Tumgik
#बच्चनने
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका
मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका
मनिष मल्होत्राच्या पार्टीत श्वेता बच्चनने वेधले सर्वांचे लक्ष, तिच्या पुढे मलायकाचा ग्लॅमरस अंदाजपण फिका फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी स्टारच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतील प्रत्येकाची स्टाईल अतिशय क्लासी दिसत होती. मलायका अरोरा, करीना कपूर, गौरी खान, जान्हवी कपूर ते सारा अली खान…
View On WordPress
0 notes
swati2shah · 3 years
Text
Happy Birthday to You Dear Amitabh ji Stay healthy and always happy. Love u forever. One and only golden moment of my life with you
एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.
एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.
सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.
नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.
हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.
सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.
पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे. त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला. मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.
पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.
असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेव्हडे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते. संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.
बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे ��ाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.
किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.
त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कम्पोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.
अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.
बच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आप को अभी और बहोत काम करना है, क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!
Feel free to share
Tumblr media
4 notes · View notes
dks91 · 2 years
Text
Abhishek Bachchan Described To Wife Aishwarya Rai Bachchan's Beauty In An Interview With Oprah Winfrey Might Strengthen The Bond Between Husband And Wife. | ‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीसोबत लग्न करून कसं वाटतंय?’ यावर अभिषेक बच्चनने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल थक्क..!
Abhishek Bachchan Described To Wife Aishwarya Rai Bachchan’s Beauty In An Interview With Oprah Winfrey Might Strengthen The Bond Between Husband And Wife. | ‘जगातील सर्वात सुंदर स्त्रीसोबत लग्न करून कसं वाटतंय?’ यावर अभिषेक बच्चनने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल थक्क..!
अभिषेक बच्चनच्या (Abhishek bachchan) आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे त्याला खुद्द जन्म देणारे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) अर्थात त्याचे पिता आणि त्याची स्वप्नसुंदरी बायको ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan)! महानायकाचा मुलगा असून सुद्धा अमिताभ बच्चन या नावासारखं वलय आपल्या भोवती निर्माण करण्यात अभिषेक पुरता अपयशी ठरला. ते म्हणतात ना बाप प्रसिद्ध असेल तर तसाच बेटा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
अमिताभ बच्चन ने लता मंगेशकर को उनके थ्रोबैक वीडियो - टाइम्स ऑफ इंडिया के साथ याद किया
अमिताभ बच्चन ने लता मंगेशकर को उनके थ्रोबैक वीडियो – टाइम्स ऑफ इंडिया के साथ याद किया
महान गायक का निधन लता मंगेशकरी एक खालीपन छोड़ गया है जिसे कभी भरा नहीं जा सकता। रविवार की सुबह जब उन्होंने अंतिम सांस ली तब से देश भर के लोग शोक में हैं। कई अन्य लोगों की तरह, मेगास्टार अमिताभ बच्चनने भी भारत की कोकिला को श्रद्धांजलि दी। करने के लिए ले जा रहा है instagramबिग बी ने लता मंगेशकर का एक थ्रोबैक वीडियो शेयर किया। क्लिप में, वह एक पुरस्कार समारोह के दौरान मंच पर लता मंगेशकर का स्वागत…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Text
ऐश्वर्या- आराध्याची करोना टेस्ट निगेटिव्ह, अभिषेक बच्चनने दिली माहिती
ऐश्वर्या- आराध्याची करोना टेस्ट निगेटिव्ह, अभिषेक बच्चनने दिली माहिती
[ad_1]
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असून त्यांना नानावटी इस्पितळातून घरी सोडण्यात आले आहे. अभिषेक बच्चनने यासंबंधी ट्वीट करत माहिती दिली. यासोबतच तो आणि वडील अमिताभ बच्चन अजूनही इस्पितळात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुशांतचे ५० सिम कार्ड आणि रहस्यमयी मृत्यूवर प्रश्न
अभिषेकने ऐश्वर्या आणि आराध्याच्या…
View On WordPress
0 notes
unitysamachar · 4 years
Text
भूमि पेडनेकर के इस कमेंट से चकरा गए अमिताभ बच्चन, पूछा- आखिर इसका क्या मतलब है?
भूमि पेडनेकर के इस कमेंट से चकरा गए अमिताभ बच्चन, पूछा- आखिर इसका क्या मतलब है?
Tumblr media
Image Source : INSTAGRAM भूमि पेडनेकर ने अमिताभ बच्चन की पोस्ट पर किया कमेंट
बॉलीवुड के महानायक अमिताभ बच्चनने हाल ही में एक पुरानी फोटो शेयर की, जो करीब 44 साल पुरानी है। उन्होंने इस तस्वीर के जरिए उन्होंने खुद की तुलना करते हुए अपनी ही खिंचाई की है। बता दें कि उनकी एक और फिल्म ‘गुलाबो सिताबो’ जल्द ही ऑनलाइन प्लेटफॉर्म पर रिलीज होने वाली है, जिसकी…
View On WordPress
0 notes
filmigaze-blog · 6 years
Photo
Tumblr media
KBC 10: बच्चन की सलाह बावजूद न मानी महिला, कर बैठी 9 लाख का नुकसान कौन बनेगा करोड़ पति की हॉट सीट पर शुक्रवार को महाराष्ट्र की सोनाली घुदल बिराजमान हुई थी। सोनाली एक बस कंडक्टर है। जिसने 20 हजार तक के सवाल के जवाब में ही 3 लाइफ लाइन यूज करली थी। और चौथी लाइफ लाइन 12.50 हजार रूपैये के जवाब के लिये यूज कि थी। 25 लाख रूपैये के लिये सवाल पूछा गया तब अमिताभ बच्चनने सोनाली को एक सलाह दी थी। लेकिन लालच में आकर सोनाली 9 लाख रूपैये का नुकसान कर बैठी। 25 लाख के सवाल का सोनाली ने गलत जवाब दिया और 9 लाख का नुकसान कर बैठी। शो में से सोनाली सिर्फ 3.20 लाख रूपैये ही समेट पाई। सोनाली को प्रश्न किया गया था की नासा ने किसके नाम से चंद्रा सेटेलाईट भेजा था। जिसका जवाब था सुब्रामण्यम चंद्रशेखर. हालाकी सोनाली गलत जवाब दे बैठी। यह भी पढेंः हॉलीवुड की यह 5 वॉर फिल्म जबरदस्त है
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Text
ट्विटर हॅकिंगचं सत्र सुरूच, अनुपम खेरनंतर अभिषेक बच्चनचे ट्विटरही हॅक..
ट्विटर हॅकिंगचं सत्र सुरूच, अनुपम खेरनंतर अभिषेक बच्चनचे ट्विटरही हॅक..
प्रतिनिधी /मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या ट्विटर हॅकिंग नंतर आता अभिषेक बच्चनचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. तुर्की सायबर आर्मी ‘अयिल्दिज टीम’ने ज्युनिअर बच्चनचं अकाऊंट हॅक केले, त्यानंतर हॅकर्सनी कव्हर फोटो बदलत एका मिसाइलचा फोटो वापरला होता, ज्यावर ‘अयिल्दिज टीम’ असं लिहिले होते. यानंतर ट्विटरने लक्ष घालत हॅक झालेलं अकाऊंट पुर्ववत केलं. अभिषेक बच्चनने यानंतर अकाऊंटवरुन ट्विटरचे आभार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर अभिषेक बच्चनने केले वक्तव्य, म्हणाला…
दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर अभिषेक बच्चनने केले वक्तव्य, म्हणाला…
दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर अभिषेक बच्चनने केले वक्तव्य, म्हणाला… सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ‘बाहुबली’ नंतर ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांनी सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षक पसंती देतात. यामुळे मुंबईतील चित्रपट निर्मात्यांवरही टीका होत आहे. आता यावर अभिनेता अभिषेक बच्चनने…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“बाप , बाप होता है और…”, नेटकऱ्याने वडिलांशी तुलना केल्यानंतर अभिषेक बच्चनने दिले मजेशीर उत्तर
“बाप , बाप होता है और…”, नेटकऱ्याने वडिलांशी तुलना केल्यानंतर अभिषेक बच्चनने दिले मजेशीर उत्तर
“बाप , बाप होता है और…”, नेटकऱ्याने वडिलांशी तुलना केल्यानंतर अभिषेक बच्चनने दिले मजेशीर उत्तर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक गेल्या काही दिवसांपासून दसवी या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा अभिनय बिग बींना प्रचंड आवडला. त्यानंतर बिग बींनी अभिषेकला त्याचा उत्तराधिकारी घोषित केले. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी अभिषेकची तुलना अमिताभ यांच्याशी केली.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे. आराध्याने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
श्वेता बच्चनने शेअर केला आई आणि मुलीसोबतचा खास फोटो, म्हणाली “तू…”
श्वेता बच्चनने शेअर केला आई आणि मुलीसोबतचा खास फोटो, म्हणाली “तू…”
श्वेता बच्चनने शेअर केला आई आणि मुलीसोबतचा खास फोटो, म्हणाली “तू…” देशातील उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीचे नुकतेच लग्न झाले. अनमोलने क्रिशा शाहसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नात अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनिल आणि टीना अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो नव्या नवेली नंदा आणि…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“मी तिच्या गालाला स्पर्श…”, रणबीर कपूरने सांगितला ऐश्वर्या रायसोबत रोमान्स करतानाचा ‘तो’ अनुभव
“मी तिच्या गालाला स्पर्श…”, रणबीर कपूरने सांगितला ऐश्वर्या रायसोबत रोमान्स करतानाचा ‘तो’ अनुभव
“मी तिच्या गालाला स्पर्श…”, रणबीर कपूरने सांगितला ऐश्वर्या रायसोबत रोमान्स करतानाचा ‘तो’ अनुभव अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अभिनयाने आणि सौदर्याने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. सिनेसृष्टीतील क्वचितच एखादा अभिनेता असेल ज्याने ऐश्वर्या रायसोबत काम करण्याचे स्वप्न पाहिले नसेल. अभिनेता रणबीर कपूरचे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले. रणबीर कपूरने ऐश्वर्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार
अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार
अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याशी लग्न केले असून त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. पण तुम्हाला माहितीये बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांची इच्छा होती की त्यांची मोठी मुलगी ईशाने अभिषेकशी लग्न केले पाहिजे. त्यावर ईशा त्यांची ही इच्छा…
View On WordPress
0 notes