#मतदानाचा
Explore tagged Tumblr posts
Text
मारकडवाडी इथे ' आक्रोशाची चिंगारी ' , ईव्हीएम विरोधात लॉंग मार्चची तयारी
मारकडवाडी इथे ' आक्रोशाची चिंगारी ' , ईव्हीएम विरोधात लॉंग मार्चची तयारी
‘ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी इथे ईव्हीएम विरोधात आक्रोशाची चिंगारी सध्या पेटलेली असून निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुन्हा मतदानाचा आदेश काढावा अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि त्यातून काही झालं नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मारकडवाडी येथून लॉंग मार्च काढू ,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराचं वितरण, दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचाही शुभारंभ • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबतच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर आजपासून संसदीय कामकाज सुरळीत होणार • भारतीय जनता पक्षाकडून विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेम���ूक • ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे आणि • उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभात होणार सहभागी
आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी १६ कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
संसदीय कामकाजाची कोंडी सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्याचं मान्य केलं. काँग्रेसचे गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. १३ आणि १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यसभेतही चर्चा होईल. विरोधकांनी सहमती दर्शवल्यानंतर आजपासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरू होईल, आज पहिलं विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडलं जाईल तसंच विरोधकांनी दिलेल्या आश्वासनामुळे कामकाज सुरळीत पार पडेल, असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान, एका खासगी कंपनीचं कथित लाचखोरी प्रकरण आणि संभलमधल्या हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल सलग पाचव्या दिवशी बाधित झालं.
राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीनं, भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या चार तारखेला होणार असून, त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी पाच तारखेला होणार आहे. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली असून, महायुतीमध्ये कोणतेही मतभे�� नाहीत असं महाजन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं. यापूर्वी आपल्याला केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव मिळाला होता, मात्र आपण तो नाकारला, पक्ष संघटना आणि लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणार असून, राज्यातल्या कोणत्याही मंत्रिपदात आपल्याला रस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि इव्हिएममधल्या मतदानामध्ये तफावत दिसत असून, पोस्टल मतदानाचा जो ट्रेंड आहे, तो इव्हिएममधल्या मतदानात दिसत नाही, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची माहिती दिली. या ट्रेंडबद्दलचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्��ाचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीविषयीही त्यांनी खुलासा केला, ते म्हणाले. ‘‘आपण एक लक्षात ठेवा पाच ते सहाच्या नंतर सहाला कोणी क्यू मध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते. म्हणून पूर्ण दिवसामध्ये कुठल्याही स्तरावर किती टक्केवारीने वाढले, किती नंबरला वाढले एवढेच नंबर पाचच्या नंतर सुद्धा वाढलेले आहेत. चुकून आपण झारखंडच्या सोबत काही कम्पॅरिजन होत आहे. झारखंड मध्ये पाच वाजता मतदान क्लोज झालेला आहे ऑफिशियली. महाराष्ट्र मोठा राजे असल्यामुळे सहा वाजता बंद झाले. झारखंड पूर्वीपासून अरली वोटिंग राज्य आहे. म्हणजे लवकर येऊन लोक मतदान करून जातात. सात ते नऊ मध्ये त्यांच्या परसेंटेज पाहिलं तर फार मोठा असतो आपल्याकडे सात ते नऊ मध्ये कमी असतं.’’
दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार भूषवणार आहेत. संमेलनाच्या समितीची ही मागणी पवार यांनी स्वीकारल्याची माहिती, समितीच्या वतीनं डॉ. सतीश देसाई आणि संजय नहार यांनी काल पुण्यात दिली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. रा��्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
जागतिक एड्स दिन एक डिसेंबर रोजी पाळण्यात आला, त्यानिमित्त विविध ठिकाणी कालही अनेक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात काल जाणीवजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसचं महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. प्रसिद्ध रंगकर्मी मदन मिमरोट यांच्या कलापथकाने जागृतीपर सादर केलेल्या कार्यक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हिंगोलीत काल जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रानं जनजागृती रॅली काढली होती. हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. उपस्थितांना या कार्यक्रमात एड्स नियंत्रणाबाबत शपथ देण्यात आली. बीड इथंही जागतिक एड्स दिनानिमित्त काल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनपर्यंत जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव जी.जी.सोनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. सर्व उपस्थितांना यावेळी एड्स मुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली. लातूर इथंही जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक तसंच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने काल रॅली काढण्यात आली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथून अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना एड्सविरोधी शपथ देण्यात आली.
परभणी जिल्ह्यात हिवाळी हंगामातल्या रब्बीच्या पिकांसाठी जायकवाडी, निम्न दुधना आणि येलदरी धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असली तरी याचदरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यानं कमी दाबाची वीज मिळत असल्याने मोटार पंप जळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रब्बीच्या पेरणीचा कालावधी संपत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरा��जीक सातारा परिसरातल्या खंडोबा अर्थात मार्तंड भैरव यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक सातारा परिसरात येत असतात. येत्या सात ते नऊ डिसेंबर दरम्यान दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर देवस्थानकडून चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती, देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली.
पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात आज उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात होणार असून, या स्पर्धेतला अंतिम सामना उद्या होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल अ- गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. अ -गटातल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला ६० धावांनी पराभूत केलं.
हवामान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. काल परभणी शहरासह काही भागात जोरदार पाऊस झाला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा, तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे तर शेवटच्या टप्प्यातला कापूस भिजल्यानं नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात, राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
0 notes
Text
Jalna round 1
Jalna round 1November 23, 2024Jalna round 1 जालना विधानसभा मतदार संघात 63.63 % (प्रा.अंदाजे)एकूण :- 221692November 20, 2024Pri Estimate) जालना विधानसभा मतदार संघात 63.63 % (प्रा.अंदाजे)एकूण :- 221692November 20, 2024Jalna Assembly Constituency 63.63% (Private Estimate) सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३ लाख ४४ हजार २५२ मतदरापैकी २ लाख ३ हजार ५१८ मतदानाचा हक्क बजावला असून टक्केवारी ५९.१२…
0 notes
Text
रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क - महासंवाद
रायगड, दि. १७ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर अखेर पर्यंत एकूण 2 हजार 680 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. पनवेल विधानसभा मतदारसंघात 124 ज्येष्ठ नागरिक, 13 दिव्यांग अशा एकूण 137 …
View On WordPress
0 notes
Text
वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान
बार्शी:- वंचित घटक असलेले तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून देणे, तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे आरोग्य तसेच शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ले��क सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख, आमदार बबन अवताडे तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते वायकुळे…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-the-reason-for-the-drop-in-voting-percentage-is/
0 notes
Text
Nagar News : आता घरूनच बजावता येईल मतदानाचा अधिकार
https://bharatlive.news/?p=183642 Nagar News : आता घरूनच बजावता येईल मतदानाचा अधिकार
नगर : पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
Text
शिक्षक मतदार संघासाठी गोंदियात १० मतदान केंद्रावर होणार मतदान
एकूण मतदार ३८८१, स्त्री मतदार १२१८ तर पुरुष मतदार २६६३ ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान मतदानाची वेळ सकाळी ��� ते दुपारी ४ पर्यंत गोंदिया,दि.18 : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून गोंदिया जिल्ह्यात एकूण १० मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. या निवडणुकीत ३८८१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात स्त्री मतदार १२१८ तर पुरुष मतदार…
View On WordPress
0 notes
Text
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने…
View On WordPress
0 notes
Text
‘ मतदानाचा निकाल लागू दे तुला पाहून घेतो ‘ , आरोपी संग्राम जगताप यांच्याशी संबंधित असल्याचा दावा
‘ मतदानाचा निकाल लागू दे तुला पाहून घेतो ‘ , आरोपी संग्राम जगताप यांच्याशी संबंधित असल्याचा दावा
मतदानाच्या दिवशी बोल्हेगाव येथील मतदान केंद्रावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि अभिषेक कळमकर यांचे मित्र उमेश पंढरीनाथ भांबरकर ( वय 40 वर्षे राहणार भुतकरवाडी ) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्यानंतर तोफखाना पोलिसात त्यांनी धाव घेतली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाण करणारे आरोपी हे संग्राम…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या कामकाजाचा पेच सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक, दोन्ही सदनात संविधानावर विशेष चर्चेचं आयोजन
खासगी उद्योग समुहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरुन संसदेचं कामकाज सलग पाचव्या दिवशी ठप्प
भाजपच्या विधीमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार प्रदान करण्यात येणार, तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
आणि
जागतिक एड्स दिनानिमित्त आज विविध ठिकाणी जनजागृतीपर रॅलीचं आयोजन
****
संसदेच्या कामकाजाचा पेच सोडवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्याचं मान्य केलं. काँग्रेसचे गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते
१३ आणि १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यसभेतही चर्चा होईल. विरोधकांनी सहमती दर्शवल्यानंतर उद्यापासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरू होईल, उद्या पहिलं विधेयक लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडलं जाईल तसंच विरोधकांनी दिलेल्या आश्वासनामुळे कामकाज सुरळीत पार पडेल, असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले –
सोलह और सतरह पर राज्यसभा मे संविधान पर चर्चा होगा। इसके अलावा स्पीकर साहब ने भी कहां है, कोई भी मुद्दा अगर उठाना चाहेगा तो उसका नियम होता है। अनुमती प्राप्त करने पर आप नोटीस दे सकते है।
****
दरम्यान, एका खासगी कंपनीचं कथित लाचखोरी प्रकरण आणि संभलमधल्या हिंसाचारासह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज सलग पाचव्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्यांवर चर्चेची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. गोंधळ सुरूच राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
राज्यसभेतही याच मुद्यांवरून विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेतही गदारोळ सुरू झाला. धनखड यांनी चर्चा करण्याची विनंती करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं, त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी दिली. ते आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. हस्तकलांवर आधारित उद्योगांना अधिक विस्तृत बाजारपेठ मिळवून देणं, आणि त्या कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तयार करणं, या उद्देशाने ही केंद्र स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं. पर्यावरण पूरक उद्योगांमधून रोजगारनिर्मितीसाठी एक क्षेत्र समर्पित असून, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमार्फत एक लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात सरकार स्थापनेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ पक्षनेत्याच्या नेमणुकीसाठी भाजपाच्या संसदीय मंडळाने दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे. राज्यात नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी पाच तारखेला होणार आहे.
****
दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं स्वतः श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. यापूर्वी आपल्याला केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव मिळाला होता, मात्र आपण तो नाकारला. पक्ष संघटना आणि लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत करणार असून, राज्यातल्या कोणत्याही मंत्रिपदात आपल्याला रस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीत मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि इव्हिएममधल्या मतदानामध्ये तफावत दिसत असून, पोस्टल मतदानाचा ट्रेंड जो आहे तो इव्हिएममधल्या मतदानात दिसत नाही, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची माहिती दिली. या ट्रेंडबद्दलचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
****
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आरोप केले जात आहेत, त्याचवेळी चोक्कलिंगम यांनी हे विधान केलं. या प्रकरणी अधिकारी सखोल तपास करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. परदेशात वास्तव्यास असलेल्या आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारी पत्रं पाठवणाऱ्या सय्यद शुजा यांच्या विरोधात निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या��ेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ‘अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. भोपाळमधे झालेल्या युनियन कार्बाईड विषारी वायू दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दोन डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो. ही दुर्घटना तीन डिसेंबर १९८४ रोजी घडली होती.
****
जागतिक एड्स दिन काल पाळण्यात आला, त्यानिमित्त विविध ठिकाणी काल आणि आजही अनेक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहरात आज जाणीवजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी क्रांती चौक इथं या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. प्रसिद्ध रंगकर्मी मदन मिमरोट यांच्या कलापथकाने जागृती पर सादर केलेल्या कार्यक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हिंगोलीत आज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रानं जनजागृती रॅली काढली होती. हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. उपस्थितांना या कार्यक्रमात एड्स नियंत्रणाबाबत शपथ देण्यात आली.
बीड इथंही जागतिक एड्स दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनपर्यंत जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव जी.जी.सोनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. सर्व उपस्थितांना यावेळी एड्स मुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात हिवाळी हंगामातल्या रब्बीच्या पिकांसाठी जायकवाडी, निम्न दुधना आणि येलदरी धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असली तरी याचदरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यानं कमी दाबाची वीज मिळत असल्याने मोटार पंप जळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रब्बीच्या पेरणीचा कालावधी संपत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांगलादेशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर शहरानजीक सातारा परिसरातल्या खंडोबा अर्थात मार्तंड भैरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ८०० वर्षांपेक्षा अधिक काळाची या यात्रेची परंपरा असून, या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक सातारा परिसरात येत असतात. येत्या सात ते नऊ डिसेंबर दरम्यान दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर देवस्थानकडून चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती, देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली.
****
हवामान
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळं परभणी जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे, त्यामुळं थंडी कमी झाली आहे. आज परभणी शहरासह काही भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि पावसामुळं हरभरा, तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे तर शेवटच्या टप्प्यातील कापूस भिजल्यानं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३ लाख ४४ हजार २५२ मतदरापैकी २ लाख ३ हजार ५१८ मतदानाचा हक्क बजावला असून टक्केवारी ५९.१२ इतकी आहे
जालना विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ३ लाख ४४ हजार २५२ मतदरांपैकी १ लाख ६० हजार ९६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आहे.तर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३ लाख ४४ हजार २५२ मतदरापैकी २ लाख ३ हजार ५१८ मतदानाचा हक्क बजावला असून टक्केवारी ५९.१२ इतकी आहे From 7 am to 5 pm, a total of 3 lakh 44 thousand 252 voters, 2 lakh 3 thousand 518 were eligible to vote and the…
0 notes
Text
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १९ नोव्हेंबर तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८, १९ आणि २० नोव्हेंबरला मुलाखत - महासंवाद
मुंबई, दि. 16 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक…
View On WordPress
0 notes
Text
गैर-काश्मीरींसाठी मतदानाचा हक्क स्थलांतरित कामगारांना धोक्यात आणतो, पक्ष म्हणा
गैर-काश्मीरींसाठी मतदानाचा हक्क स्थलांतरित कामगारांना धोक्यात आणतो, पक्ष म्हणा
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. (फाइल) श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील गैर-स्थानिकांसाठी मतदानाचा हक्क जाहीर केल्याने स्थलांतरित कामगार आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आले आहे, असे केंद्रशासित प्रदेशातील राजकीय पक्षांनी सोमवारी सांगितले. फारुख अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत वादग्रस्त हालचालीमुळे सुरक्षेतील नुकसानाबाबत चर्चा झाली आणि…
View On WordPress
0 notes