#राज्यसरकार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण • सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन • केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित • राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ आणि • नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक तसंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात यईल. दरम्यान, या पुरस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजनही करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमात सुपोषित ग्राम पंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ��ध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्��ी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, काल करण्यात आली, या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले… ‘‘साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।’’
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती वर्षाला काल प्रारंभ झाला. यानिमित्तानं पंतप्रधानांनी एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं यावेळी अनावरण केलं.
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीरा मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ** केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे. नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रं, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरणही शहा यांनी काल केलं. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात याच अनुषंगानं काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी उप��्थित होते. सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याचं आवाहन करत, मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कर्डांचं वितरण उद्या केलं जाणार आहे.
चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीचा आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.’’
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं… ‘‘एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.’’
शिवसेनेचे प्रवक्ते तथा उपनेते डॉ राजू वाघमारे, तसंच मराठ�� आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची स्वतंत्रपणे भेट घेऊन सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली, तर परभणी आणि बीडच्या घटनांचा संबंध जोडू नये, असं आवाहन वाघमारे यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते या महोत्सवा उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर तसंच अहिल्यानगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले, तसंच चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी झाले.
हिंगोली इथं एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलीसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. काल रात्री ही घटना घडली. विलास मुकाडे असं या पोलिसाचं नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे.
लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं खेळवला जात आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्र��म फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ११२ धावा झाल्या होत्या.
हवामान राज्यात छत्रपती संभाजीनगरसह, अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेती कामांचं नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0 notes
Text
youtube
विधानसभा चुनाव नजदीक देखकर कांग्रेस ने अब एकजुटता दिखाने का प्रयास शुरू कर दिया है https://www.youtube.com/watch?v=AuSGRTEOv5I Follow this link to join our WhatsApp group to get Latest News Updates : https://chat.whatsapp.com/FRKXh6rZlttH99KKEP2PXv युग चरण के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | - असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा ने गुरूवार को कहा - राज्यसरकार बहुविवाह पर प्रतिबंध लगाने की योजना बना रही है | - Assam Chief Minister Himanta Biswa Sarma said on Thursday – the state government is planning to ban polygamy. - बनारस हिन्दू विशविद्यालय में तीन वर्षीय एलएलबी कोर्स में एडमिशन के लिए प्रोसेस जारी है | - Process is going on for admission in three year LLB course in Banaras Hindu University. - भारत की ब्रहोस क्रूज मिसाइल को देश का बह्रमास्त्र कहा जाता है | - India's Brahos cruise missile is called the country's Brahmastra. - राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू तीन दिन राजस्थान के दौरे पर रहने वाली है | - President Draupadi Murmu is going to visit Rajasthan for three days - विधानसभा चुनाव नजदीक देखकर कांग्रेस ने अब एकजुटता दिखाने का प्रयास शुरू कर दिया है | - Seeing the assembly elections near, the Congress has now started trying to show solidarity. Watch the latest Hindi news Live on the World's Most Loved News Channel on YouTube. Latest News about Politics , Sports , Entertainment, Crime at Yugcharan Channel. Un Biased News Reporting ! Subscribe our channel for the latest news: https://www.youtube.com/@yugcharan Like us: https://www.facebook.com/theyugcharan Follow us: https://twitter.com/theyugcharan Telegram : https://t.me/TheYugCharanpaper Instagram : https://www.instagram.com/theyugcharan/ Website : https://yugcharan.com #today_breaking_news #Breaking_news #Latest_news #Hindi_News #News #NewsHindiLive #LiveTVNews #HindiNews #draupadimurmu #rajasthannews #vidhansabhachunav #congress #bharatmisaile #bramhastra #banaras #hinduvishvidhyaley #llb via yugcharan https://www.youtube.com/channel/UCbT6O9BlRulH48ph5QmCYEg July 14, 2023 at 06:00PM
0 notes
Text
youtube
विधानसभा चुनाव नजदीक देखकर कांग्रेस ने अब एकजुटता दिखाने का प्रयास शुरू कर दिया है https://www.youtube.com/watch?v=AuSGRTEOv5I Follow this link to join our WhatsApp group to get Latest News Updates : https://chat.whatsapp.com/FRKXh6rZlttH99KKEP2PXv युग चरण के साथ देखिये देश-विदेश की सभी महत्वपूर्ण और बड़ी खबरें | - असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा ने गुरूवार को कहा - राज्यसरकार बहुविवाह पर प्रतिबंध लगाने की योजना बना रही है | - Assam Chief Minister Himanta Biswa Sarma said on Thursday – the state government is planning to ban polygamy. - बनारस हिन्दू विशविद्यालय में तीन वर्षीय एलएलबी कोर्स में एडमिशन के लिए प्रोसेस जारी है | - Process is going on for admission in three year LLB course in Banaras Hindu University. - भारत की ब्रहोस क्रूज मिसाइल को देश का बह्रमास्त्र कहा जाता है | - India's Brahos cruise missile is called the country's Brahmastra. - राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू तीन दिन राजस्थान के दौरे पर रहने वाली है | - President Draupadi Murmu is going to visit Rajasthan for three days - विधानसभा चुनाव नजदीक देखकर कांग्रेस ने अब एकजुटता दिखाने का प्रयास शुरू कर दिया है | - Seeing the assembly elections near, the Congress has now started trying to show solidarity. Watch the latest Hindi news Live on the World's Most Loved News Channel on YouTube. Latest News about Politics , Sports , Entertainment, Crime at Yugcharan Channel. Un Biased News Reporting ! Subscribe our channel for the latest news: https://www.youtube.com/@yugcharan Like us: https://www.facebook.com/theyugcharan Follow us: https://twitter.com/theyugcharan Telegram : https://t.me/TheYugCharanpaper Instagram : https://www.instagram.com/theyugcharan/ Website : https://yugcharan.com #today_breaking_news #Breaking_news #Latest_news #Hindi_News #News #NewsHindiLive #LiveTVNews #HindiNews #draupadimurmu #rajasthannews #vidhansabhachunav #congress #bharatmisaile #bramhastra #banaras #hinduvishvidhyaley #llb via yugcharan https://www.youtube.com/channel/UCbT6O9BlRulH48ph5QmCYEg July 14, 2023 at 06:00PM
0 notes
Text
राज्यातील 'या' पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान ! सरकारने घेतला मोठा निर्णय
भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. काही वर्षांपूर्वी शेतकरी अगदी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. तसेच पारंपरिक पिके सोडून इतर पिकांचे देखील उत्पादन घेत आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दरम्यान सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना व अनुदाने जाहीर करते. सध्या बिहार सरकारने (Bihar Government) राज्यातील केळीउत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार बिहारमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी लागवड (Banana Farming) करतात. मात्र शेतकऱ्यांना यासाठी मोठे भांडवल खर्व करावे लागते. दरम्यान या शेतकऱ्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी बिहार सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदान जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत बिहार राज्यसरकार शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान देणार आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या (Bihar Government) फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार होणार ‘टिशू कल्चर’ ( Tissue Culture) म्हणजे एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे . ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात किंवा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असे सुद्धा म्हणतात. यामध्ये कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार केली जातात. महत्त्वाची बाब म्हणजे ही झाडे अधिक निरोगी असतात. Read the full article
0 notes
Text
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
पदोन्नती मधील आरक्षण रद्द! प्रकाश आंबेडकरांची राज्यसरकारवर जहरी टीका
मुंबई | दि. २० एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील…
View On WordPress
0 notes
Text
SC ने राज्य सरकारों को फटकारा, कहा- सोशल मीडिया पर शिकायत गलत नहीं, मदद मांगने वालों पर कार्रवाई की तो मानेंगे अवमानना
चैतन्य भारत न्यूज देश में फैले कोरोना संकट को लेकर सु��्रीम कोर्ट में शुक्रवार को सुनवाई हुई। इस दौरान ऑक्सीजन की कमी और व्यवस्थाओं में खामियों के मुद्दे पर भी चर्चा हुई। इस दौरान अदालत ने सरकार से कहा, 'हम यह बहुत साफ कह देना चाहते हैं कि अगर कोई नागरिक सोशल मीडिया पर अपनी शिकायत दर्ज करवाए तो यह नहीं कहा जा सकता है यह जानकारी गलत है। हम नहीं चाहते कि इस तरह की सूचनाओं को दबाया जाए। अगर ऐसी शिकायतों पर एक्शन लेने की नौबत आई तो हम इसे अदालत की अवमानना मानेंगे।' Supreme Court begins hearing in the case where it took suo moto cognizance on issues related to oxygen supply, drug supply, and various other policies in relation to the #COVID19 pandemic. pic.twitter.com/WfgBAXCEXV — ANI (@ANI) April 30, 2021 वैक्सीन को लेकर किया सवाल वहीं सुप्रीम कोर्ट ने सवाल किया कि केंद्र सरकार 100 फीसदी टीकों की खरीद क्यों नहीं करती। इसे राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रम के मॉडल पर राज्यों को वितरित क्यों करती ताकि वैक्सीन की दामों में अंतर न रहे। सुप्रीम कोर्ट ने कहा कि आखिरकार यह देश के नागरिकों के लिए है। कोरोना मरीजों की राष्ट्रीय नीति को लेकर किया सवाल जस्टिस डीवाई चंद्रचूड ने वैक्सीनेशन और ऑक्सीजन को लेकर केंद्र सरकार से पूछा है कि, 'क्या वैक्सीन अलॉटमेंट के लिए एक राज्य पर दूसरे राज्य को प्राथमिकता दी जा रही है?' इसके अलवा न्यायमूर्ति चंद्रचूड़ ने कहा कि, 'हमारे सामने कुछ ऐसी भी याचिकाएं दायर की गई हैं, जो गंभीर रूप से स्थानीय मुद्दो को उठाती है। ऐसे मुद्दों को उच्च न्यायालय में उठाया जाना चाहिए। वही पीठ ने सवाल किया कि अनपढ़ या जिनके पास इंटरनेट एक्सेस नहीं है, वे कैसे वैक्सीन लगवाएंगे।' Read the full article
0 notes
Text
आज सिलीगुड़ी आ रही हैं मुख्यमंत्री
सिलीगुड़ी, 12 मार्च। मुख्यमंत्री ममता बनर्जी राज्य सरकार एवं जीटीए संयुक्त तत्वावधान में 13 मार्च से दार्जिलिंग में आयोजित दो दिवसीय बिज़नेस समिट में हिस्सा लेने सोमवार को सिलीगुड़ी पहुँच रही है। मुख्यमंत्री की मौजूदगी में होने वाले इस बिज़नेस समिट में देश - विदेश के उद्योगपतियों के हिस्सा लेने की संभावना हैं। सोमवार को सिलीगुड़ी में रात्रि विश्राम के बाद मंगलवार को मुख्यमंत्री पहाड़ दौरे पर जाएगी। मंगलवार दोपहर दो बजे वे बिज़नेस समिट के उद्घाटन सत्र को संबोधित करेंगी। वे दूसरे दिन भी बिज़नेस समिट में भाग लेगी। जीटीए चेयरमैन विनय तमांग ने बताया कि पहाड़ पर बिज़नेस समिट की तैयारियां पूरी कर ली गयी है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री समेत बिज़नेस समिट में हिसस लेने यहाँ आने वाले सभी लोगों के स्वागत तैयार है। Read the full article
#जीटीए#जीटीएचेयरमैन#दार्जिलिंग#देशविदेश#दोदिवसीयबिज़नेससमिट#पहाड़#ममताबनर्जी#मुख्यमंत्रीममताबनर्जी#राज्यसरकार#विनयतमांग#सिलीगुड़ी
0 notes
Text
जयपुर में दीपावली स्नेह मिलन समारोह में शामिल हुए एवं राज्यसरकार पूर्व मंत्री, विधायक और वरिष्ठ नेताओं से मुलाकात की (बृज किशोर शर्मा, पूर्व कैबिनेट मंत्री) ,सुरेश मिश्रा जी (प्रदेश कांग्रेस के वरिष्ठ नेता) ए सी गणेशा जी जयपुर के जाने माने (समाजसेवी उद्योगपति )राकेश पारीक जी (विधायक राजस्थान विधानसभा) महे शर्मा जी (मंत्री राजस्थान सरकार)
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक ���वीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित
राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ
आणि
नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
****
सुशासन दिवस हा फक्त एका दिवसापुरता कार्यक्रम नसून, सुशासन ही भाजप सरकारची ओळख असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी, आज करण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, मध्यप्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले –
साथियों, हमारे लिए सुशासन दिवस सिर्फ एक दिन का कार्यक्रम भर नही है। गुड गव्हर्नन्स, सुशासन भाजपा सरकारों की पहचान है। देश की जनता ने लगातार तिसरी बार केंद्र मे भाजपा की सरकार बनाई।
माजी पंतप्रधान-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं या कार्यक्रमात मोदी यांनी एक हजार, १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणीही केली. दिवंगत वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. देशातील पहिल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
दरम्यान, सकाळी दिल्लीत, वाजपेयी यांचं समाधीस्थळ - सदैव अटल इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य, वाजयेपी यांच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलं.
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
मुंबईत मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
सुशासन दिनानिमित्त, अमरावती इथं आज सकाळी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा पार पडली.
धाराशिव इथं लोकसेवा समितीचे मराठवाडास्तरीय १५वे लोकसेवा पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या ढेकणमोहा इथल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालना जिल्ह्यातल्या लिखित पिंपरीच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्गच्या पालावरची शाळा प्रकल्पाच्या मीराताई मोटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. नवी दिल्लीच्या पुसा इथं सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आज दुपारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या संस्थांचा यात समावेश आहे.
नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील शहा यांनी केलं. या माध्यमातून पंचायतींच्या स्तरावरील कर्ज वितरणासह अर्थिक समावेशनाला हातभार लागणार आहे. ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर स्वविकास आणि आत्मनिर्भरतेतून राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होणं याद्वारे शक्य होणार आहे.
याच अनुषंगानं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
राज्य सरकारनं आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित केलं असून, या उद्दीष्टपूर्तीसंदर्भात आढावा घेऊन अहवाल तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हा अहवाल माध्यमांसमोर सादर केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
प्रत्येक खात्यांनी शंभर दिवसांचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे. शंभर दिवसांत काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे. शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि त्यांनी काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचवू.
जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात तीनही पक्षांच्या सहमतीनं निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच, गडचिरोलीचं पालकमंत्री होण्याची आपली इच्छा असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
सायबर सुरक्षा, ऊर्जा, लाडकी बहीण, आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
बीड तसंच परभणी इथल्या घटना गंभीर आहेत, त्यामुळेच राज्यसरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्याचं सांगत, अशा घटनांचं पर्यटन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं –
एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाहीये. पण अजितदारांसारखे सीनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटीव्ह असतात. तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करून हा मात्र माझा नेहमी मत आहे.
****
स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा २७ डिसेंबरला होत आहे. देशभरातील सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण याद्वारे केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक-अभिनेते मंगेश देसाई यावेळी उपस्थिती होते. तत्पुर्वी, सकाळी महापालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक���टर विजय फुलारी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. २८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवात चार जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालयांचे दोन हजार कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीतील कथित हिंसाचारानंतर मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबवला जाणार आहे. या पंचसूत्री अंतर्गत किशोरी मेळावा, इयत्ता पाचवी-आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवीसाठी स्पर्धा परीक्षा, बालवर्ग ते नववीसाठी गुणवत्ता विकास समिती आणि अभ्यास गट स्थापन करणं, यासह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जाणार आहे.
****
प्रभु येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरासह भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण, प्रभु येशु यांनी दिलेल्या प्रेम, दया आणि करुणेच्या शाश्वत शिकवणीची आठवण करुन देतो असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमांवर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातही अनेक घरं - चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
धुळे शहरातील सेंट ऍन्स कॅथोलिक चर्च इथं आज सकाळी विशेष प्रार्थना सभा घेण्यात आली. यावेळी सर्व धर्मियांसह लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नाशिक शहरातील शरणपूर भागात ख्रिश्चन बांधवांची वसाहत असून या ठिकाणी विद्युत रोषणाई बरोबरच येशू जन्माचे देखावे तयार करण्यात आले आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या शहागडनजिक छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री उभ्या कंटेनरला पाठीमागून आयशरची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.
आयशरचा चालक आणो सोबती यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
****
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने हालचाली वाढल्या असून, यावर उपाय योजना केली जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली आहे.
****
हवामान
येत्या २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याभागात कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तीस डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes
Text
अनुकंपा आधार पर कैसे मिलती है नौकरी, जानिए क्या है पूरी प्रकिया और किस आधार पर मिलेगी नौकरी
अनुकंपा आधार पर कैसे मिलती है नौकरी, जानिए क्या है पूरी प्रकिया और किस आधार पर मिलेगी नौकरी
पिछले दो साल में अनुकंपा नियुक्ति को लेकर कोर्ट के कई फैसले आए हैं. 2019 में सुप्रीम कोर्ट ने भी कहा था कि दूसरी शादी (अमान्य है) से पैदा हुआ बच्चा वैध है और उसे अनुकंपा के आधार पर नौकरी से मना नहीं किया जा सकता है. अब विवाहित बेटी को अनुकंपा नियुक्ति पर सुप्रीम कोर्ट ने बड़ा फैसला दिया है. राज्यसरकार अपने कर्मचारियों की सेवाकाल में मृत्यु होने ��र उनके आश्रित को नौकरी देने की नीति में बदलाव…
View On WordPress
0 notes
Text
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्ली
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्ली
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांना कॅबिनेटच्या बैठकीत एकटक बघणाऱ्या 45 रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन; अजितदादांनी उडवली खिल्ली Ajit Pawar : भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे स्टेटमेंट वाचले मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. मुंबई: राज्याचे विरोधी…
View On WordPress
#ajit#pawar#अजितदादांनी#आजची बातमी#आताची बातमी#उडवली#एकटक#कॅबिनेटच्या#खिल्ली#खुर्च्यांचं#टेन्शन#ठळक बातमी#ताजी बातमी#बघणाऱ्या#बातम्या#बैठकीत#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#राजकारण#रिकाम्या#शिंदे-फडणवीसांना
0 notes
Text
गाय शेळी मेंढी कुक्कुटपालन साठी 25 लाखापर्यन्त अनुदान, कसा कराल अर्ज
0 notes
Text
कई राज्यों में कम हुई रिश्वतखोरी, एक साल में भ्रष्टाचार में आई 10% कमी, 78वें स्थान पर पहुंचा भारत
चैतन्य भारत न्यूज नई दिल्ली. भारत में भ्रष्टाचार ��े मामलों में कमी आई है। रिपोर्ट के मुताबिक, वित्त वर्ष 2019 में देश के 20 राज्यों में भ्रष्टाचार 10 फीसदी कम हुआ है। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल सर्वे की रिपोर्ट के मुताबिक, हमारे देश में सरकारी कार्यों में रिश्वतखोरी पर कुछ हद तक लगाम लग गई है। इसी के साथ भ्रष्टाचार को लेकर 180 देशों की सूची में भारत की रैंकिंग पिछले साल के मुकाबले तीन पायदान सुधरी है। (adsbygoogle = window.adsbygoogle || ).push({}); भारत की रैंकिंग में सुधार इस सर्वे को ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इंडिया ने किया था। यह एक गैर राजनीतिक, स्वतंत्र और गैर सरकारी भ्रष्टाचार रोधी संगठन है। जानकारी के मुताबिक, साल 2018 में भारत भ्रष्टाचार में मामले में 81वें स्थान पर था। लेकिन अब वह 78वीं रैंक पर पहुंच गया है। पिछले साल 56% नागरिकों ने कहा था कि, उन्होंने रिश्वत दी है और इस बार 51% लोगों ने माना कि उन्होंने रिश्वत दी है। सबसे ज्यादा रिश्वत राज्य सरकार के दफ्तरों में ली जाती है। इनमें प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन और जमीन से जुड़े मामलों में सबसे अधिक रिश्वत दी गई। 26% लोगों ने इस विभाग में रिश्वत दी। Incidents of bribery in India reduced by 10 pc since last year, according to 'India Corruption Survey 2019' carried out in 20 states. — Press Trust of India (@PTI_News) November 26, 2019 38% लोगों का मानना- देश में रिश्वत के बिना काम नहीं हो सकता बता दें इस सर्वे में 248 जिलों के 1,90,000 लोगों को शामिल किया गया था। इसमें 64% पुरुष और 36% महिलाएं थीं। 48% लोगों ने माना कि राज्य सरकार या स्थानीय स्तर पर सरकारी दफ्तरों में भ्रष्टाचार रोकने के लिए कोई प्रभावी कदम नहीं उठाए। साथ ही लोगों का मानना है कि 2017 में हुई नोटबंदी के कारण भ्रष्टाचार के मामलों में ज्यादा गिरावट आई है। वहीं कुछ ऐसे भी लोग हैं जो यह मानते हैं कि देश में रिश्वत के बिना काम नहीं हो सकता। ऐसे लोगों की संख्या 36% से बढ़कर 38% हो गई। इसके अलावा जो भी लोग रिश्वत को सिर्फ एक सुविधा शुल्क समझते हैं उनकी संख्या भी बढ़ गई है। पिछले साल यह संख्या 22% थी जो अब 26% हो गई है। वहीं 19% लोगों ने पुलिस विभाग में भी रिश्वत दी। चीन 87वें और पाकिस्तान 117वें स्थान पर बता दें चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग ने अपने देश में हाई-प्रोफाइल भ्रष्टाचार विरोधी अभियान चलाया था, बावजूद इसके चीन भ्रष्टाचार की रैंकिंग में ऊपर है। इस बारे में विशेषज्ञों का कहना है कि भारत पड़ोसी देशों से बेहतर तो जरूर हुआ है लेकिन भ्रष्टाचार खत्म करने के ��िए अभी भी बहुत कुछ किया जाना बाकी है। बता दें भ्रष्टाचार के मामले में चीन 87वें और पाकिस्तान 117वें स्थान पर हैं। ये भी पढ़े... थाईलैंड में बोले पीएम मोदी- भारत में निवेश के लिए यह सबसे अच्छा समय, भ्रष्टाचार का खात्मा हो रहा हिजाब का विरोध करने पर युवती को 24 साल की सजा, कोर्ट ने कहा- इससे भ्रष्टाचार और वेश्यावृति फैल रही है सीबीआई की बड़ी कार्रवाई, भ्रष्टाचार और धोखाधड़ी के खिलाफ देशभर के 110 ठिकानों पर छापेमारी Read the full article
#bharatmebrashtachar#corruption#Corruptioningovernmentdepartment#Corruptioninindia#corruptionindia#Corruptionreducedinindia#transparencyindiabribe#घूसखोरी#ट्रांसपेरेंसीइंटरनेशनल#भारतमेंभ्रष्टाचार#भारतमेंभ्रष्टाचारमेंकमी#भ्रष्टाचार#राज्यसरकार#रिश्वतखोरी#सरकारीदफ्तरोंमेंघूसखोरी#सरकारीदफ्तरोंमेंरिश्वतखोरी
0 notes
Text
कालियागंज के विभिन्न वार्डों में लगेंगी सीसीटीवी कैमरे
उत्तर दिनाजपुर , 08 मार्च। राज्य सरकार के ग्रीन सिटी मिशन के तहत कालियागंज नगरपालिका के 17 वार्डो के विभिन्न सड़कों पर 70 सीसीटीवी कैमरे लगाए जायेगें। कालियागंज नगरपालिका के चेयरमैन कार्तिक पाल के अनुसार इस योजना में करीब 30 लाख रूपये की लगत आएगी। उन्होंने कहा कि शहरवासियों की सुरक्षा के मद्देनजर सड़कों पर सीसीटीवी कैमरे लगाने का निर्णय लिया गया। उन्होंने कहा कि दूसरे चरण में अन्य शहरों में सीसीटीवी कैमरे लगाए जायेंगे। इसके साथ ही उन्होंने कहा की शहर की निगरानी के लिए दो कण्ट्रोल रूम स्थापित की जाएगी। इनमे एक कालियागंज थाने में स्थापित होगा दूसरा नगरपालिका कार्यालय में। दोनों ही कार्यालय में 24 घंटे कर्मचारी नियुक्त रहेंगे। Read the full article
0 notes
Text
आमच्या गावचा एम्पिरिकल डेटा आम्ही पाठवू | बेला ग्रामपंचायतीने पाठविला शासनाला ठराव
आमच्या गावचा एम्पिरिकल डेटा आम्ही पाठवू | बेला ग्रामपंचायतीने पाठविला शासनाला ठराव
भंडारा,दि.03 : ओबीसी आरक्षणाचे घोडे एम्पिरिकल डेटा साठी अडून आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्यसरकार डेटा मिळण्याची आस लावून बसला आहे. राज्य सरकारला न्यायालयाने दिलेली डेटा गोळा करण्याची तीन महिन्याची मुदत ही आता संपत आली. दरम्यान राज्यसरकार यासंदर्भात फारशी सकारात्मक दिसत नसले तरी भंडारा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने आम्हीच आमच्या गावचा डेटा गोळा करून शासनाला पाठवतो. अशा स्वरूपाचा ठराव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
स्वहिताआधी देशहिताचा विचार करावा-उपराष्ट्रपतींचं आवाहन;राज्यभरातल्या संविधान मंदिरांचं लोकार्पण
देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा काल पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी राज्यसरकार सकारात्मक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
केंद्र तसंच राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची शरद पवार यांची टीका
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन
****
स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं काल मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून दूरदृश्य पद्धतीनं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय राज्यघटना ही फक्त मिरवण्यासाठी नसून, तिचा गाभा समजून घेण्याची गरज धनखड यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी संविधान मंदिरांचं लोकार्पण करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरांमुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती धनखड यांनी काल नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात 'एक पेड मां के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.
****
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झारखंडमध्ये रांची इथं पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही काल करण्यात आलं. सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा असेल, आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून, या निर्णयाबाबत आश्वस्त केलं.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत ��म आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रातलं तसंच राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्यात शिंदखेडा इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका पवार यांनी केली.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं, जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं देखील काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पैठण इथल्या संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.
****
अभियंता दिन काल साजरा झाला. नागपूर इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्कार तसंच उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार देखील यावेळी वितरीत करण्यात आले.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच आवश्यक सूचना केल्या.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. मस्कतमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत गणेश घुगे यांनी माहिती दिली..
‘‘दरवर्षी आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करतो. गणपतीसाठी आम्हाला एक ठिकाण आहे रूई म्हणून. तिथे आम्हाला भारतातून गणेशमूर्ती इम्पोर्ट करतात. आणि ते आणून आम्ही इथे सण साजरा करतो. ढोलताशाचा गजर वगैरे इथं काही प्रकार नाही. आणि प्रसाद दोन वेळेला असतो. सकाळ संध्याकाळ प्रसाद करतो. गणपतीची आरती करतो. भजन करतो. आणि आनंदाने हा सण आम्ही इथे साजरा करतो.’’
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद - मिलाद- उन - नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त आज सर्वत्र मिलाद महफिल आणि सीरत संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे. ईद निमित्त ठिकठिकाणी मिलाद जुलूस देखील काढले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातली परिपत्रकं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल जारी केली.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
उद्या १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
दरम्यान, उद्या साजरा होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा माहितीपट आज सह्याद्री वाहिनीवर दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी माहितीपट पाहावा असं आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावं, असं आवाहन कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या मोहा आणि सिरसाळा इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते.
दरम्यान, अंबाजोगाई इथले ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन काल धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर, आमदार नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होत्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
परभणी इथं काल धनगर समाजाच्या वतीनं मेघालयचे राज्यपाल सी.एच.विजयशंकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.इंद्र मणि उपस्थित होते. आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणावर भर देण्याची गरज विजयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि कांदा निर्यातीला दिलेलं प्रोत्साहनाचं, आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी स्वागत केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी आधारभूत केंद्र पुढच्या काही दिवसात सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रितेश मोरे असा या मुलाचा नाव असून तो गणेशपूर पिंप्री इथलं रहिवासी होता.
****
0 notes