#पॉझिटिव्ह’
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यास रिझर्व्ह बँकेची मंजुरी
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण
आणि
बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश, आयोगानं या पत्रात दिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी परवा २५ मे रोजी देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात मतदान होत आहे. या सर्व मतदार संघातला प्रचार आज सायंकाळी संपणार आहे.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी द्यायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राखीव निधी साडेसहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णयही बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतला आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला काल बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यावर दारू पिऊन कार चालवल्या बद्दल कलम १८५ अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, संबंधित बारचे चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर अशा तिघांना काल सत्र न्यायालयानं २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, गंभीर गुन्ह्यातून अल्पवयीन आरोपींची सुटका होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी, ही वयोमर्यादा १६ वर्षे करावी अशी मागणी, महाराष्ट्र पोलीस मित्र सघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या केपी टू या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. हा जे एन वन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेन्सिकग केलं असता, ७० टक्के नमुने केपी टू पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
****
बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांची अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण पूर्वीइतकीच आजही प्रासंगिक असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यात शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली आहे.
****
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यंदाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार', कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना घोषित झाला आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञा�� पुरस्कारासाठी, भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे डॉ. सुहास जोशी यांची निवड झाली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार' अभिनेता रणदीप हुड्डा यांना, तर 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार' यंदा विद्याधर जयराम नारगोळकर यांना घोषित झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ, तर बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातल्या महसुली मंडळांमध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिज��. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.
****
उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्यानं धाराशिव शहराला पुढील काही दिवस नऊ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्याच्या पावसाळी वातवरणामुळे शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा खंडित होत असल्यानं देखील, नियमित पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचं, प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन, उजनी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून, कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभगानं काल केलेल्या दोन कारवायांमध्ये एका कार्यकारी अभियंत्यासह २ खाजगी अभियंत्यांना लाच घेताना जेरबंद केलं, तर एक नगर रचनाकार फरार झाला.
बीड जिल्ह्यात अकृषिक परवान्याच्या पोर्टलवर आलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रभारी नगर रचनाकार प्रशांत डोंगरे यानं ३० हजार रुपयाची लाच मागितली होती. मदतनीस शेख निहाल शेख अब्दुल गनी आणि खासगी अभियंता निलेश पवार यांना ही लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आलं. मात्र डोंगरे हा फरार झाला.
अन्य एका कारवाईत परळी वैजनाथ पाटबंधारे विभाग वर्ग एक चा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ हजार रुपयांची लाच घेताना काल सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. चिंचोटी तलावातला गाळ आणि माती काढून सात शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याची परवानगी मिळण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरता पाच हजार रुपये लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात रॉजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. या स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना उद्या शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि सनाराईजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळेल.
****
जपानच्या कोबे इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक प्रकारात भारताच्या सचिन खिलारीनं सुवर्ण पदक पटकावलं. सचिननं पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात १६ पूर्णांक ३० मीटर गोळा फेकत, नवीन विक्रम प्रस्थापित केला.
****
हवामान
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड ��थं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text
केरळमध्ये वटवाघळांवर केलेल्या 'निपाह' चाचण्या पॉझिटिव्ह
https://bharatlive.news/?p=177619 केरळमध्ये वटवाघळांवर केलेल्या 'निपाह' चाचण्या पॉझिटिव्ह
पुढारी ...
0 notes
Text
Kirron Kher | किरण खेर यांना कोरोनाची लागण; ट्विट करत प्रकृतीबाबत दिली माहिती - anupam kher wife Kirron Kher tests positive for Covid 19 details inside
बॉलिवूडशिवाय किरण खेर यांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ यांसारख्य�� मालिकांमध्ये काम केलं. या व्यतिरिक्त त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या परीक्षकपदाची धुराही सांभाळली आहे.
Kirron Kher Image Credit source: Facebook मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. 20 मार्च रोजी किरण खेर यांनी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी लिहिलंय. Read the full article
0 notes
Text
Voice Of Media | 'व्हॉइस ऑफ मीडिया'चे लाखोंचे पुरस्कार!
‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ची घोषणा सकारात्मक पत्रकारितेचे नवे पर्व राज्यातील सर्व पत्रकारांसाठी स्पर्धा गोंदिया : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत…
View On WordPress
0 notes
Text
अंबानींचा मुलगा अनंत यांना कोरोनाची लागण, काल शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेतली होती
अंबानींचा मुलगा अनंत यांना कोरोनाची लागण, काल शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेतली होती
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली. अनंत अंबानी मुकेश अंबानी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी कोरोना झाला आहे. ते कोविड 19 पॉझिटिव्ह सापडले आहेत. आणखी एक मोठी चिंतेची बाब म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजेच १ ऑगस्ट रोजी,…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची पुन्हा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची पुन्हा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
“हे खरं तर ‘रिबाउंड’ सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करते,” असे राष्ट्रपती डॉक्टर म्हणाले. (फाइल) वॉशिंग्टन: जो बिडेन दुसर्यांदा कोविड -19 साठी सकारात्मक चाचणी घेत आहेत आणि ते अलगावमध्ये परत येत आहेत, असे त्यांच्या व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी शनिवारी सांगितले, अमेरिकेच्या अध्यक्षांना मिळालेल्या उपचारांमुळे “रीबाउंड” सकारात्मकतेचे श्रेय दिले गेले. सलग चार दिवसांच्या नकारात्मक चाचण्यांनंतर, 79 वर्षीय…
View On WordPress
#अमेरिकेचे अध्यक्ष#कोविड पॉझिटिव्ह जो बिडेन#जो बिडेन#जो बिडेन कोविड अपडेट#जो बिडेन कोविड पॉझिटिव्ह#जो बिडेन कोविड बातम्या#जो बिडेन कोविड-19#जो बिडेनची कोविड चाचणी झाली
0 notes
Text
या स्टार खेळाडूंशिवाय उतरणार टीम इंडिया, केएल राहुल लग्नामुळे पहिला वनडे खेळणार नाही
या स्टार खेळाडूंशिवाय उतरणार टीम इंडिया, केएल राहुल लग्नामुळे पहिला वनडे खेळणार नाही
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1ली वनडे: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवार, ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी टीम इं���ियाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वरिष्ठ सलामीवीर शिखर धवन, राखीव सलामीवीर रुतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कारणामुळे तो पहिल्या वनडेत टीम इंडियाचा…
View On WordPress
#odi मालिका#अहमदाबाद वनडे#ऋतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह#एकदिवसीय मालिका#केएल राहुल#केएल राहुल अपडेट#केएल राहुल पहिला वनडे का खेळणार नाही?#केएल राहुल पहिला वनडे खेळणार नाही#केएल राहुल बातम्या#केएल राहुल लग्नामुळे पहिला वनडे खेळणार नाही#क्रिकेट बातम्या#टीम इंडिया#टीम इंडिया कोरोना#टीम इंडिया कोरोना पॉझिटिव्ह#नवदीप सैनी#नवदीप सैनी कोरोना पॉझिटिव्ह#भारत वि वेस्ट इंडिज#भारत वि वेस्ट इंडीज#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ#रुतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह#शिखर धवन#शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह#श्रेयस अय्यर#श्रेयस अय्यर कोरोना पॉझिटिव्ह
0 notes
Text
बापरे! या जिल्ह्य़ातील निवासी शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना झाला कोरोना
बापरे! या जिल्ह्य़ातील निवासी शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना झाला कोरोना
रोखठोक वर्धा….. हळु हळु राज्यातील शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आसतानाच कोरोना बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शाळेतील एकूण २४७ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. १ विद्यार्थी व ९ कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर ३० कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. विद्यार्थ्यांना याच…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना.
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण.
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामं प्रकरणी फौजदारी कारवाईचे विभागीय आयुक्तांचे निर्देश.
आणि
बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर.
****
लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिंता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश आयोगाने या पत्रात दिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी येत्या २५ मे रोजी तर सातव्या टप्प्यासाठी येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात तर सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातही आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ मतदार संघात मतदान होणार आहे. निवडणुकीतल्या सर्व टप्प्यातल्या मतदानाची चार जून रोजी मोजणी होणार आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी पुणे शहरातले हॉटेल, ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड, आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्���र मॅरियट सूट- ब्लॅक, या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम, तसंच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावाने बंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं पुणे शहरातल्या सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, मध्यरात्री दीड वाजेनंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये, महिला वेटर्समार्फत रात्री साडे नऊ नंतर कोणतीही विदेशी दारू पुरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
मुंबईतल्या घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष तपास पथक - एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकामध्ये एकूण सहा अधिकारी असतील. एसआईटी चमूने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या घरी शो�� मोहीम हाती घेतली आणि होर्डिंग कराराशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्रं ताब्यात घेतली. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.
****
कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्हयात आढळून आले आहेत. हा जेएन-१ व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिकग केले असता ७० टक्के नमुने केपी २ पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूध्द प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये एक पुरुष तर एका महिला रुग्णाचा समावेश आहे.
****
यंदाच्या खरीप हंगामात ४८ लाख टन खत पुरवठ्याचं नियोजन प्रस्तावित करण्यात आलं आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. युरिया आणि डीएपी या खतांचा साठा संरक्षित कऱण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, या खतांच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे युरिया खताच्या ४५ किलो गोणीची किंमत २६६ रूपये ५० पैसै असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव इथल्या द सहकारी संस्था पिंपळगाव या धान खरेदी केंद्रात जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून त्यांना ऑनलाइन बोनस देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर २५ बोगस शेतकरी आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुद्धपौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात विभागीय आयुक्त मधुकर राजेआर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. अशी प्रकरणं तपासून, फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करावे तसंच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, असंही या पत्रात नमूद आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ तर बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली असून या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे...
जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.
****
बार्शी इथं एका तरुणाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचं एक पिस्तुल आणि दोन काडतुसं जप्त केली आहेत. भूम इथं राहणारा आकाश गाडे नावाचा हा युवक, बार्शी-लातूर रस्त्यावर संशयितरित्या थांबल्याचं पोलिसांच्या गस्ती पथकाला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जात असतांना त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ परवाना नसलेलं पिस्तुल आणि दोन काडतुसं आढळली. या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सुरतहून धुळ्याकडे येणाऱ्या एका खासगी बस चालकाला चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन संशयितांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी एका पडक्या शाळेच्या आवारातून औषधांचा नशा करतांना रंगेहाथ पकडलं. या कारवाईत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आणि दुचाकीसह एकूण ५८ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरिता पाच हजार रुपये लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव असून त्यानं तक्रारदाराकडे गोठा बांधकाम अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याकरिता ७ हजार रुपयांची मागणी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथली १२वी ची गुणवंत विद्यार्थिनी तनिषा बोरामणीकर हिचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सत्कार केला. देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या तनिषा हिने वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला, या यशाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तिचं कौतुक केलं. तनिषाचे पालक, शिक्षक तसंच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र खो खो संघटनेच्या स्वीकृत उपाध्यक्षपदी लातूर जिल्ह्यातील औसा इथले आमदार अभिमन्यू पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सरचिटणीस चंद्रजीत जाधव यांनी आज पुणे इथं संघटनेच्या कार्यकारिणीसह विविध समित्यांची घोषणा केली. या सर्व समित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहाणार आहे.
****
0 notes
Text
'टीम इंडिया'ला धक्का ; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
https://bharatlive.news/?p=158843&wpwautoposter=1696565046 'टीम इंडिया'ला धक्का ; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
पुढारी ...
0 notes
Text
भंडारा जिल्हा : 177 कोरोना पॉझिटिव्ह तर 15 रुग्णांना डिस्चार्ज
भंडारा जिल्हा : 177 कोरोना पॉझिटिव्ह तर 15 रुग्णांना डिस्चार्ज
आजच्या टेस्ट 1484 भंडारा, दि. 16 : जिल्ह्यात रविवारी 177 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.16) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15 आहे. रविवारी 1484 व्यक्तींची चाचणी केली असता 177 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 570 सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59182 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60886 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.20 टक्के…
View On WordPress
0 notes
Text
अमि��ाभ बच्चन कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह चाहते कौन बनेगा करोडपती 14 बद्दल काळजीत आहेत होस्टिंग म्हणतो की सर ताज्या टीव्ही बातम्या आणि गॉसिप्स लवकरच बरे व्हा
अमिताभ बच्चन कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह चाहते कौन बनेगा करोडपती 14 बद्दल काळजीत आहेत होस्टिंग म्हणतो की सर ताज्या टीव्ही बातम्या आणि गॉसिप्स लवकरच बरे व्हा
अमिताभ बच्चन कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह चाहते कौन बनेगा करोडपती 14 बद्दल काळजीत आहेत होस्टिंग म्हणतो की सर ताज्या टीव्ही बातम्या आणि गॉसिप्स लवकरच बरे व्हा ,
View On WordPress
#अमिताभ बच्चन#अमिताभ बच्चन twitter#अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम#अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह#अमिताभ बच्चन वय#अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट#अमिताभ बच्चनचे व्हायरल फोटो#अमिताभ बच्चनच्या चाहत्यांची प्रतिक्रिया#कोरोना विषाणू#कौन बनेगा करोडपती 14#कौन बनेगा करोडपती 14 भाग#कौन बनेगा करोडपती 14 मुळे चाहते चिंतेत आहेत#कौन बनेगा करोडपती 14 वर अमिताभ बच्चन#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या
0 notes
Text
कोविड 19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शिखर धवनने हॉटेलमधील फोटो शेअर केला, चाहत्यांनी दिली ही प्रतिक्रिया
कोविड 19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शिखर धवनने हॉटेलमधील फोटो शेअर केला, चाहत्यांनी दिली ही प्रतिक्रिया
शिखर धवन कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी सर्व खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत. पण इथे पोहोचल्यावर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. येथे शिखर धवनसह अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. धवन कोविड 19 पॉझिटिव्ह आढळून आल्याने भारतीय संघाचे मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत धवनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर…
View On WordPress
#Covid-19#अहमदाबाद#एकदिवसीय मालिका#कोरोना विषाणू#कोविड -19#गुजरात#टीम इंडिया#टीम इंडिया एकदिवसीय मालिकेत 11 खेळत आहे#टीम इंडिया कोरोना#टीम इंडिया कोविड 19#टीम इंडिया वनडे मालिका#भारत वि वेस्ट इंडिज#भारत वि वेस्ट इंडीज#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ#वेस्ट इंडिज विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक#शिखर धवन#शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह
0 notes
Photo
कुडाळ तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला कुडाळ : कुडाळ तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा वेग मंदावला आहे. आज सोमवारी ४ कोरोना रुग्ण आढळून आले असून हे चारही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
छत्रपती संभाजीनगर तसंच सांगली शहरात कोविडचे प्रत्येकी दोन नवे रुग्ण;प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा
एनसीसीच्या राष्ट्रीय शिबीरात सर्वोत्तम कॅडेट्सचा अतिरिक्त महासंचालकांकडून सत्कार
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड वाटप
आणि
लातूर-तुळजापूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टर अपघातात चौघांचा मृत्यू
****
छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको एन सेवन परिसरात आज कोविडचे दोन रुग्ण आढळले आहेत. यात एका दहा वर्षीय बालिका तसंच ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी सांगितलं. या दोन्ही रुग्णांच्या श्वसन स्रावाचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे, या चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती डॉ मंडलेचा यांनी दिली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून या दोन्ही रुग्णांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे दोनही रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी आज दिली. त्यामुळं नागरिकांनी घाबरून न जाता कोविड -19 मध्ये आपण ज्या गोष्टींचं पालन केलं त्या गोष्टीचं पालन करावं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असं सांगत, सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती डॉक्टर विक्रम सिंह कदम यांनी यावेळी दिली.
****
नागपूर जिल्हा सहकारी बँक -एनडीसीसी मध्ये दीडशे कोटी रुपये घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता, त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणी नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांच्या न्यायालयाने केदार यांच्यासह पाच जणांना आज दोषी ठरवलं असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
****
मुंबईत येत्या २० ते २८ जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' आयोजित क��ण्यात आला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व सहभागी संस्थांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात या महोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या महोत्सवामध्ये शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढवण्यात यावा, असं आवाहन महाजन यांनी केलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या अखिल भारतीय थल सैनिक शिबीरात सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्सचा एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांच्याहस्ते आज सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या शिबीरात महाराष्ट्रातल्या कॅडेट्सनी मुलींच्या गटात दुसरा तर मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एनसीसी मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रूप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात एनसीसी कॅडेट्सना दिलं जात असलेलं प्रशिक्षण तसंच व्यवस्थापनाबद्दल सिंह यांनी समाधान व्यक्त केलं. योगेंदर सिंह यांनी देवगिरी महाविद्यालयाच्या पथकाने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं कौतुक केलं. सिंह यांनी या दौऱ्यात एमजीएम विद्यापीठालाही भेट देऊन कुलपती तसंच कुलगुरूंशी चर्चा केली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. एकोणऐंशी हजारांहून अधिक विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये १ कोटी ३१ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ४९ लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग तपासणी तर, ३ लाख ४० हजारांहून अधिक नागरिकांना उच्च दर्जाच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांची शिफारस करण्यात आली.
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको परिसरातील साई मंदिर इथं पोहचली. या निमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यासा���ी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्याकडं आली असून या योजना समजून, जाणून घ्या आणि लाभार्थी बना असं आवाहन कराड यांनी यावेळी केलं. ते म्हणाले -
या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत कशी मिळते ही माहिती दिली जाते. मी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपलं आरोग्य असेल, ��पल्या घरातील गॅस असेल, आपला राहण्यासाठी घर असेल किं��ा आपणाला लागणारा, गोरगरिबांसाठी अन्नधान्य असतील, शेतकऱ्यांसाठी निधी असेल अशा वेगवेगळ्या जवळजवळ ३४ योजनांची माहिती दिली जाते. आपण सुद्धा यामध्ये समावेश पहा आणि आपला विकास करा. आपला विकास म्हणजे भारत देशाचा विकास.
****
या यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात अनेक लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - योगेश सुरडकर आणि रत्नमाला पठाडे, छत्रपती संभाजीनगर
****
विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचवण्याचं केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केलं आहे. त्या आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. या यात्रेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना लवंगारे-वर्मा यांनी दिल्या.
****
सोलापूर जिल्ह्यात २३ नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत विविध केंद्रीय योजनांची माहिती शहरी आणि ग्रामीण भागात देण्यासाठी चित्ररथ गावोगावी आणि शहरात फिरत आहेत. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसंच लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातील लातूर-तुळजापूर महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या चार पैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. औसा शहराजवळ भरधाव वेगातील कार लोखंडी ट्रॉलीला मागच्या बाजूनं धडकल्यानं हा अपघात झाला.
****
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अहमदनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी मांडे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मांडे यांचं काल अहमदनगर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते.
****
'हेड टू टेल' या अभियानांतर्गत नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची आतापर्यंत २८ किलोमीटर अंतरातील कालव्याची स्वच्छता करण्यात आली आहे. एकूण ४९ किलोमीटर अंतराच्या या कालव्याच्या स्वच्छतेमुळे पाणी पातळी आणि वहन क्षमता यात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती यांत्रिकी मंडळाचे अधिक्षक अभियंता जितेंद्र गंटावार यांनी दिली.
****
0 notes
Text
'टीम इंडिया'ला धक्का ; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
https://bharatlive.news/?p=158843 'टीम इंडिया'ला धक्का ; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
पुढारी ...
0 notes