#विचारपूस
Explore tagged Tumblr posts
kamlakar-das · 3 months ago
Text
Tumblr media
अमर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी भक्तीचा विधी कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी पवित्र पुस्तक ज्ञानगंगा जरूर वाचा ही पुस्तक तुम्हाला निशुल्क तुमच्या घरपोच पत्त्यावर दिली जाते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता किंवा फेसबुकवरील तुम्ही ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल विचारपूस करू शकता
3 notes · View notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सी-व्हिजिल ॲपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ-निवडणूक आयोगाकडून ९८ टक्क्यांहून अधिक तक्रारी निकाली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग
��ाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन-पुण्यात अंत्यसंस्कार
आणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या पाच पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. याकाळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत एकूण कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी भाजपाला दीडशे, शिवसेना ८७ ते ९० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. त्या अनुषंगानेही महायुतीची चर्चा होत असल्याचं वृत्त आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई इथं काँग्रेसच्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच इतर राज्यातील नेते उपस्थित होते
दरम्यान, चेन्निथला यांनी, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी आलो होतो, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं चेन्नीथला यांनी यावेळी सांगितलं.
****
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी आज धुळे इथं माध्यमांशी संवाद साधला. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेल हे नक्की असून, या दोन जागांसह एकूण १२ जागां��ी मागणी समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे केली असल्याचं, यादव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल असा विश्‍वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर आज पहाटे सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मुंबई गोवा महार्गावर केलेल्या कारवाईत १८ लाख रुपयांचं गोवा बनावटीचं मद्य आणि ८ लाख रुपयांचा टेम्पो असा २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ व��जून १० मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या Youtube वरुन प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या ७ मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला ठरल्या आहेत. या पदाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.‌ २००७ ते २०१० या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असलेल्या रहाटकर यांनी, महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपच्या राष्ट्रीय सचिव अशी विविध पदं भुषवली आहेत. रहाटकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचं संपादन, 'अग्निशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतांना, या पदाची जबाबदारी समर्पण भावनेनं पार पाडणार असल्याची भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केली.
अनेक क्षेत्रांमध्ये जसं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचे सामाजिक स्थान आहे. यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे महिलांच्या क्षमता आणि संधींना अधिकाधिक गती पण त्यांचा सुध्दा प्रयत्न नक्कीच करायला हवा. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना आपण दिली पाहिजे याकरीता मी प्रयत्न केले पाहिजे असंही मला वाटतं. या पदाचं निर्वाहन जे आहे ते मी खूप जबाबदारीने करेन आणि समर्पण भावनेने करेल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं’ नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान चार तास आपल्या क्षमतेशी निगडित काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातल्या विभागातले कर्मचारी आणि इतर संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी होतील. डिजिटल परिसंस्थेच्या मदतीनं नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं सप्टेंबर २०२० मध्ये कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आलं. नागरी सेवा देणाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती आणि मानव संसाधन व्यवस्थापनासाठी विकास साधण्याचा हा कार्यक्रम आहे.
****
महाराष्ट्रासह ओडिशात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या एका जोडप्याने आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत आणि अंजू सुळ्या जाळे उर्फ सोनिया उर्फ जनिता असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. १९७० च्या दशकात देशदूत वृत्तपत्रापासून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या अनुराधा औरंगाबादकर यांनी १९९८ पर्यंत साप्ताहिक गावकरीमध्ये कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची विविध विषयांवरची ९० पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्‍यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना प्रसिध्‍द केली असून या पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना-१६, सोयाबीनचा एम ए यू एस-७३१, देशी कपाशीचा पी ए ८३३, अमेरिकन कपाशीचा एन एच ६७७ आणि तीळाचा टी एल टी -१० या वाणांचा समावेश आहे. देशाच्‍या राजपत्रात समावेश झाल्‍यामुळे या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी व्यक्त केला आहे. हे वाण विकसित करण्‍यास योगदान देणारे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ डि. के. पाटील, डॉ एस. पी. मेहत्रे, डॉ. व्ही. के. गीते, आणि डॉ.मोहन धुप्पे यांच्यासह सर्व संबंधित शास्‍त्रज्ञांचं कुलगुरू इंद्र मणी यांनी अभिनंदन केलं आहे.
****
बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेली पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १०७ धावांची आवश्यकता आहे. आज चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सर्वबाद ४६२ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात सर्फराज खान १५०, ऋषभ पंत ९९, विराट कोहली ७० तर कर्णधार रोहित शर्माने ५२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू झाली, मात्र चार चेंडूत एकही धाव काढलेली नसतांनाच पाऊस तसंच अपुऱ्या प्रकाशानं, आजचा खेळ थांबवण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर प्रशासकिय यंत्रणांनी भर द्यावा, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक एकत्र होत आहे. त्यामुळं आचारसंहितेच्या या काळात संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
अहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डी इथं करण्यात आलं. या पुस्तिकेत निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.
****
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
एक अत्यंत संतापजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात शिरूर कासार परिसरात उघडकीला आले असून आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलेली सात वर्षीय मुलगी आपल्या घरी जात नव्हती म्हणून आत्याने तिच्याकडे विचारणा केली त्यावेळी तिने पप्पांकडे जायचे नाही असे सांगून टाहो फोडला. ��त्याने तिला जवळ घेऊन विचारपूस केली असता जन्मदाता पिता हाच तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
एक अत्यंत संतापजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात शिरूर कासार परिसरात उघडकीला आले असून आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलेली सात वर्षीय मुलगी आपल्या घरी जात नव्हती म्हणून आत्याने तिच्याकडे विचारणा केली त्यावेळी तिने पप्पांकडे जायचे नाही असे सांगून टाहो फोडला. आत्याने तिला जवळ घेऊन विचारपूस केली असता जन्मदाता पिता हाच तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
एक अत्यंत संतापजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात शिरूर कासार परिसरात उघडकीला आले असून आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलेली सात वर्षीय मुलगी आपल्या घरी जात नव्हती म्हणून आत्याने तिच्याकडे विचारणा केली त्यावेळी तिने पप्पांकडे जायचे नाही असे सांगून टाहो फोडला. आत्याने तिला जवळ घेऊन विचारपूस केली असता जन्मदाता पिता हाच तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
एक अत्यंत संतापजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात शिरूर कासार परिसरात उघडकीला आले असून आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलेली सात वर्षीय मुलगी आपल्या घरी जात नव्हती म्हणून आत्याने तिच्याकडे विचारणा केली त्यावेळी तिने पप्पांकडे जायचे नाही असे सांगून टाहो फोडला. आत्याने तिला जवळ घेऊन विचारपूस केली असता जन्मदाता पिता हाच तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
पप्पांकडे जायचं नाही म्हणून ती रडू लागली अन ..
एक अत्यंत संतापजनक असे प्रकरण बीड जिल्ह्यात शिरूर कासार परिसरात उघडकीला आले असून आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त गेलेली सात वर्षीय मुलगी आपल्या घरी जात नव्हती म्हणून आत्याने तिच्याकडे विचारणा केली त्यावेळी तिने पप्पांकडे जायचे नाही असे सांगून टाहो फोडला. आत्याने तिला जवळ घेऊन विचारपूस केली असता जन्मदाता पिता हाच तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
blogasiaorg · 2 years ago
Link
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल होताच बहीण पंकजा मुंडे पोहोचल्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस
धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल होताच बहीण पंकजा मुंडे पोहोचल्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस
धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल होताच बहीण पंकजा मुंडे पोहोचल्या भेटीला; प्रकृतीची विचारपूस राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते पोहोचत आहेत. दुसरीकडे भावाला भेटण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेदेखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
View On WordPress
0 notes
majkur-blog · 3 years ago
Text
दुर्गाष्टमी २०२१
आजचा दिवस नेहमी प्रमाणेच जात होता. सकाळपासून तसं माहित होते कि आज नवरात्री मधील एक दिवस आहे पण नक्की कुठली तिथी व आजच्या दिवसाचे माहात्म्य ठाऊक न्हवते.... मुळात रोजच्या दिनचर्येत व्यस्त असल्यामुळे तो विचार जरा कुठे मना��्या कोपऱ्यात होता. असो... दिवस नेहमिच WFH मध्ये जसा जातो तसा  गेला. थोड्या meetings, नेहमीचे जेवण, दुपारचा चहा वगैरे झाला, मग मित्राने सांगितले कि आज त्याच्या society ने दुर्गाष्टमी निमित्त पूजेचे आयोजन व प्रसाद वितरण करण्याचे कार्यक्रम ठेवले आहे, म्हणून सायंकाळी ७ वाजता आरतीला नक्की ये. [मी जिथे राहतो तिथे जवळ जवळ १६-१७ इमारती आहेत आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम बरेच होतात. पण २०२० साल पासून जे काय जागतिक पातळीवर चालले आहे त्यामुळे सहसा काही कार्यक्रम पहिले नाही.] 
Tumblr media
७ वाजले आणि मी काम उरकून खाली सोसायटी मध्ये उतरलो. जागा कुठे होती पूजेची हे माहिती न्हवते, पण लांबून आरतीच्या ओळी, त्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या व लहान मुलांचे खेळण्याचे आवाजांनी मला बरोबर दिशा सूचन करून इष्ठस्थळी पोहोचविले. तिथे गेलो तेव्हा बरेच लोकं दिसले व आधी थोडे संकोच झाले कि सध्याच्या परिस्थितीत असे जावे का? पण जवळ जाऊन पहिले तर सर्व जण व्यवस्थित मास्क घालून शिस्तीत आरती म्हणत होते. अर्थात गुरुजींना त्यांच्या सुंदर (आमच्या साठी तो आवाज सहन शक्तीच्या पलीकडचा होता तो विषय निराळा आहे म्हणा) आवाजात आरती म्हणायला माइक दिला होता म्हणून आणिकच रम्य वातावरण तयार होत होतं . मी आपला गर्दी चिरत हळू हळू पुढे सरकत आपल्या मित्रांना व त्यांच्या कुटुंबियांना शोधात होतो. तेवढ्यात लक्षात आले कि ज्यांनी मला बोलाविले होते, तो मित्र व त्याची सौ आरती करत होते व दुसरा मित्र एका टेबलाच्या समूहाजवळ उभे होते. मला हे गणित काही कळले नाही, मी सहजच त्याच्या जवळ गेलो आणि विचारपूस केली. मग लक्षात आले कि आज त्यांचा दिवस होता प्रसाद आयोजित करायचा. साधारण पणे ह्यात असे वाटेल कि त्यात काय...नॉर्मल आहे कि.....मला पण हा विचार चाटून गेला. 
पण इथे गोष्ट खूप वेगळी होती. ह्यांनी फक्त प्रसाद न्हवता आयोजित केला, पण व्यवस्थित नाश्ताच आणला होता. कागदाच्या प्लेट, केळ, सामोसा, खमण व  मोतीचूर चा लाडू आणून ठेवले होते… ३ मोठ्या टेबलांवर. पण एवढे का? तर ह्या मागचे कारण म्हणजे आज दुर्गाष्टमी असल्या मुळे  बऱ्याच आज्या, वहिन्या व लहान मुलींनी व्रत ठेवले होते. संध्यकाळी आरती झाल्यावर ते उपास सोडतील, घरी जाऊन खाण्या ऐवजी इथेच सर्व आयोजन केले होते. मग काय जसे जसे एक-एक आरत्या संपत होत्या आम्ही पुरुष मंडळी व काही पोरं-पोरी जोराने कमला लागलो. टेबल मांडले गेले, खाण्याचे crate उचलून रचले, कागदाचे plates काढून टेबल वर ठेवले आणि जसे काही factory  मध्ये होते तसे, भराभर assembly line  सुरु झाली वा��ण्याची. आरती संपताच लहान पोरं - पोरी प्लेट्स कडे येयला लागले. आमच्या पैकी कोणी त्यांची Line बघत होते तर कुणी "अरे जरा senior citizens ची प्लेट तैयार करा" उद्गारात होते. बघता बघता जे मी फक्त दर्शन घ्याला  गेलो होतो, त्यातून एक्दम जैयत तैयारीत जुम्प्लो होतो. कुठे तरी एखादा पोर "काका एक लाडू देता का" तर कुठे एखादी वाहिनी "अरे दादा मला सामोसा नको" अश्या काही फार्महीशी करू लागल्या. 
ह्या सगळ्या रण धुमाळीत माझ्या मनात सारखे एक विचार येत होते कि अजून देवीचे दर्शन नाही झाले, आरती घेणे नाही झाले.... पण कोण जाणे का असे वाटले कि आज सहज दर्शन न घेता उत्सवाची जाणीव घेऊनच दर्शन घ्यावे दुर्गा आईचे. मग काय...आम्ही लोकांनी जवळ जवळ ५०० प्लेट serve  केले सतत १-१:१५ तास उभय उभ्या उभ्या. शेवटी सर्व उरकले आणि काही प्लेट व त्यात नाश्ता उरला आणि आम्ही कार्यकारी मंडळींनी त्यातून प्रसाद मानून थोडे थोडे स्वाद घेतले. प्रसंग खूप छान राहिला व सर्वांनीच तोंड भरून आमचे प्रोत्साहन केले. सर्वांना आनंदित बघून, मुलांना उत्साहित बघून व स्त्री वर्ग ना अष्टमीचे सुंदर आयोजन झाल्या बद्दल संतुष्ट बघून बरेच अलौकिक वाटले. आम्ही सगळे कार्यकारी गप्पा मारत, हसत, खिदळत वर्तुळाकार उभे होते तेव्हा हळूच माझे लक्ष गेले मंडप कडे आणि दुर्गा आई ची स्मित मुखी मूर्ती दिसली. असे वाटले कि जसे काही एखाद्या शहाण्या मुलाने चांगले काम केले कि आई कसे कौतकने बघते. फार छान वाटले. इतक्या वर्षात पाहिलेंदाच असे घडले...माहित नाही का...घरी येऊन हा अनुभव आई ला फोन करून कळवळा....विस्तारात नाही पण आनंद झाल्या बद्दल सांगितले... आणि म्हणूनच हा पहिला वाहिला आणि लांब लचक लेख लिहिण्याचे नक्की केले. 
1 note · View note
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत एक हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पाऊस अद्यापही देशातून परतलेला नाही. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुर��क ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू होत आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री अचानक पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा हे रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी झाले आहेत. आज पहाटे मुंबईत राहत्या घरी ही घटना घडली. रिव्हॉल्वर हातातून निसटून खाली पडल्याने, त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायात लागल्यानं, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, गोविंदा यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.  
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बंधाऱ्यांमुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर जळकोट इथंल्या नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचं लोकार्पणही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी काल नांदेड इथं महाराष्ट्रातल्या खासदारांशी सवांद साधला. मुंबई -जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी, त्यासोबतच नांदेड - हैदराबाद या मार्गावर नवी वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. विभागांतर्गत गेल्या पाच वर्षात १ हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, २६ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नांदेड - बीदर, नांदेड - लातूर आणि बोधन - लातूर या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचंही जैन यांनी सांगितलं.
****
उद्या गांधी जयंतीला नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी ही माहिती ��िली. गावस्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण स्‍पर्धेतल्या पात्र कुटुंबांचा उद्या सन्‍मान करण्‍यात येणार आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावं, त्याकरता प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड, परिसर स्वच्छता, स्वच्छता रॅली यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये काल संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यासह शाळेत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला.
****
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
somghadge · 5 years ago
Text
असं मरण मला यावं अस मला वाटतं...
.....
मी मरणाची आणि ते येण्या अगोदर, तुला शेवटचं भेटायची वाट बघत कोठे तरी असावं आणि तू मला एके दिवशी सायंकाळच्या वेळेला भेटायला याव.
सगळी विचारपूस झाल्यावर "मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवू दे." अशी मी तुला विनंती करावी.
तू ही लगेच "हो" म्हणावं.
माझं डोक तुझ्या मांडीवर असावं. तू एका हाताने माझा हात हातात घ्यावा आणि तो सुखद धक्का पचवे पर्यंत तू तुझा दुसरा हात माझ्या केसातून फिरवावा.
"मी आले आहे ना आता ... बघ तू नक्की बरा होशील." अस तू म्हणावं.
माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या हृदयाचा ठाव घ्यायचा आज पर्यंत केला नाही असा प्रयत्न तू करावास.
आणि हे सगळं पाहताना माझ्या डोळ्यात हलकेच आलेले अश्रू
तू वरच्या वरच टिपून घ्यावेस आणि स्वतः मात्र बाहेर येऊ पाहणाऱ्या डोळ्यातील त्या सरींना आवर घालायचा केविलवाणा प्रयत्न करावा.
काहीही न बोलता फक्त नजरेने एकमेकांच्या सहवासातील क्षण.. एकमेकांना दिलेली मोजकी साथ.. परिस्तिने ने केलेली फसगत.. अशक्य गोष्टी शक्य करायचा केलेला अट्टाहास.. एकमेकांना दिलेला आधार.. एकमेकांवर केलेलं निस्वार्थी प्रेम.. हे सगळं आठवाव...
काही चुकले असेल तर माफी मागावी.. या जन्मात नाही पण पुढील जन्मात एकमेकांना साथ द्यायची एक शेवटची शपथ घ्यावी ...
.... मग मी पुढच्या जन्मात तुझी वाट बघतोय अस एकदा पापणी लवुन वचन द्यावं आणि परत एकदा डोळे उघडून तुला शेवटचं त्यात भरून घ्यावं ...
तुझा चेहरा पाहत पाहत एक छोटीसी हास्याची लकेर माझ्या चेहऱ्यावर यावी आणि माझे डोळे तसेच उघडे रहावे ... आता पर्यंत रोखलेले अश्रू आता मात्र तुला अनावर व्हावे... मग मनात नस्ताना तू माझे डोळे तुझ्या थरथरनाऱ्या हातानी बंद करावेत... ते ही अग��ी कायमचे.
1 note · View note
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला शनिवारी झालेल्या अपघातात जखमी व मृतांच्या वारसांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. तसेच ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. शनिवारी झालेल्या बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी डॉ. भारती  पवार यांनी जिल्हा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
अपघातग्रस्तांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला शनिवारी झालेल्या अपघातात जखमी व मृतांच्या वारसांना केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. तसेच ब्लॅकस्पॉट बाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. शनिवारी झालेल्या बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी डॉ. भारती  पवार यांनी जिल्हा…
View On WordPress
0 notes