#शाळांवर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
नगर जिल्ह्यात 3395 शाळांवर कोणाचाही नाही वॉच
https://bharatlive.news/?p=171951 नगर जिल्ह्यात 3395 शाळांवर कोणाचाही नाही वॉच
नगर : पुढारी वृत्तसेवा :  ...
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार -विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तारदरवाडी तलाव फुटला; आपत्ती निवारण दल तैनात.
आणि
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर.
****
राज्यातल्या दरड प्रवण भागातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत आपल्या निवेदनातून ही माहिती दिली. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत आज मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली, ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश याबैठकीत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्घटना घडल्यानंतर, दोन तासांत प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. मदतकार्यात पाऊस, चिखल आणि धुक्याचा मोठा अडथळा होता, मात्र तरीही एकशे नव्व्याण्णव लोकांना वाच��ण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मदतकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचं निधन झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करत, शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इर्शाळवाडीतल्या नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या वेळी सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांनी मतभेद विसरून एकत्र प्रयत्न केले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान, विकासाच्या नादात निसर्गाशी छेडछाड करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालायला हवा, असं मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात विधानसभेत बोलताना व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान, या सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातंही जबाबदार असून, या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. या संदर्भात गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारने रुग्णवाहिका, तसंच वैद्यकीय पथकांचं कार्यक्रमस्थळी नियोजन केलं होतं तर घटनेवेळी या यंत्रणा कुठे होत्या असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
****
राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सहाशे एकसष्ट खाजगी शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात हरिभाऊ बागडे, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न केला होता.
****
मुंबई शहर आणि परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यानं उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
नवी मुंबई परिसरातही पावसाचा जोर वाढला असून, दुपारपर्यंत ४३ पूर्णांक ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरी भागात तसंच वाशी परिसरातल्या सखल भागात पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रायगड जिल्ह्यातही चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळ��ार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांची पडझड झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या दुथडी भरून वहात असल्यानं नदीकाठच्या तसंच दरडग्रस्त भागातल्या सातशे सहासष्ट लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
सातारा जिल्ह्यातल्या सातारा, वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या दरडप्रवण तालुक्यांमधल्या तीनशे एकसष्ट कुटुंबांचं तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव, पुसद आणि उमरखेड परिसरात काल रात्री मोठा पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये नाल्यांचं पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा शोधावा लागला, तसंच पिकं पाण्याखाली बुडाली.
चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सततच्या पावसामुळे अनेक तालुक्यातली शेती पाण्याखाली आली आहे. काही घरांची पडझड झाल्याचं वृत्त असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड मधील तारदरवाडी इथला तलाव अतिवृष्टीमुळे आज फुटला. याठिकाणी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून आपत्ती निवारण दल तैनात करण्यात आलं आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी देगलूर आणि मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी गावकरी आणि शेतकऱ्यांना धीर देत प्रशासन नागरिकांच्या सोबत असल्याचं सांगितलं.
****
औरंगाबाद विभागात एक जून पासून आतापर्यंत २२९ मिली मीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं दिली आहे. पावसाचं प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असून ८८ पूर्णांक आठ टक्केच पाऊस पडला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १६८ मिली मीटर पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३२७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात २७७, लातूर २४१, परभणी २०८, जालना २०४ आणि औरंगाबाद जिल्ह्यात २०२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३५ पूर्णांक २७ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या, मोदी आडनाव मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये आज न्यायालयानं तक्रारदार पूर्णेश मोदी, गुजरात सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून, याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या चार ऑगस्टला हो��ार आहे.
****
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून औरंगाबाद इथं दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वार उद्घाटन आणि पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे आणि पद्मश्री डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, ना.धो.महानोर, कृषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. तसंच दिवंगत पद्मश्री फातेमा झकेरिया आणि पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार असून हा सन्मान त्यांचे कुटूंबीय स्वीकारणार आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्या सायंकाळी पाच वाजता हा सोहळा होणार आहे. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली आहे.
****
जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचं अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोली इथं जैन समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा घटना यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला तसंच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आलं.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
ब्रिटनमध्ये पाच लाख सरकारी कर्मचारी संपावर
Tumblr media
लंडन : चांगले पगार आणि सुरक्षित वातावरणाची मागणी करत ब्रिटनमध्ये पाच लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शिक्षक, नागरी सेवक, कनिष्ठ डॉक्टर, परिचारिका, ट्रेन आणि ट्यूब चालक, रेल्वे आणि टपाल कर्मचारी यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर गेल्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनकही तणावात आहेत. इंग्लंड आणि वेल्समधील नॅशनल एज्युकेशन युनियनचे शिक्षक संपावर गेल्यामुळे 23,400 शाळांवर परिणाम झाला, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली. शिक्षक संघटनेने म्हटले आहे की शालेय व्यवस्थेतील भरती आणि दशकभरापासून कमी पगार हे या निर्णयाचे प्रमुख कारण आहेत. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ब्रिटनमध्ये डिसेंबरपासून हे कर्मचारी संप करत आहेत. प्रत्युत्तरात, पंतप्रधान ऋषी सुनक यांच��� प्रवक्ते म्हणाले की अशा संपामुळे लोकांचे जीवन विस्कळीत होई��, संवाद हा योग्य दृष्टीकोन आहे. या संपामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावर मोठया प्रमाणावर परिणाम होत आहे. Read the full article
0 notes
loksutra · 3 years ago
Text
मुंबईतील २६९ बेकायदा शाळांबाबत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र, म्हणाले- महाविकास आघाडी सरकार झोपलंय का?
मुंबईतील २६९ बेकायदा शाळांबाबत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र, म्हणाले- महाविकास आघाडी सरकार झोपलंय का?
भाजप आमदार नितेश राणे (फाइल फोटो) इमेज क्रेडिट स्रोत: ANI भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 269 सरकारी शाळांचा प्रश्न उपस्थित केला आहे. या बेकायदा शाळांवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. भाजप नेते नितेश राणे (भाजपचे नितेश राणेमुंबईत सुरू असलेल्या बेकायदा शाळांच्या मुद्द्यावरून उद्धव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Photo
Tumblr media
शाळांवर “सोलर पॅनल” बसवून वीजपुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून सर्वे सुरू ​कणकवली​ ​​: आमदार नितेश राणे यांनी शाळांना​ ​"​​सोलर पॅनल”च्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याची संकल्पना मांडली आहे.​ ​या कामाला युद्ध पातळीवर गती मिळाली आहे.
0 notes
abbnews-blog1 · 5 years ago
Link
शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठी पालकांना शालेय शुल्क जमा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शाळांवर कठोर कार्यवाही करणे बाबत.
0 notes
digimakacademy · 5 years ago
Text
Portraits Of Savarkar Deendayal Upadhyay To Be Removed From Rajasthan Schools | ‘शाळांमधून सावरकरांचे फोटो काढा’; राज्य सरकारने दिला आदेश
Portraits Of Savarkar Deendayal Upadhyay To Be Removed From Rajasthan Schools | ‘शाळांमधून सावरकरांचे फोटो काढा’; राज्य सरकारने दिला आदेश
[ad_1]
राजस्थान सरकारच्या एका निर्यणामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. अशोक गहलोत यांच्या सरकारने सावरकरांचे फोटो काढून टाकण्याचा आदेश देणारे एक पत्रकच शाळांसाठी जारी केलं आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
औरंगाबादेत 4 शाळांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी
औरंगाबादेत 4 शाळांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी
प्राप्तिकर विभागाने बुधवारी शहरातील सीबीएसई माध्यमाच्या 4 शाळांवर एकाच वेळी छापे टाकले. या शाळांची वार्षिक उलाढाल प्रत्येकी ४ ते ५ कोटी रुपयांची असतानाही संस्थाचालक प्राप्तिकर विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.
आयकर विभागाच्या 4 पथकांनी हे छापे टाकले असून यात चिकलठाणा परिसरातील पीएसबीए इंग्लिश स्कूल (चिकलठाणा), रॉयल ओक्स वर्ल्ड स्कूल (देवळाई), ऑर्किड इंग्लिश स्कूल (वाळूज) व…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
चिंताजनक ! राज्यातील 14 हजार शाळांवर टांगती तलवार
https://bharatlive.news/?p=148682 चिंताजनक ! राज्यातील 14 हजार शाळांवर टांगती तलवार
नगरः पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
इन्फ्ल्यूएंझाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्दी, ताप, खोकला होताच नागरिकांनी जवळच्या सरकारी किंवा खासगी दवाखान्यात त्वरित दाखवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सध्या राज्यात इन्फ्ल्यूएंझा एच वन एन वन आणि एच थ्री एन टू टाईप -ए च्या उपप्रकाराचे रुग्ण आढळत आहेत. या आजारावर प्रभावी औषधी उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा, हस्तांदोलन करणं तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळावं, आणि लक्षणे असतील, तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आरोग्य विभागानं सूचित केलं आहे.
***
नाशिकमधल्या अशोका मेडिकव्हर या रुग्णालयात नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. नाकाद्वारे देता येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं संमती दिली असून इन्कोव्हॅक लस भारत बायोटेकने तयार केलेली आहे. १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांना ��ी पहिली मात्रा किंवा वर्धक मात्रा म्हणून ही लस घेता येणार आहे. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड ही लस घेतली आहे त्यांना ही नाकाद्वारे देण्यात येणारी लस वर्धक मात्रा म्हणूनही घेता येणार आहे.
***
राष्ट्रीय तपास संस्था- एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया -पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या १९ सदस्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. एनआयएकडून दाखल या पाचव्या आरोपपत्रात पीएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या १२ सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना गेल्या सप्टेंबर महिन्यात देशभरात ३९ ठिकाणी छापे टाकून अटक केली होती.
***
पंजाब राज्यात वारीस दे पंजाब या संघटनेच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी सदस्यांची धरपकड सुरू झाली आहे. आतापर्यंत संघटनेच्या ७८ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. संघटनेचा म्होरक्या अमृतपालसिंह याला अटक झाल्याचं वृत्त काल काही वृत्तसंस्थांनी दिलं होतं, मात्र तो आणि त्याचे काही साथीदार फरार असून, त्यांना पकडण्याच्या मोहिमेला पोलिसांनी गती दिली आहे. या सदस्यांवर हत्येचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले, शासकीय कामकाजात अडथळा, समाजात वैमनस्य पसरवणं, आदी गुन्हे दाखल आहेत.
***
राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संप आज सलग सहाव्या दिवशी सुरुच आहे. या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बाधित होत आहे तर दुसरीकडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ही संपात सहभागी झाल्याने शाळांवर सुद्धा परिणाम होत आहे. अत्यावश्यक सेवा कोलमडता कामा नये यासाठीची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. दुसरीकडे जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यां��ा तातडीने नोटीसा बजावण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
***
छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनात आज हिंदू गर्जना महामोर्चा काढण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरात क्रांतीचौकातून हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी जिल्हाभरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. दरम्यान, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी सकल हिंदू मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी 'अन्नदात्यासाठी एक दिवस उपवास' आंदोलन आज करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातले साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटूंबासह आत्महत्या केली होती, त्यांच्या स���मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
***
भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा यानं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डन याच्या साथीने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं झालेल्या या सामन्यात बोपण्णा मॅथ्यू जोडीनं ६-३, २-६, १० - ८ असा विजय मिळवला.
***
नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत आज ४८ ते ५० किलो वजनी गटात निखत झरीन चा सामना अल्जेरियाच्या बोआलम रोमायसा हिच्याशी तर ५४ ते ५७ किलो वजनी गटात मनिषाचा सामना ऑस्ट्रेलियाच्या राहिमी टीना हिच्यासोबत होणार आहे.
//************//
0 notes
dnyanesh001 · 6 years ago
Link
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
राज्यातील 14 हजार शाळांवर संक्रांत
https://bharatlive.news/?p=146727 राज्यातील 14 हजार शाळांवर संक्रांत
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी
RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी
RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी RTE admissions: ठाण्यातील कासरवडवली येथील एका नामांकित शाळेच्या व्यवस्थापनाकडून हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा शाळांवर कडक कारवाईची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांकडूनही या प्रकरणी तत्काळ ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
धार्मिक शाळांची खिल्ली उडवणाऱ्या प्रसिद्ध गायिकेला अटक
धार्मिक शाळांची खिल्ली उडवणाऱ्या प्रसिद्ध गायिकेला अटक
धार्मिक शाळांची खिल्ली उडवणाऱ्या प्रसिद्ध गायिकेला अटक तिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच बेकायदेशीर आणि अनियमित होती. तुर्कीमधील धार्मिक शाळांवर विनोद करणाऱ्या पॉप गायिक��� गुलसेन कोलाकोग्लूला ‘द्वेष आणि शत्रुत्व भडकवण्याच्या’ आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. असे शुक्रवारी एका अहवालात म्हटले आहे. एप्रिलमध्ये इस्तंबूलमध्ये एका मैफिलीदरम्यान, गुलसेनने आपल्याच संगीतकाराची भर मैफलीत थट्टा…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण; २०१५ ते २०२० या कालावधीतील कागदपत्रांची तपासणी
शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण; २०१५ ते २०२० या कालावधीतील कागदपत्रांची तपासणी
शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण; २०१५ ते २०२० या कालावधीतील कागदपत्रांची तपासणी माहिती सादर न करणाऱ्या आणि लेखापरीक्षणास उपस्थित न राहणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई होणार शालेय पोषण आहार योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा योग्य पद्धतीने वापर होतो का? याची तपासणी लेखापरीक्षणाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्याकडील २०१५…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
झारखंडमधील शेकडो सरकारी शाळांना रविवार नव्हे तर शुक्रवारी साप्ताहिक सुटी, नावेही बदलण्यात आली आहेत.
झारखंडमधील शेकडो सरकारी शाळांना रविवार नव्हे तर शुक्रवारी साप्ताहिक सुटी, नावेही बदलण्यात आली आहेत.
झारखंडमधील शेकडो सरकारी शाळांना रविवार नव्हे तर शुक्रवारी साप्ताहिक सुटी, नावेही बदलण्यात आली आहेत. झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात स्थानिक लोकांनी सरकारी नियम मोडून शाळांवर मनमानी नियम लादले आहेत. झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात स्थानिक लोकांनी सरकारी नियम मोडून शाळांवर मनमानी नियम लादले आहेत.परिसरातील शेकडो शाळांमध्ये आता सरकारी नियमानुसार रविवारची साप्ताहिक सुट्टी नसून शुक्रवारी (जुमा) सुट्टी…
View On WordPress
0 notes