#वझर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      मराठवाडा वॉटर ग्रीड टप्पाटप्प्यानं विकसित करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता, औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून २८५ कोटी रूपयांच्या पहिल्या ग्रीडला मंजुरी.
·      जालना जिल्ह्यातल्या हातवन प्रकल्पाच्या २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारीत खर्चास प्रशासकीय मान्यता.
·      राज्यातल्या ‘आशा’ स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची राज्य सरकारची घोषणा, मागण्या मान्य झाल्यानं संप मागे.
·      राज्यात १० हजार ६६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १३ जणांचा मृत्यू तर ४०५ बाधित.
आणि
·      जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधित पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
****
मराठवाडा विभागातल्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता टप्पा-टप्प्यानं विकसित करण्यास, काल मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात या ��ंदर्भात बैठक झाली. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यासाठी, जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास काल मान्यता देण्यात आली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील कांही तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत, एकूण पाण्याची उपलब्धता, आणि निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नाशिकमधल्या धरणांमधून वाहून जाणारं पाणी, तसंच जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, इसापूर, पैनगंगा ही ११ धरणं मोठ्या जलवाहिनीनं जोडून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्याची ही ग्रीड योजना आहे.
 जालना जिल्ह्यातल्या हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारीत खर्चास, प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळानं काल घेतला. यामुळे जवळपास १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत, दुधना उपखोऱ्यात हातवन गावाजवळील कुंडलिका नदीवर होणार आहे. याशिवाय यातून जालना तालुक्यातल्या हातवन, हिवरा रोशनगाव, कारला, ममदाबाद, वझर आणि सोलगव्हाण, या सहा गावातलं एक हजार ६९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसंच बळीराजा संजीवनी योजनेतील प्रकल्पांना, केंद्र शासनाकडून मिळणारं अर्थसहाय्य आणि राज्य शासनाच्या हिश्श्यापोटी, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्डकडून कर्जरुपानं मिळणारी रक्कम, संबंधित पाटबंधारे महामंडळाच्या खात्यात जमा न करता, राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा करण्यासही, काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
 महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपासही, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. करदाते तसंच वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन, कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्यादृष्टीनं, तसंच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशानं या कायद्यात ही सुधारणा करण्यात येत आहे.
****
राज्यातल्या ‘आशा’ स्वयंसेविकांना येत्या १ जुलै पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता, अशी एकूण १५०० रुपयांची वाढ, तर गट प्रवर्तकांना एक हजार २०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता, अशी एकूण एक हजार ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. मुंबईत काल कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सध्या राज्यभर चालू असलेला आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा, कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी केली. आजपासून राज्यातल्या आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोनही देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले –
‘आशा’ची एकूण जी संख्या आहे ६८,२९७ गटप्रवर्तक एकूण ३,५७० आणि त्यामुळे जवळजवळ दोनशे दोन कोटी प्रतिवर्ष खर्च अपेक्षित आहे. याबरोबरच पुढच्या वर्षी देखील आपण जुलै महिन्यामधे पाचशे रूपये वाढ देण्याच्या दृष्टीकोनातून चर्चेमधे आम्ही ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आशाताई, ज्या काम करत असतांना कोविड परिस्थितीमधे ज्या बाधीत झाल्या आणि आणि दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला अशा ज्या काही केसेस असतील त्या सगळ्यांना देखील ५० लाख रूपये आम्ही देणं निश्चित झालेलं आहे.
आशां वर्कर्सचं काम आणि त्यांना मिळणारं मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी, ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल, लसीकरणासाठी गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता २०० रुपये अतिरिक्त भत्ता देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं कर्ज बुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची, संपत्ती निवारण अधिनियम २००२ कायद्यातंर्गत, १८ हजार १७० कोटी दोन लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बँकांच्या एकूण नुकसानीच्या ८० पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढी ही मालमत्ता आहे. ईडीनं एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली. एकूण जप्त मालमत्तेपैकी नऊ हजार ३७१ कोटी १७ लाख रूपये, कर्ज दिलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं, ईडीनं म्हटलं आहे.
****
राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांच्या घोषणेला, भारतीय जनता पक्षानं विरोध दर्शवला असून, या निवडणुकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि या पोटनिवडणुकांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं जर या निवडणुका घेतल्याच तर आम्ही सगळ्या जागांवर फक्त इतर मागासवर्गीय उमेदवार देऊ, जिंकण्या-हरण्याची पर्वा नाही, ��सं फडणवीस म्हणाले. इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यात काल १० हजार ६६ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९७ हजार ५८७ झाली आहे. काल १६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १९ हजार ३०३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २१ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ४०५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर लातूर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १४८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ९८, औरंगाबाद ५९, लातूर ३६, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी २३, जालना १४ तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कासंदर्भात, विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेल्या निवेदनावर अभ्यास करून, विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. मुंबईत काल महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम-२०१५ नुसार, गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याबाबत काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
****
जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत काल मराठवाड्यातल्या सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रखडलेल्या आणि लहान पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, तसंच नवीन योजनांचं सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करण्याच्या सूचनाही, त्यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतल्या ७६ तालुक्यांमध्ये, यावर्षी जवळपास सात लाख २४ हजार ९०४ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूक एमआयएम पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबादमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत होते. यंदा जास्तीत जास्त वार्डांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद विमानतळासमोर होणारा नियोजित उड्डाणपूल रद्द करुन, आकाशवाणी किंवा दुध डेअरी इथं तो उभारण्यात यावा किंवा सिडको बसस्��ानकाजवळील जालना मार्गावरील उड्डाणपूलाचं विस्तारीकरण करुन तो सरळ केंब्रीज पर्यंत करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचं, जलिल यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडगाव कोल्हाटी इथं काल १८ वर्षांवरील दिव्यांग बांधवांसाठी, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. यावेळी ४० दिव्यांगाना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. शासनानं दिव्यांगांसाठी लसीकरणाची ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल लाभार्थी दत्ता वाकडे यांनी आभार मानले. ते म्हणाले –
शासनाने जे दिव्यांगासाठी महाराष्ट्रामध्ये घरपोच लस देण्याचं जे उद्दिष्ट ठेवलं, त्यात डॉ बामणे यांच्या मदतीने बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ४० दिव्यांगाना जवळपास आज लस देण्यात आली. आणि लस घेण्यासाठी बजाजनगर परिसरात दिव्यांग त्रस्त होते. लॉकडाऊनमुळे एवढे वर्ष ते घरीच होते. कारण त्यांना लस घेण्यासाठी बाहेर केंद्रावर जात येत नव्हतं किंवा कुठे रजिस्ट्रेशन करा हे काम खुप सोप्या पद्धतीने आम्हाला करुन घेतलं. या सर्व टिमचं आणि शासनाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातल्या घरकुल लाभधारकांचे प्रलंबित हप्ते तत्काळ वाटप करावेत, अशी मागणी एमआयएमच्या वतीनं, काल एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाला असून, गंगाखेड शहरातले घरकुल लाभार्थी किरायाने राहत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळाले तर बांधकाम करून राहण्याची व्यवस्था होईल, आणि आर्थिक कुचंबणाही थांबेल, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणी संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती, शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात सर्व तालुक्यात हे चक्का जाम आंदोलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विद्युत वितरण विभागाच्या डोंजा उपकेंद्रामध्ये, पाच मेगा व्होल्ट ॲम्पीयर क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या या उपकेंद्रातून कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्या��्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचं, त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगांव इथं विजेच्या लपंडावाला कंटाळून नागरिकांनी काल सकाळी राणी सावरगांव-गंगाखेड मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. गावातल्या लोकांनी वेळोवेळी महावितरणकडे स्वतंत्र ग्रीडरची मागणी करुनही कंपनीनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन केल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पाऊस पडला. जिल्ह्यात कन्नडसह काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा, तर वि���र्भात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
chaitanyabharatnews · 5 years ago
Text
महाशिवरात्रि 2020: इस अनोखे मंदिर में एक शिवलिंग में होते हैं 1008 शिवलिंग के दर्शन
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज बड़वानी. इस बार 21 फरवरी यानी शुक्रवार को महाशिवरात्रि का पर्व मनाया जाएगा। इस खास अवसर पर हम आपको आज भोलेनाथ के एक ऐसे मंदिर के बारे में बता रहे हैं जहां एक ही शिवलिंग पर छोटे-छोटे 1008 शिवलिंग बने हुए हैं। जी हां... देशभर से श्रद्धालु इस अनोखे शिवलिंग के दर्शन करने आते हैं। (adsbygoogle = window.adsbygoogle || ).push({}); 1100 साल पुराना शिवलिंग भोलेनाथ का यह अनोखा व अतिप्राचीन शिवलिंग मध्यप्रदेश के बड़वानी जिले के निवाली के समीप ग्राम वझर में है। शिवलिंग की ऊंचाई करीब साढ़े तीन फीट है। कहा जाता है कि इस अनोखे शिवलिंग के दर्शन-पूजन से 1008 शिवलिंग की पूजा का पुण्य एकसाथ मिल जाता है। इतिहासकारों के मुताबिक, भोलेनाथ का यह शिवलिंग परमारकालीन राजाओं द्वारा बनवाया गया है। लिहाजा यह 1100 साल से भी ज्यादा पुरानी है। अच्छे से नहीं हो रहा रखरखाव काले पत्थर पर बने एक शिवलिंग पर बड़ी-ही नाजुकता और सफाई से 1008 शिवलिंगों को उकेरा गया है। हालांकि, इस अति महत्वपूर्ण प्राचीन शिवलिंग का रखरखाव अच्छे से नहीं हो रहा है। शिवलिंग को एक पेड़ के नीचे स्थापित किया गया है। पास ही नंदी भगवान की भी एक विशाल प्रतिमा रखी गई है। अन्य देवताओं की प्रतिमा भी विराजित मंदिर परिसर में न सिर्फ 1008 मुख वाला शिवलिंग बल्कि और भी कई देवताओं की प्रतिमा विराजित है। साथ ही यहां जैन प्रभु की प्रतिमाएं भी हैं। उचित रख-रखाव के अभाव के कारण यहां से कुछ प्रतिमाओं को केंद्रीय संग्रहालय इंदौर व अन्य स्थानों पर पहुंचा दिया गया है। वर्षभर जलमग्न रहता है शिवलिंग वझर में स्थित 1008 शिवलिंग वाले मंदिर के अलावा यहां से 3 किमी दूर ग्राम फुलज्वारी में भी एक प्राचीन शिव मंदिर है। यह मंदिर गर्भगृह में है। जानकारी के मुताबिक, गर्भगृह में स्थापित यह शिवलिंग सालभर जलमग्न रहता है। वर्त्तमान में भी मंदिर के गर्भगृह में छह इंच से अधिक पानी भरा हुआ मिला। इस मंदिर के आसपास भी कई खंडित प्राचीन प्रतिमाएं रखी हुई हैं। ये भी पढ़े... महाशिवरात्रि 2020: आखिर क्यों महाशिवरात्रि को कहा जाता है सिद्धि रात्रि? शिव की पूजा से होते हैं दोषमुक्त महाशिवरात्रि 2020 : उज्जैन के राजा हैं महादेव तो रूद्र के रूप हैं काशी के कोतवाल महाशिवरात्रि 2020 : पाकिस्तान में है सबसे रहस्यमयी शिव मंदिर, यहां सती की याद में भगवान शिव ने बहाए थे आंसू Read the full article
0 notes