Tumgik
#बिलोली
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media
सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा,भात,मका, ज्वारी व ऊस या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी रोग सर्वेक्षण,सल्ला,जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने “पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )” राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत देगलूर उपविभागस्तरीय क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन आज उद्यमिता लर्निंग सेंटर, सगरोळी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेता प्रा.कपिल इंगळे यांनी कापूस, सोयाबीन, तूर पिकातील उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केलं. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधला. तर प्रा.व्यंकट शिंदे यांनी सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाची कामे यावर मार्गदर्शन केले तर कृषी विभागाचे तंत्र सहाय्यक श्री.तपासे यांनी क्राॅपसॅप ॲप च्या वापरा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.भाऊसाहेब बह्राटे,उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर श्री अनिल शिरफूले, तालुका कृषी अधिकारी बिलोली, देगलूर व धर्माबाद यांच्यासह कृषी विभागातील १२० कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. #cropsap #क्राॅपसॅप #app #सोयाबीन #कापूस #तूर #Agriculture #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण.
नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत तर परभणी जवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार मागे.
चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण;जालन्यात १२, बीडमध्ये १९ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले सात अर्ज बाद.
आणि
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांत आज काही प्रकार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघातल्या २०४ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड इथं ५२ पूर्णांक ४७ शतांश टक्के, परभणी इथं ५३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिंगोली इथं  ५२ टक्के, यवतमाळ वाशिम ५४ टक्के, तर अकोल्यात ५२ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्रावरील बॅलेट युनीट, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनीट आणि २५ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला, मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं.
परभणी लोकसभा मतदार संघातही २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरीत बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनीट कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार समोर आला. भैय्यासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बॅलेट युनीट तत्काळ बदलून देण्यात आलं. दरम्यान, या युवकाने मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
****
परभणी शहराजवळील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं, मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं. शहरात गुजराथी महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
परभणी लोकसभा मतदार संघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आले होते, यात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या केंद्राला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नव मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकाने मुंबईहून येत तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
आज पालघर लोकसभा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुशिला कांबळे, राईट टू रिकॉल पक्षाकडून अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदारसंघात आज ४१ अर्जांची विक्री झाली. यात भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या वतीने चार अर्जांची खरेदी केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज झाली. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते, यापैकी सात जणांचे अर्ज बाद झाले, तर ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
बीड इथून ७६ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ जणांचे अर्ज बाद ठरले, तर ५५ अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.
****
राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन आज रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
                                   ****
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश आलं आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मुलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं आहे.
****
नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज अर्ज छाननी प्रक्रिये दरम्यान, भाजपाच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी, के.सी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गोवाल पाडवी यांनी मालमत्तेचं विवरण दिलं नसून ९० दिवसाच्या आतील बँकेच्या नोंदी देखील जोडल्या नसल्याचं, तसंच गावित दांम्पत्यांनं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं, हिना गावीत यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवला. भारतीय जनता पक्षानं, याविरोधात न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
****
बीड इथं येत्या रविवारी २८ एप्रिलला मतदार जागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी काढण्यात येणार असून या फेरीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून करण्यात येईल.
****
जनकल्याण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील गोडेगाव इथं येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित समारंभात बोरूडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून, आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना गेल्या ३१ वर्षापासून मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे
****
चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं आज अंतिम फे��ीत प्रवेश केला. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. उद्या सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
नांदेड दि. २१ : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी  दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या  दिलेल्या…
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
डोंगरगाव ता.लोहा येथे तीन घरफोडून 6 लाखांची चोरी; इतर चोऱ्या
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगाव येथे चोरट्यांनी काही घरे फोडून त्यातून 6 लाख 3 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. बिलोली येथे एक घरफोडून चोरट्यांनी 29 हजार 500 रुपयंाचा ऐवज लंपास केला आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हेबोरगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 60 हाजरांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखमापुर येथून 3 जणांनी पशुधन चोरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मौजे डोंगरगाव येथील साहेबराव विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जुलैच्या पहाटे 5 वाजण्याच्या पुर्वी त्यांच्या घरातील ड्रेसींग टेबलमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 50 हजार रुपये असा 1 लाख 85 हजारांचा ऐवज तसेच त्यांचे शेजारी आनंदराव जाधव यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 88 हजार रुपयंाचा ऐवज आणि तुकाराम गंगाराम गिते यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 30 हजारांचा ऐवज मिळून एकूण 6 लाख 3 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत. बिलोली येथे राहणारे औषध निर्माण अधिकारी श्रीनिवास व्यंकटराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेदरम्यान आपल्या सरकारी नोकरीवर नायगाव येथे गेले असतांना त्यांचे घरफोडून चोरट्यांनी चांदीचे विविध साहित्य आणि 10 हजार रुपये रोख रक्कम व काही नाणे असा एकूण 29 हजार 500 रुपयंाचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करीत आहेत. शोभाबाई प्रकाश गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कोल्हेबोरगाव येथे आणि त्यांचे पती 26 जुलै रोजी रात्री 9 वाजता झोपले. 27 जुलैच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांना जाग आली कि, कोणी तरी चोरट्यांनी घरफोडून घरातून सोन्याचे दागिणे एकूण 60 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार काळे अधिक तपास करीत आहेत. मौजे लखमापुर ता.माहुर येथील सुरेशलालसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलै रोजी सकाळी 10 ते 24 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 1.45 वाजेदरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरात बांधलेल्या 8 शेळ्या अजिम कुरेशी रा.आर्णी जि.यवतमाळ, नारायण मारेाती गुडूलवार, विक्की लक्ष्मण गेडाम दोघे रा.कौठा बाजार, आर्णी जि.यवतमाळ यांनी चोरून नेल्या आहेत. माहुर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत. Read the full article
0 notes
prabudhab · 3 years
Photo
Tumblr media
माजी आमदार श्री. अविनाशजी घाटे साहेबांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यतवाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल *राहुल गांधी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश व नांदेड शहर कमिटीतर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐 . . . . . #देगलूर_बिलोली_विधानसभा_पोटनिवडणूक #jiteshantapurkar #degloor #degloorbilolividhansabha90 #mla_avinash_ghate #nandednews #nandeddiaries #बिलोली (at देगलूर - बिलोली मतदारसंघ) https://www.instagram.com/p/CVYEdUkvKVV/?utm_medium=tumblr
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media
फळपिक लागवडीचे महत्व… कृषी विभाग बिलोली, तर्फे आरळी येथे प्रशिक्षण व कृषी दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रम मध्ये प्रा. व्यंकट शिंदे यांनी सोयाबीन व तूर पिकामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापन या बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच डॉ संतोष चव्हाण यांनी उत्पन्न वाढीसाठी फळपिक लागवडीचे महत्व आणि आपल्या भागात घेण्यात येणाऱ्या कागदी लिंबू, आंबा, सीताफळ या पिकाबद्दल माहिती दिली. सादर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी, तिडके सर, आणि बि टी एम श्री कांबळे सर उपस्थित होते. #farming #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded #agriculture #फळपिक #horticulturecrops🌱🍅 #fruits #vegetables
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशपातळीवरच्या पहिल्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या पुरस्कारांच्या माध्यमातून देशातल्या प्रतिभावंत युवा शक्तीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. कथाकथन, सामाजिक बदल, शाश्वत पर्यावरण, शिक्षण, गेमिंग अशा विविध क्षेत्रामंध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या २३ जणांना यावेळी गौरवण्यात आलं. 
****
महिला दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, जागतिक महिला दिनी आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचा गौरव केला जात आहे. ‘महिला सक्षमीकरणासाठी गुंतवणूक’, ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचं स्वागत केलं असून, जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वैशाली हंगरगेकर यांचं व्याख्यान झालं. मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक करू नये ही सर्व महिलांची सार्वत्रिक जबाबदारी असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावाने साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या शिव मंदीरांमध्ये यानिमित्त आज पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी इथं वैद्यनाथांचं दर्शन घेऊन, राज्यातल्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना केली.
दरम्यान, मुंडे यांनी अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची चौकशी केली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. मध्यरात्री आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत श्री नागनाथाची महापूजा करण्यात आली. आज रात्री आठ वाजता नागनाथाची पालखी निघणार आहे.
****
जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार करण्यात आला असून, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उद्या हिंगोली इथं या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील. परवा दहा तारखेपासून ही रेल्वे नियमित धावेल. जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली इथून पहाटे चार वाजून २० मिनिटांनी सुटणार असून, मुंबईला दुपारी चार वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. जालन्याला ही गाडी सकाळी नऊ वाजता, तर छत्रपती संभाजीनगरला नऊ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीसाठी जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईहून दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सुटणार असून, छत्रपती संभाजीनगरला संध्याकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी, जालना इथं संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी, तर हिंगोली इथं रात्री साडे बारा वाजता पोहोचेल.   
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर��ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचं आज पहाटे निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. १९९९ मध्ये ते या मतदारसंघातून जनता दलाकडून विजयी झाले होते. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड यांचे ते वडील होत.
****
बुलढाणा जिल्ह्यात नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर नजीक तालासवाडा फाट्यावर आज सकाळी ट्रक आणि आयशरच्या झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
धाराशिव जिल्ह्यात भूम इथल्या वनविभागातल्या एका वनमजुरास दोन हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. शेतातली वाढलेली झाडं तोडण्यास वरिष्ठांकडून परवानगी मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात पुढील आठवड्यापासून बदल करण्यात येणार आहे. यापुढे दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान धरमशाला इथं सुरु असलेल्या पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात, शुभमन गीलच्या शतकी खेळीच्या बळावर ८३ धावांची आघाडी मिळवली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद ३०१ धावा झाल्या होत्या.  
****
0 notes
marathipeople111 · 2 years
Text
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम आली अंगलट , महिलेला रंगेहाथ धरले
शासकीय पदांवर महिलांची नेमणूक झाल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगण्यात येत होते मात्र प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून येत असल्याचे समोर येत आहे . कोल्हापूर पाठोपाठ अशीच एक घटना नांदेड येथे समोर आलेली असून सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना बिलोली नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक कमल पिराजी तुमडे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
पावसाने झोडपून काढले; जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 31 मि.मी. पाऊस
Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. आज सकाळपासून व्यवसायीक एकटेच आपल्या दुकानात बसलेेले आहेत. रस्त्यावरुन वाहणारी वाहतुक सुध्दा नगण्य झाली आहे. गावखेड्यांमध्ये नदी नाले भरून वाहत आहेत. अनेक गावांना ज���डणारे नदी-नाले भरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यात गुरुवार 27  जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी  31  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 468.60  मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवार 27 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (348), बिलोली-40.30 (575.90), मुखेड- 19.10 (484.50), कंधार-9.90 (233.70), लोहा-11.90 (329), हदगाव-25.30 (431.70), भोकर-57.90 (534.80), देगलूर-25.30(488.40), किनवट-78.30(693.70), मुदखेड- 28.60 (441.90), हिमायतनगर-43.30 (422.80), माहूर- 21.50 (705.60), धर्माबाद- 39.60 (537.90), उमरी- 34.50 (511.50), अर्धापूर- 25.90 (439.60), नायगाव-23 (376) मिलीमीटर आहे. Read the full article
0 notes
amhikastkar · 3 years
Text
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमी
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमी
औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी केवळ ८.२ मिलिमिटर पाऊस झाला. पावसाचा जोर कमी झाला. मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर, मुदखेड, अर्धापूर, उमरी आदी तालुक्‍यात सरासरी ३० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीतील औंढा तालुक्‍यात सरासरी ३३.२ मिलिमीटर पाऊस झाला.  नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्‍यात सरासरी २२.५ मिलिमिटर, बिलोली २१.८, मुखेड १०, कंधार १६.४, लोहा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
काँग्रेसचे आमदार अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन
काँग्रेसचे आमदार अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन
मुंबई/नांदेड-प्रतिनिधी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनानं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. करोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. आमदार रावसाहेब…
Tumblr media
View On WordPress
0 notes