#प्रश्नावर
Explore tagged Tumblr posts
dakshadev · 1 month ago
Text
Tumblr media Tumblr media
आज मतदारसंघातील सर्व चर्मकार समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.उपस्थित राहुन भेटून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या विविध ��्रश्नावर चर्चा केली.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सायबर सुरक्षा हा देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. 
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा.
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू.
****
सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त दिलीप पावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांनी राज्यपालांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांनी शहरातल्या सुभेदारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्याचे ���ालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात राज्यभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांशी पाणी प्रश्नावर आपण चर्चा केली, तसंच वैधानिक विकास महामंडळा विषयी देखील चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांनी जळगाव इथं लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जळगाव जिल्हा सुवर्णालंकार व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं.  जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावं, राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचं रखडलेलं काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावं. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा असं राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.
****
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेची पोलिस कोठडी १३ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुख्य संशयित जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली, न्यायालयानं ती क��ही अंशी मान्य करत, १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू. राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. मात्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे तसंच संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आठ हजार ६०३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नाही तसंच आता लोकसंख्या वाढली असल्याने नाशिक जिल्ह्यालाच पुरेसं पाणी उपलब्ध नाही, असं सांगत, आमदार फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, समन्यायी पाणी वाटपाच्या पुनर्विलोकनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी अभ्यास करून पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश न्यायालयाने दिल्याचं, आमदार फरांदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. महात्मा फुले पुतळा इथून संवादयात्रा रॅली काढण्यात आली. यावेळी भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना अर्थसंकल्पीय तरतूद, जातिनिहाय जनगणना, प्रशिक्षण संस्था अशा एकूण १७ मागण्यांसाठी ही ��ात्रा काढण्यात आली आहे.
****
प्राथमिक शिक्षक पदाकरिता केवळ पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा महाटीईटी’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिक्षण सेवकशिक्षक या पदांकरिता १० नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-१ घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-२ दुपारी २ ते साडे चार वाजे दरम्यान होणार आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३३ पूर्णांक ३९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यतल्या उर्वरीत १३१ पात्र शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी थेट हस्तांतरण योजना अर्थात डीबीटी द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रं लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Chinchwad : अटक करण्‍याची धमकी देत एक कोटी रुपयांची फसवणूक
एमपीसी न्यूज – फ्राॅड केसमध्‍ये अटक करण्‍याची भिती दाखवत (Chinchwad)एका ज्‍येष्‍ठ नागरिकाची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे 4 ते 9 सप्टेंबर 2024 रोजी घडली. याप्रकरणी 60 वर्षीय ज्‍येष्‍ठ नागरिकाने सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम…
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
*कासरा च्या मुख्य भूमिकेत जालन्याचा जनमेजय तेलंग!*निलम चित्रपट गृहात  प्रिमियर शो*
Jalna’s Janamejay Telang starring Kasara!Premier Show at Neelam Cinema* जालना ( प्रतिनिधी) :  शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित “कासरा” या चित्रपटात जालना शहरातील उभारता अभिनेता जनमेजय भागीरथ तेलंग हा मुख्य भूमिकेत दिसणार असून खास जालनेकरांसाठी रविवारी ( ता. 26) दुपारी 12.00 वा.रेल्वे स्थानक मार्गावरील निलम चित्रपट गृहात  विशेष प्रिमियर शो चे आयोजन करण्यात आले आहे. जूना जालना भागातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
आरक्षणाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया.. #ajitpawar #manojjarange...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन
https://bharatlive.news/?p=188703 धाराशिव : महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर दुष्काळाच्या प्रश्नावर ...
0 notes
nagarchaufer · 1 year ago
Text
निवडणूक नसताना जनहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी कसे वागले ? , नगर चौफेर एक्सक्लुसिव्ह
निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे मतांसाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आणि उमेदवार इतर वेळी आपल्या मतदारांसोबत आणि न���गरिकांसोबत कशा स्वरूपाचे वर्तन करतात याच्यासाठी नगर चौफेर न्यूज प्रतिनिधीकडून परिसरातील लोकप्रतिनिधींना संपर्क करून एक रिपोर्ट बनवण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन लोकप्रतिनिधींकडे उपस्थित केलेला विषय लोकहिताचा असून या प्रश्नावर लोकप्रतिनिधी यांचे वर्तन आपल्याला कितपत योग्य वाटते याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
--II ● विवेक विचार ● II--
केवळ शारीरिक साहाय्य करून लोकांच्या दुःखांचा नायनाट करणे अशक्य आहे. जोपर्यंत माणसांची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे सारे शारीरिक अभाव उद्भवणारच, सारे कष्ट होणारच. दुनियेतील या दुःखांच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा म्हणजे अखिल मानवजातीला पवित्र बनवणे, सक्षम, सा़क्षर, आत्मनिर्भर, अध्यात्मिक बलसंपन्न, सामर्थ्यशाली बनवणे, स्वतःच्या पायावर उभे करणे तरच जगातून दुःख नाहीसे होईल. देशातील प्रत्येक घर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
कृषीमंत्र्यांनी मागितली शेतक-यांची जाहीर माफी
Tumblr media
सिल्लोड : शेतमालाला भाव नाही, खतं खरेदी करताना जात टाकावी लागणं अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या राज्यातला शेतकरी सामोरा जातो आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतक-यांन मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांची माफी मागितली आहे. सत्तार म्हणाले, नाफेडची सध्या ४० केंद्र सुरू आहेत. कांद्याला सध्या नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. हे युक्रेन रशियाच्या युद्धामुळे होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याबद्दल विचार कर�� आहे. पण अधिवेशन संपण्याच्या अगोदर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. रासायनिक खतं खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये शेतक-यांना जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची कार्यवाही करत नाही. हा मुद्दा काल अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी मांडला. त्यावरुन चर्चाही झाली. आपण याबद्दल केंद्र सरकारला कळवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याच मुद्यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, खत खरेदी करत असताना जातीचा उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय होईल. शेतक-यांची माफी मागताना सत्तार म्हणाले, ‘शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. त्यामुळे मी शेतक-यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघेल.' Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास वाळू मोफत
गोंदिया/भंडारा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अन��क लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत, मात्र बांधकामासाठी लागणार्‍या वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत. या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी, मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त देशभरात सर्वत्र आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संत कबीर आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातलं हातमाग क्षेत्राचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
****
महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात बहुराज्यीय सहकारी संस्थांकडून, पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा, मुद्दा काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत उपस्थित केला. मराठवाड्यात बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी, कामगार, मजूर तसंच गरीब आणि ज्येष्ठांकडून अनेक बहुराज्यीय सहकारी संस्थांमध्ये पैसे गुंतवण्यात आले, मात्�� या संस्था बंद पडल्यानं, खातेदार आणि ठेवेदार अडचणीत सापडले आहेत. या कंपन्या बहुराज्यीय असल्यानं राज्य सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याचं सांगत, या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी रजनी पाटील यांनी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असं आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणना करणं आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे ही आरक्षणा संबंधीची काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन लाख ८७ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी दोन लाख ७६ हजार ९४१ अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, १४ हजार ७२६ अर्ज तात्पुरते बाद झाले आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव ओबीसी यात्रा काल बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथं पोहोचली. ओबीसी च्या घटकांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला प्रवर्गाला साथ द्यावी, हा प्रवर्गही तुम्हाला साथ देईल, त्यामुळे आरक्षणाला धोका निर्माण होणार नाही, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Charholi : चऱ्होलीकरांच्या पाणी प्रश्नावर सक्षम तोडगा काढणार - अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज –  चऱ्होली परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गावठाणाबरोबरच येथे  अनेक गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या( Charholi) असून,  साधारण 20 हजार नागरिक या परिसरात वास्तव्याला आहेत. हा परिसर वेगाने विकसित होत असताना येथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणीटंचाईचे कारण आहे.  पाणीटंचाईपासून येथील नागरिकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने…
0 notes
crime-chovis-tass · 2 years ago
Text
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात बोनस देऊन शासन न्याय देईल - आ. डॉ. परिणय फुके
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात बोनस देऊन शासन न्याय देईल – आ. डॉ. परिणय फुके
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक पुढाकार घेतला.. नागपूर. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. येथे खरीप आणि रब्बी हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी बियाणे, खते, औषधांच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीच्या खर्चात झालेली वाढ, डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना पिकांवर जास्त खर्च करावा लागला. याशिवाय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नावर ६ ऑक्टोबरला सुनावणी!
https://bharatlive.news/?p=149112 राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नावर ६ ऑक्टोबरला सुनावणी!
राज्याच्या ...
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
पदवी परीक्षेची फैसला ३१ जुलैला
पदवी परीक्षेची फैसला ३१ जुलैला
[ad_1]
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारख्या अव्यावसायिक शाखांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र/अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिकेवर आता ३१ जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, या याचिकेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती…
View On WordPress
0 notes