#पूरग्रस्तांना
Explore tagged Tumblr posts
Text
Pune : पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप; पिंपरी चिंचवड शहरातील 7 हजार कुटुंबांना मिळणार मदत
एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ( Pune ) हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. अनुदानाची रक्कम सर्व कुटुंबांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सात हजार पेक्षा अधिक कुटुंबांना ही मदत मिळणार आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ राहणार - पंतप्रधान मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन
नागपूरच्या पूरस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा, पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देणार
नांदेडमध्ये अतिवृष्टी, बीडच्या आष्टीत मुसळधार, तर बुलढाण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस, अनेक गावात नदीनाल्यांचं पाणी शिरलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शुभमन गील आणि श्रेयस अय्यरची शतकी खेळी, भारताचा धावांचा डोंगर
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची अंतिम फेरीत धडक
****
जी - ट्वेंटी शिखर परिषदेत भारतानं, आफ्रिकी महासंघाला जी- ट्वेंटी समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे पाचवा भाग होता. जी - ट्वेंटीचं यशस्वी आयोजन आणि जागतिक पातळीवर भारताचं वाढणारं महत्वही पंतप्रधानांनी यावेळी विषद केलं. आधुनिक काळात भारतानं जी- ट्वेंटी परिषदेत, आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे. हा कॉरिडॉर पुढची शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार असून याची सुरुवात भारतीय भूमीवर झाली याची नोंद इतिहासात कायम राहील, असं पंतप्रधान म्हणाले. दिल्लीतील जी-ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान, अनेक जागतिक नेते राजघाटावर महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत, याचा हा एक मोठा पुरावा असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणखी नऊ वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा प्रारंभ केला. सध्या देशाच्या विविध रेल्वे मार्गांवर २५ वंदे भारत रेल्वे धावत असून आज आणखी नऊ रेल्वेंची त्यात भर पडल्याने त्यांची संख्या ३४ झाली आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग आणि प्रमाण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळत आहे. देशाला अशाच प्रकारचा पायाभूत विकास हवा आहे. नवीन वंदे भारत रेल्वे देश��रातील कनेक्टिव्हिटी सुधारतील आणि या रेल्वे नवीन भारताचा नवीन आत्मा आणि उत्साह दाखवतील. वंदे भारत रेल्वेची लोकप्रियता सतत वाढत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा या वंदे भारत रेल्वे देशाच्या सर्व भागांना जोडतील.
****
नागपुरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळं उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्या कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपये, तर दुकानाचं नुकसान झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेत काल झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात काल पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यातल्या येवती, जाहूर आणि अंबुलगा या तीन आणि देगलूर तालुक्यातील शहापूर आणि नरंगल बुद्रुक या मंडळांचा समावेश आहे. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९ मिलिमीटर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाळुंगी मंडळातल्या लोणवाडी, खडदगाव माळेगाव, तसच बरफगाव मंडळातल्या अनेक गावांमध्ये नदी ओढ्यांना पूर आला. गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरे पडली तसंच २० ते २५ जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, कापूस पिके वाहून गेली आहेत. दरम्यान, प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मध्यरात्रीच्या काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिनी इथल्या एका शेतकऱ्याच्या कुकूट पालनाचं मोठं नुकसान झालं आहे. तीन हजार कोंबड्या पावसामुळे दगावल्या असून त्यांचं खाद्यही वाहून गेले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
****
शिवसेनेच्या दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यातील ५४ आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहेत.
****
नर्मदा परिक्रमा करत असताना आपला आचार हा धार्मिक असतो, विचार हे सात्विक असतात आणि मुखात माते��्याच नामस्मरणाचे उच्चार असतात, असं प्रतिपादन परिक्रमावासी डॉ. नीतू पाटील यांनी केलं आहे. जळगाव इथं आज इंडीयन मेडिकल आसोसिएशन - आयएमए सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जवळपास तीन हजार ६०९ किलोमीटर पायी चालत असताना मातेचं कोटीवेळा नामस्मरण होतं, असं पाटील म्हणाले. व्यासपीठावर जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे आदी हे उपस्थित होते.
****
इंदूर इथल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ४०० धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. सलामीवीर ऋतुराज गायकवाड झटपट बाद झाल्यावर शुभमन गील आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. के एल राहुल ५२ तर ईशान किशनने ३१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव ७२ आणि रवींद्र जडेजा १३ धावांवर नाबाद राहिले.
****
आशियाई क्रीडा स्पर्धांमधे भारतीय महिला क्रिकेट संघानं आज बांगलादेशाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगला देशाचा डाव भारतानं अवघ्या ५१ धावावंर गुंडाळला. हॉकीमधे भारताच्या पुरुष संघानं उझबेकिस्तानचा १६-० असा दणदणीत पराभव केला आणि अ गटात अव्वल स्थान मिळवलं. भारताचा पुढचा सामना सिंगापूरबरोबर होणार आहे.
****
राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी खेळाडू केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. तसेच लातूर जिल्ह्याला कुस्तीची उज्ज्वल परंपरा असून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदगीर येथे लवकरच दिवंगत खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उदगीर येथील पोस्ते पोतदार लर्न कॅम्पसमध्ये आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी बनसोडे बोलत होते.
****
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची परवा मंगळवारी लासलगाव इथं बैठक होणार आहे. सध्या बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आंदोलन सुरू असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून कांदा व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या बेळगाव तालुक्यातल्या घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात नक्षलविरोधी अभियान पथकाच्या पोलिसांना यश आलं आहे. यावेळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरुन असलेली ४ पाकीटं आढळून आली, ज्यात सुमारे १२ किलो स्फोटकं पोलिसांनी हस्तगत केली. २१ सप्टेंबरपासून नक्षलवाद्यांच्या वर्धापन सप्ताहाला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलवादी सक्रिय झाले असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी शास्त्रज्ञांची कामगिरी आणि पंतप्रधान मोदी यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं असं मत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, त्यात भारतीय रिपब्लीकन पक्षाला स्थान मिळावं, अशी मागणी आठवले यांनी केली. आगामी निवडणुका शिवसेना भाजप युतीसोबतच लढवणार असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील काही रेल्वेगाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड ते इरोड एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी २९ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोंबर रोजी, तर इरोड ते नांदेड एक्स्प्रेस १ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर या २ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस उद्या २५ तारखेला तसंच येत्या २ आणि ९ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
पूरग्रस्तांना आता ५ ऐवजी १० हजार तातडीची मदत-उपमुख्यमंत्री अजित पवार
https://bharatlive.news/?p=113532 पूरग्रस्तांना आता ५ ऐवजी १० हजार तातडीची मदत-उपमुख्यमंत्री अजित ...
0 notes
Text
Ajit Pawar | बिग ब्रेकींग! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानवाल्यांना…
Ajit Pawar | राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगानं सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आली आहे.
पूरग्रस्तांना तातडीची मदत
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. यावर्षीपासून 5 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषेदत निवेदनाद्वारे केली आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीनं पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही.
आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार
आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील. रत्नागिरी, ��ायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. Read the full article
0 notes
Text
60 हजारांहून अधिक गॅस शेगड्या पूरग्रस्ताना देणार
60 हजारांहून अधिक गॅस शेगड्या पूरग्रस्ताना देणार
पेट्रोलियम कंपन्यांच्या मदतीने 60 हजारांहून अधिक गॅस शेगड्या पूरग्रस्ताना वितरीत केल्या जाणार आहेत. सोबतच गॅस दुरुस्तीसाठी दोनशेहून अधिक कुशल कर्मचारी हे पूरग्रस्त भागांमध्ये घरोघरी जाऊन गॅस शेगड्यांची मोफत तपासणी करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
. पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
View On WordPress
0 notes
Text
आशिया चषक: देशातील पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तान भारत विरुद्ध ब्लॅक आर्म बँड घालणार | क्रिकेट बातम्या
आशिया चषक: देशातील पूरग्रस्तांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तान भारत विरुद्ध ब्लॅक आर्म बँड घालणार | क्रिकेट बातम्या
पाकिस्तान क्रिकेट संघाचा फाइल फोटो© एएफपी पाकिस्तान क्रिकेट संघ चालू असलेल्या आशिया चषक 2022 च्या भारताविरुद्धच्या त्यांच्या सलामीच्या सामन्यात देशातील पूरग्रस्तांसाठी एकता आणि समर्थन दर्शविण्यासाठी काळ्या आर्म बँडसह खेळणार आहे. “पाकिस्तान क्रिकेट संघ ACC T20 आशिया चषक 2022 च्या भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आज देशभरातील पूरग्रस्तांसाठी त्यांची एकता आणि समर्थन व्यक्त करण्यासाठी काळ्या आर्म…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना संवेदनशीलतेनं वागणूक द्यावी-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सूचना.
अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फीचा राज्याच्या गृहमंत्र्यांचा इशारा.
पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीच्या सानुग्रह अनुदानात दुपटीने वाढ.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन.
आणि
लिंगनिदान तसंच गर्भपातप्रकरणी बार्शी इथं आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
****
कर्ज परतफेडीच्या प्रकरणांमध्ये बँकांनी ग्राहकांना संवेदनशीलतेनं आणि मानवी भावनांचा विचार करुन वागणूक द्यावी अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या आहेत. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. काही खाजगी बँका तसंच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कर्ज परतफेडीच्या प्रकरणात कडक कारवाई करत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं, त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी लोकसभेतून बँकांना या सूचना केल्या.
****
केंद्र सरकारनं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या जमा भविष्य निर्वाह निधी व्याजदरात पाच शतांश टक्क्याने वाढ केली आहे. सन २०२१-२२ साली हा दर ८ पूर्णांक १० शतांश टक्के होता तो आता ८ पूर्णांक १५ शतांश टक्के करण्यात आला आहे.
****
विरोधी पक्षांना मणिपूर प्रकरणी संसदेत चर्चा करायची नसल्याचा आरोप, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. ते आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. मणिपूर प्रकरणी सरकार चर्चा करण्यास तयार असून विरोधी पक्षांनी या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन जोशी यांनी केलं.
दरम्यान विरोधी पक्षांनी आज संसद भवन परिसरात धरणे आंदोलन करत मणीपूर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी केली. या आंदोलनात कांग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, जनता दल युनायटेडचे ललन सिंह, आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांच्यासह इतर विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
दरम्यान आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केलं.
****
अवैध धंद्यांना संरक्षण देण्यात पोलिसांचा सहभाग आढळल्यास त्यांना बडतर्फ केलं जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आज विधान परिषदेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत तारांकित प्रश्न विचारला, त्याला फडणवीस उत्तर देत होते. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पक्ष तसंच जातपात न पाहता कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी रमी तसंच ड्रीम इलेव्हन यांसारख्या ऑनलाइन जुगारांवर बंदी घालण्याची आणि याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रेटीं���र कारवाईची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय देताना हे जुगार नसून ते खेळ आणि कौशल्य असल्याचं म्हटल्यामुळे यावर कारवाई शक्य नाही, मात्र जागृती करणं गरजेचं असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
****
निधीच्या बाबतीत अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला जात असून सत्ताधारी आमदारांना झुकतं माप दिलं जात आहे, असा आरोप विरोधकांनी आज विधान परिषदेत केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत सर्व आमदारांना निधीचं समान वाटप करावं अशी मागणी केली, त्याला फडणवीस उत्तर देत होते.
****
पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीचं सानुग्रह अनुदान दुपटीनं वाढवण्यात आलं आहे. आता पूरग्रस्तांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विदर्भातल्या पूरस्थितीसंदर्भात आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन केलं. त्यावेळी ही माहिती दिली. ते म्हणाले...
ज्या घरात पुरांचं पाणी शिरलं त्या सध्याच्या दरात पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई सुरु करावी आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आत्ताच सरकारने घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी तो आत्ता इथं सांगितला.
****
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत असून, याबाबत रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा 'एनडीआरएफ'चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री पवार उत्तर देत होते.
****
पीक विमा योजनेत विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचं, कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. मराठवाड्यात पावसाअभावी २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्यानं, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये मांडली, त्यावर मुंडे बोलत होते. २४ जुलै पर्यंत राज्यात एक कोटी चार लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असल्याची माहिती मुंडे दिली.
****
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. शंभराहून अधिक मराठी नाटकं, मराठी चित्रपट, तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी अजरामर भूमिका केल्या होत्या, तसंच ३० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केलं होतं. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात सावरकर यांनी काम केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी इथं लिंगनिदान करून घरातच गर्भपात केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल अनंत चौरे यांच्या सदनिकेत हा प्रकार होत असल्याचं उघडकीस आलं. मागील सहा महिन्यात या ठिकाणी ३२ गर्भपात केल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. यातील आठ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
****
मणिपूर प्रकरणात दोषींवर कारवाई करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. ��ा आंदोलनात माजी आमदार संतोष टारफे, यांच्यासह आदिवासी समाजातील नेतेमंडळी सहभागी झाली होती.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या कचरा वेचक घंटा गाड्या येत्या एक ऑगस्टपासून फक्त ओला - सुका असं वर्गीकरण केलेला कचराच घेणार आहेत. महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहर स्वच्छ करण्यासाठी “हम होंगे कामयाब” हा उपक्रम प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आला आहे. जी श्रीकांत यांनी आज स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. प्रबोधन केल्यानंतरही जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देण्यास नकार देतील, त्यांचा एकत्रित असलेला कचरा परत करण्याचे निर्देश जी श्रीकांत यांनी दिले.
****
धुळे इथल्या पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि धुळे महापालिकेच्या वतीनं शहरानजिक प्रसिद्ध लळींग किल्ल्यावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत किल्ल्याच्या मार्ग आणि परिसरातील केर कचरा, प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्या गोळा करत किल्ल्याच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. महापौर प्रतिभा चौधरी यांनी स्वतः या मोहिमेत भाग घेऊन उपस्थितांचा उत्साह वाढवला. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं पोलिस निरीक्षक चौधरी यांच्या सहकार्यानं सुमारे शंभर ते सव्वाशे पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. लळिंग किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असून धुळ्यासह आणि अनेक जिल्ह्यातील नागरिक या किल्याला आवर्जून भेट देतात.
****
शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज आषाढी वारी करून शेगाव इथं परतली. काल पालखी सोहळा खामगाव शहरात पोहोचला होता. आज जिल्हाभरातले भक्त मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खामगाव ते शेगाव या १८ किलोमीटर मार्गावर प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं चहापान तसंच फराळाची मोफत सेवा देण्यात आली.
****
0 notes
Text
आलिया- रणबीरने केली पाकिस्तानच्या पूरग्रस्तांना मदत? काय आहे व्हायरल ट्वीटमागचं सत्य
आलिया- रणबीरने केली पाकिस्तानच्या पूरग्रस्तांना मदत? काय आहे व्हायरल ट्वीटमागचं सत्य
आलिया- रणबीरने केली पाकिस्तानच्या पूरग्रस्तांना मदत? काय आहे व्हायरल ट्वीटमागचं सत्य आलिया आणि रणबीरबाबत हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होतंय. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक चित्रपट आणि कलाकारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. लोकांच्या रागाचे कार�� केवळ रणबीर कपूरचे जुने वादग्रस्त व्हिडिओ नाहीत. आता आलिया आणि रणबीरने…
View On WordPress
#आताची बातमी#आलिया#आहे#एंटरटेनमेंट बातम्या#काय?#केली#ट्रेंडिंग बातमी#ट्वीट���ागचं#न्यूज अपडेट मराठी#पाकिस्तानच्या#पूरग्रस्तांना#फ्रेश बातमी#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मदत#मनोरंजन#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रणबीरने#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#व्हायरल#सत्य#सिने जगत#सिने सृष्टी#सेलेब्रिटी न्यूज
0 notes
Text
भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत तीन हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत तीन हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
भंडारा, दि. 17 : जिल्ह्यातील नदी – नाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला आहे. आज (दि. 17) रोजी पाच वाजता कारधा लहान पुलाच्या धोका पातळीपेक्षा पाणी अधिक म्हणजे 247.70 मीटर जलप्रवाह होता, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. भंडारा…
View On WordPress
0 notes
Text
पूरग्रस्तांना मदत करा ,राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी
पूरग्रस्तांना मदत करा ,राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी
केरळमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे ९ जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोवीस तासांत २४ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. वायनाडमध्ये दरड काेसळून अनेक लोक अडकले असून पैकी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. १०० लोकांना वाचवण्यात आले.
वायनाडसह केरळमधील पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना केले. उभय…
View On WordPress
0 notes