#बदलाचे
Explore tagged Tumblr posts
news-34 · 3 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
योगामुळे समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग-पंतप्रधानांचं प्रतिपादन
दहावा योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा-मराठवाड्यात विविध ठिकाणी शिबीरांमधून योगाभ्यास
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका-मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
लोकपाल नियुक्त न केल्याप्रकरणी यूजीसीकडून परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासह १५७ विद्यापीठांना नोटीस
आणि
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
****
योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. गेल्या दहा वर��षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर योगाभ्यासात सहभागी झाले.
****
स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. मरीन ड्राईव्ह इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत, योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा, असं मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात योगदिनानिमित्त सर्वत्र योगाभ्यास आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला. भारतीय योग संस्था, यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं शहरात जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयं, पर्यटन विकास महामंडळ, आदी ठिकाणी योगशिबीरं घेण्यात आली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उप अधीक्षक वैभव पाटील, नाथा घारगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग, अंगुली मुद्रा विभाग आणि हस्ताक्षर तज्ज्ञ विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
मौलाना आझाद महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिशुविहार शाळा, आदी शैक्षणिक संस्थांमध्येही योगदिवस साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योग शिबिर घेण्यात आलं. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर या शिबीरात सहभागी झाले.
नांदेड इथं गुरूग्रंथ साहिबजी भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, यांच्या उपस्थितीत झालेल्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांन सहभाग घेतला.
जालना इथं पतंजली योग समिती, महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसंच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले. माजी र���ज्य मंत्री अर्जुन खोतकर, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले.
****
परभणी इथं जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजगोपालाचारी उद्यानात योगाभ्यास शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी, तसंच नागरिकांनी या शिबीरात योगाभ्यास केला.
हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं याठिकाणी योगासनं केली. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयातही योगशिबीर घेण्यात आलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जवळपास ६ हजा�� नागरिक सहभागी झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती केली.
****
बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी योगासनं केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा प्रशासन, आयुष विभाग, जिल्हा योग संघटना, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समितीच्या वतीने योगशिबिर घेण्यात आले. ४५० नागरिक, खेळाडू तसंच विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला इथं जलतरण पटूंनी जलतरण तलावात योगासने करुन योग दिन साजरा केला. ५ वर्षांच्या चिमुकलीपासून ८० वर्षे वयाचे अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले
****
महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्ता-आर्टीफिशल इंटेलिजंस 'एआय'चा वापर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. या सर्व व्यवस्थेतून देशातले महाराष्ट्राचे पोलीस दल एक आधुनिक दल होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले –
आर्टीफिशियल इंटेलिजंसचा उपयोग हा लॉ अँड ऑर्डर करता प्रेडीक्टीव्ह सिच्युयेशन्स करता आणि एखादा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता आपल्याला करता येणार आहे. यासंदर्भात जे काही मॉड्युल आपण तयार केलं, त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं. त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत, ते सजेशन्स इनकॉरपोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण प्रोजेक्ट रोल्डआऊट करणार आहोत, ��ोल आऊट करणार आहोत.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षण बचाओची हाक देत, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत, त्यांना हा दिलासा दिला. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. दरम्यान, आंदोलकांच्या वतीनं एक शिष्टमंडळ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिगृहात दाखल झालं आहे.
दरम्यान, अंबड तालुक्यातील शिवाजीनगरजवळ आज आंदोलकांनी छत्रपती संभाजी नगरहून बीड कडे जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून, आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातल्या १५७ विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि २ अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुंबईतलं एस एन डी टी विद्यापीठ, नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक इथलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, तसंच दोन खासगी विद्यापीठांसह एकूण नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून यूजीसीला त्याबाबत माहिती द्यावी, असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ’चा समारोप आज होणार आहे. या महोत्सवात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत संध्याकाळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाईल. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं चिखलफेक आंदोलन केलं. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला यावेळी चिखल फासण्यात आला. महागाई तसंच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, खते बियाणांचा कथित काळा बाजार, नीट परीक्षेत घोटाळा, आदी मुद्यांवरून या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलतांना सांगितलं.
****
वट सावित्रीप��र्णिमेच्या सणानिमित्त आज महिलांनी वडाच्या वृक्ष���चे पूजन करुन हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम पार पडले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातला टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर देण्याला सर्व शेतकरी सभासदांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सभेत, सभासदांचा रोष पाहताच, अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी काढता पाय घेतला. सभासदांनी सर्व संचालकांना घेराव घालत, सदरील ठराव नामंजूर असल्याचं सांगितलं. असा ठराव झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सभासदांनी दिला आहे.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 6 months ago
Video
youtube
राजाभाऊ वाजेना वाढता प्रतिसाद मतदारसंघात बदलाचे वारे..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड प्रक्रियेत बदलाचे संकेत
https://bharatlive.news/?p=88868 शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
कारमध्ये बदल करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला भरावा लागेल मोठा दंड
कारमध्ये बदल करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला भरावा लागेल मोठा दंड
नवी दिल्ली. जर तुम्हीही तुमची कार किंवा बाइक मॉडिफाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण कार मॉडिफाय करून घेण्याच्या प्रक्रियेत अनेकवेळा ते वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे तुम्हाला नंतर मोठी चलन भरावी लागते. असाच काहीसा प्रकार इंदूरचे धान्य व्यापारी विशाल डाबर यांच्यासोबत घडला आहे. वास्तविक, विशालने त्याच्या आलिशान कार बीएमडब्ल्यूचा रंग बदलला होता.…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान
चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान
का: येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन श्रीमती चेतना सिन्हा यांना अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. जागतिकहवामान बदलाचे परिणाम आज ग्रामीण भागामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा...
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा…
जग बदलवताना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच तुमच्या बोलण्याला नैतिकतेचं बळ मिळतं… तुमच्याकडे समाज बदलाचे प्रतीक म्हणून बघतो … असा बदल स्वतः मध्ये घडवून समाजापुढे रोल मॉडेल म्हणून उभं राहिलेल्या तरुणाला मागच्या आठवड्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या सांगण्यावरून… अहमदपूर तालुका कृषी अधिकारी भगवान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा...
उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तव्हा…
जग बदलवताना स्वतः बदलायला हवे, इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवताना, कौटुंबिक मूल्य सांगताना ते आपण पहिले पाळायला हवेत तरच तुमच्या बोलण्याला नैतिकतेचं बळ मिळतं… तुमच्याकडे समाज बदलाचे प्रतीक म्हणून बघतो … असा बदल स्वतः मध्ये घडवून समाजापुढे रोल मॉडेल म्हणून उभं राहिलेल्या तरुणाला मागच्या आठवड्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांच्या सांगण्यावरून… अहमदपूर तालुका कृषी अधिकारी भगवान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
रासायनिक खतांच्या अनुदानापोटी एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, आगामी खरीप हंगामात खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही 
राज्यातल्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून, आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना पूर्णपणे पायबंद घालण्याच्या विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदाचाळ उभारण्यासाठी अनुदान देण्याची मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जवर १४ धावांनी विजय
****
आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या अनुदानापोटी एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळे येत्या खरीप हंगामात खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नसल्याचं, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. २०२३च्या खरीप हंगामासाठी, पिकांसाठी आवश्यक विविध पोषण घटकांनुसार, पोषक तत्वावर आधारित अनुदानाच्या दरांमध्ये सुधारणा क��ण्यासाठीच्या प्रस्तावालाही मान्यता दिल्याचं ते म्हणाले. याअंतर्गत २०२३च्या खरीप हंगामात सरकारकडून, फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी ३८ हजार कोटी रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हार्डवेअर उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यासाठी १७ हजार कोटी रुपये निधी जारी करण्यात आला असून, या योजनेचा कार्यकाळ सहा वर्ष असेल.
****
केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असून, कृषी तसंच पायाभूत सुविधा क्षेत्राच्या उत्थानाला मदत मिळत असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत लाभार्थी संमेलनात मार्गदर्शन करत होते. गेल्या सरकारला चालू करता न आलेल्या विविध योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचं, ते म्हणाले. दरम्यान, नड्डा यांचं दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर काल आगमन झालं, ते आज पुण्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्यातल्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून, त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला काल नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबी शहरातून अटक केली. नीरज सिंह राठोड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यानं आपण भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे विश्वासू असल्याचं भासवत, भाजपा आमदार विकास कुंभारे यांना दूरध्वनी केला होता, आणि मंत्रिपद मिळवून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली होती. कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे, नीरज सिंह राठोड याला अटक करण्यात आली. नीरज यानं कोणकोणत्या आमदाराशी संपर्क करून फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधीही त्यानं गोवा आणि नागालँडमधेही अनेक आमदारांची अशाच रितीनं फसवणूक केली असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
****
दूरसंचार सेवा प्रदाते - टी एस पी यांनी जारी केलेले मुंबईतले ३० हजारापेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल क्रमांक, दूरसंचार विभागानं शोधून काढले आहेत. ग्राहकांच्या माहिती केंद्रातून पडताळणी केली असता, ६२ समूहांमध्ये एकाच छायाचित्राचा वापर करून, वेगवेगळ्या नावाने मोबाईल क्रमांक घेण्यात आल्याचं आढळून आलं. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टलचं उद्घाटन केल्यानंतर, मुंबईतल्या दूरसंचार विभागाचे अतिरिक्त महासंचालक एच. एस. जाखड या��नी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली.
****
वायू प्रदुषण आणि वातावरण बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी पवन ऊर्जा हा उत्तम पर्याय असल्याचं, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भुपिंदर सिंग भल्ला यांनी म्हटलं आहे. जी - 20 अंतर्गत ऊर्जा संक्रमण कार्य समूहाच्या तिसऱ्या बैठकीचा काल मुंबईत समारोप झाला, त्यापूर्वी या बैठकीत, पवन ऊर्जेवरच्या परिसंवादात भल्ला बोलत होते. पवन ऊर्जेच्या वापरामुळे रोजगार निर्मितीही होईल, असं ते म्हणाले. ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जलविद्युत आणि आण्विक ऊर्जेसारखीच क्षमता पवन ऊर्जेमध्ये असल्याचं सांगितलं.
****
पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून जमिनीत जिरवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, तसंच जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, आदी योजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. हे अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमधले प्रदूषणकारी घटक कमी करणं, तसंच त्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या गणपती मूर्तिकार तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या समितीत जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी आणि न्याय, या विभागांचे प्रधान सचिव, सदस्य म्हणून, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करतील. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करेल.
दरम्यान, राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील एक समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
****
गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना पूर्णपणे पायबंद घालण्याच्या सूचना, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नीरा इथं गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी हे निर्देश दिले. असे प्रकार रोखण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांनी शासनाच्या सर्व ��ंबंधित खात्यातल्या अधिकाऱ्यांची कारवाई पथकं तयार करावीत, सोनोग्राफी केंद्रांमध्ये सोनोग्राफीपूर्वीचा फॉर्म -एफ भरला असल्याबद्दल या पथकांनी खात्री करून घ्यावी, पी सी पी एन डी टी आणि गर्भपात विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, जिल्हा तसंच तालुका स्तरावर लोकप्रतिनिधीची एक समिती स्थापन करावी, अशा सर्व तक्रारीची, माहितीची प्राथमिक चौकशी नियमितपणे करून, त्या संबंधीचा अहवाल दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध करावा, आदी सूचना गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
****
५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स, तसंच पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदाचाळ उभारण्यासाठी, एक लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी ही माहिती दिली. यामध्ये अकुशल कामासाठी ९६ हजार २२० रुपये मजुरी, कुशल कामासाठी ६४ हजार १४७ रुपये मजुरी आणि अधिक साहित्यासाठी लागणारा खर्च, असं एकूण एक लाख ६० हजार ३६७ इतकं अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम दोन लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातल्या ४६ ग्रामपंचायतीच्या ५० रिक्त पदांसाठी ही निवडणूक होत असून, सकाळी साडे सात वाजेपासून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना कामातून तीन तासाची सवलत देण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी दिले आहेत. ही सवलत खासगी कंपन्या, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींना लागू राहतील.
****
दहा रुपये मूल्याचं चलनात असलेलं नाणं कोणीही नाकारू नये, असे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. हे नाणं नाकारल्यास पोलिसात गुन्हा दाखल होऊन कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ते म्हणाले...
‘‘सर्व व्यापारी संघटनांचे निवेदन आमच्या प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये असं लक्षात यायला लागलं की दहा रूपयाचं जे नाणं आहे, आपल्याकडचे दुकानदार पण स्वीकारत नाही आणि बँकामध्ये गेल्यावर पण स्वीकारत नाही. तर माझी पहिल्या��दा ग्राहकांना सूचना राहील त्यांनी प्रत्येकानं ते नाणं स्वीकारलं पाहिजे. जर नाणं कुणी नाकारलं तर त्याच्याविरूद्‌ध भारतीय दंडविधान एकशे चोवीस च्या तरतुदी अन्वये त्यांच्याविरूद्‌ध गुन्हा दाखल करता येतो.’’
****
नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी जून आणि जुलै या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात, वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून बचावण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयानं हे दामिनी ॲप तयार केलं असून, हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. वीज पडण्याचा १५ मिनीट आधी ॲपमध्ये सूचना मिळते, अशी सूचना मिळताच, सुरक्षित स्थळी जावं, त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेनं पाच जून पूर्वी शहरातल्या सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. गेल्या १२ दिवसांपासून शहरात स्वच्छतेची कामं गतीने केली जात आहेत, लातूर मनपाच्या कार्यक्षेत्रात ५० मोठे तसंच लहान ६५ असे एकूण ११५ नाले आहेत. या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी मनपाने दोन मोठे तसंच चार छोट्या जेसीबीसह पाच हायवा अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
****
‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम येत्या १५ जूनपर्यंत राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातल्या ७५ हजार पात्र लाभार्थ्यांपर्यत शासन योजनांचा लाभ पोहचवण्यात येत आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात २०० हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी, कमीत-कमी कागदपत्रं सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभाग आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभागामार्फत, या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातल्या किमान ४५ हजार नागरिकांना विविध सेवा देण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीतर्फे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यान आणि इतर उपक्रम राबवले जातात. यानिमित्त काल उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम हा विषय महाविद्यालयीन आणि माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणं तसंच आंबेजवळगा, आ��णी, चिखली आणि केशेगाव, या ठिकाणी स्मृतिस्तंभ उभे करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकारी ओंबासे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं.
****
परभणी जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागांकडून प्रत्येकी १० अशा एकूण ५० चॅम्पियन्स नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल याबाबतच्या बैठकीत ही माहिती दिली. सर्व विभागांनी नियुक्त करण्यात येणाऱ्या या चॅम्पिअन्सची नावं आणि संपर्क क्रमांक तत्काळ कळवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ५७ बालविवाहांची माहिती महिला आणि बालविकास विभागाला मिळाली. त्यापैकी ४५ बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं असून, यापैकी २५ प्रकरणांची माहिती बाल कल्याण समितीकडं सादर करण्यात आली आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ मे, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जून पासून सुरु होणार आहेत. दोन्ही मिळून ३२ अभ्यासक्रमांसाठी ७८ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या परिक्षा २१ मार्च ते १६ एप्रिल या काळात घेण्यात आल्या असून, उत्तरपत्रिका मुल्यांकनाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जवर १४ धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात दोन गडी गमावत २१३ दावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात आठ गडी गमावत १९८ धावाच करु शकला.
****
जल पुनर्भरणाबाबत जनमानसामध्ये व्यापक स्वरूपात जागृती करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केल्या आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलपुनर्भरणाबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नागरिकांनी छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी जलपुनर्भरण उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवावा, व्यासायिकांनीही जलपुनर्भरणाची कामं येत्या ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, या कामांना आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
0 notes
mahampsc · 3 years ago
Text
Editorial page Liquid oxygen AGR Extension of recovery Promote competition or investment in the telecom sector akp 94 | लिक्विड ऑक्सिजन!
Editorial page Liquid oxygen AGR Extension of recovery Promote competition or investment in the telecom sector akp 94 | लिक्विड ऑक्सिजन!
‘एजीआर’ वसुलीस मुदतवाढ असो वा कंपनलहरी- यांबाबतचे निर्णय आमूलाग्र बदलाचे नसल्याने दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा वा गुंतवणुकीला चालना मिळेलच असे नाही… ताज्या सुधारणा १०० टक्के परकीय गुंतवणुकीचे आमिष दाखवतात. पण आपल्या नियमनसातत्याच्या अभावामुळे या क्षेत्रात, एखादा अपवाद वगळता, कोणी फारसे पैसा ओतण्यास तयार नाहीत… ‘दूरसंचार क्षेत्रास संजीवनी’ मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उपायांचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ…
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ…
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ… नवी दिल्लीः काँग्रेसची आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा आता काही दिवसांनी राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकारणात आता बदलाचे वारे फिरू लागले आहे. राहुल गांधी आता राजस्थानमध्ये दाखल होण्याआधीच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी आपल्यात वाद संपवण्याचे संकेत दिले आहेत. या राजकीय…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, साहानंतर आता इशांत शर्मावर टांगती तलवार
टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, साहानंतर आता इशांत शर्मावर टांगती तलवार
इशांत शर्मा रणजी करंडक २०२२: इशांत शर्माने रणजी ट्रॉफीमधून माघार घेण्याच्या तयारीत असताना, ऋद्धिमान साहाने आधीच आपले नाव मागे घेतले आहे आणि अनेक दिवसांपासून स्तब्ध राहिलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यापुढे सुरळीत रस्ता नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय कसोटीत बदलाचे युग सुरू झाले आहे का? याचे उत्तर काही प्रमाणात श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मायदेशातील कसोटी मालिकेत मिळेल. रणजी…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - महासंवाद
निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – महासंवाद
           मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.             वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
बारामती नगरपरिषदेचे 'माझी वसुंधरा अभियान २.०' मधील यश
बारामती नगरपरिषदेचे ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ मधील यश
वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने  ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात आले होते. दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये   बारामती नगरपरिषदेने  राज्यात  नगरपरिषद गटात तिसरे  स्थान पटकावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती शहरातील  वृक्ष लागवडीवर नेहमीच भर असतो. सोबत पर्यावरणपूरक कामांवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
युरोपमध्ये महापुरामुळे विध्वंस
नद्यांचा मार्ग बदलला : युरोपमधील जर्मनी, बेल्जियम आणि स्वित्झर्लंडमध्ये पावसाचा तडाखा 180 जण ठार, 1500 पेक्षा जास्त बेपत्ता बर्लिन : हवामान बदलाचे परिणाम आता जगात दिसून येत आहेत. युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये या दिवसात पूरस्थिती आहे. याचा सर्वाधिक परिणाम जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड्समध्ये दिसून येत आहे. युरोपमध्ये महापुरामुळे विध्वंस झाला आहे. रविवारी सकाळपर्यंत संततधार पावसामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागेल
प्रत्यक्ष राबणाऱ्या हातांच्या मदतीला जावे लागेल
नेपाळची सीमा, हिमालयात सतत होण��रे वातावरणीय बदल यामुळे बिहारवरील हवामान बदलाचे संकट यापुढेही वाढतच जाणार आहे. म्हणून शेतीवाडी सोडून कुटुंबासह स्थलांतर करण्याचा पर्याय सोपा असला तरी योग्य नव्हे, हे शेतकऱ्यांना पटवले पाहिजे. अशा वेळी कार्यरत असलेल्या विद्यापीठांसह सर्व संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे महत्त्वाची ठरणार आहे. कारण केवळ पुस्तकी धडे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार नाहीत. प्रत्यक्ष शेतात…
Tumblr media
View On WordPress
0 notes