Tumgik
#वाहतुकीची कोंडी
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातला प्रचार थांबला;उद्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना
उमेदवारी अर्ज प्रक्रियेसाठी औरंगाबाद, जालना आणि बीड प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जळगाव इथं एका रसायन कारखान्याला लागलेल्या आगीत एक जण ठार तर २५ जखमी
आणि
रामनवमीचा सोहळा देशभरात उत्साहात साजरा
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज थांबला. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदार संघात परवा १९ एप्रिलला मतदान होत आहे. आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढून मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा १९ तारखेला संपणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या उस्मानाबाद आणि लातूर सह अकरा मतदार संघात सात मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह, नंदूरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या एकूण अकरा मतदार संघात उद्यापासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होईल, २५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून, २६ एप्रिलला अर्जांची छाननी तर २९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. या सर्व मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी या पूर्वतयारीचा आज अंतिम आढावा घेतला. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, वाहतुकीची कोंडी होऊन, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून येत्या २९ तारखेपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतुक सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
जालना मतदार संघासाठीही उद्या पासून उमेदवार नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना आपलं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी, suvidha.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिलेलं आहे. कॅन्डिडेट ॲप किंवा पोर्टल वरुन देखील उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरता येणार आहे. जालना इथले उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात २३ स्थिर तर १८ भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत.
****
बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माध्यम सनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कक्षाला, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या मतदार संघात उद्यापासून सुरू होत असलेल्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज पाहणी केली. बीड लोकसभा मतदारसंघात, अवैध मद्य वाहतूक तसंच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून, या अंतर्गत आतापर्यंत ९२ प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
****
नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काही मतदारांच्या घरी पोल चीट अर्थात मतदार माहिती चिठ्ठी पोहोचवून मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी स्वीकारून मी मतदान करणारच, असा निर्धार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ज्येष्ठ मतदारांची भेट घेऊन, त्यांना गृहमतदान सुविधेबाबत माहिती दिली. जिल्ह्यात १२ डी फॉर्म भरून ६९९ ज्येष्ठ मतदारांनी गृहमतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
****
जळगाव इथं आज एका रसायन कारखान्याला लागलेल्या आगीत एक कामगार ठार तर २५ हून अधिक जण गंभीररित्या होरपळले आहेत. डब्ल्यू-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत ही भीषण दुर्घटना घडली. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची तसंच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान, जळगाव महापालिका आणि जैन कंपनीच्या अग्निशमन बंबांकडून सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात बोल्डा फाटा इथं अचानक लागलेल्या आगीत हॉटेल, कपड्याचे दुकान आणि ऑटोमोबाइल्ससह चार दुकानं खाक झाली, काल रात्री ही घटना घडली. या घटनेत मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
श्रीरामनवमी आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली. रामजन्मभूमी अयोध्येत आज नव्याने बांधलेल्या श्री रामलल्ला मंदिरात प्रथमच रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी ठीक १२ वाजता बाळरामाच्या कपाळावर सूर्यकिरणांनी प्रकाश टाकत 'सूर्य तिलक' लावला गेला. बाळरामची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
राज्यातही रामनवमी उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे.
* छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा तसंच समर्थ नगर इथल्या राम मंदिरासह शहरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये दुपारी १२ वाजता रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्तानं रक्तदानशिबीर, आरोग्य तपासणी शिबीर तसंच प्रसाद वाटपासह विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
* धाराशिव इथं समर्थ नगर श्रीराम मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिरात पहिल्याच वर्षी महिला पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
* जुना जालना भागातील श्रीराम मंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी रामदास महाराज आचार्य यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचं वर्णन केलं.
* यवतमाळ जिल्ह्यात गावागावात प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रा काढण्यात आल्या, तसंच शहरात पहाटे पारंपारिक वेशभूषेत रामभक्तांनी प्रभात फेरी काढली.
* अकोला शहरात श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने शहराच्या प्रमुख चौकांमध्ये भगव्या पताकांनी आकर्षक विद्युत रोषणाई, नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती तसंच अठरा फूट उंच हनुमान देखावाही उभारण्यात आला आहे.
* धुळे शहरात श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी धुळे शहरातून दुचाकी फेरीसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत तरुण, तरुणींसह  राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रेत अयोध्येतल्या बाळरामासारखी हुबेहूब मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.
* नाशिक इथं शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात श्री गोरा राम मंदिर आणि अन्य मंडळांमध्येही रामजन्मोत्सव साजरा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
* रत्नागिरी जिल्ह्यात पावसमधल्या श्रीराम मंदिरातला रामनवमी उत्सवदेखील प्रसिद्ध असून, यंदाही गुढीपाडव्यापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
राज्यात गोंदवले, सज्जनगड तसंच जालना जिल्ह्यात जांबसमर्थ इथंही भाविकांनी रामनवमीनिमित्त श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
* शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात आज दुपारी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. इतरही धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडले. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.
****
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मानल्या जाणाऱ्या वणी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. येत्या हनुमान जयंती पर्यंत हा चैत्रोत्सव चालणार असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी आहे. एस टी महामंडळाच्या वतीने उत्सव काळात सुमारे अडीचशे जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
अकोल्यामध्ये, 'स्वीप' अंतर्गत मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृती करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी १० हजार विद्यार्थी एकाचवेळी प्रतिज्ञा घेणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथं येत्या शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज एलईडी रथ रवाना करण्यात आले.
****
यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांना यशवंत सेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
****
0 notes
Text
मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी; मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
https://bharatlive.news/?p=108075 मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी; मुंबईत पावसाचा ऑरेंज ...
0 notes
karmadlive · 2 years
Text
वाहतूक कोंडीने वाहनधारकांना होत आहे मनस्ताप
करमाड: ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या करमाडचा आठवडे बाजार केवळ जागेअभावी अडचणीत सापडला आहे . येथील सोमवारचा आठवडे बाजार मोठा भरत असल्याने जागा कमी पडते . दुकाने चक्क औरंगाबाद – जालना या मुख्य महामार्गावर थाटली गेल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते . वाहतुकीची कोंडी सोडवण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांत प्रवाशांत नाराजी आहे .…
Tumblr media
View On WordPress
0 notes
makrandghodke · 4 years
Photo
Tumblr media
pune trafic पुण्यात लॉकडाऊन झाले तरीही अगणित वाहने रस्त्यावर  चेक पॉईंटने उडवला सोशल डिस्टंसीग चा फज्जा  पुणे (प्रतिनिधी):
0 notes
nandedlive · 2 years
Text
नांदेड, बीडसह लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी
Tumblr media
निलंगा : औरादला २ तासांत १४५ मि.मी. पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू, २ म्हशी दगावल्या लातूर/नांदेड : मराठवाड्यात औरंगाबाद, जालन्यासह नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील ब-याच भागात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा तालुक्यात सायंकाळी दमदार पाऊस पडला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे तर तब्बल १४५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच बीड जिल्ह्यातही माजलगाव, वडवणी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. याशिवाय नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. त्यात भोकर तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव येथील पद्मावती नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पुराचे पाणी दगडी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वडवणी तालुक्यातदेखील मुसळधार पाऊस झाला असून, लऊळ येथील नदीला पूर आला. तसेच इतर भागातही पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातही गुरुवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह जिल्हा आणि शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, भोकर तालुक्यात पिंपळढव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असून, मराठवाड्यात ब-याच भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यान��� वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यातही गुरुवारी दुपारनंतर निलंगा, औसा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निलंगा शहरासह तालुक्यात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अक्षरश: रस्त्याला तलावाचे स्वरुप आले. नाले, गटारी, रस्ते तुडुंब भरुन वाहू लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. निलंगा-औराद रस्त्यावर अटलवाक जवळ रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. रस्त्याला तलावाचे रुप आले. दरम्यान औराद शहाजानी येथे ढगफुटी होऊन दोन तासात १४५ मीमी पाऊस झाला असल्याची औराद हवामान केंद्रात नोंद झाली असल्याचे मुकरम नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, या पावसात दापका येथील बाबूराव खंडू सुरवसे (५०) यांच्या शेतात वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच आनंदवाडी ( शि.को.) येथील शेतकरी बालाजी गंगाराम शिंदे यांची एक म्हैस व दगडवाडी येथील विनायक रामा भोसले यांची एक म्हैस दगावल्या. वीज पडून दोघांचा मृत्यू भोकर, निलंगा तालुक्यात प्रत्येकी १ बळी नांदेड जिल्ह्यात एक महिला, तर निलंगा तालुक्यात दोन म्हशींसह एका पुरुषाचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गुरुवारी शेतकरी सुभाष पोले पत्नी व दोन मुलांसह शेतात गेले होते. दुपारी २.२० च्या सुमारास सुभाष पोले, पत्नी ललिता पोले व त्यांची दोन मुले झाडाखाली बसली होती. त्यावेळी वीज कोसळून ललिता सुभाष पोले (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुभाष पोले गंभीर जखमी झाले. दोन मुले सुदैवाने बचावले. दरम्यान, निलंगा तालुक्यातील दापका येथील बाबूराव खंडू सुरवसे (५०) यांचा मृत्यू झाला. आनंदवाडी आणि दगडवाडी येथील शेतक-यांच्या २ म्हशी दगावल्या. Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
आयुक्त साहेब बघा...राणे नगर बोगद्यात वाहतुकीची कोंडी,पोलीस गायब अन् वाहनचालक हैराण
आयुक्त साहेब बघा…राणे नगर बोगद्यात वाहतुकीची कोंडी,पोलीस गायब अन् वाहनचालक हैराण
प्रतिनिधी सिडकोराणे नगर येथील उड्डाणपुलाखालील बोगद्यात वाहतूक कोंडी हि नित्याचीच समस्या झाली असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. वाहतूक ��ोलीस मात्र ऐन गर्दी व वाहतूक कोंडीच्या वेळी गायब असल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत येथे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले असून कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.पोलीस असले तरीही कायमस्वरूपी वाहतूक…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
हॅकर्सनी रशियाला दिला ' असा ' काही झटका की कुणालाच काही समजेना
हॅकर्सनी रशियाला दिला ‘ असा ‘ काही झटका की कुणालाच काही समजेना
रशियातील एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून हॅकर्स व्यक्तींनी आपण काय करू शकतो याचा प्रत्यय रशियाला आणून दिलेला आहे. रशियातील कॅब सेवा देणारी सर्वात मोठी यांडेक्स टॅक्सी या कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करण्यात आले. यांडेक्स हे रशियातील गूगल म्हणून परिचित आहे त्यांनी कॅब सर्व्हिसच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात टॅक्सी मागवल्या आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 06 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०६ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
२० व्या आसिआन भारत आणि १८व्या पूर्व आशिया परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इंडोनेशिया दौऱ्यावर जात आहेत. आसिआन परिषदेचं अध्यक्षपद सध्या इंडोनेशियाकडे असून, जकार्ता इथं ही परिषद होत आहे. गेल्या वर्षी भारत-आसियान संबंधांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत वृध्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर २०वी आसिआन भारत परिषद विशेष असल्याच��� परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या पूर्व भागाचे सचिव सौरभ कुमार यांनी काल माध्यामांशी बोलताना सांगितलं.
****
जी 20 परिषदेनिमित्त नवी दिल्लीत भरवण्यात येणार्या हस्तकला प्रदर्शनात महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी साडीचा समावेश करण्यात आला आहे. देशाची सर्वांगिण सामाजिक - आर्थिक वाढ सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. प्रगती मैदानातल्या भारत मंडपम इथं आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
****
आज श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. यानिमित्त सर्व कृष्ण मंदिरांमध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात येतो. आज रात्री बारा वाजता मंदिरांमध्ये आणि घराघरात कृष्ण जन्मोत्सव करण्यात येईल. दहिहंडी आणि गोपालकाला उद्या साजरा होईल.
****
राज्यात गाळांनी भरलेले जलसाठे, नद्या, ओढे-नाले यांना येत्या उन्हाळ्यात गाळमुक्त करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीनं जलसंधारणाच्या आणि धरणांमधला गाळ काढण्याच्या कामांचं नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं. कोकणात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात हा भाग कोरडा पडतो, या भागात जलसंधारणाची कामं करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
लोकशाही हा जीवनमार्ग व्हायचा असेल तर ती समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये पोहोचण्याची गरज असल्याचं, राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटलं आहे. शिक्षक दिनाचं औचित्य साधून लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण, या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. लोकशाही प्रक्रियेत तरुणांनी जास्तीतजास्त सहभाग नोंदवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
****
डेंग्यूच्या आजारावरील लस निर्मितीचा तिसरा टप्पा पार पडला असून, आता लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जात आहे, अशी माहिती जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले यांनी दिली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. लस दिलेल्यांमध्ये डेंग्यूच्या सर्व विषाणुंविरोधात अँटिबॉडिज अर्थात प्रतिपींड तयार होतात का यांची खात्री करुन, सुरक्षिततेशिवाय लस उपलब्ध करुन दिली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतल्या वैयक्तिक शेततळे, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या फळबागधारक शेतकऱ्यांनी, राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असं आवाहन लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. या योजनेतून अस्तरीकरण नसणाऱ्या शेततळ्यासाठी पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत तर अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या तुळजापूर-औसा महामार्ग क्रमांक ३६१ वरची अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी ६१ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली. ही कामं झाल्यानंतर या महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन अपघातांचा धोका कमी होईल, तसंच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांची काक्रंबा गावातल्या उड्डाण पुलामुळे सोय होऊन वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
****
अकोला जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचं प्रमाण वाढत आहे. काल आणखी चार गुरांना या रोगाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पातूर तालुक्यातल्या आलेगाव, आसोला, बार्शिटाकळी तालुक्यातल्या येवता आणि मूर्तिजापूर तालुक्यातल्या मंदुरा या गावात संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. बाधित परिसरात जनावरांची खरेदी - विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा आणि प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
****
हवामान
येत्या तीन दिवसात राज्यात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, या जिल्ह्यांसह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढील ३ दिवसांकरता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
हॅकर्सनी रशियाला दिला ' असा ' काही झटका की कुणालाच काही समजेना
हॅकर्सनी रशियाला दिला ‘ असा ‘ काही झटका की कुणालाच काही समजेना
रशियातील एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून हॅकर्स व्यक्तींनी आपण काय करू शकतो याचा प्रत्यय रशियाला आणून दिलेला आहे. रशियातील कॅब सेवा देणारी सर्वात मोठी यांडेक्स टॅक्सी या कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करण्यात आले. यांडेक्स हे रशियातील गूगल म्हणून परिचित आहे त्यांनी कॅब सर्व्हिसच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात टॅक्सी मागवल्या आणि त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years

mhlivenews · 2 years
Text
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
ठाणे, दि. 28 (जिमाका) :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years

bharatlivenewsmedia · 2 years
Text
Lonavala traffic jam : पर्यटनाचा झाला विचका! बंदी असतानाही पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी
Lonavala traffic jam : पर्यटनाचा झाला विचका! बंदी असतानाही पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी
Lonavala traffic jam : पर्यटनाचा झाला विचका! बंदी असतानाही पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी, तर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळे बंद केल्यामुळे अशाप्रकारची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोणावळा, पुणे : लोणावळा शहरात मोठी वाहतूक कोंडी (Lonavala traffic jam) झाली…
View On WordPress
0 notes