Tumgik
#मनसे राज ठाकरे
mhlivenews · 1 year
Text
हे खरंय का? धादांत खोटं आहे! फडणवीसांचा ताजा व्हिडिओ दाखवत टोलवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोल दरवाढीला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाधव यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता टोलप्रश्नावरून राज ठाकरे आक्रमक झाले असून राज यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
पार्टी नेताओं का कहना है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने फिलहाल बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) के आगामी चुनावों में अकेले लड़ने का फैसला किया है। राज ठाकरे के नेतृत्व वाली पार्टी ने हालांकि भारतीय जनता पार्टी (भाजपा) और सीएम एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली बालासाहेब की शिवसेना के साथ गठजोड़ से पूरी तरह इनकार नहीं किया है। उन्होंने कहा, ‘अभी तक (गठबंधन पर) कुछ भी ठोस नहीं है। अभी के लिए, हम अपने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात
आणि
बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
सविस्तर बातम्या
स्वच्छ भारत, तसंच निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवलं. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दीष्ट साध्य करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्याहस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
****
विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी सुसज्ज असण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यम वर्ग, महिला आणि युवक अशा सर्व घटकांसाठी पंधरा लाख कोटी रुपये योजनांची सुरुवात केली आहे. सरकारनं देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी नवनवीन पावलं उचलली आहेत.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले…
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल पुण्यात 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा काल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत काल नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगान युनेस्कोचं पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात शंकरनगर इथलं एसबीआय बँकेचं एटीएम फोडून वीस लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली. एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील ग्रामसेवकाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामसेवक ईश्वर डफडे याने तक्रारदाराकडे नमुना आठ-असाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली होती. डफडे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी तीन महिन्यांचं व्यावसायीक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार  आहे. यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं,  शिरसाट यांनी सांगितलं.
****
राज्य महिला आयोगाकडून काल जळगाव इथं महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यात महिला तक्रारींच्या दाखल ९४ प्रकरणांवर तीन पॅनल कडून सुनावणीची कारवाई करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. लातूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा काल सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त काल जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत युवक, पुरुष, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदवलं आहे. समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.   
****
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
Video
youtube
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही शेंगदाण्याच्या दाण्यावर काढलेले चित्र भेट..
0 notes
Text
आता ठाकरे बंधूनी एकत्र यावे, जनतेची हीच इच्छा; राज ठाकरेंच्या बैठकीतच मनसे नेत्यांचा सूर
https://bharatlive.news/?p=109191 आता ठाकरे बंधूनी एकत्र यावे, जनतेची हीच इच्छा; राज ठाकरेंच्या बैठकीतच ...
0 notes
happyharmonypuppy · 2 years
Link
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीच राजकारण सुरू : राज ठाकरे 
सिंधुदुर्ग :   महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यावरून राजकारण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या जातीचं राजकारण सुरू आहे.  या जातीय राजकारणाचा जन्म 1999 साली एनसीपीच्या  जन्मापासून सुरू झाली असल्याची घणाघाती टीका राज ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेत केली.  मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्या नंतर राज ठाकरे माध्यमांशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
जांच करने की जरूरत है कि क्या मुख्य समाचार से ध्यान हटाने के लिए जानबूझकर महा-कर्नाटक सीमा मुद्दा उठाया गया है: राज ठाकरे
जांच करने की जरूरत है कि क्या मुख्य समाचार से ध्यान हटाने के लिए जानबूझकर महा-कर्नाटक सीमा मुद्दा उठाया गया है: राज ठाकरे
आखरी अपडेट: 29 नवंबर, 2022, 23:42 IST सीमा विवाद महाराष्ट्र के बेलगावी के दावे से संबंधित है जो तत्कालीन बॉम्बे प्रेसीडेंसी का हिस्सा था क्योंकि इसमें मराठी भाषी आबादी का एक बड़ा हिस्सा है। भाषाई आधार पर राज्यों के पुनर्गठन के बाद सीमा विवाद 1960 के दशक का है महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) के प्रमुख राज ठाकरे ने मंगलवार को आश्चर्य जताया कि क्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद जैसे मुद्दों को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लास मधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगर पालिकेला नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली.
****
राज्यसभेत आज शून्य काळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्त्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समिक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातली लोकसंख्याशास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून, यामुळे लोकशाही, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला.
****
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात काल एकाच दिवशी १३ पोलिसांसह ९१ जणांचा मृत्यू झाला. राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांमध्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९७१ च्या युध्दातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्‍ताव आरक्षण-विरोधकांनी फेटाळून लावला असून, त्यांनी राजीनामा द्यावा, ही एककलमी मागणी केली आहे.
दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत.
****
सुरक्षेच्या कारणावरुन अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवती नगर तळापासून यात्रेकरुंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली  आर. एस. पुरा इथं एक�� भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणार्यांना माध्यमांनी स्थान देवू नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. तर महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरन पहलचा सामना होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
दरम्यान, टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं प्रथमच ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यानं कार्लोस अल्काराझचा सात - सहा, सात - सहा असा केला पराभव. १९८८ नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरु असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशामन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदी काठच्या रहिवाशांना देखील सुरक्षीत स्थळी हलवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरम्यान, निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी पाच हजार सातशे पन्नास घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आलं.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
'तुमच्या पक्षाचं नाव बदलून...'; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका
Tumblr media
मुंबई | गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय. टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारेंनी दिलाय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल की बोलाचीच कढी आणि ��ोलाचाच भात, असंही त्या म्हणालेत. राज ठाकरेंनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलीये. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
newslobster · 2 years
Text
VIDEO: मराठी गाने नहीं बजाने पर राज ठाकरे की पार्टी के नेताओं ने होटल स्टाफ को पीटा
VIDEO: मराठी गाने नहीं बजाने पर राज ठाकरे की पार्टी के नेताओं ने होटल स्टाफ को पीटा
मुंबई: मुंबई के पास वाशी में एक होटल के कर्मचारियों को राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) के कार्यकर्ताओं ने मराठी गाने नहीं बजाने के कारण जमकर पिटाई कर दी. जानकारी के अनुसार मराठी गानों को लेकर कुछ लोगों और होटल स्टाफ के बीच बुधवार शाम कहासुनी हो गई.  मनसे कार्यकर्ता भी इसमें शामिल हो गए. स्टाफ के सदस्यों और प्रबंधक ने उन्हें स्थिति समझाने की कोशिश की, लेकिन मामला बढ़ गया इस बीच…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटकपदी अमोल जंगले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटकपदी अमोल जंगले
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटकपदी स्थापत्य अभियंता अमोल जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या आदेशांनुसार रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष योगेश परूळेकर, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष अमित शिंदे यांचेकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mumbai-live-news · 2 years
Link
Akshay kumar will play the role of shivaji in mahesh manjrekar's marathi film vedat marathe veer daudale saat | मांजरेकरांच्या चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत
0 notes