#रूजू
Explore tagged Tumblr posts
nashikfast · 7 months ago
Text
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी!
राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम! किती रिक्त पदांवर हे उमेदवार होतील रूजू… नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी 81 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शिवसेनेच्या संत परंपरेचे हिंदुत्व रुजू नये यासाठी भाजपाने घेतली फारकत : प्रकाश आंबेडकर
नाशिक : भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी वैदीक पध्दतीचे आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व हे संत परंपरेचे आहे. शिवसेनेचे हे हिंदुत्व रूजू नये म्हणूनच भाजपने सेनेसाेबत फारकत घेतल्याचा आराेप वंचित बहुजन आघाहीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये केला. त्याचबराेबर शिवसेनेशी आमचं नातं अजून जुळलेले नाही, फक्त एकमेकांवर लाइन मारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
एसटीचे 43 हजार कर्मचारी कामावर रूजू, संप मागे?
एसटीचे 43 हजार कर्मचारी कामावर रूजू, संप मागे?
एसटीचे 43 हजार कर्मचारी कामावर रूजू, संप मागे? जवळपास साडे पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे संपण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर एसटी कर्मचारी कमावर रूजू होण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय.   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबईत हल्ला झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
राजकीय नेत्यांनी केलेल्या टीकांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयावर कोणतंही दडपण नसून, अशा टीकांना हाताळण्यासाठी हे ��्यायालय सक्षम असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्त आणि न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि इतर राजकीय नेत्यांनी, न्यायसंस्थेबाबत केलेल्या टीकांविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर, न्यायालयानं हे स्पष्ट केलं. या याचिकेची सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतरच केली जाणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असल्यानं लोकांनी केलेल्या टीकेचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता नसल्याचंही या न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे.
****
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर आज उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार, राज्य सरकारच्या वतीनं उत्तर दाखल करण्यात आलं. त्यानंतर उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी घेण्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निश्चित केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख ८० हजार ७४३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८८ कोटी ६५ लाख ४६ हजार ८९४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ३७७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ४९६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १७ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये अनुसूचित जातीच्या १५ टक्के आणि अनुसूचित जमातीच्या साडे सात टक्के आरक्षित जागा भरल्या पाहिजेत, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एम्प्लॉईज वेल्फेयर असोसिएशनच्या वतीनं काल मुंबईत विलेपार्ले इथं महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आठवले बोलत होते.  
****
बीड जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. अवघ���या एका आठवड्यात महामंडळाच्या महसुलात ३७१ लाख रूपयांची वाढ झाली आहे, तर जवळपास दोन हजार ८०० कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. संप काळात महामंडळाचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी, तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना हवं त्या ठिकाणी प्रवासासाठी विविध योजना हाती घेणार असल्याचं, विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितलं.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे मे महिन्यात औरंगाबाद-तिरुपती- औरंगाबाद दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या दहा फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड-विशाखापट्टणम-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या मे महिन्यात पाच फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तिरुपती ते औरंगाबाद ही विशेष रेल्वे गाडी, १, ८, १५, २२ आणि २९ मे ला, सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे. औरंगाबाद ते तिरुपती ही विशेष रेल्वे गाडी, २, ९, १६, २३, ३० मे रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. नांदेड ते विशाखापट्टणम गाडी, सहा आणि तेरा मे रोजी, दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी विशाखापट्टणम इथून एक, आठ आणि तेरा मे रोजी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे.
****
बंगळुरु इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्री���ा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती पाटील आणि आरती पाटील या जुळ्या बहिणींची जलतरण मध्ये १०० मीटर ब्रेन स्ट्रोक प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. पुरूषांच्या चार बाय २०० मीटर्स रिले मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघानं रौप्य पदक जिंकलं, तर याच प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या संघानं कांस्य पदक मिळवलं.
****
मनीलामध्ये सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत पी. व्ही. सिंधु तसंच पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उप-उपांत्य फेरीत पोहचले आहेत. तर साइना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उप-उपांत्य फेरीत सिंधुचा सामना चीनच्या बिंग जियाओ हिच्याशी होणार आहे.
****
0 notes
wanibhushan-newspapers · 3 years ago
Text
Tumblr media
अाज मतदार दिवस
मतदार हा कितीही सुशिक्षीत झाला, तरीही भारतात लोकशाही रूजू होत नाही तोपर्यंत काहीच अर्थ उरत नाही. कारण कॉंग्रेस व बिजेपी सहीत हवसे गवसे नवसे पक्ष रोज उदयास येवून फक्त लोकशाही संपूष्टात अाणून स्वत:चे शंड नेते पूढे अणन्याचा अाटोकाट बि��बूडाचा प्रयत्न करत अाहे.कोणी जाती धर्माने तर कोणी भाषा, प्रांत या शंडवृत्तीने राजकारणाचा सुड उगवत अाहे.., .
1 note · View note
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार - परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई, दि. १० : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन ��रीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
सिंधुदुर्गातील अजून तीन रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती ची कारवाई
सिंधुदुर्गातील अजून तीन रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती ची कारवाई
कणकवली: सिंधुदुर्गातील एस.टी. कर्मचारी संपावर ठाम असल्‍याने लालपरीचा मुक्‍काम अजूनही एस.टी. आगारांमध्येच राहिला आहे. एकूण २१४६ पैकी आज दुपारपर्यंत सिंधुदुर्गात २९७ एवढेच कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. यात वाहक नसल्‍याने स्थानकातून बसेस सोडता आली नसल्‍याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. दरम्‍यान आज नव्याने तीन रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. आतापर्यंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years ago
Text
अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राआधारे सेवेत रूजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवा व सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट हा आपला अहवाल लवकरच मंत्रीमंडळाला सादर करणार आहे.
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
संप मागे घेण्याचे पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि.१० : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, असे आवाहन करीत कर्मचारी सोमवारपर्यंत कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे,” अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे,” अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे,” अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 April 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही - ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनपर भाषणात खासदार शरद पवार यांचं प्रतिपादन तर मानवी मूल्यांशी निष्ठा राखणारं लेखन व्हावं-संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचं आवाहन
·      महावितरणला दोन हजार मेगावॅटहून अधिक वीज उपलब्ध; भारनियमानातून काही अंशी दिलासा
·      एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपली; आतापर्यंत ७५ हजार कामगार कामावर हजर
·      शालेय शिक्षणात शेती या विषयाचा समावेश करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचा विचार
·      राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी घेतली जाणार
·      औरंगाबाद तीन दिवसीय शेक्सपिअर महोत्सवाला कालपासून प्रारंभ
आणि
·      उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर ग्रामपंचायतीची घरपोहोच शुद्ध पेयजल वाहिका
****
सविस्तर बातम्या
लोकाश्रय आणि राजाश्रय ही साहित्यरथाची दोन चाकं आहेत, साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही, असं प्रतिपादन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. ग्रंथ प्रकाशन संस्थांची खालावलेली आर्थिक परिस्थिती निराशाजनक असून, ती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनात नव्याने प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचं, पवार म्हणाले. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचं आणि स्नेहभावाचं नातं असावं, साहित्यिकांचा राजकर्त्यांवर अंकुश हवा, प�� राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कण्ट्रोल असू नये, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत असून, संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली. सबळ पुराव्याशिवाय केलेलं ऐतिहासिक लेखन वेळीच रोखण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर आजकाल काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं, असंही पवार यांनी नमूद केलं.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव संमेलननगरीस दिलं याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले. लतादीदींनी साहित्यातील गीत आणि काव्य प्रकाराला साज चढवला आणि कोट्यवधी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. साहित्यविश्वाने ह्याच ऋणानुबंधातून लतादीदींना दिलेली ही एक सार्थ आदरांजली असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.
संमेलनाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
साहित्यिकांनी मानवी मूल्यांशी निष्ठा राखणारं लेखन मोठ्या प्रमाणात करायला हवं, असं आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ सासणे यांनी केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सासणे यांनी, अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना, मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे, बालसाहित्यातून अद्‌भुतरस हद्दपार केला आहे, याकडे लक्ष वेधलं.
मराठी भाषा बोलणारे देशात दुसऱ्या आणि जगात १०व्या क्रमांकावर असल्याचं सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. तसंच साहित्य संमेलन इतर राज्यात व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरवावं, कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असं ते म्हणाले.
९६ वावं साहित्य संमेलन होण्यापूर्वी केंद्राने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी अमित देशमुख यांनी यावेळी केली.
दरम्यान, ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. उदगीर शहर आणि तालुक्यातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विविध पोशाखात या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तीन किलोमीटर अंतराच्या या ग्रंथदिंडीत महिलांची दुचाकी फेरी तसंच विविध पोशाखातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या ग्रंथदिंडीवर प्रत्येक चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
काल या संमेलनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: काय कमावले काय गमावले, मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण: किती खरे किती खोटे, मराठी लेखिकांचे ��ेखन व्याज स्त्रीवादात अडकले आहे का, मराठी, कन्नड, तेलुगू, आणि उर्दू यांचा भाषिक आणि सांस्कृतिक अनुबंध, लेखक आणि लोकशाही मूल्ये, या विषयांवर परिसंवाद, निमंत्रितांचं कविसंमेलन तसंच लोकनृत्याचं सादरीकरण झालं. आज सकाळच्या सत्रात लेखक राजन गवस यांची मुलाखत, मान्यवर लेखकांचा सत्कार, दुपारच्या सत्रात कादंबरीकारांशी संवाद, कथाकथन, यासह सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
****
वीज महावितरण कंपनीला दोन हजार मेगावॅटहून अधिक वीज उपलब्ध झाल्यानं, राज्यातल्या नागरिकांना वीज भारनियमानातून काही अंशी दिलासा मिळाला आहे. यापैकी तेराशे ११ मेगावॅट वीज अदानी पॉवरकडून, तर ७०० मेगावॅट वीज महानिर्मितीकडून मिळणार असल्याची माहिती, महावितरणनं दिली आहे. अतिरीक्त वीज मिळाल्यामुळे भारनियमन कमी होणार असलं, तरीही नागरिकांनी काटकसरीनं वीज वापरावी, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, भारनियमन बंद करण्याबरोबरच सुरळीत वीजपुरवठा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात माध्यमांशी बोलत होते. छत्तीसगड राज्यातली एक कोळसा खाण विकत घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
राज्यात भारनियमन सुरु असतांना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. सामान्य ग्राहकाचं वीजबिल थकल्यानंतर, वीज कापणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं उघड झालं आहे. राज्य महसूल विभागाने तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन, वाढीव सुरक्षा अनामत व���ूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली मुदत काल संपली. आतापर्यंत ७५ हजार कामगार कामावर रुजू झाले असल्याची माहिती, महामंडळानं दिली आहे. बडतर्फ कामगारांना कामावर हजर होण्यासाठी न्यायालयानं दिलेली चार आठवड्यांची मुदत येत्या २७ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे २८ तारखेपासून सर्व कामगार कामावर हजर होतील, असा विश्वास एसटीचे जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी व्यक्त केला आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कुख्यात गूंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपावरून ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं हस्तक्षेप करण्याचं नाकारत, सर्वोच्च न्यायालयानं मलिक यांचा अर्ज फेटाळून लावला.
****
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचं आरोपपत्र दाखल केल्यावरही, त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका, भारतीय जनता पक्षानं केली आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत, मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून मलिक यांनी नवा विक्रम केला असल्याची टीका त्यांनी केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १२१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७६ हजार ५०३ झाली आहे. या संसर्गानं काल कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ८३१ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ६६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २७ हजार ८५५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्�� आढळले. यामध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
शालेय शिक्षणात शेती या विषयाचा समावेश करण्याच्या दृष्टीनं विचार सुरू असल्याचं कृषिमंत्री दादा ��ुसे यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २४ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृहं निर्माण करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी क्षेत्रातल्या युवा शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदाच्या वर्षांपासून शासन महिला शेतकऱ्यांचा देखील सन्मान करणार असल्याचं, ते म्हणाले.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी दीक्षांत समारंभाला, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. दीक्षांत समारंभात चार हजार २३२ स्नातकांना पदव्या, पदव्युत्तर पदव्या तसंच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आल्या. तसंच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं आणि रोख पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं.
****
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. या पार्श्वभूमीवर यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेनं आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परीक्षा घोटाळ्यात विनर कंपनीचं नाव आल्यामुळे शासनानं या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतू, विनर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी आता विनरच्या सहकार्याने येत्या २० जुलैला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.
****
साध्या सोप्या इंग्रजी भाषेत नाट्यलेखन केल्यामुळेच शेक्सपिअर आजही जगभरात जिवंत असल्याचं मत, प्राध्यापक डॉ. मुस्तजीब खान यांनी व्यक्त केलं आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं, औरंगाबाद इथं आयोजित शेक्सपिअर महोत्सवाचं, काल डॉ. खान यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेक्सपिअरनं इंग्रजी भाषेत सतराशे नवीन शब्द देवून भाषा समृद्ध केली. शेक्सपिअरनं त्याच्या विनोदी नाटकांमध्ये सर्वप्रथम महिलांना प्रमुख भूमिका दिल्याचं, डॉ.मुस्तजीब खान यांनी सांगितलं. या महोत्सवात काल नितीन गरुड यांनी दिग्दर्शित केलेल्या ॲनेक्स या नाटकाचा प्रयोग झाला.
आज या महोत्सवात दीपा मंडलिक यांच्या ‘पराक्रमी हिंदू राज्यांची अद्वितीय मंदिरं, या पुस्तकावर, डॉ प्रभाकर देव यांचं व्याख्यान होणार असून, ‘ती’ला समजून घेताना, हा स्त्री व्यक्तिरेखांचा मागोवा घेणारा प्रयोग सादर होणार ��हे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात सहा आर ओ अर्थात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले असून, दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणं शक्य होत नाही, हे लक्षात घेत, तेर ग्रामपंचायतीनं शुद्ध जल वाहिका उपलब्ध करून दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. ही जलवाहिका घरपोहोच पाणी पुरवठा करेल. अवघ्या दहा रुपयांत १५ लीटर पाणी देणाऱ्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर,
Byte…
काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणे शक्य होत नाही, तसेच आरओ प्लॅन्ट नसलेल्या भागातील नागरिकांना यापासून वंचित राहावं लागतं. अशा नागरिकांना देखील शुद्ध पिण्याचे पाणी कमीत कमी दरात उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरासमोर शुद्ध जल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल आहे. अवघ्या १० रुपयात १५ लिटर शुद्ध “आरओ” पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुध्दजल वितरण व्हॅनला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. "आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद" अभियाना अंतर्गत येणाऱ्या या शुध्द जल व्हॅन उपक्रमामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
 ****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. साडे तीनशेवर रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं झालेल्या आरोग्य मेळाव्यात ६०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १६० डिजिटल हेल्थ आयडी तयार करण्यात आले, तर आयुष्मान भारत योजनेचे ५० कार्ड वितरित करण्यात आले.
****
परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या तीन लाख तीन हजार लाभार्थ्यांपैकी, दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांना, किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले असून, २३ हजार नोंदणीकृत लाभार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर किसान क्रेडिट कार्डचं वाटप करण्यात येईल. यासाठी २४ एप्रिलला जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
darshaknews · 4 years ago
Text
#Ahmednagar #Health #Hospital आनंदऋषीजी नेत्रालयात पूर्ण वेळ रेटिना सर्जन कार्यरत ; रेटिना तपासणी व उपचार यासाठी अत्याधुनिक उपकरणे
#Ahmednagar #Health #Hospital आनंदऋषीजी नेत्रालयात ��ूर्ण वेळ रेटिना सर्जन कार्यरत ; रेटिना तपासणी व उपचार यासाठी अत्याधुनिक उपकरणे
अहमदनगर : जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालयात नेत्रोपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आता नेत्रालयात पूर्ण वेळ रेटिना सर्जन कार्यरत झाले आहेत. देशभरातील विविध रूग्णालयात सेवा देणारे डॉ.आदित्य नाकाडे हे नेत्रालयात पूर्ण वेळ रूजू झाले असून दु. 1 ते 3 याकाळात त्यांची ओपीडी सेवा उपलब्ध असेल. याशिवाय व्हिट्रिओ रेटिना सर्जन डॉ.हर्षल गोंधळे हे आठवड्यातून एक दिवस उपलब्ध असतील अशी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years ago
Photo
Tumblr media
नूतन जिल्हा परिषद `सीईओ' एस.टी. टाकसाळे रूजू... मावळते `सीईओ' पृथ्वीराज यांना दिला निरोप.... https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/%e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%88%e0%a4%93-%e0%a4%8f%e0%a4%b8/?feed_id=30121&_unique_id=5fd0abf659802
0 notes
digimakacademy · 5 years ago
Text
nagpur municipal corporation commissioner tukaram munde in action mode given notice to four employees | तुकाराम मुंढे पुन्हा ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; चार कर्मचाऱ्यांना दणका
nagpur municipal corporation commissioner tukaram munde in action mode given notice to four employees | तुकाराम मुंढे पुन्हा ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; चार कर्मचाऱ्यांना दणका
[ad_1]
नागपूर महानगपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जोमानं कामाला सुरूवात केली आहे. तुकाराम मुंढे यांनी रूजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या कामात अनियमितता केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
दु…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
एसटीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई?, कामावर हजर न झाल्याने महामंडळ आक्रमक
एसटीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई?, कामावर हजर न झाल्याने महामंडळ आक्रमक
एसटीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई?, कामावर हजर न झाल्याने महामंडळ आक्रमक संप करणारे बहुतेक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. पण २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याची शवेटची तारीख असतानाही सहा हजार कर्मचारी रूजू झालेले नाहीत. यामुळे एसटी महामंडळ आक्रमक झाले आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. संप करणारे बहुतेक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. पण २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याची…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
भेदभाव, भ्रष्टाचार हे व्होटबँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त ते आज भाजप कार्यकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. आत्मनिर्भरता, समरसता आणि सामाजिक न्यायाचा विचार घेऊन भाजपाची स्थापना झाली असून, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवणं हेच पक्षाचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भाजप काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या मार्गावर चालत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकार राष्ट्रीयत्वाला महत्त्व देत असून, आज देशाजवळ धोरणं आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे. जी लक्ष्ये आपण ठरवत आहोत, तीच पूर्णही करत आहोत. भारतात सातत्यानं नव्या शक्यता निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं, या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून न टाकण्याचं राज्य सरकारला आवाहन केलं आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली. कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी सूचना न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे. यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे उद्या सकाळी दहा वाजता यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे न्यायालयानं संपकरी कर्मचाऱ्यांना देखील येत्या १५ एप्रिलपर्यंत पुन्हा कामावर रूजू व्हावं, अशी सूचना केली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत दोन कोटी ३७ लाख ७२ हजार ९०९ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ७१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार १९८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ११ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
देशभरातल्या विविध उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांच्या १२ च्या परीक्षेतल्या गुणप्रक्रियेत असमानता असल्यामुळे केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा स्वतंत्रपणे घेत असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे. ही केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा अर्थात सी यु ई टी, राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे घेतली जाणार असून, त्यासाठी आजपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. देशातल्या काही उच्च माध्यमिक मंडळांमध्ये १२ वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ९९ ते १०० टक्क्यांपर्यंत गुण मिळतात असं दिसून आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढीस लागतो. गुण देण्याच्या पद्धती प्रत्येक राज्यात निरनिराळ्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून या नवीन प्रवेश परीक्षेची योजना केली असल्याचं, कुमार यांनी सांगितलं.
****
‘सुपोषित भारत’ या संकल्पनेखाली आता सर्वत्र पसरू लागलेल्या पोषणाच्या चळवळीत महाराष्ट्रानं सातत्यानं अग्रेसर रहात आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. नुकत्याच झालेल्या पोषण पंधरवड्यात राज्यानं देशात पुन्हा एकदा पह���ला क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या कार्यक्रमांची संख्या आणि सहभागी लाभार्थ्यांची संख्या, या दोन्ही निकषांमधे राज्यानं हे यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांच्या संख्येत गुजरात आणि उत्तर प्रदेशाला, तर लाभार्थ्यांच्या संख्येतही कर्नाटक आणि गुजरातला मागं टाकलं आहे. महिला आणि बाल विकास विभागानं राबवलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात कार्यक्रमांच्या संख्येबाबत अनुक्रमे रायगड, सातारा आणि पुणे हे जिल्हे अग्रेसर आहेत. लाभार्थ्यांच्या सहभागाबाबत अनुक्रमे रायगड, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.
****
नाशिक रोड स्थानकाजवळ गेल्या रविवारी पवन एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघाताची रेल्वे प्रशासनामार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून आज नागरिक आणि प्रवाशांना याबाबत माहिती असल्यास त्यांच्याशी पथक चर्चा करणार आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला होता. पवन एक्सप्रेस चे नऊ डबे घसरल्यामुळे तीन ते चार प्रवासी जखमी झाले होते. एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे यासंदर्भात रेल्वे प्रशासनामार्फत चौकशी करण्यात येत असून काल सायंकाळी नाशिक मध्ये दाखल झालेल्या चौकशी पथकाने पाहणी केली तसेच आज प्रवाशांशी चर्चा करण्यात येणार आहे.
****
0 notes