#भाजप�� विरोध
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 24 days ago
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..’ त्या ‘ संघटनांची नावे जाहीर करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..’ त्या ‘ संघटनांची नावे जाहीर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना विरोध केला की तुकडे तुकडे गॅंग , अर्बन नक्षल अशी विशेषणे जोडून मूळ विषय भरकटवला जातो. असाच प्रकार सध्या देशात सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत 40 नक्षली संघटना सहभागी झाल्याचे म्हटलेले होते त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 40 नक्षली संघटनांची नावे द्या असे खुले आव्हान दिलेले आहे.  नाना पटोले…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज १०५ नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ
नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत एकाही मताचा फरक नसल्याचं स्पष्ट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमांची सुरुवात
आणि
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना, तसंच महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या पदावर नार्वेकर यांची बिनविरोध निवड होत आहे. सभागृहात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र, अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यानं नार्वेकर यांची निवड बिनविरोध होत आहे.
****
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०५ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल पहिल्या दिवशी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत शपथग्रहण समारंभावर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला. शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज शपथ घेतलेल्यांमध्ये नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप सोपल, मंगलप्रभात लोढा, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, अमित देशमुख, अस्लम शेख, तानाजी सावंत, आदित्य ठाकरे यांचाही सहभाग होता. अजुनही विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके या आठ सदस्यांचा शपथविधी शिल्लक आहे.
****
दरम्यान, सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, विजय ��ेशमुख, बालाजी किणीकर हे सदस्य या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ईव्हीएमवर शंका घेणं हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
****
मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्‍यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले.
****
मारकडवाडी इथं ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला असण्याची शक्यता असू शकेल, मात्र, एखादं मशीन बिघडलं म्हणजे सर्वच ईव्हीएम खराब आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. ग्रामस्थांना काही शंका असतील तर निवडणूक आयोगाने त्याचा तपास करून शंका निरसन केलं पाहिजे, असं आठवले म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे करण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या पंचेचाळीस अशा एकूण पंच्याहत्तर मतदान केंद्रावरील मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. लॉटरी पद्धतीनुसार या निवडक केंद्रांची सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून निवड करण्यात आली होती. तर मतमोजणीची ही पडताळणी प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली गेली.
आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहून अनुराग पोवळे
****
सीमा सुरक्षादल गेली सहा दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि एमआय १७ देखील सहभागी झाली आहेत. यासोबतच श्वानपथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून, या कार्यक्रमात सात सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात आज करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वर्धापन दिनानिमित्त उद्यापासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, क्रिडा स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियानं हा सामना दहा गडी राखून जिंकला असून, पाच सामन्यांच्या मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधली आहे.
आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव केवळ १७५ धावांतच आटोपला. नितीश रेड्डी यानं सर्वाधिक ४२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्यासमोर विजयासाठी केवळ १९ धावांचं आव्हान उरलं. ते ऑस्ट्रेलियानं एकही गडी न गमावता पूर्ण केलं. मालिकेतला तिसरा सामना येत्या १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं खेळला जाणार आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये देखील ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं ५० षटकात आठ बाद ३७१ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४४ षटकं आणि पाच चेंडूंमध्ये २४९ धावा करून माघारी परतला. मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या ११ डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. राधेशाम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती, स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. यासह इतर साहित्य पुरस्कारांचं वितरण येत्या २२ तारखेला तरवडी इथं होणार आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या हस्ते भवानी मातेची महापूजा करण्यात आली. ध्वजस्तंभाचं पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचं रोहण करण्यात आलं. आरतीनंतर मा��ाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
****
कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून तामिळनाडू इथल्या एका इसमाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. निरंजन कुलकर्णी असं या आरोपीचं नाव असून, त्याने तामिळनाडू इथल्या नरसिम्हा रेड्डी या व्यक्तीला आपल्या राजकीय ओळखी सांगून, कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यासाठी १५ कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यातले पाच कोटी आठ लाख रुपये देखील घेतले होते. न्यायालयाने या आरोपीला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
देवेगौडा यांच्या भाजप युतीला महाराष्ट्रातून विरोध
https://bharatlive.news/?p=154868 देवेगौडा यांच्या भाजप युतीला महाराष्ट्रातून विरोध
पुणे : पुढारी ...
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
'नंगटपणा करणाऱ्या या बाईला बेड्या ठोका', चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या
Tumblr media Tumblr media
मुंबई| कपड्यांच्या विचित्र फॅशनमुळं उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच चर्चेत येत असते. उर्फीला बऱ्याचदा ट्रोलही केलं गेलं आहे. परंतु तरीही उर्फी कोणाचाही विचार न करता कपड्यांची फॅशन करण्यात मग्न असते. आता या सगळ्यात भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही उर्फीला टार्गेट केलं आहे. त्यामुळं उर्फी आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. सध्या या दोघींच्या वादावर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर एक ट्विट केलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, शी, हे चाललंय काय, रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोसिल आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्माप महिला विकृतांच्या शिकार होत आहेत. त्यात ही बया अजून विकृती पसरवत आहे.असंही चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्विटला उर्फी जावेदनं कडक शब्दांत प्रत्तुतर दिलं आहे. या वादावर काही नेटकरी उर्फीची बाजू घेत आहेत तर काहीजण मात्र तिला विरोध दर्शवित आहेत. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
उत्तराखंड येथील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पुलकित आर्य याचे वडील आणि भाजपचा नेता विनोद आर्य यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारहाण देखील केली अशी तक्रार एका वाहन चालकाने त्यांच्या विरोधात केलेली आहे. आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता आपल्याला विनोद आर्य याने जीवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
उत्तराखंड येथील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पुलकित आर्य याचे वडील आणि भाजपचा नेता विनोद आर्य यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारहाण देखील केली अशी तक्रार एका वाहन चालकाने त्यांच्या विरोधात केलेली आहे. आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता आपल्याला विनोद आर्य याने जीवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
उत्तराखंड येथील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पुलकित आर्य याचे वडील आणि भाजपचा नेता विनोद आर्य यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारहाण देखील केली अशी तक्रार एका वाहन चालकाने त्यांच्या विरोधात केलेली आहे. आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता आपल्याला विनोद आर्य याने जीवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
उत्तराखंड येथील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पुलकित आर्य याचे वडील आणि भाजपचा नेता विनोद आर्य यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारहाण देखील केली अशी तक्रार एका वाहन चालकाने त्यांच्या विरोधात केलेली आहे. आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता आपल्याला विनोद आर्य याने जीवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
आरएसएसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही कधी भाग घेतला नव्हता , काँग्रेसने इतिहासच काढला सोबतच..
आरएसएसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही कधी भाग घेतला नव्हता , काँग्रेसने इतिहासच काढला सोबतच..
भाजप सत्तेत आल्यानंतर तुकडे तुकडे गॅंग वगैरे अर्बन नक्षल वगैरे शब्द माध्यमात देखील चर्चिले जाऊ लागले. विशेषत: भाजपला विरोध करणाऱ्या व्यक्तींबद्दल हे शब्द वापर��े जातात. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांच्यावर निराधार आरोप करून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा केविलवाला प्रयत्न करणारे भाजप आणि आरएसएस हेच देशातील टुकडे टुकडे यांचे सदस्य आहेत , असे काँग्रेसने म्हटलेले आहे.  काँग्रेसच्या…
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.11.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
संरक्षण संशोधन आणि ��िकास संस्था -डीआरडीओनं काल मध्यरात्रीनंतर ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्थानकातून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण-चाचणीला ऐतिहासिक यश म्हटलं असून या कामगिरीमुळं भारताचा प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात समावेश झाला आहे.
****
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२४ च्या आंतरराष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे.  “जोधा अकबर”, “लगान” आणि “स्वदेश सारख्या चित्रपटांची निर्मिती गोवारीकर यांनी केली आहे.  येत्या २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं हा चित्रपट महोत्सव होणार आहे. या निवडीबद्दल गोवारीकर यांनी आनंद व्यक्त केला असून सातत्यानं विकसित होत असलेले चित्रपट पाहण्यासाठी हा महोत्सव म्हणजे उत्तम व्यासपीठ असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांच्या आज सभा होत आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांदवड इथं आज दुपारी तर सायंकाळी सहा वाजता नाशिकमध्ये सभा होणार आहे. शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आज मालेगाव इथं दुपारी सभा होत आहे.
काल रात्री मालेगाव इथं एमआयएम पक्षाचे नेते असुदोद्दीन ओवैसी यांची सभा झाली. पक्षाचे उमेदवार मौलाना मुफ्ती यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी केंद्र सरकार वक्फ बोर्ड कायद्याच्या माध्यमातून वक्क्फ बोर्डाकडे असलेली संपत्ती ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची काल येवला इथं सभा झाली, या
सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पराभूत करण्याचं आवाहन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल कदम यांच्या समर्थनार्थ पक्षाचे नेते संजय राऊत यांची  निफाड तालुक्यात तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ��ाज ठाकरे यांनी पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
****
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून आतापर्यंत एकूण २७ कोटी ६८ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनानं जप्त केला आहे. यात मद्यसाठा, अंमली पदार्थ,  मौल्यवान वस्तू, दागिने आणि मोफत वाटपाचं इतर साहित्यांचा समावेश आहे.
****
कोल्हापूरमधल्या राजारामपुरी इथं एका वाहनातून निवडणूक भरारी पथकानं १० लाख ९५ हजार रुपये जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या रकमेची आयकर विभागामार्फत पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी  डॉ. संपत खिलारी यांनी दिली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मतदान जनजागृती विभाग तसंच परभणी जिल्हा सायकल संघटनांच्या वतीनं शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत सर्वांना मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. समारोपात सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.  या रॅलीत ८ वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंत सायकलस्वार सहभागी झाले होते.
****
धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्तरावर प्रयत्न सुरु असून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार, संपूर्ण शिरपुर तालुक्यातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.
****
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगानं मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी स्वीप उपक्रमा अंतर्गत पालघरमध्ये आज सकाळी रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं. यात तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर मॅरेथॉनमध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र तसचं पालघर जिल्ह्यातल्या शाळा-महाविद्यालयातील १८ वर्षाखालील मुलं आणि मुली, १८ वर्षावरील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
काश्मीरबाहेरील नागरिकांना मतदानाचा हक्क दिल्यास विरोध ; भाजप वगळता अन्य पक्षांच्या बैठकीत निर्णय, कायदेशीर मार्गही अवलंबणार
काश्मीरबाहेरील नागरिकांना मतदानाचा हक्क दिल्यास विरोध ; भाजप वगळता अन्य पक्षांच्या बैठकीत निर्णय, कायदेशीर मार्गही अवलंबणार
काश्मीरबाहेरील नागरिकांना मतदानाचा हक्क दिल्यास विरोध ; भाजप वगळता अन्य पक्षांच्या बैठकीत निर्णय, कायदेशीर मार्गही अवलंबणार भाजपनेही अब्दुल्ला यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीला प्रत्युत्तरादाखल रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती. श्रीनगर : ‘‘जम्मू-काश्मीरच्या मतदारयादीत काश्मीरबाहेरील नागरिकांचा समावेश करणे, येथील राजकीय पक्षांना मान्य नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरची वेगळी ओळख नष्ट…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
भाजप नेत्याचा चक्क ड्रायव्हरवर अनैसर्गीक अत्याचार ?
उत्तराखंड येथील अंकिता भंडारी नावाच्या युवतीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पुलकित आर्य याचे वडील आणि भाजपचा नेता विनोद आर्य यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारहाण देखील केली अशी तक्रार एका वाहन चालकाने त्यांच्या विरोधात केलेली आहे. आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता आपल्याला विनोद आर्य याने जीवे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
'नंगटपणा करणाऱ्या या बाईला बेड्या ठोका', चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या
Tumblr media
मुंबई| कपड्यांच्या विचित्र फॅशनमुळं उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच चर्चेत येत असते. उर्फीला बऱ्याचदा ट्रोलही केलं गेलं आहे. परंतु तरीही उर्फी कोणाचाही विचार न करता कपड्यांची फॅशन करण्यात मग्न असते. आता या सगळ्यात भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही उर्फीला टार्गेट केलं आहे. त्यामुळं उर्फी आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. सध्या या दोघींच्या वादावर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर एक ट्विट केलं आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक ��्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, शी, हे चाललंय काय, रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोसिल आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्माप महिला विकृतांच्या शिकार होत आहेत. त्यात ही बया अजून विकृती पसरवत आहे.असंही चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्विटला उर्फी जावेदनं कडक शब्दांत प्रत्तुतर दिलं आहे. या वादावर काही नेटकरी उर्फीची बाजू घेत आहेत तर काहीजण मात्र तिला विरोध दर्शवित आहेत. महत्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ' ह्या ' भाषेत सुनावले
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ‘ ह्या ‘ भाषेत सुनावले
भाजप सत्तेत आल्यापासून विविध प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरू झालेली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबणे, भाजपमधील अंतर्गत वादातून पक्षनेतृत्वाला असलेला विरोध कमी करण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या सत्ताधारी पक्षातील ��िरोधकांनाच आणि विरोधी पक्षालाच निशाण्यावर घेणे असे प्रकार सुरू झालेले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सातत्याने समाजातील सामाजिक स्वास्थ खराब होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम दाखवणे आणि त्याचा सत्ताधारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ' ह्या ' भाषेत सुनावले
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ‘ ह्या ‘ भाषेत सुनावले
भाजप सत्तेत आल्यापासून विविध प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरू झालेली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबणे, भाजपमधील अंतर्गत वादातून पक्षनेतृत्वाला असलेला विरोध कमी करण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या सत्ताधारी पक्षातील विरोधकांनाच आणि विरोधी पक्षालाच निशाण्यावर घेणे असे प्रकार सुरू झालेले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सातत्याने समाजातील सामाजिक स्वास्थ खराब होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम दाखवणे आणि त्याचा सत्ताधारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ' ह्या ' भाषेत सुनावले
वृत्तवाहिन्या आहे का व्यासपीठ ? , गोदी मीडियाला सर्वोच्च न्यायालयाने ‘ ह्या ‘ भाषेत सुनावले
भाजप सत्तेत आल्यापासून विविध प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरू झालेली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबणे, भाजपमधील अंतर्गत वादातून पक्षनेतृत्वाला असलेला विरोध कमी करण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्या सत्ताधारी पक्षातील विरोधकांनाच आणि विरोधी पक्षालाच निशाण्यावर घेणे असे प्रकार सुरू झालेले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सातत्याने समाजातील सामाजिक स्वास्थ खराब होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम दाखवणे आणि त्याचा सत्ताधारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes