेत्र नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
****
वीजचोरीविरोधात औरंगाबाद परिमंडलात गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन हजार तीनशे एकोणीस जणांवर कारवाई करून, दोन कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते आणि कर्मचाऱ्यांना दिले होते. नागरिकांनी विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर टाळावा तसंच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी कुसूम योजनेअंतर्गत सौरपंप बसवले आहेत, यामुळे या शेतकऱ्यांची रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यापासून सुटका झाली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
‘‘सन 2021 पासून सौर कृषीपंप मिळविण्यासाठी जिल्ह्यातील 40 हजार 294 शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. तर 2 हजार 474 शेतकऱ्यांनी विहीर, बोअरवर कृषीपंप बसवून घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांची सोयीनुसार पाणी देता येत आहे. दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यामुळे रात्रपाळीत पिकांना पाणी देण्यापासून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे. शेतकऱ्यांना ही योजना लाभदायक ठरत असून सौर कृषीपंपाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.’’ 
रमेश कदम, हिंगोली.
****
भारतीय रिझर्व बँक आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता आणि जी-20 च्या भारतातल्या आयोजनासंदर्भात तालुका स्तरावर प्रश्नमंजुषा सपर्धा घेण्यात आली. या परीक्षेत हदगाव तालुक्यातल्या तामसा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनी पूर्वा लाभशेटवार आणि समृद्धी ठमके यांचा प्रथम क्रमांक आला. १४ तारखेला मुंबई इथं या संदर्भात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा होणार आहे.
****
जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या २१ वर्षाखालील संघाने सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य, अशी एकूण ११ पदकांची कमाई केली आहे. या संघाचं नेतृत्व करणाऱ्या प्रियांशने वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं, शिवाय मिश्र प्रकारात अवनित कौर बरोबर सुवर्णपदक पटकावलं. पार्थ साळुंके यालाही वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं. १८ वर्षाखालील चमूचं नेतृत्व करणाऱ्या आदिती गोपीचंद स्वामीनेही वैय्यक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे.
****
हिंगोली शहरात तोफखाना परिसरातल्या जुन्या रुग्णालयाच्या ठिकाणी निजामकालीन तोफगोळे सापडले आहेत. महिला रुग्णालयाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु असताना, लहान मोठे सुमारे एक हजार तोफगोळे सापडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. याबाबत महसूल प्रशासनाला पत्र पाठवून तोफगोळे ताब्यात घेण्याबाबत कळवण्यात आलं आहे.
****
आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिन ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी औरंगाबाद इथल्या डॉ. आंबेडकर सेनेनं केली आहे. या सेनेचे प्रमुख भाई दिनकर ठोकळ आणि प्रदेशाध्यक्ष देविदास लहाने यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिलं आहे.
****
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय मधील प्रवेशाची मुदत आज संपत आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्त्तीण इच्छुक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन डॉट डी व्ही इ टी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भूमिगत नाली बांधकामाच्या परवानगीसाठी लाच मागणाऱ्या दोन ग्रामसेवकांना काल जालना जिल्ह्यात बदनापूर इथं सापळा रचून अटक करण्यात आली. सिद्धार्थ घोडके असं या ग्रामसेवकाचं नाव असून, त्यानं सात हजार रुपये आणि मद्याच्या दोन बाटल्यांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं घोडके याला महिला साथीदारासह अटक केली.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावं, यासाठी २६ तारखेपर्यंत बीड जिल्ह्यात “राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं केलं आहे.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
' गद्दार ' हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
‘ गद्दार ‘ हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून राज्यातील सत्ता नाट्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवण्यासाठी हे निघाले आहेत याबाबत राग येण्यापेक्षा आता दुःख वाटत आहे. ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच आता पक्ष संपवायला निघालेले आहे आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत, असे शिवसेना नेते आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
' गद्दार ' हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
‘ गद्दार ‘ हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून राज्यातील सत्ता नाट्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवण्यासाठी हे निघाले आहेत याबाबत राग येण्यापेक्षा आता दुःख वाटत आहे. ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच आता पक्ष संपवायला निघालेले आहे आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत, असे शिवसेना नेते आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
' गद्दार ' हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
‘ गद्दार ‘ हाच त्यांचा खरा शिक्का , आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असून राज्यातील सत्ता नाट्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेना संपवण्यासाठी हे निघाले आहेत याबाबत राग येण्यापेक्षा आता दुःख वाटत आहे. ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच आता पक्ष संपवायला निघालेले आहे आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आम्ही ताठ मानेने उभे आहोत, असे शिवसेना नेते आदित्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes