#पिंपरी चिंचवड बातम्या
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 9 months ago
Text
बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने सपोर्ट देण्यात आला असून ही इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही इमारत कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे या इमारतीच्या आजूबाजूचा रस्ता आणि परिसर रिकामा करण्यात आला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
PCMC Bandh : राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आज पिंपरी-चिंचवड बंद; संभाजीराजेंचा आंदोलनाला पाठिंबा
PCMC Bandh : राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आज पिंपरी-चिंचवड बंद; संभाजीराजेंचा आंदोलनाला पाठिंबा
PCMC Bandh : राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आज पिंपरी-चिंचवड बंद; संभाजीराजेंचा आंदोलनाला पाठिंबा Pimpri Chinchwad Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पुकारला आहे. Pimpri Chinchwad Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी राजकीय पक्ष आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 26 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईतल्या टिळक भवन इथं आज होत आहे. या बैठकीनंतर याच ठिकाणी वाजता काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयकांची बैठक होणार आहे. दरम्यान, चेन्नीथला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून भेट घेतल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
या जाहीरनामा समिती���ध्ये पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, समीर भुजबळ, आमदार इद्रीस नायकवडी, प्रवक्ते अविनाश आदिक, रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. याकाळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणं, मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढवणं, अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला, त्यावेळी काल ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीत मुख्यालय सोडू नये. याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.
****
दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे पुणे विभागातून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी ५०४ जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. २७ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या १६ ते १८ तारखेदरम्यान प्रवाशांनी सामानात, शरीरात आणि कचरापेटीत लपवून आणलेलं १ कोटी ७० लाख रुपये किमतीचं २ किलो ४२७ ग्रॅँम सोनं आणि ४२ लाख १४ हजार रुपये किमतीचे महागडे ७ फोन विमानतळ गुप्तचर आणि टेहळणी विभागानं जप्त केले आहेत. केनिया, जेद्दाह, दुबई आदी देशांमधून हे सर्व साहित्य बेकायदेशीर पद्धतीनं विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं.
****
जळगांव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात परतीच्या पावसानं काल संध्याकाळी आणि मध्य रात्री पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी पावसामुळं वेचणीवर आलेला कापूस, मका आणि कडधान्याचं अतोनात नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा इथं काल अंगावर वीज पडून ६५ वर्षीय पांडुरंग त्र्यंबक महाजन यांचा मृत्यू झाला; तर दुसऱ्या घटनेत वीज पडून बैल आणि दोन वासरं ठार झाली. त्यापूर्वी अग्नावती आणि गडद नदीला सोमवारी आलेल्या पुरात तिघांचा बडून मृत्यू झाला होता. परतीच्या प्रवासात गेल्या सहा दिवसात जळगाव जिल्ह्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे.
****
भारत आणि न्यझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील आज चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळं थांबला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद ३४४ धावा झाल्या आहेत. सर्फराज खान यानं शतक साजर करत १२५ धावांवर ऋषभ पंतनं ५३ धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला तर न्युझीलंडनं पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या होत्या.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
निवडणूक आयोगाचा अश्विनी जगताप यांना दणका!
Tumblr media
चिंचवड | पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार (Bjp) अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलाय. अश्विनी ��गताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज (Paid News) प्रकरणी नोटीस धाडली आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे. पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अश्विनी जगताप यांचं लेखी उत्तर मागवलं आहे. 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे. दरम्यान, मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे 43 लाख रुपयांची रोकड, चार लाख 97 हजार 625 रुपये किंमतीचे मद्य आणि 94 हजार 750 रुपयांचा 3  किलो 584 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. ��हत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
'पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार'
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार’
पिंपरी : ‘आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शिवसेनेकडून युवा सेन���प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. त्यांनी जास्तीत जास्त सभा घेण्याचे आश्वासन दिले आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या समवेत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली. शिवसेनेचे पुणे जिल्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
पिंपरीत भीषण अपघात: दुचाकीला डंपरची धडक, शंभर मीटरपर्यंत नेलं फरफटत, पोरासमोर बापाचा अंत
Pimpri-Chinchwad Accident: पुण्यात चांदणी चौकात झालेल्या अपघातानंतर आज सायंकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम, प्रशासनाला सतर्कतेच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
राज्य परिवहन महामंडळाचा ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम
अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत होणार आयोजन
बीड जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाई, १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठी लढत, ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात  
****
मुंबईसह राज्यभरात काल पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, तसंच मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक ��ाटरस्ते बंद केले आहेत. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
दरम्यान, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागाती�� नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हवामान विभागानं पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
****
नाशिक जिल्हयात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक धरणांमधला विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून आठ हजार १००, दारणा धरणातून २२ हजार ३८३ तर नांदूरमध्यमेश्वर मधून ५४ हजार २३३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, नाशिक शहरात गोदावरी नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला. महावितरणमध्ये अभियंता असलेला यग्नेश पवार हा रामकुंडाजवळ पुजाविधी करत असताना पाय घसरुन नदीत पडल्यानं वाहून गेला. कालपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. मालेगाव तालुक्यातल्या मालधे गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेले सुमारे १२ जण पुराचं पाणी वाढल्याने पात्रातल्या एका टेकडीवर अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातून २७ हजार, तर निळवंडे धरणातून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडलं जात आहे. यंदा पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे.
गेल्या तीन दिवसात जायकवाडी धरणात सहा टीएमसी पाणी दाखल झालं असून, धरणाचा पाणीसाठा सात टक्क्यांनी वाढला आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यानं शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.
****
अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलन मार्गदर्शन समितीच्या बैठकीत संमेलन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथं काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ११ लाख ८५ हजार ६८ रूपये किंमतीची १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त केली. तसंच बीड, अहमदनगर आणि धाराशिव इथं काल विभागातर्फे विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ६ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची ६ हजार ९४२ किलो भेसळ जप्त करण्यात आली.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उप��न्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आज कांस्यपदकासाठी खेळणार आहे. काल उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या विक्टर अक्सेलसेनकडून त्याला पराभव पत्कारावा लागला. महिला टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांचा चमू उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी खेळेल. ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बीड इथला अविनाश साबळे तीनशे मीटर स्टीपलचेस प्र��ारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
****
कोलंबो इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला श्रीलंकेकडून ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ५० षटकात २४० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला भारताचा संघ ४३व्या षटकात २०८ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदीरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदीरात भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह खुलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
लातूर इथं काल सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘चला सावली पेरुया’ या वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
****
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच भोकर तालुक्यातल्या मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची पाहणी केली.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपान्त्य फेरीत धडक, तर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव
****
मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अ��ेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद इतका केला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करायची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. सिंहगड, एकता नगर भागातल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
ताम्हिणी घाटासह पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसंच धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला असून उजनी धरण ९० टक्यांहून अधिक भरलं आहे.
****
पुण्यात सुरू अ��लेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.
****
महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे आदींची निवड करण्यात आली आहे.
****
भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. नंदुरबार इथं आज झालेल्या जिल्हास्तरीय विस्तारित बैठकीत त्या बोलत होत्या. एकनाथ खडसे यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.
****
अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात आज भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
तर दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात लक्ष्यला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन कडून २२ - २०, २१ - १४ असा पराभव पत्करावा लागला. आता कांस्य प��कासाठी लक्ष्यचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडुसोबत होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुर असलेल्या दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं निर्धारित षटकात नऊ बाद २४० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने तीन, कुलदीप यादवने दोन, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
लातूर इथं आज सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘चला सावली पेरुया’ या वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सांगली-साताऱ्यात वृक्ष लागवडीसाठी पाच लाख वृक्षांच्या बिया पाठवण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यासह पंधरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उप्रकम पोहोचवण्याचं उद्दीष्ट असल्याचं शिंदे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
****
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या जल कायदा, धोरण आणि शासन या नव्या अभ्यासक्रमाचं औपचारिक उद्घाटन आज माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. जल व्यवस्थापनासाठी सर्व राज्यांनी एकत्रितपणे एका दिशेने प्रयत्न करण्याची गरज, प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू ए. लक्ष्मीनाथ, गोदावरी विकास महामंडळाचे कार्य़कारी संचालक संतोष तीरमनवार, उद्योजक राम भोगले यावेळी उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचं अभिनंदन केलं असून, ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
सांगली इथं आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात ४५ संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी कृषी, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसंच शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यातले बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नांदेडचे विकास माने आणि अनुप पाटील या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच जिल्ह्यात डॉ. सचिन खल्लाळ आणि क्रांती डोंबे यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलिना ��ोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.
नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार आहेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.
****
राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.
****
पुण्यानजीक खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.
खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा ��िसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं सुरु होत आहे.
****
1 note · View note
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नवव्या दिवशी, भारताचे खेळाडू विविध खेळप्रकारांच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये आपलं कसब पणाला लावणार आहेत. गोल्फ प्रकारात शुभंकर शर्माचा सहभाग असलेला खेळ दुपारी साडेबाराला सुरु झाला. हॉकीच्या संघाची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनसोबत दुपारी दीडला लढत आहे. तर, याचवेळी ॲथलेटीक्सच्या अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात पारुल चौधरीचा सहभाग आहे. लांब उडी प्रकारात जेस्वीन आल्ड्रीन अडीच वाजता खेळणार आहे. त्यानंतर मुष्टीयुध्द ७५ किलो वजनी गटात लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत तीन वाजता खेळेल. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा पुरुष एकेरी उपांत्य फेरीचा सामना साडेतीनला आहे. याचवेळी नौकायन प्रकारात पुरुष गटात विष्णु सर्वनन, तर महिला गटात नेत्रा कुमानन संध्याकाळी सहाला खेळणार आहे.
नेमबाजीत २५ मिटर मीटर रैपिड फायर पिस्टल प्रकारात अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धूचा सहभाग असलेला खेळ थोड्या वेळेपूर्वी सुरु झाला आहे
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार आहेत. या जनसन्मान यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर इतर आठ जणांचा सहसमन्वयक म्हणून समावेश केला आहे.
****
राज्यस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इंथ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विजयघाट इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर जात त्यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाची जाज्वल्य आठवण म्हणून मराठवाड्यातील मुक्ती संग्राम स्मारकाची निर्मिती होत असून, ही निर्मिती परिपूर्ण होण्यासाठी सुधारीत नव्या बाबींचा समावेश आराखड्यात करुन हा सुधारीत प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
मुक्तिसंग्राम स्मारकासंदर्भात पालकमंत्री सत्तार यांच्या समोर काल सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातील संतांच्या आभासी प्रतिमा, आठही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे स्तंभ, जिल्ह्यांची ओळख दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांचं प्रतिबिंब बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा, कला दालन, अजिंठा-वेरूळ लेण्यातील चित्रे, मराठवाड्याचा इतिहास दर्शवणाऱ्या माहितीपटाचं सादरीकरण स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसाठी होणार आहे.
****
पुण्यानजीक खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात सुरू असणारा विसर्ग आज सकाळी अकरा वाजेनंतर पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक यानुसार बदलून वाढवण्यात येत आहे. पुण्याच्या सिंचन भवनाद्वारे ही महिती देण्यात आली आहे.
खडकवासलासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या सुमारे १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात झाला आहे. तरीही आज अखेरपर्यंत या धरण साखळीत सुमारे ७३ पूर्णांक ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. विसर्ग सुरु असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून, त्या परिसरातील धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. ताम्हिणी घाटासह जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर परिसरात वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांसह आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनानं द��ले आहेत.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत याच्या अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात उद्या कृषी मार्गदर्शन - प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल पंधरवडा निमित्त आयोजित आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी साडे अकरा वाजता होणाऱ्या या शेतीविषयक कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह नागरीकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
भारत-श्रीलंके दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना थोड्याच वेळेत दुपारी अडीच वाजता कोलंबो इथं सुरु होत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरी होत आहे. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीस लागू दे, तसंच प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केली आहे. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी १०३ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या महापूजेनंतर बोलताना केली -
तिरूपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्‌धत आपण करू या. याला लागणारे १०३ कोटी रूपये शासन तात्काळ देईल एवढी खात्री मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या, महापुजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
****
शिर्डी इथं आज साईबाबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्तानं मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते आज महापूजा करण्यात आली.
प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. ही पालखी नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून आहेत.
****
मुस्लिम धर्मियांमध्ये करबला युद्धातल्या बलिदानाचं स्मरण करून देणारा मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुस��न यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ताजिया मिरवणूक काढली जाते.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
****
लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या एकोणीस तारखेला सातारा इथे पोहचणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. हा सोहळा अत्यंत दिमाखदार आणि राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून, ती सकाळी दहा ते पाच या वेळेत नागरिकांना पाहता येतील.
****
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आदित्य यांचा काल एका रस्ता अपघात��त मृत्यू झाला. बारामती तालुक्यात रुई लिम्टेक मार्गावर धावत्या कारचं टायर फुटून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष श्रेठींकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय परवा १९ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर इथं ही माहिती दिली.
****
पुण्यातल्या पिंपरी चिंचवड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक तसंच कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरी होत आहे. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तिभाव, नम्रता आणि करुणा वाढीस लागू दे, तसंच प्रामाणिकपणे सर्वांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केली आहे. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी १०३ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या महापूजेनंतर बोलताना केली -
तिरूपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्‌धत आपण करू या. याला लागणारे १०३ कोटी रूपये शासन तात्काळ देईल एवढी खात्री मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या, महापुजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
****
शिर्डी इथं आज साईबाबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्तानं मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते आज महापूजा करण्यात आली.
प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळी आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. ही पालखी नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून आहेत.
****
मुस्लिम धर्मियांमध्ये करबला युद्धातल्या बलिदानाचं स्मरण करून देणारा मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ताजिया मिरवणूक काढली जाते.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २२ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं २१ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करतील.
****
लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत्या एकोणीस तारखेला सातारा इथे पोहचणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. हा सोहळा अत्यंत दिमाखदार आणि राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून, ती सकाळी दहा ते पाच या वेळेत नागरिकांना पाहता येतील.
****
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आदित्य यांचा काल एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. बारामती तालुक्यात रुई लिम्टेक मार्गावर धावत्या कारचं टायर फुटून हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष श्रेठींकडे पाठवला आहे. याबाबतचा निर्णय परवा १९ तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर इथं ही माहिती दिली.
****
प��ण्यातल्या पिंपरी चिंचवड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक तसंच कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. मुंबईत गेल्या सहा तासात विविध ठिकाणी ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आझाद नगर मेट्रो स्थानकाखाली पाणी साचलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातल्या सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सांगण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन त्यांनी ट्विट संदेशातून केलं आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक, लवकरच पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या पावसामुळे उद्‌भवलेली परिस्थिती आणि ती पूर्ववत करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी, यासंदर्भात माहिती देतांना, सध्या कुर्ला आणि सायन या दोन ठिकाणी पाणी साचलेलं असून, त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं सांगितलं. येत्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा केसरकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मध्य रेल्वे सेवा सध्या बंद असून सर्व लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटं उशिराने धावत आहेत. मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी आणि गोदावरी एक्सप्रेस ��लग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी या रेल्वेगाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आणि त्या पुढे धावणार नसल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली.
****
विधान परिषदेत आज अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, या चर्चेत सहभागी होत हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, महिला तसंच उपेक्षितांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. सीमाभागातल्या मराठी शाळा, रायगड पर्यटन आराखडा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्यासह विविध मागण्याही दरेकर यांनी सरकारकडे केल्या.
****
राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले निरंजन डावखरे, किशोर दराडे, आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.
****
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गंत अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी सोलापूर शहरातल्या दोन ई-सेवा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना महा-ई सेवा केंद्रांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत, मात्र या केंद्र चालकांनी अर्ज भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.
****
फुलंब्री इथल्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. उज्ज्वला पालकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
पुण्यात झिकाचा प्रसार वाढत असून शहरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात ४२ वर्षीय महिलेला, तसंच खराडी इथल्या एका २२ वर्षीय तरुणाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील झिकाबाधित रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार पासूनच्या संततधार पावसामुळे अनेक प्रकल्प तुटुंब भरले आहेत. खामगाव तालुक्यात शेतपिकाचं मोठं नुकसान झालं असून, रस्ते वाहतूक बंद झाली आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या परिसरातल्या गावांचा संपर्क तुटला आहे.
****
पुण्यात निगडी इथं बेकायदा घुसखोरी करून राहणाऱ्या ४२ बांगलादेशी लोकांचे भारतीय पासपोर्ट पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने रद्द केले आहेत. निगडी परिसरात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केल्याचं, वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
नाशिक मध्ये अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहना��ं, उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिल्यानं एक ठार तर तिघे जखमी झाले. चांदवड-मनमाड रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अवैध मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करत असतांना, आरोपींच्या गाडीनं पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा शांत-उद्या मतदान
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग-
छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात ३५ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचं चंदन जप्त-दोन जण ताब्यात
आणि
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात मतदार जागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा काल थंडावल्या. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांसह राज्यातल्या सोलापूर, माढा, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, या ११ मतदारसंघात उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत सभा, मेळावे घेत प्रचार फेऱ्या काढल्या, द्वारसभांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भर दिसून आला.
****
कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला, तर इंडिया आघाडीसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते नितीन गडकरी प्रचारात सहभागी झाले होते. त्यांनी टेंभुर्णे इथंही सभा घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण इथं सभेला संबोधित केलं, तर सोलापूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर इथं संकल्प मेळावा घेतला.
बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारांना साद घातली.
सांगली लोकसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज इथं केसांचा चौकात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.
महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली, तर सावंतवाडीत भाजपा उमेदवार नारायण राणे यांनी प्रचारसभा घेतली.
लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, काँग्रेस नेते अमित देशमख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातही जाहीर प्रचार थांबला असून, आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाटीभेटींसह, माध्यमांच्या जाहिरातींवर उमेदवारांचा अधिक भर दिसून येत आहे.  
****
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानेही आता वेग घेतला आहे.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज राज्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथं, तीन च्या सुमारास पिंपरी-चिंचवड इथं, तर संध्याकाळी साडे चार वाजता रायगड जिल्ह्यातल्या खारघर इथं ते प्रचारसभा घेणार आहे.
��ालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्राचारार्थ काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना शहरात सभा घे��ली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल वैजापूर इथं पदयात्रा काढली, तर पक्षाचे प्रमुख असदउद्दीन ओवैसी यांची संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेतली असून,  महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
****
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जी भाषा पाकिस्तान करतो, तीच भाषा काँग्रेस का करत आहे, असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विधीज्ञ उज्वल निकम यांच्या संदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत, वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केल्याचं शेलार यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसची ही भूमिका मान्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. विधीज्ञ निकम ही यावेळी उपस्थित होते, आपल्याकडे बरीच माहिती आहे मात्र देशहित म्हत्वाचा असल्यानं आपन काही बोलत नाही असा इशारा त्यांनी दिला.
****
भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी प्रमुख वर्तमानपत्रांत काल प्रसिद्ध केलेली जाहिरात, मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार, काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
कामगारांना मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा, यासाठी सर्व क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं आहे. मतदान करण्यास सवलत मिळाली नाही, अशी तक्रार दाखल झाल्यास संबंधिताविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण अहमदनगर आणि शिर्डी या मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम समाज माध्यमांवर ही ऐकता येईल.
****
छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तीन नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वरतु मोहिमे अंतर्गत या नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत प्रोत्साहन म्हणून या सर्वांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले जातील.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोटी रुपये मूल्याचं चंदन जप्त करण्यात आलं. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल पहाटे केलेल्या या कारवाईत चंदनाचा सुमारे १२०० किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली, गाडे यांचं परवा छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं काल शहरातून संचलन केलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात आजपासून मतदार जनजागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी काल रात्री अचानक आंतरराज्य सीमेवरील स्थिर निगराणी पथकांना भेट देवून तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. रोकड, मद्य किंवा इतर प्रतिबंधित पदार्थ, वस्तूंची वाहतूक होवू नये, यासाठी स्थिर निगराणी पथकावर वाहनांची तपासणी केली जात आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा अन्य अधिकारी कर्मचारी जे कर्तव्यावर आहेत, अशा एकूण ६२२ मतदारांनी आतापर्यंत टपाली मतदान केलं आहे.  सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात १० ते १२ मे दरम्यान उर्वरित पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात काल एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मेहकर नजीक काल सकाळी हा अपघात झाला, जखमींना छत्रपती संभाजी नगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण जवळ टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा २१ वर्षीय युवक काल संध्याकाळी दुचाकीवर त्याच्या आईसह शेवगाव इथं जात असताना हा अपघात झाला.
****
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. क्षितीज झारापकर यांनी गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, ��यडियाची कल्पना आदी चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जला २८ धावांनी हरवलं. तर अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायन्ट्सचा ९८ धावांनी पराभव केला. आज या स्पर्धेत मुंबईत मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघादरम्यान सामना होणार आहे.
****
राज्यात काल सोलापुरात सर्वाधिक  ४४ पूर्णांक ४ दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली
मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक सात, नांदेड ४२ पूर्णांक ८, बीड ४२, तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान ४१ पूर्णांक सहा एवढं नोंदवलं गेलं.
दरम्यान, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 06 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं १५ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध संपर्क व्यवस्था प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. देशातल्या पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचंही त्यांनी उद्घाटन केलं. पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गिकेचं उद्घाटन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी करण्यात आलं.
या कार्यक्रमासाठी मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज असून, मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार असल्याचं  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री एक���ाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचं प्रकाशन शहा यांच्या हस्ते झालं. मुंबईत आज वांद्रे - कुर्ला संकुलात आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, काल रात्री मुंबईत आल्यानंतर शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधल्या घटक पक्षांशी चर्चा केली.
****
शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्च पर्यंत राबवला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात विविध प्रकारच्या दस्त प्रकरणी १८० कोटीहून अधिक रुपयांचे शुल्क माफ करत नागरिकांना शासनाने मोठा दिलासा दिला असून, १७३ कोटीहून जास्त रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यात ड्रोन मिशन राबवण्याबाबत राज्य शासन आणि मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेदरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञाना��ा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात येणार आहे. या मिशनच्या प्रकल्पांतर्गत पाच वर्षासाठी २३ हजार ९६३ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तर आयआयटी, मुंबईला १५ हजार १८१ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या नऊ ते ११ मार्च दरम्यान छत्रपती शिवरायांवरच्या महानाट्याच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली. नांदेड शहरातल्या सर्कस मैदानावर होणारं हे महानाट्य सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
****
धुळे इथं झालेल्या पहिल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या परिषदेत ७४ गुंतवणूकदारांनी तब्बल एक हजार ६६२ कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. उद्योग विभागासोबत सामंजस्य करारही करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात किमान चार हजार २९१ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर- रत्नेश्वर देवस्थानचा ७१ वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, त्या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आठ तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वर्ष २०२३-२४ साठी नांदेड जिल्ह्यातल्या, पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येत्या १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस वाय एन डॉट महा समाज कल्याण डॉट इन, या संकेतस्थळावर भरून त्या अर्जाची प्रत, समान संधी केंद्राकडे जमा करणं बंधनकारक आहे. परभणी जिल्ह्यातही या योजनेला येत्या एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर  
२१व्या शतकातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त
९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवरील परिसंवादात मान्यवरांचा सहभाग
आणि
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यशस्वी जैस्वालचं द्विशतक;भारताला १७१ धावांची आ��ाडी
****
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही घोषणा केली. देशाच्या विकासात अडवाणी यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं. राजकीय नैतिकतेमध्ये अडवाणी यांनी अनुकरणीय मानदंड स्थापन केल्याचं, मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधानांसह इतर मान्यवर नेत्यांनी अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे.
या सन्मानाबद्दल अडवाणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. आपण आयुष्यभर पालन केलेल्या आदर्श आणि तत्‍वांचा हा सन्मान असल्याची भावना अडवाणी यांनी व्यक्त केली आहे
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखा आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा 'आशा भोसले पुरस्कार' यंदा सुप्रसिध्द पार्श्वगायक, संगीतका�� शांतनू मुखर्जी उर्फ शान यांना जाहीर झाला आहे. शाल, सन्मान चिन्ह आणि एक लाख ११ हजार रुपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराचं यंदा २०वं वर्ष आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी देश पातळीवर हा पुरस्कार दिला जातो, येत्या ११ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
२१व्या शतकातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं विधीज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. न्यायदानामधील सिमेपलीकडील आव्हानं हा या परिषदेचा विषय आहे. कधीकधी एका देशात न्याय सुनिश्चित करण्यासाठी इतर देशांसोबत काम करणं आवश्यक असून, त्यामुळे अधिक चांगल्या आणि जलद न्याय वितरणाला चालना मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षांत भारताने कायदेशीर व्यवस्थेत अनेक सुधारणा केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आमदार गायकवाड यांनी काल पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली, तर दोन जण फरार झाले.
दरम्यान, या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं, त्यानुसार गुन्हे शाखेने लगेचच तपास सुरू केला आहे.
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायदा सुव्यवस्थेबाबत सत्ताधाऱ्यांची बघ्याची भूमिका असल्याची टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात बोलतांना, आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ��ाणे इथल्या रुग्णालयात महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केल्याचं वृत्त आहे.
****
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेनं राबवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कराड यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना, पतसंस्थेच्या मालमत्तेचा लिलाव तसंच कर्जदाराने कर्ज घेताना पुरेसं तारण दिलं किंवा नाही याबाबत तपासणी करावी आणि सर्व प्रक्रिया जलद राबवण्याची सूचना कराड यांनी केली आहे.
****
भारत तांदूळ या ब्रँड अंतर्गत ग्राहकांसाठी तांदळाची किरकोळ विक्री सुरू करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. पहिल्या टप्प्यात, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार या तीन संस्थांमार्फत भारत तांदूळ ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी, पाच लाख मेट्रिक टन तांदळाचं वितरण करण्यात येणार आहे. सामान्य ग्राहकांना हा भारत तांदूळ २९ रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध होणार आहे. पुढल्या आठवड्यापासून हे वितरण सुरू होणार आहे. दरम्यान, तांदळाचे व्यापारी, घाऊक तसंच किरकोळ विक्रेते, साखळी विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि तांदळाचा साठा करणाऱ्या इतर आस्थापनांकडच्या साठ्याची माहिती केंद्र सरकारने मागवली आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आजच्या दुसऱ्या दिवशी विविध परिसंवाद झाले. 'राजकीय आणि सामाजिक प्रदुषणावर संत साहित्य हाच उपाय' या विषयावरील परिसंवादात, संतांनी समाजकल्याणासाठी धर्माचा वापर केला, तसंच जातिभेद नष्ट करत, एकोप्याने राहण्याचा मार्ग दाखवला, असा सूर सहभागी मान्यवरांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं 'तृतीयपंथी समुदायाचं मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या विषयावर परिसंवाद झाला. मुख्य प्रवाहातील साहित्यात तृतीयपंथी समाजाच्या जगण्याचं, समस्यांचं चित्रण झालं, तरच समाज त्याची दखल घेईल, असं मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यांनी व्यक्त केलं.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी, भारताने दुसऱ्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाने आज आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २५३ धावा केल्या. भारताकडून जसप्रित बुमराहने ६ तर कुलदीप यादवने ३ खेळाडू बाद केले. दरम्यान, आज सकाळी भारतीय संघाने कालच्या सहा बाद ३३६ धावसंख्येवरुन आपल्या डावाला पुढे सुरुवात केली, तीनशे ९६ धावांवर संघ सर्वबाद झाला. यशस्वी यादवने आपलं दुहेरी शतक पूर्ण करत सर्वाधिक २०९ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेंव्हा भारतीय संघाने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १५ तर कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर नाबाद आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहिमेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले सुधाकर मेहेत्रे तसंच स्नेहल काळे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली.
****
गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक सेवेकरी म्हणून आलो असल्याची भावना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते आज बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या गहिनीगडावर श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात बोलत होते. गडाच्या विकास कामांसाठी यापूर्वी २५ कोटी रुपये निधी दिला असून, गरज पडल्यास पुन्हा २५ कोटी रुपये निधी देऊ, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
संत नामदेव यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित्त उद्या नांदेड इथं राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाची सुरुवात श्री सचखंड गुरुद्वारा इथून सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम हे राहणार आहेत.
****
संशोधित वितरण क्षेत्र योजनेसह केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध योजनांमधील विद्युत विकासाची कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत जिल्ह्यासाठी २५ हजार ग्राहकांना छतावर सौरऊर्जा देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. वा‍हिनी विलगीकरणासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसर्या टप्प्यात निवड झालेल्या उपकेंद्रांना प्राधान्य ‌द्यावं, तसंच जे शेतकरी कृषिपंप जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित आहेत, अशा शेतकऱ्यांना कुसुम-ब योजनेतून सौर कृषिपंप घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना रेशमे यांनी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कालपासून सुरू झालेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला कलारसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात आज अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांचं सरोद वादन, आणि सुफी गायक कैलाश खेर यांचं सादरीकरण होणार आहे.
****
0 notes