#पूर्वी नागरी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीनं आज दिवाळीची सुरुवात होत असून या दिवशी गाय - वासराची पूजा केली जाते. दिवाळी निमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठांमधे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात मेहकर नजिक समृद्धी महामार्गावर आज पहाटे खाजगी बसला ट्रकनं दिलेल्या धडकेमुळं बसमधल्या दोघांचा मृत्यू झाला तर चौघं जखमी झाले. पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातल्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर अन्यत्र हवामान कोरडं राहील.
****
गोव्यात सुरु असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत आहे. गेल्या २५ तारखेला सुरू झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ७५ सुवर्ण पदकांसह २२० पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलँड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरु इथं चिन्नास्वामी क्रीडा संकुलात दुपारी दोन वाजता हा सामना खेळवला जाईल.
****
वाशिम इथं महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कालपासून बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचं प्रदर्शन भऱवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात चाळीस दालनं लावण्यात आली असून हे प्रदर्शन उद्या पर्यंत सुरु राहणार आहे.
****
धुळे तालुक्यातल्या अनकवाडी इथल्या तत्कालीन सरपंचाच्या खून प्रकरणी १४ आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१४ मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीतल्या वादामुळं सरपंच पितांबर चव्हाण यांच्यावर आरोपींनी हल्ला केला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
****
ठाणे महापालिकेचा पुढला लोकशाही दिन येत्या चार डिसेंबर रोजी होणार आहे. येत्या २० नोव्हेंबर पूर्वी त्यांचे अर्ज- निवेदन महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
0 notes
bongboyblog · 4 years ago
Text
बांग्ला अक्षरों की तुलना हिंदी अक्षरों से
यह पोस्ट हिंदी भाषियों के लिए है (This post is for Hindi speakers)। आशा है इससे आपको मदद मिलेगी।
हिंदी भाषा देवनागरी लिपि में लिखी जाती है जबकि बांग्ला/बंगाली (सही उच्चारण: बाङ्ला) भाषा बांग्ला लिपि, या जिसे पूर्वी नागरी लिपि भी कहते हैं, उसमें लिखी जाती है। इन दोनों लिपियों में अनेक समानताएं हैं लेकिन कुछ भिन्नता भी अवश्य है जिसे अंदेखा नहीं किया जा सकता।
बांग्ला में ' अ ' स्वर प्रयोग नहीं है। अ के स्थान पर ' অ ' (ऑ/औे) स्वर प्रयोग में लाया जाता है।
অ - ऑ, कभी कभी ओ भी।
আ - आ
ই - इ
ঈ - ई
উ - उ
ঊ - ऊ
ঋ - ऋ
৯ - लृ (इसका कहीं भी प्रयोग नहीं होता है आजकल। कुछ क्षेत्रों में तो इसे वर्णमाला से ही निकाल दिया गया है।)
এ - ए
ঐ - ओई
ও - ओ
ঔ - ओउ
व्यंजन वर्णों को ऑ स्वर के साथ पढ़ा जाता है, जैसे ক को ' काॅ '.
ক - क
খ - ख
গ - ग
ঘ - घ
ঙ - ङ
চ - च
ছ - छ
জ - ज
ঝ - झ
ঞ - ञ
ট - ट
ঠ - ठ
ড - ड
ঢ - ढ
ণ - ण
ত - त
থ - थ
দ - द
ধ - ध
ন - न
প - प
ফ - फ
ব - ब
ভ - भ
ম - म
য - ज (परंतु चवर्ग वाले ज से ज़्यादा कठोर)
র - र
ল - ल
শ - श
ষ - ष
স - स
হ - ह
ড় - ड़
ঢ় - ढ़
য় - य
कुछ ज़रूरी चिन्ह:
কৎ - कॉत् (खंड त)
ক্য - क्काॅ (यह असल में आधा य है, परंतु बांग्ला में इसका उच्चारण नहीं होता है, बल्कि इसके साथ युक्त दूसरे व्यंजन को यह ज़्यादा ज़ोरदार बना देती है।)
ক্যা - कै (अंग्रेज़ी शब्द ' बैग/bag ' के a अक्षर जैसा उच्चारण। असलियत में यह ' या ' है।)
ক্ব - क्कॉ (आधे ब का उच्चारण नहीं किया जाता है।)
ক্ - क्
কঁ - कॉँ
কং - कॉङ्
কঃ - कॉः
मात्राएं
ক - कॉ, कौ
কা - का
কি - कि
কী - की
কু - कु
কূ - कू
কৃ - कृ
কে - के
কৈ - कोइ
কো - को
কৌ - कोउ
चलिए बांग्ला में कुछ वाक्य देखते हैं और उनका देवनागरी में निकटतम लिप्यांतरण क्या होगा वह भी जानते हैं।
নমস্কার। আপনার এই ব্লগে স্বাগতম। আশা করি আপনার এই পোস্টটা ভালো লেগেছে হবে।
लिप्यांतरण :
नॉमोस्कार्। आप्नार एइ ब्लॉगे स्आगॉतॉम्। आशा कोरि आप्नार एइ पोस्टटा भालो लेगेछे हॉबे।
अनुवाद :
नमस्कार/नमस्ते। आपका इस ब्लॉग पर स्वागत है। आशा करता हूं आपको यह पोस्ट अच्छा लगा होगा।
पढ़ने के लिए धन्यवाद ^^
18 notes · View notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
आता NPS नाही तर OPS अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन पर्याय; जाणून घ्या तपशील
आता NPS नाही तर OPS अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन पर्याय; जाणून घ्या तपशील
आता NPS नाही तर OPS अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन पर्याय; जाणून घ्या तपशील केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती १ जानेवारी २००४ पूर्वी करण्यात आली होती परंतु ते १ जानेवारी २००४ रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झाले आहेत अशांसाठी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या जागी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियमांतर्गत…
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
चीन ने लद्दाख में भारतीय सीमा पर तैनात किए 'सुपर सोल्‍जर', सामने आईं तस्‍वीरें Divya Sandesh
#Divyasandesh
चीन ने लद्दाख में भारतीय सीमा पर तैनात किए 'सुपर सोल्‍जर', सामने आईं तस्‍वीरें
पेइचिंग पूरी दुनिया में बादशाहत कायम करने की फिराक में लगे चीनी ड्रैगन ने ��ब अपने सैनिकों को ‘सुपर सोल्‍जर’ में बदलना शुरू कर दिया है। चीन ने ऐसे सैनिकों के लिए एक आयरनमैन की तरह से ‘एक्सोस्केलेटन सूट’ बनाया है जो उन्‍हें भारी वजन ले जाने में मदद करता है। यही नहीं चीनी ड्रैगन ने ऐसे सूट से लैस चीनी सैनिकों को पूर्वी लद्दाख में तैनात किया है जहां पर दोनों ही देशों के बीच पिछले कई महीने से तनाव चल रहा है।
PLA सैनिकों के ‘एक्सोस्केलेटन सूट’ पहनकर गश्‍त लगाने की यह खबर ऐसे समय पर आई है जब पिछले दिनों ड्रैगन पर भारतीय सैनिकों के खिलाफ अपने सबसे घातक माइक्रोवेब वेपन के इस्‍तेमाल का आरोप लगा था। हालांकि भारतीय सेना ने इसका खंडन किया था। रूसी न्‍यूज वेबसाइट आरटी के मुताब‍िक चीन के सरकारी टीवी चैनल सीसीटीवी ने अपनी रिपोर्ट में PLA सै‍निकों के यह सूट पहनकर गश्‍त लगाने को द‍िखाया गया है।
सीसीटीवी ने बताया कि इन सैनिकों को नागरी इलाके में तैनात किया है जो लद्दाख से सटा हुआ है। इन सैनिकों ने एक्सोस्केलेटन सूट की मदद से अग्रिम मोर्चे पर तैनात अपने साथी सैनिकों को चीनी नए साल का तोहफा पहुंचाया। यही नहीं चीनी ऑल टेरेन वीइकल समुद्रतल से 16 हजार फुट की ऊंचाई तक पहुंच गया। सीसीटीवी ने सीसीटीवी ने यह नहीं बताया कि इस सूट को किसने बनाया है।
गश्त लगाने में प्रभावी है यह सूट चीनी सरकार के मुखपत्र ग्लोबल टाइम्स के अनुसार, एक्सोस्केलेटन सूट की मदद से चीनी सैनिक गश्ती और संतरी ड्यूटी जैसे मिशन में अत्याधिक प्रभावकारी है। जिन सैनिकों को यह सूट सबसे पहले दिया गया है वे दक्षिण-पश्चिम चीन के तिब्बत स्वायत्त क्षेत्र में में स्थित नागरी में तैनात हैं। बता दें कि इस इलाके में चीन का एक महत्वपूर्ण एयरफोर्स बेस भी है। जो भारत के खिलाफ चीनी आक्रमण का बड़ा केंद्र बन सकता है।
नागरी में चीनी सैनिक पहन रहे आयरनमैन सूट नागरी में तैनात सैनिकों ने इस सूट को पहनना भी शुरू कर दिया है। इसकी मदद से वे उबड़ खाबड़ रास्तों और खराब मौसम में भी भारी सामान ढोने में सक्षम हैं। इससे सैनिकों के कमर या पैर में चोट लगने का जोखिम भी कम होता है। नागरी समुद्रतल से 5000 मीटर से ज्यादा की ऊंचाई पर स्थित है। ऐसे में वहां के मौसम में भारी सामान के साथ सैनिकों को गश्त करने में परेशानी होती थी।
वजन को सूट के फ्रेम में किया जा रहा ट्रांसफर चीन सेंट्रल टेलीविजन (CCTV) की रिपोर्ट के अनुसार, हाल के ही सप्लाई डिलिवरी मिशन के दौरान शिनजिया���ग मिलिट्री कमां�� से जुड़े कई सैनिकों ने इस सूट की सहायता से लगभग 20-20 किलोग्राम का खाना-पानी अपने बैकपैक में ढोया। विशेषज्ञों के अनुसार, इस तकनीकी से बैकपैक का वजन सैनिकों के पैरों के बजाय एक्सोस्केलेटन सूट के फ्रेम में स्थानांतरित किया जाता है। इतने वजन के साथ पहाड़ी इलाकों में गश्त को काफी प्रभावी माना जाता है। इससे मिशन की अवधि भी बढ़ सकती है।
0 notes
kokannow · 4 years ago
Text
चिपी विमानतळाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी?
चिपी विमानतळाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी?
 कुडाळ​:​ चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवरून सुरु आहेत. दरम्यान, एअर इंडियाचे अध्यक्ष तथा सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी विकासक कंपनी आयआरबीला लेखी पत्राद्वारे २६ जानेवारी २०२१ पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी.
विविध क्षेत्रांच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास घडवण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त-कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन.
मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांची कोरोना काळातल्या व्यवहारांचीही चौकशी करावी -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आव्हान.
आणि
सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी मतदारसंघनिहाय जनजागृती करण्याचं निवडणूक विभागाच्या सूचना.
****
न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे होणारे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून आत्महानी होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे नैसर्गिक मृत्यू आत्महत्यांमुळे होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर, या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी, स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात या सेवेचा प्रा��ंभ, अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन, राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, गुप्ता यांनी यावेळी दिली.
****
येत्या काळात विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांची कौशल्यं विकासित करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळं राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक आणि व्यावसायिकांची पिढी घडेल असं सांगत, विद्यार्थ्यांनी फक्त ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या दीक्षांत समारंभात २४९ संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना ११९ सुवर्णपदकं, २३ रौप्यपदकं आणि २५ रोख पारितोषिकं, तसंच ४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी आणि २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश विकासाच्या वाटेवर असून जगात भारताची प्रतिमा उंचावली असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कार्यासंदर्भात ते आज चंद्रपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. देशात २०१४ पूर्वी ९१ हजार किलोमीटर महामार्ग झाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात ५४ हजार किलोमीटर महामार्ग तयार झाल्याचं यादव यांनी सांगितलं. या काळात देशात १११ नवे जलमार्ग तयार झाले. २०१४ पूर्वी देशात फक्त ५ मेट्रो धावत होत्या, २०१४ नंतर १५ शहरात मेट्रो सुरू केल्या, तसंच गेल्या नऊ वर्षात नवीन ७०० रुग्णालयं सुरू केल्याची माहिती यादव यांनी दिली.
****
कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे आव्हान दिलं. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू होता. त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पाटण्यातल्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल भाजपने केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू ��रताना तसंच तपासणी करतानाही समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं अमृत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांना केंद्रीय अमृत अभियान पथकानं आज भेट दिली. या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेनं कोपरखैरणे आणि ऐरोली इथल्या सी टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलजलप्रक्रिया केंद्र उभारली आहेत. या पाण्याच्या वापराविषयीची माहिती पथकानं यावेळी घेतली.
****
वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयांना उपलब्ध सुविधा आणि मासिक कामगिरीच्या आधारावर पहिल्यांदाच मानांकन दिलं आहे. त्यानुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला गोल्ड श्रेणीत स्थान मिळालं आहे. या यादीत अकोला जीएमसी अर्थात सामान्य वैद्यकीय परिषदेला सहावं स्थान मिळालं आहे.
****
परकीय व्यापार महासंचालनालय अर्थात डीजीएफटीनं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. या धोरणात बदल केल्यामुळं भारताला जागतिक पटलावर ड्रोन उत्पादक म्हणून चालना मिळेल तसंच स्टार्ट-अप आणि नवीन ड्रोन उत्पादक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या चार हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी आता १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १० जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील, तर रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे.
****
येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती व्हावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी’ या विषयावर यशदा इथं सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी ��ांची कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेत देशपांडे मार्गदर्शन करत होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तुनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिबीरं आणि प्रश्नमंजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमांचा वापर करावा अशा सूचना देशपांडे यांनी यावेळी दिल्या.
****
येत्या २६ जून रोजी येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं जनजागृती सप्ताह पाळण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पंचवटी परिसरातून निघालेल्या या सायकल फेरीचा पोलिस कवायत मैदानावर समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी आपलं शहर, राज्य आणि देश अंमली पदार्थ मुक्त करण्याची शपथ घेतली.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट आणि बेकायदेशीर दारूसाठा कंटेनरसह ३१ लाख ४९ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
सरकारने आरक्षण मर्यादेबाबत भूमिका स्पष्ट करावी-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
नागरी सेवा दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट प्रशासन पुरस्कार सोहळ्यात लातूर आणि सोलापूरचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव
राज्यात तसंच देशात सध्या दिसत असलेलं चित्र चिंताजनक-खासदार शरद पवार यांची टीका
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
बालविवाह प्रतिबंधासाठी विविध जिल्हा प्रशासनांकडून जनजागृती मोहीम
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा सनरायजर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह उपचारात्मक याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकार मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…
Byte…
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते पूर्णपणे सरकार फुल प्रुफ करेल अशा प्रकारची चर्चा झाली. मी एवढंच सांगतो, पूर्वी आरक्षण रद्द करतांना ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचं काम राज्य सरकार करेल. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्��ध आहे. तोपर्यंत ज्या सुविधा इतर समाजाला ज्या मिळतायत, त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मराठा समाजाच्या तरूणांना असतील, त्या दिल्या जातील.
या बैठकीत मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसंच शैक्षणिक मागासलेपणासंदर्भात, सामाजिक संस्थेकडून सखोल सर्वेक्षण करण्यात यावं, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीच्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात यावी, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. याविषयावर विरोधी पक्ष नेत्यांशीही राज्य सरकार चर्चा करणार आहे.
****
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेले निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असल्याचं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. इंद्रा साहनी प्रकरणातली ५० टक्के मर्यादा, ही मराठा आरक्षणातला मूळ अडसर आहे. राज्य सरकार गंभीर असेल तर या आरक्षण मर्यादेबाबत भूमिका तसंच पुढील धोरण स्पष्ट करावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली. आरक्षण मर्यादा शिथिल झाली तर मराठा समाजासह देशभरातल्या अनेक समाजाच्या आरक्षणांच्या मागण्या मार्गी लागू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मराठा समाजाचा इतर मागासवर्ग -ओबीसीत सामवेश केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. सरकारची आरक्षण देण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणं, हा एकमेव संवैधानिक मार्ग असल्याचं भानुसे यांनी म्हटलं आहे.   
****
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून मराठा वनवास यात्रा काढण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी सहा मे रोजी ही यात्रा तुळजापूर इथून निघणार असून, सहा जून श्री शिव राज्याभिषेक दिनी ही यात्रा मुंबईत मंत्रालयावर पोहोचणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धाराशिवच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना काल याबाबत निवेदन देण्यात आलं.
****
नागरी प्रशासनामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पुरस्कार काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोविड काळात आणि नंतरही आरोग्य मंत्रालयानं राबवलेल्या देशव्यापी लसीकरण मोहिमेला यावेळी पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याला ‘आरोग्यवर्धिनी’ उपक्रमासाठी तर सोलापूर जिल्ह्याला ‘ऑपरेशन परिवर्तन’ या उपक्रमासाठी, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारानं’ गौरव करण्यात आलं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्��ीकारला.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत, विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचं निदान, उपचार संदर्भ सेवा, इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या, ऑपरेशन परिवर्तन मुळे, जिल्ह्यातल्या अवैध दारू व्यवसायाला आळा बसला आहे. स्थानिक जनतेला स्वयंरोजगाराची साधनं उपलब्ध झाल्यामुळे ते अवैध दारू विक्रीपासून परावृत्त झाले आहेत.
****
नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातल्या तेरा पुरस्कारांचं वितरण, काल करण्यात आलं. आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असतांना, नवनवीन संकल्पना राबवून अधिक संवेदनशीलपणे काम करावं, कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यं बजावायला हवीत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्यात तसंच देशात सध्या जे चित्र दिसत आहे, ते चिंताजनक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात बोलत होते. गुजरात दंगलीतल्या आरोपींना मुक्त करणं ही कायदा आणि संविधानाची हत्या असल्याची टीका करत, पवार यांनी केंद्र तसंच राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या विधानाच्या आधारे, पवार यांनी केंद्राच्या भूमिकेवर टीका केली. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला पूर्णपणे राज्यसरकार जबाबदार असून, या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात घोषणांशिवाय काहीही मदत पडलेली नाही, असंही पवार यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने झालेले मृत्यू आणि सरकारने जारी केलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचं, त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर येत असलेल्या चित्रफितींमुळे संभ्रम वाढत असून, सरकारी कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
****
आंतरराष्ट्र���य पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. एक एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास, यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात, महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करणं, आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली हेाती. यासाठी सोलापूर इथं ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत, काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार संतोष बांगर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, यावेळी उपस्थित होते. या यासंदर्भातल्या अपेक्षित तांत्रिक बाबी पूर्ण करून जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी केली. तसंच बंधाऱ्यांचं धरणांमध्ये रुपांतर करण्याचं धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
ईद उल फित्र - रमजान ईद आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या ईदहाग मैदानावर यानिमित्त विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रेम, करुणा आणि एकमेकांमध्ये स्नेह वृद्धींगत करतो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
ईद उल फित्र चा सोहळा म्हणजे एकत्र येत आनंद साजरा करण्याची एक चांगली संधी असते, असं धनखड यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो आणि परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो, अशी प्रार्थना करत असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. तर ईद-उल-फित्र संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दाऊदी बोहरा समाजानं काल ईद - उल - फित्र साजरी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दाऊदी बोहरा समाज बांधवांनी पारंपारिक वेषभूषेत मशिदींमध्ये ��माज अदा करुन आरोग्य, सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली.
****
अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सकारात्मक ऊर्जा देणारा हा सण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंतीही आज साजरी होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीच्या वतीने वाहन फेरी काढण्यात येत आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं बसवेश्वर चौकात ध्वजारोहण होणार आहे.
परशुराम जयंतीनिमित्त ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं औरंगपुरा इथं स्तंभपूजन केलं जाणार आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहन रॅली काढण्यात आली.
****
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नागरिकांना मालमत्तेसंदर्भातले व्यवहार सुलभतेने करता यावे, यासाठी आज आणि उद्या शासकीय सुट्टीच्या दिवशीही राज्यातले सह दुय्यम निबंधक कार्यालयं सुरू राहणार आहेत. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी हे निर्देश दिले.
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला, राज्यात अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांनी बालविवाह निर्मूलन जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
परभणी जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी, जिल्हा प्रशासनातल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची, प्रत्येक गावाकरता सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे अधिकारी संबंधित गावात प्रत्यक्ष भेट देऊन गावातल्या विवाहाच्या नोंदी, तसंच ग्राम पंचायतींमधील विवाह नोंदणी तपासणार आहेत. याबरोबरच गावात विवाह होत असल्यास वधु आणि वर यांच्या वयाची खात्री करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन तातडीने १०-९-८ आणि ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातही बालविवाह रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, फेरी इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निर्देश दिले आहेत.
बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही बाल विवाह निर्मूलन जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने दिलेलं १३५ धावांचं लक्ष्य, चेन्नईच्या संघानं एकोणिसाव्या षटकात पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज लख��ौ सुपर जायन्ट्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत मुंबई इं��ियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कुंजखेडा आरोग्य उपकेंद्रात, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र याठिकाणी अद्याप वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही, याकडे खासदार जलिल यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वानिमित्त संध्याछाया वृध्दाश्रमात, ज्येष्ठ नागरिकांचं जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनांची, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांनी माहिती दिली. समाज कल्याण अधिकारी बि.एस.दासरी यांनी ज्येष्ठ नागरिकांना विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका परिसरात काल सोसाट्याचा वारा तसंच विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतपीकांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
नागरी सेवा दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट प्रशासन पुरस्कार प्रदान; लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव.
मराठा आरक्षणासाठी क्युरेटीव्ह उपचारात्मक याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
राज्यात १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता.
आणि
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना.
****
प्रशासकीय कामकाजात जाणारा वेळ वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, तसं केल्यानेच कामकाजात सुलभता येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नागरी सेवा दिनानिमित्त आज नागरी प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार काम केल्यास, लोकांच्या गरजा सुनिश्चित करता येतील, तसंच आगामी धोरण निश्चित करण्यासही ही बाब लाभदायक असेल, असं पंतप्रधान म्हणाले. देशवासियांच्या अपेक्षा वाढत असून, देशाच्या विकासासाठी तसंच व्यवस्थेत बदलासाठी नागरिक आतूर आहेत, त्यामुळे निर्णय क्षमता गतीमान करून पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
या कार्यक्रमात राज्यातून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सन्मानित करण्यात आलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचं निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील तेरा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असतांना नवनवीन संकल्पना राबवून अधिक संवेदनशीलपणे काम करावं, कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली कर्तव्यं बजावायला हवीत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
****
��राठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह उपचारात्मक याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत समाजाचं आर्थिक, सामाजिक तसंच शैक्षणिक मागासलेपणासंदर्भात सामाजिक संस्थेकडून सखोल सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सरकार मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते पूर्णपणे सरकार फुल प्रुफ करेल अशा प्रकारची चर्चा झाली. मी एवढंच सांगतो, पूर्वी आरक्षण रद्द करतांना ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचं काम राज्य सरकार करेल. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्‌ध आहे. तोपर्यंत ज्या सुविधा इतर समाजाला ज्या मिळतायत, त्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना असेल, मराठा समाजाच्या तरूणांना असतील, त्या दिल्या जातील.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचं देशकार्य शब्दांच्या पलीकडे आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उदय निरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं, या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. सावरकर गौरव यात्रेतून त्यांचा इतिहास, देशभक्ती, त्याग सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याला चांगला प्रतिसादही मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने झालेले मृत्यू आणि सरकारने जारी केलेली आकडेवारी यात तफावत असल्याचं विधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी न्यायालयीन चौकशीची मागणी आपण राज्यपालांकडे केल्याचं, पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर येत असलेल्या चित्रफितींमुळे संभ्रम वाढत असल्याचं पवार यांनी सांगितलं. सरकारी कार्यक्रम असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करणे आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा केली हेाती. यासाठी सोलापूर इथं ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. हिंगोली जिल्हा अनुशेष निर्मूलनाबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार संतोष बांगर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, उपस्थित होते. या यासंदर्भातील अपेक्षित तांत्रिक बाबी पूर्ण करून जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या. तसंच बंधाऱ्यांचे धरणांमध्ये रुपांतर करण्याचे धोरणही लवकरच निश्चित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कुंजखेडा आरोग्य उपकेंद्रात, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र याठिकाणी अद्याप वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही, याकडे खासदार जलिल यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वा निमित्त संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरिकांचं जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनांची अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांनी माहिती दिली. समाज कल्याण अधिकारी बि.एस.दासरी यांनी ज्येष्ठ नागरिकांना विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरासंबंधी कारवाई करण्यात येत आहे. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत एकशे सात किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करून एक्कावन्न हजार पाचशे रूपयांचा दंड आकारण्यात आला. महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात येत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे वाकद इथं जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यासाठी एक कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
आज जागतिक वसुंधरा दिनानि��ित्त छत्रपती संभाजीनगर इथं विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला. तहसीलदार छाया पवार यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसंच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळं राज्यातल्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास.
पैठणचे संदीप जगदाळे, परभणीचे बा. बा. कोटंबे यांना मध्य प्रदेश सरकारचा भा. रा. तांबे साहित्य पुरस्कार जाहीर.
सीमाप्रश्न, महापुरुषांचे राजकीय नेत्यांकडून होत असलेले अपमान, बेरोजगारी याविरोधात महाविकास आघाडीचा परवा ��ुंबईत मोर्चा.
आणि
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ४०४ धावा केल्यानंतर भारतानं बांगलादेशाचा डाव आठ बाद १३३ धावांवर रोखला.
****
मुंबई ते अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळं महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बोलत होते. या थेट सेवेमुळे सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाईल. राज्यातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला याचा मोठा लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईहून सुरू झालेली ही थेट सेवा आतापर्यंतचा सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळेला ही सेवा दिली जाणार आहे. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं सिंदीया म्हणाले. जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाई प्रवास सेवेला अधिक बळ देण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
मुंबईत आज G-20 विकास कार्यगटाच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा झाली. सहभागी प्रतिनिधी, समस्या आणि त्यातील अंतर ओळखून त्यावरच्या मोजमापावर या बैठकीमध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. हे प्रतिनिधी डेटासंबधी भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा करत आहेत. भारतानं विकासासाठी डेटावरील G-20 उपक्रमाचा प्रस्ताव दिला आहे. डेटाचं विभाजन कमी करण्यासाठी क्षमता निर्माण जोडणीद्वारे डेटाच्या क्षमतेनुरुप उपयोगात मदत होईल. यामुळे शाश्वत विकास उद्दिष्टं साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्यातही मदत होईल, असं भारतानं म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढीनंतरही या वर्षी गेल्या सहा एप्रिलपासून सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ केलेली नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. देश आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. यामुळे देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेल्या असल्याचंही पुरी यांनी सांगितलं.
****
प्रसारण क्षेत्रात व्यवसाय आणि पूर्तता सुलभता आणण्यावर केंद्र सरकार भर देत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज सांगितलं. ते राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. अपलिंकीग आणि डाऊनलिंकींगसाठी पूर्वी वेगवेगळी मार्गदर्शक तत्वं होती, मात्र आता दोन्हींसाठी एकच मार्गदर्शिका असल्याचं त्यांनी सांगितलं. आता थेट प्रसारणासाठी परवानगी घ्यावी लागत नाही फक्त पूर्व नोंदणी करणं गरजेचं असतं. प्रसारण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
****
मध्य प्रदेश शासनाचे २०२० आणि २०१९ चे अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी दोन साहित्यकृतींना हा पुरस्कार दिला जातो. २०२० साठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांच्या ‘सुपारी डॉट कॉम’ या नाट्य लेखनाला तर सुचेता घोरपडे यांच्या ‘खुरपं’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. २०१९ चे पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथले संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कविता संग्रहाला आणि परभणीच्या बा. बा. कोटंबे यांच्या कदाचित कादंबरीला जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्काराचं स्वरूप ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं आहे. ‘मराठी गौरव दिना’ निमित्त येत्या २७ फेब्रुवारीला भोपाळ इथं पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचे राजकीय नेत्यांकडून होत असलेले अपमान, बेरोजगारी याविरोधात महाविकास आघाडीतर्फे परवा मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच अन्य विरोधी पक्ष नेत्यांच्या समवेत या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील अनेक संघटना या मोर्चात सहभागी होणार असून तो शांततेत पार पडेल असं पवार यांनी सांगितलं. मोर्चाद्वारे मांडले जाणारे प्रश्न हे कोणत्याही एका पक्षाचे प्रश्न नाहीत, हे सामाजिक प्रश्न आहेत त्यामुळे राज्यातल्या तमाम नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेतून करतो असं पवार म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीला आज प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत २५ डिसेंबरपर्यंत लसीकरण केलं जाणार आहे. गोवर रुबेला लसीची चुकलेली मात्रा या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये अवश्य घ्य्या असं आवाहन भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे यांनी केलं आहे. या मोहिमेची उस्मानाबाद जिल्हास्तरीय सुरुवात उस्मानाबाद तालुक्यातील सांजा इथल्या आरोग्य वर्धीनी केंद्रात आज झाली.
****
भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर बांगलादेश संघाचा डाव आठ बाद १३३ धावांवर रोखला. छत्तोग्राम इथं सुरू या सामन्यात कालच्या सहा बाद २७८ धावसंख्येवरुन पुढं खेळताना भारतानं ४०४ धावा केल्या. श्रेयस अय्यर ८२ धावांवर बाद झाल��यानंतर आर. अश्र्विननं  ५८ तर कुलदिप यादवनं ४० महत्त्वपूर्ण धावा केल्या. ताईजुल इस्लाम आणि मेहीदी हसन यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. कुलदीपनं चार तर मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करत बांगलादेशच्या डावाची दाणादाण उडवली. बांगलादेश संघ पहिल्या डावात २७१ धावांनी पिछाडीवर आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत लातूर-नांदेड केंद्रातून परभणी इथलं दानव आणि लातूरचं अबीर गुलाल या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. गोपाळ फाऊंडेशनच्या दानवला प्रथम तर शकुंतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अबीर गुलालला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. परभणीच्या क्रांती हुतात्मा संस्थेच्या सृजन्मय सभा नाटकास तृतीय पारितोषिक मिळालं आहे.
****
विभागीय आयुक्त डॉ.सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या रामेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. त्यांनी यावेळी स्वतः विद्यार्थ्यांची शाळा घेतली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन येत्या १५ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत झाला. उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीचे सदस्य याव���ळी उपस्थित होते. प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरची पाणी पट्टी वसुली तसंच त्याबाबतचं व्यवस्थापन करणं वाढत्या सिंचन क्षेत्रामुळं आणि मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळं ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश विखे पाटील यावेळी यांनी दिले.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचा एक वक्र दरवाजा आज १ फुटानं उघडून अकराशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. सिंचनाची मागणी वाढल्यामुळे पाणी सोडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उच्च शिक्षणमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधासाठी धुळ्यामध्ये आज सर्वपक्षीय विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यांचं मंत्रिपद बरखास्त करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल���. पाटील यांनी या प्रकरणी माफी मागताना हे प्रकरण थांबवण्याचं आवाहन यापूर्वीच केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधानसभेच्या एकूण ६८ जागांसाठी २४ महिलांसह ४१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे.
****
देशातल्या महानगरपालिकांनी शाश्वत उत्पन्न स्रोतांच्या दृष्टीनं नगरपालिका कर्जरोख्यांच्या पर्यायाचा विचार करावा, असं भारतीय रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. देशातल्या बहुतांश महानगरपालिकांना मालमत्ता कर आणि सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून रहावं लागतं, त्यामुळे त्यांना आर्थिक स्वायत्त���ा मिळत नाही, असं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाविषयी रिझर्व बँकेनं तयार केलेल्या अहवालात म्हटलं आहे. रिकाम्या भूखंडावर कर, विकसनाच्या शुल्कात वाढ, मुद्रांक शुल्कात वाढ अशा इतर पर्यायांचाही विचार झाला पाहिजे असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे.
****
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सहभागातून राज्यभर 'माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहीम सुरू असून, ही मोहिम सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व संशयित लम्पी चर्मरोगग्रस्त पशुरुग्णांची तपासणी, चाचणी, उपचार, लसीकरण, गोठ्याचं आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात यावं, असे आदेश राज्याचे अप्पर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी राज्यातल्या बाधित शहरं, गावं, वाड्या-वस्त्या, पाडे, तांडे इथल्या पशुधनाचं सर्वेक्षण, लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी पशुपालकांना जैवसुरक्षा उपाय, आणि अनुषंगिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
****
राज्यात वन सेवा केंद्र सुरू करून वन विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली देण्यात याव्यात, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. काल मुंबईत राज्यातल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून, सर्व प्रकल्प प्लास्टिकमुक्त असतील आणि संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य देणारे असावेत, असं ते म्हणाले. प्रत्येक प्रतिष्ठाननं आपलं स्वतःचं संकेतस्थळ बनवून त्यावर संबंधित व्याघ्र प्रकल्पाची इत्त्थंभूत माहिती द्यावी, अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली.
****
राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या योजनेद्वारे कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेत पूर्वी अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग आदींचा समावेश होता, आता इतर मागास वर्ग, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आदी घटकांचा समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
नाशिकची आरोग्यदायी हवा तसंच अनेक वर्षांपासूनच्या मागणीचा विचार करून या शहरात योग आणि आयुर्वेद विद्यापीठ सुरू करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, अशी माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिक शहरात त्र्यंबक रोडवर असलेल्या खादी ग्रामोद्योगच्या जागेवर योग आणि आयुर्वेद विद्यापीठ सुरू करण्याची मागणी आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शनिवारपासून १५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या अमरावती आणि औरंगाबाद विभागीय केंद्रावर १२ नोव्हेंबरला, मुंबई, कोल्हापूर, नाशिक केंद्रांवर १३ नोव्हेंबर तर नागपूर आणि नांदेड इथं १४ नोव्हेंबरला विभागीय क्रीडा महोत्सव होईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी काल नाशिक इथं दिली. विभागीय केंद्रावरच्या स्पर्धेतून केंद्रीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. केंद्रीय क्रीडा स्पर्धेतून निवडलेला अंतिम संघ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सहभागी होईल.
****
नांदेड जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्या स्वरूपात राबवण्यात येणार असून, याबाबत जिल्ह्यात महिनाभर जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्‍हयात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. नागरीकांनी या मोहिमेत सहभागी होऊन गावागावात स्वच्छतेच्या कामाला गती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या विधवा महिलांची मालमत्ताविषयक प्रलंबित प्रकरणं तत्काळ निकाली काढावेत, तसंच पोखरा योजनेतून काही लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कोविड-19 मु��े पालक गमावलेल्या २१९ बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेवून समुपदेशन करण्याचं काम देखील जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत वेळोवेळी केलं जात असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्याचा ठराव विधीमंडळात एकमतानं मंजूर
·      राज्य विधीमंडळाचं अधिवेशन संपल. १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये पुढचं हिवाळी अीधवेशन
·      अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
·      राज्यात, ‘माझा एक दिवस बळीराजासोबत’, अभियान राबवून कृषी धोरण तयार करणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
·      राज्यातल्या सत्तासंघर्षावर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
·      बीड जिल्ह्यातील शशिकांत कुलथे आणि सोमनाथ बलके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८८७ रुग्ण, मराठवाड्यात ५२ बाधित
आणि
·      नाशिकमध्ये २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला अटक  
  सविस्तर बातम्या
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा, तसंच नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा ठराव, काल विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आला. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव, धाराशीव करण्यात येणार आहे. विधीमंडळात नामांतराचा मंजुर झालेला हा ठराव आता केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे पाठवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. ते म्हणाले....
 Byte …
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर विभाग जिल्हा तालुका तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे ��ामांतर करण्यास १६ /७/२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्याअर्थ��� औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव जिल्हा असे नामांतर करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्यविधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभेच्या ११० नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नामांतर करण्याची शिफारस भारत सरकारला करते.  
 नवी मुंबई विमानतळाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवला जाणार आहे. नामांतराचे हे ठराव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विधानपरिषदेत सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आणि ते मंजुर करुन घेतले.
****
राज्य विधीमंडळाचं अधिवेशन काल संस्थगित झालं. पुढचं हिवाळी अीधवेशन १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होईल. कोविडच्या निर्बंधानंतर यावेळी राज्य विधिमंडळाचं नऊ दिवसांपैकी सहा दिवसाचं कामकाज झालं. आपल्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी झाल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्वपूर्ण अशी एकूण १० विधेयकं अधिवेशनात मंजूर झाल्याचं मुख्यमंत्री सांगितलं.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातल्या विविध विभागांमधल्या रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून, ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं कारशेड आरे इथंचं उभारलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आरेत वन विभागाची एकूण एक हजार २८५ हेक्टर जमीन असून, त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमिनीचा वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार असल्याचं, ते म्हणाले.
राज्यातल्या गुन्हेगार शोधण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, पोलिसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातली ३७ हजार ५११ मुलं आणि मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांकडे सुपूर्द केलं आहे.
पोलिसांना अधिक घरं उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वी केवळ पाच हजार रुपये मदत होती, ती आता पंधरा हजार रुपये दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गावांचं शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्यानं काम केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून, त्यास लवकरात लवकर मंजूरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. यासाठी राज्य शासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. त्यानुसार अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीनं काढला असून, त्याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यात, ‘माझा एक दिवस बळीराजासोबत’, हे अभियान राबवून कृषी धोरण तयार करणार असल्याची घोषणा, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली. या अभियानात शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं यासाठी, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्यानं एकत्���ितरित्या हे अभियान येत्या एक सप्टेंबरपासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी दिवसभर राहणार असून, त्यांची दिनचर्या जाणून घेणार आहेत. या दरम्यान त्यांच्या अडीअडचणी जाणून आत्महत्यांच्या कारणांची मीमांसा देखील करणार आहेत, असं ते म्हणाले. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करुन कृषी धोरण तयार करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
****
अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदं लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री संदीपान भुमरे यांनी काल विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. अल्पसंख्याक विभागातल्या रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत तसंच निधीसाठी विविध विभागाशी समन्वय ठेवण्यात येईल अशी माहितीही भुमरे यांनी यावेळी दिली.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केंद्रीय भूसंपादन कायद्यापेक्षा अधिक मोबदला आणि सुविधा देण्याचा ठराव, काल विधीमंडळात मंजूर करण्यात आल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तत्कालीन भूसंपादन कायदा १८९४ च्या कलम १०७ नुसार राज्यांना दिलेल्या अधिकारानुसार राज्य शासनानं भूसंपादन करण्यासाठी उचित बदल केले आहेत. या बदलांमुळे भूधारक आणि प्रकल्पग्रस्तांना अधिकचा मोबदला मिळणार असून, जास्तीच्या सुविधा मिळणार आहेत. तसचं औद्यौगिकरणासाठी जमिनी उपलब्ध होणं अधिक सोयीचं होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
****
आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. कुपोषणमुक्तीसाठी महिला आणि बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या समन्वयानं विविध योजना राबवण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभेत कुपोषणाच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुपोषणामुळे मृत्यू झाले नाही, या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या दाव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
****
कृष्णा - मराठवाड��� सिंचन प्रकल्पासाठी लवादाकडे पाठपुरावा करणार असून, प्रकल्पाचं काम थांबवलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली.
****
विधानपरिषदेतल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल विधानपरिषदेत दरेकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पुढील तीन महिन्यात हे तैलचित्र लावण्याचं काम पूर्ण करणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
****
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या एक हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांच्या बाबतीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा आरक्षणा संदर्भातली मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांशी बोलतांना हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे, असे आदेश काल वनविभागानं जारी केले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला याबाबतची घोषणा केली होती.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली नाही. येत्या सोमवारी २९ तारखेला शिवसेनेचे वकील न्यायालयात आपलं म्हणणं सादर करतील, त्यानंतर सुनावणी कधीपासून सुरु होणार हे निश्चित होईल.
****
शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देशातल्या ४६ शिक्षकांना २०२२चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. यामध्ये राज्यातले शशिकांत कुलथे, सोमनाथ बलके आणि कविता संघवी या तीन शिक्षकांचा समावेश आहे. कुलथे हे बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या दामु नाईक तांडा शाळेचे, तर बलके हे आष्टी तालुक्यातल्या पारगाव इथल्या जोगेश्वरी शाळेचे शिक्षक आहेत. येत्या शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे .
****
अमृत महोत्सवानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना सुरु करण्यात आली आहे. ७५ वर्षांवरील या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्रांचं वितरण आणि योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झाला. या योजनेचा १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना ��ाभ होणार असून, शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र आणि केंद्र आणि राज्य शासनाचं ओळखपत्र, यापैकी कुठलंही एक ओळखपत्र वाहकाला दाखवल्यास या योजनेअंतर्गत मोफत प्रवास करता येणार आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेव अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबाद इथं केलेल्या भाषणात चौदा चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी दोषारोपपत्र तयार करण्यात आलं आहे. ते दाखल होताच न्यायालयानं आदेश दिल्यानंतर हजर राहण्याची नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आली आहे.
****
साखर सम्राट अभिजित पाटील यांच्या नाशिक, उस्मानाबाद, पंढरपूर आणि परभणी इथल्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं काल छापे मारले. या चौकशीत काय निष्पन्न झालं, हे अद्याप कळू शकलं नाही.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८८७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ९१ हजार २७६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २१४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार १९० रुग्ण बरे झाले.  राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ३० हजार ७९३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६, औरंगाबाद १२, लातूर नऊ, जालना आठ, नांदेड चार, तर बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
नाशिक मधल्या बांधकाम विभागातला कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सेंट्रल किचनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. जिल्ह्यातल्या हरसूल या आदिवासी गावात असलेल्या वसतीगृहात सेंट्रल किचन बांधण्याचं काम आर के इन्फ्रा कॉन्स्ट्रो लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं आहे. दोन कोटी ४० लाख रुपयांच्या या कामासाठी आरोपी अभियंता बागुल यानं एकूण खर्चाच्या १२ टक्के या प्रमाणे लाच मागितली होती.
****
प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत सावन कुमार यांनी संज��व कुमार ते सलमान खान अशा सर्व मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं.  त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. यामध्ये सौतन, साजन बिन सुहागन, सनम बेवफा, खलनायका, माँ, चांद का तुकडा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सावन कुमार हे महिलांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते.
****
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल जालना शहरात नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला मूर्तीवेस रस्ता तातडीनं सुरू करण्यात यावा, तसंच कन्हैय्यानगर रस्त्याचं रखडलेलं काँक्रिटीकरण पूर्ण करावं या प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      समृध्दी महामार्ग राज्याच्या विकासाचा साक्षीदार ठरेल - मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
·      पुणे-औरंगाबाद महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्याची केंद्रीय परिवहन मंत्र्यांची सूचना.
·      शिंदे सरकारचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीला शिवसेनेकडून आव्हान.
·      औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू.
आणि
·      उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याचं २२ टक्के पाणी दूषित.
****
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत आज मुंबईत घेण्यात आलेल्या संकल्प ते सिध्दी-नवा भारत, नवे संकल्प या परिषदेत बोलत होते. समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी आणि उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. इथेनॉलला पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं. दिल्ली-मुंबई-बंगळुरू तसंच पुणे-औरंगाबाद हे महामार्ग करण्याचं नियोजन सुरु असून, राज्य शासनाने या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करण्याची सूचना गडकरी यांनी केली.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई ही फक्त महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून २०३० पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या गटानं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीलाही आव्हान दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी ११ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यापूर्वीच्या याचिकांवरही याच दिवशी सुनावणी होणार असल्याचं न्यायमूर्ती इंद्रा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सांगितलं.
****
दरम्यान, कायदेशीरदृष्ट्या धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ��िधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील पक्ष या दोन्ही स्वतंत्र बाबी असून आमदार बाहेर गेले तरी पक्ष तसाच राहतो असं ठाकरे म्हणाले.  
****
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, असं मत व्यक्त करत शिंदे यांनी यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे आज निधन झालं. आज सकाळी निवडणुकीच्या भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर शिंजो आबे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याच��� जपानच्या सरकारी वृत्त विभागानं सांगितलं. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. शिंजो आबे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक अशा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी वरील ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना, अभिनव कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांबद्दलची माहिती २८ जुलै पर्यंत माय जी ओ व्ही, नमो अॅप्लिकेशन किंवा १८००११७८०० या क्रमांकाच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित करून पाठवाव्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. ‘मन की बात’ कार्यक्रम मालिकेचा हा ९१ वा भाग असणार आहे.
****
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात ८ जुलै १९१० रोजी घेतलेल्या ऐतिहासिक उडीला ११२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. सावरकरांच्या राष्ट्रकार्याची माहिती देणारं संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारण्यात यावं, यासाठी आपण स्वतः आग्रह धरणार असल्याचं नार्वेकर यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा आज विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. गणेश थेटे, भारत वर���ड, जगदीश मुरकुंडे, अर्जून मगर अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. कन्नड तालुक्यातल्या हिवरखेडा नांदगीर वाडी इथं नवीन रोहित्र बसवण्याचं काम सुरू असताना, ही घटना घडली असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याचं २२ टक्के पाणी दूषित असल्याचं आढळलं आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीच्या निष्कर्षातून ही माहिती समोर आली. तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी आठ तालुक्यातील ९३३ पाण्याच्या नमुन्यात २०८ नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या २३१ गावांना पिवळे कार्ड तर ३९१ गावांना हिरवे कार्ड देण्यात आलं आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टक्के दूषित पाणी नमुने उस्मानाबाद तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे १४ टक्के दूषित पाणी नमुने हे कळंब तालुक्यात आढळून आले असून लोहारा तालुक्यात दूषित पाण्याचं प्रमाण शून्य टक्के आहे.
****
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विरोधात १२ जुलै मंगळवारी शहरात भव्य मूक मोर्चा निघणार आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अयूब जागीरदार आणि गौतम खरात यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गौतम खरात यांनी याबाबत बोलताना, छत्रपती संभाजी महाराज यांचा आपण आदर करतो. पण औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुण्यात जीवन व्यतीत झाले. त्यांची समाधीसुध्दा पुण्याजवळ असल्याने संभाजीनगर हे नाव पुणे शहराला देण्यात यावं अशी मागणी खरात यांनी केली.
****
बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे. आज गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर इथं पोलिस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन करत बैठक घेतली. प्रतिपंढरपूर असलेल्या औरंगाबाद नजीक पंढरपूर इथं या दिवशी प्राण्यांचा बळी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणारी हानी टाळण्यासाठी अधिक दक्षता आणि सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचं राज्याचे कृषि विभाग प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
बीड जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन मान्सून काळात सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
****
नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ११ पूर्णांक ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत २५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातही आज सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी १४६ मिलिमीटर पाऊस झाला असून खरीप हंगामातल्या पिकांच्या पेरण्यांना यामुळे वेग आला आहे.
****
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त “एक वि��्यार्थी एक झाड” या अभियानाअंतर्गत औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, काल १०० विद्यार्थ्यांच्या हस्ते १०० झाडं लावून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय-दुर्मिळ झाडांची ही रोपं निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीनं उपलब्ध करुन देण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हा�� वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
·      किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्यानं आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच किराणा दुकान सुरू राहणार.
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या, पॅकेजमधली मदत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·      फुफ्फुसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी घरातल्य�� घरात सहा मिनिटं चालण्याच्या चाचणीवर आरोग्य विभागाचा भर.
·      राज्यात ५८ हजार ९२४ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ११३ जणांचा मृत्यू तर सात हजार ४५७ बाधित.
आणि
·      प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन.
****
देशातल्या १८ वर्षांवरील वयोगटाला कोविड लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या एक मे पासून हे लसीकरण सुरू होईल. केंद्र सरकारनं काल कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर करताना ही माहिती दिली. या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या कोविड लस उत्पादक कंपन्या, थेट राज्य सरकारांना लस पुरवठा करू शकतील, तसंच खुल्या बाजारात कोविडची लस उपलब्ध करून देऊ शकतील, मात्र लसीच्या एकूण उत्पादनाच्या ५० टक्के साठा केंद्र सरकारला देणं, सर्वच लस उत्पादक कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारांना किंवा उत्पादकांना लसीची किंमत एक मे पूर्वी जाहीर करावी लागेल, असंही केंद्रानं सांगितलं आहे.  
दरम्यान, १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केलं जाईल आणि लसीच्या पुरेशा मात्रांचा पुरवठा वेळच्या वेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
कोविडग्रस्तांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय प्राणवायूची वाहतुक करण्यासाठी, रेल्वेची तयारी पूर्ण झाली आहे. काल मुंबईतल्या कळंबोली स्थानकातून रिकामे सात टँकर घेऊन, एक मालगाडी विशाखापट्टणम कडे रवाना झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हे टँकर जमशेदपूर, रौरकेला आणि बोकारो इथं पाठवले जातील. रिकाम्या टॅंकरमध्ये प्राणवायू भरून दोन दिवसांनी हे टॅंकर पुन्हा कळंबोलीत दाखल होणार आहेत.  राज्यातून परिवहन महामंडळाच्या वतीनं टँकर वाहतुकीचं नियोजन केलं जात असून, कळंबोली इथं एक हजार ६१८ टँकर आणले असल्याचंही, रेल्वच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात रा��्य मार्ग परिवहन महामंडळही तयार असल्याचं, परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटीचे चालक सज्ज आहेत. गरज असलेल्या ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर्स तयार करून, प्राणवायूचा प्राधान्यानं पुरवठा केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शवभूमीवर कडक निर्बंध असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्यानं किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन, अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीनं स्थापन करण्यात यावेत, असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं.
कोविड निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या, ५ हजार ४७६ कोटींच्या पॅकेजमधली मदत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही, उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या अंतर्गत सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, मोफत शिवभोजन थाळी, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आणि आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगाऊ मदतीचं तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातले नोंदणीकृत कामगार, घरगुती कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी, तात्काळ वितरित करण्यात येणार आहे.
****
कोविड संसर्ग झालेला असताना, आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे तपासण्यासाठी गृहविलगीकरणातल्या रुग्णांनी, किंवा कोविडची लक्षणं असलेल्या व्यक्तींनी, घरातल्या घरात सहा मिनिटं चालण्याची चाचणी करण्यावर आरोग्य विभागानं भर दिला आहे. यासंदर्भात नागरिकांचं प्रबोधन करावं, असं आवाहन, आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी केलं आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत, व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला, सहा मिनिटं चालण्याच्या चाचणी बाबत, अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. या चाचणीत रुग्णाने सामान्य गतीने सहा मिनिटं चालण्यापूर्वी, आणि चालल्यानंतर, बोटाला ऑक्सीमीटर लावून रक्तातल्या प्राणवायुच्या प्रमाणाची नोंद करावी, चालून झाल्यावरचं प्रमाण जर ९३ अंकापेक्षा कमी असेल किंवा दोन्ही नोंदीत तीन अंकांपेक्षा अधिक फरक असेल किंवा जास्ती प्रमाणात धाप लागत असेल, तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना, आरोग्य मंत्रालयानं केली आहे.
****
राज्यात काल ५८ हजार ९२४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली आहे. काल ३५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६० हजार ८२४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५६ शतांश टक्के झाला आहे. काल ५२ हजार ४१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ७६ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या सात हजार ४५७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २८, औरंगाबाद २४, परभणी १६, नांदेड १५, उस्मानाबाद दहा, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, तर जालना जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे एक हजार ४९३ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ४२१, नांदेड एक हजार ३७५, बीड एक हजार १२१, उस्मानाबाद ६६२, परभणी ५७३, जालना ५२१, तर हिंगोली जिल्ह्यात २९१ नवे रुग्ण आढळून आले.
****
राज्यातलं औद्योगिक क्षेत्रातलं पहिलं कोविड लसीकरण केंद्रं तसंच आरटीपीसीआर चाचणी केंद्र काल नाशिक औद्योगिक वसाहतीत सुरू झालं. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते, दूरदृष्य प्रणालीद्वारे या केंद्राचं उद्धाटन झालं. कामगारांच्या लसीकरण मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहून पुढे येत आहे, ही बाब भूषणावह असल्याचं भुजबळ म्हणाले.
****
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत जे जे रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण आवश्यक असून, आतापर्यंत सुमारे एक कोटी २२ लाख लाभार्थ्यांना लस देऊन, महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनानं आणखी चार ठिकाणी द्रवरूप प्राणवायू प्रकल्प लवकर उभारण्यासाठी पूर्ण वेगाने काम करण्याचे निर्देश, पालकमंत्री शंकरराव गडाख यांन��� दिले आहेत. जिल्ह्यात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हवेतून प्राणवायू वेगळा करणारा प्रकल्प उभारण्यासाठी, प्रशासनानं मागणी प्रस्ताव तातडीनं सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत, घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्यावा, आणि संशयितांच्या तातडीने चाचण्या करून उपचार सुरू करावेत, असं गडाख यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं युध्दपातळीवर प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची सूचना, पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिली आहेत. या शिवाय पालकमंत्र्यांनी प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्ण खाटा, सामान्य रुग्णखाटा, रेमडेसीवीर औषध पुरवठा तसंच व्हेंटीलेटरची संख्या वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. खासदार राजीव सातव यांनी, जिल्ह्यात वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता, प्राणवायू प्रकल्प उभारण्याची मागणी केली होती.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, महापालिका आणि आरोग्य विभागानं, हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णांना तत्काळ रुग्णखाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. ते काल एका आढावा बैठकीत बोलत होते. प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा, व्हेंटिलेटर सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून ठेवाव्यात, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या वतीनं पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये, मुलांच्या वसतिगृहात कोविड समर्पित सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात प्राणवायू सुविधा असलेल्या ९० रुग्णखाटा, तसंच २०० अलगीकरन रुग्णखाटा उपलब्ध आहेत. सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांची या केंद्राच्या सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरातले डोळे तसंच दाताचे दवाखाने येत्या ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश, मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत. कोविड संसर्ग वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड इथं उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचं काल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन केलं. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाधितांना आरोग्य सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितलं असून, आजच्या घडीला जिल्ह्यात प्राणवायूच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं.
****
परभणी तालुक्यातल्या झरी तसंच पिंगळी इथं कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं. त्यांनी झरी इथं नियोजित कोविड केंद्राच्या जागेची काल पाहणी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमधून, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतत असल्यामुळे, ग्रामीण भागातही कोविडचा संसर्ग वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी, झरी तसंच पिंगळी इथं कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. शहरातल्या कोविड रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, या केंद्रात पुरवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सर्व रुग्णालयांनी प्राण वायुचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. ते काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात द्रवरुप प्राणवायूचा पुरेसा साठा आहे, मात्र भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन नियोजन करणं आवश्यक असल्याचं, केंद्रेकर म्हणाले. सर्वच कोविडग्रस्तांवर उपचारासाठी प्राणवायूची आवश्यकता नसते, गरज असणाऱ्या रुग्णांनांच प्राणवायू लावण्यात यावा, प्राणवायूची गळती होऊ देऊ नये, आदी सूचनाही केंद्रेकर यांनी केल्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असून, जिल्ह्याल्या हे इंजेक्शन तातडीनं उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. कोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकलं जात असून, रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जात असल्याचं सांगून जलिल यांनी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला.
****
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधासाठी नियम पाळण्याचं, तसंच कोविड लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनाची महामारी विशेषतः ग्रामीण भागामधे मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. तेव्हा सर्व जनतेने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि नियमाचं काटेकोरपणाने पालन करणे, या बाबींची काळजी घेतली तर निश्चित कोरोना महामारी कमी होण्याला मदत होईल. माझी आपणाला दुसरी एक विनंती अशी राहणार आहे की ४५ वर्षाच्या वरच्या नागरिकांना लस उपलब्ध आहे. ती लस सर्वांनी घ्यावी. मी स्वतः लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. जनतेला माझी हात जोडून विनंती राहणार आहे की नियमांचे काटेकोरपणाने पालन करा. आणि कोरोनाला संपवण्यासाठी सहकार्य करा.
****
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून केलेलं काम, या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरेल, त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनीही भावे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. एका प्रयोगशील दिग्दर्शिकेला आपण मुकलो आहोत, अशी भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली. कर्करोगानं आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
परभणी जिल्ह्यात बियाणं, खतं आणि किटकनाशकं यांच्या गुणवत्ता आणि पुरवठ्यासंदर्भात अडचणींचं तत्काळ निराकरण करण्यासाठी, जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. गेल्या खरीप हंगामात आलेल्या अडचणी पाहता, हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं, जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मागील वर्षी घेण्यात आलेल्या मुलाखती, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातल्या नव्या तारखा लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी, नागपूर इथल्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु, डॉ.विलास सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. डॉ.सपकाळ यांनी काल पदभार स्वीकारला.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यातल्या १६७ धरणांच्या पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
·      इथेनॉल खरेदीचे आता वेगवेगळे दर, नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आणि तेल आयात घटण्याची सरकारला आशा.
·      औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कला विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरु.
·      राज्यात आणखी पाच हजार ९०२ कोविड बाधितांची नोंद, १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात १३ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४७४ रुग्णांची नोंद.
आणि
·      ‘लव्ह औरंगाबाद मिशन’ला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रारंभ.
****
धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातल्या ७३६ धरणांचा समावेश असून, त्यात राज्यातल्या १६७ धरणांचा समावेश आहे. यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आर्थिक मदत करणार आहे. या प्रकल्पातंर्गत निवड झालेल्या धरणांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारणं, शाश्वत विकास करणं, धरणांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्यामंध्ये संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणं, धरणांशी संबंधित विभागांचं मजबुतीकरण करणं, धरणांच्या माध्यमांतून महसूल मिळवण्याची शक्यता तपासणं, यासह प्रकल्प व्यवस्थापन करणं या घटकांचा यात समावेश असेल.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांमार्फत इथेनॉल खरेदीबाबतच्या व्यवस्थेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पूर्वी इथेनॉलचा एकच दर असे, मात्र आता वेगवेगळे दर असतील. साखरेपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ६२ रूपये ६५ पैसे प्रतिलिटर असेल तर साखरेचं प्रमाण अधिक असलेल्या ऊस चिपाडाच्या बी दर्जाच्या अवजड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ५७ रूपये ६१ पैसे आणि संपूर्ण साखर काढून घेतल्यानंतर उरलेल्या चिपाडाच्या सी दर्जाच्या अवजड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ४५ रूपये ६९ पैसे प्रतिलिटर असेल. नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगला भाव मिळेल आणि तेल आयात कमी होण्यासही मदत होईल, अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्क आणि रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्कसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसंच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे. राज्याची बल्क ड्रग पार्क आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क याची प्रकल्प किंमत दोन हजार ४४२ कोटी रुपये इतकी तर वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कची प्रकल्प किंमत ४२४ कोटी रुपये इतकी आहे. ही विशेष प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या १२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे. मे आणि जून २०२० मध्ये मुदत संपलेल्या तीन महानगरपालिका, आठ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया कोविडमुळे स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचाही समावेश आहे.
शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. ३१ मार्च २०२१ पर्यंत हा दर लागू राहणार आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरु होत आहेत. केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी दोन मेट्रिक टन तर मोठ्या पदांसाठी २५ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा घातली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन कांदा घेऊन त्याची साठवणूक करण्यात अडचणी येत असल्यानं व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कांदा निलाव बंद केले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने काल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साठवण मर्यादा वाढवून द्यावी यासाठी राज्य शासन पाठपुरावा करेल, असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी, कांदा लिलाव सुरु करण्याचं आवाहन या बैठकीत केलं होतं.
दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून, त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. कांदा साठवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या मर्यादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना आता विकता येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन कांदा खरेदी करता येणार असल्यामुळे अडचण येणार नाही.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जेष्ठ साहित्यिक, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु, माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी केलं आहे.
****
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनंही प्रतिबंधित क्षेत्रात ३० नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवली आहे. राज्य सरकारनं काल याबाबतचा आदेश जारी केला. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे सर्व व्यवहार कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून सुरु र��हणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालयातल्या ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचं परिपत्रक शालेय शिक्षण विभागानं काल जारी केलं. शाळा जेव्हा सुरु होतील, तेव्हा पालकांची लेखी हमी घेण्यात यावी, त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, असं या आदेशात म्हटलं आहे.    
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव विज देयकं, तसंच दूध दर वाढ, मंदिर प्रवेश, अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे प्रश्र्न तातडीनं सोडवले जावेत, यासाठी ही भेट घेतल्याची माहिती राज ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.  
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ९०२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे ��ाज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६६ हजार ६६८ झाली आहे. राज्यभरात काल १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ८८३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख २७ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४७४ रुग्णांची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू, तर नवे ६० रुग्ण, बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७० रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे १३३ रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात ७१, उस्मानाबाद जिल्ह्यात ५६, लातूर जिल्ह्यात ५०, परभणी जिल्ह्यात २५ आणि हिंगोली जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार १२० रुग्ण आढळले, तर ३३ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७०२ नवे रुग्ण, तर २१ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ३१३ रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २६५, सातारा १८६, सोलापूर १५७, सांगली १३३, रायगड १२५, गडचिरोली ११८, बुलडाणा ८४, यवतमाळ ४४, सिंधुदुर्ग ४३, वाशिम २९, धुळे २२, तर रत्नागिरी जिल्ह्यात नव्या १२ रुग्णांची नोंद झाली.  
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ऊन्हाळी परीक्षांचे निकाल उद्या ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांनी काल ही माहिती दिली. पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आज संपणार आहेत. एक दोन तांत्रिक अडचणी वगळता सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असल्याचा दावा कुलगुरुंनी केला आहे.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या लव्ह औरंगाबाद मिशनला काल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सुरुवात झाली. शहराचे मुलभूत प्रश्न मार्गी लागत असताना नागरिकांना शहराबद्दल प्रेम वाटावं, आपुलकी निर्माण व्हावी, त्यांनी शहराबद्दलचे सकारात्मक विचार समाजात मांडावे, या उद्देशानं महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग योजनांची आढावा बैठकही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. औरंगाबाद - वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातल्या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातले प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन, सर्व संबंधित यंत्रणांना सोपवलेली कामं दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.  
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व ५१ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा निकष लावावा, संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतीवृष्टीची मदत सर्वच शेतकऱ्यांना देण्यात यावी, या आणि इतर मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास दोन नोव्हेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निवेदन दिलं.
परभणी जिल्ह्यातल्या जांब महसूल मंडळाचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह ग्रामस्थांनी काल परभणी शहरात धरणे आंदोलन केलं. यासंबधीचं निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना देण्यात आलं.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या आमदार निधीतून घेतलेली वैद्यकीय यंत्रसामुग्री काल लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस सुपुर्द केली. कोरोना विषाणूग्रस्त रूग्णांकरता वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी चव्हाण यांनी मे २०२० मध्ये दहा लाख ४८ हजार रुपये इतका निधी दिला होता, त्यातून हे साहित्य खरेदी करण्यात आलं.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जेष्ठ साहित्यिक छाया महाजन यांनी केलं आहे.
****
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१ च्या ३५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांच्या हस्ते झाला. अंबाजोगाई साखर कारखाना बीड जिल्ह्यातल्या इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देईल, शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या पंचवीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते काल झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
****
बीड जिल्हा परिषदेतले शाखा अभियंता वशिष्ट तावरे यास २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिका सही करून बांधकाम विभागास पाठवून त्याचे बील मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातले कवी देविदास फुलारी यांना नारायण सुर्वे कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानचिन्ह, ग्रंथ आणि दोन हजार पाचशे रूपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मदतीचा लवकरच निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·      मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं मत.
·      राज्य सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरल्याची विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका.
·      राज्यात आणखी पाच हजार ९८४ कोविड बाधितांची नोंद, १२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात १५ रुग्णांचा मृत्यू तर, नव्या ४३२ रुग्णांची नोंद.
आणि
·      परळीच्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याला दहा लाख रुपयांची लाच घेताना अटक.
****
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, अनेकांचे प्राणही गेले आहेत, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर ते सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यावरचा अतिवृष्टीचा धोका अद्याप कायम आहे, यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नुकसान भरपाईसाठी गरज पडल्यास केंद्र सरकारकडे मदत मागितली जाईल, पंतप्रधानांनी आपल्याला दूरध्वनीवरून मदतीची तयारी दर्शवली असल्याचं, त्यांनी सांगितलं.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सकाळी अक्कलकोट तालुक्यात अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सोलापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्या १० व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली, तसंच आपदग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं वार्ताहरांशी बोलताना, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलं. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता या भागात पूर्वी झालेल्या भूकंपाइतकीच मोठी असल्याचं ते म्हणाले. या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं असून, पिक विमा निकषात दुरुस्ती करणं, बाधित झालेल्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणं, हे राज्यासमोर आव्हान असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं पवार म्हणाले
****
दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही काल तुळजापूर इथं वार्ताहरांशी बोलताना, अतिवृष्टीमुळे जेवढं नुकसान झालं आहे, तेवढी मदत नक्कीच केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं. विमा संरक्षणाखाली येणारी जमीन तसंच पीक विमा भरलेल्या खातेदारांची माहिती तयार करावी, पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. नुकसान झालेले रस्ते, पूल, पाझर तलाव आदीच्या दुरुस्तीबाबत स्वतंत्र अहवाल शासनाला सादर करावा, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालना तालुक्यातल्या आंतरवाला, गोलापांगरी, कुंभेफळ या गावांमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी काल पुणे जिल्ह्यातील बारामती इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागतो आहे, यातून सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत असल्याचं ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या आडगाव मंडळामध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांनी नुकसानीची पाहणी केली.
****
सरकारनं पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना तत्काळ २५ हजार रुपये मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी काल पंढरपूर इथं अतिवृष्टीमुळे आणि भीमा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी निर्माण करून त्यातून ३५ हजार कोटी रुपये राज्याला द्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, शेट्टी यांनी काल लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या तुंगी या गावीही नुकसानीची पाहणी केली. दापेगाव साठवण तलावाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं उभ्या पिकांचं नुकसान झाल्याबाबत त्यांनी तहसीलदारांना संपर्क साधून पंचनामा करण्यास सांगितलं.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही काल लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे ४८ तासांत पूर्ण करण्याचे, निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणं, वा���ंवार हात धुणं आणि सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.
****
परभणी इथल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयास उर्वरित निधी देऊन सक्षम करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. परभणी जिल्ह्यातल्या कोविड-19 संबंधी आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्यातला कोविडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी कोविड सेंटरमधल्या रुग्णांवर उपचार करावे, तसंच नागरिकांनीही लक्षणं दिसल्यास तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. परभणी इथं उभारण्यात आलेल्या द्रवरुप प्राणवायू प्रकल्पाचं काल टोपे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तीनशे वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड मंडळानं केलेल्या याचिकेवर न्यायालयानं स्थानिक परिस्थितीनुसार याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले असल्याची माहिती मंडळाचे सचिव रविंद्रसिंग बुंगई यांनी दिली.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ९८४ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख एक हजार ३६५ झाली आहे. राज्यभरात काल १२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४२ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १५ हजार ६९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७३ हजार ७५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३२ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू, तर नवे १०१ रुग्ण, जालना जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू, तर नवे २७ रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात नव्या ११३, तर लातूर जिल्ह्यात ४६ रुग्णांची नोंद झाली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात ७३ तर उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ४२ रुग्णांची भर पडली. परभणी जिल्ह्यात २१, तर हिंगोली जिल्ह्यात आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली.  
****
मुंबईत काल आणखी एक हजो २३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५४९ नवे रुग्ण आणि ४२ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी ३१८ रुग्ण आढळले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात २१५, सातारा २०९, जळगाव १५२, रायगड १४३, गडचिरोली ८०, यवतमाळ ५९, भंडारा ३२, अमरावती २८, धुळे २४, वाशिम २०, रत्नागिरी १८, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एका रुग्णाची नोंद झाली.  
****
जालना इथल्या कोविड रुग्णालयात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या वेगवेगळ्या चाचण्यांसाठी बसवण्यात आलेल्या इम्युनोसे यंत्रासह दोन कार्डियाक रुग्णवाहिकांचं लोकार्पण काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. इम्युनोसे या एकाच मशीनच्या मदतीने अँटीबॉडीजसह विविध शारीरिक चाचण्या करणं शक्य होणार असल्यानं हे मशीन रुग्णांसाठी वरदान ठरेल, असं टोपे यावेळी म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातल्या परळीच्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याला दहा लाख रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. वैद्यनाथ बँकेनं कळंब इथल्या एका व्यापाऱ्याला अडीच कोटी रुपयाचं कॅश क्रेडिट मंजूर केल्याचा मोदबला म्हणून, जैन यानं १५ लाख रुपये लाच मागितली होती, त्यापैकी १० लाख रुपये घेताना, त्याला काल त्याच्याच परळीतल्या अन्नधान्याच्या दुकानात पकडण्यात आलं. जर्‍न याला ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणी परळीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानापोटी सरसकट हेक्टरी ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, पीक विमा देण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रब्बीच्या पेरणीसाठी २५ हजार रुपये अनुदान द्यावं, या आणि इतर मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. गंगापूरचे माजी पंचायत समिती सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखलं, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेले टमाटे, मक्याची कणसं, सोयाबीन आणि इतर पिकं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून निषेध नोंदवला.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. माता रमाई तसंच पंतप्रधान घरकुल योजनेच्या घरकुलांचे हप्ते त्वरित वितरित करण्यात यावेत, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथं काल कांद्याला प्रतिक्विंटल आठ हजार ५०० रूपये इतका उच्चांकी भाव मिळाला. दिंडोरी तालुक्यातल्या वणी इथं कांद्याला आठ हजार शंभर रुपये, लासलगाव बाजार समितीत सहा हजार ८९१ रुपये तर विंचूर इथंही सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. गेल्या काही दिवसांत पावसामुळे झालेलं नुकसान तसंच कांद्याची वाढलेली मागणी, या कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या व्यापक विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा विकास समन्वय आणि संनियत्रण - दिशा समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल दिशा समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घर बांधण्यास सहकार्य करावं, जिल्ह्यांतर्गत रस्ते तसंच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधा��णा करावी, असं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन उस्मानाबादचे
रब्बी हंगामासाठी हरभरा बियाण्यांसाठी लागू केलेली सोडत पद्धत बंद करुन, शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर एक हरभरा बियाण्यांची बॅग द्यावी अशी मागणी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या अनसरवाडा, सोनखेड, लिंबाळा या भागात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी सरकारनं पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकता तात्काळ मदत देऊन दिलासा देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
परभणीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यानं आपल्या वाढदिवसानिमित्तानं ठिकठिकाण��� रक्तदान शिबीरे घेण्यात येत असून, यापुढे रक्ताचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं आमदार राहुल पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल परभणी इथं झालेल्या रक्तदान शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोविड नियम पाळून साजरा;  माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगर पालिकेचा राज्यात पहिला क्रमांक
** आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचा बीड इथं मोर्चा; औरंगाबाद जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना अटक
** औरंगाबाद इथं महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन
आणि
** देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर; उद्या सायंकाळी ऑनलाईन वितरण
****
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोविड नियम पाळून साजरा करण्यात आला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आले.
 गेल्या दशकात ज्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढलं आहे अशा जगातल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते.गेल्या सहा वर्षात वन आणि वृक्ष क्षेत्र १५ हजार वर्ग किलोमीटरनं वाढलं असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
 राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२२ नगर पालिकांमधून हिंगोली नगर पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. आज या पुरस्काराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आलं. या अभियानात पृथ्वी, जल, वायू यापैकी एका घटकावर काम करून शहराचा चेहरा बदलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. हिंगोली पालिकेने पृथ्वी या घटकामध्ये शहरात गेल्या वर्षभरात ५ हजार झाडं लावून त्यांचं संगोपन केलं तर देशी वाणाच्या १५ हजार वृक्षांची रोपवाटिका तयार केली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे
****
औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या गोगाबाबा टेकडी हरितकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिलेल्या पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा संदेशाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. टेकडीवर ६ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद महानगर पालिकेच्यावतीनं आज शहरात खाम नदीपात्रालगत तसंच विविध उद्यानांमधून दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठाच्या वतीने 'पर्यावरण : समस्या आणि उपाय' विषयावर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं. शाश्वत विकास अभ्यासक, प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी या व्याख्यानात, निसर्गाला उपभोग्य वस्तू समजू नये अन्यथा अवघ्या विश्वाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असं मत व्यक्त केलं.
****
हिंगोली इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
परभणी इथं उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला. मानवत, गंगाखेड तसंच इतर तालुक्यातही वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.
जालना इथं शहरातल्या हुतात्मा चौकात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
****
कोविड महामारीमुळे ज्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा भारतातील निवासासाठीचा पूर्वनिश्चित कालावधी ३० जून २०२१ नंतर संपत असेल तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे परिचालन सुरु झाल्याच्या दिवसानंतर आणखी ३० दिवसांसाठी तो वैध आहे असे मानण्यात येईल. कोविडमुळे, व्यावसायिक विमानांची सामान्य परिचालन सेवा उपलब्ध नसल्याकारणाने मार्च २०२० पूर्वी वैध भारतीय व्हिसावर भारतात आलेले अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. अशा परदेशी नागरिकांना टाळेबंदीच्या काळात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला.
****
मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीनं आज बीड इथं आरक्षण मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते, कोविड विषयीचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेऊन क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण मोर्चा आणि रायगड इथं शिव राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्याना औरंगाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी आज अटक करण्यात आली. पैठण औद्योगिक परिसर आणि बिडकीन पोलीस ठाण्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबादहून बीडला जात असतांना काही कार्यकर्त्यांना पाचोड पोलीसांनी ताब्यात घेतलं.
****
नंदुरबार  इथले  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी त��सीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीं निशा पावरा यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तपासणी पथकाने वाळू वाहतुक करणारा ट्रक दोन तास अडवला, त्यावेळी चौधरी यांच्याशी वाद झाला. दरम्यान, गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळु ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारहाण केली नसून संबंधीत महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा दावा त्यांनी केला आहे.
****
कोविड काळात काम न मिळाल्यामुळे लोककलावंतांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार असल्याचं,गायक आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. वयोवृद्ध कलाकारांना सध्या सरकारकडून मिळत असलेलं दीड हजार रुपये मानधन पाच हजार रुपये करावं यासाठी महामंडळ पाठपुरावा करत असून गेल्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यासंदर्भात भेट घेऊन मागणी केली असल्याचं महामंडळाचे संस्थापक डॉ.प्रशांत होर्शिळ यांनी सांगितलं.
****
देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रिंट मीडिया श्रेणीत जालन्याचे संजय प्रभाकर देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत शहाद्याचे जगदीश एकनाथ जयस्वाल, न्यूज पोर्टल श्रेणीत जळगावचे शेखर पाटील तसंच सोशल मीडिया मुक्त लेखनासाठी भुसावळचे निलेश सुभाष वाणी यांना गौरवण्यात येणार आहे. उद्या रविवारी सायंकाळी ऑनलाईन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यु-ट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद इथं आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत आठ कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दोन तर  अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळी २६ नवे कोविडग्रस्त उपचारासाठी दाखल झाले, तर १५ रुग्ण संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ५०८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या २२९  रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५८ हजार ७६३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ७१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज २४३ नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ३९ रुग्ण, बीड तालुक्यात त्या खालोखाल ३८, पाटोदा ३४, केज तसंच माजलगाव प्रत्येकी २९, धारूर २०, अंबाजोगाई १६, गेवराई १४, शिरूर तसंच वडवणी प्रत्येकी १० तर परळी तालुक्यात आज नवे ४ रुग्ण आढळले.
****
धुळ्याचे  सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल आणि रानमळा गावचे सरपंच प्रवीण पवार यांनी स्वतःच्या मालकीची जमीन, कोरोना विषाणू संसर्गामुळे बळी गेलेल्या रुग्णांचे  अंत्यविधी करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. अशा रुग्णांचे अंत्यविधी नागरी वस्तीतल्या स्मशानभूमीत करण्याला लोक विरोध करतात मात्र असतांनाही अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत या दोघांनी जिल्हा प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्यासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे.
****
0 notes