#बोलणं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे
अति बोलणं नडलं अन् काम मिळेनासं झालं; स्वरा भास्कर झिजवतेय निर्मात्यांचे उंबरठे Swara Bhaskar बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र आता तिचं हेच अति बोलणं तिच्या करिअरमध्ये बाधा आणतय. स्वराला बॉलिवूडमध्ये काम मिळेनासं झालंय. Swara Bhaskar बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 3 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावर���न घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळ��� नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ��ेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर ��ीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हण��ाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जा���े पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
bandya-mama · 1 month ago
Text
Bandya : तू का रडत आहेस?
Bandya Chi गर्लफ्रेण्ड : मी फोन एअरप्लेन मोडवर टाकला आहे, तरीसुद्धा तो उडत नाहिये.
गर्लफ्रण्डचं हे बोलणं ऐकून Bandya ला तिथेच चक्कर आली.
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
pradip-madgaonkar · 1 month ago
Text
Pradip : तू का रडत आहेस?
Pradip Chi गर्लफ्रेण्ड : मी फोन एअरप्लेन मोडवर टाकला आहे, तरीसुद्धा तो उडत नाहिये.
गर्लफ्रण्डचं हे बोलणं ऐकून Pradip ला तिथेच चक्कर आली.
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
shrikrishna-jug · 4 months ago
Text
मेंदूचं रहस्य
काल मी ज्यावेळी प्रोफेसर पोंक्षेना भेटलो त्यावेळी सहज निरनिराळ्या विषयावर बोलणं झाल्यावर कुतू��ल म्हणून प्रोफेसर पोंक्षेना मी म्हणालो, “मला मेंदू बद्दल विशेष वाटतं कारण आपल्या शरीरातील अनेक अवयवावर खूप संशोधन झालं आहे पण मेंदूवर तेवढं संशोधन दिसत नाही आणि जिवंत माणसाच्या मेंदूवर सर्जरी वगैरे प्रकार फार धोक्याचा असल्याने त्यावर सहजासहजी सर्जरी होत नाही परंतु मृत माणसाचा मेंदू उघड करून त्यावर बरच…
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 05 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीचं कामकाज २७ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उद्या ६ ते २७ जानेवारी दरम्यानच्या या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून अंतिम करण्यात आलं आहे. उद्या ६ जानेवारीवापासून याचिकेसंदर्भातील कागदपत्रं आणि पुरावे जमा करण्यास सुरुवात होईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर १६ जानेवारीला याचिकांचे मुद्दे निश्चित करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर २० आणि २३ जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी, उलटतपासणी घेतली जाईल. तर, २५ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यामुळं २७ जानेवारीला अंतिम युक्तिवादाचं कामकाज संपवून ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
****
आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळं आणि दोन-चार लोकांमुळं संपू शकत ना���ी. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असून त्याला कोणीही मारू शकत नसल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार तथा संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे.
नवव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मधल्या आयनॉक्स, प्रोझोन मॉल इथं जावेद अख्तर यांची दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मुलाखत घेतली, त्यावेळी अख्तर बोलत होते.
भाषा कायम आपल्या सोबत असते. भाषेमध्ये आपली संस्कृती दिसते. भाषा सोडली की आपण आपली मुळं सोडली असा अर्थ होतो. भाषा एकमेकांसाठी बोलण्यासाठी होती, मात्र आज भाषेमुळं बोलणं बंद होण्याची वेळ आली आहे आणि हे चिंताजनक असल्याचं ते म्हणाले.
****
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातल्या महिला शेतकरी अग्रेसर आहेत, असं मुख्यमंत्री एक��ाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला आहे. या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या प्रयोगांची माहिती देण्यात आली आहे. 
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात राज्यातल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. येत्या ५० वर्षांचा विचार करुन राज्यातली विकास कामं सुरू आहेत, असं सांगत या कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुयोग्य नियोजन करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वाहतुकीचंही नियोजन करण्यासोबत प्रकल्पासाठी भूमी देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचं वितरण ताबडतोब करण्यात यावं असंही पवार म्हणाले. पुणे मेट्रो मार्गातल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळखुर्द इथं लग्नाची मिरवणूक चालु असताना डिजे अंगावर पडल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल घडली. मृतांमध्ये बाळासाहेब हरिभाऊ खताळ, भास्कर राधु खताळ यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
****
बीड जिल्ह्यात येत्या काळातील निवडणुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकत्रित लढणार आहेत. काल बीड जिल्ह्यातल्या केज इथं प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. 
****
चंद्रपूर इथं आज नवा विश्वविक्रम बनणार आहे. या ठिकाणी होत असलेल्या चांदा कृषी महोत्सवात सुप्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ विष्णू मनोहर, तब्बल सहा हजार सातशे पन्नास  किलो भरडधान्यांची मिलेट खिचडी बनवत असून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
****
वाशिम इथं अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढ तसंच निवृत्ती वेतन योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी आंदोलन कर्त्यांनी केल्या.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
#लेख:"भुकेल्या पोटी स्वाभिमान"
"तात्या ओ तात्या! काय काम काढलं इकडे?"- तात्या दोन दिवस रिकामी पिशवी घेऊन येत व परत निघून जात हे बघून मी तात्याला विचारलं..
त्यावर तात्याने उत्तर दिलं -"इकडे रेशनच्या दुकानात दोन दिवसापासून येतो पण दुकानात माल आला नसल्याने चक्करा माराऱ्या लागत आहे"😢
तात्या दोन दिवसापासून त्यांच्या रेशनकार्डवर धान्य घेण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकानात येत होते..
उन्हातान्हात तात्या येत जात असल्याचे बघून तात्याला म्हटल-"तात्या काल ते नेताजी लोकांना धान्य वाटप करत होते तुम्ही तिथं असून सुद्धा त्यांचेकडून धान्य घेतलं नाही"
त्यावर ते तात्या बोलले की" तो पुढारी 5 किलो धान्य देईल व धान्य देतांना त्याच्या बरो��र पाच पन्नास फोटो काढून जाहिरात करेल..आम्ही अडचणीत आहोत भिकारी नाही.रेशनवर धान्य मिळालं नाही तर चार दिवस उपाशी राहू पण अशा लोकांपुढे हात पसरणार नाही.भुकेपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे"
तात्याचे हे बोलणं ऐकून विचारात पडलो.तात्याचे नातेवाईक, भाऊबंद लोकप्रतिनिधी कुणी नगरसेवक आमदार! नातेवाईक लोकप्रतिनिधी असूनही तात्याने अडचणीच्या काळात कोणाकडे मदत मागितली नाही.एवढंच काय स्वस्त धान्य दुकानदार नातेवाईक असूनही तात्याने त्याच्याकडे स्वतः च्या धान्य कोट्यापेक्षा अधिक धान्य कधीच मागितले नाही.
तात्यासारखे लोक एकवेळ उपाशी राहतील पण कोणापुढे हात पसरणार नाहीत.कोरोना लॉक डाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात,उद्योगधंदे बंद पडलेत.अनेकांना घर प्रपंच चालविणे कठीण झाले.अनेकांचे खाण्याचे वांध्ये झालेत,कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशा अडचणीतिल लोकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे.पण मदत करत असताना कधीही कॅमेरा सोबत घेऊन जाऊ नका.ही लोकं अडचणीत आहेत ती भिकारी नाहीत.त्यामुळे त्याना मदत करत असतांनाचे फोटो फेसबुक व्हाटसअप ट्विटर इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचा स्वाभिमान दुखवू नका.गुप्तदान हेच श्रेष्ठदान आहे.पटलं तर यावर नक्की विचार करा...
✍️✍️
-वैभव वैद्य....
0 notes
loksutra · 3 years ago
Text
युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला अणुबॉम्ब सांगितला, कोरिओग्राफर बायको अशी बोलती थांबली; पहा व्हिडिओ - VIDEO: युझवेंद्र चहलने कोरिओग्राफरच्या पत्नीला सांगितले अणुबॉम्ब, धनश्री वर्मा बोलली
युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला अणुबॉम्ब सांगितला, कोरिओग्राफर बायको अशी बोलती थांबली; पहा व्हिडिओ – VIDEO: युझवेंद्र चहलने कोरिओग्राफरच्या पत्नीला सांगितले अणुबॉम्ब, धनश्री वर्मा बोलली
मैदानाव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्याची कोरिओग्राफर आणि डेंटिस्ट पत्नी देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो-व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्याच्या डान्सचे व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात. धनश्री वर्माने 4 एप्रिल 2022 रोजी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती नायजेरियन गायक आणि रॅपर…
Tumblr media
View On WordPress
#अणुबॉम्ब#कोरिओग्राफर धनश्री वर्मा#धनश्री वर्मा#धनश्री वर्मा अणुबॉम्ब#धनश्री वर्मा इंस्टाग्राम#धनश्री वर्मा उंची#धनश्री वर्मा चित्रपट#धनश्री वर्मा नेट वर्थ#धनश्री वर्मा मालिका#धनश्री वर्मा यांची निव्वळ संपत्ती#धनश्री वर्मा वय#धनश्री वर्मा विकी#धनश्री वर्माची उंची#बायकोने असं बोलणं बंद केलं#युझवेंद्र चहल#युझवेंद्र चहल आयपीएल#युझवेंद्र चहल इन्स्टाग्राम#युझवेंद्र चहल इंस्टाग्राम#युझवेंद्र चहल पंजाबी आहे#युझवेंद्र चहल पत्नी#युझवेंद्र चहल बुद्धिबळ#युझवेंद्र चहल वय#युझवेंद्र चहल समुदाय#युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती#युझवेंद्र चहलची निव्वळ संपत्ती#युझवेंद्र चहलची पत्नी#व्हिडिओ पहा
0 notes
antarmukh · 3 years ago
Text
'हुशार' का 'कमी हुशार' का 'ढ' ?
माझ्या आठवणीतली शाळा..
विषय तसा जुना आणि पुरता चघळून, चावून चोथा झालेला असला तरी लिहायचा मोह आवरणं जरा अवघडच असावं..
तसं माझं शालेय जीवन इतर लोकांसारखंच साधं, सोपं आणि सरळ (थोडाफार अभ्यास केल्यामुळे असेल) होतं.
पण आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करण्याचा छंद असल्यामुळे अतिशय मनोरंजक होतं.. अर्थात नुसतं मनोरंजन करून घेतल्यामुळे म्हणा किंवा स्वतःहून त्या मनोरंजनात न सहभागी झाल्यामुळे म्हणा, मी फारशी कोणाला आवडत नसावे असा माझा कयास आहे.. (अर्थात याला अपवाद आहेतच)
पण या शाळेच्या विश्वात माझं छोटंसं जग होतं आणि त्या जगाच्या काचेतून बाहेरील मनोरंजनाचा भरपूर आस्वाद घेता आलाय.
तर, ...
'हुशार' मुलांच्या वर्गाचं असलेलं आकर्षण काही कमी नव्हतं. मुळात हुशार म्हणजे काय असतं ? आणि हुशार मुलं दिसतात तरी कशी ?
किंवा आपल्या पेक्षा कमी हुशार वर्गातील मुलं आणि आपण यात असाच फरक असेल का ?
ह्या कुतूहलापोटी, मी अनेक वेळा हुशार आणि कमी हुशार यांच्या वर्गा जवळ जाऊन निरीक्षण करण्याचा प्रयत्न केलाय... पण फारसं हाती काही लागलं नसावं...
दोन्ही वर्गातील मुलं काय बोलत असतात हे थोडं माझ्या आकलना पलीकडचंच होतं...
किमान आपल्या वर्गातल्या मुलींचं बोलणं कळतंय हेही काही कमी नाही हे स्वतःला समजावून सांगून मी निरीक्षण करणं बंद केलं...
आणि आपले शिक्षक किती भारी आहेत. त्यांना आपोआप कसं कळतं कोण किती हुशार आहे किंवा कोणाला किती कल�� येऊ शकतात ह्या गोष्टींनी मी मनाला सांगून टाकलं ...
आपली हुशार आणि ढ ही वर्गवारी एकदा झाल्या नंतर आपण हुशार होऊ शकतो असल्या फालतू शंका मनात बाळगायच्या नाहीत...
वर्गातल्या वर्गात जे काही स्पर्धा करायच्या ते करायच्या.. उगाच फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही...
दुसरं म्हणजे साधारण ३री चौथी पर्यंत शिक्षकांना कळून जातं कि आपल्यात अभ्यास व्यतिरिक्त काही इतर गुण आहेत का ते ...
'बाई / मॅम, मला पण आंतरवर्गीय नाटकात काम करायचंय... ' हे बोलायचं धाडस करण्या आधी, आपला लहानपणी चा काही अनुभव आहे का ? किंवा आपला शाळेतला social कोशंट किती आहे ? ह्याचा तरी जरा अंदाज घ्यावा ,,,,
असो, तर 'अश्या मारक विचारांनी ग्रस्त' असं आम्हा मधल्या फळीतल्या हुशार मुलींचं होत असावं... बाकी मला ढ मुलींचा हुशार मुलींपेक्षा जास्त हेवा वाटायचा ..
भरपूर खेळायचं, मुक्तपणे बागडायचं... फार pressure घ्यायचं नाही.. एकंदरीत याही बाबतीत middle-class असल��याची किंचित कुचंबणा असावी...
आता, शाळा संपल्या नंतर जेव्हा ह्या मर्यादा किती भासमान होत्या हे जाणवतं तेव्हा असं वाटतं कि काश 'गट' किंवा 'वर्ग' वारी करण्याचा अट्टाहास नसता .. तर काही वेगळंच चित्र निर्माण करू शकलो असतो ...
असो...
4 notes · View notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
शेजाऱ्यांशी बोला आणि निरोगी राहा; शेजाऱ्यांशी बोलणं हितकारक - नवीन संशोधन
https://bharatlive.news/?p=121978 शेजाऱ्यांशी बोला आणि निरोगी राहा; शेजाऱ्यांशी बोलणं हितकारक - नवीन ...
0 notes
kavitadatir · 4 years ago
Text
महाडचे दिवस ९: इतका वेळ कुठं होतास?
"तुम्ही जोशी आहात म्हणून खोली दाखवली. तुम्ही सांगताय ती मंडळी असतील तर मला नाही द्यायची खोली." यादी वाचून मी कुरेशीवर थांबलो की बोलणं थांबत होतं. कादंबरी 'महाडचे दिवस' प्रकरण ९ इतका वेळ कुठं होतास? - दीपक पारखी #chitrakshare #goshtacreations #saaradmajkur
रात्री कुरेशीला म्हटलं, ‘‘कुरेशी, आपली जेवणाची सोय तर उद्यापासून कोकणे खानावळीत झाली. ऑफिसमध्ये नवीन एंट्री झाल्यात. आपण असं लॉजमध्ये किती दिवस…’’ ‘‘जोशी, तू माझ्या मनातलं बोललास. एखादी खोली मिळतीय का बघू. खोलीचा आकार आणि भाडं पाहून तिथं किती जण ��ाहू शकतील याचा अंदाज घेऊ, मग बाकीच्यांशी बोलून बघू.’’
प्रत्येक गोष्टीत कुरेशींनी पुढाकार घ्यायचा हे मला काही बरं वाटलं नाही. मी ठरवलं की आपण खोली…
View On WordPress
1 note · View note
shoonyalabhaag · 5 years ago
Text
असीम....
असीम अनंत अपार आहेस तू.
पण तू कितीही मोठा झालास ना तरीही माझा दोस्तच वाटतोस मला.
असा दोस्त कि ज्याला माझ्या मनातल न सांगता कळतं .
केळशीला सुरुच्या वनाला बिलगणारा तू. 
मुरुडच्या लहानसहान पोरांना डॉल्फिन्स दाखवणारा तू.. 
गणपतीपुळ्याच्या ओंकाराचा नाद आपल्या लाटांतून ऐकवणारा तू.. 
आंजर्ल्याच्या कड्यावरून दिसणारं तुझं लोभसवाणं रूप .. 
गोव्याच्या हवेने थोडा glamorous झालेला तू ..
तुझी जेवढी रूपं बघ���तली तेवढं तुझ्याबद्दलचं प्रेम वाढलं मित्रा .. 
तुला भेटायचं म्हणलं कि माझ्यातलं पोर जागं होतं . मग मला बाकीचं काही लागत नाही. 
तुझ्या जवळ जसं जसं येत जातो तसं आकाशाचं रूप बदलतं .. तुझा प्रतिबिंब पडतं आकाशात 
सुरुची ,नारळी पोफळी ची झाडं दिसली कि तुझी चाहूल लागते . आणि मग मनाला सांभाळणं अवघड होऊन जातं .. 
एवढ्या वेळा तुला भेटलोय ..पण प्रत्त्येक वेळी तेवढ्याच ओढीने भेटतो मी तुला .. 
तुला भेटायला ज��तानाचा रस्ता पण आवडतो.. त्यावरची माणसं पण आवडतात ..त्यांचं बोलणं , वागणं बघत राहावं असं वाटतं .. 
तुझा अंश त्यांच्यात असतो आणि म्हणून तुझ्या जवळ राहणारे लोक वेगळेच असतात . सतत पळणाऱ्या लोकांच्या चिंता त्यांना भेडसावत नाहीत.. 
पण म्हणून संघर्ष संपलेला नसतो.तो चालूच असतो.पण चेहऱ्यावर एक निवांतपणा असतो.. त्यांच्या आत तुझी अथांगता पोचलीये असा वाटतं काहीवेळा .. 
तुझा स्पर्श आणि नंतर एक एक पाऊल तुझ्या आणखी जवळ येणं .. तुझ्या लाटा अंगावर घेणं त्या अथांगतेचा एक अंश..  तो हि अथांगच . . तो अंगावर घेणं ..मनाला आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो.. खूप असतं मनात तुला भेटायच्या आधी ..आपल्या लोकांकडून बाळगलेल्या छोट्या अपेक्षा ..त्यांचा कधीच ना फिरणारा पाठीवरचा मायेचा हात .आपल्या व्यापात गुंतलेले आणि मनात असून सुद्धा वेळ ना देऊ शकणारे "आपले "लोक .. त्यांच्या जुन्या आठवणी .. आणि या सगळ्यातून आलेलं एकटेपण insignificant वाटतो स्वतःला मग मी खूप .. पण तुला बिलगलो कि ते मळभ जातं सगळं कुणाबद्दल राग नाही राहत मनात .. कारण तुला कळतं ..ना सांगता .. 
साक्षात सूर्यनारायणाचं नातं आहे तुझ्याशी .. आपलं काम काही झालं तरी नेटाने करणारे तुम्ही २ दोस्त ..संध्याकाळच्या वेळेला काय गप्पा मारत असता .. 
तो हि कधीच थांबत नाही आणि तू पण .. काय सांगता एकमेकांना संध्याकाळी .. पण तुमच्या दोघांचा ते अद्वैत मात्र खूप लोभसवाणं असतं .. हळव्या माणसाला अजून कातर बनवतं ते.. 
सूर्यास्तानंतरचं तुझं रूप खूप उदास बनवतं मनाला ..पण ते हि सौन्दर्यच ना.. उदासी खूबसूरत नही होती बाबूमोशाय?
खूप आहे मनात ..पण तुला ना बोललेलं पण कळतं ना.. एवढं पुरे आहे माझ्यासाठी ..थांबतो 
3 notes · View notes
shrikrishna-jug · 9 months ago
Text
लागट बोलणं
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि मनाला लागलेली एक घटना आठवली.धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द कृतींपेक्षा जास्त एखाद्याला दुखवू शकतात,असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो.एकदा लोकांनी एका व्यक्तीला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा;पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पुनर्विचार करण्याचं आश्वासन
खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी 
न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा-केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू 
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा राज्य सरकारचा विचार
धाराशिव जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं-पालकमंत्री तानाजी सावंत यांचं आ��ाहन
मराठवाड्यात काल पुन्हा पाऊस; परभणीत घर कोसळून बालकाचा मृत्यू 
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा गुजरात टायटन्सवर पाच धावांनी विजय
****
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं काल मुंबईत प्रकाशन झालं, या समारंभात त्यांनी, पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर कोणतीही नवी जबाबदारी घेणार नसल्याचं पवार यांनी जाहीर केलं. ते म्हणाले...
‘‘एक मे एकोणीसशे साठ ते एक मे दोन हजार तेवीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा  विचार सुद्‌धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.’’
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्य��ंनी हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले...
‘‘काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.’’
मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला जवळपास सगळ्याच नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं, अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया, महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना, शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.
शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल गडचिरोली इथं माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी खारघर इथं झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्द्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, काँग्रेस पक्षानं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या माहितीच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, पंचना��्यांसाठी थांबू नये, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
****
फाशीच्या शिक्षेसंदर्भातल्या पर्यायांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर काल याबाबत झालेल्या सुनावणीत, ॲटर्नी जनरल- महान्यायवादी आर वेंकटरमणी यांनी यासंदर्भातले दस्तावेज सादर केले. विधीज्ञ ऋषी मल्होत्रा यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी फाशीऐवजी कमी त्रासदायक पर्याय अवलंबण्यासाठी एका याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. प्राणघातक इंजेक्शन, बंदुकीची गोळी झाडणं, विजेचा झटका किंवा विषारी वायू कक्ष, आदी पर्याय संबंधितांनी सुचवले आहेत, या याचिकेवर पुढची सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे.
****
न्यायव्यवस्थेत भारतीय भाषांचा वापर वाढावा असा केंद्र सरकारचा मानस असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये भारतीय भाषांचा वापर वाढवण्याच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ई प्रणाली संचाचं उद्घघाटन काल रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या न्यायव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रिजिजू यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यावेळी उपस्थित होते. न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं मार्गी लावणं तसंच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ई-फाईलिंग सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक अरुण गांधी यांचं काल कोल्हापूर इथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक राजकीय कार्यकर्ते असलेल्या अरुण गांधी यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचं काल नागपूर इथं आजारपणानं निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. देव यांचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता. सामाजिक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमधून सातत्याने लेखन केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थ्यांचं बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या, दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांचं, महाजन यांच्या हस्ते काल उद्‌घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून, येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन काल सत्तार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबीन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कमी पर्जन्यमान असलेल्या धाराशीव जिल्ह्यात शेततळी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिव इथं खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात निकृष्ट बियाणं, भेसळयुक्त खतं आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला. ज्या बॅंका खरीप पिकांसाठी कर्जवाटपाचे लक्ष्यांक साध्य करणार नाहीत आणि सिबिल स्कोअरच्या नावाखाली कर्ज देण्यास टाळाटाळ करतील, अशा बॅंकांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं कार्यवाही प्रस्तावित करावी, असे निर्देश सावंत यांनी दिले.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीनं स्थापन केलेल्या, गौरव समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत, या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुढील मुक्तिसंग्राम दिनापर्यंत, विविध कार्यक्रमांची आखणी करताना, समाजातले विविध घटक त्यामध्ये सहभागी होतील, असं नियोजन करण्याची सूचना चव्हाण यांनी केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन कार्यक्रमांचं वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
मराठवाडा मुक्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत काल नांदेड इथं बोलतो मराठी-गर्जतो मराठी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्याचं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या कल्लाळी, इस्लापूर, उमरी, यासारख्या ऐतिहासिक ठिकाणी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मुक्तीलढ्याचा इतिहास पोहोचवत असल्याचं, चिखलीकर यांनी सांगितलं.
****
राज्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिल��. राज्यात ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसंच सर्व २८८ मतदारसंघांत येत्या सहा मे पासून सहा जून पर्यत हे शिबीर घेतलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे.
****
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या चुडावा शिवारात काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं आखाड्यावरील घर कोसळून एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
हिंगोली शहरात काल रात्री अवकाळी पाऊस झाला. नांदेड शहरातही आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. काल सायंकाळी सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या काही भागाही काल रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
****
दरम्यान, येत्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. चार मे रोजी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ निर्धारित षटकात सहा गडी गमावत १२५ धावाच करु शकला.
या स्पर्धेत आज दुपारी साडे तीन वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्न सुपर किंग्ज यांच्यात, तर संध्याकाळी साडे सात वाजता पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे.
****
बारावीनंतर तांत्रिक शिक्षण घेऊन एखादी परदेशी भाषा शिकल्यास बारावी पास विद्यार्थ्यांनाही परदेशामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, असं मत शासकीय ��द्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम वाघ यांनी व्यक्त केलं आहे. परदेशातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, या विषयावर छत्रपती संभाजीनगरातल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात काल झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. काळानुसार झालेले बदल स्वीकारले तर संधी चालून येते, असं सांगत, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांमध्ये भारतातल्या विद्यार्थ्यांना आरोग्य, कृषी, बांधकाम तंत्रज्ञान, अन्न आणि भाज्या तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
#मांग...
दिवाळी,दसरा वा इतर कुठलाही सण असला की मांग गावात दिवाळी वा दसरा मांगायला येतो.मांग आपली हलगी प्रतेकांच्या घरासमोर वाजवतो अन प्रत्येक घर त्याला स्वखुशीने पैसा,धान्य भाजीभाकरी देतो.अन तोही ते आनंदाने स्वीकारतो.ही गावाकडली हजारो वर्षांपासून चालत आलेली रीत,प्रथा परंपरा आहे.
मांग समाज हजारो वर्षांपासून हलगी वाजवत आलाय.दारोदारी भिक्षा मागून खात आलाय आपलं घर चालवत आलाय.गावात कोणी मरण पावलं तर मांग हलगी वाजवतो.मेलेल्याची डोली तोच सजवतो.मेलेल्या माणसानंवर फेकलेली चिल्लर वा पैसा मांग आजही उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो.मेलेल्या माणसाच्या अर्थिवरील गोधडी,तांब्याची भांडी आजही तोच आपल्या घरी घेऊन जातो.अजून अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आजही मांग समाज हा मानसिक गुलामीत जगत आहे.मांग समाज आपलं शिक्षण,संविधानिक अधिकार,प्रतिनिधित्व,न्याय,हक्क,यांपासून खूप दूर आहे असंच वाटतं.हा समूह काही अंशी जरी पुढं आला असला तरी त्यांच जागरूक असण्याचं प्रमाण खूप कमी दिसत.हे एक जिवंत सामाजिक विषमतेचे उदाहरण आहे.ही सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामी हजारो वर्षांपासून 'जैसे थे' आपल्याला दिसते.
गावाकडे सुखाच्या प्रसंगी ब्राम्हण आणि अपशकुन प्रसंगी मांग असंही चित्र आपल्याला पहावयास मिळेल.
मग समाजातील लोकांना प्रश्न केल्यावर त्यांच्याकडन उत्तरं येतात की मग हे काम ही लोकं नाही करणार तर कोण करणार? हजारो वर्षापासून तीच लोक ही काम करताय आणि पुढेही तीच लोकं करतील.
समाजाची ती रीत आहे,परंपरा आहे,प्रथा आहे.अशे अनेक प्रकारचे लोकांची उत्तरं आहेत.
मांगाशी मी आज दोन शब्द बोललो म्हंटल एक विचारतो राग मानू नका,मी तुमच्यापेक्षा लहान आहे.ते म्हटले बोला मला कहीही राग येणार नाही.मी म्हटलं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही ही असली कामं करीत आलेले आहात कसं वाटतं तुम्हाला? काही बद्दल करावा,थोडं मान सन्मानाने जगावं? आपली मुलं शिकावी,मोठी व्हावी,घर समाज पुढे यावा असलं वाटतं नाही का तुम्हाला? ते म्हंटले म्हणे पार पूर्वजांनपासून आमचं अश्या ह्या प्रथा चालत आलेल्या. मग मीही त्या पुढे चालवल्या.मला काही वेगळं वाटत नाही.आनंदाने मी करतो.माझ्या घरात गरिबी एवढी आहे की मला असली कामे करावी लागतात. त्यांच्या अश्या बोलल्यातुन मला खूप वाईट वाटतं होतं अन अजून किती वैचारिक,शैक्षणिक अज्ञान आणि मागासलेपण समाजात आहे हे मला जाणवत होतं.नन्तर मी अजून एक त्यांना केला.म्हटलं तुमच्या मुलांना ही असली कामं करायला लावणार का?पिढ्यानपिढ्या असली कामे करणार का? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं अन बोलले की.. नाही? माझी मुले आज शिकत आहेत पण शिकून नोकरीला लागली तर ठीक नाहीतर करतील काही कामं आपलं पोट भरण्यासाठी. मला त्याच बोलणं खूप खुपत होतं.त्यांच्याशी मी कसा बोलू काय शब्द वापरु कळत नव्हतं.ते जरा घाईत होते म्हणून मीही जास्त बोलू शकलो नाही.पण मला अशे अनेक प्रश्न जाताना ते सोडून गेलेत. असले प्रश्न कधी मिटणार?सामाजिक दुरी अन मागासलेपण कधी कमी होणार? याला जबाबदार ते स्वतः आहेत की समाजातील लोकं वा सरकार? असल्या अनेक प्रश्नांनी मनात अस्वस्थता निर्माण झालीय.
महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्नांना पूर्णपणे कधी यश येईल?
महात्मा फुले म्हणायचे की,
विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. – महात्मा फुले.
तुम्हीही यांवर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे.
लिहायला भरपूर होतं पण थांबलो.
-वैभव वैद्य....
0 notes
wordspower · 3 years ago
Text
स्वतःच कॅलेंडर
सौजन्य – ब्लूपॅड 🙏 विनंती: पुढे शेअर करा स्वतःच कॅलेंडर – स्वराणी आणखी वाचा ब्लूपॅड वर – https://bluepad.in/share/WCUoxkjUQ97jqvVB7 कॅलेंडर अर्थातच दिनदर्शिका, तिथी, वार, पंचांग सोडलं व फक्त तिचा मतितार्थ जर घेतला तर खरंच आपला दैनंदिन जीवनाचा आरसा असते दिनदर्शिका. हे असं बोलणं नाही लक्षात येणार पण जर मागे वळून पाहिलं की मी काय काय केलं , काय काय ठरवलं होतं तेंव्हा नक्कीच प्रत्येकजण स्वतःच कॅलेंडर…
View On WordPress
0 notes