#महोत्सवादरम्यान
Explore tagged Tumblr posts
Text
‘तसा’ एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द
‘तसा’ एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द
‘तसा’ एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये कोकण महोत्सव (Kokanmahotsav) सुरु आहे. या महोत्सवादरम्यान संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासींना शब्द दिला आहे. “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही”, असं फडणवीस म्हणालेत. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,…
View On WordPress
#आजच्या प्रमुख घडामोडी#आणणार;#एकही#कोकण#कोकणात#तसा#देवेंद्र#नाही#प्रकल्प#फडणवीसांचा#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महोत्सवादरम्यान#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शब्द#शासन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आठ���्या भारतीय जल सप्ताहाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते नवी दिल्लीत उद्घाटन
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन सर्वत्र साजरा-मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता-ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकींना प्रारंभ
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं आठव्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण आपण आज करतो, असं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आज दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.
मराठवाड्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमीपूजन केलं. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक��टरांशी संवाद साधला.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली.
परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यातल्या पेडगांव इथं मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात सत्तार यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला –
राज्याचे शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अनेक अशा माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
****
नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्यशासन अनेक सामाजिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडं वाटचाल करत असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी क���ण्यात आला.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर आता सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला आहे.
पुण्यात मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागचा राजा आणि इतर सर्वच मोठ्या मंडळांच्या गणपती मिरवणुका विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गक्रमण करत आहेत. महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलावही तयार केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं आहे. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप दिला जात आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून अर्धा किलो सेंद्रीय खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे. नांदेड, जालना, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे.
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.
****
आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांची दिल्ली विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा क���ली होती, त्यानुसार त्यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून राजीनामा सादर केला.
****
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या आज दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.
****
हिंगोली जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुके अंतर्गत अपंगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत आज हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.
****
अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडं सादर करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड इथं आज स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीति सरकार यांनी गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामूहिक वृक्षारोपण करण्यात आलं.
****
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी उद्यापासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी परवा १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील गिद्दलूर आणि दिगऊमेटा दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/meri-mati-mera-desh-campaign-concludes-the-scent-of-soil-brought-from-every-village-of-the-country-filled-the-duty-path/
0 notes
Text
कणकवलीतील शासकीय ठेकेदार निखिल घेवारी यांना नारायण राणे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
कणकवलीतील शासकीय ठेकेदार निखिल घेवारी यांना नारायण राणे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
यांत्रिकीकरणा करिता 30 लाखांचे कर्ज मंजूर ठेकेदार निखिल घेवारी यांनी मानले राणेंचे आभार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचा आज कणकवली त शुभारंभ झाला. या महोत्सवादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा ठेकेदार निखिल घेवारी यांना यांत्रिकीकरण करिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याच्या माध्यमातून तब्बल 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात…
View On WordPress
0 notes
Photo
हम्पी महोत्सवादरम्यान काडलेकुलू येथील गणपती मंदिराचे काढलेले हे विहंगमय छायाचित्रं. . . . #HampiUtsav #AnnualFestival #Kadalekalu #GanapathiTemple #illuminated #Saturday #maharashtratoday https://www.instagram.com/p/Buf5K45BVRc/?utm_source=ig_tumblr_share&igshid=m3vcqb3mqou0
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ते आपल्या भाषणात म्हणाले...
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्री मंडलाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६घोषणा करण्यात आल्या या पैकी २९ हजार कोटीची कामे पुर्णत्वाकडे चालली आहेत उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत हे फक्त कागदावर ठेवलेल नाही तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
***
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, तसंच धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
***
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं चित्रकार दिलीप दारव्हेकर आणि कुटुंबियांनी कळमनुरी तालुक्यातल्या ५२ स्वातंत्र्य सैनिकांची रांगोळीतून भव्य चित्रकृती रेखाटली आहे.
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं आठव्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज शंभर दिवस पूर्ण झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून सुरक्षित भारत निर्माण करण्यास मदत केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. सरकारनं तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसांत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध विकासयोजनांना मंजूरी दिली आहे आणि काम सुरु केलं आहे, तसंच पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु केले आहेत, असं शहा यांनी सांगितलं.
***
दि���्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून मंत्री आतिषी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
***
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून अर्धा किलो सेंद्रीय खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.
नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जनासाठी प्रशासनानं तयारी केली आहे. तर, धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
***
पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची आगेकूच सुरु आहे. हंगेरीविरुद्ध भारताच्या पुरुष संघानं ३-१ असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली. तर, महिला संघानं अर्मेनियावर विजय मिळवला. बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला संघानं सलग सहा विजयांची नोंद केली आहे. स्पर्धेत अजून सात फेरींचा खेळ बाकी आहे.
***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** देशातील कोविडबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० पूर्णांक ७७ शतांश टक्के ** औरंगाबाद इथं सहा कोविडग्रस्तांचा मृत्यू; नवीन १०५ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या १७ हजार ७३७ ** नांदेड इथं रॅपीड चाचणीला उत्स्फुर्त प्रतिसाद; १२ व्यापाऱ्यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट आणि ** संपत्ती दानापेक्षाही प्राण वाचवणारं देहदान अवयवदान मोलाचं - अवयवदान चळवळीतील कार्यकर्ते डॉ. रवी वानखेडे **** देशात गेल्या चोवीस तासात ५६ हजार ३८३ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. एका दिवसात रुग्णाच्या संसर्गमुक्तीचा हा विक्रम आहे. यामुळे देशाचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७० पूर्णांक ७७ शतांश टक्के झालं आहे. तर या संसर्गामुळे होणारा मृत्यू दर एक पूर्णांक शहाण्णव शतांश टक्के झाला आहे. देशातल्या कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या आता २३ लाख २९ हजारावर गेली असून, आतापर्यंत १६ लाख ९५ हजाराहून अधिक रुग्ण या संसर्गातून बरे झाले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासात विक्रमी ७ लाख ३३ हजार कोरोना चाचण��या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या एका दिवसात केलेल्या चाचण्यांचा हा उच्चांक आहे. **** कोविड प्रादुर्भावाच्या उपचारासाठी लागणारी वैद्यकीय सामुग्री केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाते आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या प्रारंभीच्या काळात यापैकी बहुतांश साहित्य भारतात उत्पादित होत नव्हतं, मात्र आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ, विविध मंत्रालयं, आणि इतर संस्थांच्या सहयोगानं पीपीई कीट, एन ९५ मास्क, व्हँटिलेटर आदी साहित्याचं देशातच उत्पादन केलं जात आहे. **** अयोध्येतल्या नियोजित राम जन्मभूमी मंदीर तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. काल रात्री मथुरा इथं कृष्ण जन्माष्टमी महोत्सवादरम्यान, त्यांना श्वसनाचा त्रास तसंच ताप आल्यानंतर केलेल्या चाचणीतून ही बाब स्पष्ट झाली. **** औरंगाबाद मध्ये आज सहा कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातल्या आंबेडकर नगर इथल्या ७० वर्षीय, छावणीमधील शांतीपुरा इथल्या ६५ वर्षीय तसंच ८० वर्षीय पुरुष आणि नांदर इथल्या ८० वर्षीय, सिल्लोड मधील समतानगर इथल्या ७५ वर्षीय आणि पानवडोद इथल्या ५० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात १०५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये महापालिका हद्दीतल्या ६२ आणि ग्रामीण भागातल्या ४३ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ हजार ७३७ एवढी झाली आहे. त्यापैकी १२ हजार ९९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून सध्या चार हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं ५५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागातल्या चार लाख ४१ हजार ९४८ जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. **** कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी मुंबई महापालिकेकडून सेरो सर्वेक्षण केलं जातं आहे. आजपासून या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. २८ ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. **** धुळे शहरात सर्व दुकानं सकाळी नऊ ते सांयकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी संजय यादव यांनी परवानगी दिली आहे. पण सम विषम पध्दतीनेच दुकानं खुली ठेवावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी यादव यांनी केली आहे. **** नांदेड इथं महात्मा गांधी मार्गावरच्या कपडा व्यापाऱ्यांनी आज उत्स्फुर्तपणे कोरोना विषाणू संसर्ग रॅपीड चाचणी शिबीरात सहभाग नोंदवला. या केंद्रावर १९९ व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली, यापैकी १२ व्यापारी कोरोना विषाणू बाधीत आढळले. शहरात विविध ९ ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. **** संपत्ती दानापेक्षाही प्राण वाचवणारं देहदान अवयवदान मोलाचं आहे, असं प्रतिपादन अवयवदान चळवळीतील कार्यकर्ते डॉ. रवी वानखेडे यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं जागतिक अवयवदान दिनानिमित्त आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ते बोलत होते. नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्त�� मरणोत्तर दान केली तर अनेकांचे प्राण वाचवल्याचं पुण्य मिळेल, असं ते म्हणाले. अवयवदान चळवळीतील समन्वयक पुरुषोत्तम पवार यांचही यावेळी व्याख्यान झालं. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी यावेळी अवयव दानाचा संकल्प केला. **** पार्थ पवार हे राजकारणात नवखे असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यावर केलेल्या विधानासंदर्भात भुजबळ बोलत होते. पार्थ यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज नसल्याचंही भुजबळ यांनी नमूद केलं. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या लोकसभा मतदार संघातल्या कामांसंदर्भात ही भेट असल्याचं, सुळे यांनी पत्रकारांना सांगितलं. **** राजस्थानात अशोक गहलोत सरकारविरोधात भारतीय जनता पक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहे. राजस्थान विधानसभेचं अधिवेशन उद्या १४ तारखेपासून सुरू होत आहे, या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचं राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितलं आहे. दरम्यान उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री गहलोत यांनी आज संध्याकाळी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे बंडखोर नेते सचिन पायलट उपस्थित आहेत. पायलट गटाच्या दोन आमदारांचं निलंबनही काँग्रेस पक्षानं मागे घेतलं आहे. **** राज्यात विविध ठिकाणी पाऊस सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा साठ टक्के झाला आहे. परभणी जिल्ह्यात सकाळपासून रिमझीम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. उस्मानाबाद जिल्हा आणि प��िसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार चालू आहे. नांदेड शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात आज सकाळ पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या दोन दरवाजातून आज पहाटे तीन तास ९०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता पुरुषोत्तम कडवे यांनी दिली. **** सांगली जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरूवात झाली. राज्यभरात आजपासून अठरा तारखेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलना दरम्यान ५ लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत. **** कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. **** केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ‘कचरा मुक्त भारत अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये स्वच्छता संदेश रंगवणं, ग्रामस्तरावरील शासकीय, निमशासकीय इमारतींची साफसफाई करून दर्शनी भागावर स्वच्छता तसंच पाणी वापरा विषयक प्रबोधनात्मक घोषवाक्य रंगवणं आदी कामं करण्यात आली. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘कचरा मुक्त माझे गाव’ या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र १६ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
**** जम्मू काश्मीरमधल्या माछील सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** औरंगाबाद इथं आज सकाळी एका भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हे सर्वजण ४५ ते ६५ वर्ष वयोगटातले आहेत. जालना रस्त्यावर केंब्रीज शाळेजवळ सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या या जीपनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांना धडक दिली, त्यापैकी चार जण जागीच ठार झाले, एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक जण सुदैवानं बचावला. अपघातानंतर वाहनचालक जीप सोडून पसार झाल्याची माहिती सिडको एम आय डी सी पोलिस ठाण्यातून देण्यात आली. **** तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावं म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी, असे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. काल तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. भेसळयुक्त कुंकवाची विक्री, आणि घरगुती गॅस तसंच रॉकेलचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गमे यांनी यावेळी दिले. **** लातूर तालुक्यातल्या टाकळी, बोपला, चाटा आणि धानोरी शिवारात बंधाऱ्यांवर काल जलपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश कराड यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं. **** परभणी जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा अभियानाला काल सर्वत्र प्रारंभ झाला. शासकीय कार्यालयांसह नागरिकांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रमालाही जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रियदर्शनी इंदिरा गांधी मैदानावर खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत या महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हाभरात सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळून हा क्रीडा महोत्सव साजरा केला. ****
0 notes