#शिवसेनेत
Explore tagged Tumblr posts
Text
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत ‘उलटी गंगा’ वाहताना दिसत…
View On WordPress
#bjp leader joins shivsena#Poonam Mahajan#shivsena news#shivsena uddhav balasaheb thackeray#sudhir khatu#uddhav thackeray#उद्धव ठाकरे#पूनम महाजन#भाजप नेता शिवसेनेत#सुधीर खातू
0 notes
Text
‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत ‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ असे वक्तव्य केलेले होते मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचा कार्यकर्त्यांवर भलताच परिणाम झाला. आधी शिवसेनेत दोन गट पडले आणि राष्ट्रवादीतही दोन गट पडले त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांची सध्या गोची झालेली दिसून येत आहे. महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यात अनेक घटक पक्ष असल्याने गळ्यात उपरणी तरी किती घालायची ?…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 November 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
दिवाळीचा सण देशभर उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज अश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जाईल. या लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्याची दुकानं सजली आहेत. रोषणाईच्या विविध प्रकारच्या माळा आणि दिवे, तसंच कृत्रिम फुलांची तोरणं खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओघ दिसून येत आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्र��ाराची मोर्चेबांधणी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार असून, त्यातली पहिली सभा येत्या ८ नोव्हेंबरला धुळ्यात होत आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधीदेखील ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील, असं कॉँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मध्य रेल्वेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त २८ ऑक्टोबरपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह पाळण्यात येत आहे. "राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती" ही या सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहात चर्चासत्र, ‘मस्त कलंदर’ हा लघुपट, ‘सुबोध’ या विशेष वृत्त बुलेटिनचे अनावरण, तसंच वादविवाद, निबंध, रेखाचित्रे, घोषवाक्य, स्किट्स आणि लघुपट यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
विविध राज्यं, तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी १ फेब्रुवारीपासून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पुरस्कार देण्याची सुरुवात झाली आहे. दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
****
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या नऊपैकी तीन विधानसभा क्षेत्रातून काल २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार, तसंच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भोकरमध्ये सर्वाधिक १७ अपक्ष उमेदवारांनी, तर नायगाव आणि लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रशिक्षणादरम्यान गैरहजर असलेल्या २०१ कर्मचाऱ्यांपैकी खुलासा सादर न करणाऱ्या ८२ जणांवर तात्काळ गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत. आजपर्यंत २४ मतदान केंद्राध्यक्ष, ३२ प्रथम मतदान अधिकारी आणि ६३ इतर मतदान अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे.
****
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आणि उद्योजक सत्यजित जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
****
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात काल दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३२४ दखलपात्र तक्रारींमधून ३०६ तक्रारींचं १०० मिनिटांच्या आत निराकरण करण्यात आलं असून, उर्वरित तक्रारींचंही निराकरण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान काही अनियमितता किंवा आचारसंहिता भंगाच्या घटना आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मात��न संदेश, फोटो, व्हिडिओद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून १०० मिनिटांच्या आत तक्रारीचं निवारण केलं जातं.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं, तोपर्यंत न्यूझीलंडच्या २ बाद ५९ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****s
0 notes
Video
youtube
गद्दारांना शिवसेनेत थारा नाही उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल..
0 notes
Text
आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबई : दसऱ्याच्यानिमित्ताने आज (दि. २४) होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सग��्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. यंदाच्या भाषणामध्ये उद्धव…
View On WordPress
0 notes
Text
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी; शिंदे गटातील बडा नेता स्वगृही परतला
https://bharatlive.news/?p=172534&wpwautoposter=1697781929 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी; शिंदे गटातील बडा नेता स्वगृही ...
0 notes
Text
सुगत जरी शिंदे गटात गेला तरी मी राष्ट्रवादीतच राहणार; मनोहर चंद्रिकापुरेंची स्पष्टोक्ती
गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि तर्कवितर्कांना उधान आले. यातच सुगत जरी शिंदे गटात गेला असला तरी मी राष्ट्रवादीतच कायम राहणार, अशी स्पष्टोक्ती…
View On WordPress
0 notes
Text
'भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे'
मुंबई: गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. अशातच खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सापत्�� वागणूक मिळत असल्याचा दावा कीर्तिकरांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गजानन…
View On WordPress
0 notes
Photo
आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत? राष्ट्रवादीला झटका ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला राजीनामा आहेत.
0 notes
Text
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण…
View On WordPress
#eknath shinde amshya padvi entry#mla amshya padvi#mla amshya padvi shinde group entry#आमदार आमश्या पाडवी#आमदार आमश्या पाडवी शिंदे गट प्रवेश#एकनाथ शिंदे आमश्या पाडवी प्रवेश
0 notes
Text
आमदारांना महिला भगिनींनी ओवाळलं यात नगरकरांना काय मिळालं ? , ‘ पीआर इव्हेंट ‘ नकोत आता..
आमदारांना महिला भगिनींनी ओवाळलं यात नगरकरांना काय मिळालं ? , ‘ पीआर इव्हेंट ‘ नकोत आता..
अनिल भैय्या राठोड विचार मंचकडून उमेदवार प्रा. शशिकांत गाडे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झालेले असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकारी गाडे यांच्यासोबत दिसून येत आहेत. शशिकांत गाडे गेल्या वीस वर्षांपासून दिवंगत अनिल भैय्या राठोड यांच्यासोबत शिवसेनेत सक्रिय होते. शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा सेकंद उशीर झाला असे कारण सांगितलेले असले तरी त्यांनी बंड केले आहे हे…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 24.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत-उर्वरित जागा वाटपावर आजपासून चर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर-राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ३८ उमेदवारांची घोषणा-अजित पवार बारामतीतून निवडणूक रिंगणात
नामनिर्देशन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांकडून १६४ अर्ज दाखल
माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत तर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
आणि
राज्यात सोने ८० हजार रुपये तोळा तर चांदी एक लाख रुपये किलो
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं २५५ जागावाटपावर एकमत झालं असून, उर्वरित जागांसंदर्भात आजपासून चर्चा सुरू होणार आहे. सध्या तिन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी ८५ जागा निश्चित झाल्याचं काल पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
****
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्या स्वाक्षरीनं जारी करण्यात आलेली ही यादी शिवसेनेनं सामाजिक संपर्क माध्यमावरून जाहीर केली.
या यादीनुसार लोहा मतदार संघातून एकनाथ पवार, कळमनुरी संतोष टारफे, परभणी राहुल पाटील, गंगाखेड विशाल कदम, सिल्लोड सुरेश बनकर, कन्नड उदयसिंह राजपुत, औरंगाबाद मध्य किशनचंद तनवाणी, औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे, वैजापूर दिनेश परदेशी, गेवराई-बदामराव पंडित, उस्मानाबाद-कैलास पाटील, परांडा-राहुल ज्ञानेश्वर पाटील, बार्शी दिलीप सोपल, तर नेवासा मतदार संघातून शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ३८ उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी दिली आहे. माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना, तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी, धर्मराव आत्राम-अहेरी, राजकुमार बडोले-अर्जुनी मोरगाव तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं १३ उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर पन्नासपेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची माहिती, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतू त्यानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला.
****
शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून शिंदे अर्ज भरणार आहेत.
****
नामनिर्देशन प्रक्रियेच्या काल दुसऱ्या दिवसापर्यंत राज्यभरात १५३ उमेदवारांनी १६४ अर्ज दाखल केले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल एकूण १७५ जणांनी ३८५ अर्ज घेतले, तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून दोन तर गंगापूर मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात काल तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. भोकरमध्ये दोन, तर किनवट आणि नांदेड उत्तर मधून प्रत्येकी एका उमेदवाराने अपक्ष अर्ज सादर केले. जिल्ह्यातल्या सर्व मतदार संघातून काल विधानसभेसाठी ४४१ तर लोकसभेसाठी २८ अर्जांची उचल झाली.
लातूर जिल्ह्यात उदगीर या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले.
हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल ��ेली, तर वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं.
भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात बदनापूर मतदार संघातून दोन अपक्ष तर घनसावंगी मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराने काल अर्ज दाखल केला.
परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारसंघातून काल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह पाच अपक्ष, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी, तर पाथरी मतदार संघातून दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात काल एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, मात्र ७६ जणांनी १७३ अर्ज खरेदी केले.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षाचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाण देऊन स्वागत केलं.
****
भाजपा नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राज्यात सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ८० हजार रुपयांच्या पुढे गेले असून, चांदीचा दर किलोमागे एक लाख रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७९ हजार ५०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत आहेत. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते. दिवाळी आणि लग्नसराईसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, आणि जागतिक राजकीय तणाव यासारख्या घटकांचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडत असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
****
निवडणूक आयोगानं दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या पात्र मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून आल्या�� नागरिकांनी सी-व्हीजील अॅपवर किंवा १९५० या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे. ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधाही सी-व्हीजील अॅपवर उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप वर एक हजार ११ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९८ टक्के म्हणजे ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अक्षय भागवत आणि अकबर पटेल या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करण्याची सूचना, हिंगोली जिल्हा निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी केली आहे. ते काल पथक प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
परभणी इथले विधानसभा निवडणूक निरीक्षक राहुल मिश्रा यांनी काल जिल्ह्यात विविध मतदार संघात तपासणी करुन, कामकाजाचा आढाव घेतला
****
नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेचे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी ए. गोविंदराज आणि गुजरात कॅडरचे अधिकारी मयंक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. गोविंद राज यांच्याकडे नायगाव, देगलूर, मुखेड आणि लोहा मतदारसंघांची तर पांडे यांच्याकडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या मतदारसंघांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे.
****
बीड इथं काल पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
****
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल हजेरी लावली. मोहोळ इथं विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी उभारलेल्या तपासणी नाक्याचा तंबू पावसामुळे कोसळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
‘दाना’ चक्रीवादळ आज रात्री ओडिशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आपली पथकं तैनात केली आहेत.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आजपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वा��ता सामन्याला सुरुवात होईल. उर्वरित मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes
Video
youtube
राजन साळवी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार ? #news #breakingnews
0 notes
Text
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
संजय राठोड यांना बंजारा समाजातून विरोध वाढला , दिग्गज महंतांचा शिवसेनेत प्रवेश
टिकटॉक स्टार म्हणून ओळख असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला मात्र बंजारा समुदायात त्यांना होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. संजय राठोड यांना टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून…
View On WordPress
0 notes