#परब
Explore tagged Tumblr posts
Text
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
संविधानाच्या अधिष्ठानामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम-विधान परिषदेतल्या विशेष चर्चेत सभापतींचं प्रतिपादन
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर;सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नियुक्त समितीच्या अहवालानुसार कारवाईची ग्वाही
जालना ते जळगांव प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती
बीड जिल्हा कारागृहात सतीश भोसलेची बडदास्त ठेवल्याप्रकरणी दोघे निलंबित
आणि
नांदेडचे डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या 'नवी लिपी' कविता संग्रहास नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर
****
संविधानाचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे असं प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. विधानपरिषदेत भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर आज ते बोलत होते. महिलांना मतदानाचा अधिकार भारतात स्वातंत्र्यावेळीच दिला गेला, महिलांना संविधानाचं संरक्षण आहे असं उपसभापती निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. तर राज्याच्या अधिकारावर केंद्राचं अतिक्रमण होत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला.
****
विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्ताववरच्या चर्चेला उत्तर दिलं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात कठोर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलं.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे, त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सहकारी उपनिबंधक कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार आहे, त्या��ंबंधी आधी तीन आणि नंतर सहा महिन्यात संबंधीत कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
****
मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला, यासंदर्भातले पुरावे त्यांनी आज सभापतींकडे सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस २४ नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आले असल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.
****
बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी करू, इतर दोषींवरही कारवाई करू अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच ना विकास विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या २६७ बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीनं तातडीनं कारवाई करून ती पाडली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या प्रकरणात नकाशांमध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या फेरफार आणि चूकीच्या परवानग्यांबद्दल विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश, मराठी भाषेत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिरात तसंच प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार तसंच प्रसार होईल, असं सरनाईक यांनी नमूद केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या ४५ तर माजलगाव तालुक्यातल्या २९ गावांच्या पाणीपुरवठ्याचं काम देण्यात आलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली. सदस्य विजयसिंह पंडित यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नगरनाका ते केंब्रिज चौकपर्यंत तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गड��री यांनी २०१५ साली प्रस्तावित केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत, चालू अधिवेशन संपल्यानंतर सबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्ताव सादर करू, अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज दिली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
लोकसभेनं आज वित्तविधेयक २०२५ पारित केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देतांना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, करदात्यांच्या सन्मानासाठीआणि व्यवसाय सुलभतेसाठी करात सूट दिल्याचं सांगितलं. नवीन आयकर विधेयकावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यताही अर्थमंत्र्यांनी वर्तवली.
****
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील अभ्यास करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीचा कार्यकाळ संसदेच्या पावसाळी सत्राच्या अंतिम आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला सदनाने मंजुरी दिली.
****
जालना ते जळगांवपर्यंत रेल्वे मार्गासाठी गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे नामांकन जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालं असून त्यासाठी भूसंपादन सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आले आहेत. त्यानुषंगानं आज माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रगती तसंच या रेल्वे मार्गाच्या संदर्भात कामाचे स्वरुप याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आवश्यक सूचना केल्या.
****
गाव तसंच महापालिका हद्दीतील अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय लवकरात लवकर काढण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज सांगितलं. लातूर महापालिकेने अकृषीकर भरला नाही म्हणून महसूल विभागाने लातूर इथलं यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल सील केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत काल भेट घेतली आणि शासनाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाबाबत शासन आदेश अद्याप निघालेला नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं.
****
भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारित दिल्यास त्यांची देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल, असं ��ेलार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक-कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या दुबईत प्रकाशित झालेल्या ‘नवी लिपी’ कविता संग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा यंदाचा नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.राजेंद्र गोणारकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह असून त्यांची ‘निळे आकाश’, ‘सूर्यपक्षी’, ‘मराठवाड्यातील आंबेडकरी प्रबोधन पर्व’, ‘दलित पॅंथर : सम्यक आकलन’ आदी १३ पुस्तकं प्रकाशित आहेत.
येत्या ३० मार्च रोजी नागपूर इथे विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.
****
जालना जिल्ह्यातल्या अंशत: विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी आज मोर्चा काढला. विना अनुदानित शिक्षकांना २० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा या आणि इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं, दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका महिला शिक्षकेसह चार शिक्षकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या सर्वांना ताब्यात घेतलं.
****
बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षकाने अकरा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. धनंजय नागरगोजे यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेत नागरगोजे यांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी आश्रम शाळा शिक्षकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आलं आहे.
****
बिहारमधील बुद्धगया स्थित महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड इथं भिख्खू संघाच्या नेतृत्वाखाली आज शहरातल्या नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील भिख्खू, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. त्याबरोबरच ज्या महिलांनी चुकीचे आधार क्रमांक दिले, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांची यादी परिवहन विभागाकडून घेण्यात आली असून या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी करण्यात येत आहे.
****
0 notes
Text
West singhbhum - चक्रधरपुर में मागे परब के 'बार' का उलंघन करने पर पदाधिकारियों को दंड स्वरूप देना पड़ा बकरे व मुर्गा का कीमत
रामगोपाल जेनाकोल्हान/चक्रधरपुर : चक्रधरपुर प्रखण्ड अंतर्गत मौजा इन्दकाटा में मागे परब के ‘बार’ का उलंघन करने पर आंगनबाड़ी केंद्र का निर्माण कार्य करा रहे संवेदक एवं मिट्टी की खोदाई कर जांच कर रहे भारत सरकार के वाहन पर पहुंचे पदाधिकारियों को दण्ड स्वरूप देना पड़ा बकरे और मुर्गा का किमत. मागे परब के पूजा से 24 घंटा पहले गांव में ‘बार’ रखा जाता है ‘बार’ यानि गांव में हल जुताई, मिट्टी खोदाई, पेड़…
0 notes
Link
छत्तीसगढ़ में जनादेश परब: राज्य सरकार के एक वर्ष के पूर्ण होने पर बड़ा समारोह
0 notes
Text
केन्द्रीय मंत्री जेपी नड्डा कल आएंगे छत्तीसगढ़ के दौरे पर, कई कार्यक्रमों में लेंगे हिस्सा
रायपुर। केन्द्रीय स्वास्थ्य मंत्री जगत प्रकाश नड्डा 13 दिसंबर को छत्तीसगढ़ के एक दिवसीय दौरे पर रायपुर पहुंचेंगे। वे छत्तीसगढ़ सरकार के एक वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में स्थानीय साइंस कॉलेज मैदान में आयोजित जनादेश परब कार्यक्रम में शामिल होंगे। श्री नड्डा दोपहर 3 बजे रायपुर के स्वामी विवेकानंद विमानतल पर पहुंचेंगे। यहां से वे सीधे साइंस कॉलेज मैदान जाएंगे और जनादेश परब कार्यक्रम में मु��्य अतिथि…
0 notes
Text
Rang Parab Series: ‘रंग परब’ नाट्य श्रृंखला का 'महंत घासीदास संग्रहालय में होगा आयोजन, दिखने वाली है छत्तीसगढ़ की संस्कृतिक झलक
Rang Parab Series: छत्तीसगढ़ संस्कृति विभाग के द्वारा छत्तीसगढ़ की समृद्ध सांस्कृतिक धरोहर को सुरक्षित रखने तथा उसे बढ़ावा देने के लिए 'रंग पर्व' नाट्य श्रृंखला आयोजित किया जा रहा है. आपको बतादें कि यह आयोजन रायपुर के महंत घासीदास स्मारक संग्रहालय परिस�� में 22 से 24 अगस्त 2024 तक खुले मंच पर होने वाला है.

0 notes
Text
नासिक से शिंदे की शिवसेना को मिली जीत...विधान परिषद चुनावों में आगे रहे उद्धव ठाकरे, यूं किया 'खेला'
मुंबई: महाराष्ट्र में लोकसभा चुनावों के बाद एक बार फिर शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे सत्तारूढ़ गठबंधन महायुति पर भारी पड़े हैं। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना को कुल चार सीटें में दो पर जीत मिली है, जबकि महायुति को दो सीट सीटों पर संतोष करना पड़ा है। इसमें एक सीट बीजेपी और एक सीट एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना को मिली है। शिक्षकों और ग्रेजुएट्स के द्वारा हुए विधान परिषद चुनावों में अजित पवार की अगुवाई वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) और राज ठाकरे ने भी कैंडिडेट उतारा था, लेकिन दोनों दलों को सफलता नहीं मिली है। ऐसे में जब राज्य में 11 विधान परिषद की सीटों पर चुनाव होने जा रहा है तब उद्धव ठाकरे को मनौवैज्ञानिक तौर पर दूसरी मजबूती मिली है। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने मुंबई की शिक्षक और ग्रेजुएट सीट पर जीत हासिल की है, जबकि बीजेपी को कोंकण और शिवसेना को नासिक सीट पर जीत मिली है। उद्धव ठाकरे को मिली दो सीटें महाराष्ट्र विधानपरिषद के चार सीटों के चुनाव के लिए 26 को वोट डाले गए थे। शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) के कैंडिडेट अनिल परब ने सोमवार को बीजेपी के किरण शेलार को हराकर मुंबई स्नातक निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र विधान परिषद का चुनाव जीता। परब को 44,784 वोट मिले, जबकि शेलार को 18,772 वोट मिले। कुल डाले गए वोट में से 64,222 वोट वैध पाए गए थे। ऐसे में परब ने बड़ी जीत हासिल की है। कोंकण स्नातक निर्वाचन क्षेत्र में बीजेपी के निरंजन दावखरे ने कांग्रेस के रमेश कीर को हराया। दावखरे को 1,00,719 वोट मिले जबकि कीर को 28,585 मत मिले। शिवसेना (यूबीटी) के उम्मीदवार जेएम अभ्यंकर ने मुंबई शिक्षक सीट से जीत हासिल की। उन्हें 11,598 वैध मतों में से 4,083 मत मिले। नासिक सीट पर एकनाथ शिंदे की अगवाई वाली शिवसेना के किशोर दराडे जीते हैं। एक निर्वाचन अधिकारी ने बताया कि दराडे ने अपने निकटतम प्रतिद्वंद्वी विवेक कोल्हे (निर्दलीय) को हराकर अपनी सीट बरकरार रखी और 63,151 वैध मतों में से जीत के लिए पर्याप्त मत हासिल किए।बराबरी पर छूटा मुकाबला विधान परिषद के इन चुनावों में महायुति की तरफ से बीजेपी ने दो कैंडिडेट उतारे थे। एक सीट पर शिवसेना और एक सीट पर निर्दलीय कैंडिडेट का समर्थन किया था। ऐसे में महायुति को दो सीटें मिलीं तो वहीं दूसरी तरफ महाविकास आाघाडी से शिवसेना ने कुल तीन कैंडिडेट उतारे थे। इसमें उसे दो ��र जीत मिली। कोंकण की सीट पर कांग्रेस के रमेश कीर लड़े थे, हालांकि वे चुनाव हार गए। नासिक की सीट पर शिवसेना यूबीटी ने कांग्रेस से आए संदीप गुलवे पर दांव खेला था, लेकिन गुलवे नहीं जीत पाए। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना यूबीटी की जीत ने पार्टी को जोश से भरा दिया है। मुंबई की कुल छह लोकसभा सीटों में चार सीटें एमवीए और दो सीटें महायुति को मिली थीं। इसमें तीन तीन सीटें शिवसेना यूबीटी और 1 सीट कांग्रेस को मिली थी। बीजेपी मुंबई नॉर्थ और शिवसेना मुंबई नॉर्थ वेस्ट सीट जीत पाई थी। काम आई उद्धव की रणनीति लोकसभा चुनावों की तरह उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने विधान परिषद चुनावों में बाजी मारी। पार्टी ने बीजेपी और दूसरे दलों से पहले न सिर्फ प्रत्याशियों का ऐलान किया बल्कि चुनाव प्रचार की रणनीति भी आक्रामक रखी। इसके चलते पार्टी मुंबई की दोनों सीटों पर जीत हासिल करने में सफल रही। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी का मुकाबला बीजेपी से हुआ था, लेकिन शिवसेना यूबीटी ने दोनों सीटें अच्छे मार्जिन से जीती हैं। जीत के बाद मातोश्री में जश्न भी हुआ। विजयी उम्मीदवारों ने ठाकरे परिवार से मुलाकात की। http://dlvr.it/T930xB
0 notes
Text
मुंबई में घटी मराठियों की आबादी, नए प्रोजेक्ट्स में आरक्षित हों 50 फीसदी घर, उद्धव सेना ने कर दी नई मांग
Creative Common परब ने जोर देकर कहा कि यह कानून शहर में मराठी जनसांख्यिकीय को बनाए रखने में मदद करेगा। प्रस्तावित विधेयक में कहा गया है कि डेवलपर्स मराठी लोगों के लिए आवास इकाइयाँ आरक्षित करें। लोकसभा चुनावों में अपनी हालिया सफलता से उत्साहित महा विकास अघाड़ी (एमवीए) ने एक बार फिर मुंबई में ‘माटी के बेटे’ की घटती आबादी का मुद्दा उठाया है। यह तब हुआ है जब शहर विधान परिषद और महाराष्ट्र में आगामी…

View On WordPress
0 notes
Text
अभिनय बेर्डे-प्रथमेश परब यांचा सिंगल येतोय भेटीला
https://bharatlive.news/?p=178748 अभिनय बेर्डे-प्रथमेश परब यांचा सिंगल येतोय भेटीला
पुढारी ऑनलाईन ...
0 notes
Text




मुंबई सांस्कृतिक सेल के अध्यक्ष श्री सुधीर परब द्वारा २००० लोगो को नोट-बुक का वितरण का कार्यक्रम होने जा रह है, जिसका उद्घाटन महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष मा श्री नाना ( भाऊ ) पटोले जी के हाथो से किया गया |
| #NanaPatole | #SureshShyamlalGupta |
| Nana Patole | Suresh Shyamlal Gupta |
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाऊंडेशनचं सहकार्य
विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप
२०२४ वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर
छत्तीसगडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत ३० नक्षलवादी ठार
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा
आणि
पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ-भानुदास एकनाथच्या जयघोषात संतनगरी दुमदुमली
****
राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्��िमत्तेच्या वापरात करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमातही गेट्स फाऊंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गोहत्येचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा-मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या ल��्षवेधीला उत्तर देत होते.
****
विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी आज राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं, त्यात हा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, सत्ताधारी पक्षाच्या कलानं कामकाज केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
****
दिवंगत अभिनेता सुशांतहसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य अमित साटम, नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याचं विधानसभेचं कामकाज काही काळासाठी बाधित झालं
भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला, या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप सॅलियन कुटुंबाने केला आहे. तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सुरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नव्याने चौकशी करावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरम्यान, सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सदस्य अनिल परब यांनी सॅलियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं सभागृहात सांगितलं. यावेळी परब आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज काही काळ बाधित झालं.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज शिवसेना सदस्यांनी विधानभवन परिसरात मूक आंदोलन केलं.
****
२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभुषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, सुतार यांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर सुतार यांना हा पुरस्कार जाहीर होणं हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरच्या निखळ प्रेमाचं प्रतीक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी मागवल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. अवैध वाळू उपसा झाला असेल तर त्याठिकाणी दंडासह वसुली केली जाईल, वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बावनकुळे यांनी ही माहिती दिली. अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
****
राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचार सुरू असल्याचं भुसे यांनी या उत्तरात नमूद केलं.
****
धाराशिव इथं "बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्या सह एसटीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार तर एक सैनिक हुतात्मा झाला. दंतेवाडा-बीजापूर सीमा आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत.
****
जागतिक चिमणी दिवस आज पाळण्यात येत आहे. “मला चिमण्या आवडतात” या संकल्पनेनं चिमणी संवर्धनासाठी पुढे यावं, तसंच यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात, छतावर किंवा गॅलरीत चिमण्यांसाठी पाण्याची सोय करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
****
महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. ते आज महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या ७ कोटी रुपयांची कामं, तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील, अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली.
दरम्यान, हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत आज सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली. यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथसमाधीची सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रौत्सवासाठी यंदा ६२७ पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून, हजारो वारकरी इथे मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीनं याठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पैठण शहरातून आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा येथील नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी काकड आरती, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी परिसरातून नाथांची पालखी निघाली, शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं.
****
0 notes
Text
jamshedpur rural- कोवाली के तिलाईझोरी में मागे बुरु सुसुन दुरांग परब आयोजित, शिक्षा पर दिया गया जोर
जमशेदपुर: कोवाली थाना अंतर्गत आमदा पंचायत के तिलाईझोरी गांव में मागे बुरु सुसुन दुरांग परब कार्यक्रम का आयोजन किया गया. कार्यक्रम में मुख्य अतिथि के रुप में पोटका विधायक संजीव सरदार व तिलाईझोरी की मुखिया ने कहा कि आज के समय में समाज के लोगों को शिक्षा पर जोर देने की जरुरत है. शिक्षित समाज की समाज को विकास के रास्ते पर ले जा सकता है. इसलिए समाज के लोग शिक्षित होने के लिए प्रयास करे. तभी समाज का…
0 notes
Link
0 notes
Text
विशेष आलेख: लोक परब हरेली...
छत्तीसगढ़ में वर्षभर प्रत्येक माह त्योहार होता है। इसमें सावन महीना के प्रमुख त्योहार हरेली यानि हरियाली कृष्णपक्ष अमावस्या के दिन मनाई जाती है। छत्तीसगढ़ में अक्षय तृतीया से कृषि वर्ष की शुरूआत होती है और फिर धान समेत खरीफ फसल की बोआई और रोपाई होता है। निंदाई-गुढ़ाई के बाद आषाढ़ की समाप्ति तक फसल की स्थिति संभल जाती है। वहीं पूरी धरती में जब पूरी हरियाली छा जाती है। तब प्रमुख त्योहार हरियाली मनाई…
0 notes
Text
मुंबई : अनिल बेदाग : रिश्तों का जश्न मनाने वाली जियो स्टूडियोज की हाल ही में रिलीज़ हुई मराठी फिल्म बाईपण भारी देवा Baipan Bhari Deva ने बॉक्स-ऑफिस पर असाधारण प्रदर्शन के साथ मराठी फिल्म उद्योग में उत्साह की लहरें पैदा कर दी हैं। केवल 10 दिनों में, फिल्म ने 26.19 करोड़ रुपये का कारोबार करके धूम मचा दी है। इतना ही नही, सिर्फ एक दिन में ₹6.10 करोड़ इतनी कमाई कर, मराठी फ़िल्म उद्योग में सबसे बड़ा कलेक्शन करनेवाली फिल्म साबित हुई है और वह भी रिलीज के दूसरे रविवार को, और तो और फिल्म के दूसरे वीकेंड की कमाई ( ₹13.50 करोड़ ) प��ले हफ़्ते की कमाई (₹12.5 करोड़) से भी ज्यादा रही। रिपोर्ट के अनुसार, जबरदस्त वर्ड-ऑफ-माउथ और फिल्म के प्रति दर्शकों के क्रेज के साथ, फिल्म का तीसरा सप्ताह भी तेजी से बढ़ने की उम्मीद है। महाराष्ट्र की सिनेमाघरों में मराठी नॉन मराठी सभी दर्शकों की भीड़ उमड़ रही है। जियो स्टूडियोज द्वारा प्रस्तुत, माधुरी भोसले और जियो स्टूडियोज द्वारा निर्मित, बेला शिंदे और अजीत ब्यूर द्वारा सह-निर्माता, रोहिणी हट्टंगड़ी, वंदना गुप्ते, सुकन्या माने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर और दीपा परब जैसी एक से बढ़कर एक शानदार स्टार कास्ट के साथ, केदार शिंदे द्वारा निर्देशित यह फिल्म महाराष्ट्र के साथ साथ विदेशों में भी पसंद की जा रही है।
0 notes
Text
0 notes