#मिळतो
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Health Benefits of Cinnamon: महिलांसाठी वरदान ठरते दालचिनी, ‘या’ आजारांमध्ये मिळतो आराम
Health Benefits of Cinnamon: महिलांसाठी वरदान ठरते दालचिनी, ‘या’ आजारांमध्ये मिळतो आराम
Health Benefits of Cinnamon: महिलांसाठी वरदान ठरते दालचिनी, ‘या’ आजारांमध्ये मिळतो आराम नवी दिल्ली – सध्याच्या धावपळीच्या युगात निरोगी राहणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. विशेषत: महिलांसाठी (woman health) हे आणखी कठीण काम होतं. हार्मोनल बदलांमुळे (hormonal changes) महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना प्रकृतीकडेही नीट लक्ष देता येत…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 3 months ago
Text
चित्रपटांविषयी
Tumblr media
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूं��ावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
Tumblr media
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून का��लेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो त���थे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
Tumblr media
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड ��रून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
Tumblr media
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
Tumblr media
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वय���द्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विवि�� भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
Tumblr media
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
Tumblr media
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
Tumblr media
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
Tumblr media Tumblr media
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
Tumblr media Tumblr media
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
Tumblr media Tumblr media
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
Tumblr media Tumblr media
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास ��ाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes · View notes
mukundhingne · 27 days ago
Text
"If you get a good neighbor, the joy of the home increases…!"
“चांगला शेजारी मिळाला तर वास्तूचा आनंद मिळतो…!” What makes a good neighbor? "Today, right at the beginning of my post, I would like to thank 'Prompt'. Instead of providing content that talks about the complexities of the world, I genuinely appreciate the simplicity and straightforwardness in suggesting topics that peek into everyone's daily lives!" It is often said that your life partner is…
Tumblr media
View On WordPress
0 notes
awfairtel · 28 days ago
Text
एयरटेल प्रीपेड मोबाईल सेवां सहनिर्बाध कनेक्टिव्हिटीचा आनंद घ्या
Tumblr media
हाय Tumblr कम्युनिटी!
एक अशी मोबाईल सेवा शोधत आहात जी लवचिकता, किफायतशीरता आणि अनेक छान फायदे प्रदान करते? चला चर्चा करूया एयरटेल प्रीपेडमोबाईल सेवांची!
काय आहे खास?
लवचिकप्लॅन्स: दैनिक डेटा गरजांपासून दीर्घकालीन वैधतेपर्यंत, तुमच्या जीवनशैलीनुसार प्लॅन निवडा.
किफायतशीरकिंमत: प्लॅन्स फक्त ₹19 पासून सुरू! होय, तुम्ही बरोबर वाचले.
अनलिमिटेडमजा: अनलिमिटेड कॉल्स आणि भरपूर डेटा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांशी जोडलेले राहू शकता.
तुम्ही चुकवू शकत नाही असे फायदे:
मनोरंजनाचाखजिना: निवडक प्लॅन्ससह एयरटेल एक्सस्ट्रीम, विन्कम्युझिक, आणि अगदी डिस्नी+ हॉटस्टार चे मोफत सबस्क्रिप्शन मिळवा.
5G रेडीसिम: एयरटेलच्या 5G सक्षम सिम्ससह भविष्याकडे पाऊल टाका. अल्ट्रा-फास्ट इंटरनेट स्पीडचा अनुभव घ्या!
रिवॉर्ड्सआणिअधिक: एयरटेल थँक्स अॅपसह रिवॉर्ड्स मिळवा, कॅशबॅक मिळवा, आणि विशेष डील्सचा लाभ घ्या.
हेशानदारप्लॅन्सपहा:
बजेटबडी - ₹149 प्लॅन
वैधता: 28 दिवस
फायदे: 2GB एकूण डेटा, अनलिमिटेड कॉल्स, 300 एसएमएस
बिंजवॉचर - ₹599 प्लॅन
वैधता: 84 दिवस
फायदे: 2GB/दिवस डेटा, अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस/दिवस, डिस्नी+ हॉटस्टारमोबाईल सबस्क्रिप्शन
संपूर्णवर्षाचासाथी - ₹2,999 प्लॅन
वैधता: 365 दिवस
फायदे: 2GB/दिवस डेटा, अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस/दिवस, एयरटेल एक्सस्ट्रीम अॅप प्रीमियम
एयरटेलकानिवडावे?
कारण जोडलेले राहणे न अवघड असावे आणि न महागडे. एयरटेल प्रीपेडसह, तुम्हाला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि एक असा नेटवर्क मिळतो जो तुमच्यासोबत आहे.
स्विचकरण्यासतयारआहात?
रिचार्ज करणे खूप सोपे आहे! फक्त एयरटेल थँक्स अॅपवर जा, आमच्या वेबसाइटला भेट द्या, किंवा जवळच्या एयरटेल स्टोअरला भेट द्या.
जोडलेले राहा, आनंदी राहा! 😊
0 notes
shrikrishna-jug · 1 month ago
Text
मिळतो समीप येण्याचा अवसर कधीकधी
मिळते जीवनात प्रेम कधीकधीमिळते दया प्रियतमाकडून कधीकधी लज्जित होऊन नको फिरवू मान नजरेच्या मुद्द्यावरयेते अशा वळणावर नशीब कधीकधी नाही उघडत रोज दरवाजे आनंदाचेयेतो प्रलय असा प्रियसख्या, कधीकधी ना तोडू शकते एकटेपण तारुण्याचे मार्गहोईल प्रस्तुत कुणाची जरुरी कधी कधी न जावो हरवून आपण फिरून दुनियेच्या गर्दीमध्येमिळतो समीप येण्याचा अवसर कधीकधी मिळते जीवनात प्रेम कधी कधीमिळते दया प्रियतमाकडून कधीकधी
0 notes
rohini-0306 · 1 month ago
Text
0 notes
atulgaikwad7038 · 1 month ago
Text
मनुष्य जन्म हा एकदाच भेटतो आणि तो भक्ती करण्यासाठी झाला असतो हे जाणून घेण्यासाठी ज्ञान गंगा हे पुस्तक अवश्य वाचा
0 notes
vinodpande04 · 1 month ago
Text
0 notes
weepingsuitgiver · 1 month ago
Text
0 notes
ganpatidas · 1 month ago
Text
आपल्याला मनुष्य जन्म का मिळतो ? | Sant Rampal Ji Marathi Satsang
youtube
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
AAP बनला राष्ट्रीय पक्ष, पाहा कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? मुंबई : आम आदमी पक्षाने (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ही माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष (National Party) बनवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला मिळालेल्या मत��ंच्या संख्येनुसार आप आता राष्ट्रीय पक्ष बनला…
View On WordPress
0 notes
arunpangarkar2 · 1 month ago
Text
आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
0 notes
thediscoveredwriter · 2 months ago
Text
अंधश्रद्धेचा अंधार, ज्ञानाचा प्रकाश
अंधश्रद्धा दूर करु, ज्ञानाचा प्रकाश देऊ, खोट्या गोष्टींना फसून, आयुष्य नाही व्यर्थ होऊ! काळी मांजरे दिसली, संकट येते म्हणतात, पण ज्ञानाच्या मार्गावर, मन हे खुलं ठेवतात! चपला उलटं पडल्या, दुर्भाग्य काही नाही, अंधश्रद्धेत बुडलात, तरच संकटं येत नाही! लिंबू-म���रची लटकवा, दारावर बांधा दोर��, खरं तर मेहनतीनं, मिळतो विजय चहुबाजूंनी! भितीच्या धाग्यांमध्ये, बांधू नकोस मन, ज्ञानाचा दीप लाव, मिळेल…
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Chinchwad :वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळतो - विश्वास साळुंखे
Chinchwad :वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळतो – विश्वास साळुंखे – MPC…
0 notes
mazhibatmi · 2 months ago
Text
Hyundai Aura CNG: Hyundai Motor कंपनी ही भारतातील एक आघाडीची दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी तिच्या नावीन्यपूर्ण, गुणवत्ता आणि वचनबद्धतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. या कंपनीच्या वाहनांना भारतात खूप पसंती दिली जाते. Hyundai ने अलीकडेच आपल्या Aura sedan कारचे CNG व्हेरियंट भारतात लाँच केले आहे. Hyundai Aura CNG असे या CNG व्हेरियंटचे नाव आहे. Aura ही भारतातील Hyundai ची अतिशय लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स, उत्तम डिझाइन आणि आधुनिक फीचर्सचा मिलाफ मिळतो. Hyundai Aura CNG भारतात इतकी खास का आहे ते जाणून घेऊयात...
0 notes
atulgaikwad7038 · 3 months ago
Text
संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग ऐकल्याने सर्व प्रकारचे व्यसने सुटतात आणि माणसाला चांगल्या प्रकारे जगण्याचा मार्ग मिळतो
0 notes