#येणाऱ्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता ३२ पट वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ चं उद्घाटन आज पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातला प्रत्येक तज्ञ म्हणत आहे की २१ वं शतक भारताचं आहे, भारत केवळ स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मंत्रीस्तरीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभाग, प्रदर्शनाची जागा आणि आयोजित केली जाणारी सत्रे यांची संख्या पाहता हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड यांची दालने असतील.
****
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात दीनदयाळ उपाध्याय यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहा�� अर्पण करून अभिवादन केलं.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत.
पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता. बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. बोराडे सरांच्या जाण्याने साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळच तुटली आहे, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे १६ गाड्या चालवत असून, या सर्व स्थानकांवरची परिस्थिती सुरळीत आहे. यासंदर्भात कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला ��ांनी केलं आहे. राज्यातून दररोज सुमारे २० विशेष आणि नियमित गाड्या प्रयागराज आणि त्या भागासाठी चालवल्या जात आहेत.
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवायचं आवाहन केलं आहे. भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध रेल्वेस्थानकांवर मदत केंद्रंही स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतून तीन बांग्लादेशींना अटक केली. भारतात बेकायदेशीर वास्तव्य करून बनावट कागदपत्रांआधारे इराकला जाण्याचा त्यांचा विचार होता. मोहम्मद इस्माईल, शेख अकबर, शेख साजन अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मुंबई एटीएसच्या मदतीनं या तिघांनाही मुंबईच्या पायधोनी भागात अटक करण्यात आली आणि त्यांना रायपूरला परत नेण्यात आलं.
****
बुलढाणा जिल्ह्यात या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ करणार असल्याची घोषणा, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं हा महोत्सव सुरू केला जाणार आहे.
****
बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिने महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
****
0 notes
Text
Oppo Reno 13 Series: Oppo कंपनी लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली Oppo Reno 13 सीरिज लॉन्च करणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 9 जानेवारी 2025 रोजी येणाऱ्या Oppo Reno 13 आणि Oppo Reno 13 Pro स्मार्टफोन्सकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू शकता. या सीरिज मध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि प्रीमियम डिझाईन पाहायला मिळणार आहे.
0 notes
Text
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार करण्यावर भर – मंत्री प्रकाश आबिटकर - महासंवाद
पुणे, दि.०३: आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुवि��ा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी…
View On WordPress
0 notes
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतात.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
#soil#soilhealth#soil erosion#agriculture#micronutrients#organic fertilizer equipment#biostimulants market trends#organic fertilizer production line#farming#farms#environment
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४६
भाऊसाहेबांनी केलेल्या त्या स्पष्ट खुलाशानंतर एक विचित्र शांतता पसरली! त्यावर कुणालाच कांही बोलण्याचा धीर झाला नाहीं. एका बाजूला खुर्चीवर ऐकत बसलेल्या मनोरमावर मात्र भाऊसाहेबांच्या खुलाशाचा वेगळाच परिणाम झाल्याचं शुभदाला जाणवलं. तिची अचानक वाढलेली अस्वस्थता पाहून शुभदाने मनोरमाच्या चाळवाचाळव करणाऱ्या हातांवर शांतपणे आपला हात ठेवीत तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि नजरेच्या खुणांनीच 'तुला जे कांही बोलायचं आहे ते लगेच आणि स्पष्टपणे बोल' असं सुचवलं. "माफ करा भाऊसाहेब," मनोरमा शांततेचा भंग करीत म्हणाली, "तुम्ही मुलांनी जे सुचवलं त्याला सुहासिनीचा ठाम विरोध असल्याचं सांगीतलं, पण त्याची कारणं नाहीं सांगीतली!" "मनोरमा, अग तूं मधेच हे काय --" म्हणत तिला थांंबवायचा प्रयत्न करणाऱ्या भोसलेंना अडवून मनोरमा शांतपणे म्हणाली,"मला बोलूं द्या, मनोहर! खरं तर ही कारणं सुहासिनीने स्वत: सांगणं अधिक योग्य ठरलं असतं, पण आतां ती बोलायच्याही अवस्थेत नाहीये! तिचं म्हणणं या सर्वांसमोर आलं नाहीं तर परिस्थितीचं गांभीर्य कुणालाच समजणार नाहीं!" त्यावर भोसलेंनी भाऊसाहेबांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं! भाऊसाहेबांनी मूकपणे संमतीदर्शक मान डोलावली तशी मनोरमा सर्वांना उद्देशून पुन: बोलूं लागली, "सुहासिनीकडून तिच्या अलीकडच्या आजारपणांत मला जे समजलं तेच मी थोडक्यात सांगणार आहे! सुहासिनीचं स्पष्ट मत होतं की मुलांना दाखवताहेत तसा आई-बाबांचा कळवळा वगैरे कांही आलेला नसून गेली पांच वर्षं तरी दाबूून ठेवलेली मनीषा त्यांना पूर्ण करायची आहे!" "कुठल्याही कारणास्तव कां होईना, मुलं आई-बाबांची काळजी घेणार असतील तर हरकत काय आहे?" एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं.
"तेच तर मी सांगतेय् की सुहासिनीच्या मते मुलांचा खरा हेतू काळजी घेण्याचा नसून वेगळाच होता! धाकट्या शिरीषने ५ वर्षांपूर्वी वेगळं बिऱ्हाड केलं तेव्हांच दोघां भावांनी 'माॅम आणि डॅडने त्यांच्याबरोबर रहावं' असं सूतोवाच केलं होतं! त्यावेळी नकार देतांना सुहासिनीने स्पष्ट शब्दांत सांगीतलं होतं की 'तुमच्या लग्नांनंतर सर्वांनी एकत्र रहावं म्हणून तर होता तो बंगला विकून त्याच परिसरात आम्ही हा ४ बेडरूमचा फ्लॅट घेतला! तथापि तुम्हां दोघांनाही स्वतंत्र राहायचं असेल तरी आमची हरकत नाही;-- पण हा फ्लॅट सोडून आम्ही कुठेही येणार नाहीं. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ इथे राहिल्याने या परिसराशी आमची जणूं नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आतां या वयांत दुसरीकडे नव्याने बस्तान बसवणं शक्य नाहीं.' ते ऐकून दोघेही खूप नाराज झाले होते!" "पण मुलांना उतारवयात आई-बाबांनी एकटं राहण्याबा���त काळजी वाटणे साहजिक नाहीं कां?" दुसर्या एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं "सुहासिनीशी याबाबत भाऊसाहेब सहमत नसले, तरी सुहासिनीच्या मते मुलांचा डोळा फक्त हा फ्लॅट विकून येणाऱ्या भल्यामोठ्या रकमेवर होता! कारण त्यांनी कधीही असं म्हटलं नाहीं की 'हा फ्लॅट विकून येणाऱ्या पैशांतून तुमच्यासाठी आमच्या जवळ नवीन फ्लॅट घेऊंया'. गेल्या ५ वर्षांत या फ्लॅटची किंमत अधिकच वाढली आहे हे उघड आहे!!" एवढ्यांत कुणीतरी उतावीळपणे अधिक वेळ बटन दाबून धरावे तशा प्रकारे डोअरबेल कर्कश्श वाजली. भाऊसाहेबांना बसून राहण्याची खुण करीत भोसलेंनी चट्कन पुढे होऊन ��ार उघडलं तशी गिरीश घाईघाईने आंत ��ला. पण जमलेल्या लोकांना बघून कांहीसं चकित होत त्याने तीक्ष्ण स्वरांत भाऊसाहेबांना विचारलं, " डॅड, माॅम कुठे आहे? आणि तुम्ही ही कोण लोकं, कशासाठी जमा केली आहेत?" " डॅड, तुम्हांला दिवसभरांत फोन करून दादाशी किंवा माझ्याशी बोलावंसं नाहीं वाटलं?" गिरीशच्या मागोमाग आलेल्या शिरीषने विचारलं. त्याच्या स्वरांतला उपहास लपण्याजोगा नव्हता!
"गिरीश आणि शिरीष, तुम्हांला वाटणारी काळजी आम्ही सगळे समजूं शकतो! तथापि माझी विनंती आहे की तुम्ही शक्य तेवढ्या हळूं आवाजांत बोलावं!" आपल्या आवाजावर ताबा राखीत भोसले अत्यंत शांत स्वरांत म्हणाले, "भाऊसाहेब या घडीला कुठलाही संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाहींत, हे तुम्ही दोघांनी लक्षांत घ्यायला हवं! त्यामुळेच मी स्वत: तुम्हां दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला! पण फोन लागला नाहीं;-- तेव्हां तुम्ही महत्वाच्या कामांत बिझी असाल हे ओळखून मी तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवले, ते तुम्ही बघितले नाहीं कां?" भोसलेंनी शांत स्वरांत केलेला खुलासा ऐकून गिरीश आणि शिरीष दोघेही वरमले. पुढे केलेल्या खुर्चीवर बसत गिरीश म्हणाला, "काका, तुमचा मेसेज शिरीषने प्रथम बघितला आणि मला लगेच कळवलं! म्हणून तर आम्ही ताबडतोब इथे आलो आहोंत!" दोघांच्या वागण्या-बोलण्याचा एकुण रागरंग पचनी न पडल्याने खुप चिडलेली मनोरमा पुढे येत लागट स्वरांत म्हणाली, "नशीब म्हणायचं की भोसलेकाकांना तरी तुम्ही ओळखलंत! आणि काय रे, तुम्ही आई-बाबांची विचारपूस करायला आला आहांत की त्यांना जाब विचारायला?" "माफ करा काकु!" गिरीश चट्कन हात जोडून म्हणाला, "काळजीपोटी आम्ही कांही कमीजास्त बोललो असूं हे प्लीज समजून घ्या! माॅमला आम्ही भेंटूशकतो कां?प्लीज?" "सुहासिनीची तब्येत ठीक आहे आतां, पण औषधांच्या परिणामाने तिला गाढ झोंप लागली आहे! हवं तर तिला बघून या, पण उठवूं नका!" मनोरमा म्हणाली, "डाॅक्टर म्हणाले आहेत की ती आपणहून उठेल तेव्हां तिची तब्येत ठणठणीत झालेली असेल!" "माॅमला शांत झोप लागली असेल तर आपण तिला आत्ता नको भेंटुया!" गिरीशला उद्देशून शिरीष म्हणाला, "उद्यां सकाळी त्यांना घेऊन जायला येऊं, तेव्हांच एकदम भेंटुया!"
६ जुलै २०२३
0 notes
Text
Pune : शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी
एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथे (Pune) उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर…
0 notes
Text
youtube
येणाऱ्या ऋषीं पंचमीला महिलांनी प��रखर पितृदोष मासिक धर्म दोष आणि पवित्रतेसाठी अशी करा व्रत उपासना Follow the DATTAPRABODHINEE NYAS channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VaaSq9oK5cDE7kwVvZ2o
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज : https://forms.gle/4kXGqHxzdMjKk5t77
Quora : https://www.quora.com/profile/Kuldeep-Nikam
Quora Space : https://swamisamarth.quora.com/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत. पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही बोराडे यांना जाहीर केला होता. बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरातल्या तीन हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होत आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळानं २७१ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून, या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याने निगराणी ठेवली जाणार आहे. तसंच, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही, असं केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांनी काल लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपरस्थित केला होता. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला, त्याला कृष्णा पाणी लवादानं मंजुरी दिली. या प्रश्नावर कोणत्याही राज्याकडून धरणाची उंची वाढवायला विरोध असल्याचा प्रस्ताव दाखल झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या धरणाचं पाणी शिरोळ तालुक्यापर्यंत पोहोचणार असून, पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे जलमय होऊ शकतात, असा दावा जलतज्ञांनी यापूर्वी केला आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थ्यांना १० कोटी एलपीजी जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पे��्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत दिली. एलपीजी जोडणीसाठी अजून २९ लाख अर्ज प्रलंबित असून, ते मंजूर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही असं त्यांनी सांगितलं.
रेल्वे वाहतुकीसाठी विजेची वाढती गरज लक्षात घेऊन त्याच्या पुरवठ्यासाठी आता अणुऊर्जेच्या पर्यायाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि वीज मंत्रालयाशी संपर्क साधला असल्याचं त्यांनी सांगितलं.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने धाराशिव इथं काल मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाची ध्वजारोहणाने सुरुवात झाली. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यावेळी उपस्थित होते. १९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कार्यालयाजवळच्या रोहित्राला काल आग लागली होती. नागरिकांची सतर्कता तसंच पोलीस, आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली.
0 notes
Text
कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० सप्टेंबरपासून अर्थसहाय्य वाटप - कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. 2 : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सन 2023…
0 notes
Text
खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन…
View On WordPress
0 notes
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
मातीचे आरोग्य हा आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो अन्न उत्पादन, पाण्याची गुणवत्ता आणि हवामान स्थिरता प्रभावित करतो. शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी मातीच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. निरोगी माती का महत्त्वाची आहे आणि ती आपल्या जीवनावर कसा परिणाम करते ते येथे आहे.
अन्न उत्पादनाचा पाया आपल्याला टिकवून ठेवणारे अन्न तयार करण्यासाठी निरोगी माती आवश्यक आहे. असा अंदाज आहे की आपले 95% अन्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीत उगवले जाते. निरोगी माती आवश्यक पोषक तत्वे, पाणी, ऑक्सिजन आणि मुळांना आधार देतात, ज्यामुळे झाडे मजबूत वाढतात. मातीची गुणवत्ता थेट उत्पादित पिकांच्या गुणवत्तेशी आणि प्रमाणाशी संबंधित आहे, ज्यामुळे मातीचे आरोग्य अन्न सुरक्षेसाठी मूलभूत बनते.
जैवविविधता आणि इकोसिस्टम कार्य माती ही एक जिवंत परिसंस्था आहे, जिवाणू, बुरशी, गांडुळे आणि कीटकांसह विविध प्रकारच्या जीवांचे घर आहे. हे जीव पोषक सायकलिंग, सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि मातीची रचना राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विविध मातीची परिसंस्था वनस्पतींचे आरोग्य आणि रोग आणि कीटकांविरूद्ध लवचिकता वाढवते. जेव्हा मातीचे आरोग्य कमी होते, तेव्हा ते या प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे जैवविविधता आणि परिसंस्थेची कार्यक्षमता कमी होते.
पाणी व्यवस्थापन निरोगी मातीत पाण्याची घुसखोरी आणि धारणा सुधारते, प्रवाह आणि धूप कमी होते. ते नैसर्गिक फि��्टर म्हणून काम करतात, जलमार्गापर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रदूषकांना अडकवून पाणी स्वच्छ करण्यात मदत करतात. पूर आणि दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी पाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याची ही क्षमता महत्त्वाची आहे. मातीचे आरोग्य राखून, आपण शेती आणि शहरी दोन्ही गरजांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवू शकतो.
हवामान बदल शमन माती ही महत्त्वपूर्ण कार्बन सिंक आहे, जी वातावरणापेक्षा जास्त कार्बन साठवते आणि सर्व स्थलीय वनस्पती जीवन एकत्रित करते. निरोगी माती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड काढून टाकून हवामानातील बदल कमी करण्यास मदत करू शकतात. याउलट, अस्वास्थ्यकर माती वातावरणात साठवलेला कार्बन परत सोडू शकतात, ज्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात योगदान होते. त्यामुळे मातीचे आरोग्य राखणे केवळ शेतीसाठीच नाही तर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी देखील आवश्यक आहे.
शाश्वत शेती मातीचे आरोग्य राखण्यासाठी शाश्वत व्यवस्थापन पद्धती आवश्यक आहेत जे तिच्या जीवनशक्तीला चालना देतात. यामध्ये कमी मशागतीद्वारे मातीचा त्रास कमी करणे, आच्छादित पिकांसह जास्तीत जास्त जमिनीचे आच्छादन करणे आणि जैवविविधता वाढविण्यासाठी पिके फिरवणे यांचा समावेश होतो. शाश्वत पद्धती जमिनीतील सेंद्रिय पदार्थ पुनर्संचयित करण्यात मदत करतात, पोषक सायकलिंग सुधारतात आणि दीर्घकालीन उत्पादकता सुनिश्चित करतात.
निष्कर्ष मातीच्या आरोग्याचे महत्त्व जास्त सांगता येणार नाही. हे अन्न उत्पादन, जैवविविधता, पाणी व्यवस्थापन, हवामान स्थिरता आणि शाश्वत शेतीसाठी पायाभूत आहे. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे आपल्या नैसर्गिक संसाधनांवर वाढत्या दबावाचा सामना करत असताना, येणाऱ्या पिढ्यांचे शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मातीच्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. निरोगी मातीला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतींचा अवलंब करून, आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करताना अन्न सुरक्षा वाढवू शकतो.
0 notes
Text
केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी 28 व 29 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली. या भेटीदरम्यान, डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या ��ाध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या, जसे की उद्यमीता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन इत्यादी. त्यांनी सर्व प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला. कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फुके उपस्थित होते.डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था #कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #कापूससंशोधन #भारतीयकृषीअनुसंधानसंस्था #विस्तारकार्यक्रम #शेतकरीउत्पादककंपनी #CottonResearch #दादालाडतंत्रज्ञान #शेतकरी
1 note
·
View note
Text
ll वानप्रस्थ ll : ४२
शुक्रवारी सकाळी अनंतची मित्रांबरोबर गप्पा आणि खाण्याची साप्ताहिक बैठक असल्याने शुभदा तशीही निवांत असे. आज जरा अधिकच निवांत होती कारण ४ दिवसांपूर्वी 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'मधे घडलेल्या गैरप्रकारांबाबत विस्तृत कारवाई मनासारखी झाल्याच्या समाधानांत मनोहर भोसले आज सर्व मित्रांना विशेष पार्टी देणार होते! त्यांनी स्वत: फोन करून, "वहिनी, मी तुमच्यासाठी खास भलंमोठं पार्सल पाठवणार आहे;- तरी आज चूलीला पूर्ण विश्रांती देऊन मस्त आराम करायचा!" असा निरोप दिल्याने शुभदाला आज स्वयंपाकाचाही तगादा नव्हता! त्यामुळे बर्याच दिवसांनी मिळालेल्या फुरसतीचा सदुपयोग करुन एक नवीन डिझाईनचा स्वेटर विणायला सुरुवात करायचा घाट तिने घातला होता. संग्रही असलेल्या लोकरींचे गुंडे तपासून कुठले ३ रंग निवडावेत याचा विचार ती करीत असतांनाच डोअरबेल वाजली! अनंतला यायला आज नेहमींपेक्षा अधिकच उशीर होणार असल्याने 'कोण आलं असावं?' असा विचार करीत तिने दार उघडलं तर बाहेर अनंत उभा! "धांदलीमधे लॅचची चावी घरीच राहिली कां?" "तूं चुकून आंतून कडी लावली होतीस कां?" त्याला पाहून चकीत झालेल्या शुभदाच्या प्रश्नावर हातांतला चाव्यांचा जुडगा पुढे करीत अनंतने विचारलं, "मी नेहमीप्रमाणेच लॅच उघडायचा प्रयत्न केला, पण उघडलंच नाही!" "जाऊं द्या! माझीच कांहीतरी गडबड झाली असेल तुम्ही गेल्यावर दार ओढून घेतांना!" नेहमी हमखास लॅच उघडून घरांत येणाऱ्या अनंतला आज लॅच उघडतां आलं नाही म्हणजे तो नक्कीच कसल्यातरी गहन विचारांत मग्न असणार हे ओळखून शुभदाने विषय वाढवला नाहीं. आपला लोकरींचा पसारा झटपट आवरून तिने अनंतला सोफ्यावर बसायला जागा करून दिली आणि थंड पाण्याचा ग्लास त्याच्या हातांत देत सहज स्वरांत विचारलं, "पण तुम्ही आज एवढे लौकर कसे परत आलांत? भोसलेंची खास पार्टी होती ना?"
"हो, आज खास पार्टीचं आयोजन मनोहर भोसलेंनी केलं होतं! त्यांनी स्वत: प्रत्येकाला फोन करून आग्रह केल्याने कधी नव्हे ते आम्ही सर्व १६ मेंबर्स आज अगदी वेळेवर हजर होतो. मनोहरपंतांनी स्वत: ठरवलेल्या मेनूला दाद मिळाली. तसंच कांही जणांनी बदलही सुचवले . त्यानुसार खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आणि चहा-काॅफीचा आस्वाद घेत गप्पाही सुरु झाल्या! पण तेवढ्यांत एक फोन आला आणि एकच गोंधळ उडाला!" "म्हणजे?" "आमचे एक मेंबर भाऊसाहेब सप्रे रहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा फोन आला की सप्रेवहिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून भाऊसाहेबांनी तांतडीने घरीं परत यावं! ते ऐकून भाऊसाहेब एवढे घाबरले की त्यांनाच आधी डाॅक्टरांकडे न्यावं लागणार असं वाटायला लागलं! पण सुदैवाने त्यांच्या सोसायटीतच राहणारे यशवंत माने आमच्या ग्रुपमधे आहेत. त्यांनी भाऊसाहेबांना धीर देऊन सांवरलं आणि आपल्या कारमधे त्यांना बसवून तडक घरी घेऊन गेले!" "पण मग तुम्ही नाहीं गेलांत?" "शुभदा, आमची बर्याच वर्षांची ओळख असली आणि ग्रुपच्या निमित्ताने हल्ली नियमित भेटतही असलो तरी माझे भाऊसाहेबांशी वैयक्तिक संबंध नाहींत! त्या��ुळे अशा नाजूक आणि अवघड परिस्थितीत माझ्यासारख्या, नाहीं म्हटलं तरी परक्या माणसाने त्यांच्या घरी जाणं मला योग्य वाटलं नाहीं! माझ्यासारखे इतरही ५-६ जण आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र विचार करून ठरवलं की आपण आत्तां लगेच त्यांच्या घरी जायचं नाहीं!" यावर काय बोलावं हे न सुचून शुभदाही गप्प राहिली. पांच-सात मिनिटे अशा अवघडलेल्या शांततेत गेल्यावर अनंत विमनस्कपणे म्हणाला, "मात्र आम्ही सगळे संध्याकाळी एकत्र भेटून ठरवणार आहोत की कधी जायचं भाऊसाहेबांना भेटायला! तोपर्यंत एकुण परिस्थितीचाही अंदाज येईल!" "आतां भाऊसाहेबांसोबत कोण आहेत याची कांही कल्पना? म्हणजे त्यांना कांही मदत लागली तर या दृष्टीने मी विचारतेय!" "त्या सगळ्या गडबड गोंधळामधे यशवंत मानेंसोबत किती, कोण गेले आठवत नाहीं" अनंत विचार करीत उत्तरला,"पण मानेंसोबत गेले नसले तरी मनोहरपंत तिथे नक्की गेले असतील! त्यांची भाऊसाहेबांशी व्यक्तीशः मैत्री आहे. शिवाय एकुणच त्यांचं सोशल नेटवर्किंग मोठं आहे;- ज्याचा अशा वेळी हमखास उपयोग होतो! मीही संध्याकाळी त्यांनाच फोन करून परिस्थिती जाणून घेणार आहे!!"
बोलत असतांना अनंतच्या चेहर्यावरील तणाव व आवाजातील थकवा जाणवून शुभदा म्हणाली, "हो, संध्याकाळी तुम्ही ठरल्यानुसार तुमच्या मित्रांशी सल्ला-मसलत जरूर करा, पण तोपर्यंत मात्र विश्रांती घ्यायची! उन्हातून आला आहांत म्हणून थंडगार पन्हं घेणार आहांत की तुम्हांला तुमचा तिन्हीत्रिकाळ आवडता चहाच हवा?" "मला काय हवं ते ठाऊक असूनही कशाला नसतंं नाटक ग!" म्हणतांना अनंतच्या चेहर्यावर प्रथमच हलकीशी स्मितरेषा उमटली. 'बरं;-- चहा आणते!' म्हणत शुभदा कीचनमधे जाण्यासाठी वळली तेव्हां तिला थांबवीत अनंत म्हणाला, "तुझी जी कुणी मैत्रीण आहे डबा देणारी, तिच्याकडून सरळ जेवण मागव! आतां कांही करीत बसूं नकोस! आज सकाळी नाश्ता न केल्याने आतां या परिस्थितीतही आपल्या दोघांना लौकरच सणसणून भूक लागणार आहे!"
८ जून २०२३
0 notes
Text
'अष्ट दारिद्र्य'
‘अष्ट दारिद्र्य’ हा संकल्पना आहे ज्यात जीवनात येणाऱ्या विविध प्रकारच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींचा समावेश आहे. ही संकल्पना भारतीय परंपरेतून आली आहे आणि तिचा उद्देश आहे की आपण कसे वागायला हवे आणि कोणत्या प्रकारच्या विचारांचा त्याग करायला हवा, जेणेकरून आपण खरेखुरे समृद्ध जीवन जगू शकू. अष्ट दारिद्र्यांचा संक्षेप असा आहे: अज्ञान (Ignorance): ज्ञानाचा अभाव, सत्यापासून दूर राहणे.आळस…
0 notes