Tumgik
#भेटण्यासाठी
nashikfast · 6 months
Text
नाशकात महायुतीचा उमेदवार प्रतिक्षेत?
मुख्यमंत्र्यांना इतर तीन ठिकाणी उमेदवार बदलावले तसे नाशिकलाही होणार का? नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मुंबईला भेटण्यासाठी अचानक बोलावून घेतल्यानंतर त्यापाठोपाठ खासदार हेमंत गोडसे यांनीही मुंबई गाठली. या सर्व घडामोडींमुळे शिंदे सेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. नाशिकच्या जागेचा अद्यापही निर्णय होत नाही, त्याउलट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Chinese girl Goes to Pak for Lover : चिनी महिला प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली
https://bharatlive.news/?p=114036 Chinese girl Goes to Pak for Lover : चिनी महिला प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंजाबमध्ये भटिंडा इथल्या सैन्य छावणीत आज पहाटे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र हा गोळीबार नेमका कुणी केला, याबाबत काहीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेनंतर सैन्याने या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे.
***
जयपूर ते दिल्ली या राजस्थान मधील पहिल्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. या प्रवासासाठी पाच तास १५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. शताब्दी एक्सप्रेसला हे अंतर पार करण्यासाठी सव्वा सहा तास लागतात. 
***
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर इथल्या चिंचोली गावात शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचं, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण करणार आहेत. या संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील एक हजार आठ ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा जतन करण्यात आला आहे. या परिसरात वैशिष्टयपूर्ण वास्तुकलेतून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांसाठी निवासस्थानं आदी आठ इमारती उभारण्यात आल्या आहेत.
***
जी ट्वेंटी अंतर्गत डब्ल्यू ट्वेंटी गटाची बैठक उद्यापासून जयपूर इथं सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या या बैठकीत जी ट्वेंटी संघटनेतील १८ देशांच्या १२० महिला प्रतिनिधी सहभागी होतील. स्त्री - पुरुष असमानतेशी निगडीत मुद्द्यांसह वैश्विक पातळीवर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर या बैठकीत मंथन होईल.
‘लोकसहभाग - महिला सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास’ या विषयावरील चर्चेनं आज या कार्यक्रमाची सुरुवात होईल. “महिलांचं आर्थिक सक्षमीकरण”, “तळागाळातील महिलांचं नेतृत्व” आणि “उद्योजकता आणि भविष्यासाठी उद्दिष्टांची निश्चिती” या विषयांवर चर्चा होईल. डब्ल्यू ट्वेंटी गटाची पहिली बैठक फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर इथं झाली होती.
***
देशात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा कोविड संसर्गाने मृत्यू झाला, तर कोविड संसर्गाचे नवे सात हजार ८३० नवे रुग्ण आढळले. देशभरातल्या कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या ४० हजार २१५ झाली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २२० कोटी ६६ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
***
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये कालच्या बैठकीत आघाडीची भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलं. काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
***
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समतापर्व अभियान समितीच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात तालूकास्तवरावर जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शनपर शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० एप्रिल पर्यंत हे शिबीर राबवलं जाणार असून या अंतर्गत उद्या नांदेड इथं यशवंतराव महाविद्यालयात आणि कंधारच्या महात्मा फुले महाविद्यालयात एकदिवसीय शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. याचा लाभ घेण्याचं आवाहन समतापर्व अभियान समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले यांनी केलं आहे
***
महाराजस्व अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथं उद्या समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पंचायतराज प्रशिक्षण केंद्रात सकाळी नऊ ते बारा या वेळात होणाऱ्या या शिबिरात नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेत, त्या सोडवण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. या समाधान शिबिराला मुरुड महसूल मंडळातल्या नागरिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन लातूरच्या तहसीलदारांनी केलं आहे.
***
मराठवाड्यात उद्यापासून ते १५ एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. त्यानुसार उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात, चौदा तारखेला जालना वगळता इतर सगळ्या जिल्ह्यात आणि पंधरा तारखेला नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
//**********//
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
देवरी तहसीलदारच्या कक्षात हुडदंग घालून रेतीमाफिया पसार
गोंदिया, दि.19 : जिल्ह्यातील देवरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार इंगोले यांच्या कक्षात शिरून एका रेतीमाफियाने जप्त केलेल्या वाहनावरुन वाद घालण्यास सुरवात केली. तसेच या वादादरम्यान हुडदंग घालून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. या दरम्यान त्या कक्षात तहसीलदार इंगोले यांना भेटण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये हे सुध्दा तिथे हजर होते. दरम्यान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
विहिरीत बुडताना दोरीने बाहेर काढून अखेर लग्न लावले
विहिरीत बुडताना दोरीने बाहेर काढून अखेर लग्न लावले
देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून बिहारमधील छपरा इथे एक प्रियकर हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी गेला होता मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना एकत्रितरित्या पाहिले आणि त्यानंतर त्याने मारहाण होण्याच्या भीतीने चक्क विहिरीत उडी घेतली. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला दोरी टाकून बाहेर काढले आणि त्यानंतर त्यांचे लग्न लावून देण्यात आले. शुक्रवारी रात्री हा तरुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच - पालकमंत्री संजय राठोड
रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्र्यांचा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद  मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात तिनशे रुग्ग्णांची शस्त्रक्रिया यवतमाळ दि, ३० नोव्हेंबर, जिमाका:-  अनेक प्रतिष्ठित व्यक्ती  पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडुन उपचार करुन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे असतात.  त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून  आपल्या जिल्ह्यातिल नागरिकांच्या डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच - पालकमंत्री संजय राठोड
रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्र्यांचा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद  मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात तिनशे रुग्ग्णांची शस्त्रक्रिया यवतमाळ दि, ३० नोव्हेंबर, जिमाका:-  अनेक प्रतिष्ठित व्यक्ती  पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडुन उपचार करुन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे असतात.  त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून  आपल्या जिल्ह्यातिल नागरिकांच्या डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
‘या’ कृतीने राहुल गांधींनी जिंकलं सर्वांचं मन, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Tumblr media
नांदेड | केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची ((Rahul Gandhi) )भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीये. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यात्रा नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यांमधून जाणार आहे. राहुल गांधी यांची यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. यात्रेत त्यांना असंख्य नागरिक भेटायला येत आहेत. यात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण आहेत. यात नांदेडचा चिमुकला सर्वेश हाटणे देखील राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता. सर्वेशदेखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. भविष्यात तुला काय बनायचंय, हे विचारलं. त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय, असं सांगितलं. राहुल गांधींनी त्याला कंप्यूटर येतं का?, असं विचारलं असता, त्याने नाही असं उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी संवेदनशीलता दाखवत आज त्याला कंप्यूटर भेट म्हणून दिलं. राहुल गांधींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. Congress President Shri @Kharge, in the presence of Shri @RahulGandhi handed over a PC to Sarvesh Hatne, a young tech enthusiast & Padyatri. A little gesture from our end to help him discover more.#BharatJodoYatra pic.twitter.com/5mS78HRp7p — All India Mahila Congress (@MahilaCongress) November 11, 2022 Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ' त्याची माहिती काढ ' , त्यानंतर मात्र..
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ‘ त्याची माहिती काढ ‘ , त्यानंतर मात्र..
लग्न जुळणार्‍या एका संकेतस्थळावर महिलेला फसवणुकीचा अनुभव आलेला असून पुणे येथील एका भामट्या व्यक्तीने या महिलेची फसवणूक केलेली आहे . पीडित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून आरोपी हा पुण्याचा असल्याचे समजते. पीडित महिला ही डॉक्टर असून एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर तिची आरोपीसोबत ओळख झालेली होती. आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गुंगी येणारे शीतपेये पाजले आणि तिचे काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
नव्या घंटागाडी संदर्भात मनपा आयुक्तांना दिनकर पाटील यांचे साकडे
नव्या घंटागाडी संदर्भात मनपा आयुक्तांना दिनकर पाटील यांचे साकडे
सातपूर : नवीन घंटागाड्या महिलांना त्रासदायक ठरत आहे. तसेच घंटागाडी ठेकेदार हा महापालिकेच्या टेंडर मध्ये प्रसिद्ध केलेल्या अटी शर्तीचा भंग करुनही घनकचरा विभागाचे प्रमुख आवेश पलोड हे केवळ भ्रष्टाचारामुळे ठेकेदाराला पाठीशी घालत आहे.असा आरोप माजी सभागृह नेते दिनकर पाटील व माजी नगरसेविका प्रियंका मानेसह शिष्टमंडळाने केला असुन काल पलोड यांना यासंदर्भात भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला उडवाउडवीची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नाशिक : बाळाला भेटण्यासाठी आईचे धाडस, तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरण्याचे केले धाडस
https://bharatlive.news/?p=102791 नाशिक : बाळाला भेटण्यासाठी आईचे धाडस, तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर ...
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 March 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सामान्य नागरीकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवण्याची सर्व मंत्री तसंच अधिकाऱ्यांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाची सूचना
कायम खाते क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांना जजोडण्याच्या मुदतीत तीस जूनपर्यंत वाढ
मानहानीच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
आचारसंहितेचा भंग करण्याच्या कारणावरून विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित
केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ
आणि
लातूरचा सोनबा लवटे एकशे दहा किलो वजनी गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’
सविस्तर बातम्या
सामान्य नागरीकांना भेटण्याची वेळ राखून ठेवण्याची सूचना राज्य शासनाच्या समान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्री आणि अधिकार्यांना केली आहे. आपल्या कामाची दाद मागण्यासाठी मंत्रालयात आलेल्या तीन जणांनी सोमवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं. सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात सामान्य नागरीकांना भेटण्याच्या वेळेसंदर्भात आपापल्या दालनाबाहेर एका फलकावर लिहावं, मंत्रालयीन अधिकार्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी तीन ते चार ही वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी, या कालावधीत विभागाच्या बैठका घेऊ नये, विभागीय पातळीवर शासकीय कार्यालयातल्या अधिकार्यांनी जनतेसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करुन वेळ राखून ठेवावी आणि लोकांच्या भेटीवर परि��ाम होणार नाही अशा पद्धतीने दोरे आयोजित करावे, अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं कायम खाते क्रमांक -पॅन आणि आधार क्रमांक जोडण्याची मुदत या वर्षीच्या तीस जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत येत्या एकतीस मार्चला संपत होती. या वर्षीच्या तीस जूनपर्यंत पॅन आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्या करदात्यांचे पॅन क्रमांक निष्क्रीय केले जाणार असून, अशा पॅनवर कोणताही कर परतावा दिला जाणार नाही. निष्क्रीय झालेलं पॅन कार्ड तीस दिवसात एक हजार रुपये शुल्क भरून सक्रीय करता येईल, असं मंडळानं सांगितलं आहे.
****
अदानी समुहातल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीसाठी, तसंच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधासाठी, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे, संसदेचं कामकाज काल सलग अकराव्या दिवशी बाधित झालं. सकाळी लोकसभेत तालिका अध्यक्ष मिथुन रेड्डी यांनी कामकाज पुकारताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली, तसंच अध्यक्षांकडे कागद भिरकावले. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही याच मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाजाला सुरवात केली. वित्त विधेयकात राज्यसभेनं सुचवलेली सुधारणा लोकसभेनं मान्य करून, तिचा वित्त विधेयकात समावेश केल्याची माहिती, राज्यसभा सचिवांनी दिली. महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन, लवलीना बोर्गोहेन, नितू घंसास आणि सविती बुरा, या खेळाडूंनी सुवर्ण पदकं जिंकल्याबद्दल राज्यसभेनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. उपसभापतींनी येत्या एकतीस तारखेला राज्यसभेचं काम होणार नसल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
दिल्ली उच्च न्यायालयानं मानहानीच्या एका प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना काल न्यायालयात पुढच्या सुनावणीस हजर राहण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार कोटी रुपये देऊन निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं चिन्ह विकत घेतल्याचा आरोप या तिघांनी त्यांच्या वक्तव्यांमधून केला होता. यानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी मानहानीची तक्रार केली होती, ती न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. राऊत आणि ठाकरे पितापुत्रांनी केलेली मानहानीकारक वक्तव्यं अजूनही मंचावर ठेवणाऱ्या समाज माध्यमांनाही न्यायालयानं नोटीस बजावली असून, ही वक्तव्यं अजूनपर्यंत हटवली का नाहीत, याचा खुलासा विचारला आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या सतरा एप्रिलला होणार असून, न्यायालयानं ठाकरे पितापुत्र आणि खासदार राऊत यांना, त्यावेळी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिले आहेत.
****
वकील आचारसंहितेचा भंग करण्याच्या कारणावरून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली आहे. एसटी कर्मचारी आंदोलनात वकिलांचा गणवेश परिधान करून सहभाग घेणं, आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेणं, हे वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत, बार कौन्सिलनं सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती.
****
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात काढण्यात येणाऱ्या सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात येईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या तीस तारखेपासून सुरू होणारी ही यात्रा सहा एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यभरात फिरणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागावी, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले...
Byte…
राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागितली पाहिजे. कसलाही इतिहास माहिती नाही. कसलाही इतिहास वाचलेला नाही. असं असतांना अशा पद्‌धतीची वक्तव्य करणं हे पूर्ण भारत देशाचा अपमान करण्यासारखं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अयोग्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचं पत्र, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिलं आहे. सव्वीस मार्चला झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिरसाट यांनी अशी टीका केल्याचं, समाज माध्यमांमधून समोर आल्यानंतर दानवे यांनी हे पत्र दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
नेरुळ इथल्या डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी लिट पदवी प्रदान केली. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या सोहळ्यात लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांनाही राज्यपालांच्या हस्ते डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.
****
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल मुंबईत, जी-20 सदस्य देशांमध्ये व्यापार आणि वित्तीय सहकार्य, या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आली. केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी आपल्या बीजभाषणात, व्यापार आणि वित्तीय क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या तसंच संभाव्य उपाय यावर चर्चा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मत व्यक्त केलं. रचनात्मक संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि जगभरातले शैक्षणिक तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. विकासातली व्यापाराची मोठी भूमिका आणि त्यासाठी एकात्मिक व्यापारी वित्तपुरवठा, या मुद्द्यांवर यावेळी सदस्यांनी सहमती दर्शवली. येत्या काही वर्षात कागदविरहीत आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्या देशांनी आवश्यक ते कायदे करावेत, असं मतही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केलं.
****
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याजाच्या दरात वाढ करत, तो आठ पूर्णांक एक वरून, आठ पूर्णांक १५ शतांश टक्के करण्याची शिफारस केली आहे. अर्थ मंत्रालयानं या शिफारशीला मंजुरी दिल्यानंतर वाढलेला व्याज दर सरकारी राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल, आणि त्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, या वाढलेल्या व्याजाचा लाभ सदस्यांच्या खात्यांमध्ये जमा करेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरचा हा आतापर्यंतचा सर्वात जास्त व्याज दर आहे.
****
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला नागपूर पोलिसांनी बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून काल ताब्यात घेतलं. पुजारी यानं गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन वेळा फोन करुन दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. त्याने यापूर्वी १४ जानेवारी रोजी तीन फोन करुन, डी गँगचा सदस्य असल्याचं सांगत १०० कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात नागपूर इथं जीवे मारण्याची धमकी तसंच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
आष्टी - अहमदनगर या मार्गावर सुरू झालेली डेमू रेल्वे गाडी पुण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव सल्लागार समितीत मांडणार असल्याचं, अखिल प्रवासी सेवा सुविधा समितीचे सदस्य खासदार डॉ राजेंद्र फडके यांनी सांगितलं आहे. या समितीने काल सोलापूर रेल्वे विभागांतर्गत अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. रेल्वे स्थानकावरील उपाहारगृह, प्रवाशांची बैठक व्यवस्था, पेयजल सुविधा आदीची पाहणी करत या समितीनं नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातलं सशुल्क दर्शन बंद करण्याचा आदेश, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागानं, या मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. कायद्यानुसार अशा संरक्षित स्मारकांमध्ये पैसे न घेण्याचा नियम असल्यामुळे हा आदेश दिल्याचं पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं स्पष्ट केलं आहे. या मंदिर परिसरात असलेल्या दानपेट्या तत्काळ काढून टाकण्याचा आदेशही यात देण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना यावर्षीचा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक, हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा हा पुरस्कार  येत्या दोन एप्रिलला सोलापूर इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात एक एप्रिलपासून सर्व कार्यालय आणि विभागांनी झीरो पेंडेंसीचा अवलंब करून प्रलंबित असलेली सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. धाराशिव इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  सूरत -चेन्नई प्रकल्पाबाबत आढावा घेताना सावंत यांनी, भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगासाठी शिबीर घेऊन त्यांना उपचारासोबत दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्रही देण्याचं नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या विकासासाठी असलेला निधी योग्य पद्धतीत खर्च करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सूचित केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, वैजापूर आणि लासुर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत २१ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं ही माहिती दिली. सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन दिवसात ६२२ अर्ज विक्री झाले.
****
कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये लातूरच्या सोनबा लवटे यानं एकशे दहा किलो वजनी गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला आहे. त्यानं लातूर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलं होतं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी लवटे याचं अभिनंदन केलं असून, त्याला भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि प्राध्यापक ठाकरे गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा देशपातळीवरील दुसरा गणितरत्न पुरस्कार कोलकाता इथल्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापक नीना गुप्ता यांना काल प्रदान करण्यात आला. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी हा पुरस्कार प्रदान केला. गुप्ता यांनी मागील सात दशकांपासून अनुत्तरीत असलेला 'झरिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम' पूर्णतः सोडवण्यात यश मिळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सोयगाव तालुका दुर्गम असला तरी याठिकाणी जनसुविधा आणि विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे. सोयगाव इथं काल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर, शेततळं आणि गरज तिथं पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन भुमरे यांनी यावेळी केलं. सोयगाव तालुक्यासाठी सिंचन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
****
महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत वीजबिलात तीस टक्के माफीची मुदत येत्या एकतीस तारखेला संपत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपांचं वीजबिल भरून टाकावं, असं आवाहन महावितरणनं क���लं आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज आणि विलंब आकारात माफी, तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सूट देण्यात आली असून, शेतकऱ्यांना सुधारीत थकबाकीच्या केवळ सत्तर टक्के रक्कम आणि सप्टेंबर २०२० पासूनचं चालू बिल भरायचं आहे. या सवलतीचा लाभ घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त व्हावं, असं महावितरणनं म्हटलं आहे.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ' त्याची माहिती काढ ' , त्यानंतर मात्र..
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ‘ त्याची माहिती काढ ‘ , त्यानंतर मात्र..
लग्न जुळणार्‍या एका संकेतस्थळावर महिलेला फसवणुकीचा अनुभव आलेला असून पुणे येथील एका भामट्या व्यक्तीने या महिलेची फसवणूक केलेली आहे . पीडित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून आरोपी हा पुण्याचा असल्याचे समजते. पीडित महिला ही डॉक्टर असून एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर तिची आरोपीसोबत ओळख झालेली होती. आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गुंगी येणारे शीतपेये पाजले आणि तिचे काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ' त्याची माहिती काढ ' , त्यानंतर मात्र..
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ‘ त्याची माहिती काढ ‘ , त्यानंतर मात्र..
लग्न जुळणार्‍या एका संकेतस्थळावर महिलेला फसवणुकीचा अनुभव आलेला असून पुणे येथील एका भामट्या व्यक्तीने या महिलेची फसवणूक केलेली आहे . पीडित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून आरोपी हा पुण्याचा असल्याचे समजते. पीडित महिला ही डॉक्टर असून एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर तिची आरोपीसोबत ओळख झालेली होती. आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गुंगी येणारे शीतपेये पाजले आणि तिचे काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ' त्याची माहिती काढ ' , त्यानंतर मात्र..
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ‘ त्याची माहिती काढ ‘ , त्यानंतर मात्र..
लग्न जुळणार्‍या एका संकेतस्थळावर महिलेला फसवणुकीचा अनुभव आलेला असून पुणे येथील एका भामट्या व्यक्तीने या महिलेची फसवणूक केलेली आहे . पीडित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून आरोपी हा पुण्याचा असल्याचे समजते. पीडित महिला ही डॉक्टर असून एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर तिची आरोपीसोबत ओळख झालेली होती. आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गुंगी येणारे शीतपेये पाजले आणि तिचे काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ' त्याची माहिती काढ ' , त्यानंतर मात्र..
कल्याणच्या महिला डॉक्टरने भावाला सांगितले ‘ त्याची माहिती काढ ‘ , त्यानंतर मात्र..
लग्न जुळणार्‍या एका संकेतस्थळावर महिलेला फसवणुकीचा अनुभव आलेला असून पुणे येथील एका भामट्या व्यक्तीने या महिलेची फसवणूक केलेली आहे . पीडित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून आरोपी हा पुण्याचा असल्याचे समजते. पीडित महिला ही डॉक्टर असून एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर तिची आरोपीसोबत ओळख झालेली होती. आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर तिला गुंगी येणारे शीतपेये पाजले आणि तिचे काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes