#मुंबई क्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा ��ेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्थन मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिव��ांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी ज���ंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नां��ेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समोर आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी - 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या 'कर्मभूमी'मध्ये प्रवेशावर बंदी
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी – 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या ‘कर्मभूमी’मध्ये प्रवेशावर बंदी
मुंबईतील सांताक्रूझ येथील ‘लोकप्रिय’ एअर इंडिया ग्राउंड, जे पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांसारख्या टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे घर आहे, ते यापुढे इच्छुक क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध नसेल. यामुळे सुमारे 1000 प्रतिभावान क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात आले आहे. हे मैदान मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मालकीच्या क्रीडा संकुलाच्या आत आहे. ते गेल्या वर्षी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं?
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं?
Irfan Pathan: मुंबई विमानतळावर इरफान पठाणला अपमानास्पद वागणूक, वाचा काय घडलं? Irfan Pathan mumbai airport: इरफान पठाणचा आशिया कप २०२२ च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी इरफान दुबईला रवाना झाला. बुधवारी कुटुंबासह दुबईला जाण्यासाठी इरफान मुंबई विमानतळावर पोहोचला होता. यादरम्यान त्याला विमानतळावर वाईट वागणूक देण्यात आली. Irfan Pathan mumbai…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्माचे केले कौतुक, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारासाठी असे म्हटले
डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्माचे केले कौतुक, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारासाठी असे म्हटले
डेवाल्ड ब्रेविस: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने रोहित शर्मावर मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा कर्णधार म्हणून हुशार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. तो पुढे म्हणाला की, रोहित शर्मा आपल्या खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. तो आपल्या खेळाडूंवर दबाव निर्माण होऊ देत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही तुमच्या नैसर्गिक खेळाचा आनंद घ्यावा आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या ��ेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्‍ आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार ��रकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या ��हिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 20 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दु��ारी १२ वाजता धुळे आणि दोन वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत, मतदान जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई महापालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त ���ाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या चारही मतदार संघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना केल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.
लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेख्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स��पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली.
धुळे शहरात १० नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. याअंतर्गत २६८ वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये नव्व्द कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आला होता. याप्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक आधिकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
चेन्नई इथं सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा ४-१ असा पराभव केला. तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा ५-० असा पराभव केला. चंदीगडने उत्तराखंडविरुद्ध ९-० असा विजय मिळवला.
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. श्रद्धेचे महान पर्व असणाऱ्या छठ या सणाशी संबंधित त्यांची सुमधुर गाणी नेहमीच स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. दरम्यान, शारदा सिन्हा यांच्या पार्थिव देहावर उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी ९ तारखेला नांदेड इथं जाहीर सभा होणार आहे. खासदार अशोक चव्हाण तसंच खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला इथं सभा घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेची आढावा बैठक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. या बैठकीला निवडणूक आयोगाचे उप आयुक्त हिर्देश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. पहिली तपासणी उदगीर विधानसभा मतदारसंघ ७ तारखेला, अहमदपूर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील ८ तारखेला, तसंच लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी ९ तारखेला रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरी तपासणी १२ आणि १३ तसंच तिसरी तपासणी १�� आणि १७ तारखेला होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी काल केली. शिवडी इथं काल झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना��ा पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.
मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने, अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना काल सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आलं. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते सुहास जोशी यांना सन्मानित करण्यात आलं. विष्णुदास भावे गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे आणि आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यावेळी उपस्थित होत्या.
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या कलाकारांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं १४ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहेत. काल झालेल्या सामन्यांत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे, आरव मुळ्ये यांनी मानांकित खेळाडूंवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. स्मित उंद्रेनं गुजरातच्या १४ व्या मानांकित कबीर परमारचा पराभव केला. तर, आरव मुळ्येनं तेलंगणाच्या चौथ्या मानांकित प्रणित रेड्डीवर विजय मिळवला. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित राजस्थानच्या आराध्या मीना हिनं ओडिशाच्या शजफाचा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ -आ��सीसीच्या काल ��ाहीर करण्यात आलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची महिला क्रिकेट खेळाडू दीप्ती शर्मा दूसऱ्या स्थानावर असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ती चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ही पहिल्या स्थानावर आहे.
0 notes
airnews-arngbad · 24 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस • मराठवाड्यात जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली मतदारसंघांत उमेदवार देण्याचे मनोज जरांगे पाटील यांचे संकेत • शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या त्रुटीबाबत चौकशीचे निवडणूक आयोगाचे निर्देश • दीप��त्सवात भाऊबीजेचा सण काल घरोघरी पारंपरिक पद्धतीने साजरा आणि • मुंबई क्रिकेट कसोटी जिंकत न्यूझीलंडचा भारताविरोधात निर्भेळ मालिका विजय
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणुशक्तीनगर, मानखुर्द यासह ३६ ठिकाणी तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा यासह २६ ठिकाणी इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. महायुतीकडून तसंच महाविकास आघाडीकडून आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर, उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधली नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असं आवाहन, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्यानं महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अस��ही सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या यशवंत सेना या संघटनेनं, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठीं��ा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे संकेत, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. आपण ज्या जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू, अशी भूमिका, जरांगे यांनी या बैठकीत मांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शिवसेनेचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातल्या मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप, सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
परभणी जिल्ह्यातल्या रामपुरी इथं दिवाळी पहाट ही सुरेल संगीत मैफल काल घेण्यात आली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे त्यांच्या मार्गदर्शनात मुख्य समन्वयक अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे यांच्या संचाने, नागरिकांना येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन केलं..
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
सणांचा समूह असलेल्या दीपोत्सवात काल भाऊबीजेचा सण पार पडला. घरोघरी बहिणींनी भावांना औक्षण करून, त्यांच्या दीर्घायुष्याची मंगल कामना केली, तर भावांनी बहिणींना ओवा��णीच्या रुपात आकर्षक भेटवस्तू दिली. काल भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर वस्त्रप्रावरणं, आभुषणं आणि इलेक्ट्रीक तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
छत्रपती संभाजीनगर इथं काल गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सगर महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये रेड्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. पशुपालकही पारंपारिक पोषाख घालून मोठ्या उत्साहाने यामिरवणुकीत सहभागी झाले होते.
बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलातल्या खो-खो च्या मैदानावर दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड जिल्हा खो-खो असोसिएशन, आणि साई-गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून परस्परांना शुभेच्छा दिल्या.
न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. काल मुंबईत झालेला तिसऱ्या आणि अखेरच्या सामनाही न्यूझीलंडनं अवघ्या २५ धावांनी जिंकला. न्यूझीलंडचा दुसरा डाव काल सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला, पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळे भारताला विजयासाठी १४७ धावा करायच्या होत्या, मात्र भारताचा दुसरा डाव अवघ्या १२१ धावांवर संपुष्टात आला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने एकाकी झुंज देत ६४ धावा केल्या, वॉशिंग्टन सुंदरने १२ तर कर्णधार रोहित शर्माने ११ धावा केल्या, रवीचंद्रन अश्विन आठ, रवींद्र जडेजा सहा, यशस्वी जैस्वाल पाच, शुभमन गिल, विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी प्रत्येकी एक धाव केली तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. सामन्यात ११ बळी घेणारा न्यूझीलंडचा एजाज पटेल सामनावीर, तर विल यंग मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
१४ व्या हॉकी इंडिया अजिंक्यपद स्पर्धांना आजपासून चेन्नईत प्रारंभ होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ सहभागी होत आहेत. उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची म��हिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांच्या पार्थिव देहावर काल आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. वरखडे यांचं शनिवारी रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहिल.
0 notes
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्र���देशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• दिवाळीत आज भाऊबीजेचा उत्साह-नानाविध प्रकारच्या खरेदीने दिवाळीचा पाडवा आनंदात साजरा • केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ • अहमदनगर जिल्ह्यात २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं जप्त आणि • मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी
आज कार्तिक शुद्ध द्वितीया. हिंदू संस्कृतीत यमद्वितीया नावानं ओळखला जाणारा हा दिवस, बहीण भावाच्या नात्यातला स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळण्याचा आणि भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. भाऊबीजेच्य पार्श्वभूमीवर काल सर्वच ठिकाणची बसस्थानकं तसंच रेल्वेस्थानकं प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली होती. दरम्यान, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा काल साजरा झाला. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी या मुहूर्तावर करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे या दिवशी नूतन गृहप्रवेश, वाहन खरेदी किंवा आभुषणं खरेदीकडे बहुतेकांचा कल असतो. कालही भेटवस्तू, मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून मोठी गर्दी झाली होती. विक्रम संवत २०८१ ला कालपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. देशभरात गोवर्धन पूजाही काल करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा काल खंडीत झाली. बारामतीमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, काल ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, पाडव्याचा सोहळा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.
दिवाळीनिमित्त रसिकांना सर्वत्र विविध सांगितिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असून, या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नांदेड इथं आज सकाळी प्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांचा गजल संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संत मुक्��ाबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा ब्रह्मचित्कला मुक्ताई हा आगळा कार्यक्रम काल पुण्यात सादर झाला. महाराष्ट्रातल्या संतांच्या कार्याची माहिती आणि महती कथन करणाऱ्या मालिकेअंतर्गत सादर झालेल्या या कार्यक्रमाचं हरिभक्त परायण रोहिणी माने - परांजपे यांनी निरुपण केलं. या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन तसंच निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी काल दीपोत्सव साजरा केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, असे एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा तीन तत्वांवर दरवर्षी हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक गोपाल खाडे यांनी आपल्या निवासस्थानी आकाश कंदिलाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संदेश दिला आहे. खाडे कुटुंबीयांनी तयार केलेल्या या आकाश कंदिलावर विविध संदेश लिहून, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातल्या यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले असून, त्यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नागपूर मधून पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले अनिस अहमद, काल काँग्रेस पक्षात परतले. काही दिवसांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. या पक्षाकडून ते मध्य-नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते, मात्र निर्धारित वेळेत पोहोचू न शकल्याने, त्यांचा अर्ज दाखल होऊ शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर अहमद यांनी काल मुंबईत काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ��ासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान, शेट्टी यांनी आजपर्यंत पक्षशिस्त पाळली आहे, त्यामुळे ते बोरीवलीतून माघार घेतील, अशी आशा फडवणीस यांनी वर्तवल्याचं, वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी काल जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे. [Byte- विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन - ]
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातल्या मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्र���्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं, निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. छापील प्रचार साहित्यावर प्रकाशक आणि मुद्रकाचं नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असून, जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणला जाणार आहे.
क्रिकेट मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.
अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या कृषा वर्मानं जर्मनीच्या लेरिका हिचा पाच - शून्य असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मात्र महिलांच्या स्पर्धेत चंचल चौधरी आणि अंजली सिंग, तर पुरुषांच्या स्पर्धेत राहुल कुंडू यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात येत्या १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दिव्यांगांच्या राष्ट्र���य नेमबाजी स्पर्धा होणार आहेत. दहा मीटर रायफल, २५ मीटर एअर पिस्टल, ५० मीटर एअर पिस्टल, ५० मीटर रायफल या प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले सुमारे ६०० नेमबाज सहभागी होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मतदार संघातल्या उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी येत्या सात तारखेला, दुसरी तपासणी ११ तारखेला, तर तिसरी तपासणी १५ तारखेला होणार आहे. चिखलवाडी इथं ही तपासणी होणार आहे.
महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी काल अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारी आढावा बैठक घेतली. प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
चालू महिन्यात देशभरात पेन्शन विभाग आणि ॲम्प डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजना राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी एक लाख ८० हजारांहून अधिक पेन्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत पेन्शनधारक स्मार्टफोन कॅमेऱ्याने स्वत:चा चेहरा स्कॅन करुन हे प्रमाणपत्र जमा करू शकतात.
0 notes
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कता इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ. • विधानसभा निवडणुकीत उमेदवाराकडून नमुना मतपत्रिका छापण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी. • बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा विविध वस्तूंच्या खरेदीने सर्वत्र साजरा. आणि • मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीविताला धोका असून, तसे कट रचले जात असल्याची माहिती, गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्य पोलिस दलाने तत्काळ फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेत, सुरक्षेत वाढ केली. आता नेहमीच्या बंदोबस्तासोबत ‘फोर्स वन'चे १२ सैनिक देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी, नागपूर इथल्या निवासस्थानी तसंच त्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा देण्याची सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. फडणवीसांच्या उपस्थितीत अनिल कौशिक यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
भाजपाचे बंडखोर आमदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आपण पक्ष सोडलेला नाही, पक्षानं आपल्याला बाहेर काढलं तरीही आपण पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपलं प्रत्येक पाऊल पक्षाच्या हितासाठी, पक्षात राहून पक्षाची हानी करणाऱ्यांच्या विरोधात आहे, असं ते म्हणाले.
माहिमचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माहिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहिमची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हटलं आहे.
विधानसभेच्या मतदानावेळी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातील मतपत्रिका, उमेदवाराला आता नमुना मतपत्रिका म्हणून छापता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्बंध राहणार असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. पॅम्प्लेट, पोस्टर, फ्ले���्स या प्रचार साहित्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या नसेल तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र, आयोगाने निश्चित केलेल्या कागदावर नमुना मतपत्रिकेचा वापर उमेदवारांना करता येईल. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांबाबत सर्व राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यंत्रणेला कळवावी लागणार आहे.
दरम्यान, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणं आवश्यक असल्याचं, आयोगानं कळवलं आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करावी, आणि त्याच खात्यातून धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे निवडणूक खर्च करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणंही आवश्यक असणार आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची ��ाब म्हणून गणला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचालींवरून गाडी थांबवून तपासणी केली असता, हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं आहे. बाईट – विवेक भीमनवार
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले. अन्नकूट उत्सवानिमित्त आज अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले. दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. या वर्षी आतापर्यंत आठ लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे. याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे.
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमांची सुरुवात किंवा महत्त्वाची खरेदी आज केली जाते. घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं, मॉल्स, घाऊक बाजारपेठा, सराफकट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. विक्रम संवत २०८१ ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, सफलता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण भावाच्या नात्यातला स्नेह वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सण उद्या साजरा होत आहे, या पार्श्वभूमीवर बस स्थानकं तसंच रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडीत झाली. बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना, अनेक वर्षापासून चालत आलेली एकत्रित पाडवा साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर आनंद झाला असता, असं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी, ट्विट करून या कार्यक्रमाची माहिती दिली, आजचा हा पाडवा, मोठ्या स्नेहभावानं साजरा झाल्याचं सांगत, अनेक वर्षांचं हे नातं असंच वृध्दींगत होत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या आदर्श गावातल्या ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांनी प्रथम दिवे प्रज्वलित करून असा दीपोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करण्याचा निर्धार केला. प्रत्येक कुटुंबातून १ दिवा किंवा पणती, प्रत्येक संस्थेची एक पणती आणि सर्व मंदिरांचा एक दिवा, अशा एकूण ८५० दिवे प्रज्वलित करून जलस्रोतात सोडण्यात आले, शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य जपणूक, जलदेवतेची आराधना आणि वीजेची बचत अशा ३ तत्वांवर प्रत्येक हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
मुंबई क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव २६३ या धावसंख्येवर संपुष्टात आला. शुभमन गिल ९० धावा करून बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात नऊ बाद १७१ धावा केल्या आहेत.
अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
0 notes
airnews-arngbad · 26 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही  कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवा��ांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्‍यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची  भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आण��ेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घट�� पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर
राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय
नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
****
महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी आज आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या २३ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा मतदारसंघातून अभयकुमार पाटील, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील, परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे, धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं २२ उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही नावं जाहीर केली. या मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला - माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून -अभिषेक कळमकर, माळशिरस- उत्तमराव जानकर, फलटण -दीपक चव्हाण, चंदगड- नंदिनी भाबुळकर-कुपेकर, इचलकरंजी- मदन कारंडे यांचा समावेश आहे.
****
भाजपनेही आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये ��ाशिक मध्य मतदार संघातूनन देवयानी फरांदे, जत मतदार संघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण-रमेश कराड तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावंडे यांचे स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या सुविद्य पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.
****
मनसेचे मुंबईतल्या माहिम मतदार संघाचे उमेदवार अमित ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महाविकास आघाडीत झालेल्या जागांच्या वाटपात काही जागांची अदलाबदल होऊ शकते का, या या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला आज अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष एलईडी व्हॅन तयार केली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येणार आहे. महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत १ शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ, बीड इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएल��ार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई शहर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११५वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय मल्लखांब, रोप मल्लखांब, खो-खो स्पर्धा तसंच गडचिरोली इथं झालेल्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या विभागीय खो खो स्पर्धेतही विजेतेपद पटकावलं आहे. लोकबिरादरी आश्रमशाळेच्या १३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या खेळाडूंचं डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे यांनी अभिनंदन केलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज न्युझीलंड संघानं ११३ धावांनी जिंकला. आज तिसऱ्या दिवशी न्युझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक ७७ धावा केल्या. या मालिकेत न्यूझीलं���च्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५६ धावांमध्येच संपुष्टात आला होता.
****
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. आज अनेक विद्यार्थ्यांनी ही पत्रं शाळेत सादर केली. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला.
बाईट
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एसएमएस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात ��िक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश देत जनजागृती केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं.
****
मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, ���िथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले ��ारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्या��ून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन ��िवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 October 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद मोदी आज दुपारी वाराणसी इथं सहा हजार एकशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत.  आर. जे. शंकर नेत्र  रुग्णालयाचं ते उद्घाटन करतील आणि दुपारी साडेचार वाजता वाराणसीतील सिगरा क्रीडा संकुल इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहेत. आग्रा, दरभंगा आणि बागडोगरा विमानतळांच्या नवीन नागरी केंद्रांची पायाभरणी पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करणार आहेत.
****
शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळं शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन  उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी केलं आहे. राजस्थान मधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण हे कधीच उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं. शिक्षण क्षेत्राचा व्यवसाय होणं, हे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं पोषक नसल्याचं धनखड यावेळी म्हणाले.
****
दिवाळी आणि छट पूजा सणांच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं  एकूण ५७० विशेष रेल्वेंची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या राज्यातल्या मुंबई, पुणे, नागपूर आदी स्थानकांमधून सुटणार आहेत. उत्तरेकडच्या दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आदी ठिकाणी जाण्यासाठीही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गांड्यांसोबतच मध्य रेल्वेद्वारे लातूर, सावंतवाड़ी रोड, नागपुर, पुणे, कोल्हापुर, नांदेडसह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांचा प्रवास करणा-या प्रवाश्यांसाठी  १०८ रेल्वे गाड्यांचं  नियोजन करण्यात आलं आहे.दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरू आणि इतर ठिकाणासाठीही रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेनं प्��सिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचं आरक्षण सुरु झालं आहे.
****
राज्य सरकारतर्फे होत असलेला खर्च आणि एकंदर कारभार आणि राज्याच्या एकूण  अर्थव्यवस्थेवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्या काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. राज्य आर्थिक संकटात असून सरकारनं मोठ्या प्रमाणावर कर्जं घेतली आहेत असं त्या म्हणाल्या.
****
लोकनेता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या, प्रति टन चार रूपयां पैकीच्या, प्रतिटन तीन रुपयांचा भरणा करण्याचे निर्देश शासनानं दिले आहे. अन्यथा संबंधित साखर कारखान्यांना, यंदाचा हंगाम २०२४-२५ साठीचा ऊसगाळप परवाना देण्यात येणार नाही, असं साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी सर्व साखर कारखान्यांना कळवलं आहे. राज्यातल्या ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी आणि सामजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता ही योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.  
****
बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात  आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे उशिरा सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा न्यूझीलंडनं एक बाद १७ धावा केल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १०७ धावांची आवश्यकता आहे. भारताचा पहिला डाव ४६ धावांवर संपुष्टात आला होता, दुसऱ्या डावात काल भारतानं ४६२ धावा केल्या.
****
तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचं आज पहाटे पुणे इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी लातूर बीड धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ते काही काळ अध्यक्ष होते. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पाच वाजता तुळजापूर येथील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज वीजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान खात्‍यातर्फे अहिल्‍यानगर जिल्‍ह्यात काल प्रमाणे आजही वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा आणि अतिवृष्‍टीची शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यासाठी ''ऑरेंज अलर्ट'' जारी करण्‍यात आलेला आहे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरच्या पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये, असं आवाहन अहिल्यानगर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. थायलंडच्या बँकॉक इथून आलेल्या प्रवाशानं खेळणी आणि अन्नपदार्थांच्या खोक्यात जवळपास नऊ किलो वजनाचा हा गांजा लपवला होता. याचं मूल्य अंदाज�� आठ कोटी रुपये असून या प्रकरणी प्रवाश्याला ताब्यात घेण्यात आलं असल्याचं तसपास यंत्रणेनं म्हटलं आहे.
****
पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून सुमारे ४५ लाख २३ हजार रुपये उकळल्या प्रकरणी बीड इथं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी २४ लाख रुपये रोख आणि उर्वरित २१ लाख २३ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून हस्तांतरित करण्यातआलेहोते.
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा-अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लॉरेन्स बिष्णोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक
रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता १२० ऐवजी ६० दिवसआधी करता येणार
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसकडून रविंद्र वसंत चव्हाण यांना उमेदवारी
आणि
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद ४६ धावा- विराट कोहलीसह पाच खेळाडू शून्यावर बाद
****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित, नागरिकत्व कायद्याच्या कलम ‘६ अ’ ची घटनात्मक वैधता, सर्वोच्च न्यायालयानं आज चार एक अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार, हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता, असं निरीक्षण न्यायालयानं हा निर्णय देताना नोंदवलं. १९८५ मध्ये आसाम करारानंतर कलम ‘६ अ’ समाविष्ट करण्यात आलं होतं. २०१९ साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी साठी हे कलम आधारभूत मानलं गेलं होतं. कलम ‘६ अ’ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली, ज्याद्वारे १ जानेवारी १९६६ पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताचे नागरिक मानलं गेलं.
****
दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आज नाशिक ते दिल्ली ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. एक हजार ६०० मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली ही विशेष रेल्वे गाडी, येत्या २० ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून, त्यानंतर हा कांदा दिल्लीतल्या घा��क बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज ही माहिती दिली. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्स्प्रेस गाड्या रवाना होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका निशाणेबाजाला हरियाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सुखा असं आरोपीचं नाव असून, त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
गेल्या जून महिन्यात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देश तसंच राज्यांच्या विकासासाठी, जनहितासाठी अनेक निर्णय घेतले असून प्रवक्त्यांनी सरकारची कामं तसंच पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत, याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधलं.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, किंवा रोख रकमेचे वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय मिळाल्यास माहिती १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिरसाठ यांनी महापालिकेत १५ वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कसोटी क्रिकेट क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिला डावात अवघ्या ४६ धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरुच शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण ५ खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळं काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आजचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या तीन बाद १८० धावा झाल्या होत्या.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली.
****
धाराशिव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करून बायोमायनिंग प्रकारच्या प्रक्रियेला कार्यान्वित कण्याअच्या प्रकल्पात हा घोटाळा झाला होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी तसंच फौजदारी अपीलं उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे
****
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.
****
नागरिकत्व कायद्याचं कलम सहा ए संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. ��्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****
बिहारमधल्या सिवान आणि सारन जिल्ह्यात मद्य सेवनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सारनमध्ये आठ आणि सिवानमध्ये दहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलिस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘रणांगण विधानसभेचं’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरु झाला, मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद १३ धावा झाल्या आहेत.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून ३२० किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे.
****
0 notes