Tumgik
#वाहतूक दंड यादी
darshaknews · 3 years
Text
ट्रॅफिक पोलिसांचे चुकीचे ट्रॅफिक चालान ई चलन रिफंड प्रक्रिया ई चलन पेमेंट mbh
ट्रॅफिक पोलिसांचे चुकीचे ट्रॅफिक चालान ई चलन रिफंड प्रक्रिया ई चलन पेमेंट mbh
नवी दिल्ली. ट्रॅफिक पोलिसांनी चुकून तुमचे चलन कापले असेल किंवा तुमचा कोणताही दोष नसताना चालान कापले गेले असेल, तर घाबरू नका. आता तुम्ही अनेक पातळ्यांवर जाऊन या चालानला आव्हान देऊ शकता. तुमच्याकडे आधीच चलन रद्द करण्याचे अनेक पर्याय आहेत. आपल्याला फक्त त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावरही कॉल करू शकता. तसेच, तुम्ही ही माहिती जवळच्या वाहतूक पोलिस…
View On WordPress
#ew वाहतूक नियम#चलन#चलन दंड यादी#चलन भरत नाही#चुकीचे बीजक कापल्यास काय करावे#चुकीचे वाहतूक चलन#दंड यादी#दिल्ली वाहतूक पोलीस#दिल्ली-एनसीआर वाहतूक चलन#नवीन चलन नियम#नवीन मोटार वाहन कायदा#नवीन वाहतूक नियम#न्यायालयात आव्हान कसे द्यावे#पोलिसांनी चुकीचे चालान कापले#बीजक नियम#बीजक वजा झाल्यावर काय करावे#रहदारीचे नियम#वाहतूक चलन#वाहतूक चलन कसे रद्द करावे#वाहतूक दंड यादी#वाहतूक नियम#वाहतूक नियम चलन यादी#वाहतूक नियम चालान#वाहतूक नियम चालान पूर्ण यादी#वाहतूक नियम चालानची संपूर्ण यादी#वाहतूक नियम दंड यादी#वाहतूक नियम फाइल पूर्ण यादी#वाहतूक नियमांचे चलन भरू नका#वाहतूक पोलिस#वाहतूक पोलिसांचे चलन
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 September 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भात दाखल विविध याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यीय घटनापीठाचं गठन, आज सुनावणी होणार
राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा आखण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
नाकाद्वारे कोविड प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारची परवानगी
काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला आजपासून प्रारंभ 
राज्यातल्या २८१ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, २९ जानेवारीला मतदान
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार
औरंगाबाद शहराला दर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे महानगरपालिकेला निर्देश
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव
****
राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच सदस्यीय घटनापीठाचं गठन केलं आहे. हे घटनापीठ आज या याचिकांवर सुनावणी करणार आहे. मूळ शिवसेना कोणाची हे ठरवण्याच्या मुद्द्यावर सध्या निवडणूक आयोगाकडे अर्ज प्रलंबित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यावर सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी करणारा अर्ज शिंदे गटाकडून काल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानंतर सरन्यायाधीश उदय लळीत यांनी जेष्ठ न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी घटनापीठ स्थापन केलं आहे. या घटनापीठात न्यायमुर्ती एम आर शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी नरसिंहा यांचा समावेश आहे. जवळपास ११ मुद्यांवर हे घटनापीठ निर्णय देणार आहे.
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग - ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १३ सप्टेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे.
****
राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा आखण्यासाठी राष्ट्रस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून काल ही घोषणा करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत देशभरातले सत्तेचाळीस सदस्य आहेत. या सदस्यांमध्ये सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ, राष्ट्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या सहकारी संस्थांचे ���्रतिनिधी, सहकार सचिव तसंच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सहकारी संस्थांचे निबंधक, यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, सहकारातून समृद्धी, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, हे नवीन सहकार धोरण आखलं जात आहे. सहकार चळवळ मजबूत करणं आणि सहकारावर आधारित आर्थिक विकास योजनांना प्रोत्साहन देणं, हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे.
****
भारत बायोटेक कंपनीकडून विकसित, नाकाद्वारे घेण्याच्या कोविड प्रतिबंधक लसीच्या नियंत्रित वापराला, केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी काल एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. आणीबाणीच्या स्थितीत, अठरा वर्षांहून जास्त वयाच्या रुग्णांना ही लस घेता येईल. यामुळे भारताचा कोविडविरुद्धचा लढा अधिक मजबूत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
मोटारीमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना देखील सीटबेल्ट अनिवार्य करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसेल तर दंड ठोठावण्याचा इशारा गडकरी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून दिला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
****
काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा आजपासून सुरु होत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा १२ राज्यातून जाणार असून, १५० दिवसात तीन हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करुन काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मांडणार आहे.
****
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातल्या २८१ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याची माहिती, प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमात येत्या २७ सप्टेंबरपर्यंत सदस्य सूची मागवली जाणार असून, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत बाजार समिती सचिवांना अंतिम मतदार यादी तयार करावी लागेल. येत्या १४ नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध होईल, २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान अर्ज सादर करावे लागतील. त्यानंतर २९ जानेवारी २०२३ ला मतदान होईल आणि ३० जानेवारी २०२३ ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
****
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर आणि भाषणावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे.
****
निधी अभावी कुठलीही विकास कामं रखडली जाऊ नयेत, याची तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्यांनी खबरदारी घ्यावी, विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार, असं आश्वासन, राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलं आहे. काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले सावंत यांनी, परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यातल्या तहसील कार्यालयांची आढावा बैठक घेतली. परांडा तालुक्यातल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले, तसंच तालुक्यात आरोग्य आणि स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याची सूचना केली.
****
औरंगाबाद शहराला दर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महानगरपालिकेला दिले आहेत. वारंवार संधी आणि निर्देश देऊनही महापालिका आश्वसानपुर्ती करत नसल्यामुळे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले आहे. जायकवाडी धरणातून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी मिळत नाही, शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे जलवाहिन्यांचं काम झालं नाही, त्यामुळे उपलब्ध साठा पुरेसा नाही, असं महापालिकेतर्फे न्यायालयात सांगण्यात आलं. यासंदर्भात पुढची सुनावणी १२ सप्टेंबरला होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर खुर्द इथल्या नगरपालिका शाळेत बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सौर उर्जेवर चालणारी ही राज्यातली पहिलीच शाळा ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
तुळजापूर खूर्द इथल्या नगर पालिकेच्या शाळा क्रमांक तीन मधले दिवे, पंखे, जल शुद्धीकरण यंत्र, स्मार्ट टीव्ही, एल ई डी प्रोजेक्टर, स्मार्ट फळा अशी वीजेवर चालणारी सगळी उपकरणं आता सौर ऊर्जेवर चालणार आहेत. माझी वसुंधरा या उपक्रमातून तुळजापूर नगर पालिकेनं शाळेला सौर प्रकल्प दिला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पातून दररोज तीन किलो मेगा वॅट सौर ऊर्जेची निर्मिती होईल, या शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात 'उत्कृष्ट शाळा'हा पुरस्कार देऊन यापूर्वी गौरवण्यात ही आलं आहे. मराठवाड्यातली ISO मानांकन प्राप्त करणारी नगर पालिकेची पहिली शाळा हा बहुमान ही याशाळेनं मिळवलेला आहे.
*देविदास पाठक, उस्मानाबाद
****
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय- ईडीने काल देशभरात अनेक ३० हून ठिकाणी छापे टाकले. मुंबई, दिल्ली आणि गुरुग्रामसह पंजाब आणि उत्तरप्रदेशातल्या शहरांमध्ये हे छापे घालण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रेल्वे गाडीला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास आय आर सी टी सी च्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिलं जातं. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार असल्याची माहिती ‘आयआरटीसी’कडून देण्यात आली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८६९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख सहा हजार २७२ झाली आहे. या संसर्गानं काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार ३२८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ५० हजार ३०२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य सात शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ७०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५, उस्मानाबाद आठ, लातूर सहा, नांदेड चार, जालना तीन, तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
क्रिकेटपटू सुरेश रैना यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. देशाच्या तसंच उत्तर प्रदेशच्या क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणं ही आपल्यासाठी खूप सन्मानाची बाब होती, असं त्याने म्हटलं आहे. सुरेश रैनानं आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत भारतासाठी अठरा कसोटी सामने, दोनशे सव्वीस एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि अट्ठ्याहत्तर टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रैनानं पाच हजार सहाशे पंधरा आणि टी ट्वे��टी क्रिकेटमध्ये एक हजार सहाशे चार धावा केल्या आहेत. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात असलेल्या रैनाने आयपीएल क्रिकेट मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून दोनशे पाच सामने खेळत पाच हजार पाचशे अट्ठावीस धावा केल्या आहेत.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल सुपर फोर गटात भारताचा श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव झाला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघानं कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १७३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव ३४, हार्दिक पांड्या १७, के एल राहुल सहा, दीपक हुडा तीन, तर विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार शून्यावर बाद झाले. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघानं चार गडी गमावत विसाव्या षटकात हे आव्हान पूर्ण केलं. 
****
पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ येत्या तेरा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत औरंगाबादमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर घेण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा, महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्यानं, शहरातल्या एन वन सिडको इथल्या लायन्स नेत्र रुग्णालयात, येत्या तेरा तारखेला हे शिबीर सुरू होणार आहे. डॉक्टर दीक्षित यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य आणि सहकारी डॉक्टर राज लाला यांनी या शिबिराचं काम नियमितपणे सुरू ठेवलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडी गावात जनावरांमध्ये लंपी स्कीन रोगाचा प्रार्दुभाव दिसून आला आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अंबाजोगाई शहरात मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हे आदेश दिले. बाधित जनावरांच्या पालकांनी पशुवैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं, आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन अंबाजोगाई बाजार समितीचे प्रशासक गोविंद देशमुख यांनी केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मंगळवारी पहाटे किरकोळ वादातून खून झाला. वसमत रस्त्यावरील शिवराम नगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. वेलतुरा इथं वीज पडून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. महेश सानप असं त्याचं नाव असून, तो आईसोबत शेतात काम करण्यासाठी गेला होता. काल सायंकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबला असता वीज पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
****
राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नंदेडसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
ट्रॅफिक चलन रद्द करण्याची प्रक्रिया ई चलन पेमेंट ट्रॅफिक चलन यादी रहदारीचे नियम onlene Challan mbh
ट्रॅफिक चलन रद्द करण्याची प्रक्रिया ई चलन पेमेंट ट्रॅफिक चलन यादी रहदारीचे नियम onlene Challan mbh
नवी दिल्ली. जर ट्रॅफिक पोलिसांनी तुमचे चालान चुकून कापले असेल किंवा तुमचा कोणताही दोष नसताना चालान कापले गेले असेल तर घाबरू नका. आता तुम्ही अनेक पातळ्यांवर जाऊन या चालानला आव्हान देऊ शकता. तुमच्याकडे आधीच चलन रद्द करण्याचे अनेक पर्याय आहेत. आपल्याला फक्त त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावरही कॉल करू शकता. तसेच, तुम्ही ही माहिती जवळच्या वाहतूक…
View On WordPress
#ew वाहतूक नियम#चलन#चलन दंड यादी#चलन भरत नाही#चुकीचे चालान#चुकीचे बीजक कापल्यास काय करावे#चुकीचे वाहतूक चलन#दंड यादी#दिल्ली वाहतूक पोलीस#दिल्ली-एनसीआर वाहतूक चलन#नवीन चलन नियम#नवीन मोटार वाहन कायदा#नवीन वाहतूक नियम#न्यायालयात आव्हान कसे द्यावे#पोलिसांनी चुकीचे चालान कापले#बीजक नियम#बीजक वजा झाल्यावर काय करावे#रहदारीचे नियम#वाहतूक चलन#वाहतूक चलन कसे रद्द करावे#वाहतूक दंड यादी#वाहतूक नियम#वाहतूक नियम चलन यादी#वाहतूक नियम चालान#वाहतूक नियम चालान पूर्ण यादी#वाहतूक नियम चालानची संपूर्ण यादी#वाहतूक नियम दंड यादी#वाहतूक नियम फाइल पूर्ण यादी#वाहतूक नियमांचे चलन भरू नका#वाहतूक पोलिस
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 May 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मे २०२० सायंकाळी ६.०० ****  टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी;  राज्याची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन भागात विभागणी  नवी मुंबई शहराचा देशातल्या कचरामुक्त पंचतारांकित शहरांच्या यादीत समावेश आणि  औरंगाबाद शहरात गुरुवारपासून टाळेबंदी शिथील **** टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने आज जारी केल्या. राज्याची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका क्षेत्रांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रं आखली जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्याचे अधिकार महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर पडताना मास्क लावणं गरजेचं असेल. तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून तो आता दंडनीय अपराध आहे. विमान, मेट्रो, शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह, मॉल, व्यायामशाळा तसंच प्रार्थनास्थळं बंदच राहणार आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडाविषयक, मनोरंजनात्मक, किंवा इतर कुठल्याही कारणासाठी लोकांना एकत्र जमवता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र वगळता घरपोच खाद्य पुरवठा करण्यासाठी उपाहारगृहांना राज्यभर परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवेतले उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. याशिवाय मजुरांची वाहतूक गरजेची नसेल तर सर्व बांधकामंही सुरू होऊ शकतील. मात्र टॅक्सी, रिक्षा, कॅब आणि अॅप आधारित वाहतुक सेवा रेड झोनमध्ये बंदच राहतील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. **** सरकारी कार्यालयांमधली बायोमॅट्रिक जैवमितीय हजेरी पद्धत टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातही रद्द करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयानं कार्यालयात अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यानुसार उपसचिव आणि त्यापेक्षा वरच्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांना कामाचे सर्व दिवस कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. तर उपसचिव दर्जापेक्षा खालच्या पदाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दररोज ५० टक्के उपस्थिती आवश्यक असेल. आतापर्यंत हे प्रमाण ३३ टक्के होतं. **** देशभरातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केला आहे. देशभरात सध्या एक लाख एक हजार १३९ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन हजार १६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३९ हजार १७४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचलं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठी गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे. एक मे पासून आतापर्यंत रेल्वेनं एक हजार ५६५ रेल्वे गाड्या चालवून सुमारे २० लाख स्थलांतरित कामगारांना आपल्या मूळ गावी पोहोचवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्व राज्य सरकारांनी विशेष श्रमिक रेल्वेसंदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, आणि स्थलांतरित कामगारांना पाठवण्याची तसंच आपल्या राज्यात पोहोचलेल्या कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातून आतापर्यंत जवळपास ५६ हजार स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं आहे. यापैकी २१ हजार ४७५ कामगारांना १७ रेल्वेगाड्यांमधून तर ३४ हजार ४८५ कामगारांना एक हजार ५५३ बसमधून त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत वांद्रे स्थानकावर आजही विशेष श्रमिक रेल्वे सुटण्यापूर्वी कामगारांनी मोठी गर्दी केली होती, पोलिसांच्या मदतीने हा जमाव पांगवण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** रायगड जिल्ह्यात ११ मे ते १८ मे या काळात जवळपास ३७ हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्हयात पायी किंवा खासगी वाहनांनी येणाऱ्यांची पेण जवळ खारपाडा इथल्या चेकपोस्टवर नोंद ठेवली जात आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी २७ हजार ८७० जणांना कोणतीही बाधा नसली तरी त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. **** जळगाव जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या ३१६ बसेसमधून ६ हजार ९५२ जणांना आपल्या मूळ गावी पोहचवण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली आहे. रवाना करण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. **** मध्यम उद्योगांच्या गुंतवणूक आणि वार्षिक उलाढालीच्या मर्यादेत वाढ केली जाणार आहे. या उद्योगांची गुंतवणूक मर्यादा २० कोटी रुपयांवरून ५० कोटी रुपये तर, वार्षिक उलाढालीची मर्यादा १०० कोटी रुपयांवरून २०० कोटी रुपये केली जाणार असल्याचं, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी सांगितलं आहे. सरकारने नुकतेच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे निकष वाढवले होते. त्यानंतर आता मध्यम उद्योगांच्या निकषात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच सूचना जारी केली जाईल, असं गडकरी यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** नवी मुंबई शहराचा देशातल्या कचरामुक्त पंचतारांकित शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हर��ीपसिंह पुरी यांनी ही आज ही यादी जाहीर केली, यामध्ये मध्यप्रदेशातलं इंदूर, छत्तीसगढ राज्यातलं अंबिकापूर, गुजरातमधलं राजकोट आणि सुरत, कर्नाटकातलं म्हैसूर आणि महाराष्ट्रातल्या नवी मुंबई या सहा शहरांना कचरामुक्त पंचतारांकित शहरं म्हणून घोषित करण्यात आलं आहे. **** औरंगाबाद शहरात परवा गुरुवारपासून टाळेबंदी शिथील करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, अन्नधान्य, किराणा आणि भाजीमंडई सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं परिपत्रक मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी आज जारी केलं आहे. याठिकाणी गर्दी होणार नाही तसंच शारीरिक अंतर राखणे, नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असल्याचं त्यांनी या परिपत्रकात नमूद केलं आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ५३ ��वीन रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७५ झाली आहे. यापैकी ३३५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून ३५ जणांचा मृत्यू झाला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** नांदेड शहरातील करबला भागात एका ६० वर्षीय इसमाचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु असून सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. या रुग्णामुळे नांदेड जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ९८ झाली आहे. **** गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३८ दिवसांनंतर कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता दोन झाली आहे. **** अमरावती जिल्ह्यात आज आणखी एकाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११२ झाली आहे. सध्या ३६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. **** धुळे जिल्ह्यात आणखी नऊ रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यामुळे धुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७९ झाली आहे. साक्री तालुक्यातल्या बल्हाणे इथल्या ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्यानं, प्रशासनाने संपूर्ण गाव प्रतिबंधित केलं असून गावात १४ दिवसांची टाळेबंदी घोषीत केली आहे. **** कोरोना विषाणूबाधित महिलेसोबत मुंबई येथून वाशिम येथे आलेल्या ६ व्यक्तींपैकी पाच जणांना कोरोना विषाणू लागण झाली असून एकाचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं **** रुग्णालयांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजून कोरोना विषाणूला रुग्णालयाबाहेरून लढा देण्याची गरज असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. कोवीड 19 या साथीवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून तुलनेने राज्यातील मृत्यू दर आणि साथीच्या प्रसाराचा वेग कमी राहिला असल्याचं ते म्हणाले. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सर्व प्रतीचा कापूस त्वरीत खरेदी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आलं. मागणी पूर्ण न झाल्यास, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. **** टाळेबंदीमुळं राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेल्या विद्यार्थी, मजूर, नागरिक, पर्यटकांसाठी राज्य शासनानं मोफत बस सेवा सुरू करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे त्यांनी या मागणीचं निवेदन सादर केलं आहे. **** नांदेड शहरात श्रीनगर परिसरात एक पादत्राणांचं दुकान परवानगी नसतांना उघडल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुकान चालकास पाच हजार रुपये दंड ठोठावत दुकान बंद केलं. अन्य एका दुकानदारानं निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यामुळं त्या दुकानदाराकडूनही मनपा पथकानं दंड वसूल केला. **** टाळेबंदीच्या काळात औरंगाबाद जिल्ह्यात सर्व नऊ तालुक्यांमधे सात हजार ४४ कामगारांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळालं असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 May 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ मे २०२० सकाळी ७.१० मि. **** ** टाळेबंदीमुळे राज्यभरात अडकून पडलेल्या नागरिकांना राज्य सरकार त्यांच्या घरापर्यंत मोफत सोडणार ** कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातल्या खाटा वाढवण्यासंदर्भात राज्याचं नियोजन ** राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक एक हजार २३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले; ३४ जणांचा मृत्यू ** औरंगाबाद जिल्ह्यात ३५ नवे रुग्ण; नांदेडमध्ये एक जणाचा मृत्यू ** लातूर जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकानं दिवसनिहाय सुरु करण्यास प्रशासनाची परवानगी तर औरंगाबाद शहरात गर्दी कमी करण्यासाठी शहागंज, बुढीलेन, चेलीपुरा, जुना मोंढा भागातले रस्ते बंद ** आणि ** जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख दहशतवादी रेयाझ नायकू ठार *** टाळेबंदीमुळे राज्यभरात अडकून पडलेल्या नागरिकांना राज्य सरकार त्यांच्या घरापर्यंत मोफत सोडणार आहे. राज्य परीवहन महामंडळाच्या सुमारे १० हजार बस गाड्यातून या लोकांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी राज्य सरकार एक वेबसाइट तयार करत आहे. इच्छुक नागरिकांना या वेबसाइटवर नोंदणी करून कुठून कुठून जायचे आहे याची माहिती द्यावी असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. २५ लोकांच्या समुहासाठी बस सोडली जाणार आहे. या बस रस्त्यात कुठेही थांबा न घेता थेट जाणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. मात्र रेड झोनमधले नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील असंही त्यांनी सांगितलं. **** राज्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रातून २५ रेल्वे आतापर्यंत कामगारांना घेऊन इतर राज्यात गेल्या असल्याची माहिती अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांनी दिली. चंद्रपूर आणि गडचिरोली इथं बाहेरच्या राज्यातून श्रमिकांना घेऊन कालपर्यंत दोन रेल्वे आल्या. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत गेलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात रेल्वेशी बोलणी झाली असून लवकरच त्यांना भुसावळ इथं आणलं जाईल, केवळ मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातल्या श्रमिकांसाठी रेल्वेचे सर्व पैसे भरल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. परराज्यांतल्या लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही आपापल्या घरी जाण्यासाठी मंत्रीमंडळ सदस्यांनी सूचना केल्या. **** मे महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची ���क्यता केंद्र शासनानं व्यक्त केली असल्यानं राज्य शासनानं मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमधे विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातल्या खाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचं नियोजन केलं आहे. राज्य शासनानं रेल्वे, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयं तसंच संस्था यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता इतरत्र असलेले राज्यातले नागरिक परत येत आहेत, तसंच येत्या काही दिवसात परदेशांतून देखील नागरिक देशात येणार आहेत, या सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्याच्या दृष्टीनंही नियोजन केलं जात आहे. **** कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातल्या सर्वच नागरिकांना समाविष्ट करण्यात आलं असून खाजगी रुग्णालयात उपचार न करता या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते म्हणाले, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये शासकीय कर्मचारी असो किंवा पांढऱ्या राशन कार्डवाले लोक असो सगळ्यांना कव्हर दिल्यामुळे कोविड असो किंवा नॉन कोविड असो या सगळ्यांच्या अनुषंगानं आपण सर्वांना कव्हर केलं असल्याने जनतेला अतिशय नम्र विनंती आहे की तुम्ही विनाकारण पैसे खरेदी करू नका तर तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यात तुमची ही जी काही हजार हॉस्पीटलची यादी आहे की जे साधारण पन्नास बेडेडच्या वरचेच हॉस्पीटल आहेत.त्याचा लाभ सर्वच जनतेनं घेतला पाहिजे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पंधराशे कोटी रुपयांचा विमा राज्य सरकार भरत असल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणं नसलेल्या, मात्र कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आलेल्या रुग्णांना आठवडाभरात घरी पाठवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. घरी पाठवण्यापूर्वी दोन ऐवजी एकच चाचणी या रुग्णांची करण्याचाही प्रयत्न आहे. यामुळे चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी व्हायला मदत होईल, असं ते म्हणाले. सध्या राज्यात ५४ ठिकाणी दिवसाला आठ ते दहा हजार चाचण्या होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं आहे. या डॉक्टरांना त्यांचे दवाखाने सुरू केले नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. **** राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक एक हजार २३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. तर काल ३४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे. **** औरंगाबादमध्ये काल दिवसभरात कोरोना विषाणूची लागण झालेले ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. शहरातल्या जयभीम नगर आणि संजय नगर भागात प्रत्येकी सात, कबाडीपुरा तसंच बायजीपुरा भगात प्रत्येकी पाच, कैलासनगर मधल्या दत्तनगर भागात चार, पुंडलिकनगरमध्ये तीन, बेगमपुरा, रेल्वे स्टेशन परिसर आणि उस्मानपुरा परिसरातल्या कबीर नगर भागात प्रत्येकी एक असे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात बजाजनगरमधल्या इंद्रप्रस्थ कॉलनीतल्या एका परिचारिकेला विषाणूची लागण झाल्याचं जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आलं. या रुग्णांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे. यासह औरंगाबाद जिल्ह्यातल्या या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५६ झाली आहे. दरम्यान, सातारा परिसरातल्या राज्य राखीव दलाच्या बटालियमधले १५७ जवान मालेगावहून बंदोबस्त करून परत आले आहेत, त्यापैकी १०९ जणांना विलगीकरणात ठेवलं आहे. दरम्यान, तीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण संपूर्ण बरे झाले, काल त्यांना घरी सोडण्यात आलं. यामुळे आतापर्यंत २८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर सध्या १४९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तसंच ४३ जणांचे अहवाल नकारात्मक आले असल्याचंही सांगण्यात आलं आहे. **** नांदेड शहरात एका ५६ वर्ष वयाच्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाला. तीन मे रोजी या व्यक्तीला कोविड केअर सेंटर मध्ये विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होतं. **** नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. केवळ मालेगावातली रुग्ण संख्या ४१३ झाली असून, नाशिक महापालिका हद्दीत २२ तर उर्वरित जिल्ह्यात ५२ रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण ५०३ बाधित रुग्ण आहेत. **** लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल आणखी सात जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. **** सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले बारा रुग्ण काल आढळले आहेत. यात कराडमधल्या दहा तर फलटणमधल्या दोघा जणांचा समावेश आहे. फलटण मधल्या रूग्णांमध्ये `कोरोना केअर सेंटर`मध्ये कार्यरत एक आरोग्य सेविका असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितलं. सातारा शहरात उपचार घेत असलेले तीन रुग्ण १४ दिवसानंतरच्या अहवालानंतर बरे झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळं त्यांना काल घरी सोडण्यात आलं. **** धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका अपघातग्रस्त तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर या तरुणाचा अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. **** टाळेबंदीच्या काळात राज्यात ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या असून त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात या संबंधी विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. **** महाराष्ट्राला कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरुद्धच्या लढ्यामध्ये सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यांनी काल महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या परिस्थितीसंबंधी दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या दोन राज्यांतल्या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतल्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. आपल्याला देशातल्या सगळ्या जिल्ह्यांना अत्यल्प किंवा रुग्ण नसलेल्या हिरव्या क्षेत्रात रुपांतरित करायचं असल्याचं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. **** टाळेबंदीमध्ये खरीपातली शेतीची कामं सुरळीत व्हावीत यासाठी कृषि विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन कृषि मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. ते काल खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेताना बोलत होते. राज्यात खरीपाचं क्षेत्र १४० लाख हेक्टर असून १६ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी उत्पादक यांच्या माध्यमातून १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असं या बैठकीत सांगण्यात आलं. कापूस बियाण्यांच्या १ कोटी ७० लाख पाकिटांची गरज असून बियाणे उत्पादक कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटाच्या पुरवठ्याचं नियोजन केलं आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीनं सर्व कृषी सेवा केंद्रं तसंच कृषी अवजारांची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकानं पूर्ण वेळ चालू राहतील, तसंच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं कृषिमंत्र्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी काही रस्त्यांवरची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे. शहरातल्या शहागंज, बुढीलेन, चेलीपुरा, जुना मोंढा या भागात लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी रस्ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे. चांदणे चौक ते चेलीपुरा चौक, हर्षनगर ते मंजुरपुरा हे रस्ते बंद करण्यात करण्यात आले आहेत. अग्निशमन दलाची वाहनं, रुग्णवाहिका या मार्गावरुन जाऊ शकतील तसंच नागरिकांना या मार्गांवरुन पायी ये-जा करता येऊ शकेल, वाहनधारकांनी या रस्त्यांऐवजी चंपा चौक, जामा मशीद, महापालिका कार्यालय या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा अशा सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. **** जालना जिल्ह्यातून बाहेर किंवा राज्यात जाणाऱ्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ३२ ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. परराज्यातून तसंच इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या नागरिकांनी देखील तपासणी करुन पुढील चौदा दिवस घरातच विलगीकरणात राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात किंवा गावात नवीन व्यक्ती आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातल्या सर्वच ४२ ग्रामपंचायतीमध्ये गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती आणि कर्मचारी प्रत्यक्ष गावा-गावात जाऊन कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती करत आहेत. लोकांनी पूर्णवेळ घरीच राहावं, मास्कचा वापर करावा, एकमेकांपासून अंतर राखावं आदीबाबत ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे. **** नांदेड शहरात भारतीय जैन संघटना, इंडीयन रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर आपल्या दारी, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सात दिवसात सात आरोग्य शिबीर घेऊन एक हजार ४३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि औषधं पुरवण्यात आली. **** लातूर जिल्ह्यात रेणा सहकारी साखर कारखान्यामध्ये बनवण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधीच्या विक्रीचा काल कारखान्याचे संस्थापक दिलीप देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रांवर आधारित आणि शासनाच्या धोरणानुसार हे औषध बनवण्यात आलं आहे. **** मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसंच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी आदींनी कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता दोन कोटी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. ठाणे जिल्हा सहकारी बँकेतर्फेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातली जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालकं आणि व्यावसायिक संस्थांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३१४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या सर्वांच्या सहकार्यानं, स्वंयशिस्तीचं आणि नियमांचं कडक पालन करून आपण कोरोना विषाणूला नक्की हरवू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. **** परभणी जिल्ह्यात जिंतूरच्या सुंदरलाल सावजी नागरी सहकारी बॅंकेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे काल हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. **** लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या वाढदिवसानिमित्त जनाधार सेवाभावी संस्थेनं जिल्ह्यातल्या डॉक्टरांसाठी १०० स्वसंरक्षण संच आणि ५०० लिटर सॅनिटायझरचं वाटप काल केलं. यापैकी प्रत्येक तालुक्यात दहा संच आणि ५० लिटर सॅनिटायझर देण्यात येणार आहे. **** नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार माधव कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना सॅनिटायझर आणि कापडी मास्कचं वाटप माजी शिक्षण सभापती शिवरीज पाटील होटाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. **** औरंगाबाद शहरातले काही किराणा विक्रेते टाळेबंदीच्या काळात चढ्या दरानं विक्री करत असल्यानं त्यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी जनता दल - धर्मनिरपेक्षतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या किराणा विक्रेत्यांकडून सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजमल खान यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. विक्रेत्यांना त्यांचे दर फलक लावणं सक्तीचं करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, वैजापूर इथं टाळेबंदीच्या अनुषंगानं काल किराणा दुकानांमध्ये चढ्या दरानं मालाच्या विक्रीबाबत प्रशासनाच्या वतीनं तपासणी करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील घायगाव, जांबरगाव, महालगाव इथल्या किराणा दुकानांचीही या पथकानं तपासणी केली. **** टाळेबंदीच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातले तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतःच्या संपर्क कार्यालयातून शेकडो भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र सुरू केलं आहे. हा उपक्रम उस्मानाबाद शहरासह तुळजापूर, नळदुर्ग, कळंब या ठिकाणी चालवला जात आहे. अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर लोक डाऊन मुळे कारखाने तसंच मोलमजुरी ची कामे बंद असल्यामुळे अनेक गोरगरिबांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गरजू गोरगरिबांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचा निर्णय घेतला. उस्मानाबाद नगरपालिकेतील नगरसेवक युवराज नळे यांनी गरजू नागरिकांना संपर्क करून डबे देण्याचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला चारशे डब्यापासून सुरू झालेला हा उपक्रम आज दररोज सहाशे जणांना जेवणाचे डबे पोहोचकरण्यापर्यंत गेलेला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेन राणाजगजितसिंह पाटील यांनी सुरू केलेलं हे अन्नछत्र गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवणार केंद्र होत आहे. **** लातूर जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकानं सुरु करण्यास प्रशासनानं परवानगी दिली असून, त्यासाठी दिवसनिहाय वेळा ठरवून दिल्या आहेत. सोमवार आणि मंगळवारी ॲटोमोबाईल्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, टायर्स, बॅटरी, तयार फर्निचर, मोबाईल शॉपी, बुधवार आणि गुरुवारी तयार कपडे, भांडी, शिंपी, पादत्राणे, दोरी, पत्रावळी, दागिने, जनरल स्टोअर्स, घड्याळं, सुटकेस आणि पिशवी, शुक्रवार आणि शनिवारी स्टेशनरी, कटलरी, सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, भंगार, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, रंगकाम साहित्य, उर्वरीत आस्थापना सुरु राहतील. ही सर्व दुकानं सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेती विषयक दुकानं, जीवनावश्यक वस्तुंची दुकानं, औषधी, दवाखाने रविवार वगळता दररोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. **** परभणी जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळानं चार मे पासून कापसाची खरेदी सुरू केली आहे. शासकीय कापूस खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत परभणीचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे … शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये जाऊन टोकण घेण्यासाठी होणारी गर्दी टळून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निश्चितच टळला आहे. परभणी जिल्ह्याच्या कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचे कौतुक मा. प्रधान सचिव, पणन यांनी केलेले आहे. आता बाजार समिती दूरध्वनीद्वारे संबंधित शेतकऱ्यांना फोन करून कापूस खरेदीसाठी बोलावले अशाच शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी घेऊन जावे. दिनांक पाच मे अखेर ६३८ शेतकऱ्यांचा पंधरा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. खरेदीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे बंधनकारक आहे. **** जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधल्या एका संयुक्त कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख दहशतवादी रेयाझ नायकू याला काल ठार केलं. तो गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा दलांना चकमा देत होता. बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर २०१६ मध्ये नायकू हा हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या झाला होता. त्याच्यावर बारा लाख रुपयांचं इनाम घोषित करण्यात आलं होतं. **** लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या गणपत लांडगे या जवानाला काल सियाचीन भागात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं. त्यांचा पार्थिव देह आज लोदगा इथं पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. **** आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी घेतला आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे काल सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये झालेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर पालखी सोहळा प्रस्थान करत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून पंढरपूरला जाईल, यात अंत्यत कमी वारकऱ्यांचा सहभाग असेल, तसंच सातही प्रमुख पालखी सोहळ्याबाबत एक प्रकल्प तयार करण्यात येईल असं या वेळी ठरवण्यात आलं. याबाबत एक समन्वय समिती शासनाशी चर्चा करेल, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं या बैठकीत निश्चित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जालना जिल्ह्यातल्या मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांना काल निलंबित करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न करणं आणि अन्य गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी पाटील यांच्या निलंबनाची शिफारस शासनाकडे केली होती. **** नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, मुदखेड, भोकर परिसरात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातून मे महिन्यासाठीची पाणी पाळी सोडण्यात आली आहे. या पाण्यामुळे या भागातील रहिवासी तसंच जंगली प्राणी, पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. **** लातूर जिल्हा न्यायालयातले जेष्ठ वकील विक्रम हिप्परकर यांचं काल सकाळी निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. पालकमंत्री अमित देशमुख यांनी हिप्परकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. **** नांदेड शहरातल्या वसरणी परीसरात शासकीय दुध डेअरी जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं ३४ लाख रूपये किमंतीचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक काल पकडला. हा गुटखा नांदेड शहरातून बाहेर गावी पाठवण्यात येत असल्याचा निनावी दूरध्वनी पोलिस अधिकाऱ्यांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करुन ट्रक चालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात गल्ले बोरगावमध्ये एका शेतात बेकायदेशिररित्या बनावट देशी आणि विदेशी दारु तयार करणाऱ्या उपसरपंचासह तिघांजणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशी दारुचे बॉक्स आणि इतर साहित्य असा ६३ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमालही खुलताबाद पोलिसांनी या आरोपींकडून जप्त केला. हा कारखाना गल्लेबोरगावचा उपसरपंच संजय कचरु भागवत चालवत होता. **** छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल नांदेड इथं त्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. **** नगर-मनमाड राज्य महामार्गावर बियर घेऊन जाणारा टॅम्पो काल पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालकासह एक जण जखमी झाला. या अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेल्या बियरच्या बाटल्या उचलून नेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 April 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० एप्रिल २०२० सायंकाळी ६.०० ****  देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के  कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत- मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश  दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार आणि  औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण **** देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर गेलं असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के एवढं झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या चोवीस तासात देशभरात एक हजार ७१८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, सध्या देशभरात २३ हजार ६५१ रुग्ण विविध रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासात ६३० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत आठ हजार ३२४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. **** कोविड १९ च्या उपचार पद्धतीत बदल करण्यासंदर्भात निर्देश जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यवस्थ रुग्णांवरच्या उपचारात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि प्रतिजैविकांचा वापर घातक असू शकतो, यामुळे या उपचारावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आज सुनावणीस आली. न्यायालय या संदर्भात तज्ज्ञ नसल्याने, काहीही निर्देश देऊ शकत नसल्याचं, तीन न्यायमूर्तींच्या पीठानं सांगितलं. या आजारावर सध्या कोणतीही ठोस उपचार पद्धत ज्ञात नसल्यामुळे, डॉक्टरांकडून विविध प्रकारे उपचारांचा प्रयत्न केला आहे. उपचाराबाबतचा आपला सल्ला, भारतीय वैद्यक संश���धन परिषद - आयसीएमआर कडे नोंदवावा, अशी सूचना न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली आहे. **** कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. अनेक खासगी दवाखाने तसंच सुश्रुषा गृहांकडून रुग्णांना निदान तसंच उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जे दवाखाने रुग्णांना उपचार नाकारतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दोन मे नंतर याबाबतचे आदेश लागू होणार असल्याचं, मेहता यांनी सांगितलं. **** लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसंच इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य सरकारनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसंच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व यंत्रणांनी जबाबदारीने यासंदर्भात अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या अडकलेल्या व्यक्तींची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांनी समन्वयानं वाहतुकीचा निर्णय घ्यावा, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अधिकृत पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोविड आजाराची लक्षणं असल्यास वाहतुकीची परवानगी दिली जाणार नाही, तसंच इतर राज्यांतून येणाऱ्यां सर्वांना चौदा दिवसांचा विलगीकरण अवधी पाळावा लागेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे. **** दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कपूर कुटुंबातल्या सदस्यांसह उद्योजक अनिल अंबानी, अभिनेता अभिषेक बच्चन, सैफ अली खान तसंच चित्रपटसृष्टीतल्या मोजक्या कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून, ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप दिला. कपूर यांचं आज सकाळी मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या निधनाने आपण एका गुणी कलावंताला मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे. औरंगाबाद इथं उद्या महाराष्ट्र दिनाचं शासकीय ध्वजार��हण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हे ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंमामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. **** खरीप हंगामापूर्वी बीड जिल्ह्यात विद्युत दुरुस्ती आणि रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसंच मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामं त्वरित सुरू करावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. वीज वाहतूक आणि वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कामं त्वरित करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी राऊत यांना दिलेल्या पत्रात केली आहे. **** विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठांना दिल्या असून त्याअनुषंगानं स्थापन केलेल्या कुलगुरुंच्या समितीची उद्या बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीपाठोपाठ परवा होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा एक ते १५ जुलै पर्यंत संपवाव्यात आणि बारावीनंतरचं नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर पासून सुरु करावं अशा सूचना यूजीसीने दिल्या असल्याचं सामंत यांनी सांगितलं. **** तूर खरेदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याची मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही मुदतवाढ द्यावी, असं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यात तूर खरेदीची मुदत आज ३० एप्रिलला संपते आहे. **** औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील नूर कॉलनी, कैलासनगर, चिकलठाणा, सावरकर नगर, किल्लेअर्क, जय भीमनगर, आसेफिया कॉलनी, बेगमपुरा या परिसरातले हे रुग्ण असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद शहरातली एकूण रुग्णसंख्या आता १५१ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं शहरातला जुना आणि नवा मोंढा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ही माहिती दिली आहे. या तीन दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर निर्जंतूक करण्यात येणार असून दुकानांचे मालक, कर्मचारी आणि हमाल बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं. **** कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी उद्या १ मेच्या सुट्टीच्या दिवशीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले सर्व बाजार व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी ही माहिती दिली. **** नांदेड शहरातील पीरबुऱ्हाणनगर भागातला रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय कोरोनाग्रस्त रूग्णाचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णावर २२ एप्रिल पासून उपचार सुरू होते. मधुमेह, अस्थमा यासह अनेक आजार असल्याने रूग्णाची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** धुळे इथं आज आणखी दोन रुग्णांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात २८ वर्षीय तरुणाचा, आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. **** अहमदनगर इथं एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. **** अमरावती शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनानं जिल्ह्यातल्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या तेवीस इमारती ताब्यात घेतल्या असून या इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. **** राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं. कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. **** लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सुरेन्द्र अनंतराव पाठक यांचं आज सकाळी लातूर इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव, तसंच सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहात होते. **** नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातले कर्मचारी वैजनाथ दांडगे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांचा निधी दिला आहे. आज त्यांनी आपला धनादेश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. **** चंद्रपूर महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ जणांविरूद्ध तसंच मास्क न वापरणाऱ्या ३८६ नागरिकांवर कारवाई केली आहे. या नागरिकांकडून ७८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला नसून जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. ***** ***
0 notes