#बोलले
Explore tagged Tumblr posts
kamlakar-das · 6 months ago
Text
Tumblr media
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes · View notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३३
"केदार, जुन्या आठवणी जागवून कशाला एवढा त्रास करून घेतोस!" चटकन ऊठून, केदारच्या पाठीवर हलकेच आपला हात ठेवीत अनंत म्हणाला. "त्यांतूनही कटुआठवणी म्हणजे नुकतीच खपली धरलेल्या जखमांसारख्या असतात;-- जरा धक्का लागला की भळाभळा वाहूं लागतात!" सबनीसांच्या या सहानुभूतीपूर्ण उद्गारांनी भानावर येत केदार म्हणाला, "नाहीं काका, मला या आठवणींनी वाईट नाहीं वाटत;-- उलट 'आपण किती वाईट परिस्थितीतून वाट काढली आहे' या विचाराने स्वत:चा अभिमान वाटतो!!" "केदार बोलतोय ते खरं आहे, काका!" एकनाथ म्हणाला, " ते जुने दिवस आठवले की आम्हांला त्या वाईट परिस्थितीवर मात करायला किती लोकांनी मदत केली तेही आठवतं! स्टाॅल टाकायचा विचार आमच्या दोघांच्या मनांत आला खरा, पण तसं करणं खुपच अवघड होतं!" "तुम्हांला खोटं वाटेल काका, पण मी आणि एकनाथने बेकारीच्या काळांत कुणाकडे पैशांसाठी कधी हात नाहीं पसरला! कामासाठी वेळ आली तर उपाशीपोटी पायपीट केली, पण काही फुकट मिळावं म्हणून याचना नाहीं केली! गराजमधे प्रामाणिकपणाने आणि चोख काम करीत असतांना अनेक भल्या-चांगल्या गिऱ्हाईकांशी ओळखी झाल्या होत्या पण त्यांच्या कुणाच्याही दारांत मदत मागायला आम्ही गेलो नाहीं! मात्र जेव्हां स्वत:चा स्टाॅल टाकायचा विचार मनांत पक्का झाला, तेव्हां अशा ठोस कामासाठी ज्याच्याकडून मदत मिळेल असं वाटलं त्याच्याकडे ती सरळ मागितली!" "आणि तेव्हां कळलं की लोकांना खऱ्या-खोट्याची किती पारख असते!" एकनाथ भरल्या गळ्याने सांगू लागला,"केवळ आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हांला मदत केली! आम्ही सर्वांना हेच सांगितलं की तुमचे पैसे आम्ही कर्ज म्हणून घेतले आहेत! शक्य तेवढ्या लौकर आम्ही ते नक्की परत करूं! तसं लिहून द्यायलाही आम्ही तयार होतो पण लिखापढी कुणीही करून घेतली नाही!"
"त्याच वेळीं आम्ही ठरवलं की ज्यांनी आपल्यावर इतका विश्वास ठेवला आहे त्यांचे पैसे आपण लौकरांत लौकर परत करायचे! त्यासाठी कमाई चांगली होऊं लागल्यावर दरमहा आम्ही ठराविक रक्कम बाजूला काढून एकेकाचे पैसे परत करायला सुरुवात केली! आणि काय सांगू काका,--" आपले अश्रू न लपवतां केदार म्हणाला, "अनेकांनी पैसे परत घ्यायला नकार दिला! कुणी म्हणाले 'पैसे सत्कारणी लागतील याची खात्री होती म्हणूनच दिले होते' तर कुणी म्हणाले 'तुम्ही पैसे परत करायला आलांत, यांतच ते मिळाले असं आम्ही मानतो'! लोकांच्या या अशा वागण्याने आम्हांला प्रामाणिकपणाने कष्ट करण्यासाठी दुप्पट बळ मिळालं बघा!" "माझ्या अनुभवावरून सांगतो," अनंत म्हणाला, "आपल्या आजुबाजूला वावरणारी माणसं रोज उठून गवगवा करीत नसली, तरी आपल्या वर्तनाकडे त्यांचं बारीक लक्ष असतं! योग्य वेळ येते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेतून ते आपल्याला ��मजतं! याचाच अनुभव तुम्हांलाही आला आहे! कुुणी तुमच्या सचोटीचं प्रशस्तीपत्र आपणहून दिलं नसलं, तरी तुम्हांला गरज पडली तेव्हां लोकांचा तुमच्या सचोटीवरील विश्वासच तुमच्या कामीं आला ना!" "तुम्हांला लोकांचा हा विश्वास गमवायचा नाहींये;-- तर तो अधिक वृद्धिंगत करायचा आहे हेच तुम्ही लोकांचे पैसे परत करायच्या प्रयत्नांतून दाखवून दिलं आहे!" सबनीसांच्या या उदगारांवर हंसून मान डोलावीत अनंत म्हणाला, "अगदी बरोब्बर बोलताहेत सबनीसकाका! मात्र केदार आणि एकनाथ, लोकांची जी कांही कर्जाऊ रक्कम तुमच्याकडे अद्याप बाकी आहे, ती लौकरांत लौकर परत करण्यासाठी तुम्हांला प्रयत्न वाढवावे लागतील!" "त्यासाठीच तर आम्ही सगळी मेहनत करतोय् काका!" केदार गोंधळून म्हणाला, " त्यांत काय कमी पडतंय् असं तुम्हांला वाटतं?" "'नाहीं,नाहीं!" अनंतने घाईघाईने खुलासा केला, " तुम्ही दोघे जिवापाड मेहनत करताहांत यांत शंकाच नाहीं! फक्त तिची दिशा थोडी बदलायला हवी!"
अनंतच्या या खुलाशावर केदार आणि एकनाथ बावचळल्यागत त्याच्याकडे आणि एकमेकांकडे बघतच राहिले! "आपल्या जिवापाड मेहनतीला आतां कुठली नवी दिशा दाखवणार हा माणूस?" अशी जणूं शंका त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होती! त्यांचा गोंधळ लक्षात येऊन, त्यांना दिलासा देण्यासाठी अनंत म्हणाला, "असे गोंधळू नका ��े! तुम्हांला कांहीही वेडावाकडा सल्ला मी देणार नाहीं याची खात्री बाळगा! लोकांचं बाकी असलेलं कर्ज लौकर फेडण्यासाठी तुम्हांला स्टाॅलपासून मिळणारं उत्पन्न वाढलं पाहिजे ना? त्यासाठी सबनीस मगाशी म्हणाले त्याप्रमाणे गिऱ्हाईकांच्या गर्दीचा पुरेपूर लाभ व्हावा यासाठी स्टाॅल बंद करायची वेळ तुम्हांला रात्री ऊशीरापर्यंत वाढवावी लागेल!" "पण अनंतराव , स्टाॅल रात्री ८ / ८.३० नंतर उघडा ठेवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल दोघे मगाशीच मोकळेपणानं बोलले ना!" सबनीस कांहीसं गोंधळून म्हणाले! "ते माझ्याही लक्षांत आहो! पण केदार आणि एकनाथ, त्यांतून मार्ग काढण्यासाठी मला एकच प्रश्न तुम्हांला विचारायचा आहे की स्टाॅलवर तुम्ही दोघांनी दिवसभर एकत्र थांबणं कितपत आवश्यक आहे? त्यापेक्षा कामाचे तास तुम्ही दोघांमधे वाटून घेतलेत तर? अनेक कारखान्यांमधे जशा कामाच्या पाळ्या असतात त्याप्रमाणे तुम्हांला आळीपाळीने स्टाॅल सांभाळणं जमणार नाहीं कां?"
२३ फेेब्रुवारी २०२३
0 notes
pradip-madgaonkar · 21 days ago
Text
मिना : सासूबाई किती कटकट करताय वयाप्रमाणे वागा.
सासू : ए भवाने! तुझे ६४ दात तोडून टाकेन.
Pradip : अगं आई माणसाला ३२ दात असतात.
सासू : मला माहीत होतं तू मधे बोलणार, तुझे पकडूनचं मी बोलले होते.
😀😀😀😃😃😃😄😄😄🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 21 days ago
Text
मिना : सासूबाई किती कटकट करताय वयाप्रमाणे वागा.
सासू : ए भवाने! तुझे ६४ दात तोडून टाकेन.
Bandya : अगं आई माणसाला ३२ दात असतात.
सासू : मला माहीत होतं तू मधे बोलणार, तुझे पकडूनचं मी बोलले होते.
😀😀😀😃😃😃😄😄😄🤣🤣🤣
0 notes
appasahebparbhane · 5 months ago
Text
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
#हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
👇
कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या देवाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
👇
अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
👇
येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
त गुरु रामपाल जी
मुख्यपृष्ठ
चर्चेत असलेला वि��य
लेख
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
17 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित
भगवद्गीतेतील श्री कृष्ण दुसऱ्या कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात का?
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्यातरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जिथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
लिप्यंतरण: जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की, जो मला शेवटच्या क्षणी स्मरण करतो तो मला प्राप्त करतो. यात शंका नाही.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 6
गीता अध्याय ८ श्लोक ६
लिप्यंतरण: हे कुंतीपुत्र अर्जुन! ये मानुष्य अंतकाल में जिस-जिस भी भव को स्मरण करता हुआ शेयर का त्याग करता है, उसको ही प्राप्त हो, क्यूंकी वह सदा उसे भाव से भावित रहा है.
तात्पर्य: कृष्णजी म्हणत आहेत की मृत्यूच्या वेळी ज्या देवाचे स्मरण होते, तो त्या भगवंतालाच जातो.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 7
गीता अध्याय ८ श्लोक ७
लिप्यंतरण: isliye he अर्जुन! तू सब समय में निरंतर मेरा स्मरण कर और युद्ध भी कर. इज प्राकार मुझमे अर्पण किये हुए मन-बुद्धी से युक्त होकर तू निहसंदेह मुझे ही प्राप्त होगा.
तात्पर्य: येथे कृष्णजी अर्जुनला म्हणतात, की तू युद्ध कर आणि त्याच वेळी माझे स्मरण कर. अशा रीतीने तुम्ही मला कोणत्याही शंकाशिवाय साध्य कराल.
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 8
गीता अध्याय ८ श्लोक ८
👇
हे पार्थ! ये नियम है की परमेश्वर के ध्यान के अभ्यास रूप योग से युक्त दुनिया और ना जानेवाले चित से निरंतर चिंतन करता हुआ मनुष्य परम दिव्य पुरुषो अर्थ परमेश्वर को ही प्राप्त होता है.
येथे श्रीकृष्णजी अर्जुनाला एका नियमाविषयी सांगत आहेत, आणि दुसऱ्या कोणत्यातरी परमदेवाबद्दल बोलत आहेत. ते म्हणतात की जो परमात्म्याचे स्मरण करतो (जे कृष्णजीपासून वेगळे आहे) अविभाज्य लक्षाने परमात्म्याची प्राप्ती करतो. कृष्णजी 8:9 -10 मध्ये आणखी स्पष्ट करतात.
Tumblr media Tumblr media
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/nibbana-method-of-diagnosis-of-diseases-faith-of-dr-nilesh-patil-and-dr-akesha-patil/
0 notes
sanjay-ronghe-things · 10 months ago
Text
प्रहार झाला
बोलले कोणी टोचून कितीशब्दांचा तो वार झाला ।सोसतो मी जरी वार आतामनावरचं का प्रहार झाला । तुटले फुटले मनही आताअंतरात एक विचार आला ।शब्दांचेच बळ हे कितीशब्दांचा मग आधार झाला । जरी शब्दांनी शब्द वाढतीशब्द तिथे एक कामी आला ।लागला जिव्हारी शब्द जेव्हाशब्दांनीच तो मुकाट झाला ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
राज्यपाल फालतू माणूस असीम सरोदे थेट बोलले.. #eknathshinde
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात
लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात
आरक्षणावरुन सुरू रणधुमाळी थांबवा- काँग्रेस ���क्षाची सरकारकडे मागणी
आणि
साईबाबा संस्थानला दिवाळी सुटीत साडे सतरा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त
****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचं मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यांची दिनचर्या सुरळित सुरू आहे, असं बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्याची माहिती घेत आहेत. सरकारच्या सर्व यंत्रणा, विविध राज्य सरकार बचाव कार्यात सहभागी आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आवश्यक यंत्र सामुग्री प्राप्त व्हावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाची भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसवर आधारित मालमत्ता आणि यादी व्यवस्थापन प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणाच्या भविष्यातल्या गृहनिर्मिती आणि भूखंड हे व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेलं अतिक्रमण, आरक्षणनिहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मार्गस्त केलं. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यातही आजपासून यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत याचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाच�� अव्वर सचिव कौस्तुभ गिरी तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली इथं दिल्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अभियानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींना माहिती दिली. ते म्हणाले -
घरकुल योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, उज्ज्वला योजना, अशा ५४ योजनांमध्ये ज लाभार्थी आहेत, लाभ मिळालेल्या योजना कशा राबवल्या जातात यासंबंधी चर्चा केली. समाधानकारक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम या जिल्ह्याचे अधिकारी करतायत. त्यानंतर लोकांमध्ये आलो. काही लाभार्थी बोलले. एकंदरीत ज्या योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या अभियानाचा औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या अभियानात आठ रथ असतील, असं त्यांनी सांगितलं. डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रथ आज ग्रामीण भागासाठी मार्गस्थ करण्यात आले.
****
दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीनं शासन आदेश काढला असून हा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात आज २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनाद्वारे या आदेशाची होळी करण्यात आली.
****
राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली रणधुमाळी सरकारनं थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मराठा- इतर मागास प्रवर्ग वाद सरकार प्रायोजित असल्याचा आरोप केला. या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागं भारतीय जनता पक्षाची शक्ती असल्याचं ते म्हणाले. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राजस्थान, छत्तिसगडला ४५० रुपयांना गॅस मिळतो मग महाराष्ट्रात येवढा महाग का, अशी विचारना त्यांनी केली. आरक्षणावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानला दिवाळीच्या सुटीमध्ये १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजारांहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. हा निधी रोख, धनादेश तसंच सोने, चांदीच्या स्वरुपात असल्याचं शिवा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं हाच पर्याय असल्याचं मत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपुरमध्ये `अॅग्रोव्हिजन` प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी देवव्रत बोलत होते. मुळात जमिनीची उगवण क्षमता लक्षात घेता निरनिराळ्या प्रयोगांचा विचार होणं अपेक्षित होतं. पण, अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांत मागच्या काळात झालेल्या प्रयोगांनी नापिकी अधिक आली, असं त्यांनी सांगितलं. रासायनिक शेतीमुळं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राची संरचना बदलावी लागेल असंही राज्यपाल देवव्रत यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारं पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जलसंपदा विभागाला लिहिलेलं पत्र समाजमाध्यमांवर सादर करताना त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हे पत्र कोणत्या कारणांमुळं लिहिलं गेलं, याचा राज्य सरकारनं तातडीनं खुलासा करावा. राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आलं.
****
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर २-० असा सहज विजय नोंदवला. पुरुष ��केरीत उपउपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात भारताचा प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि जपानच्या कोडाई नराओका दरम्यानचा सामना होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या परभणी-वसमत मार्गावर खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीत दुकानांतलं सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये शेतमालासह नजिकच्या एका हॉटेलमधलं सामान जळून खाक झालं.
****
गडचिरोली जिल्हा भयमुक्त होत असून, लॉयड मेटल्सबरोबरच जिंदाल आणि अंबुजा हे प्रमुख उद्योग देखील इथं मोठी गुंतवणूक करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा जिल्हा लवकरच राज्यात अव्वल स्थानी दिसेल, असा विश्वास त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी आज उद्योग विभागाशी संबंधित एक आढावा बैठकही घेतली.
****
यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना मारहाणीच्या घटनेनं संतप्त झालेल्या अभियंत्यांनी पुसद आणि यवतमाळ कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात काळ्या फिती लाऊन ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार भावना गवळी यांनी आंदोलक अभियंत्यांशी चर्चा केली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विभागीय कार्यालयानं पोलिसांशी पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला असून कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्यानं कामबंद आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनं दिला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
'शरद पवार पंतप्रधान नाहीत' : अदानी- पवार मैत्रीवर राहुल गांधी स्पष्टच बोलले
https://bharatlive.news/?p=170735 'शरद पवार पंतप्रधान नाहीत' : अदानी- पवार मैत्रीवर राहुल गांधी स्पष्टच ...
0 notes
kamlakar-das · 6 months ago
Text
Tumblr media
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
1 note · View note
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २८
सुरळीत कार्य करणारं A.T.M. Card अचानक बंद पडल्याची तक्रार करायला बँकेत गेलेला अनंत बराच वेळ झाला तरी परतला नव्हता म्हणून शुभदा वाट बघत होती. 'मोबाईलवर काॅल करून विचारावं कां?' या विचारांत ती घुटमळत असतांनाच तिच्या मोबाईलवर अनंतचाच काॅल आला! तिनं काॅल घेत मोबाईल उचलून कानाशी धरला तशी अनंत म्हणाला, "शुभदा, माझं बँकेतलं काम झालं आहे आणि मी घरीच येत होतो,-- पण तेवढ्यात शेजारच्या सबनीसांचा फोन आला. बॅकेजवळच्याच एका चौकात मोटारसायकलचा धक्का लागून पडल्याने ते जखमी झाले आहेत; म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी जात आहे ---" "अगबाई! पण जखमी अवस्थेतही सबनीस स्वत: तुमच्याशी बोलले कां?" "हो;--फार लागलेलं नाहीं म्हणाले, पण बरेच घाबरलेले वाटले! रजनीवहिनी अपघाताबद्दल ऐकूनच खुुप घाबरतील, म्हणून त्यांनी घरी कांही न कळवतां मलाच फोन केला! तूं वाट बघत असशील म्हणून तुला कळवलंय्;- पण मी सबनीसांना घरी घेऊन येईपर्यंत तू वहिनींना कांही बोलूं नको अपघाताबद्दल! जमलं तर काहीतरी बहाण्याने त्यांच्या घरी जा आणि तिथेच थांब!" "बरं!" म्हणून शुभदाने मोबाईल ठेवला. पण 'प्रत्यक्षात सबनीसांना काय-कितपत लागलं असेल?' या विचाराने तिच्याही काळजांत धडधडूं लागलं. घोटभर पाणी पिऊन तिनं कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि सगळं अवसान गोळा करुन, चेहरा शक्य तेवढा शांत ठेवायचा प्रयत्न करीत तिनं सबनीसांच्या फ्लॅटची बेल वाजवली.
"तूं होय!" दार उघडायला आलेल्या रजनी सबनीस तिला बघून म्हणाल्या, " मला वाटलं, दिनकरच आले! अग तासभर झाला;-- औषधं संपली होती ती आणायला म्हणून बाहेर पडले ते अजून आले नाहीत! मी कधीची वाट बघते आहे!" "हे सुद्धा जवळच बँकेत गेले आहेत, ते अजून परत आले नाहीत! वाट बघून कंटाळा आला, म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला आले, तर इथेही तीच कथा!" म्हणत शुभदा हंसू लागली. ओळख झाल्यापासून रोजच गप्पा मारतां मारतां दोघी कधी अग-तूंगवर आल्या ते त्यांचं त्यांनाही समजलं नव्हतं! समवयस्क आणि बोलघेवडा स्वभाव यामुळे यामुळे त्यांचं सू�� लौकरच छान् जुळलं होतं. " जेवायची वेळ होत आली आहे, तरी एवढ्या उन्हांत आतां बाहेर पडूं नका म्हणून सांगत होते;--पण ऐकतील तर शपथ!" रजनी तक्रार करीत म्हणाली, "---आणि त्यांत हल्ली जवळच एक केमिस्टचं दुकान आहे ते सोडून लांब दुसऱ्या केमिस्टकडे जातात;--कारण तो बिलामधे १२ % सूट देतो! संध्याकाळी त्याच्या दुकानांत जास्त गर्दी होते म्हणून आतांच भर उन्हांत गेले आहेत बघ!" एवढ्यांत शुभदाच्या मोबाईलवर अनंतचा पुन: काॅल आला. तो घेत ती म्हणाली, " हो, मी रजनीकडेच आहे! तुम्ही या दिनकरना घेऊन!!" तिच्या बोलण्याने गोंधळलेल्या रजनीवहिनींना शुभदाने थोडक्यात काय घडलं होतं ते सांगीतलं आणि धीर देत म्हणाली, " दिनकर आणि अनंत आतां येतीलच इतक्यांत ! दिनकर स्वतःच्या पायांनी चालत येताहेत, म्हणजे त्यांना मोठी वा गंभीर दुखापत झालेली नाहींये हे समजून घे;-- आणि काळजी करूं नको! मी दार उघडते, तोपर्यंत तूं आंत बेड तयार कर म्हणजे दिनकरना आल्या-आल्या त्याच्यावर पडतां येईल!"
पांच-सात मिनिटांतच सबनीसांना घेऊन अनंत आणि सोबत ३ तरुण आंत आले. हातांतल्या काठीच्या आधाराने सबनीस हळुंहळूं चालत असले तरी प्रत्येक पाऊल टाकतांना त्यांना होणाऱ्या वेदना चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत्या! हातां-पायांवर लहानमोठ्या जखमा झालेल्या होत्या आणि अंगातल्या कपड्यांवर रक्ताचे आणि धुळीचे डाग जागोजागीं दिसत होते! तोडांत पदराचा बोळा कोंबून, फुटणारं रडूं आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पत्नीला धीर देण्यासाठी किंचित हंसण्याचा प्रयत्न करीत सबनीस म्हणाले, "रजनी, एवढी घाबरूं नकोस! मला अचानक एका बाईकने धक्का दिल्याने मी रस्त्यांत पडलो आणि जखमी झालो हे खरं असलं तरी मी हातीपायीं धड आहे ते बघितलंस ना?" आपल्या शेजारी उभ्या असलेल्या तिघां अनोळखी तरुणांकडे अंगुलीनिर्देश करीत ते पुढे म्हणाले,"या तिघांचे आपण खुप आभार मानायला हवेत की कुठलीही ओळख नसतांना त्यांनी मला आपणहून हरप्रकारे मदत केली! अचानकपणे जोराच्या धक्क्याने खाली पडल्यावर मी इतका गांगरून गेलो होतो, की मला कांही सुचेना! त्यांतच माझा चष्मा कुठंतरी पडल्याची भर! पण यांनी मला बसतं केलं! माझा चष्मा पडला होता तो एकाने शोधून दिला, दुसऱ्याने मला प्यायला पाणी दिलं आणि मग कुणाला फोन करायचा आहे कां विचारलं! एवढंच नव्ह���, तर चष्मा फुटल्याने मला मोबाईल बघतां येईना म्हणून मग यांच्यापैकीच कुणी अनंतरावांचा नंबर शोधून त्यांना काॅल केला!" पाणावलेल्या डोळ्यांनी त्या तिघांकडे पहात रजनीवहिनींनी आभारासाठी हात जोडले. तेवढ्यांत सर्वांसाठी पाण्याचे ग्लास घेऊन तिथे आलेल्या शुभदाने तीव्र स्वरांत सबनीसांना विचारलं, " पण तुम्हांला असा धक्का देणाऱ्या त्या बाईकवाल्याचं काय? तो पळूनच गेला असेल ना?"
१९ जानेवारी २०२३
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
अंतरिक्षा भारताने केला शंखनाद-नरेंद्र मोदी
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-भारताने चंद्रयान-3 मधील विक्रमच्या माध्यमातून चंद्रावर पाय ठेवले. हा भारताचा अंतरिक्षात शंकनाद आहे असे प्रतिपादन दक्षीण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज सायंकाळी 5.44 वाजता भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षीण धु्रवावर उतरत असतांना नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून इस्त्रो आणि भारतीय वैज्ञानिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे सहभागी झाले होते. सायंकाळी 5.55 वाजता भारताचे चंद्रयान उभ्या रेषेत चंद्राकडे जात असतांना सर्वांचा जीव गळ्यात आला होता. इस्त्रोचे मुख्य एस.सोमनाथ यांनी चंद्रयान-3 ने चंद्रावर विक्रमद्वारे पाय रोवताच टाळ्यांचा कडकडाट केला आणि एस.सोमनाथ यांनी भारताच्या पंतप्रधानांना आम्ही यशस्वी झाल्याची माहिती दिली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान यांनी हातात तिरंगा घेवून टाळ्या वाजवल्या. याप्रसंगी पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अब चंदा मामा दुरके नहीं, तसेच भारतीय वैज्ञानिकांना शुभकामना दिल्या. भारतीय लोकांना याबद्दल सांगतांना नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही आता अंतरिक्षात शंखनाद केला आहे. सोबतच आता चंद्रावरच्या व्याख्या बदलतील आणि त्याबद्दलच्या आस्था बदलतील. नवीन समीकरणे तयार होतील आणि त्यातून आम्ही जगाला नवीन माहिती देवू. याप्रसंगी जगाला संबोधीत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये बोलले आणि म्हणाले आजच्या चंद्रयान -3 चे यशस्वी प्रदार्पण माझे एकट्याचे नसून त्यासाठी जगाची आमच्यासोबत असलेली शुभकामना महत्वपुर्ण आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम्ही गगण यान प्रक्षेपणासाठी तयार ठेवलेले आहे. आणि आम्ही त्याद्वारे शुक्रग्रहावर जाणार आहोत. आजचा दिवस जग लक्षात ठेवील की, भारत हा पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षीण धु्रवावर आपला विक्रम उतरवला आहे. Read the full article
0 notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
बाबा: pradip , आमचा काळ असा होता की मी ५ रुपयांत किराणा सामान घेऊन यायचो
Pradip : आता, ते शक्य नाही बाबा. आता सगळीकडं सीसीटीव्ही असतो.
Bandya चे बाबा दिवसभर काही बोलले नाहीत…
😛😛😛😉😉😉😏😏😏🤔❤️🤔😱😱😱
0 notes
appasahebparbhane · 5 months ago
Text
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्री कृष्णजी ज्याच्याविषयी बोलत आहेत अशा इतर काही परम देव आहेत का?
श्रीकृष्णजींनी गीतेचे ज्ञान दिले आहे आणि ते स्वतः परमात्मा आहेत, अशी भक्त समाजात प्रचलित धारणा आहे. श्रीकृष्णजी गीता बोलले की नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. श्री कृष्णजी इतर कोणत्या तरी परमात्म्याबद्दल बोलतात की नाही या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देऊ, आणि तेही भगवद्गीतेतील ठोस पुराव्यासह.
भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत जेथे कृष्णजी दुसऱ्या देवाबद्दल बोलत आहेत, उदाहरणार्थ 18:62, 18.66. तथापि, आम्ही या लेखाच्या उद्देशाने धडा 8 वर लक्ष केंद्रित करू कारण ते इतर काही सर्वोच्च देवाबद्दल अगदी स्पष्टपणे बोलत आहे.
अध्याय 8 श्लोक 5 - 10 मधील श्लोक खाली पहा . या प्रतिमा गीता प्रेस गोरखपूरच्या भगवद्गीतेतील आहेत
👇
भगवद्गीता अध्याय 8, श्लोक 5
गीता अध्याय ८ श्लोक ५
जो पुरुष अंतकाल में भी मुझको ही स्मरण करता हुआ शेयरर को त्याग कर जता है, वह मेरे साक्षात् रूप को प्राप्त होता है. इसमे कुछ भी संकट नाही
Tumblr media
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/interstate-racket-of-ganja-smuggling-busted-by-local-crime-branch-nearly-90-kilos-of-ganja-seized/
0 notes